नमस्कार मंडळी,
गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा! अंत्यत श्रध्देने आणि मोठ्या भक्तीभावाने हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या बरोबरीने महाराष्ट्रात घरोघरही जवळपास १२ ते १५ लाख बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापुर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो, मग ते दिव्यांची आरास असो वा फुलांची तोरणे, थर्माकॉलचे आकर्षक मखर असो वा गणेशाची सुंदर मुर्ती! हि सजावट अगदी मनोभावे आणि जोरदार केली जाते. घरगुती गणपतींना होणारी ही सजावट लक्षात घेता मिपा व्यवस्थापनाने यावर्षीपासून घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. आपणा सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल, त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या घरात गणपतीभोवती केलेल्या सजावटीचा फोटो इथे टाकायचा आहे. येणार्या सजावटींमधून सर्वोत्तम तीन सजावटींना मिपा व्यवस्थापनातर्फे पुस्तक स्वरूपात पुरस्कार दिले जातील. त्यासंबधीची इतर माहिती नंतर कळवण्यात येईलच.
चला तर मग!! होऊन जाऊ द्या घरातली सजावट एकदम जोरदार !!
स्पर्धेचे नियम आणि अटी खालीलप्रमाणे :-
१) स्पर्धेचा सहभाग सर्वांना खुला असेल.
२) प्रत्येक स्पर्धकाने फक्त आपल्याच घरातल्या सजावटीचा फोटो टाकायचा आहे.
३) स्पर्धकाला प्रत्येकी २ फोटो टाकता येतील.
४) आपले फोटो इथेच प्रतिसादामध्ये टाकायचे आहेत. ज्या स्पर्धकांना फोटो टाकण्यात अडचण येईल, त्यांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे संपादक मंडळ या आयडीला कळवायचे आहे.
५) आलेल्या सजावटींमधून सर्वोत्तम तीन निवडण्याचा अंतिम निर्णय परिक्षकांकडे राहील.
प्रतिक्रिया
14 Sep 2013 - 2:00 am | सूड
>>श्री अम्बाबाई चे चित्र नसून त्रिमीत आहे. मूर्तीच्या चित्राला दागिने व् साडी नेसवली आहे.
मग तर ग्रेटच. देवळात देवीला साडी नेसवताना तिथल्या लोकांची किती गडबड होते हे पाह्यलंय. अगदी हुबेहुब महालक्ष्मी साकारलीय. दंडवत स्वीकारा !! ;)
14 Sep 2013 - 1:12 pm | जोशी 'ले'
मस्त रे जरा डिटेल्स चे फोटो टाक ना...
14 Sep 2013 - 1:07 am | Mrunalini
हा माझ्या घरचा बाप्पा आणि गौरी.. :)
14 Sep 2013 - 2:38 am | प्यारे१
मस्त आहे .
अवांतरः गणपती आहे तर गौरी नाही नि गौरी आहे तर गणपती नाही... असं कसं?
दीड दिवसाचा गणपती का?
अतिअवांतरः आमच्याकडे गौरी गणपती भाऊ बहिण मानतात. गौरी येऊन गेल्याशिवाय गणपती जात नाही.
काय खरं खोटं दोघांनाच ठाऊक.
14 Sep 2013 - 4:13 pm | Mrunalini
हो... दिड दिवसाचा गणपती... त्यामुळे गौरी सोबत गणपती नाही आहे.
14 Sep 2013 - 3:46 pm | रिकामटेकडा
मुर्ती माझ्या पत्नीने शाडुच्या मातीपासून घरीच बनवली आहे.
धोतर व उपरण्यासाठी वेल्व्हेट च्या कापडाचे तुकडे वापरले.
मागील देखाव्यासाठी कार्डबोर्ड व कागदाचा वापर केला आहे.
14 Sep 2013 - 3:52 pm | रिकामटेकडा
मुर्ती माझ्या पत्नीने शाडुच्या मातीपासून घरीच बनवली आहे.
धोतर व उपरण्यासाठी वेल्व्हेट च्या कापडाचे तुकडे वापरले.
मागील देखाव्यासाठी कार्डबोर्ड व कागदाचा वापर केला आहे.
14 Sep 2013 - 4:07 pm | पैसा
खूपच मेहनत घेतली आहे! खूप छान!
14 Sep 2013 - 4:18 pm | जेनी...
मनापासुन अभिनंदन !
अतिशय देखणा देखावा आणि मुर्तिहि एकदम सुबक
खरच खुप मेहेनत घेतलिय . गणपती येन्या आधी अशी सजावट
करायला घेणं ... म्हणजे गणपतीची अगदि उत्स्फुर्तपणे अन आतुरतेन
वाट पहाणं ... हे सगळच तुमच्या कलाक्रुतीत दिसतय .
पून्हा एकदा अभिनंदन !
