गव्हाणी घुबडाच्या घरात.... समारोप..!! They are back...!!

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
31 Oct 2013 - 7:40 pm

आधीचा धागा भरुन वहायला लागला. घुबडाच्या न बांधलेल्या गबाळ्या घरात खूप जणांना डोकावण्याची उत्सुकता दिसली.

नवीन प्रतिसाद शोधणं त्या धाग्यात कठीण झाल्याने हा आणखी एक धागा तयार करतोय.

अजूनही चार अंडी शिल्लक आणि तीन पिल्लं बाहेर आहेत. चौथं पिल्लू बाहेर यायला विसरलंय की काय ??!

पहिलं पिल्लू प्रचंड मोठं झालंय (तुलनेतच अर्थात). तिन्ही पिल्लांचे डोळे उघडले आहेत. यात गंमतीशीर प्रकार असा की सर्वात लहान पिल्लू (टिल्लू) हे सर्वात मोठ्या भावंडाला (दादा म्हणू) पकडून राहतंय.. जिकडेतिकडे दादाच्या प्रोटेक्शनमधे. ते जणू दादालाच आई आणि रक्षक समजतंय. घाबरलं की दादाला चिकटतं.. त्याच्या कुशीत झोपायला शिरतं. आईकडे जास्त जात नाही.

दादा हा ताईदेखील असू शकेल.. :)

आणि उरलेलं तिसरं (मधलं.. म्हणजे २ नंबर) पिल्लू मात्र मम्माज बॉय आहे. ते कायम आईच्या पंखाखाली.

लहान्या आणि मोठ्याला पंखातून सुटका करुन मोकळ्यावर खेळायची हौस.. तर मधला मात्र आईच्या पदरात सदैव दडून.. बाहेर आला तरी नुसतं डोचकं बाहेर काढून अंदाज घेतो आणि आत दडतो.

थोडक्यात मोठा दादा आणि शेंडेफळ (आत्तापावेतोचं) यांचा कंपू झालेला दिसतो. व्हिडीओ नीट पाहिलेत तर मी काय म्हणतो कळेलच. एकदोनदा तर मला दादा (अर्थात त्याचं स्वतःचं हादडून झाल्यावरच बहुधा..) त्याच्या छोट्या दोस्ताला खायला मदत करतानाही भासला. आणखी निरीक्षणाने पक्कं सांगता येईल.

३१ ऑक्टोबर..

१. आधी बघा एक थोडा मोठा व्हिडीओ. यात आई आणि पोरं यांच्या दिनचर्येतला काही भाग.. शिकारीचे लचके, पोरांची मागणी, घुबडाईची स्वतःची साफसफाई... आणखीही काही दिसलं तर मला कळवा. हा व्हिडीओ फक्त थोडा जास्त वेळ तुम्हाला या घरात डोकावता यावं यासाठी.

२. हा व्हिडीओ दिवाळीत काय होईल याची झलक दाखवतो. शेवटपर्यंत पाहिला तर आधी एक सुतळी बॉंम्ब किंवा लक्ष्मीतोटा उडल्यावरची रिअ‍ॅक्शन.. थोडीशीच.. आणि नंतर फटाक्यांची माळ वाजल्यावर मात्र एकदम दचकून चला रे पंखांखाली.. मस्ती बास आता.. असा घुबडाईचा पोक्त इशारा..

३. बिग ब्रदर ईटिंग लंच.. डिस्टर्बन्स नको.. घुबडाईकडे चिर्र चिर्र अशा आवाजांनी मागणी केली जाते आणि ती आणलेल्या शिकारीचा एक लचका तोडून पिल्लांना देते. पिल्लं गुणी आहेत. आ करुन भरवण्याचा हट्ट न धरता आपापली हाताने जेवतात.. (लिटरली.. पिल्लांचे पंजे प्रचंड आहेत.. ते लचका पंजात पकडून किंवा पंजे त्यात रोवून त्यावर बसून चोचीने आपापले खातात.) माझी अशी समजूत होती की त्यांना चोचीत भरवावं लागत असेल. अर्थात मोठं झालेलं पिल्लू अशा रितीने खात असेल हीदेखील शक्यता आहेच.

४. बिग ब्रो झोपलाय. त्याचा छोटा चाहता त्याला ढोसकलतोय. त्याच्यावर चढायचा प्रयत्न करतोय. इतकावेळ ते दोघे एकमेकांशी काहीतरी ढकलाढकली करत होते. त्यानंतर मोठा भाऊ झोपला. तेव्हा लहान बाळ "माझ्याशी अजून खेळ ना रे.. " असं म्हटल्यासारखं मला वाटलं.

५. मला माझ्या वाट्याचा लचका दे अशी घुबडाईकडे बडादादाची तीव्र मागणी आणि लचका तोडून मिळाल्यावर संतोष पावून तो कोपर्‍यात नेणे. (कोपर्‍यात घेऊन निवांत खात बसण्याचा भाग व्हिडीओत आलेला नाही.)

पिल्लं घशातून कसलातरी वेगळाच सीर्र सीर्र अशा आवाज करतात. तो यातल्या बर्‍याचशा व्हिडीओजमधे ऐकायला मिळेलच. पण त्या आवाजाने त्यांची शांतताप्रेमी आई वैतागते आणि त्यांना पंखाखाली घेऊन आणि अर्रर्र किंवा तत्सम दबक्या आवाजात दामटते असं दिसलं. केवळ खाणं / भक्ष्य इतकाच इंटरेस्ट न राहता आता त्या पिल्लांना (निदान थोरल्याला) खेळण्यातही रस उत्पन्न झाला आहे असं वाटतंय. एक रंगीबेरंगी चिंधी मिळाली आहे त्यांना. ती फाडत बसतात.

बाकी अपडेट उद्या किंवा जसाजसा लाभेल तसा. साधारण कालक्रमानुसार आणखी एक पिल्लू उद्या यायलाच हवं.

भेटू..

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

आतिवास's picture

31 Oct 2013 - 7:46 pm | आतिवास

रोचक आणि माहितीपूर्ण डॉक्युमेंटेशन. तुमच्या कुतूहल आणि उत्साहाला दाद :-)

मोहनराव's picture

31 Oct 2013 - 9:12 pm | मोहनराव

+१
नविन धागा काढलात हे उत्तम केलंत. पुढचे अपडेटस पहायला आवडतील.

