महाभारतात भगवान कृष्णासकट कुणीही देव नाही असं माझं मत आहे. आहेत ती सारी माणसंच. पराक्रमी, कसलातरी पीळ घेऊन जगणारी. प्रत्येकाचे पाय मातीचे. हर्ष, खेद, सुख, दु:ख, वेदना, लोभ, सूड, कौर्य अशा अनेकानेक भावनांचा विविधरंगी पट या कथेत गुंफला आहे. हा इतिहास पराक्रमी पुरुषांचा असला तरी त्यामागे कुशल राजकारणाचा देखिल अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि या राजकारणाचे धागेदोरे महाभारतात फार दुरवर जाणारे आहेत. या राजकारणाचा विचार करताना तीन महापुरुषांनी केलेल्या घडवुन आणलेल्या घटनांचा परामर्ष या लेखात घेतलेला आहे. याला हुशारी, बुद्धीमत्ता असं नाव देता आलं असतं. मात्र मुद्दामच “चलाखी” हा शब्द वापरलेला आहे. समोरच्या माणसाचा कमकुवतपणा हेरुन आपला हेतु साध्य करण्याची किमया या माणसांमध्ये होती. हा मान साधारणपणे कृष्णाला देण्याची लोकपरंपरा आहे. मात्र कृष्णाशिवाय देखिल अनेकांनी हा प्रकार महाभारतात करुन दाखवलेला आहे. कृष्णाच्या “भगवंत” होण्याने बाकीच्यांची “चलाखी” काहीशी झाकोळुन गेली आहे. शिवाय कृष्णाने इतर कुणाहीपेक्षा अशा तर्हेची कामगिरी अनेकानेक वेळा यशस्वीपणे पार पाडलेली आहे. याचा शकुनीच्या कपटाशी संबंध नाही. कणिकाच्या कुटील नीतीशीही संबंध नाही. समोरच्याला आपल्याला हवं तसं वागण्याला उद्युक्त करणं ही करामत या घटनांमध्ये घडते.
अतिशय प्रसिद्ध घटनेचा उल्लेख करायचा झाला तर कृष्णाच्या शिष्टाई बद्दल बोलता येईल. द्रौपटीने कॄष्णाला शिष्टाईला जाण्याआधी तिच्या मोकळ्या केसांची आठवण करुन दिली होती. कॄष्ण ही घटना विसरला असण्याची शक्यताच नव्हती. दुर्योधनाचा हट्टी स्वभाव पूर्णपणे माहीत असलेल्या कॄष्णाने चलाखपणे फक्त पाच गावांची मागणी केली. कृष्णाला जरा जरी शंका असती कि दुर्योधन पाच गावांची मागणी मान्य करेल तर त्याने हा प्रस्ताव ठेवलाच नसता. त्यामुळे झाले हे की बिचार्या पांडवांनी हक्काचे अर्धे राज्य सोडुन फक्त पाच गावांवर समाधान मानले तरी दुर्योधनाचा लोभ आणि युद्धपिसाटपणा इतका कि सुईच्या अग्रावर मावेल इतकी देखिल जमीन तो द्यायला तयार झाला नाही असा संदेश जनसामान्यांत गेला. पुढे जे काही “महाभारत” झाले त्याला बहुतांशी कौरव जबाबदार धरले गेले याचं कारण कृष्णाने अत्यंत मुत्सद्दीपणे जगासमोर दुर्योधनाला हट्टाग्रही सिद्ध केलं. अर्थात दुर्योधनाला राज्याचा वाटा द्यायचा नव्हताच. पण त्याच्या स्वभावाची ही बाब कृष्णाने शिष्टाईच्या निमित्ताने चव्हाट्यावर आणली. अशा घटना महाभारतात अनेक असल्या तरी येथे फक्त तीनच घटना विचारार्थ घेतल्या आहेत. या तीन घटना त्या काळच्या विचारसरणीवर तर प्रकाश टाकतातच शिवाय या घटना घडल्यामुळे महाभारताला वेगळं वळण देखिल लागतं.
