अरबट कॉफी चरबट कॉफी |
कागदाच्या कपात करपट कॉफी ||
डोक्याची ग्रेव्ही, इनबॉक्सचं मटण |
कॅफेनची किक, बुळबुळीत बटण |
पहिला ढकलतोय, चारच बाकी |
कागदाच्या कपात करपट कॉफी ||१||
परीट घडी, टायचा बावटा |
आकड्यांची उसळ, एक्सेल पावटा |
बॉस निकम्मा, टीम पापी |
कागदाच्या कपात करपट कॉफी ||२||
पायांची घडी, मांडीवर पोट |
अप्रेझल मीटिंग, बोका भोट |
परफॉर्मन्स मदिरा, रेटिंग साकी |
कागदाच्या कपात करपट कॉफी ||३||
गारगिट्ट पोळ्या, बकाबकाबका |
सिग्रेटचा धूर, फकाफकाफका |
पगार, पीएफ, बोनस टॉफी |
कागदाच्या कपात करपट कॉफी ||४||
प्रतिक्रिया
20 Jan 2014 - 8:26 pm | प्रचेतस
जबरा.
अशोककुमारांची 'रेलगाडी' आठवली.
22 Jan 2014 - 10:28 pm | सस्नेह
आणि मर्ढेकारी थाट्सुद्धा !
बाकी, इतकी वर्षे कॉफी पितेय पण कधी अरबट चरबट किंवा करपट नाही बॉ लागली.
अरभाटच लागली प्रत्येक वेळी !
22 Jan 2014 - 10:49 pm | आदूबाळ
तुमचं नशीब थोर - मशीनजन्य कॉफी प्यावी लागत नसावी...
20 Jan 2014 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडेश.
-दिलीप बिरुटे
20 Jan 2014 - 8:33 pm | चैत्रबन
लैच भारी :)
20 Jan 2014 - 8:34 pm | जेपी
कविता आवडली .
पण कुणतरी वहीपेन घेऊन या .
20 Jan 2014 - 8:59 pm | सूड
आवडलं!!
20 Jan 2014 - 9:00 pm | तिमा
छान कविता लिहिली आहे, मर्ढेकरी बाज वाटला.
20 Jan 2014 - 9:08 pm | ह भ प
नकळत मोठ्या आवाजात चाल लावत बसलो..
20 Jan 2014 - 10:04 pm | सोत्रि
मस्त, चिडचिड पोहोचली.
- (फिल्टर कॉफी पिणारा) सोकाजी
20 Jan 2014 - 10:54 pm | पैसा
भयानक्,हास्य, करूण सगळे रस अगदी नीट उतरलेत!
20 Jan 2014 - 11:37 pm | आयुर्हित
होई सायंकाळ, ऑफिस खलास|
रिचवा रेडवाईन, हातात ग्लास||
रंगबेरंगी ढग, हवेत गारवा|
फ्रेश होऊन आता, ऐका मारवा||
डोक्यावरून फिरेल मायेचा हात|
वाईट परिस्थिती वर कराल मात||
सुख दु:ख हे असेच येईल अन जाईल|
जन्म जन्मांतर हे नाते टिकून राहील||
आपला मिपास्नेही :आयुर्हीत
21 Jan 2014 - 12:35 am | कवितानागेश
सोल्लिड. :)
21 Jan 2014 - 1:57 am | अत्रुप्त आत्मा
तुफ्फा....न!
21 Jan 2014 - 7:07 am | यशोधरा
अगदी, अगदी! :D
21 Jan 2014 - 7:41 am | आतिवास
आवडली.
21 Jan 2014 - 8:28 pm | आदूबाळ
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!
कमीत कमी ओळींत जास्तीत जास्त चिडचिड ठासण्याच्या नादात थोडी दुर्बोध झाली - तथास्तु यांची सूचना रास्त आहे!
21 Jan 2014 - 8:33 pm | जॅक डनियल्स
लैच भारी झाले आहे. हे लिहीताना पण हातात "अरबट कॉफी चरबट कॉफी" चाच कप आहे. क्याफिन धोसल्या शिवाय डोक्याची चक्रे फिरतच नाहीत.
21 Jan 2014 - 8:45 pm | राजेंद्र मेहेंदळे
मंडे सीकनेस मस्त पकडलाय.
बरे झाले सोमवारी सकाळी कविता वाचली नाही...डोक्याची मंडई झाली अस्ती. (कृ. ह. घ्या)
अवांतर-- कोणत्यातरी ऐटी कंपनीत काम करता काय?
21 Jan 2014 - 8:48 pm | आदूबाळ
येवढी कुठली आमची ऐट?
21 Jan 2014 - 11:06 pm | चाणक्य
झकास झालीये. टोटल भा.पो.
22 Jan 2014 - 8:46 am | नाखु
ना लांबड ना क्रमशः ची जिल्बी सगळ एका झटक्यात (थेट)...
"तुमचं आमच सेम असते"
अॅप्रेझल दिंडीतला "वारकरी"
22 Jan 2014 - 8:51 am | चित्रगुप्त
मस्त.
(तो मायेचा हात कुणाचा, तेवढं सांगा).
22 Jan 2014 - 10:13 am | आयुर्हित
अर्थात आपल्याला समजून घेणाऱ्या प्रिय व्यक्तीचाच !(ती प्रिय व्यक्ती कोण हे प्रत्येकाने आपल्या categery प्रमाणे ठरवावे!)
22 Jan 2014 - 8:52 am | सुहास झेले
सहीच... !!
22 Jan 2014 - 10:41 am | विटेकर
आवडली..
मर्ढेकरांचे उंदीर "पिपात मेले" आणि आपले "कपात मरताहेत" .. हाच काय तो फरक !
आयुष्य " आयटी" असले तरीही "बेकेलायटी" आहे हेच जास्त खरे आहे !
उत्तम !
22 Jan 2014 - 12:05 pm | म्हैस
लय भारी.
हे जास्त
22 Jan 2014 - 12:32 pm | बॅटमॅन
मर्ढेकरी बाज पर्फेक्ट पकडलाय. बॉस निकम्मा टीम पापी वाली ओळ सर्वांत जास्त आवडली.
22 Jan 2014 - 6:47 pm | प्यारे१
आवडली.
टाय सूट काढा नि जीन्स शर्ट हेल्मेट घाला.
नॉन ऐटी असूनही सहमत.
- 'आप बहुत ज़्यादा होपलेस काम कर रहे हो' चं पालुपद सगळ्यांना ऐकवणार्या बुडबत पांडेचा सबार्निडेट