15 Sep 2013 - 4:59 am | आनन्दिता
खुप मस्त....
16 Sep 2013 - 4:08 pm | मीनल
मूर्ती, सजावट खूप आवडली. यालाच कला म्हणतात !!!!
15 Sep 2013 - 3:29 am | प्राजक्ताची फुले
माझ्या माहेरचे गौरी आणि गणपती.. सगळी सजावट घरीच केलेली आहे. साई बाबा मंदिरातल्या गाभ्र्याची प्रतिकृती तयार केली आहे. वडीलांनी टरबुजावर गणपती कोरला आहे. आणि विठ्ठल - रखुमाई ची रांगोळी काढली आहे.
15 Sep 2013 - 8:38 am | पैसा
तुमच्या घरात सगळेच कलाकार दिसताहेत!
15 Sep 2013 - 10:58 am | डॉ सुहास म्हात्रे
+१
सगळेच सुंदर आहे. टरबूजावरचा गणेश काढायची कल्पना आवडली !
16 Sep 2013 - 4:10 pm | मीनल
मस्त!
साई गणेश तर खूप छान.
रांगोळी अप्रतिम!!!
15 Sep 2013 - 11:19 am | महाईश
15 Sep 2013 - 11:20 am | महाईश
15 Sep 2013 - 5:13 pm | मनिम्याऊ
गणेशोत्सव म्हणजे वर्षातील सर्वात आनंदाचा, उत्साहाचा काळ. सासरी गणपती बसवत नसल्यामुळे सजावटीची सगळी हौस मग माहेरीच पुरवून घ्यावी लागते. त्यात बाप्पा आमचे (माझ्या माहेरचे) कुलदैवत. त्यामुळे विसर्जनाची पद्धत नाही आणि बाप्पांची मुर्ती धातूची असते. दरवर्षी पितळी मूर्ती आणि रोज़च्या पूजेतली लहान गणेशमुर्ती ज़रा बाजूला मांडून आरास केली जाते.
यावर्षी बाप्पांची सजावट पूर्णपणे कागद वापरून केली आहे. अगदी गणेशाच्या आवडत्या 'रक्तपुष्पा' पासून तर 'प्राजक्त-फुलांच्या' माळेपर्यन्त तसेच सभोवतलचे पुष्पमंडळ आणि चारी कोपर्यातील 'फूल-छड्या' अस्मादिकानी टिशुपेपर/ क्रेपपेपर वापरून घरीच बनवल्या..
15 Sep 2013 - 8:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर सजावट !
सगळी सजावट कागदाची केलीत हे तर फारच आवडले... टोटली बायोडिग्रेडेबल्. अभिनंदन !
15 Sep 2013 - 8:29 pm | पैसा
ती प्राजक्ताची फुले कागदी वाटतच नाहीयेत!
16 Sep 2013 - 7:02 pm | केदार-मिसळपाव
मस्त...
15 Sep 2013 - 8:08 pm | माझीही शॅम्पेन
!! गणपती बाप्पा मोरया !!
हा आमच्या घराचा बाप्पा , खरतर लहान पणी पासून एको-फ्रेन्डली कडे कटाक्ष पण मागच्या वर्षी ओळखीचे एकजन हे थर्मा-कोलच मखर फेकून देत ,होते त्यांना म्हंटल आम्हाला द्या , हे परत वापरून आम्ही रीसायकल करतो , आता पुढच्या वर्षी एका मित्राला देवून परत रीसायकल करणार , पुढच्या वर्षी नक्कीच कागदच / फुलंच मखर करणार :)
थोड जवळून
15 Sep 2013 - 9:10 pm | स्मिता शितूत
काय करु????
15 Sep 2013 - 9:36 pm | पैसा
पिकासा/गूगल्/फेसबुक कुठेही असेल तर लिंक द्या.
16 Sep 2013 - 1:02 pm | नन्दादीप
16 Sep 2013 - 2:10 pm | त्रिवेणी
हे आमच्या घरचे बाप्पा
मी बाप्पांना रोज फुलांचा हार नाही घालत, त्या हाराच्या आड बाप्पा लपतात.
16 Sep 2013 - 2:14 pm | त्रिवेणी
16 Sep 2013 - 4:22 pm | गणपा
वाह ! एकाहुन एक सरस.
16 Sep 2013 - 4:27 pm | गणपा
वाह ! एकाहुन एक सरस.
16 Sep 2013 - 7:54 pm | दिपक.कुवेत
सर्वच बाप्पा छान आणि सगळ्या सजावटिहि सुंदर.....तमाम स्पर्धकांना बेस्ट ऑफ लक!
पुजा आज्जी तु परीक्षक मंडळावर तर नाहिस ना? नाहि सगळ्यांना प्रतिसाद देतेस म्हणुन आपलं विचारलं बरं.
