आज आहे २१ जून. वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र. खरतरं दरवर्षीच ही तारीख येते आणि जाते. भारतातही काही प्रमाणात दिवस रात्रीच्या वेळेतील हा फरक जाणवतो मात्र भारत विषुवृत्ताच्याही एकदम जवळ नाही आणि भूमध्याच्याही फारसा जवळ नाही. दिवस रात्र किंवा ऋतूमानातील बदल याभागात म्हणजे विषुवृत्ताजवळ जेवढ्या प्रखरपणे जाणवतात किंवा भूमध्याजवळ फारसे जाणवतच नाहीत तसा प्रकार भारतात घडत नाही.
मध्यरात्रीचा सूर्य: नॉर्वे शाळेच्या पुस्तकात हा धडा वाचल्यपासूनच 'कसा असेल मध्यरात्रीचा सूर्य?' हे कुतुहल शालेय दिवसांपासून मनात होते. मॉस्कोमध्ये असल्यामुळे अगदी मध्यरात्रीचा सूर्य नसला ला तरी २१ डिसेंबर ला सर्वात सर्वात लहान दिवस अनुभवल्या नंतर (म्हणजे सकाळी दहा वाजता सूर्योदय होतो आणि दुपारी ४.५५ सूर्यास्त). यानंतर मात्र हळू हळू दिवस मोठा होत जातो. दिवस रात्रीच्या वेळातही मोठा फरक पडू लागतो फेब्रुवारी पासून हा फरक जाणवायला लागतो. साडे सहा- सात पर्यंत दिवस उगवून संध्याकाळी ६ पर्यंत दिवस मावळायला लागतो. मे महिन्यापासून तर हा फरक ठळक होतो आणि जून मध्ये जवळपास रात्री १०.३० पर्यंत लख्ख सूर्यप्रकाश आणि त्यानंतर ११.३० पर्यंत संधीप्रकाश असे चित्र बघायला मिळते.. मागच्या वर्षी बरोबर २१ जूनलाच काही कारणामुळे भारतवारी झाल्यामुळे तो दिवस मॉस्कोत अनुभवता आला नव्हता. आज मात्र अगदी कामेरा घेऊन पहाटेपासून हा दिवस अनुभवायचं ठरवलं होतं.
आजचा सूर्योदय होता सकाळी ४ वाजून ४४ मिनिटांनी आणि सूर्यास्त आहे रात्री १०. १८ मिनिटांनी म्हणजे तब्बल १७ तास ३४ मिनिटांचा दिवस. पहाटे चारच्याही आधी उजेडायला सुरुवात होते. हा दिवस अनुभवण्यासाठी आणि कॅमे-यात बंद करण्यासाठी लवकरच उठलो पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी काढलेल्या या फोटोत दिवस उजाडायला लागलेले सहज जाणवेल..
आता कोठे पहाटेचे ४.३० झाले आहेत. मात्र सर्वत्र छान उजाडले आहे.
सूर्योदय पहाटे ४.४४. माझ्या घरातून अगदी स्पष्ट सूर्योदय दिसत नाही हे मात्र खरं आहे.
सकाळी सव्वापांच पर्यंत कोवळे उन यायला सुरुवात झाली
लवकर उठलोच आहे तर सकाळचा फेरफटका घेण्यासाठी नेहमीपेक्षा लवकर सहा वाजतांच निघालो. आता सूर्यदेव चांगलेच वर आले होते. ही ६.१० पासून सात पंधरा पर्यंतची काही क्षणचित्रे.
१.
२.
३. रशियन संसद भवनः ड्यूमा सकाळी ६.५०
४. रॅडीसन हॉटेलची देखणी ईमारत. एखादी व्यक्ती एवढी सुंदर असते की तीचा फोटो नेहमीच अप्रतिम येतो मला तसंच काहीसं या इमारती बद्दल वाटतं. सकाळी ७.००
आता साधारण दिवस सुरु झाला होता. नियमित कामे वाट पहात आहेत परंतू दिवस मावळणार आहे मात्र खूप उशीरा. आज संध्याकळी परत आल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर पडुन आजचा दिवस मनात साठवावा असा विचार करून दैनंदिन कार्यक्रमाची सुरुवात केली.
-क्रमशः
प्रतिक्रिया
21 Jun 2013 - 9:56 am | चित्रगुप्त
छान प्रयोग. संध्याकाळचे-रात्रीचे फोटो पण टाका (ते फोटो आणखी कोणत्या जागेचे असल्यास जास्त चांगले.
रॅडीसन हॉटेलची इमारत ही मुळात अन्य कसली इमारत होती का? ती केंव्हा बांधली गेलेली आहे?
