दत्त जयंतीनिमित्त भगवान दत्तात्रेयांच्या आरतीचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं आधी दोन आरत्यांचा ( गणपतीच्या नि देवीच्या ) नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती.
ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवतांच्या अंशावताराची जयंती. खरंतर देव जन्म घेतात का असा प्रश्न येतो पण भाविकांना ईष्ट देवतेचं स्मरण करायची संधी मिळावी, त्याद्वारे भक्ती वाढीस लागावी हा हेतू.
दत्त जयंतीची कथा : अत्रि नामक ऋषींच्या पतिव्रता पत्नीची अनसूयेची परिक्षा घेण्यास स्त्रीमत्सरानं सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती उतावीळ होतात, आपापल्या पतिराजांना तयार करतात नि अत्रि नसताना त्यांच्या आश्रमात पाठवतात. भिक्षा मागताना आम्हाला नग्न होऊन भोजन दे अशी अट घालतात. ती आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर तिघांना लहान बाळ करुन आपलं स्तन्य (दूध) वाढते. अनसूयेवर तिघे प्रसन्न, त्यांच्या बायका गप्प. वर माग म्हटल्यावर तुम्हा ति घांनीही माझं दूध प्यायलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिघेही आता माझे पुत्र आहात इथेच वास करुन असा म्हटल्यावर त्रिमुखी दत्त बनून अवतार धारण होतो.
कथेबाबत अनेक प्रकारे उहापोह होऊ शकतो. मनोरंजनाचं साधन नसलेल्या नि गुलामीनं पिचत पडलेल्या समाजातला कथेकरी बुवा आपल्या कल्पनाविष्कारानं कथा अशा प्रकारे सांगू शकतो ह्यात आश्चर्य नाही. रुपकं म्हणून वापरलेल्या गोष्टींना घट्ट परंपरांचं स्वरुप येऊन त्यात कर्मठपण कधी आलं ते सांगता येत नाही. सध्या फक्त एवढंच लक्षात घेऊ या की पातिव्रत्याचं सामर्थ्य दाखवण्याबरोबर मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था असेल, भगवंताकडे जाताना कुठलाही आडपडदाच काय तर यत्किंचित देखील झाकलेपणा नसला तर, विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो.
पूर्ण आरती :
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
(पाठ आहे पण हाताशी पटकन khapre.org वर मिळाली. कॉपी करुन घेतली)
आरती शब्दाचा एक अर्थ 'उपास्याबद्दल रती असेपर्यंत म्हणजे प्रेम असेपर्यंत करावयाची ती' असा आपण पाहिलेला आहेच. पुन्हा सांगावं असा हा विषय आहे. अध्यात्माबद्दल सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज असते. कारण ऐकलेलं पटकन 'आत' पोचत नाही . कारण इतर गोष्टींनी मन 'व्यापलेलं' असतं. असो.
ही संतश्रेष्ठ शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी रचलेली आरती आहे. २१ वेळा अंगावर थुंकणार्या यवनास शांतपणे आपल्या वागण्याद्वारे सुधारणारे, पितर भोजनावेळी ब्राह्मणभोजनाऐवजी दीनदलित जोडप्यांना जेवू घालणारे समाज सुधारक, यात्रा करुन परतताना गाढवाच्या मुखी गंगाजल ओतून भूतदया करणारे असे एकनाथ महाराज! स्वत:च्या उदाहरणातून शांतपणे समाजसेवा करता येते हे त्यांनी तेव्हाच दाखवून दिलेलं आहे.
पंगतीला पत्नीच्या पाठीवर एका उद्धटाने उडी मारली तेव्हा 'अगं सांभाळ, त्यांना पाडशील' म्हणून मिश्किलपणं त्याची जागा दाखवून देणारे, भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन नि अध्यात्माचे अवघड सिद्धांत सहज समजावून सांगणारे एकनाथ महाराज. कार्यालयीन कामकाजात एक पै चा हिशेब सापडेना म्हणून रात्रभर जागून तो शोधणारे व्यवहार दक्ष नि खाजगी कामासाठी सरकारी दिवा विझवून, स्वखर्चाच्या तेलाचा दिवा जाळणारे एकनाथ महाराज. विस्मृतीत गेलेल्या ज्ञानेश्वरीला शुद्ध प्रत करुन पुन्हा प्रचार करणारे एकनाथ महाराज जणू ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्याभोवतीची ही कर्मठपणाने फासणारी मुळीच जणू सोडवतात.
अशा सर्वार्थाने श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी रचलेली ही भगवान दत्तात्रेयांची आरती आहे.
मागे एका प्रतिसादात लिहील्याप्रमाणं भगवदतत्त्व सगळीकडं सारखंच. एकाच व्यक्तीला काका, मामा, बाबा, भाऊ, दादा, सर, साहेब, बंड्या म्हटल्याप्रमाणं कार्यानुसार नि कारणानुसार त्याचं नाम बदलतं. विश्व निर्मितीच्या कार्य शक्ती नि तेव्हाच्या अधिष्ठानाला ब्रह्मदेव, विश्वाचा पसारा सुरु राहण्याच्या कार्यशक्ती च्या अधिष्ठान देवतेला विष्णू नि तोचा संहार करण्याच्या शक्तीच्या अधिष्ठानाला महेश असं नाव आहे. हीच त्रैमूर्ती.
ज्या 'मोडस' मध्ये (अनुषंगाने) ती काम करते ते त्रिगुण. हालचालीशिवाय कार्य शक्य नाही. कुठलीही गोष्ट सुरु करण्यासाठी आवश्यक हालचाल अथवा जी क्रिया लागते तिला रजोगुण म्हणतात. नि सांभाळण्यासाठी आवश्यक असतं ते स्थैर्य. टिकणं. ह्या टिकण्याच्या मागं असणारा भाव असतो तो सत्त्वगुणाचा म्हणून ओळखला जातो. नि संपवण्यासाठी आवश्यक असतो तो तमोगुण म्हणजे संहार करण्याची क्रिया.
हल्लीच्या कोलॅबोरेशन च्या जमान्याच्या भाषेत बोलायचं तर दत्त भगवान हे एक 'टायअप' आहे तिन्ही गुणांच्या अभिव्यक्तीचं, तिन्ही प्रकारच्या शक्तींचं! पण ह्या तीन क्रिया म्हणजे भगवान दत्त नव्हेत किंवा हे तीन गुण म्हणजे दत्त नव्हेत. तर त्रिगुणात्मक म्हणजे तिन्ही गुणांचा आत्मा म्हणून म्हणजे ज्याला आपण मूळ स्त्रोत म्हणू शकू असे हे दत्त भगवान आहेत. मुळात ते काहीच करत नाहीत. ज्याप्रमाणं वीजेच्या बलावर हीटर नि रेफ्रिजरेटर दोन्ही चालून अनुक्रमे गरम नि थंड करण्याची कामं होतात पण वीज गरम किंवा गार नव्हे त्याप्रमाणं दत्त त्रिगुणात्मक आहेत खरे पण त्रिगुण म्हणजे दत्त नव्हेत तर त्रिगुण ज्याच्या अधिष्ठानावर काम करतात ती गोष्ट (इथं थोडं आणखी विश्लेषण म्हणजे असं एक जागी दाखवता येईल नि दुसरीकडं येणार नाही असं ते नसतंच मुळी. सबाह्य अभ्यंतरी पुढं येईलच)
दत्त म्हणजे दिलेला. कुणी दिला? कसा दिला? आपण वर पुराणातली कथा पाहिली. दत्तांच्या आईचं नाव अनसूया नि वडलांचं नाव अत्रि. कथा फार काही 'सांगणार्या' असतात. बहुतेकदा रुपक कथाच असतात त्या. आओअण नीट पाहिलं तर ह्या कथा पुष्कळ काही देऊ शकतात.
अ त्रि म्हणजे जे तीन च्या पलिकडे आहेत असे ते.