मुक्त विहारि's picture

31 Oct 2013 - 9:21 pm | मुक्त विहारि

मस्तच

स्पंदना's picture

1 Nov 2013 - 3:25 am | स्पंदना

आता कस नाव झकास वाटत. मला पहिल्या धाग्याच नाव वाचु हाच प्रश्न पडायचा की ती तुमच्या घरात नाही तर तुम्ही यायच्या आधी येउन राहिल्याने तुम्ही त्यांच्या घरात आहात.
बाकी बडादादा, शेंडेफ़ळ ही नावे ऐकुन मजा वाटली. :)
एकूण झकास चाललय. जर तुमच्या सोसायटीत घरट आहे अस सांगुन जरा फटाक्यंचा आवाज कमी कराय्ची विनम्ती केली तर चालेल का?

एस's picture

1 Nov 2013 - 8:53 pm | एस

आता कसं नाव झकास वाटतं.

हेच म्हणणार होतो.

जे.पी.मॉर्गन's picture

1 Nov 2013 - 6:58 am | जे.पी.मॉर्गन

गवि तुम्ही अचाट आहात! तुमच्यामुळे हे असं काहीतरी बघायला मिळतंय!

अमेझिंग!

जे.पी.

पैसा's picture

1 Nov 2013 - 7:57 am | पैसा

वाचूनच बरं वाटलं. आता व्हिडो सावकाश बघते!

बॅटमॅन's picture

1 Nov 2013 - 3:09 pm | बॅटमॅन

हा हा हा, लै मजा आली वाचून. व्हिडो पाहीनच, पण वर्णन खास आवडले.

सुधीर कांदळकर's picture

1 Nov 2013 - 4:03 pm | सुधीर कांदळकर

मस्तच.

काल आणि आजच्या दिवसातल्या काही प्रतिमा:

आज सकाळी (१ नोव्हें.).. तेजायला किती पिल्लं आहेत तेच कळत नाहीये. मॅगी नूडल्सप्रमाणे पसरलीत एकमेकांवर. कोणीतरी मोजून पहा हो. चौथं आलंय का ते..

A

२. कालच्या काही प्रतिमा (३१ ऑक्टो)

B

C

D

E

अर्थात कॅमेर्‍याची कपॅसिटी मर्यादित आहे आणि अ‍ॅक्सेसही अडचणीचा. त्यामुळे फोटोग्राफिक मूल्य येणारच नाही. फक्त काय चाललंय ते पाहता येईल धूसरपणे.

सौंदाळा's picture

1 Nov 2013 - 5:56 pm | सौंदाळा

रापचंडुस एकदम..
असे दणदणीत अपडेट्स आले पाहीजेत बर का यापुढे पण.

कवितानागेश's picture

1 Nov 2013 - 10:59 pm | कवितानागेश

भारी चाललय हे सगळ्ं. आता दिवाळीचे आवाजांचे ४ दिवस नीट जाउदेत.

आजचे काय अपडेट्स? पहाटेच्या फटाक्यांच्या आवाजांमुळे घुबडांची काही घबराट?

जेपी's picture

2 Nov 2013 - 1:08 pm | जेपी

झक्कास असल फुटेज डिस्कवरीकड पन नसल .

गवि's picture

3 Nov 2013 - 11:16 am | गवि

३ नोव्हेंबरचा अपडेट:

घुबडाईने घरट्याजवळ आलेल्या कावळ्याला दिलेला खतरनाक थ्रेट डिस्प्ले. पंख फुलवून भयंकर उग्र रूप दाखवून घुबडं शत्रूला पळवतात असं ऐकलं होतं. पण आज थेट पहायला मिळालं. आकार कमी करण्यासाठी क्रॉप केलेला व्हिडिओ इथे देतोय.

पिल्लं आणि अंडी यांबाबत गोंधळ होतो आहे. अजूनही चार अंडी दिसताहेत. आणि तीन पिल्लं. पण .. त्यातलं एक पिल्लू एकदमच लहान दिसतंय ..

आधीचे व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा की आधी दिसणारं लहान पिल्लू नक्कीच आणखी बरंच मोठं दिसायला हवं होतं एव्हाना .. पण आज दिसलेलं लहान पिल्लू हे एकदम नवजात दिसतंय.

आणखी एक. कालच पाच मजले खाली जमिनीवर फुटक्या अंड्याचे अवशेष मिळाले. म्हणजे एक तरी अंडं कमी व्हायला हवं होतं. .

दुसरी गोष्ट : दोन दिवसांआड एक पिल्लू अशा क्रमाने बाहेर येण्याचा क्रम असताना सहा दिवस उलटले तरी नवीन पिल्लू आलं नसेल हे पटत नाही.

म्हणजे निम्ननिर्दिष्टांपैकी काही शक्यता वाटतातः

अ. घुबडाई पहिलं पिल्लू बाहेर आल्यानंतरही अ‍ॅडिशनल अंडी देत राहते आहे की काय?
ब. परवापर्यंत सर्वात शेवटचं आणि किंचित आकार वाढलेलं पिल्लू गायब झालं आहे आणि आज किंवा काल रात्री अतिशय छोटं असं पिल्लू नुकतंच जन्माला आलं आहे. आणि नंतर घातलेल्या अंड्यांमुळे अक्षत अंड्यांची संख्या चारच राहिली आहे.

असं असेल तर आधी एक पिल्लू मेल्याची मला जी जवळजवळ खात्री झाली होती आणि नंतर दोन दिवसांच्या गॅपने पुन्हा तीन पिल्लं आणि चार अंडी असा हिशेब लागला तेव्हाही एक पिल्लू खरंच मेलं / कावळ्यांनी पळवलं असण्याची शक्यता आहे. कारण त्यावेळीही ते पिल्लू जरासं मोठं झालेलं होतं आणि नंतर पाहता पुन्हा नवजात आकाराचं दिसलं होतं. पण तेव्हा मी दुर्लक्ष केलं.

एकूण जन्मू शकणार्‍या (जगू शकणार्‍या नव्हे) पिल्लांची संख्या अबाधित ठेवण्यासाठी घुबडीण प्रसंगोपात्त अधिकची अंडी घालतेय की काय? यात कितपत शास्त्रीय आधार आहे माहीत नाही, पण दिसतंय त्यावरुन मला असा निष्कर्ष काढण्याखेरीज पर्याय नाही.

बाकी..

