आमची प्रेरणा : http://misalpav.com/comment/551311#comment-551311
( पिवळा डांबीस काकाने प्रेरीत केलं त्यामुळे लिहायला घेतलं)
फेब्रुवारी असूनही आज आकाश ढगाळलंय. कुंद म्हणता येणार नाही पण प्रफुल्लीत एकदम उत्साही. असं वातावरण असलं की कसं भाग्य फिदा असतं अशावेळेला दुधात साखर म्हणजे ऑफिसमध्ये क्लायंट ने मीटींगची डेट पोस्टपोन केलेली असावी. मस्त दिवसभर गप्पा हाणत चहा पीत बसावं किंवा मग रीक्रीएशन रूम मधे कॅरम नायतर टी टी खेळायला मिळावं अर्थात हे भाग्य एखाद्या शनिवारी मिळालं तर मग काय एकदम बाईकवर टांग टाकून मस्त भाटघर किंवा बनेश्वर ला जावं. मध्ये शिवापूरला कैलाशची झणझणीत भेळ मिसळ हाणावी येताना मस्त केतकावळ्यावरुन पुरंदराच्या कडेकडेने फुलं बघत सासवड मार्गे रमतगमत यावं. अर्थात ही आपली चाकरमान्यांची स्वप्नं.
बघुया आज भाग्य काय म्हणतय ते. कालचा शुक्रवार तसा बरा होता. असाइनमेंट्स वेळेत झाल्या वीकएन्डला रिकामा वेळ मिळालाय. पण त्यामुळे एक लोच्या झालाय. आजच्या दिवसाचं काहिही प्लॅनिंग झालेलं नाहिय्ये. एका अर्थाने बरंही आहे म्हणा. असा शनिवार मिळालाय की मोबाईल सुद्धा विश्रान्ती घेत बसलाय. काल डेक्कनवर घेतलेलं रॉबर्ट लुडलुम चं पुस्तक वाचायला घ्यावं का? नकोच एकदा पुस्तकात डोकं खुपसलं की थेट संपल्यावरच जाग येते. आजचा शनिवार कारणी लावायचा. मित्रांबरोबर सुद्धा जायला नको वाटतंय. सगळ्या गप्पा कम्पनी-बॉस-क्लायंट असल्याच होतात. हे सगळे साले लिव्ह ऑफीस- ईट ऑफीस- अँड स्लीप ऑफिस पैकी आहेत.
आज मस्त एकटेच राहुया दिवसभर. जमेल? बघुयात.
फोन वाजतोय...कोणाचा आहे....... अननोन नंबर .... घ्यायचा का .... ठीक आहे . हॅलो....कोण बोलतय? नाही ओळखला आवाज. कोण? रश्मी? कोण रश्मी? ..ओह रिमझीम रश्मी...... मॅडम कित्ती दिवसानी.नव्हे नव्हे कित्ती वर्षानी फोन करताय. कुठे बेपत्ता होतात इतकी वर्षे... व्हॉट अ सरप्राइझ...... मी ! माझं काय........ इथेच आहे की ....कधितरी पोटासाठी भटकत असतो कुठे कुठे. आणि तुम्ही.....
तुम्ही........? कायरे .... तुम्ही....... मला तुम्ही म्हणतोस...... अन त्या नंतर एक मस्त काचा फुटल्यासारखी हास्याची खळखळणारे लकेर. ...
याच खळखळणार्या हसण्याने मला वेड लावले होते कधीकाळी. कॉलेजचच्या सेकंड ईयरला असेन. इंटरकॉलेज काव्यवाचन स्पर्धेसाठी गेलो होतो. तेंव्हा आली होती एस पी कॉलेजकडून....रश्मी.... तिचं ते सुहास्य वदनी मिलीयन डॉलर स्माईल..... परीक्षकसुद्धा मोहीत झाले असतील त्यावर. माझे तर काय कॉडॅक मोमेन्ट्स झाले होते. तिचं हसणं विसरू शकत नव्हतो.
स्पर्धेनंतर मी हरवून गेलो होतो मला स्वतःला असे कधी झाले नव्हते.
त्यानंतर एका वक्तृत्व स्पर्धेत भेटली. तोच कोन्फिडन्स तेच मस्त स्माईल......