मास्कोमधील म्युझियम्स पैकी काही बघितली असल्यास त्याविषयी अवश्य माहिती द्यावी.
21 Jun 2013 - 12:01 pm | लाल टोपी
रॅडिसन ची इमारत स्टालिन च्या काळातील आहे. १९४५ नंतर मोस्को शहराला नवा चेहरा देण्यासाठी 'सेव्हन सिस्टर्स' हा उंच इमारती बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प त्याने राबवला होता मॉस्को स्टेट युनिव्ह्रसिटी, विदेश मंत्रालयाची इमारत आणि इतरही काही सारख्या दिसणा-या इमारती लक्ष वेधून घेतात. रॅडीसन चे मूळ नाव, 'हॉटेल उक्रेनिया' मे, १९५७ मध्ये उद्घाटन होऊन सुरु झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉटेलच होते. १९७६ पर्यंत जगातील सर्वात उंच होटेल म्हणून प्रसिध्द होते.
मॉस्कोतील म्युझियम विषयी नक्की लिहणार आहे. रात्रीचे फोटो टाकणार आहे. त्यासाठीच क्रमशः आहे
21 Jun 2013 - 9:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बराच मोठा दिवस म्हणायचा. लोक कंटाळतात की मौजमजा करतात आजच्या दिवशी ? मावळतीचे फोटो येऊ दया.
-दिलीप बिरुटे
21 Jun 2013 - 2:00 pm | लाल टोपी
सर,
लोक अजिबात कंटाळत नाहीत आला दिवस अत्यंत मनापासून जगतात हे लोक. विशेषतः कंटाळवाण्या हिवाळ्यानंतर आलेला उन्हाळा फारच चांगला साजरा करतात, हिवाळ्यात सतत ढगाळ हवामान, सतत पडणारा बर्फ, -२५ ते -३० पर्यंत जाणारे तापमान, अतिशय लहान दिवस, बाकी युरोपपेक्षा जास्त काळ रेंगाळणारा हिवाळा यामुळे अगदीच डोकं फिरवणा-या वातावरणानंतर आलेला उन्हाळा अगदी सोहळा साजरा केल्या सारखे जगतात. इथला उन्हाळा सुसह्य आहे.
21 Jun 2013 - 10:01 am | रोहन अजय संसारे
छान
21 Jun 2013 - 11:44 am | Mrunalini
छान.. इथे पण साधारण सकाळी ४.३० पर्यंत उजाडलेले असते आणि रात्री ९-९.३० ल सुर्य मावळतो. आता संध्याकाळचे पण फोटो टाका लवकर.
21 Jun 2013 - 12:13 pm | सौंदाळा
मस्त, मस्त मस्त!!
संध्याकाळ आणि रात्रीच्या फोटोंची वाट बघत आहे.
21 Jun 2013 - 1:01 pm | धनुअमिता
अप्रतिम आले आहेत फोटो.
21 Jun 2013 - 2:27 pm | विजुभाऊ
मी सध्या जोहान्स बर्ग मध्ये आहे. दक्षीण गोलार्धात. इकडे सध्या हिवाळा जोरात आहे.२१ जून इकडची सर्वात मोठी रात्र असते. सकाळी आठवाजता उजाडायला सुरवात होते. संध्याकाळी साडेचार ला दिवस मावळायला लागतो. सहा वाजेपर्यन्त मस्त अंधारून येते
21 Jun 2013 - 3:33 pm | मोदक
व्वा! सुंदर फोटो. धन्यवाद लालटोपी.
रॅडिसनची बिल्डींग बघून एंपायर स्टेट बिल्डींग आठवली.
21 Jun 2013 - 3:41 pm | अनिरुद्ध प
दुसर्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे.,नोर्वेच्या मध्यरात्रिच्या सुर्याची माहितीवजा दुवा दिल्यास उत्तम.
21 Jun 2013 - 8:33 pm | लाल टोपी
येथे पहा
22 Jun 2013 - 3:32 pm | अनिरुद्ध प
माहिती साठि आभार.
21 Jun 2013 - 4:17 pm | बॅटमॅन
जबरी. रशिया अजून मिपावर कुणी एक्स्प्लोरल्याचे माहिती नाही, तस्मात माझ्यापुरता तरि धिस इज अ फर्स्ट!!!
रॅडिसनची इमारत बघून लोमॉनॉसॉफ युनिव्हर्सिटीची आठवण झाली.
अवांतरः तिकडे रशियन भाषा शिकायला लागते की कसे? आय मीन लोकांचा जण्रल अॅटिट्यूड कसा आहे?