घुबडाई जबरदस्त ताकदीने आणि जोरदार हालचालीने वरचेवर अंड्यांजवळ काहीतरी खणत राहते. हा प्रकार खूप वेळ चालतो. ती अंड्यातल्या पिल्लाला स्टिम्युलेट करते की पिल्लांसाठी भुसभुशीत मऊ जागा व्हावी म्हणून तिथे असलेल्या गोष्टींचा भुगा करते की तिथे किडे होऊ नयेत म्हणून काही करते ते कळत नाही.

घुबडाईची सक्काळी सक्काळी आणि नंतरही अनेकदा चालणारी सेल्फसफाई.. पीसनपीस लख्ख..

अन्या दातार's picture

5 Nov 2013 - 11:10 pm | अन्या दातार

अपडेट्स?? वाट बघतोय आम्ही.

पैसा's picture

5 Nov 2013 - 11:13 pm | पैसा

दिवाळीच्या ४ दिवसात फटाक्यांमुळे बराच गोंधळ उडाला असणार.

गवि's picture

6 Nov 2013 - 3:46 am | गवि

@पैसाताई .. अन्या..

अपडेट्स दिलेत की.. अगदी फटाक्यांसहित. कोणीही पहात अथवा प्रतिसादत नसल्याने दोन दिवसाआड फ्रीक्वेंसी केली आहे.

आता उद्या परत अपडेटवतो बघून.

रुस्तम's picture

6 Nov 2013 - 4:06 am | रुस्तम

अहो अस कस. मी दररोज कमीत कमी २ वेळा तरी हा धागा उघडतो.

आज सकाळी कॅमेरा ऑन करताच असं दिसलंय की सर्वात मोठं पिल्लू (छोट्या पिल्लाचा बडा दादा) नाहीसं झालेलं आहे. अर्थातच कोणीतरी खाल्लेलं आहे. उर्वरित सर्व अंडी पळवलेली आहेत. फक्त दोन पिल्लं(मधलं आणि लहान)शिल्लक आहेत. पण सर्वात दुर्दैवाची आणि काळजीची गोष्ट अशी की त्यांना एक मिनिटही एकटं न सोडणारी त्यांची आई स्वतःच सकाळपासून तरी घरट्यात आलेली नाही किंवा आसपासही दिसलेली नाही.

घुबडाईला कोणी पकडलं किंवा मारलं असेल किंवा अन्य शत्रूंनी दूर हुसकावून लावताना झटापटीत जखमी झाली असेल तरच ती परत न येणं शक्य आहे. त्यामुळे या दोन पिल्लांचं भवितव्य अंधारात.

इथे प्रचंड फटाके, माळा, बॉम्ब वाजत होते. अग्निबाणही उंच उडून फुटत होते. त्या भीतीने पिल्लं सतत ओरडत होती. आवाजाच्या दहशतीने तर घुबडाई दूर गेली नसेल?

सोसायटीत फटाके उडवू नका कारण इथे घुबड आहे असं सांगितलं असतं तर बहुधा ते ताबडतोब हटवण्यासाठी बरेचजण प्रयत्नशील झाले असते. ते षटकर्णी करणं जास्त धोक्याचं होतं.

A

B

वाईट वाटतंय. कॅमेर्‍याने सर्व भाग स्कॅन केला आणि खात्री झाल्यावर मात्र दु:ख झालं.

कोणी मारली पिल्लं आणि अंडी ते कळायला मार्ग नाही. घुबडाई तरी यावी परत. आता उद्यापर्यंत प्रतीक्षा.

प्रचेतस's picture

6 Nov 2013 - 9:08 am | प्रचेतस

अरे बाप रे. :(

भयंकर आहे.

चतुरंग's picture

6 Nov 2013 - 11:31 am | चतुरंग

अंधुक आशंका होती की फटाक्यांच्या आवाजाने असे काही होईल म्हणून आणी ती खरी निघाली याचे फार वाईट वाटले.
पैसाताई म्हणते तसं पिलांची काळजी करुणा संस्थेकडून घेता आली तर खूपच बरं होईल निदान दोन पिल्लं तरी वाचतील. :(

पैसा's picture

6 Nov 2013 - 10:07 am | पैसा

वाईट वाटलं. समजा आई परत आली नाही तर पिलांना वाचवणे कठीण आहे. "करुणा" http://www.karunaforanimals.org/aboutkaruna.html या प्राण्यांसाठी काम करणार्‍या मुंबईतील संस्थेला कळवून बघा काही उपयोग झाला तर.

मी-सौरभ's picture

6 Nov 2013 - 7:00 pm | मी-सौरभ

वाईट ...

प्रभाकर पेठकर's picture

6 Nov 2013 - 7:38 pm | प्रभाकर पेठकर

दिवाळीच्या उत्तरार्धात अत्यंत 'अशुभ' बातमी. घुबीज मनाला चटका लावून गेले. उरलेल्या घुबीजच्या रक्षणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हावेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2013 - 9:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरेरे !

सुधीर's picture

6 Nov 2013 - 9:51 pm | सुधीर

खूप वाईट वाटलं.

रुस्तम's picture

7 Nov 2013 - 12:29 am | रुस्तम

खूप वाईट वाटलं.

गजानन५९'s picture

7 Nov 2013 - 11:02 am | गजानन५९

खूप वाईट,

पण गवी तुमचे विशेष कौतुक कि हा आगळा वेगळा प्रयत्न करून तुम्ही सर्वांसमोर एक वेगळेच उदाहरण ठेवले आहे.
बाकी तुमचे सर्व updates नेमाने बघितले जात होते पण प्रतिसाद जरा दमाने द्यावा असे ठरवले होते.

पुन्हा एकदा आभार्स

गवि's picture

7 Nov 2013 - 11:38 am | गवि

काल दुपारी संध्याकाळी , आज मध्यरात्री, पहाटे आणि सकाळी अगदी निघताना ९ वाजेपर्यंत पुन्हा पुन्हा नीट पाहिलं.

पण घुबड मातापिता यांपैकी कोणीही एकदाही दिसले नाहीत. आजुबाजूला घुबडिणीची बसण्याची ठराविक जागा म्हणजे एकच मोठे झाड आहे. तेही नीट पाहिलं, तिथेही काही नाही.

