बादशाही...!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
22 Aug 2013 - 1:44 am

आज सांजच्याला अड्ड्यावरनं घरला निघालो,आणी गाडी सवईनी पानाच्या आमच्या आवाडत्या ठेल्यावर गेली. "बोलो साब...कितना...?" मी-"तीन बनाओ,तीनो पार्सल करो. असं म्हणालो आणी जरा कानावरचा हेडफोन दूर करुन आजूबाजुला न्याहाळायला लागलो. आमच्या सदाशिवपेठेतली ही गल्ली पूर्वी सदाशिवपेठेचा केवळ एक भाग होती आणी भरत नाट्य मंदिराचा चौक ते टिळक स्मारक मंदिराचा चौक यांना जोडणारी गल्ली.."इतकिच" नाट्यमय तिची ओळख होती.पण गेल्या १५ वर्षात या गल्लीला एक नविन ओळख मिळाली... मटण-गल्ली! हो....! हेच नाव त्या लेनला आता मिळालं आहे.म्हणजे मला वैयक्तिक रित्या ही काहि खेद-जनक अथवा शरमेची गोष्ट वगैरे वाटत नाही.पण काळाबरोबर मूल्य कशी आणी किती बदलतात,याचा हा एक गमतीशीर पुरावा. या गल्लीत पूर्वी नागपुर खानावळ ही एकच पारंपारिक नॉनव्हेज खानावळ होती.आणी त्यानंतर त्याला तात्विक शह द्यायला आलेली सात्विक-थाळी! पण हल्लीच्या रस्सास्वादवादी चळवळीच्या जनकांनी गावभर जिथेतिथे जे तांबड्या/पांढर्‍याचं व्यापक आंदोलन "सुरू" केलय त्याची पाळमुळं याच गल्लीत असावी असा माझा आपला एक अंदाज आहे. कारण एकेक म्हणता म्हणता या गल्लीत पाच/सहा हॉटेलं त्याचीच चलु झाली हळुहळू! असो..आपली मांसाहारावर प्रीतीही नाही...दुस्वासही नाही!

या गल्लीतनं "हे" अवलोकन करून बाहेर पडता पडता,मनात का कोण जाणे चटकन नाव आलं ते आमच्या बादशाही'चं! लोकांना हे पुण्यातलं बादशाही(लॉजिंग/बोर्डींग) म्हणून माहित आहे,आंम्हाला हे पुण्याचं-(लॉजिंग/बोर्डींग) म्हणून माहित आहे. ;) (सदर वाक्यातील खोच ही ज्यानी बादशाही'ची लॉजिंगची "नियमावली" हे अस्सल पुणेरी प्रकरण वाचलं आहे,आणी त्यानंतर तो'ही वाचला आहे,त्यालाच कळेल ;) )

तर.... मनात आलं आज नेहमीच्या मेसला दांडी मारून आपल्या बादशाही'ला पुन्हा एकदा फेस करावं.घड्याळात पाहिलं आणी शेवटची पंगत मिळेल या अंदाजानीच आत गेलो.अंदाज फेल गेला नाही,कारण काऊंटरवरचा तो प्राचीन खानावळ संस्कृतीतला इसम माझ्याकडे त्याच चेहेर्‍यानी बघत टोकन-पावती फाडायच्या बेतात उभा होता. पैसे दिले पावती हतात आली,आणी "नंबर"चा पुकारा होई पर्यंत तिथल्या एका जुन्या श्टाइलच्या आणी खरोखर तितक्याच जुन्याकाळी-घेतलेल्या वेटिंगच्या लांबलचक आसनावर स्वस्थ झालो.
https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-prn1/935938_500146363404988_1751480982_n.jpg
वेळही भरत आलेली असल्यामुळे ५ मिनिटातच तिनशे...ती...स! असा पुकारा आला,आणी एंट्रिला उभ्या असलेल्या माणसानी,"आतल्या बाजुची कोपर्‍याची खुर्ची..!" असं म्हणत मला "आत-धाडलं" देखिल!
https://fbcdn-sphotos-e-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/995471_500146383404986_388120170_n.jpg
ही खास बादशाही श्टाइल आहे. मी नवि-पेठ हा सदाशिवपेठेचा वाढता भूभाग म्हणून वेगळा केलेला,माझ्या कर्मभूमीचा एरिया सोडून शिव्हगड-रोडला विस्थापित झाल्यानंतरची (म्हणजे ७/८ वर्षानंतरची! =)) ) ही माझी पहिलीच भेट होती,त्यामुळे तो आत "सोडणारा" ,श्राद्धाला पिंडांना नमस्कार करायला जे जमतात,त्या चेहेर्‍याचा आणी पेहेरावाचा'ही- नेहमीचा वयस्क मनुष्य दिसतो का? ह्या खुषीत होतो.पण आज मला एका दुसर्‍या'च माणसानी आत सोडलं.पण श्टाइल तीच असल्यानी मला त्याच्या मागे आजही उभा असलेला तो म्हातारा दिसलाच!