पहिली घटना भीष्माने केलेल्या अम्बाहरणाची. अम्बाहरणाच्या वेळची हकीकत लक्षात घेतली तर त्या काळचे राजे कसे वागत याचा अंदाज येऊ शकतो. केशीराजाने आपल्या तीन मुलींचं स्वयंवर लावलं होतं. त्यात भीष्म स्वतः ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेऊन देखिल भाग घेण्यासाठी आला. स्वयंवर कुणाचंही असो. मुलीची इच्छा काहीही असो. त्याच्या अटी वाट्टेल त्या असोत. बाहुबल असेल, धमक असेल, पराक्रम असेल तर मुलगी पळवुन न्यावी असा त्याकाळचा खाक्या दिसतो. पुढच्या काळात कृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं आणि आपला जिवलग मित्र अर्जुन याला देखिल बहिण सुभद्रेला पळवुन नेण्याचा सल्ला दिला. बायका स्वयंवरात ऐनवेळी कुणाला माळ घालतील याचा नेम नाही त्यामुळे पळवुन नेणेच इष्ट असा भगवंताचा चतुर, व्यावहारिक सल्ला होता. याचा अर्थ स्वयंवरातुन मुली पळवुन नेणे ही त्याकाळी दुर्मिळ घटना नव्हती. पळवणार्याने पराक्रम करुन हरण केले असेल, त्याचे घराणे कुलवंत असेल तर कदाचित ती इष्टापत्तीच मानली जात असेल. भीष्म स्वयंवरात आला तो सावत्र भावांसाठी मुलगी मिळवायला. कुणाच्या वतीने स्वयंवरात भाग घेता येत नाही हे भीष्माला ठाऊक असणारच. आणि असाच दंडक असण्याची शक्यता आहे. अन्यथा इतर देशीच्या रा़जांनी त्याची चेष्टा आरंभली नसती. ही चेष्टा भीष्माच्या वयाचीही आहे. राजांनी चेष्टा आरंभल्याबरोबर जणुकाही याच संधीची वाट पाहात असल्याप्रमाणे भीष्माने तिन्ही कन्यांना बळजबरीने रथात घालुन इतर राजांना युद्धाचे आव्हान दिले. भीष्म हा महाभारतात नुसताच महापराक्रमी नाही तर महाज्ञानी म्हणुनही प्रसिद्ध आहे. शांतीपर्वात युधिष्ठीरासारख्या ज्ञानी पुरुषाला आपल्या शंका निरसन करण्यासाठी भीष्माचा आश्रय घ्यावा लागला. अशा ज्ञानवान, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कुरुला स्वयंवराचे नियम माहित नसतील ही केवळ अशक्य गोष्ट आहे. भीष्माने तेथे हजर राहुन काही गोष्टी घडु दिल्या आणि आपला कार्यभाग साधला असे वाटते.
भीष्माचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला कधीही स्वतःच्या पराक्रमाबद्दल शंका नव्हती. कुरुंदकरांनी याचं विश्लेषण करताना हनुमानाचं उदाहरण दिलं आहे. हनुमानाला त्याच्या पराक्रमाची आठवण करुन द्यावी लागली आणि मग ते उड्डाण घडले. इथे प्रकार तसा नाही. भीष्माला स्वतःच्या पराक्रमाची इतक्या यथायोग्य प्रकारे जाणीव होती की त्याने परशुरामासारख्या स्वतःच्या गुरुलाही सोडले नाही. समजा राजांनी भीष्माची थट्टा आरंभलीच नसती तर पुढचा प्रकार करणे भीष्माला काहीसे जड गेले असते असे माझे मत आहे. यात चलाखि अशी कि मुळात भीष्माला क्षत्रियांच्या उद्दामपणाबद्दल खात्री असणारच. त्यांच्या दर्पोक्ती करण्याच्या स्वभावाशीही तो परिचित असेलच. आपण आल्याचे पाहुन सारे क्षत्रिय आपली थट्टा करणार याचा त्याने आधिच कयास बांधला असावा. तेव्हा आधी त्यांना कुरापत काढु द्यावी आणि नंतर उग्र रुप धारण करुन, आव्हान देऊन, कन्यांना पळवुन न्यावे असा प्रकार करावा असा विचार भीष्माने केला असेल असे मानायला जागा आहे. (क्रमशः)
प्रतिक्रिया
29 Dec 2013 - 6:37 pm | जेपी
लेख मालिका चांगलीच होणार . पुभाप्र .
29 Dec 2013 - 11:20 pm | अत्रुप्त आत्मा
+१ टू तथास्तु
या निमित्तानी कुरुंदकर लिखित "व्यासांचे शिल्प" अठवलं. :)
29 Dec 2013 - 11:20 pm | प्रचेतस
तुमच्याकडे ते पुस्तक असलं तर मला द्या ते.
29 Dec 2013 - 6:43 pm | Atul Thakur
आवडली नाही लोकांना तर पुढचे भाग टाकणार नाही. पण तीनच भाग आहेत :)
29 Dec 2013 - 6:51 pm | मनिम्याऊ
आवडले आहे
15 Jan 2014 - 7:49 pm | मी-सौरभ
पु भा प्र
29 Dec 2013 - 7:02 pm | वडापाव
लहानपणी पहिली-दुसरीत असताना महाभारत वाचलं होतं. त्यानंतर अलिकडे पुन्हा वाचायला घेतलं. परवाच मंगला सुब्रम्हण्यमनी लिहीलेलं आणि कविवर्य मंगेश पाडगावकरांनी मराठीत अनुवाद केलेलं कथारूप महाभारत वाचून पूर्ण झालं.