यावेळेस वक्तृत्व स्पर्धेत तिने मांडलेला मुद्दा मला खोडून काढायचा होता..... अवघड होते. बोलताना मराठीतली काही अवतरणे काही श्लोक काही कविता तीने खुबीने पेरल्या होत्या.. वाचन जबरा दिसत होते. स्पर्धा दोन दिवस चालली.
त्या दोन दिवसात मी तीचाच विचार करत होतो. एकदम सुंदर अप्सरा म्हणता येणार नाही पण तिच्यात एक वेगळीच जादू होती. डोळ्यात आत्मविश्वासाची चमक चेहेर्यावर जादूई स्माईल. आनंदी म्हणता येईल असे भाव. गालांशी खेळणारे....खांद्यावर रुळणारे तिचे सुंदर केस तिच्या चेहेर्याला एखाद्या सुंदर चित्राला फोटोफ्रेम असावी तसे दिसत होते.
एखाद्या चित्रातली परी....... हिच्याशी ओळख वाढवायची. स्पर्धा संपल्यावर मी तिला काँग्रेट्स केले. तिने एक रुंद स्माईल करत त्याचा स्वीकार केला. मला म्हणाली तुम्ही सुद्धा फार छान मुद्दे मांडले. बालकविंच्या कवितेवर इतके वाचन कोणी हल्ली करत असेल असे नव्हते वाटले. तुमचे वाचन भरपूर आहे.
मी कसाबसा पुटपुटत थ्यांक्यु म्हणालो. मला पुढचे शब्द सुचत नव्हते. कोणीतरी बोलायला आले म्हणून ती पुढे गेली.
मी एका धक्क्यातून सावरत होतो. अरेच्चा हिनेसुद्धा आपल्याला अप्रीशीयेट केले की. मी त्या तंद्रीतच गेलो...... " ओ बालकवी...चला हॉल रिकामा झालाय" पम्या माझ्या खांद्यावर थाप टाकून म्हणत होता. मी भानावर आलो. मघाशी गच्च भरलेल्या हॉलमध्येआता जेमतेम तीनचार माणसे होती. पम्या बाहेर वाट पाहून मला आत बोलवायला आला होता.
अशाच आणखी दोनतीन स्पर्धा झाल्या माझे तिच्याबद्दल भारावून जाणे आता नित्त्याचेच झाले होते. पण आता आम्ही भेटल्पो की एकमेकाना हसून ओळख दाखवायचो. तीने एखादे स्मित केले की माझी मात्र पार वाट लागायची. माझा एकदम फ्रीज केलेला कॉडॅक मोमेन्ट्स व्हायचा.
एखादे वेळेस स्पर्धे व्यतीरीक्त भेटायचेच. तिचे कॉलेज माहीत होते....क्लास वगैरे सापडू शकला असता. ठरले पुढची भेट एस पी मधेच.
धाडस करून एस पी च्या गेटबाहेर उभा राहीलो. समोरून एक रंगीबेरंगी फुलपाखरांचा थवा हसत खिदळत येत होता. हिरवी , लेमन यलो, जाम्भळी , गुलाबी आकाशी ,केशरी ,ग्रे सगळी फुलपाखरे एकजात साड्या नेसलेली. बहुतेक एस पी मधे साडी डे असावा. आता ओळखायचे कसे यातून......
तो फुलपाखरांचा घोळका गेटमधून पुढे गेला.... पुलंच्या भाषेत बोलायचे तर माझा नाथा कामत झाला होता.
अरे.....हॅलो.... इकडे कुठे...... कोणीतरी मला हाक मारत होते. आवाज ओळखीचा......नुसता ओळखीचा नव्हे स्वप्नात सुद्धा ओळखता येईल इतक्या घट्ट ओळखीचा होता. तीचाच होता, मी आवाजाच्या दिशेने पाहिले . थक्क झालो......
जाम्भळ्या सिल्कच्या साडीत ती अक्षरशः फुलपाखरु वाटत होती. तिचे ते मोकळे केस आज जरा जास्तच सिल्की वाटत होते. ती एखाद्या साडीच्या जहीरातीतली मॉडेल वाटत होती. चेहेर्यावर तेच आश्वासक हास्य. माझ्याकडेच येत होती.
