महाराष्ट्र वैभव.

कलंत्री's picture
कलंत्री in जनातलं, मनातलं
28 Sep 2008 - 11:07 am

महाराष्ट्राचा विचार आणि तोही सांस्कृतिक अंगाने केला तर माझ्या मनात खालील विचार आले.

महाराष्ट्राचे तीन बा : ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा. ( मराठीभाषेचे आध्यात्मिक जीवन यांच्याशिवाय कसे बरे समजता येईल?) कदाचित चालतेबोलते विद्यापीठच म्हणा हवे तर.

महाराष्ट्राचे तीन बाबा : गाडगेबाबा, बाबा(साहेब) आंबेडकर आणि बाबा आमटे. या तिघांनीही पददलितासाठी आपले जीवन वेचले.

महाराष्ट्राचे तीन तात्या : तात्या सावरकर, कुसुमाग्रज आणि आपले आवडते सेनानी तात्या टोपे.

महाराष्ट्राचे तीन लाडके क्रीडा खेलाडु : खाशाबा, सुनिल गावस्कर आणि सचिन. आपल्या क्रीडा आयुष्यात अनेक अडचणी सोसुन महाराष्ट्राचे नाव पंचखंडात नेले.

महाराष्ट्राचे तीन लाडके राजकारणी : यशवंतराव, चिंतामणराव देशमुख आणि आबा पाटील. ( प्रबोधनाचा वारसा जपणारे असे तीनही राजकारणी. त्यात यशवंतरावामुळेच महाराष्ट्र आज प्रगतिपथावर आहे हे कोणीही मान्य करेल).

महाराष्ट्राचे तिन लाडके लेखक : खांडेकर ,अत्रे आणि पुल.

महाराष्ट्राची एकमेव लाडकी गान कोकिला फक्त आणि फक्त लता दिदीच.....

समाजजीवनमानशुभेच्छाआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

28 Sep 2008 - 11:12 am | विसोबा खेचर

महाराष्ट्राचे तीन तात्या : तात्या सावरकर, कुसुमाग्रज आणि आपले मिपाचे तात्या.

कलंत्रीसाहेब,

आपल्या परवानगीने वरील वाक्य खालीलप्रमाणे संपादित करू इच्छितो..!

महाराष्ट्राचे दोन तात्या : तात्याराव सावरकर आणि तात्यासाहेब शिरवाडकर.

आपण परवानगी दिलीत तर ठीक, नाहीतर मी माझ्या अधिकारात संपादित करेन... :)

प्लीज....

तात्या.

कलंत्री's picture

28 Sep 2008 - 12:20 pm | कलंत्री

तात्या मिपाचे स्वत:चे जसे धोरण आहे तसेच आपल्या मर्‍हाट्यांचे असे धोरण आहे. ते म्हणजे अहोरात्र, तन, मन आणि धनाचाही विचार न करता भाषा आणि भाषिकांचाच विचार करणे.

आपणही जे संकेतस्थळ चालवले आहे आणि त्यासाठी आपण ज्या खस्ता खात असातत, त्याला मिळणारा प्रतिसाद बघता आपणही आम्हा सर्वांच्या प्रेमाचे प्रतिक आहात.

अश्या पद्धतिने विचार केला तर माझा विचार तुम्हाला संयुक्तिक वाटेल.

अर्थातच, लेख संपादित करण्याचा आपणास आधिकार आहेच.

तीन हा आकडा आपल्या संस्कृतीत शुभ मानला जातो. ( सगळ्या विषम संख्या.) लेखाचे एकंदरीत सौंदर्य आणि व्याप्ती पाह्ता काहीकाळ तो उल्लेख तसाच ठेवावा ही विनंती. मी महाराष्ट्र संस्कृतीत अश्याच लोकमान्य तात्याचा शोध घेतो अथवा अन्य मिपाकरांनी मला साहाय करावे. बाकी व्यनि अथवा खरडवहीत बोलूच.

आपला प्रेमी आणि स्नेही,

द्वारकानाथ

विसोबा खेचर's picture

28 Sep 2008 - 12:56 pm | विसोबा खेचर

कलंत्रीसाहेबांनी विनंती केल्याप्रमाणे येथे महाराष्ट्राच्या तीन अण्णांचा उल्लेख करत आहे...

१) स्त्रीशिक्षणाकरता आयुष्य वेचलेले..अण्णासाहेब कर्वे.

२) आपल्या अलौकिक संतवाणीच्या गायनाने सबंध महाराष्ट्राला वेड लावणारे...भीमण्णा.

३) सक्षात महाराष्ट्र वाल्मिकी...अण्णा माडगुळकर.

हे घ्या अजून तीन,

महाराष्ट्रात अण्णांची कमी नाही...! :)

१) हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे... अण्णा चितळकर.