तीन गोष्टींची भली मोठी यादी आहे. तीन गुण -सत्त्व, रज, तम , तीन काल - भूत, वर्तमान, भविष्य, तीन अवस्था - जागृती, स्वप्न, सुषुप्ति, तीन देह- स्थूल, सूक्ष्म, कारण देह अशा सगळ्याच्या पलिकडं गेलेल्या व्यक्तीमध्ये दत्ताची अभिव्यक्ती शक्य आहे. (अथर्वशीर्षामध्ये त्वं गुण, देह, काल, अवस्था त्रयातीतः असं जे गणनायकाचं वर्णन आहे ते हेच्च्च्च! एकाच व्यक्ती चा हाक मारताना पुतण्याकडून काका नि दुसर्या बाजूनं भाच्याकडून मामा म्हणून उल्लेख येतो तसंच)
हेच अनसूया ह्या आईबद्दल. अन-असूय= असूया नसलेला/ली हे मनाचं स्वरुप असलेल्या व्यक्तीमध्ये दत्त भगवान येतात.
मुळात हे दत्त वगैरे का आणायचे जीवनात?
माणसाच्या जीवनात अनेक प्रकारच्या संघर्षामध्ये स्पर्धा, मत्सर, हेवेदावे असतात पण ज्या व्यक्तीला असूया नाही त्याला ह्या कशाचा त्रास होत नाही. आपल्याला वाटेल मग प्रगती कशी होणार? स्पर्धेशिवाय प्रगती कशी शक्य आहे ? उदाहरण घेऊ. शाळेत असताना एकाला ७५ % मिळाले तरी इतर ७०% च्या आसपास असल्यानं पहिला नंबर मिळायचा. एकदा असंच एकानं सांगितलं तुला ७५% मिळतात म्हणजे २५ % येत नाही का? डोळे उघडले. परिक्षा कितीची आहे? १०० % ची आहे ना? मग आपण १०० % साठी काम केलं पाहिजे. दुसरा ७० % वर असो अथवा ९५ % वर!
स्पर्धा कुणाची? कुणाशी? ह्या विचारामध्ये आपण इतरांशी तर नाहीच तर स्वतःशीसुद्धा स्पर्धा नाही करत. मला १०० % यावं एवढा भाव निर्माण होतो.
भूतकाळाची नि भविष्याची चिंता मुख्यत्वे भीतीपोटी असते. भीतीचा उगम पुन्हा आपण असू का नसू ह्यामध्ये असतो. एकदा आपण शरीर नाही तर चैतन्य आहोत हा भाव आत पक्का झाला की जमतं. थोडं अवघड वाटतं पण आधीच्या लेखात म्ह्टल्याप्रमाणं जर 'जे माझं आहे ते मी नाही' हे पक्कं झालं की माझा मोबाईल, घड्याळ म्हणजे मी नाही हे जसं मान्य तसं माझा हात, माझा पाय, माझं शरीर, माझं नाव, माझी शैक्षणिक पदवी, माझी संपत्ती, माझे नातेवाईक, माझं मन, बुद्धी चित्त म्हणजे मी नाही हे लक्षात येतं, पटतं. हळू हळू हे आत्मसात व्हायला लागतं. ह्यातून भीती जाते, चिंता जातात, काळजी जाते.
अनसूयेच्या पोटी येणारे दत्त ह्यासाठी आपल्यामध्ये आणावेत. असूया गेली नि भूत भविष्याच्या चिंता गेल्या की बरंचसं मन मोकळं होतं. मन मोकळं झालं की आनंद असतो, आनंद असला की समाधान असतं.
आपण पहिल्या ओळीतला पहिला चरण बघतोय अजून. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा 'जाणा' वर म्हटलेलं सगळं हे जाणण्याचीच तर प्रक्रिया आहे. नेमकं काय आहे हे एकदा समजलं की पुढचं सगळं एकदम स्वच्छ होऊन जातं.
माहिती असणं वेगळं, समजणं वेगळं, समजून घेणं वेगळं नि जाणणं वेगळं. हे जाणल्यावर पुन्हा वेगळं काही जाणण्याची गरज तर राहत नाहीच पण वखवख देखील थांबते.
हे एकदा समजलं म्हणजे जणू 'मास्टर की' सापडली!
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा.: असा हा (तिन्ही गुणांचे स्वामी एकत्र आलेला) अवतार तिन्ही लोकांचा राणा म्हणजे राजाच जणू. (बाकी आनुषंगिक म्हणून तमोगुणाचे स्वामी म्हणून शंकर तमोगुणी नाहीत तर ते त्याचे स्वामी आहेत. बर्याच जणांचा तसा समज पुराणकथांचा पाठिंबा असल्यानं जाणवतो खरा मात्र हे खरं नाही. आमच्या घाटपांडे काकांनी पोलिसात असताना अनेक जणांची पाठ फोडली असेल पण म्हणून ते रागीट ठरत नाहीत तसंच काहीसं! असो. महाशिवरात्रीला शंकराची आरती बघू अशी महादेवाला प्रार्थना!)
नेति नेति शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनिजन समाधी न ये ध्याना|
जोवर नेमका भाव समजत नाही तोवर गूढ आकलन होत नाही त्यामुळंच हे वेद शास्त्र नेति नेति (हे नाही, ते नाही असं) म्हणत राहतात नि कुठल्या अनुमानाप्रत येऊ शकत नाहीत. वर म्हटल्याप्रमाणं जे माझं ते मी नाही चा विचार अगदी ह्याच प्रकारे करता येऊन नेति नेति नि शंकराचार्यांच्या आत्मषटकाला जाऊन पोचतो.
'न जाणता कोटीवरी| साधने केली परोपरी| तरी मोक्षास अधिकारी| होणार नाही||' असं म्हणतानाचा समर्थ रामदासांचा भाव,
'तीळ जाळिले तांदूळ, काम क्रोध तैसेचि खळ' म्हणणारे तुकाराम महाराज, 'वस्तुर्सिद्धीर्विचारेण न कश्चित कर्मकोटिभि'
ह्या सगळ्याचा नि सुरवरमुनिजन योगी 'समाधी न ये ध्याना' चा एकंदर अर्थ हाच की योग्य मार्गानं सारासार विचार नि विवेक करुनच नेमकं काय हे समजून घेऊनच मोक्षपद प्राप्ती करुन घेतली जाऊ शकते (मुळात ते नित्यप्राप्त च आहे, चुकीच्या धारणांमुळं बंधन वाटतं (आरशावर घाण असली तर प्रतिबिंब दिसत नाही पण ते असतं तसं. आरसा स्वच्छ करावा लागतो))
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीता हरली भवचिंता
भव चिंता: भव म्हणजे संसार. दुसरा अर्थ माझ्यापुरतं असलेलं जग. आपल्या आजूबाजूचंच. सगळ्याचा विचार काही ठराविक लोकांसाठी सोडून देऊ. (असतात तसे. असो द्यावेत) श्रीगुरु कॄपेने दिल्या गेलेल्या ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहे असं नाथ महाराज म्हणतात तेव्हा ते आपल्यासाठी जास्त असतं. संत स्वतःसाठी बोलताना सुद्धा सगळ्यांचं हीतच पाहतात.
सबाह्य अभ्यंतरी म्हणजे सगळीकडे व्यापून असलेलं तत्त्व ते तूच आहेस. विश्वनिर्मिती ते विश्वाचा लय ज्याच्या सत्तेवर (बेसवर) चालतो ते चैतन्यरुप म्हणजे दत्त. ही गोष्ट अभाग्याला मात्र कळू शकत नाही.
पराहि परतली तेथ कैचा हा हेत, जन्ममरणाचा पुरलासे अंत|
आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलण्याची मूळ सुरुवात होते ती म्हणजे परावाणी. परा, पश्यन्ती, मध्यमा नि वैखरी अशा चार वाणी आहेत. वैखरी म्हणजे आपण जे बोलतो ते. मात्र परावाणी मध्ये मूळ सुरुवात होते असं मानतात.