यही तो इधरकी खासियत है! जश्या इथल्या पाट्या अस्सल पुणेरी,तशीच या खानावळीची संस्कृतीही अस्सल पुणेरीच.
https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-ash4/1185322_500146420071649_1518672300_n.jpg
https://fbcdn-sphotos-h-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/581537_500146393404985_1978310668_n.jpg
खरं म्हणजे अस्सल हा शब्द वापरायला नकोच आहे, ते थोडसं ,"हे डोक्यावरचे माझे अस्सल केस आहेत!" असं म्हटल्या सारखं होतं. इथल्या खुर्च्या/टेबलं/पाण्याचे पितळी तांबे.जेवण वाढायची/जेवणाची भांडी ही सुद्धा अजून तशीच आणी तीच आहेत.
https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/1176350_500146240071667_1385661105_n.jpg
म्हणजे या खानावळीला (इथल्या माणसांसकट) नूतनीकरण नावाची नव मार्केटिंगवादी-झळ कधिही पोहोचलेली नाही. आणी ती पोहोचण शक्यही नाही.अहो कुंडितली तुळस उपटून फ्लॉवरपॉटमधे लावली तर ती गुलाबी येत नसते.आपल्याला उगाच नविनपणा केल्याची हौस भागवल्या सारखं होतं इतकच. बादशाही मधे मिळणारं साधं मराठी भोजन हे पूर्वीही भोजनच होतं आजही भोजनच आहे.(तिथल्या कोथिंबिर लाऊन दिल्या जाणार्‍या ताकासारखं!) त्याची कधिह्ही राइसप्लेट झाली नाही आणी थाळिही!