सहमत.
मलातरी महाभारतातली सगळी मुख्य पात्रं ही रूपकं वाटतात. युधिष्ठीराचा न्याय्यपणा, समंजसपणा, भीमाची शक्ती, क्रोध, आणि उतावळेपणा, अर्जुनाचा पराक्रम, त्याचं शौर्य, नकुलाची बुद्धी, सहदेवाचं सौंदर्य, द्रौपदीची सूडबुद्धी आणि स्वाभिमान, दुर्योधनाचा द्वेष, कर्णाचा उदारपणा, भीष्मांचा तटस्थपणा, धृतराष्ट्राचा मुलासाठीचा पक्षपात, द्रोणांचा लोभ - यासगळ्यांचा अतिरेक झाला, की तो कसा त्या त्या पात्रांवरच उलटतो आणि कसे त्याचे एकत्रितपणे महाभयंकर परिणाम होतात, हे महाभारत वाचताना सतत जाणवत राहतं.
29 Dec 2013 - 7:13 pm | विनोद१८
अतिशय प्रभावी सुरवात, सुन्दर विवेचन...!!!! याबद्दल अभिनन्दन.
महाभारताचा पट तसा विशाल, बोधप्रद, आजही मार्गदर्शक असे आहे, त्याला विविध कन्गोरे आहेत ते समजुन घेणे फार महत्वाचे आहे, आपण ते करू शकाल. मला वाटते आपण तीनच भाग का ? अधिकही लिहू शकाल नव्हे तसे लिहावे असा आग्रह. इथे सर्व त्याचे स्वागतच करतील.
धन्यवाद.
विनोद१८
29 Dec 2013 - 7:24 pm | प्यारे१
वाचतोय!
29 Dec 2013 - 9:55 pm | अत्रन्गि पाउस
एक निरीक्षण कुणीसे केलेले ...असे ऐकले आहे.. कि 'ती' ५ गाव हि दुर्योधनाच्या राज्याच्या सीमेवरील ५ मोक्याची गावे होती...जेणे करून दुर्योधनाच्या संपूर्ण राज्यावर लक्ष्य ठेवता यावे..
29 Dec 2013 - 10:38 pm | इन्दुसुता
वाचतेय.
पुभाप्र
29 Dec 2013 - 11:15 pm | प्रचेतस
लेख आवडला.
30 Dec 2013 - 8:39 am | ब़जरबट्टू
वाचतोय.. छान सुरुवात..
30 Dec 2013 - 11:36 pm | जानु
असे म्हणतात की जे महाभारतात नाही ते जगात अथवा व्यवहारात सापडणार नाही.
31 Dec 2013 - 8:02 am | कैलासवासी सोन्याबापु
महाभारतात भगवान कृष्णासकट कुणीही देव नाही असं माझं मत आहे. आहेत ती सारी माणसंच
पाय कुठेत भाऊ तुमचे ?? ही लेखमाला आगोदर वाचल्यागत वाटते आहे अतुल भाऊ, मीम वर झाले होते बहुदा ह्यावर ब्रेन स्टॉर्मिंग ? :)
1 Jan 2014 - 8:45 am | Atul Thakur
येस सोन्याबापु आणि त्यावेळी माझ्या लेखापेक्षा तुमच्या एकाचढ एक जबरदस्त प्रतिसादांमुळे रंगत आली होती.
2 Jan 2014 - 2:22 pm | अनुप ढेरे
लिंक द्या की चर्चेची त्या...
2 Jan 2014 - 6:03 pm | Atul Thakur
ही चर्चा मीमवर झाली होती. आता तेथे जुना डेटा राहिला नाहीय. :(
2 Jan 2014 - 6:13 pm | मंगेश खैरनार
मीम वरील चर्चेतिल सोन्याबापूंचं एक वाक्य पुसटसं आठवतय..
