प्रेरणा: प्रेम
गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!
गेम झाली तर माणूस गेला
नाही झाली तर माणूस वाचला
गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!
एक टपकला की दुसरा
दुसरा टपकला की तिसरा
गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!
लपायला अजिबात जंगल नाय
सावली आहे ती वड पिंपळाची
गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!
एकडे आहे मंद मोर
ज्याला सापडत नाही लांडोर !
गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!
प्रतिक्रिया
2 Oct 2013 - 10:28 pm | कवितानागेश
मला गरम पा॑ण्याचे कुंड फार आवडते. :)
2 Oct 2013 - 11:01 pm | पैसा
हे नक्की काय आहे?
धन्या यांचे खाते बंद करावे अशी विनंती नंतर येणार आहे काय?
यात आई, बाबा, चौरा याबरोबरच ५ मुलींची नावे आणि नागद्वार, काणकोण, गोवा, कोडाईक्नॉल याव्यतिरिक्त भूछत्र यांचा उल्लेख आहे याची नोंद घेतल्या गेली आहे.
3 Oct 2013 - 9:56 am | धन्या
काव्यरस च्या "मल्टीसिलेक्ट लिस्टबॉक्स"मध्ये एव्हढे सारे "लिस्ट आयटम्स" पाहून माझ्यातला वेब डेव्हलपरला "किडे करण्याची" उबळ आली आणि हे सारे काव्यरस "सिलेक्ट" केले. :)
3 Oct 2013 - 9:58 am | पैसा
मग बरोबरे!!
3 Oct 2013 - 1:17 am | प्रचेतस
=))
माताय,कवितेपेक्षाही काव्यरस तूफान आहेत.
बाकी लांडोरी मिळण्यासाठी त्या मोराला पिसारा फुलवून नाच म्हणावे.
3 Oct 2013 - 1:26 am | अभ्या..
हीहीहीहीही.
वल्ली, अशा मंद मोराचा मंद फुलणारा पिसारा बघायला सध्याच्या सुपरफास्ट लांडोर्यांना येळ आहे का?
तु फुलीव, मी झुलीवते म्हणत्यात. ;)
3 Oct 2013 - 1:56 am | अत्रुप्त आत्मा
दे मारा! =))
3 Oct 2013 - 9:55 am | प्रचेतस
=)) =))
आमचा एक 'मोरे' आडनावाचा मित्र होता त्याला सर्वजण 'गोड गोजीरी लाज लाजिरी लांडोर होणार नवरी' असे चिडवायचे.
3 Oct 2013 - 1:55 am | प्यारे१
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी टाकलेलं विडंबन!
एक मिपाकर म्हणून आत्यंतिक शरम वाटली.
दुर्दैवानं संपादक देखील ह्या अशा प्रवृत्तींना भरीस घालताना दिसतात.
क्रुपया माझे खाते बंद करावे ही णम्र विनंती.
- धाराच्या जाहिरातीतल्या 'सब घुस्सा करते है मै घर छोड के जा रहा हू' म्हणणार्या बारक्याचा पंखा.
3 Oct 2013 - 9:47 am | पैसा
तुमचा एक कंपू तयार करा! कोणी नको म्हटलंय!
3 Oct 2013 - 10:01 am | यशोधरा
संपादकच असे सांगतायत! आवडलं! :P
3 Oct 2013 - 10:01 am | धन्या
कंपू? ते काय असतं?
आम्ही तर ऐकलं होतं की तुम्ही "सार्याच्या पलिकडे गेला आहात" म्हणून.
4 Oct 2013 - 3:34 am | प्यारे१
>>>>ऐकलं होतं
हेच चुकतं. दुसर्याच्या सांगीवांगी गोष्टींवर विश्वास ठेवता. एकदा आश्रमात या, वर्गणी द्या. अनुभव हीच खात्री.
सार्याच्या पलिकडं जाणं नि शरम ह्याचा संगम करुन 'बेशरम' नावाचा शिनुमामा आमचे शिष्य रणबीर कपूर ह्यांनी काढला आहे. फुकट मिळाल्यास लाभ घ्यवा.
@ पैसाताई, वाक्य इज केप्ट फॉर रेकॉर्ड. धन्यवाद! ;)
3 Oct 2013 - 10:07 am | मदनबाण
हा.हा.हा !
5 Oct 2013 - 1:10 pm | चौकटराजा
आता मिपाची " कंपू " ही गरज झालीय काय ? या विषयावर आजचा सवाल मधी रात्री दहा वाजता . सादरकर्ते नि३.
भाग घेणारे अस्सल कलाकार.... धन्या , संक्षी, महिलांचे प्रतिनिधी पूजाबै पॉवर , व मोरांचे प्रतिनिधी....(अनेक आहेत)
बाकी @धन्या ,कवितेतला मोर तुमच्या साईडला रहातो काय ? अरे रे पण मोर खादाड असल्याचे ऐकिवात नाही.
5 Oct 2013 - 2:27 pm | चाणक्य
कडक वि'टं'बन(ा)