मात्र त्यातल्यात्यात आशादायक म्हणायचं तर असं की काल रात्री त्यातलं मोठं पिल्लू एक खूप छोटा मांसाचा छोटा तुकडा खाताना दिसलं. तो आधीच्यातला उरलेला होता की घुबड पालकांपैकी कोणी नवीन आणून दिला होता ते कळणं शक्य नाही, पण याचा अर्थ काल रात्रीपर्यंत तरी त्याच्याकडे थोडं अन्न शिल्लक होतं. लहान पिल्लाला त्याने दिलं असेल का माहीत नाही. पण दोघे एकमेकांना चिकटून / कुशीत राहात आहेत. पहाटे काहीकाळ ते दोघे घरट्याच्या जागेच्या दोन टोकांना झोपले होते. पुन्हा एकत्र आले.

आज सकाळीही एक उंदराचा अवशेष म्हणावा असा भाग दिसला. मुळात तो खरंच उंदीर होता का आणि असला तर तो कालचाच होता की नवीन ते सांगणं कठीण आहे. पण अंधुकशी शक्यता अशी की तो काल रात्रीमधे त्यांच्या आईने / बापाने आणून दिलेला असावा.

एखादा पूर्ण आकाराचा मोठा उंदीर नव्याने आलेला दिसला तरच याविषयी १०० टक्के खात्री होईल.

मादीही पिल्लांना सोडून कधीनाकधी बाहेर पडते याची कल्पना आहे. पण माझ्या मनात असं होतं की सुरुवातीला थोडाथोडा वेळ ती दूर जात असेल आणि बराच वेळ पिल्लांपाशी बसत असेल. नंतर हळूहळू बाहेरचा कालावधी वाढवत असेल.

पण दोन दिवसाआधीपर्यंत एक मिनिटही बाहेर न पडणारी घुबड मादी आता सतत बाहेरच कशी राहात असेल असा प्रश्न अजून मनात आहेच.

आजच्या या फोटोत पिल्लांच्या बाजूला जे काळं दिसतंय तो जर उरलेला उंदीर असेल तर अन्नपुरवठा चालू / शिल्लक असल्याची धूसर शक्यता आहे.

A

ब़जरबट्टू's picture

7 Nov 2013 - 1:08 pm | ब़जरबट्टू

गवि, अपडेट द्या आता तासातासाला... वाईट वाटतेय आईविना पिल्ली बघुन.. :(.. आशा आहे ती सुखरुप असावी..

गवि, खाली २ लिंका देत आहे. त्यांना संपर्क करावा असे वाटते.

http://jaagruti.org/animal-rescue-helplines/animal-helplines-in-mumbai/

http://www.karmayog.com/lists/animal.htm

धन्यवाद. त्या दृष्टीनेही तयारी ठेवली आहे. डॉ. सतीश पांडे हे घुबडांचे आणि पक्ष्यांचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत. त्यांची पक्षीविषयक संस्थाही आहे आणि अनेक दशकांचा अभ्यासही आहे. त्यांच्याशी या धाग्यानिमित्त संपर्कात आहे. त्यांनी असा दिलासा दिला आहे की ठराविक काळाने मादीही घरट्याबाहेर जाऊ शकते. ती बराच काळ न दिसल्याने मनात धाकधूक आहेच पण तज्ञ व्यक्तीने ही शक्यता दर्शवल्यावर आशा वाटते आहे.

वर म्हटल्याप्रमाणे उंदरांचा सप्लाय चालू असलेला दिसला तर पिल्लांचे आईबाप मधूनमधून येऊन जात असल्याचं सिद्ध होईल. अशा वेळी त्यांना उगीचच रिहॅब करणं म्हणजे ढवळाढवळ होईल. त्यामुळे त्यांना बाह्य अन्न देणे किंवा कोणा संस्थेकडे देणे यासाठी अजून थोडा धीर धरावा असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं.

परिंदा's picture

7 Nov 2013 - 2:45 pm | परिंदा

अंडी कशी काय पळवली गेली? घुबडांचे इतर पक्षी शत्रू (कावळे) अंडी फोडून टाकतात. आमच्या इथले बुलबुलचे घरटे पण त्यांनी असेच उद्ध्वस्त केले होते.

एखाद्या सापाने येऊन खाऊन तर नाही टाकली?

रात्रीचा कॅमेरा ऑन करता येईल का? म्हणजे कोण तिथे येऊन विद्ध्वंस करतोय ते तरी कळेल?

कावळे हाच सर्वात जास्त संशयित शत्रू आहे इथे.

पाचव्या मजल्यावर असल्याने आणि जागेच्या विशिष्ट रचनेमुळे साप येणे शक्य नाही.

एक पिल्लूही मारलं गेलं. म्हणजे कोणीतरी भक्षक पक्षी अर्थात कावळा किंवा इतर जातीचे पक्षी म्हणजे कोतवाल, टकाचोर हे पक्षी मुख्य सस्पेक्ट आहेत.

इतर एका जातीचं(शृंगी) घुबड ही शक्यता असली तरी फार कमी आहे.

आणखी एक कमी शक्यता म्हणजे पिल्लू नैसर्गिक कारणांनी मेलं. अंड्यातून पिल्लं बाहेर येण्याची वेळ टळून गेली (ती एक्सपायर झाली (?) म्हणून घुबड आईबापांनीच स्वच्छतेच्या दृष्टीने ती दूर टाकली.

अर्थात ही शेवटची शक्यता पक्षीतज्ञच सांगू शकतील.

आवाजाबाबत ही बार्न आउल्स प्रचंड सेन्सिटिव्ह असतात. ती अंधारात केवळ आवाजाने उंदीर पकडतात, त्यांना उंदराचे हार्टबीट तीस फूट दूरवर ऐकू येतात असं त्यांच्याविषयी वाचलं आहे. त्यांना विशेषतः पिल्लांना फटाक्याच्या कानठळ्या बसवणार्‍या आवाजाने त्रास झाला असू शकतो. एखादा अग्निबाण हवेत जवळ फुटला असेल तर धसक्याने पिल्ले मरु शकतात. त्या जिवावरच्या भीतीने घुबड मादीही घरटं सोडून जाऊ शकते असं वाटतं.

(प्रचंड आवाज आणि धसका यांमुळे सशाची पिल्लं मेल्याचं पाहिलं आहे. घुबडांचं माहीत नाही.)

रात्रीच्या कॅमेर्‍याविषयी: मजकडे इन्फ्रारेड कॅमेरा नाही. हँडिकॅम तिथे बसवता येत नाही.

अन्य कॅमेर्‍यासाठी रात्री तिथे लाईट मारला तर घुबडांना प्रचंड डिस्टर्बन्स होतो. त्यामुळे सतत लाईट चालू ठेवणं शक्य नाही.