हॅलो... काय इकडे कुठे......
मी ..मी म्मी.... (अरे बापरे आता काय सांगायचे....... माझा पार बर्फ झालाय..... पण चान्स सोडायचा नाही ) म्मी इकडे कुठे काय......
अरे कुठे काय ! मी तुम्हाला विचारतेय.इकडे कुठे......
अरे हो मी इकडे कुठे विचारताय होय....मी आल आलो होत रेगे मॅडम कडे ( तेवढे एकच नाव आठवत होते एस पी च्या शिक्षकांपैकी) त्या रॉबर्ट फ्रॉस्ट च्या कवितंसंदर्भात
रेगे मॅडम.त्या वाचतात रॉबर्ट फ्रॉस्ट? त्या तर मॅथ्स शिकवतात ना?
पहिल्याच बॉल ला आमची विकेट पार नेहरा ला शोएब अख्तर ने वकार युनुस स्टाईल यॉर्कर टाकल्यावर होईल तशी तीनताड उडाली होती.
हो का .मला माहीत नव्हते... मला वाटले आमच्या कॉलेज मधे रेगे सर इंग्लीश शिकवतात त्यामुळे रेगे मॅडमना रॉबर्ट फ्रॉस्ट माहीत असेल.....म्हणजे मला काय म्हणायचे आहे की त्याचे असे झाले.... की ...
माझी अवस्था बघून ती एकदम नल सुटावा तशी खळखळून हसायला लागली. तिचे ह्सणे थांबायलाच तयार नव्हते.
मी कसा बसा काहीतरी थातुरमातूर बोलून तेथुन सटकलो. माझा पक्का मोरु झाला.
रुमवर गेल्यावर पम्या विचारत होता काय झाले म्हणून...... आता आपली फजिती कशी सांगणार त्याला. पम्याला काही सांगणे म्हणजे अख्ख्या टेलीकम्युनिकेशन च्या डिव्हीजनला बुलेटीन दिल्या सारखे होते. शिवाय माझ्या सोबतच्या काही वीरांना तिच्याबद्दल कळाले तर प्रेक्षणीय स्थळ नाहीतर इमटेक्स चे प्रदर्शन पहायला जावे तसे तिला बघायला लगोलग धावतील याची नक्की खात्री होती.
तो आठवडा एसपीच काय पण टिळकरोड च्या आसपास सुद्धा फिरकलो नाही. बादशाही मेसमधे खाडा केला. हो उगाच मधे कुठे दिसली तर काय करा.
मागच्या सेमीस्टरला अॅप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स चा पेपर राहीलाय या वेळेला सोडवायलाच हवा. ते सुद्धा क्लास मेन्टेन करत. गोखले सरांचा क्लास कर्वेनगर मधे. एक बरे आहे कर्वे नगर ला जायला मधे कुठे एसपी लागत नाही. थेट प्रभात रोडवरुन इन्कमटॅक्स लेन वरुन जाता येते. अर्थात इतक्या दारूणपणे मोरु झाल्यानंतर माझ्यात धाडस नव्हते. पण काही म्हणा त्या दिवसानंतर तीचे ते खळखळून हसणेच मला जास्त आठवत होते. एखादा पिक्चर पाहिल्यावर त्यातले आयटम सॉंग कानात सतत वाजत रहावे तसे तिचे ते खळखळून हसणे कानात रुंजी घालत होते. कर्र...कच्च्च्च्च्च्च्च्च.
ओ मिस्टर नीट बघून चालवा की बाईक. काय लावलय हे. नीट चालवता येत नाही का?
त्या आवाजाने मी भानावर आलो. माझ्या शेजारी एक स्कूटी उभी होती. चेहेर्याला अतीरेकी गुंडाळता तसा रुमाल गुंडाळलेली मुलगी.....
काय केलय मी? उगाच कशाला ओरडताय. तुम्हीच उलट माझ्या डाव्या बाजूने ओव्हरटेक करताय.... तुम्हीच चालवा नीट.
काय म्हणालात....... माझी चूक आहे? उगाच शहाणपणा करू नका?