ते तसंच का मानायचं? गणित सोडवायला एक 'क्ष' लागतो म्हणून. बस्स्स. समीकरण सोडवून 'क्ष' चं विसर्जन च अपेक्षित आहे. तर ही जी परावाणी आहे ती सुद्धा परतते असं दत्तात्रेयांचं स्वरुप आहे.
थोडासा विचार करुया. आपण कधी कधी शांत बसतो. अगदी शांत. काहीच विचार नाही. तेव्हा काय होतं? आतलं सगळं शांत असतं. मन हे करु का ते करु असं काम नसतं करत, बुद्धीला घ्यायला कुठला निर्णय नसतो, चित्त काही साठवून ठेवायला नसल्यानं गप्प असतं, तसंच विचाराचा उगम असलेली परावाणी सुद्धा आपल्या मूल स्थानावर असते. चक्र सुरुच नाही ना कसलं! त्यामुळं शांतीचा अनुभव येतो. ह्यालाच परावाणीचं मूलस्थानी परतणं म्हणायचं. जास्त डिटेल्स नकोत पण जेव्हा सगळं अत्यंत शांत असतं तेव्हा दत्ताचं दर्शन झालं असं म्हणायचं.
हे कधीकधी एका जन्मात शक्य होत नाही म्हणून 'जन्ममरणाचा अंत पुरतो'. जन्मो जन्म सुद्धा घालवावे लागतात.
दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला : अशा सातत्याच्या विचारातून कधीतरी जाणून घेतलेल्या अनुभवातून दत्त हा अनुभव येतो त्याला शाश्वततेकडे नेणार्या सतभावानं प्रणिपात म्हणजे अहं सोडून नमस्कार केला.(भाव म्हणजे जो स्थिर असतो तो तर भाव-ना म्हणजे अस्थिर भाव, अभाव म्हणजे नाहीच्च! )
अशा रितीने तत्त्व समजल्यानं आशीर्वाद लाभला नि जन्ममरणाचा फेरा म्हणजे हे जे 'मी नि माझं' चं खरं स्वरुप समजलं त्यामुळं त्या बंधनातून माझी मुक्तता झाली.
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन,
मीतूपणाची जाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान||
तत्त्व समजलेलं आहे, त्यामाग ची प्रेरणा जाणलेली आहे, जनार्दनस्वामी जे श्रीगुरु आहेत त्यांची कॄपा झालेली आहे अशा दुग्धशर्करायोगानं प्रारब्ध योगानं नि स्वप्रयत्नानं नाथ महाराजांना त्रिगुणातीत, अनसूय बुद्धीनं मिळालेल्या दत्ताचं ध्यान लागलंय, हे ध्यान लागल्यानं मनाचं, बुद्धीचं, चित्ताचं, अहंचं काम थांबून मनाची उत-मन म्हणजे जणू मन शिल्लकच नाही अशी अव स्था झालेली आहे. एकच तत्त्व सगळीकडं असल्याचा अनुभव, अनुभूती आल्यानं वेगळेपणा शिल्ल क नाही, मी आणि तू असं काही नाहीच सगळीकडं एकच एक असल्याचा भाव जागृत झालेला आहे.
असाच आनंदाचा ठेवा सगळ्यांना प्राप्त व्हावा हीच विनवणी श्री दत्तात्रेय, एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी नि श्रीगुरुंच्या चरणी अर्पण करतो.
सगळ्यांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रतिक्रिया
17 Dec 2013 - 12:03 am | यशोधरा
सुरेख लिहिले आहे. अतिशय आवडले.
19 Dec 2013 - 9:22 pm | सस्नेह
हभप प्यारेमहाराजकी जय !
20 Dec 2013 - 1:31 pm | सौंदाळा
+१
17 Dec 2013 - 9:33 am | अमोल केळकर
खुप छान विवेचन ! धन्यवाद
अमोल केळकर
17 Dec 2013 - 10:05 am | स्पा
दत्त दत्त
17 Dec 2013 - 4:09 pm | म्हैस
सुंदर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हि पौराणिक गोष्ट लिहिणार्यांनी इथे सुधा स्त्री ला बदनाम करायचा chnace सोडला नाहीये . म्हणे ३ देवींना मत्सर वाटला म्हणून . कितीही मत्सर वाटला तरी कुठलीच स्त्री आपल्या पतीला दुसर्या नग्न स्त्री च्या पुढे उभा राहा म्हणणार नहि. ………… असो .
हेच सत्य अनुसयेला तिला माहित नवत
अनुसया कितीही मोठी पतिव्रता असली तरी आपल्या आईचा हे अज्ञान बघून दत्तात्रेयांना दुख झालं आणि ते आपल्या आईचे गुरु झालेत .
श्रीपाद श्रीवल्लभ , न्रुसिह सरस्वती हे तर अगदी अलीकडच्या काळातले अवतार आहेत. प्रत्येक युगामध्ये भगवान दत्तात्रय अवतार घेवून लोकांना मार्ग दाखवण्याचं काम करतायेत . रामायण मध्ये एक उल्लेख आहे . दत्तात्रेयांनी लग्नं केल नाही . त्यामुळे अनुसायामातेने आपल्या सुने साठी जमवलेले दागिने तसेच राहिले. पुढे राम अवतारामध्ये वनवासात असताना राम जेव्हा अत्री आश्रमात अले. तेव्हा आपल्या सुनेला बघून अनुसयेला खूप आनंद झाला आणि ते दागिने तिले सीतेला दिले. रावण पळवून नेत असताना सीतेने जे दागिने खाली फेकले ते हेच दागिने होते.
दत्त उपासना हि हजारो वर्षांपासून चालू अहे..
अवतार उदंड होती , आणिक मागुती जाती
तैसी नोहे हि दत्त मूर्ती , कल्पांती अंत असेना !!
अगदी शेवटच्या माणसाला मोक्ष मिळेपर्यंत भगवान दत्तात्येयाचं हे कार्य चालूच राहणार आहे
18 Dec 2013 - 12:22 am | संजय क्षीरसागर
चालू द्या! ते दागिने सध्या गाडगीळ सराफांकडे आहेत!
आणि दत्तात्रेयांनी लग्न केलं नाही म्हणून काय झालं? शेवटच्या लग्नापर्यंत पीएनजी ते दागिने पुन्हापुन्हा घडवून नववधूंना सजवत राहाणार आहेत!
_________________________________________
मायला, एकदा स्टोर्या सुरु झाल्या की त्यांना अंत नाही!
18 Dec 2013 - 2:26 pm | पिलीयन रायडर
एक प्रश्न
असं होतं (आणि ते अनुसयेला समजलं नव्हतं.. आणि म्हणुन दत्त महाराज तिचे गुरु झाले..).. मग तरीही आणखीन हे कशासाठी?
दत्ता सारखा पुत्र (म्हणजे कथे नुसार साक्षात ब्रह्मा, विष्णु आणि महेश) असताना, आधिक तोच गुरु झालेला असताना सुनेसाठी दागिने जमवणे अशा गोष्टींची गरज काय? सामान्य माणसांच जाउ द्या..पण देवादिकांनाही हे मोह का असतिल? आपण शरीर नाहिच आहोत तर ह्या नश्वर शरीराला सजवण्याचे डोहाळे का लागावे?
17 Dec 2013 - 4:40 pm | प्यारे१
कथेबाबत अनेक प्रकारे उहापोह होऊ शकतो. मनोरंजनाचं साधन नसलेल्या नि गुलामीनं पिचत पडलेल्या समाजातला >>>>कथेकरी बुवा आपल्या कल्पनाविष्कारानं कथा अशा प्रकारे सांगू शकतो ह्यात आश्चर्य नाही. रुपकं म्हणून वापरलेल्या गोष्टींना घट्ट परंपरांचं स्वरुप येऊन त्यात कर्मठपण कधी आलं ते सांगता येत नाही. सध्या फक्त एवढंच लक्षात घेऊ या की पातिव्रत्याचं सामर्थ्य दाखवण्याबरोबर मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था असेल, भगवंताकडे जाताना कुठलाही आडपडदाच काय तर यत्किंचित देखील झाकलेपणा नसला तर, विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो.
