मित्रांनो,
मराठी भाषेचा अभिमान आपल्याला महाराष्ट्रात राहून साहजिक वाटतो. तसाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस अभिमान व कामगिरी 'जया' यांनी 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू करून केली आहे.
आपली बोली भाषा टिकवून त्यातील विविध भाग रंजक व अभिनव प्रकारे कशी वापरता येतील असे सुचवणारे पर्याय शोधले आहेत. जगभरात पसरलेल्या तंजावरच्या मराठी भाषी बांधवांना एकत्र करून या बोलीभाषेसाठी एक शब्दकोश करायचे काम चालू असल्याचे भाग ७ मधे श्री. साई जनार्दन यांच्या भाषणातून कळते.
हैयो हैयैयोंनी या स्थळाचा परिचय करून दिल्याबद्दल त्यांचे आभार.
या शिवाय अन्य भागांचा परिचय मिसळपाव सदस्यांनी फावल्या वेळी ऐकून आपापल्या मित्रमंडळींना कळवून या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा ही विनंती...
प्रतिक्रिया
21 Feb 2014 - 12:58 pm | बॅटमॅन
अतिशय धन्यवाद याच्यासाठी!!!! त्या निमित्ताने ही बोली कळेल तरी. सहीच!!!
शेअर तर होणारच.
21 Feb 2014 - 1:06 pm | पैसा
या मंडळींनी फार मोठं काम केलंय. हे प्रकल्प असेच सुरू राहू देत ही शुभेच्छा!
21 Feb 2014 - 2:21 pm | सूड
अरे वा!! मस्तच !!
21 Feb 2014 - 2:24 pm | धर्मराजमुटके
सुपर्ब .....केवळ अप्रतिम शशिकांत साहेब ह्या माहितीसाठी.
मी पाचवा भाग ऐकला. लग्नाबद्दलची माहिती आहे.
तंजावर तामीलनाडूमधे असले तरी ही भाषा हेलाच्या बाबतीत कानडी भाषेच्या जवळ जाणारी वाटते.
लग्नपद्धती बर्याच प्रमाणात महाराष्ट्रातील पद्धती जवळ जाणार्या आहेत.
(हेल : उच्चार)
21 Feb 2014 - 2:46 pm | बॅटमॅन
हे वाचून
या स्पष्टीकरणामागचे कारण उलगडले. अर्थात बहुतेकांना ते कनेक्शन ध्यानात येईल याची शक्यता कमीच आहे ;) =))
21 Feb 2014 - 3:36 pm | सुनील
कन्नडमध्ये उच्चाराला हेल असा शब्द आहे काय?
21 Feb 2014 - 3:39 pm | बॅटमॅन
'हेल'णे म्ह. कन्नडमध्ये बहिर्दिशेस जाणे असा अर्थ आहे.
21 Feb 2014 - 3:40 pm | धर्मराजमुटके
नाही हो ! हा मराठी शब्द आहे. शुद्ध मराठीत सांगायच तर accent. म्हणजे उच्चारणाची लकब.
21 Feb 2014 - 6:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
23 Feb 2014 - 10:31 pm | शशिकांत ओक
Dhanyawad Jaya, for mentioning Misalpav.com from your podcast.
You can keen reading comments here.
http://www.misalpav.com/node/27100
Keep posting many interesting verbal expressions.
I happened to write one personal experience in Marathi. Some portion of that has been written by my friend Amith Chandran in Tanjavouri Marathi. If found interesting, that part of story could be told in Tanjavoori accent for your listeners in future episodes.
Can you read this in Devanagari? Dhanyawad Jaya, for mentioning Misalpav.com from your podcast.
You can keen reading comments here
http://www.misalpav.com/node/27100
Keep posting many interesting verbal expressions.
I happened to write one personal experience in Marathi. Some portion of that has been written by my friend Amith Chandran in Tanjavouri Marathi. If found interesting, that part of story could be told in Tanjavoori accent for your listeners in future episodes.
Can you read this in Devanagari? पुमपुहारचे भीषण समुद्र स्नान
If yes, will email the article.
21 Feb 2014 - 6:26 pm | शशिकांत ओक
मित्रांनो, हेल कळला. आपण तत्परतेने त्यांच्या साईटचे सदस्य झालात का?
वाचकांना विनंती की े काही भागां ऐकून इतरांना उत्तंच माहिती सांगावी.
23 Feb 2014 - 5:15 pm | धर्मराजमुटके
मी हा धागा वाचल्यापासून "माजं अस्तित्त्व" ला नियमितपणे भेट देत आहे. आज भागपॉडकास्टचा बारावा भाग ऐकला. त्यात जया राव ह्यांनी शशिकांत ओक ह्यांना आणि मिसळपाव.कॉम ला धन्यवाद दिलेत.
या भागात जया राव ह्यांनी त्यांना ना महाराष्ट्राने स्वीकारले ना तामिळनाडूने अशी खंत बोलून दाखविली आहे. आपल्या या मराठी बांधवांच्या मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्यच आहे.
23 Feb 2014 - 10:36 pm | शशिकांत ओक
मित्रांनो धर्मराज मुटके यांनी प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे इथे तो भाग ऐकायला मिळेल.