शहाणपणा....... हे बघा बाई तुम्ही बाइ आहात म्हणून गप्प बसतोय.नाहीतर...
नाहीतर काय ..नाहीतर..... काय? बाईक नीट चालवायला शिका अगोदर... अन तुमच्या हेल्मेटमुळे आजूबाजूचे दिसत नसेल तर बदला ते घाणेरडे हेल्मेट.
हे बघा बाई ...( सालं.. या हेल्मेटमुळे नीट बोलतासुद्धा येत नाही. आपला आवाज समोरच्यापेक्षा आपल्यालाच जास्त जोरात ऐकु येतो .... मी हेल्मेट काढतो. ) हे बघा बाई ओरडून बोललो म्हणजे ते खरे असते असे नाही.
अरे तुम्ही?...... तुम्ही आहात होय? ती स्कूटीवाली बाई तिचा अगोदरचा भांडायचा मूड बदलून एकदम जोरजोरात हसायला लागली.
हसायला काय झाले . मी ..मीच आहे. पण तुम्ही अशा हसताय का...?
स्कूटीवरच्या त्या बाईने तिचा तो अतीरेकी श्टाईल बांधलेला रुमाल कम बुरखा सोडला.,,,,,आता मला तिच्या हसण्याचे कारण कळाले. ती तीच एस पी वाली सुहास्य वदना...... समोर उभी होती.
हॅलो...... कसल्या तंद्रीत चालवताय बाईक.मी कित्ती वेळ हॉर्न वाजवत होते पुढे जायचे होते म्हणून.
हो.. मी जरा विचारत होतो. क्लासला चाललो होतो.
कसला क्लास....
( हीला आपली अॅप्लाईड इलेक्ट्रिनिक्स ची स्टोरी कशी सांगीतली तर उगाच इंप्रेशन डाऊन व्हायचे) मी ते आपले ह्या क्लासला जात होतो गोखलेंकडे.
कर्वे नगरला?
हो . तुम्हाला कसे माहीत.
मी कर्वे नगरलाच रहाते.
हो का! मी पुण्यात रहातो.(काय पण पत्ता सांगितलाय! पुण्यात रहातो म्हणून...)
अरे व्वा.मी सुद्धा पुण्यातच रहाते..हा हा हा ........ पुण्यातली सगळी माणसे पुण्यातच रहातात. हा हा हा
( आयला ही बया आपली दरवेळेस विकेटच घेत असते) अर्र..... हं म्हणजे काय झाले.
हा हा . गोखलेंच्या क्लासला म्हणजे तुम्ही इंजीनियरिंग ला आहात. अॅप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स सुटला नाही वाटते गेल्या सेमिस्टरला.
अरे बापरे...तुम्ही आंतर्ज्ञानी आहात की.
मग ...... भूत वर्तमान भविष्य सगळे समजते मला. हा हा हा
( ही हसतेय अन माझा जीव जातोय......) "ओ भाउ.... रस्ता सोडाकी ....... गप्पा मारायच्या असतील तर गाडी बाजूला घेवून गप्पा मारा. रहदारीचा रस्ता म्हणजे हवापाण्याच्या गप्पा मारायचे ठीकाण नव्हे". मागचा रीक्षावाला हॉर्नच्या वरताण आवाज काढून केकाटत होता. आयला हे पुण्यातले रीक्षावाले बादशाही मेस मधल्या पाट्या वाचत असावेत बहुतेक.
बायद वे ...तुम्ही इकडे कुठे.
सरळ आहे तुम्ही जिकडे जाताय तिकडेच.... कर्वे नगरला चाललेय.
म्हणजे तुम्ही सुद्धा अॅप्लाईडैलेक्ट्रॉनिक्सला.....
नाही हो. आर्ट्सला कधी अॅप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स असतो का सब्जेक्ट म्हणून......?
मग?
सांगितले की मगाशीच मी कर्वे नगरला रहाते.
ओह...... बरोबर बरोबर..... बाकी काही म्हणणा तुमचा तो तोंडाला बांधलेला रुमाल बघून मी ओळखलंच नाही.
अन मी तुमच्या हेल्मेटमुळे....फिट्टंफाट......