2 Jan 2014 - 7:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
मार्मिक ! :)
31 Dec 2013 - 12:28 pm | शरद
" समजा राजांनी भीष्माची थट्टा आरंभलीच नसती तर पुढचा प्रकार करणे भीष्माला काहीसे जड गेले असते असे माझे मत आहे." महाभारतात तरी असे काही दिसत नाही. काय म्हणते महाभारत ..".विचित्रवीर्य विवाहास योग्य वयाचा झाला असे पाहून भीष्मांनी त्याचा विवाह लवकरच उरकून घ्यावा असे मनात आणिले. इतक्यात वर्तमानाले कीं काशिराजाच्या तीन मुलींचे एकदम स्वयंवर होणार आहे. हे वर्तमान ऐकून भीष्मांनी मातु:श्रीची संमति घेतली, आणि आपण स्वतांच एकटे रथात बसून वाराणसीला गेले." विचित्रवीर्याला न घेता एकटे जाण्यात मुलींना पळवून आणणे हा उद्देश स्पष्ट होतो.यात काही चूक होती असे त्या काळी वाटत नव्हते. कारण त्या वेळी भीष्म सर्व राजांना विवाह्च्या आठ प्रकारांची माहिती देतात व सांगतात की " स्वयंवरास आलेल्या सर्व क्षत्रियांचा पराभव करून हरण करून आणलेल्या कन्येबरोबर विवाह करणे हे क्षत्रियास सर्वात श्रेष्ठ आहे."
आज आपणास हे चुकीचे वाटेल कारण इथे मुलीच्या इच्छेचा विचार केलेला नाही. पण हे काहीच नाही असे वाटावयास लागणारी कथा पुढेच आहे. द्युतानंतर पांडव व द्रौपदी वनवासात असतांना एक दिवस पांडव शिकारीला बाहेर गेले असतात व द्रौपदी एकटीच आश्रमांत असते. त्या वेळी जयद्रथ तिला पळवून नेण्याकरिता रथात घालतो. आश्रमातील धौम्यमुनी त्याला म्हणतात. "जयद्रथा,त्या महारथी पांडवांना जिंकल्यावाचून तूं हिला घेऊन जाणे शक्य नाही. अरे, पुरातन कालापासून चालत आलेल्या क्षत्रियधर्माकडे तरी कांही दृष्टि दे." म्हणजे त्यांना म्हणावयाचे आहे की पांडव असतांना त्यांना जिंकून मग तू हिला पळवून नेलेस तर ते क्षत्रिय धर्माला धरून होईल आहे ना धक्कादायक !
शरद
1 Jan 2014 - 8:50 am | Atul Thakur
विचित्रवीर्याला न घेता एकटे जाण्यात मुलींना पळवून आणणे हा उद्देश स्पष्ट होतो.यात काही चूक होती असे त्या काळी वाटत नव्हते. कारण त्या वेळी भीष्म सर्व राजांना विवाह्च्या आठ प्रकारांची माहिती देतात व सांगतात की " स्वयंवरास आलेल्या सर्व क्षत्रियांचा पराभव करून हरण करून आणलेल्या कन्येबरोबर विवाह करणे हे क्षत्रियास सर्वात श्रेष्ठ आहे."
स्वयंवरास आलेल्या सर्व क्षत्रिय राजांचा पराभव विचित्रविर्याने केला असता तर गोष्ट वेगळी होती. कुणाच्यातरी वतीने स्वयंवरात भाग घेता येतो काय हा प्रश्न आहे. माझ्यामते त्याचे उत्तर नाही असे आहे. बाकी दुसर्याच कुणी पराक्रम गाजवुन मिळवलेल्या आणि भलत्याशीच लग्न झालेल्या बायकांना मनातुन कोण आवडत असेल? ज्याने जिंकलं तो कि ज्याच्याशी लग्न करावं लागलं तो असा एक अवांतर प्रश्न माझ्या मनात तरळत असतो.
1 Jan 2014 - 2:00 pm | बॅटमॅन
डिट्टो!!!!!
बाकी ती अंबा तर भीष्मांवरच फिदा झाली होती.
2 Jan 2014 - 8:08 pm | कानडाऊ योगेशु
ठाकूर साहेब ,सुंदर आणि माहीतीपूर्ण लेख. कुर्निसात स्वीकार करावा.
ह्यामागे बहुदा असा तर्क असावा..
कि एकदा एखादी गोष्ट जिंकल्यानंतर तिचा मालकी हक्क सर्वस्वी विजेत्याकडे येतो व तो त्या गोष्टीचा कसाही सोक्षमोक्ष लावु शकतो.
कारण पुढेही द्रौपदी स्वयंवरात कर्णाने दुर्योधनाच्या वतीने ( म्हणजे on be half of Duryodhan) स्वयंवरात भाग घेतला होता.हा भाग जरी प्रक्षिप्त मानला तरी केवळ अर्जुनाने द्रौपदी स्वयंवर जिंकुन सुध्दा द्रौपदीला बाकीच्या चौघांना देखील पती म्हणुन स्वीकारावे लागले. तसेच द्युतक्रिडेत देखील शकुनी दुर्योधनाच्या वतीने खेळला होता.दुर्योधनाने फक्त बोली लावली होती. त्याकाळचा तो बहुदा रिवाज असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2 Jan 2014 - 8:14 pm | Atul Thakur
यावर चर्चा व्हायला हवी :)
3 Jan 2014 - 2:02 pm | परिंदा
म्हंजी तेवा बी सुपार्या घेतल्या जायच्या तर!!
