एक प्रेम दोन प्रेम तीन प्रेम चार!

इनिगोय's picture
इनिगोय in जनातलं, मनातलं
15 May 2013 - 1:31 am

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
शिडीवर चढता चढता सापानं गिळायचा गेम असतं.

याच नावाने प्रदर्शित झालेला मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा या विकांताला अखेर पाहिला. गेल्या काही काळात आलेला वैवाहिक नातेसंबंधावर उत्तम भाष्य करणारा हा दुसरा मराठी सिनेमा.

.

ही अनुश्री, केदार, डॉक्टर रोहित आणि प्रज्ञा या चौघांची गोष्ट आहे. अनुश्रीसोबत काही वर्षांचा संसार झाल्यानंतर दोन मुली आणि आई यांच्याकडे पाठ फिरवून केदार वेगळ्या मुलीच्या प्रेमात पडून चार वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेला आहे. अनुश्री तिचं दुखावलेपण, एकटेपण मनाच्या कोपर्‍यात टाकून ठामपणे मुलींना, सासूबाईंना, आईवडिलांना, आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःला सांभाळते आहे. फुलांचा व्यवसाय करते आहे. तर संशोधनात करियर करायची असल्याने रोहितवर मुलांची जबाबदारी टाकून प्रज्ञाने वैयक्तिक प्रगतीची वाट निवडली आहे. हे दोघं प्राचीच्या आग्रहाखातर कायदेशीररीत्या विभक्त झाले आहेत, मात्र आजही मैत्रीचं नातं टिकवून आहेत.

यांच्या आधीची पिढी आहे अनुश्रीच्या आईवडिलांची, सासूबाईंची. तिच्या सासूबाई सुनेशी प्रतारणा करणार्‍या मुलाला आयुष्याबाहेर काढण्याइतक्या तत्त्वनिष्ठ आहेत. तर आई आणि वडील हे अनुक्रमे 'केलंय ते निभवायला हवं' आणि 'आता या वयात मुलीचं दु:ख पाहायला लागू नये, तिला आधार देण्याची आता ताकद नाही, म्हणूनतरी तिने तडजोड करावी' अशा विचारांचे आहेत.

अनुश्रीची बहिण मात्र मोठ्या बहिणीच्या विस्कटलेल्या संसारामुळे लग्नाच्या बाबतीत काहीशी बॅकफूटवर गेलेली, सहजीवनाचा अर्थ शोधतेय. ज्याच्यासोबत तडजोड आणि व्यक्तीस्वातंत्र्य या दोहोंमध्ये संतुलन साधता येईल असा जोडीदार शोधतेय.

रोहित आणि अनुश्रीची भेट ही फिल्मी न वाटणार्‍या योगायोगाने होते. रोहितच्या हॉस्पिटलच्या आवारात बाग फुलवण्याच्या निमित्ताने दोघं भेटत राहतात. आधी मैत्री आणि मग त्याहून पुढे आकर्षण यातून दोघं एकमेकांना जाणून घेत राहतात. आपल्या एकत्र असण्यामध्ये नुसत्या मैत्रीच्या पलीकडच्या शक्यता आहेत असं दोघांनाही लक्षात येतं.

दोघंही आपल्या मनाशी आणि परिस्थितीशीही प्रामाणिक राहून एकमेकांशी याबद्दल बोलू पाहात असतानाच केदार अनुश्रीच्या आयुष्यात परत येतो. रोहित आणि अनुश्रीकडून नीटसपणे कळायला हवं ते अगदी धक्कादायक अपघातानेच तिच्या मुली, नवरा आणि सासूबाईंना कळतं. इतकी वर्षं सुनेच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणार्‍या सासूबाई यावेळी मात्र तिच्याशी बोलणं सोडतात. वाढत्या वयाची मोठी मुलगी तर आईवर थेट आरोप करते. अशा आक्रमक परिस्थितीत हे दोघं नेमकं काय करतात, स्वतःच्या भावनांना न्याय देतात की कुटुंबापुढे वैयक्तिक सुखाचा विचार बाजूला ठेवतात, याची उत्तरं म्हणजे हा सिनेमा.

अनेकविध भूमिकांद्वारे दीर्घ कारकीर्द गाजवून एखादी व्यक्ती जेव्हा दिग्दर्शनाकडे वळते, तेव्हा त्यातून तिने शिकलेल्या, खरंतर टिपलेल्या गोष्टी दिसून याव्या ही अपेक्षा सहजच निर्माण होते. आणि या सिनेमातून मृणाल कुलकर्णी यांनी ती अपेक्षा शंभर टक्के पूर्ण केलीय. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तीनही आघाड्या त्यांनी सांभाळल्यात.

या सिनेमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे, केदार वगळता यातल्या सगळ्या व्यक्तीरेखांनी आयुष्यातल्या कसोटीच्या प्रसंगी त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार जे सर्वात योग्य वाटले ते निर्णय घेतले आहेत. घरापेक्षा संशोधनातलं करियर मोठं वाटू लागल्यावर सगळ्या शक्यता आजमावून अखेर प्रज्ञाने वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा कायमच आदर करणार्‍या रोहितने सर्व प्रयत्न करून झाल्यावर घटस्फोटाच्या निर्णयाचा स्वीकार केलाय. तर अनुश्रीच्या सासूबाईंनी सुनेची फसवणूक ती कुटुंबाची फसवणूक असं मानून स्वतःच्या मुलाला घरापासून वेगळं काढलंय. अनुश्रीला तर निर्णयाचं स्वातंत्र्य मिळालेलंच नाही. तिचं भावविश्व केदार निघून गेला त्या क्षणापाशीच थांबलेलं आहे. किंबहुना अनुश्री ही व्यक्तीरेखा वाट्याला आलं ते गप्पपणे स्वीकारणारी अशीच आहे.

केदार ही व्यक्ती मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळी, म्हटली तर इम्पल्सिव्ह आणि म्हटली तर बेजबाबदारही आहे. संसाराच्या कोणत्याशा टप्प्यावर वेगळीच स्त्री आवडली म्हणून स्वतःची वाट बदलणारा हा पुरुष आहे. तितकाच तो मुलींच्या प्रेमाने हळवा होणारा बाप आहे, आईच्या दुराव्याने कासावीस होणारा मुलगा आहे. मात्र त्याच्या वागण्याचा बेस हा पूर्णतः 'तो स्वतः' हाच आहे. त्याच्या परत येण्यालाही कोणतंही ठोस कारण नसून केवळ ते त्याच्या सोयीचं आहे, म्हणून तो परत येतो आहे.

सगळ्या व्यक्तीरेखांना माणूस म्हणून वागायची दिलेली मूभा ही या सिनेमाची आणखी एक विशेष बाब. उदाहरणार्थ, केदार चुकला असताना स्त्री म्हणून त्याला शिक्षा करणारी त्याची आई, तो परत आल्यावर आई म्हणून विरघळते, सुनेनेही त्याला माफ करावं ही अपेक्षा करते. स्वतःच्या मुलीला तडजोड कर असं सांगताना अनुश्रीचे वडील 'हाच सल्ला मी मित्राच्या मुलीलाही दिला असता का? कदाचित तिथे जबाबदारी नसल्याने वेगळं वागलो असतो' असं स्वतःशी परखडपणे कबूल करतात. अनुश्री स्वतः केदारच्या परत येण्याची मूकपणे वाट पाहते आहे, पण तो अशा वेळी परत येतो, जेव्हा तिला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्त्व आणि सहजीवनातला आनंद या दोन्ही गोष्टी लाभत आहेत. संसार आणि स्वानंद यातून काय निवडावं याबाबत ती गोंधळून गेलीय.

सगळ्याच कलाकारांनी आपापल्या भूमिका समरसून केल्या आहेत. भावना व्यक्त करण्याच्या बाबतीत दबलीशी राहणारी, सगळ्या आघाड्यांवर तोंड देणारी अनुश्री मृणाल कुलकर्णी यांनी उत्तम साकारली आहे. परिस्थितीचा स्वीकार हाच जिचा स्वभाव आहे, अशी स्त्री 'आता मात्र निर्णय घ्यायला हवाच' या टोकाला येऊन पोचत असतानाचे तिच्यातले बदल लहानलहान प्रसंगातून दाखवले आहेत.

प्रज्ञा झालेली पल्लवी जोशी आणि केदारच्या भूमिकेतील सुनिल बर्वे यांना कथेमध्ये पूरक भूमिका आहेत, आणि दोघांनीही आपापल्या व्यक्तिरेखा समजून उभ्या केल्या आहेत. सतत संशोधकाच्या शिस्तीने वागणारी स्त्री आणि मुलांपासून, सदैव पाठिंबाच देणार्‍या जोडीदारापासून दूर गेलेली स्त्री ही प्रज्ञाची दोन रूपं असोत, किंवा आयुष्यात काय हवं आहे याबद्दल कोणताच नेमकेपणा नसलेल्या केदारचा स्वभाव असो, ही एखाद्याच प्रसंगातून ठळक झालीयेत.