एक्स्ट्रॉ स्विटडिश पूर्विही होत्या आजही आहेत,पण त्याबरोबरच इथे खास जुन्या पुणेरी मामल्याचं-एक्स्ट्रॉ तूपंही मिळंतं. (आज शेवटच्या पंगतीला असल्यामुळं ते अदृश्य झालवतं. ;) ) इथला आमटिचा प्रकार तर एक लाजवाब प्रकार आहे.अगदी खाण्यापासून ते वाढला जाण्यापर्यंत! आपण इथे जेवत असतांना आमटिचं गरम पातेलं आणी गरमागरम आमटिचं पातेलं... असं घेऊन कुणि ना कुणी अधून मधून येरझार्‍या घालतच असतो. इथल्या आमटिचा स्वाद म्हणजे खरोखर स्वाद या शब्दाची इज्जत राखणारा स्वाद आहे. जेवताना एरवी कधीही आमटी हा प्रकार आपण पीत नाही.पण इथे आमटी ही कढी सारखी गरमागरम प्याविशी वाटते. मी ज्या वयात शाळेतल्या मास्तरांना पगार मिळण्याचं "कारण" होतो,म्हणजे ६वी ७वीत शाळेत होतो,तेंव्हा कधितरी बाबांबरोबर दुपारचा इथे पहिल्यांदा जेवायला गेलो होतो.पण पदार्थाची क्वालिटी/चव/आकार/प्रकार सर्व काहि आजही तस्से आणी तसेच आहेत.एखादी ओली भाजी,एखादी सुकी भाजी ,आमटी,भात,पोळ्या,लिंबाची एकच-फोड!,एखादी चटणी,पिठातलं डांगर,कांदा असा अत्यंत साधा आणी घरगुती मामला असतो.त्यातही महागाईच्या नावाखाली बटाट्याचा आणी गेल्या काहि वर्षातल्या सोयाबिनचा "आधार" या खानावळीनी आजही घेतलेला नाही,त्यामुळेच या खानावळीचा ताटाचा "भाव" वाढलेला असला,तरी त्याची "किंमत" पूर्वी होती, तीच आहे! जेंव्हा "सातत्य" ही बाब असते तेंव्हा "दर" ही गोष्ट गौण ठरली पाहिजे,हे चांगल्या ग्राहकाच्या मनाचं अर्थशास्त्र असेल,तर त्याला हाही दर रुचून जातो! नव्हे रुचला पाहिजे,असं मला आमच्या बादशाही'च्या बाबतीत थोड्याश्या अडेल आग्रहानी म्हणावसं वाटतं.कारण भोजनाची पूर्णता तृप्तीच्या ढेकरेनी जेव्हढी यायला हवी,तितकीच "मस्त जेवलो बुवा !" ही समाधानाची हाकही मनातून येणं आगत्याचं आहे. या दोन्ही गोष्टी इथे घडतात,किंबहुना त्या घडून याव्या असाच इथल्या अन्नाचा स्थायीभाव आहे.
https://fbcdn-sphotos-f-a.akamaihd.net/hphotos-ak-prn2/1186735_500146300071661_1074214418_n.jpg
आजचा जमाना हा "सर्व्हिस"चा जमाना आहे.पण त्यात फक्त सर्व्हिस'च येते आहे,सेवा देणं शून्यवत झालं आहे.तश्या जमान्यातही आपलं खरंखुरं पुणेरीपण टिकवून गिर्‍हाइकं न वाढवता गेस्टपास'ही देणारी ही जुन्या पुण्या इतकीच-जुनी खानावळ आजही थाटात उभी आहे आणी तशीच पुढे राहिलंही!
https://fbcdn-sphotos-h-a.akamaihd.net/hphotos-ak-frc1/1004680_500146273404997_2091441227_n.jpg
===================================================================

संस्कृतीजीवनमानआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

23 Aug 2013 - 12:20 am | अत्रुप्त आत्मा

@चोरटेपणाने फोटो काढायची बाजीगरी करणाऱ्या अतृप्तांना कायदेशीर धमकावणी इमाने इतबारे पार पाडत आहेत.>>> =)) अत्यंत खोचक... आपलं ते हे... रोचक प्रतिसाद! =))