31 Dec 2013 - 2:53 pm | मालोजीराव
महाभारताचा नक्की काळ कोणता…इ.सन पूर्व किती ?
1 Jan 2014 - 7:20 am | शरद
महाभारताचा काळ कोणता? या प्रश्नाचे दोन भाग पडतात. पहिला महाभारत केव्हा लिहले गेले व दुसरा युद्ध केंव्हा झाले. यावर भारताचार्य चिं.वि.वैद्य यांनी चांगली ३२ व ४८ पाने खर्च केली आहेत. आपणस खोलवर माहिती पाहिजे आल्यास कै. वैद्य यांनी लिहलेल्या श्रीमहाभारत - उपसंहार पहावे. थोडक्यात पाहिजे असल्यास भारत व महाभारत य दोन पायर्या धरून लेखनाचा काल इ.स.पूर्व ४०० व इ.स. २००-४०० हा लेखनाचा मानावा. व इ.स.पूर्व ३१०१ हा युद्धाचा काळ असे मानावय॒अ॒अस हरकत नाही.
शरद
1 Jan 2014 - 2:19 pm | बॅटमॅन
महाभारत लिहिण्याचा काळ शरद सरांनी बरोबर सांगितला आहे.
बाकी प्रत्यक्ष घटना खर्याच की खोट्या हे ठामपणे सांगण्याइतपत विदा उपलब्ध नाही. पण जनरली सर्व संशोधक असे मानतात की मूळ युद्ध खरे असावे. ग्रंथातील एकूण वर्णने पाहता हा काळ उत्तरसिंधू कालखंडात येतो, साधारण इसपू १०००-११०० च्या आसपास शंभरेक वर्षे बहुतेक.
एक साधा चेक लावून बघ, महाभारत बुद्धपूर्व तर आहेच. म्हणजे इसपू ५००-६०० च्या बर्यापैकी अगोदर.
किती अगोदर? तर तेव्हा जनपदांची महाजनपदेही झाली नव्हती आणि सरस्वती नदी पूर्णपणे आटली नव्हती, कारण बलराम तीर्थयात्रेला निघून गेला तेव्हा सरस्वती नदीकाठी ऋषींचे आश्रम त्याला दिसले असे वर्णन वाचल्यागत आठवतेय. सरस्वती नदी आटण्याचे दोन टप्पे आहेत, एक म्हणजे जिथे सागराला मिळायची गुजरातच्या जवळ तिथे न मिळता राजस्थानच्या वाळवंटात ड्रेन होऊ लागली. हे काही शे वर्षे चालून मग पूर्णच आटली. महाभारतात हा मधला टप्पा दिसतो.
या काळास पुष्टिकारक पुरावे काही ठिकाणी सापडलेत. इसपू ९०० च्या आसपास हस्तिनापुर येथे पूर येऊन ते नष्ट झाले असा पुरावा १९५१ सालच्या उत्खननात बी.बी. लाल यांना सापडला होता. हस्तिनापूर महाभारत युद्धानंतर कधी काळी पुराने वाहून गेले अन परत वसवल्या गेले असा उल्लेख पुराणांतही सापडतो (मी प्रत्यक्ष उल्लेख वाचला नसून उत्खननासंबंधी वाचलेय तिथे असे लिहिले आहे.) तस्मात तो एक पुरावा ग्राह्य धरायला हरकत नाही. शिवाय अहिच्छत्र, द्वारका, इ. ठिकाणी एकाच प्रकारची 'पॉटरी' मिळाली आहे ज्याला पेंटेड ग्रे वेअर असे म्हणतात. म्हणजे साधारण इसपू १००० च्या आसपास ही सर्व ठिकाणे एका प्रकारच्या संस्कृतीखाली होती आणि हस्तिनापुराबद्दलचा पुराणांतील उल्लेख आणि प्रत्यक्ष पुरावा यांमध्ये एकमत आहे इतके तरी नक्कीच म्हणता येते.
पण यावरून महाभारत युद्ध घडले याचा प्रत्यक्ष पुरावा मिळतो का? धृतराष्ट्र, भीष्म, कृष्ण, इ. पैकी कुणाच्याही नावाचा शिलालेख सापडला आहे का? तर दुर्दैवाने याचे उत्तर नाही असेच आहे. पण तत्कालीन म्हणजेच लोहयुगीन भारताबद्दल रेमंड अल्चिन नामक विद्वानाने एक पुस्तक लिहिलेय त्यातून प्युअरलि आर्किऑलॉजिकल माहिती बरीच मिळते- विशेषतः जीवनपद्धती.