रात्री कॅमेरा ठेवायचा तर तो सततच ठेवला पाहिजे. त्यामुळे लाईटही सतत मारला पाहिजे.

खरं तर हे निशाचर पक्षी आहेत आणि रात्रीच त्यांच्या बर्‍याच घडामोडी घडतात हे खरंच.

भल्या पहाटे मला त्यातली थोडी झलक बघायला मिळते. सकाळी आठ-नऊच्या सुमारास हे सर्व बच्चे गाढ झोपतात आणि घुबड मादी मात्र प्रचंड झोप आलेली दिसत असूनही ती परतवत एकदम अटेन्शनमधे सावध असते.

अर्थात दोन दिवस ती आलेली नसल्याने हा सर्व भूतकाळ. :(

रुस्तम's picture

8 Nov 2013 - 5:15 pm | रुस्तम

:(

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Nov 2013 - 7:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

:(...अजुन पिल्लं / पिल्लु जिवंत आहे का? सर्पोद्यान किंवा तत्सम संस्थेमधे सोडुन द्या. :(..

गवि's picture

9 Nov 2013 - 8:17 pm | गवि

गुड न्यूज.. सर्व वाट पाहणार्यांसाठी..

खात्रीपूर्वक एक नवी छोटी चिचुंद्री पिल्लाखाली दाबून ठेवलेली दिसली. पिल्लांवर आईबापांचे छत्र अद्याप आहे याचा स्पष्ट पुरावा.

हुशश.

मधल्या दोन दिवसांत माझे बोनलेस चिकन खाल्लनीत ... जाऊंदे.

पैसा's picture

9 Nov 2013 - 8:20 pm | पैसा

पण त्या भक्ष्याचे तुकडे कोण करतं आहे? त्यांना चालत असेल तर चिकनचा खिमा टाका ना थोडा थोडा.

तुकडे करण्याविषयी मलाही तसं वाटलं, पण निरीक्षण केल्यावर कळलं की तो छोटूसुद्धा उत्साहाने हे काम करु शकतो. मोठ्याला चिरफाड करायला काहीच प्रॉब्लेम नाही पण छोट्याला जरा ओढाताण करावी लागते. मग तो मोठ्याच्या मागे लागून सुरुवातीची थोडी चिरफाड करुन घेतो.

आता लक्षात आलं की "खा रे.. खा रे.. हा घास काऊचा.. हा घास चिऊचा.." असं करत मागे पळत पळत मिनतवारीने भरवण्यासाठी ही काय आपणा मनुष्यांची कारटी थोडीच आहेत?

इथे तर लवकर लवकर खाऊन वाढ होऊन शक्तिमान न झाल्यास "हा घास काऊचा" याचा भलताच भयंकर विपरीत अर्थ होऊ शकत असल्याने पिल्ले गपगुमान आपलेआपले तुकडे करुन खातात..

पैसा's picture

14 Nov 2013 - 11:07 am | पैसा

पाणी आणि पक्षी खरंच फार स्वयंपूर्ण असतात! सस्तन प्राण्यांची पिल्ले तरी दुधासाठी काही काळ आईवर अवलंबून असतात पण पक्ष्यांची पिले मात्र अगदी जन्माला आल्यापासून जगण्यासाठी स्वतः झगडताना दिसत आहेत.

परवा वाचलं की खाणं पुरेसं असेल तर घुबडाची मोठी पिले छोट्या पिलाना अन्नाचे तुकडे करून भरवतात सुद्धा!

आता मात्र जर त्यांचे आईबाप येत नाहीत हे नक्की झालं असेल तर त्यांना कोणा संस्थेच्या ताब्यात दिलंत तर तुमचीही सुटका होईल, आणि कावळे/मांजरं येऊन त्याना मारतील का काय हे टेन्शन पण राहणार नाही. आणि ते लोक त्या पिलांचे नीट रिहॅबिलिटेशन करू शकतील.

आता मात्र जर त्यांचे आईबाप येत नाहीत हे नक्की झालं असेल तर त्यांना कोणा संस्थेच्या ताब्यात दिलंत तर तुमचीही सुटका होईल, आणि कावळे/मांजरं येऊन त्याना मारतील का काय हे टेन्शन पण राहणार नाही. आणि ते लोक त्या पिलांचे नीट रिहॅबिलिटेशन करू शकतील.

नाही... आईबाप येत आहेत याचाच तर पुरावा आहे ना वर दिलेला.. आता कशाला रिहॅब? आऊलीमाऊली आता घरट्यात बसत नाहीये इतकंच.. पण खाणं आणून देताहेत आईबाप असं दिसतंय ना..(प्रत्यक्ष दिसत नसले तरी पुराव्याने शाबीत).. भले एखादा उंदीर का असेना.. दिवसातून एकदा दिसतो.

काल चवीत बदल म्हणून एक पक्षीच आणून टाकला होता. (मधे दोन दिवस उंदीर न दिसल्याने मी पिल्लांना जी कोंबडी दिली त्यामुळे तर या बदलाची मागणी झाली नसेल ना ? ;) ;) )पण मी पाहीपर्यंत त्या पक्ष्याचा फक्त एक पंख आणि थोडा अन्य भाग शिल्लक राहिला होता. तो कै. पक्षी म्हणजे मैना असावी असं पंखाच्या रंगावरुन वाटलं.

बाकीचे पक्षी यांच्यावर खवटून असतात ते यामुळेही असेल..

पैसा's picture

14 Nov 2013 - 3:29 pm | पैसा

मला वाटलं की तुम्ही त्यांना २ दिवस खाऊ घातलंत म्हणजे आता त्यांचे आईबाप अजिबात येत नाहीत की काय!
एक शंका मात्र आहे. घुबडीण इतके दिवस पिलांना सोडून बाहेर कशी रहाते? की ती तिथे असल्याने इतरांचे लक्ष जाते म्हणून तिथे बसत नाहीये? किंवा घुबडोबा सुरुवातीपासून पिलाना खाऊ आणायचं काम इमाने इतबारे करत आहेत आणि घुबडीणीचं दिवाळीत काही बरंवाईट झालं असावं??

सुधीर's picture

9 Nov 2013 - 8:32 pm | सुधीर

खरच हुशश वाटलं! हे सारं, मांजरींसारखं जागा बदलल्याप्रमाणे आहे की काय?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Nov 2013 - 8:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हुश्श!!