कथेबरोबरच वाचकांनी हा परिच्छेद देखील वाचावा ही नम्र विनंती!
17 Dec 2013 - 5:10 pm | आनंद घारे
तसा तो नसतोच ... पर्दा नही है कोई खुदासे बंदोंसे आगे पर्दा क्या?
18 Dec 2013 - 12:57 pm | म्हैस
संजय क्षीरसागर
तुम्ही दत्त कृपेचा कधी अनुभव घेतला आहे का? घेतला नसेल तर कोणत्या आधारावर दत्त हि काल्पनिक गोष्ट आहे, भाकडकथा, ह्याव अन त्याव बोलताय तुम्ही?
संपादित.
कृपया व्यक्तिगत रोख टाळावा.
18 Dec 2013 - 2:45 pm | Dhananjay Borgaonkar
अप्रतिम लेख.
मला पिठापुर आणि कुरवपुर या दोन्ही ठिकाणी जाण्याचं भाग्य लाभलं आहे.
18 Dec 2013 - 2:49 pm | उद्दाम
मला कुरुंदवाड येथे जन्मण्याचे आणि वाढण्याचे भाग्य लाभले आहे.
18 Dec 2013 - 3:01 pm | राही
एव्हढ्या सगळ्या प्रतिसादांमध्ये 'श्रीसत्तसंप्रदायाचा इतिहास' या श्री. रा. चिं. धेरे यांच्या ग्रंथाचा उल्लेख कोणीच कसा केला नाही?
18 Dec 2013 - 3:02 pm | मारकुटे
सत्त नाही दत्त
आणि धेरे नाही ढेरे...
18 Dec 2013 - 3:06 pm | बॅटमॅन
भावनाओंको समझो.
18 Dec 2013 - 5:19 pm | राही
डुलक्या नव्हेत, घाईगडबड. मिपावर प्रकाशनानंतर स्वसंपादनाची सोय नाही म्हणून चुकांची संख्या मिपावर जास्त दिसते. (यात जाणूनबुजून शुद्धलेखन उलटेपालटे केल्यामुळे झालेल्या चुका धरलेल्या नाहीत. मिपावर ते 'अलौड' आहे.)
तसेही प्रतिसादाच्या शीर्षकात 'ढेरे' असेच टंकले आहे त्यामुळे निदान ढेरे शब्द माहीत आहे असे निदान करता येण्याजोगे होते.
कळफलकावर एस आणि डी ही अक्षरे शेजारी आहेत त्यामुळे बरेच वेळा अशी गडबड होते आणि पूर्वावलोकनात सुधारली जाते. या वेळी पूर्वावलोकन झाले नाही हे खरे.
18 Dec 2013 - 3:17 pm | बाळ सप्रे
या जगात काय म्हटलय त्यापेक्षा कोणी म्हटलयं याला जास्त महत्व आहे !!
मूळ लेख ओघवता, रसाळ वाणीचा ठरतो तर तशाच गोष्टी सांगितलेल्या एका प्रतिसादावर "प्रश्न" पडतात !!
18 Dec 2013 - 3:20 pm | संजय क्षीरसागर
तू आयुष्याला स्पर्शून जाणारे अत्यंत वॅलिड प्रश्न मांडलेत !
सामना चित्रपटात निळू फुले श्रीराम लागूंना म्हणतो : "दारू हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही मास्तर"!
प्रत्येक प्रश्न सोडवता येत नसला तरी आहे त्या परिस्थितीचा स्विकार करता येतो. दॅटस अ ग्रेट अंडरस्टँडींग अँड रिलीफ.
जर हा व्यक्तिगत प्रश्न असता तर माझ्या हरकतीला विचारतो कोण? असे विचार जनमानसावर दूरगामी परिणाम करतात. कांट यू सी धीस? ही भंपक स्टोरी किती युगं चाललीये? ही निरर्थक गुंगी किती लोकांना भ्रमात घेऊन गेलीये.
जर सगळाच भ्रम असेल तर प्रश्नच मिटला. मग दत्त हा नवा भ्रम कशाला? त्यानी नवा कहार ओढवतो. मंदिरं, मशीदी, चर्चेस, गुरुद्वारं....हे पाडा ते बांधा. ही याची वोट बँक ती त्याची वोट बँक. आहे त्या तापात आणखी नवा ताप!
विज्ञानाची तुलना भाकडतेशी निदान तुझ्यासारखानं तरी करु नाही. तो मानवी बुद्धीमत्तेचा उपमर्द आहे.
मला दया येते! अजूनही जर देव आकाशात आहे इतका बालीश गैरसमज घेऊन लोक जगत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण वरच्या ओळी पुन्हा उधृत करतो :
जर हा व्यक्तिगत प्रश्न असता तर माझ्या हरकतीला विचारतो कोण? असे विचार जनमानसावर दूरगामी परिणाम करतात. कांट यू सी धीस? ही भंपक स्टोरी किती युगं चाललीये? ही निरर्थक गुंगी किती लोकांना भ्रमात घेऊन गेलीये. इट इज अ शिअर वेस्ट ऑफ ह्युमन लाईफ, पब्लिक वेल्थ अँड टाईम.
तू प्रतिसाद शांतपणे वाचलास तर लक्षात येईल की द डॅमेज इज नॉट अॅज ग्रॉस अॅज अ पर्सनल अॅसॉल्ट. इट इज वेरी सटल अँड डिपली पॉयझनस फॉर द जनरेशन्स टू कम अँड फॉर द नेशन अॅज अ होल. कारण एकदा अशा भाकड कथांचा संस्कार झाला की वस्तुनिष्ठ दृष्टीकोन हरवतो, तो व्यक्तिगत होतो आणि कार्यकारणाचा शोध घेण्याची वृती (वैज्ञानिक दृष्टीकोन) संपते.
जर एक दाभोलकर इतक्या फंडामेंटल गोष्टीसाठी स्वतःचं आयुष्य वेचू शकतो तर माझ्या दृष्टीनं मी घालवत असलेला वेळ आणि पत्करत असलेला जनक्षोभ अत्यंत नगण्य आहे.
18 Dec 2013 - 3:54 pm | पिलीयन रायडर
हे बघा.. माझीही ह्या बाबतची मतं (चक्क) तुमच्या सारखीच आहेत. पण..पण.. दुसर्याच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीला असं डायरेक्ट भंगारात काढु नये असं माझं मत आहे.
तुम्ही त्या जागी जाऊन, त्यांच्या विचारसरणीमुळे मिळणार आधार अनुभवु नाही शकत. माणुस म्हणुन त्यांना तो महत्वाचा आहे.. तुम्ही बुद्धीवादी आहात, सगळेच नसतात.. जो तो आपापल्या परीने आपले आयुष्या सार्थकी लावण्याचा यत्न करत असतो. त्यामुळे वन कॅन नॉट से दॅट इट इज अ शिअर वेस्ट ऑफ ह्युमन लाईफ, पब्लिक वेल्थ अँड टाईम.
बरं.. दाभोळकर बळी देणे, भानामती, करणी इ एका माणसाच्या श्रद्धेमुळे जेव्हा दुसर्याच्या आयुष्याला धक्का बसतो अशा प्रथांविरुद्धा लढत होते. आरती करणे, देव आहे असं मानणे, तारणहार आहे असे समजुन निर्धास्त रहाणे अशा श्रद्धेने कुणाचं काय वाईट केलय? उलट खोट्या समजुतीने का होईना, कुणाचा तरी धाक असल्या सारखी वागत अस्तील माणसं तर काय प्रॉब्लेम आहे? अर्थात ह्या सिस्टिमचेही दोष आहेत.. पण दुर्लक्षण्याजोगे आहेत..