शिवाय इथे पुराणादि ग्रंथांतील उल्लेख आणि प्रत्यक्ष उत्खननातील पुरावे यांची सांगड घालण्याचे काम शक्यतोवर कुणी करत नाही, अगदी थोडे अपवाद वगळले तर. त्यामुळे असा कुणी इतिहासतज्ञ येईस्तोवर आपल्याला वाटच बघावी लागेल. त्या भारतीय हेन्रिक श्लीमानची मी फार आतुरतेने वाट पाहातो आहे.
बाकी शरद सरांच्या प्रतिसादात इसपू ३१०१ हा काळ आला आहे. कलियुग हे इसपू ३१०२ या वर्षापासून सुरू होते कारण तेव्हा महाभारत युद्ध संपले अशी धारणा आहे त्यामागे. या धारणेचा उगम आहे बदामी येथील सत्याश्रय पुलिकेशीचा शिलालेख आणि बहुतेक आर्यभटीय हा ग्रंथ. तो शिलालेख इ.स.६३४ चा असून त्यात तो म्हणतो की महाभारत युद्ध होऊन ३७३५ वर्षे उलटून गेलीत म्हणून. आर्यभटीय हे इ.स. ५०० किंवा त्याच्या जरा आधी लिहिले गेले असावे. त्यातही आर्यभटाने हीच गणना सांगितली आहे.
पण त्याच्या आधीच्या कुठल्याही ग्रंथात ही गणना येत नाही. आर्यभटाने आकाशातील काही विशिष्ट कॉन्फिगरेशन्स तेव्हा येतात म्हणून त्याची निवड केली असावी असे मानण्यास बराच वाव आहे. बर्याचदा हे गणिती त्यांच्या कॅल्क्युलेशनसाठी एक स्टार्टिंग पॉइंट निवडत. काही लोक लाखो-कोट्यवधी वर्षांआधी निवडत तर हा तेव्हापेक्षा तीनेक हजार वर्षे जुना असल्याने आकडेमोड करणे सोपे जाई म्हणून जास्त पापिलवार झाला असावा. यापेक्षा दुसरे काही कारण सध्या तरी दिसत नाही.
1 Jan 2014 - 2:43 pm | Atul Thakur
खुप आभारी आहे !
1 Jan 2014 - 6:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
फारच छान आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद !
1 Jan 2014 - 8:00 pm | राही
अभ्यासपूर्वक केलेले विवेचन.
3 Jan 2014 - 2:20 pm | मालोजीराव
मस्त … एकदम सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद रे !
युद्धात जी हत्यारे वापरली गेली त्यानुसार हा काळ तोच वाटतोय इ.स. पूर्व १००० वगैरे ,
बाकी हे युद्ध झालंच नसेल असं वाटत नाही, पण ऐतिहासिक नोंदी नाहीत फार हेही खरेच.
एक जाधवराव आणि देवगिरी यादव आडनावाचे दोघे ओळखीचे आहेत त्यांच्याकडे कृष्णापासूनची वंशावळ आहे, खरी कि खोटी माहित नाही पण त्यात उल्लेखलेले वंशज होते पूर्वी काही पुराणात आणि नंतर इतिहासात.यादव स्वताला उत्तरेकडीलच मानत. एका यादवराजाचा विवाह शिलाहार घराण्यातल्या मुलीशी झाला तिची आई राष्ट्रकुट घराण्यातील होती, त्यामुळे यादवांना हि मराठे म्हणू लागले…अशी स्टोरी त्यांनी सांगितली
3 Jan 2014 - 2:33 pm | बॅटमॅन
अशा वंशावळी सरदार/व्यापारी घराणी कैकवेळेस तयार करतात. ईट्स मेनी टैम्स टू गुड टु बी ट्रू, सो सेज मेहेंदळे सर :)
रोचक आहे. असे झाले असण्याची शक्यता आहे खरेच.
3 Jan 2014 - 11:11 pm | आयुर्हित
महाभारताचा म्हणजे नेमका कृष्ण जन्मदिनांक २१ जुलै ३२२८ (ख्रिस्तपूर्व) i.e. July 21, 3228 BC आहे.
Source: Arun K. Bansal, the father of computer astrology in India.
चू.भू. दे.घे.
आपला लाडका : आयुर्हीत
3 Jan 2014 - 11:21 pm | आयुर्हित
महाभारताचा म्हणजे नेमका कृष्ण जन्मदिनांक २१ जुलै ३२२८ (ख्रिस्तपूर्व) i.e. July 21, 3228 BC आहे.
Source: Arun K. Bansal, the father of computer astrology in India.