२) मराठी रंगभूमीची दैदिप्यमान परंपरा जपणारे...अण्णा पेंढारकर.

३) हिंदुस्थानी रागसंगीतातले एक दिग्गज.. अण्णासाहेब रातंजनकर.

हे घ्या अजून एक -

कुंकू, पिंजरा यासारखे चित्रपट देणारे... अण्णा वणकुद्रे.

असो,

आपला,
तात्याअण्णा वणकुद्रे.

अजून एक अण्णा : कर्मवीर भाउराव पाटील ( अण्णा) रयत शिक्षण संस्था चे संस्थापक ज्यानी अनेक लोक घडवले.
::::: त्या अण्णांच्या कालीजात शिकलेला इजुभौ

गणा मास्तर's picture

28 Sep 2008 - 2:56 pm | गणा मास्तर

तात्या टोपे, तात्या सावरकर, कुसुमाग्रज
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

विसोबा खेचर's picture

28 Sep 2008 - 4:23 pm | विसोबा खेचर

गणामास्तर,

तात्या टोपे हे नाव सुचवून ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तात्यांच्या पंगतीतून या यकश्चित तात्या अभ्यंकराची सुटका केल्याबद्दल आपले अनेक आभार.. :)

आपला,
(श्रेष्ठांच्या पंगतीत न शोभणारा) तात्या.

शैलेन्द्र's picture

28 Sep 2008 - 10:21 pm | शैलेन्द्र

व्यंकटेश माडगुळकरांनाही तात्या म्हणायचे, तात्या...

पण कुनास ठावुक, मिपाची प्रगती पाहता, आमचि पुढची पिढी (सध्या वय ५) कदाचीत "मराठी भाषा संगनकी आलि, केवळ तात्यांकारणे.." असेही म्हनेल...

प्राजु's picture

28 Sep 2008 - 10:27 pm | प्राजु

मस्त. कलंत्री साहेब.. वाचते आहे हे. आवडला हा धागा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शिवा जमदाडे's picture

29 Sep 2008 - 1:21 pm | शिवा जमदाडे

द्वारकानाथजी,
महारष्ट्रातल्या विभूतींविषयीचा हा धागा आवडला. धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Sep 2008 - 2:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> महाराष्ट्राचे तीन बा : ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा.

आणि आपला शिवबा?

कलंत्री's picture

29 Sep 2008 - 4:10 pm | कलंत्री

बा याचा अर्थ आई असा होतो. या यादीतील हे सर्व आईच्या ममतेने आपल्याकडे पाहत होते.

शिवबा हे विशेषण आपण सर्वसामान्य वापरत नाही.

तरीपण शिवाजी महाराजांशिवाय ही यादी अपूर्ण अथवा निरपयोगी अशीच आहे.

शिवाजी, पहिला बाजीराव, अहिल्यादेवी, सयाजीमहाराज आणि शाहुमहाराज या सर्वांचा महाराष्ट्रातील तीन क्षत्रीय असा उल्लेख करावयाचा माझा मानस होता. यातील कोणत्या दोघांना वगळायचे असा मला पेच पडला होता. मौनम् सर्वार्थ साधनम् म्हणून मी शिवाजीमहाराजांचा उल्लेख टाळला.

अजूनही मी यादीतील कोणालाही वगळू इच्छित नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Sep 2008 - 5:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> शिवबा हे विशेषण आपण सर्वसामान्य वापरत नाही.
मान्य! दुसर्‍या एका चर्चेचा संदर्भ डोक्यात होता म्हणून विचारलं.

>> ... मौनम् सर्वार्थ साधनम् म्हणून मी शिवाजीमहाराजांचा उल्लेख टाळला.
मग शिवाजी, पहिला बाजीराव, सयाजीमहाराज आणि शाहुमहाराज, यांच्यात तीन ठरवा
आणि जिजामाता, अहिल्यादेवी, आणि झाशीची राणी या तीन वीरांगना घ्या!

अदिती

शैलेन्द्र's picture

1 Oct 2008 - 11:51 pm | शैलेन्द्र

"आणि जिजामाता, अहिल्यादेवी, आणि झाशीची राणी या तीन वीरांगना घ्या!"

एक इतिहासाचा अभ्यासक म्हणुन मि महाराणि ताराबाइचे प्रयत्न बरेच महत्वाचे मानतो...

विसोबा खेचर's picture

2 Oct 2008 - 12:17 am | विसोबा खेचर

एक इतिहासाचा अभ्यासक म्हणुन मि महाराणि ताराबाइचे प्रयत्न बरेच महत्वाचे मानतो...

शैलेंद्रराव, आपण याबाबत विस्तृत लिहावत ही विनंती. मला वाचायला आवडेल..

तात्या.