21 Jun 2013 - 10:18 pm | लाल टोपी
धन्यवाद,
हो भाषा येथे फारच मोठी समस्या आहे. स्थानिक बस पासून आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सूचनांपर्यंत सर्व रशियन भाषेत, सर्व व्यवहार रशियन मध्येच थोडेफार जुजबी रशियन आल्याशिवाय तरणोपाय नाही. लोक संमिश्र आहेत काही अतिशय मदत करणारे तर काही अतिशय आक्रमक (स्वभावाने)
21 Jun 2013 - 11:29 pm | बॅटमॅन
माहितीकरिता बहुत धन्यवाद :)
21 Jun 2013 - 4:37 pm | अमोल केळकर
छान माहिती :)
अमोल केळकर
21 Jun 2013 - 4:38 pm | अमोल केळकर
छान माहिती :)
अमोल केळकर
21 Jun 2013 - 4:46 pm | वारकरि रशियात
फोटो चान चान.
अगदी घरी आल्यासारखे वाटले ! माझ्याजवळही असेच २१ जून (आणि २१ डिसेंबर)चे फोटो आहेत.
(वेळेवर) सापडल्यास आणि वेळ झाला, तर इथेच डकवीन.
अवांतरः लाल टोपी, बाकीच्या रस्त्याची / परिसराची पण थोडक्यात माहिती द्या. बाकी रात्रीच्या फोटोत 'त्या' चर्चचा
फोटो आल्यास आगाऊ आभार !
21 Jun 2013 - 4:47 pm | वारकरि रशियात
फोटो चान चान.
अगदी घरी आल्यासारखे वाटले ! माझ्याजवळही असेच २१ जून (आणि २१ डिसेंबर)चे फोटो आहेत.
(वेळेवर) सापडल्यास आणि वेळ झाला, तर इथेच डकवीन.
अवांतरः लाल टोपी, बाकीच्या रस्त्याची / परिसराची पण थोडक्यात माहिती द्या. बाकी रात्रीच्या फोटोत 'त्या' चर्चचा
फोटो आल्यास आगाऊ आभार !
21 Jun 2013 - 5:01 pm | प्यारे१
आमच्याकडे पण आज सकाळी ५.४५ ला सूर्योदय झालेला. ८.३० पर्यंत लख्ख उजेड असतो.
21 Jun 2013 - 5:07 pm | मुक्त विहारि
छान लिहिले आहे..
21 Jun 2013 - 5:12 pm | गवि
जगाच्या कानाकोपर्यातून असे एखाद्या गोष्टीचा वेध घेणारे प्रतिसाद येतात तेव्हा आंतरजालीय जगाचा खरा अद्भुत अनुभव येतो.
उत्तम लेख आणि उत्तम प्रयोग.
असेच सर्व देशातल्या मेंबरांनी आपापला परिसर कॅमेर्यात टिपावा आणि स्थानिक अनुभव सर्वांनाच घेऊ द्यावा अशी इच्छा..
21 Jun 2013 - 10:30 pm | पाषाणभेद
२१ जून ला रशियात दिवस मोठा अन रात्र लहान म्हणजे लोकांची झोपण्याची फारच पंचाईत होत असणार ब्वॉ. त्यामानाने विजूभौंनी म्हटल्याप्रमाणे याच काळात जोहान्स बर्ग दक्षिण गोलार्धात उलट परिस्थीती असते. म्हणजे रात्रभर कितीही झोपा काढा. क्काय?
21 Jun 2013 - 11:11 pm | लाल टोपी
हो खर आहे रात्री ठीक आहे ११ .३० पर्यंत अंधरुन येतं पण पहाटे ४. ०० पासूनच चांगलं उजाड्तं .... पण जोहान्सबर्ग ची स्थिती २१ डिसेंबरला ईकडे असते.
22 Jun 2013 - 4:21 pm | पाषाणभेद
जावूद्या. प्रभुगुर्जी पाहिजे होते या प्रतिक्रियेसाठी.
22 Jun 2013 - 4:26 pm | लाल टोपी
यावर आमच्याकडून पास...
21 Jun 2013 - 11:27 pm | पैसा
फोटो सुरेखच आहेत! पण शेवट क्रमशः बघून बरं वाटलं.
21 Jun 2013 - 11:59 pm | विकास
मस्त फोटो आहेत. अजून माहिती आणि फोटो वेगवेगळ्या लेखांमार्फत अवश्य टाकावेत ही विनंती/आग्रह.
बॉस्टनमध्ये आज सुर्योदय पहाटे ५ वाजून ८ मिनिटांनी झाला तर सूर्यास्त संध्याकाळी ८:२५ ला असणार आहे. सधारण १५ तासांचा दिवस! आता उन्हाळा सुरू झाला!