16 Sep 2013 - 8:58 pm | जेनी...
:-/
दीपु काका कट्टी फुये तुमच्याशी :-/
17 Sep 2013 - 12:34 am | अत्रुप्त आत्मा
पुजा आज्जी >>>
16 Sep 2013 - 10:16 pm | कवितानागेश
सगळ्याच सजावटी फार सुंदर झाल्यायत. इथे बसल्या बसल्या सगळ्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन झाले. :)
17 Sep 2013 - 9:21 am | पेरु
दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी पर्थ, ऑस्ट्रेलियात गणपती बसवला. सगळी सजावट घरी केली आहे. एक निरुपयोगी गिफ्ट पेपर होता तो आधी मागे चिटकवुन घेतला. फर्निचर बरोबर थर्मोकोलचे तुकडे आले होते. त्यातल्या दोन चोकोनी तुकड्यांना रंग देउन एकावर एक चिटकवले आणि मागे लावले. कागदावर काही ग्लिटर स्टिकर्स लावले. एक घरात ओढणी होती ती वरती लावली. इथवर आमची सजावट संपली होती. मग चहा ब्रेक झाला. काही उत्साही मंडळी येउन मिळाली आणी मंदिराची आयडिया सुचली. मागच्या वर्शीही मंदीर केले होते पण साधेसे. यावेळेस थोडे वेगळे केले. बेसला काहि नव्हते म्हणुन मग पाटच ठेवला. थर्माकोलचे दोनच खांब होते हे मागे लावले मग उरलेल्या दोन खांबांसाठी संपलेल्या फॉइल पेपरचा जो शेवटचा गोल रिळ उरतो तो वापरला. त्यावर तो एकुलता एक लाल गिफ्ट पेपर चिटकवला. परत कमानिला तोच पेपर (कारण घरात तोच एक प्लेन गिफ्ट पेपर होता ). कमानीवर परत ग्लिटर स्टिकर्स आणि मग शेवटी लायटींग. आणी वर सिलिंगपर्यंत रंगबेरंगी कागद(? त्याला काय म्हणतात बरे?)
17 Sep 2013 - 9:23 am | पेरु
गौरीचे फोटो पण दिलेत तर चालतील का?
17 Sep 2013 - 9:56 am | नाटक्या
17 Sep 2013 - 11:21 am | ऋषिकेश
शेवटची तारीख काय आहे?
आमच्या मामच्या घरी आम्ही केलेल्या फर्मास सजावटीचा फोटो नेमका मामेभावाच्या क्यामेरात आहे आणि तो कधी पाठवेल हे तो गणरायच जाणे ;)
17 Sep 2013 - 10:13 pm | केदार-मिसळपाव
तर गेल्या वीकांताला आमच्या घरी गणपती असल्या कारणास्तव सर्व बायरॉइथकरांना (आमच्या गावातल्या मित्रांना) संध्याकाळचे आरतीचे आमंत्रण होते.
त्या निमीत्य प्रसाद म्हणुन मोदक आणि मिसळपाव असा बेत होता...आपण तर ब्वा लै खुश झालो होतो.
गणपती बाप्पा मोरया....मोदक आणि मिसळपाव खायला या...
18 Sep 2013 - 12:58 am | लौंगी मिरची
. . .
. . .
18 Sep 2013 - 1:15 am | जातीवंत भटका
दोन आठवडे खपून केलेला बाप्पाचा मूषक महाल.
हा महाल थर्माकोल मधे केलेला असून त्यावर अॅक्रेलीक रंग लावण्यात आला आहे. रंग-संगतीसाठी लाल रंगाच्या वेल्वेट कागदाचा वापर केला आहे.
महालाची उंची साधारण ३.५ फूट आणि रूंदी ३ फूट आहे.
१. महालाची आकार घेताना.
२. महाल पूर्ण झाल्यावर .. बाप्पांच्या प्रतिक्षेत..
३. बाप्पा आपल्या मूषक महालात विराजमान झाल्यानंतर ...
गणपती बाप्पा ! मोरया !
18 Sep 2013 - 1:37 am | खटपट्या
अतीशय सुन्दर
18 Sep 2013 - 2:31 pm | मनिम्याऊ
खुप सुन्दर
18 Sep 2013 - 3:01 pm | अविनाश पांढरकर
खूप सुन्दर आहे ही सजावट!!!
18 Sep 2013 - 1:43 am | kanchanbari
18 Sep 2013 - 2:26 pm | नितिन काळदेवकर
हा पहा आमचा बाल गणेशा
18 Sep 2013 - 4:41 pm | अनन्न्या
साय्राच सजावटी पाहत राहाव्या अशा झाल्यात!
18 Sep 2013 - 5:34 pm | ब्रिज
20 Sep 2013 - 11:14 am | स्मिता शितूत
टाकाऊ पासून टिकावू..........