उपास's picture

23 Aug 2013 - 12:44 am | उपास

बादशाहीचे वर्णन, फोटॉ आणि गवि तसेच इतरांचे प्रतिसाद पाहून एकदम नॉस्टेल्जिक वाटलो.
एक काळ असा होता की आम्ही सदाशिव पेठेत रुमवर राहाणारे मित्र चार ठिकाणी चार जण जाऊन बघत असू कुठे काय आहे ते आणि मग बरेचदा बादशाही मध्येच जाणं होत असे. मी जायचो तेव्हा गविंनी लिहिलय तसं आजोबा असायचे गल्ल्यावर.. (माझ्याशी मात्र एक दोनदा चक्क गप्पा झाल्याचं आठवतय, मी मुंबईचा म्हटल्यावर!)
वामनराव पांढरा शर्ट, पाढरा लेंगा असे उभे असायचे दारात, हातात पाटी-पेन्सिल. नेहमीचं असल्याने लांबून फक्त हाताच्या बोटाने सांगायचं दोन्,तीन्,चार काय ते.. निवांत पेपर वाचत किंवा कधी नुसती धावपळ बघत बसायचं. नंबर आला की वामनराव ओरडून सांगणार, कधी मूड मध्ये असले की जवळ येऊन आत घेऊन जाणार..
भात, तूप, आमटी ह्या गोष्टींबरोबर आवडणारी गोष्ट म्हणजे तिथलं ताक!
गेल्यावर्षी अगदी आवर्जून गेलो बादशाहीत, एक फरक म्हणजे आता टेबलावर चकल्या वगैरेंची पाकीटं विकायला आली होती. काळी टोपी घालणारे अबोल आजोबा फोटोत गेले होते आणि वामनरावसुद्धा :( नकळतच नमस्कार केला त्यांना तसाच.. कुठे कुणाचे त्रुणानुबंध असतात! माणसांना जोडण्याच अजब तंत्र बादशाही मधल्या जेवणात, साधेपणात आणि आपलेपणात तेव्हा होतंच होतं.. आत्ताही असेलच!
अवांतर :
सात्विक थाळी कधी मधी जायचो पण 'व्हॅल्यू फॉर मनी' म्हणजे बादशाहीचं. पेरुगेटचं पूना बोर्डिंग हाऊस फक्त रविवारी स्काळी. म्हणजे कार्यक्रम ठरलेला.. सकाळी चाराला उठावं.. टिळक रोडवर अंबिका कडे अमृततुल्य चहा मारावा.. पलिकडच्या गल्लित प्राजक्ताचं एक झाडं होतं, त्याचा सडा ओंजळीत घेत वास भरून घ्यावा आणि बाईक वरुन थेट सिंहगडाचा पायथा.. वरती चढताना छान सूर्योदय बघावा, लिंबू सरबत घेऊन रमत गमत साडे सातापर्यंत खाली.. येताना वाडेश्वर.. थालिपीठ खाऊन थोडी कॉफी. रुम वर जाऊन आंघोळ, पेपर वाचन आणि मग बाराच्या आसपास पूना बोर्डींग हाऊस. तिथे पूर्वी एक आजोबा असायचे.. बादशाहीच्या आजोबांच्या मानाने तरूण आणि स्वभावाने विरुद्ध.. कायम बोलत असायचे.. असो तर मसाले भाग, श्रिखंड आणि अळूची भाजी.. पोट भरलं तरी जिभ तृप्त होत नसे.. खाली येऊन गल्लीत पान खावं आणि तीन-चार तास रुम वर झोकून द्यावं.. संध्याकाळी उद्य विहारच्या समोर टपरी वर चहा.. सुखाचा रविवार असायचा तो असा! ह्या लेखाच्या निमित्ताने सगळं आठवलं!

धमाल मुलगा's picture

23 Aug 2013 - 2:33 am | धमाल मुलगा

क्या बात है...क्या बात है!
नुसतं वाचूनच दिल खुश झाला यार. जियो! :)

रेवती's picture

23 Aug 2013 - 1:29 am | रेवती

छान हो बुवा! लेख आवडला. प्रतिक्रिया वाचल्या नाहीत, नंतर सवडीन नक्की वाचणार.
तिथे कधी जेवले नाहीये पण तुम्ही म्हणताय तसच काहीसं ऐकून आहे.

मृत्युन्जय's picture

23 Aug 2013 - 11:50 am | मृत्युन्जय

बादशाही बद्दल अमाप कौतुक ऐकुन आहे. गेल्या १६ -१७ वर्षात एकदाही तिकडे खाणे झाले नाही. नाही म्हणता एकदा गेलो होतो. त्यादिवशीच्या जेवणात भेंडीची पातळ भाजी होती. ते ऐकुन जे निघालो ते थेट पून गेस्ट हाउस ला जाउनच थांबलो. सुग्रास जेवण हो तिथले पण. आता एवढे कौतुक बघुन एकदा जाइनच म्हणतो.