22 Jun 2013 - 12:18 am | किलमाऊस्की
आज इथेही सकाळी ५:११ ला सुर्योदय झाला. आणि सुर्योदय रात्री ९:११ ला होणार आहे. आज १५ तास ५९ मिनीटांचा दिवस आहे. तसही आजकाल १५ तासांचा दिवस असतो.
22 Jun 2013 - 12:54 am | श्रीरंग_जोशी
या लेखनविषयाची संकल्पना आवडली. शेवटच्या चित्रातील इमारत फारच भव्य अन देखणी आहे.
रशियाविषयी अजून येऊद्या.
22 Jun 2013 - 1:00 am | श्रीरंग_जोशी
या लेखनविषयाची संकल्पना आवडली. शेवटच्या चित्रातील इमारत फारच भव्य अन देखणी आहे.
रशियाविषयी अजून येऊद्या.
22 Jun 2013 - 3:04 am | धमाल मुलगा
एव्हढा मोठा दिवस? आमच्यासारख्या निशाचरांचं अवघडच असेल. :) अर्थात, हिवाळ्याला विटलेल्या तिथल्या जनतेला मात्र हे वरदानासारखंच वाटत असेल म्हणा.
इकडं ह्या अमेरिकेतही हल्ली पंधरा वगैरे तासांचा दिवस असतोय राव. लफडं असं होतंय, की कामं करता करता कळतच नाही की किती उशीर झालाय. उगं खिडकीतून नजर बाहेर टाकली तर ऊन दिसतंय अन आपल्या इतक्या वर्षांच्या सवयीनं, 'हैऽ..अजून बक्कळ टैम है घरी जायला' असा विचार डोक्यात येतो अन वेळेचं भानच रहात नाही.
बाकी, ही मोठ्ठ्ठ्या दिवसाच्या फोटूंची कल्पना आवडली. :)
22 Jun 2013 - 6:22 pm | पाषाणभेद
हो पण जर फोटोत टाईमस्टँप असता तर खरोखर फोटो कोणत्या वेळी काढले ते कळले असते. अन्यथा इतर वेळेचेही फोटो असेच असू शकतात.
22 Jun 2013 - 7:45 pm | लाल टोपी
येथे मी जे अनुभवले, आपल्या सर्वांबरोबर शेअर करावे वाटले म्हणून येथे प्रसिध्द केले कदाचित तुम्हाला तेवढं विश्वासहर्य नसेल वाटलं तर हरकत नाही पण येथे सर्वांची दिशाभूल मी का करेन हे मला समजले नाही अगदीच पुराव्यानिशी शाबीत करायची वेळ आली तर करु शकेन पण सद्य स्थितीत त्याची गरज आहे असे मला वाटत नाही, तरीही आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद.
22 Jun 2013 - 8:30 pm | पाषाणभेद
लालजी तुम्ही फारच मनाला लावून घेतलेत बुवा. अहो तुमच्यावर कोण अविश्वास दाखवतो आहे? तुम्ही तर आम्हाला घरबसल्या रशियाची सफर घडवलीत. टाईमस्टंपचा विचार आज धमूच्या प्रतिक्रीयेनंतर माझ्या मनात आला. काल तर तसे मनातही नव्हते.
आता तुमचा धागा / फोटोंचा उद्देशच वेळेशी संबंधीत होता तर टाईमस्टँप खरोखर उपयोगी ठरला असता. (वरील प्रतिक्रीयेत हेच शब्द असते तर कदाचीत तुम्ही माझ्या वरील प्रतिक्रीयेतील वाक्यांनी नाराजही झाला नसता. माझेच चुकले. क्षमस्व.)
आणि काही जणांना कॅमेर्र्याचे इतके ज्ञान नसू शकते की टाईमस्टँप कसा सेट करावा. (आता या वाक्यालाही नकारार्थी घेवू नका. मी सर्वसाधारण व्यक्तींबद्दल बोलतोय. तरीही काही नाराजगी असेल तर दोन फटके मारा हवे तर मला.)
23 Jun 2013 - 12:29 am | लाल टोपी
अहो कॅमेरात वेळ आहे पण ती डिस्प्ले कशी करायची ते मात्र माहित नाही.. तरीपण आता २१ डिसेंबरच्या वेळी प्रयत्न करीन.
22 Jun 2013 - 2:53 pm | लाल टोपी
जगाच्या विविध भागातून प्रतिक्रिया देणा-यांचे, आपापल्या देशातील परिस्थिती कळवणा-या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
दुसरा भाग येथे डकवला आहे.
22 Jun 2013 - 2:54 pm | लाल टोपी
जगाच्या विविध भागातून प्रतिक्रिया देणा-यांचे, आपापल्या देशातील परिस्थिती कळवणा-या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
दुसरा भाग येथे डकवला आहे.