हो खरंच की. पुण्यात आणि काश्मीर मधे हे एक साम्य आहे. तिथले अतीरेकी आणि पुण्याच्या मुली तोंडाला रुमाल एका श्टाईलमधे बाम्धतात
गुड जोक.......... पण ते फक्त मुलींच्या बाबतीत. हा हा हा बाय द वे तुम्ही गेल्या आठवड्यात एस पी कॉलेजला आला होतात ते काम झाले का?
हो हो झाले. भेटल्या अना रेगे मॅडम......
अन त्या रॉबर्ट फ्रॉस्ट बद्दल बोलल्या ना? मिस्टर थापा निदान पचतील अशा तरी माराव्यात. रेगे मॅडम अन रॉबर्ट फ्रॉस्ट? हा हा हा..... त्याना रॉबर्ट फ्रॉस्टचे नावसुद्धा माहीत नसेल......
हो बरोबर माझी थाप तुम्ही ओळखलीत. ( मायला एक थाप लपवण्यासाठी दुसरी .मग दुसरीसाठी तिसरी....... अन ही बया प्रत्येक थाप ओळखतेय..... त्यापेक्षा खरे बोललेलेच बरे) चलतो मी . क्लासला उशीर होतोय...... भेटू पुन्हा कधीतरी ( कधीकधी रणांगणातून पण काढणेच सोपे असते)
"ओक्के..... शुअर... बाय..... " अन तेच ते मस्त जीवघेणे स्माईल.....
गोखले मास्तरांच्या क्लासमधे आज वसंत फूललाय. मस्त श्रावण बरसतोय....... शरदाचे चांदणे पसरलय. गोखलेसर " एच एफ ई./ एच आय ई, थॅरिस्टर , झीनर ब्रेकडाऊन करंट , करंट लिमीट " हे शिकवण्या ऐवजी ऐवजी एक बोट नाचवत "देवा कीती सुंदर आकाश सुंदर चांदणे चंद्र देई.सुंदर प्रकाश सूर्य देतो" शिकवताहेत.
क्लास संपला..... अॅप्लाईड इले़क्ट्रॉनिक कविता गुणगुणत आम्ही रूमवर.......
(क्रमशः )
प्रतिक्रिया
9 Feb 2014 - 3:16 am | प्यारे१
विजुभौ....
कस्स्लं झॅण्टॅमॅटिक लिहीलंय.
सगळीकडं नुस्ती फुलपाखरंच दिसायलीत. लोखंडाचा कापूस झाला.
बाकी सगळ्यांचा 'पचकावडा' असतोय बहुतेक पहिल्यांदा. =))
(वाश्याला विचारायला पाहीजे) ;)
ओ ते क्रमश:चं लौकर बघा बरंका! ;)
9 Feb 2014 - 2:33 pm | टवाळ कार्टा
कडक :)
9 Feb 2014 - 5:11 am | यशोधरा
:D :)
9 Feb 2014 - 6:00 am | किसन शिंदे
झक्कास. पुढचा भाग किती लवकर टाकताय हे पाहणं आलं.
9 Feb 2014 - 8:35 am | खटपट्या
पु भा प्र
9 Feb 2014 - 9:06 am | अजया
मस्तच!
9 Feb 2014 - 9:39 am | प्रभाकर पेठकर
विजुभाऊ, विजुभाऊ, अहो, विचारांत एव्हढे वाहून जाऊ नका. उद्दिष्टांवर ठाम राहा आणि संभाषणाचा ताबा सोडू नका. कशा करता एव्हढा मोरू व्हावा?
पण लेखन मस्त आहे. क्रमशःने उत्सुकता वाढवली आहे. मुळात रश्मीकाकूंचा फोन आल्यानंतर 'आज मोकळा शनिवार आहे आणि एकट्याने कुठेतरी भटकायचा मूड आहे' ह्या नंतर एव्हढा मोठा फ्लॅशबॅक आला आहे की मूळ कथानक धूसर होत गेलं. पहिल्या भागाच्या अंती पुन्हा मूळ कथानकाकडे वाचकास वळविले असतेत तर बरे झाले असते. असो.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे. लवकर टाका.