प्रचेतस's picture

23 Aug 2013 - 12:02 pm | प्रचेतस

बाकी ही ठिकाणे पारंपारिक असल्याने नॉस्टेल्जिक म्हणूनच जास्त प्रसिद्ध झालीत असे मला वाटते.
जसे
अप्पाची खिचडी (खडूस अप्पा अगदी सकाळी ९ वाजता गेलं तरी संपली आहे असेच म्हणतो त्यामुळे खायचा योग आला नाही कधी.
श्री मिसळ (ही तर अगदी अलीकडेच खाल्ली, जितकी तारीफ ऐकली होती त्यामानाने फुसकीच निघाली),
महानाझचे समोसे (हे आता ताबूत स्ट्रीटला स्थलांतरीत झालेय. अगदी मूळची चव नसली तरी अजूनही बर्‍यापैकी आब राखून आहेत.)
वाडीया कॉलेजमागची अण्णाची टपरी ( ही अजूनही लै भारीच होती. गरमागरम वाफाळते सांबार, वडा, चटणी तर जबरदस्तच. अगदी हल्लीच रस्तारूंदीकरणात बंद पडली असे वाश्याकडून समजते.)

निमिष ध.'s picture

30 Aug 2013 - 2:17 am | निमिष ध.

मगच्या वेळेस महानाझ बन्द झाले म्हणून हळहळलो होतो. पण समोसे अजुन मिळतात हे ऐकुन बरे वाटले. अता पुढच्या खेपेला सगळीकडे जाणे आलेच.

कोलेजच्या दिवसात बादशाही आणि बाकी सगळ्या ठिकाणी वार लगल्यासारखे जाणे व्हायचे.

मालोजीराव's picture

30 Aug 2013 - 5:24 pm | मालोजीराव

श्री मिसळ (ही तर अगदी अलीकडेच खाल्ली, जितकी तारीफ ऐकली होती त्यामानाने फुसकीच निघाली)

खरंच फेल आहे,

हल्ली घाटापलीकडे जास्त चांगल्या मिसळी देऊ लागलेत

मृत्युन्जय भेंडीची पातळ भाजी आवडत नाही तुम्हाला? असो आवड आपली आपली. :)
मला मात्र भेंडीची चिंच, गुळ, ओले खोबरं घालुन केलेली पातळ भाजी खुप आवडते. बादशाहीत कशी असते ते माहीत नाही पण.

सार्थबोध's picture

23 Aug 2013 - 12:09 pm | सार्थबोध

परगावच्या लोकांना घरचे सुखाचे घास खाल्य्याचा आनंद इथे मिळतो. बादशाही शाही आहे एकदम. छान लिहिले आहे.

भडकमकर मास्तर's picture

23 Aug 2013 - 4:13 pm | भडकमकर मास्तर

जुलै १९९१ ते मार्च १९९३.. अकरावी बारावीची दोन वर्षं जेवलो तिथे...
भरपूर आठवणी आहेत..
जेवण फार थोर आणि चवदार होतंच वगैरे म्हणणार नाही पण एस्पी हॉस्टेलवरून रोज तिथे जाऊन जेवायला मजा यायची... वामनराव नंबर लावेपर्यंत पेपर वाचायचो... सामना आणि मार्मिक तिथे खूप वाचला... रामजन्मभूमी चे वातावरण तापत असताना आणि ९२ - ९३ च्या त्या काळात दंगली आणि बारावीच्या परीक्षेच्या काळातच झालेले मुम्बई बॉम्बस्फोट आणि रोजचा वाचला जाणारा सामना आणि मार्मिक प्लस बादशाही मधलं जेवण असं काय काय लक्षात राहिलंय...