चू.भू. दे.घे.
आपला लाडका : आयुर्हीत
31 Dec 2013 - 9:32 pm | भ ट क्या खे ड वा ला
छान ,वाचनीय
चलाख व्यक्तिमत्वे अजूनही आहेत महाभारतात तेव्हा ३नात आटपू नका
1 Jan 2014 - 1:19 pm | म्हैस
सगळंच चुकीचं. महाभारत समजून न घेता फक्त स्वताच्या दृष्टीकोनातून लिहिलेला लेख आहे
1 Jan 2014 - 2:01 pm | बॅटमॅन
ढॅण्टढॅण!!
म्हैस-त्री मंत्र आता सुरू झालेला आहे तरी सर्व साधकांनो कान बंद करून घ्या नैतर बहिरे व्हाल.
2 Jan 2014 - 5:40 pm | थॉर माणूस
आता लेखाच्या पहिल्या वाक्यातच "असं माझं मत आहे" असं लिहीलंय ना लेखकाने? तुम्ही वेगळं काय सांगताय?
महाभारत हा लेखनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. महाभारत प्रत्येकाला वेगळं समजलंय. म्हणूनच मूळ जय लिहीलं गेल्यानंतर आजही त्यावर चर्वितचर्वण चालू शकलं. अगम्य पाल्हाळीक लिखाण असतं तर कशाला कोण डोकं फोडत बसलं असतं त्यावर?
पहिलं वाक्य मात्र आवडलं. सगळंच चुकीचं आहे हे माझं सुद्धा मत आहे. ठाकूरांचं सुद्धा, महाभारताचं सुद्धा, तुमचं आणि माझंसुद्धा... सगळंच चुकीचं. :)
2 Jan 2014 - 6:01 pm | Atul Thakur
महाभारत हा लेखनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. महाभारत प्रत्येकाला वेगळं समजलंय. म्हणूनच मूळ जय लिहीलं गेल्यानंतर आजही त्यावर चर्वितचर्वण चालू शकलं.
१०० टक्के सहमत धन्यवाद :)
1 Jan 2014 - 6:48 pm | arunjoshi123
आपण अन्यथा देव आहे/होता असे मानणारे नसलो तर?
2 Jan 2014 - 2:15 pm | म्या काय म्हन्तो...
भीष्मानी कन्सल्ट्न्सी सुरु कराय्ला हवी होती राव.. म्ह्ण्जे, ज्या कुण्या राजा ला कोणती राजकुमारी आवडेनार, त्याने स्वयम्वरासाथि , युद्ध जिण्कण्यास भीष्मा कडे यावे. तो तुम्च्या साथि जिन्कुन देनार तर...
2 Jan 2014 - 4:56 pm | परिंदा
विचीत्रवीर्य मेल्यानंतर सत्यवती स्वतःच भीष्मांना प्रतिज्ञा मोडून लग्न करायला सांगते, पण भीष्म प्रतिज्ञा मोडत नाहीत.
याबद्दल अनेकजण त्यांना दोष देतात.
जर त्यांनी तसे केले असते तर लोकांनीच म्हटले असते की भीष्मांनी मारे पितृप्रेम दाखवायला ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा घेतली, पण काहीतरी कपट करुन सावत्र भावाला मारले आणि मग सावत्र आईला प्रतिज्ञा मोडायला सांगायला विवश करुन राज्य बळकावले.
प्रतिज्ञा न मोडण्यामागे भीष्मांची हुशारी म्हणा किंवा चलाखी दिसून येते.
2 Jan 2014 - 5:22 pm | बॅटमॅन
लोकांनी काही म्हटले तरी फरक काय पडला असता? एक ते धोब्यामुळे बायकोला हाकलण्याचं रामाचं उदाहरण वगळता पुराणातही असे उदाहरण माहिती नाही. त्या उदाहरणातही राम डोके बाजूला ठेवून मूर्खागत वागला असे माझे स्पष्ट म्हणणे आहे. अन हे आजच्या काळाचे निकष लावून नव्हे तर तेव्हाच्या निकषांप्रमाणेही मूर्खपणातच मोडते. त्या धोब्याला ठार करणे काय अवघड होते? ठार मारायचं त्याला अन आवई उठवायची. राजा ना तो? इतकंही जमू नये? कृष्ण असता तर काहीतरी काडी नक्की केली असती.
प्रतिज्ञा न मोडण्यामागे भीष्मांचा मूर्खपणाच दिसून येतो.
2 Jan 2014 - 6:08 pm | प्रचेतस
रामाचा हा उत्तरकांडातला भाग बरेचजण प्रक्षिप्त मानतात.