10 Feb 2014 - 5:21 am | विजुभाऊ
आपका हुकूम सर आखोंपर.... पेठकरकाका :)
11 Feb 2014 - 10:54 pm | पिवळा डांबिस
हा हा हा!!! याला म्हणतात पेशल पेठकरशॉट!!!! :)
बाकी पेठकर काकांचा मुद्दा बरोबर आहे. कथेच्या टाईमलाईनमध्ये टू अॅन्ड फ्रो करायचं असेल तर फ्लॅशबॅक जास्त लांब ठेऊन परिणामकारकता कमी होते. फ्लॅशबॅकच्या एखाद्याच प्रसंगानंतर पुन्हा वाचकाला चार ओळींसाठी का होईना वर्तमानात आणणं आणि मग पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये नेणं जास्त वाचकासाठी रंजक होतं असा अनुभव आहे (अलिशियामध्ये मी हा प्रयोग करून पाहिला होता म्हणून म्हणतोय!)
लिहा, कुणाच्याही निमित्ताने का होईना, लिहा....
आमच्या कोकणीत एक म्हण आहे, "पादर्याक निमित्त पावट्याचा!!!!"
:)
पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे....
(च्यायला, आम्हाला क्रमशःबद्दल मनसोक्त चिडवून झालं, आणि आता हे स्वतःच काय करतंय?)
9 Feb 2014 - 9:47 am | इन्दुसुता
पुभाप्र
9 Feb 2014 - 10:01 am | मुक्त विहारि
आवडला....
पुभाप्र.
9 Feb 2014 - 11:18 am | भाते
पिडां काकांच्या प्रेरणेने का होईना, बऱ्याच दिवसांनी तुम्हाला छान लेखन लिहायला सुचले आणि आम्हाला ते वाचायला मिळाले.
आता दुसरा भाग त्या गुलाबी दिवसाच्या आधी येऊ द्या. जास्त वाट पहायला लाऊ नका हि (आगाऊ) विनंती.
9 Feb 2014 - 11:20 am | सुहास..
रोमॅन्टीक च !!
9 Feb 2014 - 11:26 am | अनुप ढेरे
तो आवाज तुम्हाला 'विजुभाऊ' म्हणूनच हाका मारत होता का?
9 Feb 2014 - 2:31 pm | विजुभाऊ
हा हा हा अनूप..... गुड क्वेश्चन
9 Feb 2014 - 4:06 pm | बाबा पाटील
एकदम झकास..
9 Feb 2014 - 6:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वसंतोत्स्व सुरु झाला तर.... :) विजुभौ, मस्त.
पुढचा भाग लवकर आणि त्यापुढे लै पांगवायचा नै.
-दिलीप बिरुटे
10 Feb 2014 - 4:47 pm | psajid
पुढचा भाग येऊ द्या
10 Feb 2014 - 5:07 pm | भावना कल्लोळ
इजू भौ, मस्तच , पुभाप्र.
11 Feb 2014 - 2:33 am | मधुरा देशपांडे
मस्तच. :)
11 Feb 2014 - 9:37 pm | सुवर्णमयी
हा हा . गोखलेंच्या क्लासला म्हणजे तुम्ही इंजीनियरिंग ला आहात. अॅप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स सुटला नाही वाटते गेल्या सेमिस्टरला.
:)
11 Feb 2014 - 10:28 pm | लॉरी
पुढच्या भागाची वाट पाहतोय!
11 Feb 2014 - 10:28 pm | लॉरी
पुढच्या भागाची वाट पाहतोय!
13 Feb 2014 - 3:15 am | विजुभाऊ
पुढचा भाग http://misalpav.com/node/27011
13 Feb 2014 - 2:13 pm | साती
पुण्यातले सगळे लोक पुण्यातच रहातात..
हे भारी होतं.
मस्तं लिहिताय.
13 Feb 2014 - 10:24 pm | पैसा
मस्त अवखळ अन रोम्यांटिक!!
14 Feb 2014 - 10:20 am | अमोल केळकर
मस्त मजा आली :)
अमोल केळकर
15 Feb 2014 - 1:45 pm | तुमचा अभिषेक
छान फ्लो जमलाय.. आसपास घडतेय वाटावे असे.. येऊद्या पुढचे..