अत्रुप्त आत्मा's picture

23 Aug 2013 - 7:54 pm | अत्रुप्त आत्मा

@९२ - ९३ च्या त्या काळात दंगली आणि बारावीच्या परीक्षेच्या काळातच झालेले मुम्बई बॉम्बस्फोट आणि रोजचा वाचला जाणारा सामना आणि मार्मिक प्लस बादशाही मधलं जेवण असं काय काय लक्षात राहिलंय... >>> येस..येस...बादशाही वाल्यांनी जाहिर केलं की असे अनुभव लिहा.तर एक भलामोठ्ठा ग्रंथ होइल! :)

किसन शिंदे's picture

24 Aug 2013 - 12:57 am | किसन शिंदे

१०० :)

ए किस्ना, कापि करतोय्स होय रं... :-/

किसन शिंदे's picture

24 Aug 2013 - 1:04 am | किसन शिंदे

प्रतिसादाची वेळ पाहिलीस तर बर पडेल म्हणतो मी.

कोमल's picture

24 Aug 2013 - 1:19 am | कोमल

:D

कोमल's picture

24 Aug 2013 - 12:59 am | कोमल

100

शशिकांत ओक's picture

30 Aug 2013 - 1:31 am | शशिकांत ओक

मित्रांनो,
प्रो. खन्नांचा  खाना खजाना

टिळक रस्यावर या छोटेखानी फराळाच्या रामनाथीला भेट द्या व शेवटी पाटीचे चित्र काढायची परवानगी ही मिळवा.

बॅटमॅन's picture

30 Aug 2013 - 2:10 am | बॅटमॅन

एकदादोनदा गेलोय इकडे. पाटीइतके पदार्थ खास आजिबात नाहीत. ठीक आहेत.

उपास's picture

30 Aug 2013 - 2:27 am | उपास

तिखट पण शानसे पायजे.. मजा नाही आली मिसळीला.. आणि वरति बसलो होतो. दहा वेळा डोकं आपटलं.. :प

प्रभाकर पेठकर's picture

30 Aug 2013 - 3:36 am | प्रभाकर पेठकर

ह्यांच्या मिसळीला का नावाजलं जातं कळत नाही.

आप्पा's picture

30 Aug 2013 - 3:26 pm | आप्पा

ठाण्यातील नेवाळे खानावळ कुणाला आठवते का?

विटेकर's picture

30 Aug 2013 - 5:54 pm | विटेकर

बादशाही कटट्यासाठी नाव नोंदणी करावी ..
मला व्य नि पाठवावा आणि सी सी टू अत्रूप्त आत्मा ..
तारखेकडे ल़क्ष द्या .. थोडाच वेळ शिल्लक आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Aug 2013 - 9:29 pm | अत्रुप्त आत्मा

कट्ट्यासाठी नावनोंदणी >>> +१

हितेच ठरवू आणी धमाल उडवू ... ;)

नाव टाका ना रे............................! :-/ अगोबा... धन्या... मोदुक... लवकर या ना...! :) बाकिच्यांनी पण ;)

या वीकांतानंतर होणार असेल तर मय हूं...

अत्रुप्त आत्मा's picture

31 Aug 2013 - 12:33 am | अत्रुप्त आत्मा

७ तारखेला करायचा आहे! :)

बाकीचे आले तर! :-/

प्रचेतस's picture

7 Sep 2013 - 1:53 pm | प्रचेतस

कट्ट्याचा वृत्तांत????

विटेकर's picture

31 Aug 2013 - 8:31 am | विटेकर

आ ल. आर.वेलकम

पप्पुपेजर's picture

5 Sep 2013 - 8:09 am | पप्पुपेजर

मला कधी या मेस आवडल्या नाहीत पण मजबुरी का नाम गांधीजी म्हणत आम्ही तिथे जायचो :)

बॅटमॅन's picture

5 Sep 2013 - 1:08 pm | बॅटमॅन

कालच बादशाहीत गेलो होतो. घेवडा अन वांगी रस्सा. भरपेट जेवण झालं. आमटीची चव नेहमीप्रमाणेच जबरदस्त. पुणेरीपणाचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले पण रिसीव्हिंग एंडला मी नसल्याने णो पिराब्ळेम.