याला एक पुरावा खुद्द महाभारतातच मिळतो. महाभारतात रामोपाख्यान आले आहे त्यात ह्या उत्तरकांडाचा कुठलाही संदर्भ येत नाही.
:) तसे वाटत नाही.
2 Jan 2014 - 7:27 pm | बॅटमॅन
प्रक्षिप्त असेल तर उत्तमच. पण ष्ट्यांडर्ड व्हर्जन सोडून अन्य व्हर्जन्स आहेत तिथे हा भाग येतो की कसे?
भीस्माबद्दल बोलायचे झाले तर प्रतिज्ञा मोडून राज्य स्थापिले असते तर काही वाईट झाले असते असे वाटत नाही. कुरुकुलाच्या हाताशी सॉफ्ट पॉवर इतकी होती की एखाद्या पुरोहिताला हाताशी घेऊन नवीन रूढी पाडणे काही अवघड नव्हते. कुरुकुलात नवीन पद्धती लै तयार झाल्या अन पुढे तगून राहिल्या याबद्दलचा मायकेल विट्झेलचा एक पेपर रोचक आहे.
2 Jan 2014 - 7:44 pm | प्रचेतस
भिष्माने प्रतिद्न्या मोडली असती तर पुढचे महाभारत घडलेच नसते.
तस्मात ते अटळ होतेच.
3 Jan 2014 - 2:05 pm | बॅटमॅन
रैट्ट.
असे काही नाही. पश्चातबुद्धीने पाहिले तर वाटते इतकेच.
2 Jan 2014 - 8:07 pm | तिमा
महाभारतात जसे चलाख महापुरुष आहेत तसेच मिपावरही खूप चलाख सदस्य आहेत. ते किती ज्ञानी आहेत हे त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादावरुन दिसून आले असेलच. आणि एवढे ज्ञानी असतानाही त्यांना जराही गर्व नाही. एखाद्या नवख्याने जरी लेख लिहिला तरी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतील आणि असे प्रतिसाद देतील की 'सौ सुनारकी एक लोहारकी!
मान गये उस्ताद!
3 Jan 2014 - 11:43 pm | पैसा
कॅलिडोस्कोप! जरासा कोन बदलला की प्रतिमा बदलतात. मात्र आपली चेष्टा होईल, मग आपण युद्धाचे आव्हान देऊ असा विचार भीष्माने करणं हा फार लांबचा विचार वाटला. स्वयंवर याचा अर्थ कन्येने स्वतः आपला वर निवडावा यासाठीची योजना. पण या घटनेत त्या राजकन्यांचा स्वत:चा वर निवडण्याचा हक्क बळाने काढून घेतला गेला आणि भविष्यात भीष्माला त्याचा परिणाम भोगावा लागला.
मात्र त्या काळात विवाहाचे अनेक प्रकार प्रचलित होते. जसे की गांधर्व, राक्षस, असुर, पैशाच, इ. तेव्हा कन्येचे असे हरण करणे हेही मान्यताप्राप्त दिसते. उदा. उषा-अनिरुद्धाची प्रेमकथा हा एक वेगळाच प्रकार झाला, ज्यात कन्येच्या सखीने वरालाच पळवून आणले!
15 Jan 2014 - 1:20 pm | म्हैस
@बॅटमॅन
तुझी अक्कल इतरांना नावं ठेवण्यापेक्षा एखाद्या विधायक कार्यासाठी खर्च कर.
@ लेखक
असं तुम्ही म्हणालात त्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. हि सगळी माणसं आहेत असं गृहीत धरला तरी ह्या माणसांबद्दल चुकीचा समाज पसरवण्याचा प्रयत्न करण्याचं कारण काय ?
उदाहरणार्थ :
ह्याचा अर्थ दुर्योधन तसा नवता पण श्रीकीष्णाने मात्र तसा समाज पसरवला असा घ्याचाय का ?
भीष्म हा स्वतासाठी नाही तर त्याच्या भावासाठी आला होता हो गोष्ट सर्वश्रुत आहे . मग त्याच्या ब्रह्मचार्याचा इथे काय संबंध ?
हनुमानाची तुलना भीष्माशी करण्याचा प्रश्न येतो का? हनुमान आपलं सामर्थ्य का विसरला होता हे तर तुम्हाला माहित असेलच ना
तुमची मतं किती बालिश आहेत ते दाखवण्याचा अट्टाहास का ?
15 Jan 2014 - 10:45 pm | बॅटमॅन
म्हशीला करायचा उपदेश स्वतःच सांगितल्याबद्दल अनेक आभार!!!
म्हशे,
तुझी अक्कल इतरांना नावं ठेवण्यापेक्षा एखाद्या विधायक कार्यासाठी खर्च कर.
माझ्या नामस्मरणासाठी धन्यवाद.