मांजरं पण अशी करतात. पिल्लांचे डोळे उघडले की मांजरं बराच वेळ गायब होतात. दोन दुध पाजण्यामधला कालावधी वाढवत नेतात. पिल्लांची सरव्हायवल इन्स्टींक्ट्स वाढावीत म्हणुन असं करत असावीत असं मला वाटतं.

मुक्त विहारि's picture

10 Nov 2013 - 10:17 pm | मुक्त विहारि

मस्त काम

निरु's picture

11 Nov 2013 - 10:35 am | निरु

येऊ द्यात. पुढील घडामोडींची वाट बघतो आहे. :)

सध्या तरी सर्व ठीकठाक चाललेलं दिसतंय. दिवसाला एखादा तरी उंदीर घुबड आईबापांकडून येतो आहे. ते स्वतः मात्र समोर दिसत नाहीत.

एक पिल्लू बर्‍यापैकी मोठं दिसायला लागलेलं आहे. त्याच्या शुभ्र पंखांमधे काही करडी पिसं तयार व्हायला लागली आहेत. ते बराच वेळ आळसुटल्याप्रमाणे झोपूनच असतं. लहान पिल्लू मात्र उत्साही आहे आणि ते मोठ्याला वरचेवर ढुसण्या देत आणि चळवळ करत असतं.

मोठ्या पिल्लाच्या चक्क खांद्यावर / पाठीवर चढून घोडाघोडा केल्यागत बसण्याचा प्रकारही लहान पिल्लू बर्‍याचदा करतं. दादाही त्याला जरावेळ उचलून मग पाडून टाकतो.

व्हिडीओ बरेच मोठे झाल्याने एडिट करायला हवेत. ते करायला वेळ नसल्याने आज व्हिडीओ नाही.

माणसांची लहान पिल्ले देखील त्यांच्या दादा/ताईंपेक्षा जरा जास्तच हुशार असतात. :)

जेपी's picture

11 Nov 2013 - 12:17 pm | जेपी

पुढील प्रतिशेत

स्पंदना's picture

11 Nov 2013 - 12:39 pm | स्पंदना

आज प्रतिसाद द्यावासा वाटला.
नाहीतर मन मोडुन गेल होत. एव्हढे प्रयास त्या आईचे अन अस व्हाव हे खरच खुप दुखवुन गेल.
चला आता काहीतरी चांगल बघायला मिळेल.

रुस्तम's picture

11 Nov 2013 - 11:13 pm | रुस्तम

आज प्रतिसाद द्यावासा वाटला.
तरी ही सगळी पिल्ले जगली असती तर अजून बरे वाटले असते.

A

B

C

उंदरांचा सप्लाय काल सकाळपासून न दिसल्याने आणि काल रात्री माझ्या चाहुलीनेच पिल्लांनी "खायला द्या" चा आक्रोश सुरु केल्याने आणखी चिकन पीसेस घातले. गोद्रेज रियलगुड झिंदाबाद. कदाचित आईबापांचे उंदीरही चालू असतीलच, आणि ते येताच तातडीने गट्टम करुन पुन्हा सर्व साफसूफ..

पण पुरवठा कमी झालाय असं वाटतं खरं. उंदीर सापडत नसतील कदाचित..

प्रचेतस's picture

12 Nov 2013 - 10:21 am | प्रचेतस

मस्त.

किती गोंडस दिसताहेत पिल्लं

चतुरंग's picture

12 Nov 2013 - 11:22 am | चतुरंग

पिल्लांनी काय भन्नाट पोझेस दिल्या आहेत! इतक्या लहान वयातही डोळे आणि त्याभोवतीची वैशिष्ठ्यपूर्ण महिरप आकार घेऊ लागलेली आहे. फारच छान. पिल्लं मोठी होताहेत हे बघून अतिशय आनंद झाला.
गवि, तुम्ही त्यांचं पालकत्व अतिशय सक्षमपणे निभावत आहात त्यामुळे तुमचे कौतुक वाटते! :)
(गगनविहारी नाव वेगळ्या अर्थाने सार्थ करताय! ;) )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Nov 2013 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>> गवि, तुम्ही त्यांचं पालकत्व अतिशय सक्षमपणे निभावत आहात त्यामुळे तुमचे कौतुक वाटते !

+१

-दिलीप बिरुटे

केदार-मिसळपाव's picture

12 Nov 2013 - 1:45 pm | केदार-मिसळपाव

फोटो अतिशय/एकदम उत्कृष्ठ आले आहेत.
अगदी स्पर्धेत असतात तसेच.
गवी, हे जपुन ठेवा...

तुम्ही पिल्लांची काळजी छानच घेताय..

मीता's picture

12 Nov 2013 - 10:41 am | मीता

मस्त!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Nov 2013 - 11:28 am | डॉ सुहास म्हात्रे

पिलांचे फोटो भन्नाट आहेत. ही जगलीवाचलेली दोन पिले छान वाढत आहेत हे वाचून बरं वाटलं.

परिंदा's picture

12 Nov 2013 - 11:59 am | परिंदा

उंदीर खाऊन झाल्यावर घुबडे उरलेल्या हाडांचे काय करतात? ती तशीच घरट्यात टाकतात की बाहेर नेऊन फेकुन देतात?

अखंड हाडासहित गिळतात. मग नंतर (या धाग्यावर अनेक फोटोंत दाखवल्याप्रमाणे) न पचलेला भाग तोंडावाटे पॅलेट्स ऊर्फ गोळ्यांच्या स्वरुपात तिथेच आसपास थुंकून / ओकून टाकतात. हे गोळे नंतर वाळतात आणि त्याचाच भुगा करुन पिल्लांसाठी मऊ मऊ जमीन तयार केली जाते.

किळसवाणे.. आय नो.. पण त्यांची तीच पद्धत... :)

म्हणजे विष्ठा हा प्रकारच नसतो की काय घुबडांच्यात?

आणि पाण्याचे काय? घुबड पाणी पिण्याची सोय कशी करत असतील?

विष्ठेला पर्याय नाहीच.. :)

पाणी मात्र मला वाटतं कोणताच पक्षी आपल्या घरट्यापर्यंत चोचीने आणून पाजू शकत नाही. गव्हाणी घुबड तरी वेगळं पाणी पीत नाही. अन्नातून (उंदरांमधून) जो पाण्याचा अंश मिळतो तोच.. मोठे होईपर्यंत तरी..