21 Feb 2014 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
फारच महत्वाचा आणि सुंदर प्रकल्प आहे ! अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे !
21 Feb 2014 - 8:35 pm | श्रीनिवास टिळक
(१)तंजावर भागात गेल्या चारशे वर्षांपासून रहात असलेल्या आपल्या मराठी बांधवांनी भाषा टिकवून ठेवण्यासाठी काय प्रयत्न आणि प्रकल्प चालू केले आहेत त्याबद्दल ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
(2)भारतातला चार महिन्यांचा मुक्काम आटोपून मी नुकताच Montreal ला परत आलो आहे.सध्या उत्तर अमेरिकेत राहणाऱ्या मराठी बांधवाना आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भविष्यात काय करावे लागेल ह्याची कल्पना ही माहिती करून देईल.
21 Feb 2014 - 11:24 pm | खटपट्या
आत्ताच पहिला भाग ऐकायला सुरवात केली. कोणी तरी कानडी मराठी बोलतंय असच वाटलं.
हेल तर अतिशय गोड…
21 Feb 2014 - 11:31 pm | खटपट्या
थोडा कोकणी टच देखील वाटतोय
23 Feb 2014 - 7:35 am | सुनील
यस्स. उडुपी/दक्षिण कानडा विभागातील एखादा कोंकणी भाषक जसा मराठी बोलेल, तसे वाटते आहे!
24 Feb 2014 - 12:24 pm | यसवायजी
ओकसाहेब- धन्यवाद.
जयातैंना शुभेच्छा. तेनालीरामाची गोष्ट फार आवडली.
@सुनील- हो. माझा बेंगलुरुमधला भाचा असंच मराठी बोलायचा.
उदा- तुज्या डोक्यंवर वग्गरणी गांलतो.:)
(वग्गरणी- फोडणी)
24 Feb 2014 - 12:31 pm | बॅटमॅन
वग्गरणी =))
वग्गरणी अन आवलक्की आठवून डोळे पाणावले. घरी गेलो की हच्चिद आवलक्की करायला सांगावी लागते आता ;)
24 Feb 2014 - 12:37 pm | यसवायजी
:) आवलक्की- आल टैम फेवरिट डिश्श.
24 Feb 2014 - 12:42 pm | बॅटमॅन
येस्स्स्स्स्स्स्स्स!!!!!
22 Feb 2014 - 12:11 am | आयुर्हित
अभिनंदन 'जया' यांचे 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू केल्या बद्दल.
आणि ही माहिती पोचवल्याबद्दल शाशिकांतजी आपले धन्यवाद !
असाच आपला काही समाज पानिपत(हरियानात)ही आहे. कोणी आहे का त्यांच्या संपर्कात?
22 Feb 2014 - 12:33 am | खटपट्या
एपिसोड क्रमांक ६ ऐका. फारच सुंदर…
एका ६ वर्षाच्या मुलीने तेनाली रामाची गोष्ट सांगितली आहे.
24 Feb 2014 - 12:04 pm | पिशी अबोली
सुरेख... :)
असेच प्रयत्न निरनिराळ्या बोली बोलणार्यांनी केले तर किती बरं होईल... ही लिंक शेअर करतेय शक्य तिथे.. :)
24 Feb 2014 - 2:20 pm | भाते
दोन तिन वर्षांपुर्वी मी बेळगावला गेलो होतो. तिकडे या उच्चारात कानडी ढंगातले मराठी पहिल्यांदाच ऐकले होते. त्यावेळी त्याचे नवलही वाटले होते आणि थोडेसे हसुही आले होते. त्याच वेगळ्या उच्चारातली मराठी भाषा पुन्हा एकदा ऐकायला मिळाली.
धन्यवाद शशिकांत ओक पॉडकास्टचा दुवा दिल्यापद्धल.
'माज़ं अस्तित्व' आणि 'जया' यांचे अभिनंदन.
3 Mar 2014 - 3:28 pm | भाते
कालच्या सत्यमेव जयतेच्या प्रसारणानंतर महिलांच्या सुरक्षेचे मुद्दे या विषयावर आज हा नविन भाग ऐकायला मिळाला.
4 Mar 2014 - 6:30 am | श्रीनिवास टिळक
हो, मी पण हा भाग ऐकला आणि बरं वाटलं. एक गोष्ट खटकली ती अशी कि जवळजवळ अर्धा भाग इंग्लिश मध्ये आहे त्यामुळे विरस होतो.
4 Mar 2014 - 11:15 am | शशिकांत ओक
असे म्हणत. 'मला हे केंव्हापासून मनमोकळे पणे बोलायचं होतं पण नेमका फोरम मिळत नव्हता'. म्हणून या भागात बोलताना तंजवुर मराठीतून कमी बोलत असल्याचे मान्य केले.
28 Apr 2014 - 7:59 pm | शशिकांत ओक
मित्रांनो,
जया राव यांनी भाग १५ मधे पुढील तीन भागात त्या तंजावरी मराठीतून काय काय उपक्रम सादर करायचे म्हणतात ते ऐकायला इथे शिरकाव करा.