तुम्हाला हा रिलीफ वाटतो.. सगळ्यांनाच नाही..
"जे तुम्हाला वाटतं, पटतं.. तेच सगळ्यांना वाटेल्..पटेल असं नाही" हे समजुन घ्या आधी..
जसे सगळ्यांचे स्वभाव, बुद्धिमत्ता, विचारसरणी इ वेग्वेगळे आहेत्..तसेच प्रत्येकाचा रिलीफ शोधण्याचा मार्गही वेगवेगळा आहे..
18 Dec 2013 - 3:59 pm | बॅटमॅन
कुडंट अग्री मोर.
अन प्रत्येक गोष्टीवर मतप्रदर्शनाआधी पूर्वानुभव गरजेचा असता तर गुप्तरोगतज्ञ आणि मनोविकारतज्ञांची अवस्था अवघडच झाली असती.
18 Dec 2013 - 4:06 pm | पिलीयन रायडर
पुर्वानुभव असला नसला तरी एकवेळ ठिके..
पण समोरच्याचा मार्ग चुकच आहे असं छातीठोकपणे म्हणणं मात्र चुक.. त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकतच नाही ना.. मुळात तुमची स्वतःची विचारसरणी सोडुन, कोर्या मनाने तुम्ही त्याचं ऐकुच शकत नाही.
18 Dec 2013 - 4:08 pm | बॅटमॅन
पण
हे सर्व लोकांच्या बाबतीत बरोबर नाही.
18 Dec 2013 - 4:16 pm | पिलीयन रायडर
मला वाटतं की तुम्ही दुसर्याच समजुन घेण्याची तयारी निश्चित दाखवु शकता.. कदाचित तुम्हाला ते विचार पटुन तुम्ही नवा विचार अंगीकारु शकता.. पण.. जुन्या विचाराचा काहीतरी रेसिड्युअल असणारच की.. पाटी कोरी कशी होईल? तुलना होईलच.. म्हणुन तसं लिहीलय मी..
18 Dec 2013 - 4:26 pm | बॅटमॅन
अर्थातच. काहीतरी रेसिड्युअल असणारच.
मुद्दा तो नाहीये. रेसिड्युअल असो वा नसो, समजून घेण्यात त्याचा काय प्रभाव पडतो हे महत्त्वाचं. उदा. अदरवाईज सनातनी विचारांचे लोक काही बाबतींत लिबरल असतात. जिथे लिबरल असतात त्या मुद्द्यांबाबत त्यांचा सनातनी रेसिड्युअल आड येत नाही.
18 Dec 2013 - 4:31 pm | पिलीयन रायडर
हम्म्म.. पॉसिबल..
18 Dec 2013 - 4:22 pm | स्पा
आमच्या सरांना बोलायचं काम नाय
18 Dec 2013 - 11:31 pm | कवितानागेश
हे.. हे असले भक्त संतांचे नाव खराब करतात!
बिचारे प्यारेकाका नम्रतेनी आणि प्रेमानी समजूतदार उत्तरे देतायत, तर तुम्ही येउन समोरच्या लोकांना अश्या धमक्या द्या!
हात ले श्पायलू!! :P
19 Dec 2013 - 6:10 am | स्पा
सर इज आलवेज राइट
19 Dec 2013 - 10:09 am | संजय क्षीरसागर
देव ही मानवी कल्पना आहे या विधानाचा कुणीही प्रतिवाद करुन दाखवावा *ok*
आणि एकदा त्या कल्पनेचा निरास झाला की लेखाचा डोलारा कोसळला! कारण दत्तच नाही म्हटल्यावर लेखातल्या एकाही वाक्याला अर्थ उरत नाही. मग
हा भोळसटपणा संपला. समाजाचा दृष्टीकोन वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक व्ह्यायला सुरुवात झाली! अँड दॅट्स द पर्पज ऑफ माय रायटिंग.
19 Dec 2013 - 10:20 am | स्पा
बराबर बोलू छु
19 Dec 2013 - 2:13 pm | सूड
आयला, त्यांना तू 'छू' बोललास?? *mosking*
19 Dec 2013 - 8:30 pm | अभ्या..
त्यांना नाय बोलला. स्पावड्याच छू.
छू म्हणजे गंगूबाई नॉन म्य्यट्रिक्चा :)
20 Dec 2013 - 1:36 pm | अत्रुप्त आत्मा
@स्पा - Thu, 19/12/2013 - 10:50
बराबर बोलू छु>>>> =)) या पां डुब्बाला हलकटाला ना ठाकुर्लीच्या ठेसनात.... ठसा ठसा..... =))
19 Dec 2013 - 3:10 pm | प्यारे१
सर एकदा लेख परत वाचणार का? पूर्ण? शांतपणं?
लेख वाचल्यावर माझे काही प्रतिसाद पण वाचा.
बघा तर प्रयत्न करुन. जमेल.
काही मुद्दे सुटलेत तुमचे.
स्कोअर सेटलिंग करु की नंतर!
घाई आहे काय ?
सध्या काही मार्च एन्ड नाहीये.
19 Dec 2013 - 3:16 pm | मारकुटे
भलत्या अपेक्षा तुमच्या
19 Dec 2013 - 3:23 pm | सूड
नायतर काय !!
19 Dec 2013 - 8:16 pm | अर्धवटराव
मूळ मुद्दा कोणि किती शांतपणे लेख वाचला हा नाहिच आहे. मूळ मुद्दा असा कि "मी" विश्वकल्याणासाठी जो जनक्षोभ ओठावुन घेतो त्याचं कौतुक नाहि तुला, शिवाय "माझ्या" मुद्द्यांचं कोणि खंडण करु शकत नाहि या माझ्या अहंकाराचं सुख तुम्हाला का बोचतय ? "मी" मानवी मनाविषयी जी नवीन संशोधनं मांडली आहेत त्यामागे माझं लॉजीक नसुन माझ्या धारणा आहेत. आता या धारणा जोवर तुम्ही अंगीकारत नाहि तोवर तुम्ही धारणारहित कसे व्हाल?
18 Dec 2013 - 4:22 pm | प्यारे१
>>>>द डॅमेज इज नॉट अॅज ग्रॉस अॅज अ पर्सनल अॅसॉल्ट. इट इज वेरी सटल अँड डिपली पॉयझनस फॉर द जनरेशन्स टू कम अँड फॉर द नेशन अॅज अ होल.
ऊप्स! हे फारच गंभीर झालं की. मी एवढा मोठा गुन्हा केलाय?
आत्मु स्मायलीवाले बाबा, डोळे विस्फारल्याची स्मायली द्या हो.
18 Dec 2013 - 4:44 pm | विटेकर
मी एवढा मोठा गुन्हा केलाय?
महाराजा.. कर्माचा परिणाम कितीही गंभीर असला तरिही गुन्हाची पातळी ठरवताना हेतु ( इंन्टेश्न ) महत्वाचे धरले जाते . तस्मात, काळजी काय कु करनेका?
लोगा आयेंगे , बोलेंगे, ध्यानच नै देनेका ! आपुन अप्ना काम करनेका !
अहो या देशात इतके महात्मा झाले म्हणून आम्ही सुधारलो का ? पावलापुरता प्रकाश हे तत्व ध्याने ठेवावे ..
बाकी कुत्ता जाने चमडा जाने !
पुरोगामी अथवा नास्तिक अस्ण्याचा अतिरेक हे पण एक अंधश्रद्धाच नाही का ? आणि त्याही पेक्षा "मीच शाणा बाकी सबलोग यडे है " ही तर विकृत श्रद्धा आहे !
18 Dec 2013 - 4:54 pm | प्यारे१
काका,
सरांना काळजी आहे ती लोकांची. पुढच्या पिढ्यांची नि एकंदरच देशाची. म्हणून राहावलं नाही.
'निवडणुकोत्तर' केजरीवालांची आठवण आली.
बाकी एका लेखाचा परिणाम एवढा दूरगामी नि खोल असेल तर क्या केहने!