शिवाय या खाली दिलेल्या आणि अशाच अन्य दुव्यांवर असं वाचायला मिळतं की घुबडं तसंही पाणी पीतच नाहीत. अन्नातूनच मिळवतात.

http://www.barnowltrust.org.uk/infopage.html?Id=295

सुबोध खरे's picture

20 Nov 2013 - 12:05 pm | सुबोध खरे

गवि साहेब,
एक शंका.
शीतकटीबंधातील पक्ष्यांना पाणी लागत नाही परंतु उष्ण कटिबंधात पक्षी पाणी पितात आणि आपली पिसे पाण्यात भिजवून ती घरट्यात परत येतात त्या भिजलेल्या पंखातून पिलांना पुरेसे पाणी मिळते. शिवाय जे पक्षी मांस भक्षक असतात त्यांना आपली पिसे आणि पंख स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्याची गरज पडतेच कारण भक्षाचे रक्त हे जीवाणूसाठी अत्यंत उत्तम अन्न आहे त्यामुळे गरुड गिधाडे (किंवा घुबडे) हे शिकारी आणि खाण्यानंतर आपली पिसे आणि पंख अतिशय निगुतीने साफ करतात. आपली घुबडे असे काही रात्री करत असावीत काय?
दुसरे -- पक्षी वर्गात मुत्र द्वार (URETHRA) गुद द्वार (anus)आणि योनी (vagina) हि तिन्ही अंगे एकाच पिशवीत(CLOACA) उघडतात.पक्षी अंडी सुद्धा त्याच अवयवातून(cloaca-अवस्कर) देतात.(त्यामुळे कोंबडीच्या अंड्याला कधी कधी काळसर विष्ठा लागलेली आढळते.) त्यामुळे पक्ष्याची विष्ठा आणि मूत्र हे एकत्र अर्धद्रव (semiliquid) परिस्थितीत दिसते. जेंव्हा पक्ष्याच्या शरीरात पाणी कमी होते तेंव्हा हि विष्ठा जास्त घन होत जाते. आपल्या घुबडाना पाणी एखाद्या वाटीत ठेवण्याची व्यवस्था करता येईल काय? जेणेकरून त्यांना पाणी लागते कि नाही हे पण कळू शकेल.
अर्थात हि एक सूचना आहे. जर यात कोणताही उपमर्द वाटत असेल तर खुशाल कचर्याच्या पेटीत टाकावी.आपण घेत असलेल्या काळजीबद्दल कोणतीही शंका नाही.

ही घुबडे (आधी हजर असताना घुबडाई आणि आता पिल्लेदेखील) सतत ही साफसफाई करत असतात. स्वतःच्या पिसांची अत्यंत निगुतीने स्वच्छता ठेवली जाते. आजुबाजूच्या स्वच्छतेची बोंबच दिसतेय पण. असो.

पाण्याचा मुद्दा रास्त आहे. पाणी भरुन ठेवायला हरकत नाही. पण पिल्लं अजिबात डिस्ट्रेस्ड किंवा डी हायड्रेटेड अशी वाटत नाहीयेत. ताजीतवानी आणि उत्साही आहेत. घरट्याची जागा उन्हापासून पूर्ण सुरक्षित आहे. सध्या हवाही थंड आहे.

पाण्याचा अभाव असता तर पिल्लं मलूल तर नक्कीच दिसली असती. शिवाय भरभर वाढतही आहेत. अशा वेळी पाण्याची वाटी किंवा भांडे ठेवण्याचे इन्टरव्हेन्शन नको वाटते. न जाणो ते पाणी ठेवून दूषित झाले / संसर्गित झाले आणि त्यातून नसलेले काहीतरी उद्भवले तर?

शिवाय त्यांच्या खालची जमीन ही त्यांच्या पेलेट्स, विष्ठा आणि अन्य घाणीने भरलेली आहे. ती सर्व घाण सुकलेली कोरडी आहे. पेलेट्सच कुटून भुगा करुन ते मऊ जमीन बनवतात. भांडे पलटले आणि जर जमीन ओली झाली तर तिथे ओला चिखल होईल आणि तो लगेच कुजल्याने जास्त अपायकारक ठरेल.

आणखी एक उपमुद्दा असा की ही जागा बरीच खोलात आहे. तिथे हात पोचण्याची शक्यताच नाही. मधे ग्रिल्स आहेत. ती कापावी म्हटले तर भयंकर आवाज होईल. त्यामुळे पाण्याचे पात्र खाली पक्ष्यांपर्यंत उतरवणे आणि ते पुन्हा भरणे अत्यंत अवघड आहे. केवळ वेबकॅम आणि त्याच्या वेगवेगळ्या रचना (सध्या स्पेशल वेबकॅम स्टिक बनवली आहे) यांमुळे ही दृश्ये दिसताहेत.

उंदीर वगैरेंच्या शरीरातून यांच्या पोटात पुरेसं पाणी जात असणार असंच वाटतं. तरीही डिस्ट्रेस वाटला तर पाणी पोहोचवण्याची सोय करता येईल..

सुबोध खरे's picture

20 Nov 2013 - 3:06 pm | सुबोध खरे

गवि साहेब
आगाऊपणा बद्दल माफ करा. तिथली प्रत्यक्ष परिस्थिती न पाहता फुकटचा सल्ला दिल्याबद्दल. क्षमस्व

रुस्तम's picture

20 Nov 2013 - 8:46 pm | रुस्तम

नवीन फोटों टाका की गवि सर..

हा व्हिडीओ नेटाने शेवटपर्यंत पाहिलात तर सुरुवातीला पिलांच्या हालचाली, विशेषतः मोठ्या पिल्लाचं माणसाप्रमाणे पूर्ण उभं राहणं, यात खूप गंमत वाटेल, पण तसेच टिकून राहिलात तर साडेतीन मिनिटे ते चार मिनिटे या इंटर्वलमधे एकदा आणि सुमार सव्वाचार मिनिटे या जागी दुसर्‍यांदा, असा तो अत्यंत खास शत्रूला घाबरवण्यासाठी घेतलेला पवित्रा -अंग दबकून फुलवणे- दिसेल.

(अद्याप पंख नसल्याने तो अविर्भाव लिंबूटिंबू दिसतो..)

पण.. त्यासोबत येणारा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सापासारखा दीर्घ फूत्कार (स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्शशश..) हा खरोखर दचकवणारा असतो..कुकरची शिट्टी जितकी तीव्र असते तितका तीव्र ऐकू येतो जवळ असताना. या व्हिडीओत त्या अविर्भावासोबत तोही ऐकायला मिळेल.