मात्र सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे सचीन खेडेकरांचा डॉ रोहित फडणीस. जणू खेडेकरांना डोळ्यापुढे ठेवूनच हे रेखाटन केलं गेलं असावं, इतकं हे पात्र उत्तम साकारलं आहे. आपल्या बायकोला हवी ती स्पेस मिळवून देणारा, त्यासाठी नीट विचारांती पाठिंबा देणारा, कृती करणारा असा हा नवरा आहे. ती स्पेस मिळवण्याच्या नादात घराचं घरपण मोडून निघून गेलेल्या बायकोसाठी तो जितका अढळ आहे, तितकाच अनुश्रीबरोबरच्या नात्यातही दृढपणे, संयमाने उभा राहिला आहे. आपल्या आयुष्यात आता दुसरी व्यक्ती आलीय, हे प्रज्ञाला सांगत असताना सचीन खेडेकरांनी आणि पल्लवी जोशी यांनी तो पूर्ण प्रसंगच तोलून धरला आहे! या प्रसंगातून त्यांच्यातलं नवराबायकोचं नातं संपलं तरी परस्परांबद्दलचा आदर संपला नाहीय, हे उमगून जातं.

.

कुटुंबासाठी करायची असलेली तडजोड आणि स्वतःला पूर्ण वाव देण्याची धडपड, या दोन परस्पर विरोधी घटना सर्वात जास्त परिणाम करत असतील तर तो नवरा बायको या नात्यावर. अशावेळी एकाने आपली वाट निवडल्यानंतर दुसर्‍याने तसेच ताटकळत राहावे, की आनंदी होण्याचा अधिकार स्वतःलाही बहाल करावा, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची वेळ येते, तेव्हा सगळे मुखवटे बाजूला ठेवावे लागतात. आदर्श वागण्याचे, त्यागाचे, पडतं घेण्याचे.. सगळेच.

एका मोडकळीला आलेल्या लग्नाला दुसरं लग्न हाच पर्याय असावा का? सुदृढ अशी मैत्रीदेखील हवी ती ऊर्जा पुरवायला पुरेशी ठरू शकते? विवाहित व्यक्तीच्या आयुष्यात अशा मैत्रीचं काय स्थान असू शकतं? किंबहुना अशी भिन्नलिंगी व्यक्ती, जी आयुष्याला संपूर्ण करते, तिच्यासोबतच्या नात्याला नाव द्यायला हवंच का? असे अनेक प्रश्न सोडवावे लागतात.

'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' ही त्या प्रश्नांची घेतलेली दखल आहे.

चित्रपटप्रकटनसमीक्षा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

15 May 2013 - 1:56 am | श्रीरंग_जोशी

एका आव्हानात्मक विषयावरील चित्रपटाबद्दल परीणामकारकपणे लिहिलय.

चित्रपट बघण्यास उत्सूक आहे.

मोदक's picture

15 May 2013 - 2:18 am | मोदक

+१ हेच बोल्तो...

अत्रुप्त आत्मा's picture

15 May 2013 - 4:37 am | अत्रुप्त आत्मा

+2
यहिच कहता है|

बाकि मृणाल तैं नी त्यांच्या पठडितलाच विषय निवडला असं दिसतय. तरि शिनुमा पाहिल्या जाइलच. :-)

अवंऽऽतिकाऽऽऽ आठवली का हो बुवा? ;)

ही बघा 'प्रेम..'ची पठडी.. :)

धनुअमिता's picture

15 May 2013 - 11:34 am | धनुअमिता

+ ३
सहमत

सस्नेह's picture

15 May 2013 - 1:48 pm | सस्नेह

उत्तमच झालंय परीक्षण.

उपास's picture

15 May 2013 - 2:20 am | उपास

गुंतागुंत खूप छान उलगडलेय परिक्षणात.. हे अशा शब्दात लिहिणं आणि पोहोचवणं नक्कीच सोप्प नाही! आवडलच..

मूकवाचक's picture

15 May 2013 - 11:24 am | मूकवाचक

+१

अर्धवटराव's picture

15 May 2013 - 3:35 am | अर्धवटराव

कथा, मानवी मनाची गुंतागुंत, नाते संबंधातील आडवळणे, अभिनय, चित्रपट... सगळ्या अँगलनी आस्वाद घ्यावा म्हणुन हे विषय चांगले आहेत. पण त्यातुन निष्कर्श काढण्याच्या भानगडीत पडु नये. कारण या सर्व सव्यापसव्याला मनाची "आय वॉण्ट सम चेंज" ही एकमेव भुमीका कारणीभूत आहे. असो.

अर्धवटराव

दोघांपैकी एकाच्या बाबतीत 'बदल हवा' हे कारण असतं तेव्हा दुसऱ्या व्यक्तीची नाईलाजाने ओढाताण ठरलेली, नाही का? अशावेळी दुसऱ्या व्यक्तीने काय करायला हवं?
या सिनेमाची गोष्ट ही त्या दुसऱ्याची गोष्ट आहे. पहिल्याच्या वागण्याचं समर्थन नक्कीच नाही.