( थोडा विनोद बरं का : जल्ला आमचा वर्षाचा बाल्या आमचं ऐकत नाय! बाकी लोकं काय ऐकणारेत? ;) )
18 Dec 2013 - 5:19 pm | मी_आहे_ना
वाह प्यारे, आज बरेच दिवसांनी मिपावर आल्याचं चीज केलं ह्या लेखानं. धन्स्!
आता जेव्हा जेव्हा दत्ताची आरती म्हणेन / ऐकेन तेव्हा तेव्हा हे नक्की आठवेल.
19 Dec 2013 - 5:20 pm | म्हैस
गुप्तरोग, मनोविकार, आणि दत्त ह्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करताय ह्यातच तुमची विचारसरणी कळून येते.
ह्या रोगांची लक्षणे डॉक्टरांना डोळ्याला दिसतात , ऐकू येतात , स्पर्शाने जाणवतात . हे रोग म्हणजे काही अनुभवण्याच्या गोष्टी नहियेत. तुम्हाला स्वताला ह्या रोगांचा अनुभव नसला तरी डॉक्टरांच्या सांगण्यावर तुम्ही विश्वास ठेवता ना . का मला स्वताला तो रोग झाल्याशिवाय मी तो काल्पनिक आहे असाच समजणार असा हट्ट धरून बसता ???
ईश्वर मात्र तुम्हाला स्वताला अनुभव घेवूनच जाणवेल . आणि जर तुमची त्या दृष्टीने प्रयत्न करायची तयारी नसेल तर दत्त हि काल्पनिक गोष्ट आहे वगेरे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही
19 Dec 2013 - 5:26 pm | म्हैस
गुप्तरोग, मनोविकार, आणि दत्त ह्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करताय ह्यातच तुमची विचारसरणी कळून येते.
ह्या रोगांची लक्षणे डॉक्टरांना डोळ्याला दिसतात , ऐकू येतात , स्पर्शाने जाणवतात . हे रोग म्हणजे काही अनुभवण्याच्या गोष्टी नहियेत. तुम्हाला स्वताला ह्या रोगांचा अनुभव नसला तरी डॉक्टरांच्या सांगण्यावर तुम्ही विश्वास ठेवता ना . का मला स्वताला तो रोग झाल्याशिवाय मी तो काल्पनिक आहे असाच समजणार असा हट्ट धरून बसता ???
ईश्वर मात्र तुम्हाला स्वताला अनुभव घेवूनच जाणवेल . आणि जर तुमची त्या दृष्टीने प्रयत्न करायची तयारी नसेल तर दत्त हि काल्पनिक गोष्ट आहे वगेरे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही
19 Dec 2013 - 5:52 pm | बॅटमॅन
दत्त काय किंवा अजून कुठला देव काय, तो आहे किंवा नाही याबद्दल मी काहीच विधान केलेले नाही. तसे एखादे विधान असल्यास दाखवून द्यावे. तो असला काय नि नसला काय, मला फरक पडत नाही. आणि मला काय बोलायचा अधिकार आहे हे तुम्ही सांगायची गरज नाही.
बाकी रोगाबद्दलचे हंबरणे अस्थानी आणि बादरायण आहे ते एक असोच.
पण आता अजून एक प्रश्न येतो, की त्या सर्वशक्तिमान वगैरे वगैरे ईश्वराची भक्ती करणार्या तुम्ही, आमच्या सारख्या महामूर्ख लोकांबरोबर वादाच्या घाणीत का लोळताय? तुमच्या भगवंताने परमिशन दिलीय का सोयीस्करपणे शिव्या घालायची?
19 Dec 2013 - 5:48 pm | प्यारे१
http://misalpav.com/node/15926
अवलिया नानानं आधीच्च लिहीलेलं राव!
चलो अच्छा है.
19 Dec 2013 - 8:33 pm | किसन शिंदे
खुप सुंदर विवेचन केलंयस प्यारे. 'लवथवती विक्राळा'ची वाट पाहतोय.
19 Dec 2013 - 9:05 pm | प्यारे१
नक्की प्रयत्न करेन. :)
गणपती बाप्पा मोरया! जय माता दी!! जय श्री गुरुदेव दत्त!!!
20 Dec 2013 - 12:26 pm | म्हैस
कारण तुम्ही माझ्या अराध्याबद्दल वाटेल ते बद्बद्ताय म्हणून . तुम्ही म्हणताय कुठला देव आहे कि नाहीये ह्त्याच्याने तुम्हाला काही फरक पडत नाही . मग तुम्हाला फरक पडत नसेल तर मी आहे म्हणल्यावर तुम्हाला एवढा राग यायचा काय कारण आहे? तुमचा त्याच्यावर विश्वास नसेल तर द्या न सोडून .
दत्त महाराजांबद्दल तुम्ही चुकीचे विचार पसरवत आहात म्हणून
20 Dec 2013 - 12:36 pm | बॅटमॅन
आमच्या धारणेचा तर्कशुद्ध प्रतिवाद करता येत नसेल तर तुम्हाला राग यायचं कारण काय आहे?
यात नक्की काय चूक आहे ते सांगा, मग पाहू. दत्त/शंकर/विष्णू हे फक्त लेबल समजा.
20 Dec 2013 - 12:38 pm | पिलीयन रायडर
बाई,
मला एक कळत नाही तुमचं.. मी अत्यंत कुतुहलाने हा प्रश्न विचारतेय.
तुम्ही धार्मिक / अध्यात्मिक / अस्तिक वगैरे वाटता. कुणी देवादिकांविरुद्ध बोलले की तुम्ही हिरीरीने वाद घालायला येता. पण मुळात प्रश्न असा की तुम्हाला फरक का पडतो लोकांच्या बोलण्याचा? बॅट्या काहीही बोलेल, जर तुमचा विश्वास आहे देवावर तर बॅट्या काय कुणाच्याही बोलण्याने काय फरक पडणारे? शिवाय वर एकदा तुम्हीच लिहीलय की अनुभव / प्रचिती आल्याशिवाय कळणार नाही. मग ज्यांना अशी प्रचिती येईल ते ठेवतील देवावर विश्वास, नाही येणार ते नाही ठेवणार.. तुम्ही का त्रास करुन घेताय? मी मागेही एकदा तुम्हाला सांगितलं होतं, काय मत बनवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
तुमचा प्रतिसाद असाही लिहिता येईल ना:-
देव खरच आहे की नुसतीच कल्पना आहे हा मोठा विषय झाला.. पण तोवर देव न मानणारे असतीलच..ते टीका करतीलच, तुम्ही जमल्यास मनावर घेणं सोडुन द्या..
20 Dec 2013 - 12:38 pm | म्हैस
ह्या प्रश्नच अर्थ समजला नहि. कृपया उलगडून सांगितला तर उत्तर देत येईल .
आपल्या मुलाने लग्न करण , सुनेसाठी दागिने जमवणं हे तीने एका आईच्या भूमिकेतून केला आहे . कारण ती पतिव्रता वगेरे असली तरी सत्याची जाणीव तिला नवती . ती अज्ञानीच होती असा मी आधीच एका प्रतिसादात म्हणलाय.
दत्त पुराणात म्हणल्याप्रमाणे दत्त महाराज किशोरवयीन झाल्यावर अनुसया त्यांना लग्नाचा आग्रह करू लागली तेव्हा दत्तांनी त्याला नकार देवून अनुसयेला सत्याची जाणीव करून दिलीये .
तेव्हा हे दागिने वगेरे जमवणं आधी . आणि दत्तांनी आपल्या आईचा गुरु बनण हे नंतर असा क्रम आहे
ह्याचा हि अर्थ समजला नाही . इथे दत्त महाराज कुठे स्वताच्या शरीराला सजवण्याच्या मागे लागले आहेत?
20 Dec 2013 - 1:10 pm | म्हैस
पिलीयन रायडर
बाई तुम्ही एकीकडे म्हणताय कि काय मत बनवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . अहो मी पण माझी मतच मांडते आहे न .