बाकी ही थाळी दिवसेंदिवस महाग होत चाललीये. ८०/- किंमत आहे आता. एक्स्ट्रा चपाती घेतली तर ६/- पर चपाती. त्यामुळे क्वचितच जाणे होते आता. त्यापेक्षा आमची मगरपट्ट्यातली रेड्डी'ज् आंध्रा मेस ७०/- मध्ये एकदम जबरी जेवण देते. क्वालिटी उत्तम, क्वांटिटी रावण स्टाईल आणि प्लस नो पुणेरीपणा.

मग "स्वीकार" काय वाईट आहे..? रविवारी दुपारी ११०/-

(स्वीकारचे जेवणही बहुदा आवडले असावे. :-) )

मोदकश्री, अर्थातच-स्वीकारचे जेवण मस्तच होते. :) रेड्डीज मेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दररोज जाणे होत असल्याने तिकडचा उल्लेख आला इतकेच. स्वीकारच्या जेवणाचाही तसा "बेशर्त स्वीकार" केल्या गेला आहे. ;)

लॉरी टांगटूंगकर's picture

6 Sep 2013 - 9:34 am | लॉरी टांगटूंगकर

मद्राशीच हैस.

gaikiakash's picture

6 Sep 2013 - 3:06 am | gaikiakash

९४-९५ साली स.प. च्या समोरच्या गल्लीत राहत असताना मी व माझे काही मित्र सकाळ व रात्रीचे जेवण बादशाही येथे घेत असू. पहिल्यांदा गेलो आणी मेंबरशिप विषयी चौकशी केली तेव्हां खुर्चीतील (अबोल) आजोबांनी एका पाटीकडे बोट केले ज्यावर लिहीले होते "कृपया मेंबरशिपविषयी चौकशी करू नये" त्यामुळे मग सकाळ/संध्याकाळ टोकन घेवून जेवू लागलो. त्यावेळी गाडी नसल्यामूळे इतर पर्याय नव्ह्ते. साधारण १५-२० असे झाल्यानंतर एक दिवस वामनराव म्ह्णाले "असे टोकनवर किती दिवस जेवणार, दुपारी येवून मेंबरशिप घ्या". त्यादिवसापासून मेंबर झालो. त्यानंतर पुढील १-१.५ वर्ष (सदाशिवपेठ सोडेपर्यंत जेवणाकरिता बादशाही was home away from home). त्या १-१.५ वर्षात व नंतरही (ब-याच वेळी जायचो तेव्हा) खुप छान अनुभव आला. एकदा एक मित्र आजारी होता (२-३ आठवडे असेल) व तो जेवायला जात नसे व आम्ही नवखे असल्याने खाडावगैरे माहित नव्हते, साधारण ४-५ दिवसांनी वामनराव विचारते झाले "तुमचा मित्र कुठे आहे?", मी सांगितले की तो आजारी आहे व त्यामुळे येवु शकत नाही, त्यावर ते म्ह्णाले "मग जेवणाचे काय करता?" मी म्हणालो की करतो आहे manage दुध-bread वर. ते म्हणाले तसं नको, डबा घेवून जा तो बरा होई पर्यंत आणी त्यानंतर अनेक दिवस सकाळ-संध्याकाळ त्याचा डबा आम्ही आणत असू. कधी-कधी कॉलेजमधून यायला उशीर झाला तरी कधीही "mess ची वेळ संपली जेवण मिळणार नाही" असे म्हणाले नाहीत. Feast च्या दिवशी किंवा काही खास पदार्थ असल्यात आग्रहकरून वाढत (फक्त मेंबर्सना) :) अश्या अनेक आठवणी आहेत, आज ह्या धाग्यामुळे त्या ताज्या केल्याबद्दल धन्यवाद!