मी-सौरभ's picture

12 Nov 2013 - 12:43 pm | मी-सौरभ

उत्तम चाललय म्हणायच आता

चिगो's picture

12 Nov 2013 - 3:16 pm | चिगो

शिरसाष्टांग नमस्कार.. पालकत्व जबरदस्त निभावताय तुम्ही..

स्पंदना's picture

12 Nov 2013 - 3:42 pm | स्पंदना

कसली गोड आहेत पिल्ल! मस्तच!
वाकुन कशी पाहताहेत ना? माझा पक्षीपण माझ्याकडे असाच निरखुन पहातो, डोक आडव करुन.

एकूण तुम्ही पाहताय म्हणुन मिसेस घुत्कारे निवांत आहेत वाटतात.

प्रभाकर पेठकर's picture

12 Nov 2013 - 3:57 pm | प्रभाकर पेठकर

अरे व्वा! मस्त पोज आहे. घाबरलेली दिसत असली तरी 'सांभाळून असा, कुठल्याही क्षणी आक्रमक होऊ' हा संदेश सक्षमतेने देत आहेत.

गवि,
जवळच्या शाळेत केजी १ साठी दोन सीट्स बुक करून ठेवा.

गजानन५९'s picture

13 Nov 2013 - 11:06 am | गजानन५९

गवी hats offf you......

चिप्लुन्कर's picture

13 Nov 2013 - 12:50 pm | चिप्लुन्कर

भारीच गवि साहेब ,

तुमच्या संगोपनाला सलाम आणि शुभेछा

झकासराव's picture

14 Nov 2013 - 10:59 am | झकासराव

ग्रेट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

:)

गवि's picture

17 Nov 2013 - 10:35 am | गवि

a

b

c

e

F

मन१'s picture

17 Nov 2013 - 10:48 am | मन१

मानवी भावनांची तुलना ह्यांच्याशी करायची झाली; तर फोटोमधून एक निस्सिम निरागसता प्रतीत होते.
ही चिमुरडी त्यांच्या चिमखड्या भाषेत " आमाला खेलायला गार्डनला नेनाल का" असं चटकन् विचारतील असं वाटतं.
.
सम्यक निसर्ग ही भंकस असेलही. त्यात टोकाच्या आणि हिण्कस क्रौर्याचे दर्शनही होते.(अर्थात क्रौर्य ही पुन्हा मानवी भावनाच."जाणिवेत"ल्या जीवांसाठी)
पण ही जी like begets like वाली साखळी आहे ना, ती अतिशय लोभस आहे. निसर्गाची ती लोभस बाजू.( आता साला "लोभस" ही पण मानवी भावना.)
कठीण आहे.

रुस्तम's picture

17 Nov 2013 - 3:44 pm | रुस्तम

सुन्दर

प्यारे१'s picture

17 Nov 2013 - 6:34 pm | प्यारे१

खरंच देखणी दिसताहेत. :)

मी_आहे_ना's picture

20 Nov 2013 - 1:56 pm | मी_आहे_ना

निरागस पिल्लं बघताना लहानपणी टीव्हीवर बघितलेल्या रामायणातील जटायूची आठवण झाली!

बहुगुणी's picture

17 Nov 2013 - 12:18 pm | बहुगुणी

हा सर्व 'आंखो देखा हाल' पाहिल्यानंतर यानंतर कधीच घुबड या पक्षाविषयी कुणाला घृणा किंवा भीती वाटणं कठीण आहे, Procreate, Protect, Provide ही मानवाची तीन मूलभूत कार्ये/ कर्तव्ये असतील तर निसर्गातील इतर जीवही हेच सर्व किती इमानेइतबारे करतात याचीच गविंच्या लेखमालेने पुन्हा एकदा जाणीव झाली.

मी-सौरभ's picture

18 Nov 2013 - 1:24 pm | मी-सौरभ

:)

पैसा's picture

19 Nov 2013 - 4:08 pm | पैसा

दोघंही पोरटीं मस्त दिसत आहेत!

गवि हल्ली पालकत्व कोणाकडे आहे? अजुन उंदिर दिसताहेत की गोदरेज चिकनवरच चाललय?

पालकत्व मूळ पालकांकडेच आहे. मी फक्त अधूनमधून नजर टाकतो इतकंच.. मी फक्त तुम्हा सर्वांना काही घडामोडी सांगतो. यापलीकडे पालकत्व म्हणावं असं काहीही माझ्या हातून खास झालेलंच नाहीये अद्याप.

स्पंदना's picture

21 Nov 2013 - 5:31 am | स्पंदना

म्हणजे उडायचे धडे मिळतील अस वाटतय.
निदान हे दोन जीव तरी जगावेत अशी देवाला प्रार्थना.

निनाद's picture

20 Nov 2013 - 3:15 pm | निनाद

नवीन व्हिडियो फोटोंची फार वाट पाहत आहोत... जमेल तसे टाका ना प्लिज...

रुस्तम's picture

22 Nov 2013 - 7:30 am | रुस्तम

नवीन फोटों टाका ना प्लिज...

मोठं पिल्लू आता खरोखर खूप मोठं झालं आहे. आजच्या या फोटोंमधे ते खाली बसून असल्याने उंची लक्षात येत नाहीये, पण आज सकाळी बघायला गेल्यावर ते उठून उभं राहिलं तेव्हा मला बर्‍याच दिवसांनी घुबडाईच येऊन बसली आहे असा भास झाला इतकं ते मोठं (उंचीला) झालं आहे.

त्याच्या पंखांमधे वाढत्या प्रमाणात अ‍ॅडल्ट घुबडाच्या रंगाची पिसं उगवली आहेत. फोटोंमधे खास हॅपनिंग काही नाही कारण ती पिल्लांची झोपण्याची वेळ आहे. आळसटलेली आहेत.

आजची खास बात म्हणजे संरक्षणार्थ कुकरशिट्टी वाजवणे, ख्याव ख्युव आवाज आणि पवित्रे घेणे ही सर्व कामं आता छोट्या पिल्लाने उत्साहाने स्वतःकडे घेतली आहेत. मोठे पिल्लू आसपास चाहूल लागली तरी फारसे काळजी करत नाही. बडा जो हो गया हूं.. असं असावं.. :)

A

बाजूला जमिनीवर मातृपितृकृपेने भक्ष्य येऊन पडलेलं दिसतंय. अर्धा स्वाहाकार झालेलाही दिसतोय.

B

सकाळच्या वेळी रोज झोप काढतात.. अर्थात सावध झोपच..

C