ब्याट्या म्हणतोय देव नाहीये आणि मी म्हणतेय अहे. एवढाच फक्त चाललाय न . ब्याट्याने माझ्या म्हणण्याला दुजोरा द्यावा किवा त्याने माझी मतं मान्य करावीत वगेरे असं मी कुठे म्हणलय? उलट माझ्यासारख्या लोकांमुळे भोन्दुबबांच फावत वगेरे म्हणून तोच माझ्याशी वाद घालतोय . मी फक्त मला असलेली माहिती इथे देत आहे .
आणि ब्याट्याला काही बोलल्यामुळे तुम्हाला मला प्रतिसाद द्यावासा वाटत असेल तर दत्त महारानांना काही बोललं तर मला प्रतिसाद द्यावासा वाटला ह्यात मी चुकीची कशी ठरतेय ?
खरं आहे ते. मी तशी आहे . कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे . जोपर्यंत मला अनुभव नवता तेव्हा माझी मतं सुधा बॅटमॅन सारखीच होति. वेळ आल्यावर जसा मला समजलं तसाच त्यालाही समजेल एवढाच म्हणलाय न मी . जोपर्यंत त्याची वेळ येत नाही तोपर्यंत त्याने आंधळेपणाने देव आहे म्हन्नार्यांवर किवा नाही म्हन्नार्यांवर विश्वास ठेवावा असा मी म्हणताच नहिये.जोपर्यंत आपण स्वतः ती अनुभवत नाही तोपर्यंत ती आहे किवा नाही हे आपण खात्रीने सांगूच शकत नाही न .
आणि मत मांडण्याच म्हणाल तर एखाद्या काल्पनिक, गोष्टील्या किवा सध्या सुध्या गोष्टींवर तुम्ही काहीही मतं मांडू शकता . पण देव , धर्म ह्याच्यावर मतं मांडताना भान ठेवायला नको का? कारण ह्या गोष्टी खूप sensitive अस्तत. तसं नसतं तर देव धर्मावरून दंगली वगेरे झाल्या असत्या का?
20 Dec 2013 - 1:18 pm | बॅटमॅन
देवधर्मावरून भावना भडकवणारे अन दंगली करणारे एकजात गाढव आहेत. (सॉरी गाढवांनो तुमचा अपमान करण्याचा हेतू नव्हता पण भाषेचे लिमिटेशन दुसरे काही नाही.)
अन मी देव नाहीये वगैए काहीच विधान केलेले नाही. हा गैरसमज दूर करावा. अन भोंदूबाबांचं फावतं ते देव अस्तित्वात आहे म्हणण्याने नव्हे तर त्याच्याशी संबंधित भाकडकथांनाही तितकेच महत्त्व देण्याने.
20 Dec 2013 - 2:03 pm | प्यारे१
>>>>अन भोंदूबाबांचं फावतं ते देव अस्तित्वात आहे म्हणण्याने नव्हे तर त्याच्याशी संबंधित भाकडकथांनाही तितकेच महत्त्व देण्याने.
बरोबर आहे.
ह्याबरोबर सत्ता, संपत्ती, यश, किर्ती, प्रतिष्ठा ह्यांच्या खर्या नि खोट्या हव्यासापायी सगळ्या (धर्माला नि देवाला सुद्धा) वेठीला धरलं जातं. दुर्दैवानं सगळ्याच संप्रदाय प्रमुखांनी देवाचं मार्केटिंग 'सिन्स बिगिनिंग' केलेलं आहे.
बाकी देवानं काही करणं म्हणजे कुणा अतिमानवी व्यक्तिनं काही हस्तक्षेप करणं अशी अपेक्षा असेल तर ती चुकीची आहे एवढंच सांगू शकतो. :)
बाकी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र एखाद्याची तहान भागवायचीच असेल तर ओंजळभर पाणी मिळेलच ह्याची खात्री आहेच्च.
इत्यलम!
20 Dec 2013 - 1:58 pm | प्रचेतस
बाकी काय ओ म्हैसतै, बहुसंख्य महाराष्ट्रवासीयांचे कुलदैवत खंडोबा असताना त्याला थिल्लर म्हणताना तुमचे हे भान कुठे गेले होते हो?
20 Dec 2013 - 2:04 pm | बॅटमॅन
हा प्वाइंट तर मी विसरलोच होतो वल्लीशेठ, आठवण करून दिल्याबद्दल आभार.
म्हशे, खंडोबाबद्दल काहीबाही बरळताना ही अक्कल कुठे गेली होती हे सांग मग पाहू तुझी दत्तभक्ती अस्सल की बेगडी ते.
20 Dec 2013 - 2:27 pm | मारकुटे
तेव्हा दत्ताची प्रचिती आलेली नसेल
20 Dec 2013 - 2:48 pm | बॅटमॅन
ठ्ठो!!!!!
20 Dec 2013 - 2:40 pm | म्हैस
१० वेळा माझा खंडोबाच्या लेखावरचा प्रतिसाद वाचा . मी खंडोबाला थिल्लर म्हणलाय कि ५ बायकांशी लग्न करण्या मागच्या उद्देशाला थिल्लर म्हणलाय ते पुन्हा नित वाचा . तसाच मी असाही विचारला होता कि खंडोबा हे दैवत आहे ह्याचा referance द्य. आजपर्यंत खंडोबा कुणाला प्रसन्न झालाय ,त्याने भक्तांना दर्शन दिलाय असा आजपर्यंत कधी कुणी सांगितलाय का? किवा दत्तांवर जसे अनेक ग्रंथ आहेत . अनेक लीलाचरित्र आहेत , स्तोत्र आहेत आणि त्याचा दत्त अस्तित्वाचा अनुभव दत्ताभाक्तान्म्ना प्रत्यक्ष येतो तसा अनुभव खंडोबा भक्तांना आलाय का? वैरागी दत्त कुठे आणि दुसर्या स्त्रीच्या मोहात पडून म्हाळसाइ ला फसवून घर सोडून जाणारा खंडोबा कुठे?
बाकी तुम्हाला खंडोबा बद्दल काय माहिती आहे ते सांगा अधि. कारण फक्त विरोधाला विरोध करणारा हा प्रश्न आहे असा मला वाटतंय
20 Dec 2013 - 2:53 pm | बॅटमॅन
चार पुस्तके लिहिल्याने अमुक दैवत मोठे होते हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन म्हशे =))
म्हणजे देव मोठा करायचा तर तेसुद्धा माणसानंच करायचं म्हण की. आव आणायचा भक्तीचा पण करायची ईश्वरनिंदा हे कै खर्या भक्ताला शोभत नाही. दत्तभक्तांना चालत असेल तर माहिती नाही बॉ.
20 Dec 2013 - 3:04 pm | सूड
>>चार पुस्तके लिहिल्याने अमुक दैवत मोठे होते हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन म्हशे
नायतर काय !!
बरं का म्हैसबाई, तुम्ही एकदा काय लिहायचं ते ठरवाच!! एका धाग्यावर देव सगळीकडे असतो म्हणता इकडे दोन देवांमध्ये भेदभाव? बाकी दत्तमहाराजांप्रमाणे खंडेरायाबद्दल कोणी पुस्तके लिहीली आहेत का हा प्रश्न विचारुन आपण पुन्हा एकदा आपल्या आयडीला जागल्या आहात हेवेसांनल.
20 Dec 2013 - 2:55 pm | मारकुटे
अरेच्या माझा प्रतिसाद हरवला का?
20 Dec 2013 - 2:56 pm | प्रचेतस
=))
अहो म्हैसतै
तुम्हाला जसा दत्त दैवत आहे असं वाटतंय तसा बाकीच्यांना खंडोबा हे दैवत का वाटू नये?
