मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसाचे संस्मरण सकाळ मधील अप्रतीम लेखाने या झाले. महाराजांच्या रयतेसाठी मनात असलेल्या सुयोग्य शासनाच्या संकल्पना साकार करायला आपल्याा सारख्या इतिहास संशोधकाने विविध प्रकारे प्रेरणा द्यावी. ही विनंती.
काही वर्षांपूर्वी प्रताप गडावरील भेट व चर्चा यांच्या आठवणी ताज्या झाल्या. विंगकमांडर शशिकांत ओक.
... असे तिथे दिलेल्या प्रतिसादातून म्हटले आहे...
प्रतिक्रिया
19 Feb 2014 - 12:57 pm | विटेकर
आणि त्याखालील प्रतिक्रिया देखील वाचल्या.
"बहुजनसमाजपालक कुळवाडीभूषण" वगैरे वाचून अंमळ मौज वाटली. "गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावंतस " वर हा चांगला उपाय आहे. आवडण्यात आला आहे.
बाकी 'स्(श)काळ " कडून अजून काय अपेक्षा असणार म्हणा ! वाढवा विद्वेष अजून , त्याशिवाय निवडणूक कशी जि़कता येईल?
हिंदू समाजाइतका आत्मघातकी समाज जगाच्या पाठीवर दुसरा नाही !
19 Feb 2014 - 1:11 pm | llपुण्याचे पेशवेll
हा सर्कारी शिवजैंन्ती हाय ना आज! म्हणजे इंग्रजी तारखेप्रमाणे महाराजांचा बड्डे आहे. हॅपी बड्डे डीयर शिवाजी म्हाराज हॅपी बड्डे टू यू.
बाकी शिवाजी महाराजांची आठवण यायला आम्हाला शिवजयंती यावी लागत नाही.
19 Feb 2014 - 2:39 pm | आयुर्हित
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।१।।
शिवरायांचे कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे । कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष । तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष । काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकी परलोकीं उरावे । कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।
19 Feb 2014 - 11:33 pm | आयुर्हित
काही वाचनीय व मननीय लेख
Vietnam’s ideal Chhatrapati Shivaji Maharaj
हिंदु साम्राज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज
20 Feb 2014 - 1:16 pm | शशिकांत ओक
मित्रांनो, जन्मदिनी महाराजांच्या कर्तृत्वाचे स्मरण करायला प्रेरित करायचा प्रयत्न होता.
20 Feb 2014 - 1:47 pm | माहितगार
शशिकांतजी; शालेय मराठीत थोर व्यक्तींचे पुतळे बनवले जाण्याच समर्थन करणारा लोकमान्य टिळकांचा एक लेख होता पाठ म्हणून होता त्यात टिळक म्हणतात थोरव्यक्तींचे पुतळे पहाणारे सर्वचजण प्रेरणा आणि आदर्श घेऊ शकतील असे नाही पण ज्याच्यात आदर्श घेण्याची क्षमता आहे त्याला ते (पुतळ्यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या व्यक्तीच कार्य) प्रेरणा देण्यास कारणी भूत होऊ शकतात. रेल्वे फलाटावर विवेकानंदांची खूप पुस्तके वर्षोन वर्षे विकली जातात त्या वाचकांपैकी प्रत्येक जण विवेकानंदांचे उपदेश अमलात आणू शकतो असे नाही पण त्याच वाचकांपैकी एक वाचक प्रेरणा घेऊन राळेगण सिद्धी सारख्या एखाद्या गावाच भवितव्य घडवण्यात मोलाच काम करू शकतो.
तुम्ही काढलेल्या ह्या धाग्याने आता पावेतो सहाशे हिट कसे बसे चार एक प्रतिसाद मी काढलेल्या धाग्याने लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या; श्री. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गौरवपर अग्रलेखाचा इंग्रजीते मराठी अनुवाद साडे पाचशे हिट्स आणि दोन प्रतिसाद मिळवले. माझ्याच "(हिवाळ्यातील रात्रीभोजनासाठी ) ओल्या हळदीची लज्जतदार भाजी धाग्याने त्या पेक्षा कमी कालावधीत जास्त हिट्स आणि जास्त प्रतिसाद मिळवले. हि वस्तुस्थिती असून सुद्धा ओल्या हळदीची लज्जतदार भाजी लढण्याकरता फारतर कॅलरीज पुरवते. शिवाजी महाराजांबद्दलचे धागे चांगल्या कामासाठी झगडण्यासाठी लागणारी समाजोपयोगी प्रेरक शक्ती पुरवतात आणि ते अधिक महत्वाचे.
दिपसे दिप जलाते चलो हि अखंड प्रक्रीया आहे यात आपण आपल्या सहभागाचा दिवा लावून तो प्रकाशमान होतानाच अजून एक दिवातरी लावेल याचा प्रयास करावयाचा.
आपणास शिवजयंतीच्या शुभेच्छा
21 Feb 2014 - 12:28 pm | शशिकांत ओक
माहितगार,
मिसळपाववरील आपल्या सारख्या एका तज्ज्ञाने आपला मन मोकळा प्रतिसाद दिल्याने विचार करायला लावणारे लेखन केल्याचे समाधान आहे. यासाठी आपले धन्यवाद.
असाच आणखी एक प्रयत्न अधुन मधून नेताजींच्या सहवासात पुस्तकाचा प्रकरण रूपाने परिचय करून देत आहे.
शिवाय 'माजा अस्तित्व' या तंजावूरी मराठी नावाची एक पॉडकास्ट काही दिवसांपासून ऐकत आहे त्याचा परिचय करून देणारा धागा टाकत आहे. जरूर प्रतिक्रिया द्यावी. हैयो हैयोंच्या माहितीतून व विकी पिडीयातून मला त्या स्थळी जाता आले.
असो....
22 Mar 2014 - 11:35 am | शशिकांत ओक
पुर्वी आर के लक्ष्मणांचे कार्टून पाहिल्याचं स्मरतं...
चित्रात एका नदीच्या पात्रावर दोन नवे कोरे पुल बांधून तयार आहेत....
काय आहे ... एक ऑर्डर इंग्रजीतून व दुसरी हिन्दीतून आल्याने दोन पुल बांधावे लागलेना... म्हणून
तशीच अवस्था एकाच व्यक्तीचे दोनदा जन्मदिवस साजरे होताना पाहून वाटते.
17 Jun 2018 - 11:50 pm | शशिकांत ओक
कसाबसा ६शे चा आकडा पार करणारा धागा आज २००० री बनला!
22 Mar 2014 - 3:19 pm | kurlekaar
"महाराजांच्या कर्तृत्वाचे स्मरण करायला प्रेरित करायचा प्रयत्न होता."
शशिकांत
टिळक म्हणतात थोरव्यक्तींचे पुतळे पहाणारे सर्वचजण प्रेरणा आणि आदर्श घेऊ शकतील असे नाही पण ज्याच्यात आदर्श घेण्याची क्षमता आहे त्याला ते प्रेरणा देण्यास कारणी भूत होऊ शकतात".
माहितगार
खूप छान. मला वाटतं रामदासांच्या “जाणता राजा’ या एका शब्दातच सारं कांही येतं.