खंडोबावर पण ग्रंथ आहेत. महाराष्ट्राची चार दैवते हे ग. ह. खर्यांचे किंवा दक्षिणेचा लोकदेव खंडोबा हे ढेर्यांचे ही पुस्तके वाचा जरा. मग सगळे रेफरन्स मिळतील.
बाकी माझं जाऊदे, मी देव वैग्रे काही मानत नै. पण दुसर्या देवांवर टिका करतांना आपण आपलेही भान सोडत आहोत हे जरा ध्यानात ठेवा म्हणजे झालं.
20 Dec 2013 - 2:42 pm | म्हैस
प्यारे , batman माझ्या प्रतिसादामध्ये मी कोणाचा वैयक्तिक उल्लेख केला नहिये.
पिलियन रायडर ने batman चा नाव त्यांच्या प्रतिसादात घातल्यामुळे साहजिक रोख batman कडे गेला
20 Dec 2013 - 2:53 pm | प्यारे१
:)
(नुकताच बिकांचं शिष्यत्व मनोमन घेतलेला) प्यारे
20 Dec 2013 - 2:55 pm | मारकुटे
बिकाचालिसा किंवा बिका माहात्म्य लिहा
20 Dec 2013 - 3:20 pm | प्यारे१
:)
सूचनेबद्दल आभारी आहे.
20 Dec 2013 - 8:09 pm | बिपिन कार्यकर्ते
:)
20 Dec 2013 - 3:09 pm | म्हैस
मी काय म्हणतेय ते तुला समजतंय का? पुस्तके वाचल्याने दत्त अस्तित्वाचा अनुभव येतो असा म्हणलाय मि… आधी नित काय लिहिलंय ते वाच अन मग खरड .
हि फक्त माहिती अहे. एखादी गोष्ट सांगावी तशी …. त्याने खंडोबाचा साक्षात्कार झालाय का आजपर्यंत कुणाला?
अहो सगळ्या महाराष्ट्राच काय ? माझाही कुलदैवत पालीचा खंडोबा आहे . आणि खंडोबाची बहिण मानली गेलेली इंजाबाई कुलदेवी आहे . वर्षानुवर्षे आम्ही सुधा खंडोबाची भक्ती केलीये ……. आमच्या देव्हार्यात खंडोबाचे टाक आहेत . केवळ लहानपणापासून हे आपला कुलदैवत आहे हे मनावर ठसाव्ल्यामुळे ……. आणि संपूर्ण महाराष्ट्राचीही हीच धारणा असेल तुम्ही नीट बघितलं तर खंडोबाच्या बाबतीत नुसतीच कर्मकांड , जत्रा उरूस वगेरे आहेत. महाराष्ट्राच कुलदैवत असला भक्ती अशी नहिच.
20 Dec 2013 - 3:19 pm | बॅटमॅन
म्हशे, तुला माहिती नाही म्हणून खंडोबाची प्रचीती कुणाला येत नाही असे धडधडीत खोटे विधान कसे करू धजावलीस? सांप्रदायिक झापड सोडून अन्य देवतेकडे बघायची कुवत नसेल तर फायदा काय? खंडोबाचे भक्त तुला ठाऊक नसतील म्हणून काय झालं? अशी मुक्ताफळे उधळण्याचा अधिकार तुला कोणी दिला?
20 Dec 2013 - 3:21 pm | मारकुटे
असं कसं ? देव नसतो आणि त्याची प्रचिती येऊच शकत नाही असे विधान विज्ञानवादी करतात ते चालतं आणि म्हशीचं बोलणं नाही चालत ! दिस इज नोत फेअर... आयटेल्यु
संपादित
20 Dec 2013 - 3:23 pm | बॅटमॅन
तथाकथित विज्ञानवाद्यांचा समाचार नंतर घेऊच ओ, हे फार रेकलेस होत चाललंय पण =))
संपादित
20 Dec 2013 - 3:35 pm | बॅटमॅन
मा.श्री. ज्यांनी हा प्रतिसाद संपादित केला त्यांसः
फेअर आणि ब्रौन यांमधील मजेने केलेली कोटी समजली नसेल तर संपादित करणे हे उत्तर नव्हे.
20 Dec 2013 - 3:38 pm | मारकुटे
आणि ज्यांना पुल स्टाईल रेकणे ही कोटी समजली नसेल त्यांचे देव भले करो.. (कुणीपण असो दत्त किंवा खंडॉबा.. करा एकदाचं भलं)
20 Dec 2013 - 3:31 pm | सूड
ब्याट्या, भैंस के आगे रोना अपने नैन खोना!! काही उपयोग नाही. बाई आयडीला सार्थ करतायेत येवढंच !!
*dash1*
20 Dec 2013 - 3:32 pm | मारकुटे
संपादीत होणार पहा तुमचा प्रतिसाद =))
20 Dec 2013 - 3:36 pm | सूड
वशाड मेलो. शुभ बोल तर म्हणे मांडवाला आग लागली !! ;)
20 Dec 2013 - 3:36 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!!!!
20 Dec 2013 - 7:19 pm | अत्रुप्त आत्मा
@त्याने खंडोबाचा साक्षात्कार झालाय का आजपर्यंत कुणाला?>>> =)) मला...मला झालाय खंडो"बाचा साक्षात्कार! येथे असंख्य धाग्यांवर खंडन करत फिरतो नाही का तो खंडो'बा!
समांतर- चक्क आपण ज्याच्याशी भांडतोय..तोच हा आपला खंडोबा'चा नवा अवतार...ही साधी अनूभूती दत्तसांप्रदायिक आध्यात्मिक म्हैशीस(अजूनपर्यंत) येऊ नये,याचं आंम्हास लै लै आश्चर्य वाटतं!
20 Dec 2013 - 8:02 pm | बॅटमॅन
अगागागागागागागागागा =)) काय काडी का काय ती, चांगली अर्गळाच सारली आहे =))
20 Dec 2013 - 3:24 pm | पैसा
प्यारेकाकांचा धागा जेजुरीला पोचला!
20 Dec 2013 - 3:25 pm | मारकुटे
थोडा वेळ थांबा...३३ कोटी देव कवर होतील
20 Dec 2013 - 3:29 pm | प्रचेतस
अहो दत्त हा रूद्राचा अंशावतार तसा खंडोबा पण रूद्राचाच अंशावतार.
मग जेजुरी काय नैतर गाणगापूर काय. एकच की. =))
20 Dec 2013 - 3:34 pm | कवितानागेश
मंदीरातून लाखो भुंगे येउन औरंगजेबाच्या सैन्यावर त्यांनी हल्ला केल्याची गोष्ट खंडोबाचीच आहे ना?
सहज विचारतेय.. ;)
20 Dec 2013 - 3:36 pm | मारकुटे
हो पण त्यावेळेस म्हणे दत्त महाराज खंडोबाला भेटायला आले होते.. सहज ! त्यांनी कमंडलूतील पाणी फेकले. त्या थेंबांचे भुंगे झाले आणि पुढचं घडलं. आमच्या आगामी दत्त वर्सेस्स खंडॉबा या पुस्तकात सर्व दिले आहे. आगाऊ मागणी खरडीत करावी,.
20 Dec 2013 - 3:37 pm | बॅटमॅन
साक्षात औरंगजेबाला प्रचीती आलेली होती म्हणजे काय चेष्टा नाही ;)
20 Dec 2013 - 3:39 pm | प्रचेतस
हो.
जेजुरीच्या खंडोबाची,
वेरूळच्या कैलासनाथाची, भुलेश्वरच्या महादेवाची पण अशीच काहीशी गोष्ट आहे. =))
20 Dec 2013 - 3:41 pm | बॅटमॅन
आयला याच्या पण मल्टिपल व्हर्जन्स आहेत की काय??? मज्जाच आहे म्हणायची =))
20 Dec 2013 - 3:35 pm | सूड
>>मग जेजुरी काय नैतर गाणगापूर काय. एकच की.
हो!! हे आपल्यासारख्या माणसांना समजू शकतं, म्हशीला कोण समजावणार ??
*mosking* *JOKINGLY*