अर्धवटराव's picture

15 May 2013 - 9:04 pm | अर्धवटराव

माझा प्रतिसाद चित्रपटाचे कथानक, त्यातला पात्रांना मिळणारा न्याय-अन्याय, तुमच्या मनात ते कसं उतरलं आणि तुमच्या लेखणीतुन ते कसं उतरलं याबद्दल नाहिच मुळी. चित्रपट कथेच्या अनुषंगाने मी केवळ एक पुस्ती जोडली... कि चित्रपटाचा शेवट "दि अ‍ॅण्ड" नसुन "पुढे चालु... अनंत काळ" असा आहे.

अर्धवटराव

सस्नेह's picture

15 May 2013 - 4:08 pm | सस्नेह

पण त्यातुन निष्कर्श काढण्याच्या भानगडीत पडु नये.

धागाकर्ती अशा काही भानगडीत पडलीय असे दिसत नाही. a

कारण या सर्व सव्यापसव्याला मनाची "आय वॉण्ट सम चेंज" ही एकमेव भुमीका कारणीभूत आहे.

मला वाटते चित्रपट म्हणजे याच सव्यापसव्याचे चित्रण आहे...
बाकी चालुदे....

अर्धवटराव's picture

15 May 2013 - 9:06 pm | अर्धवटराव

>>धागाकर्ती अशा काही भानगडीत पडलीय असे दिसत नाही.
-- नाहिच पडली धागाकर्ती त्या भानगडीत. मी माझ्या खिश्यातुन ति पुस्ती जोडली :)

>>मला वाटते चित्रपट म्हणजे याच सव्यापसव्याचे चित्रण आहे...
-- अर्थात. आणि त्या चित्रणाचे परिक्षण देखील उत्तम जमलय.

अर्धवटराव

चित्रपटाची समिक्षा मस्त झालीये. चित्रपट जालावर येईल तेंव्हा पाहीन.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 May 2013 - 9:15 pm | निनाद मुक्काम प...

समस्त अनिवासी लोकांच्या तर्फे रेवती आज्जी ने प्रतिसाद दिला आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

15 May 2013 - 5:44 am | लॉरी टांगटूंगकर

उत्तम लिहिलंय, निवांतपणे बघायला हवा.

अश्या कथा पाहताना एकदम टोकाची मते आपल्यामध्ये असतात. पांढर्‍याला पांढरं, अन काळ्याला काळ म्हणनं रंगांच्या बाबतीत शक्य आहे, पण माणसांच्या बाबतीत नाही हे सांगताना इनिगोयच्या लिखाणातल जबरदस्त शब्द सामर्थ्य कौतुकास्पद!!
उत्तम परिक्षण. पिक्चर पाहिला जाईल.

इनिगोय's picture

15 May 2013 - 8:22 am | इनिगोय

या सिनेमातली माणसं अशा ठोकळेबाज साच्यात बसवायचं कुलकर्णी यांनी पूर्णपणे टाळलंय, म्हणूनच ते खऱ्या आयुष्याच्या जास्त जवळ वाटतं.

रोहित हे पात्र अतिशय स्टेबल दाखवलंय. मात्र एका प्रसंगात अनुश्रीने परिस्थिती हातात घेऊन निर्णय घ्यायला हवा असताना तिच्या सवयीने ती निमूटच राहते, तिथे त्याचाही तोल सुटलेला दाखवलाय. it's so human. नंतर तोच तिला तिने नेमकं काय करायला हवं आहे हे इतकं सुरेख समजावून सांगतो. हाही प्रसंग खेडेकरांनी उत्तम वठवलाय.

चित्रगुप्त's picture

15 May 2013 - 7:12 am | चित्रगुप्त

चित्रपटाचा उत्तम परिचय करून दिलेला आहे.
या परिचयामुळे हा चित्रपट बघायलाच हवा, असे वाटले. आभार.

चित्रपट परीक्षण अतिशय आवडलं.

उदय के'सागर's picture

15 May 2013 - 9:05 am | उदय के'सागर

खुप छान परिचय आणि परीक्षण. बर्‍याच दिवसांनी पल्लवी जोशी चा सिनेमा आला आहे म्हणून सिनेमा बघायचा होताच, पण मनावर घेतलं नव्हतं, पण आता हे परीक्षण वाचून नक्कीच बघावा लागेल.

चित्रपट परिक्षण अतिशय सुरेख.
अर्थात भावनाशील चित्रपट किंवा एकंदरीतच हल्लीचे मराठी चित्रपट आवडत नसल्याने पाहिला जाईलच हे सांगू शकत नाही.

:)
पण हल्लीचे मराठी खूप वेगवेगळे विषय हाताळतायत, असं नमूद करू इच्छिते. गेल्या वर्षभरात आलेले मसाला, बदाम राणी गुलाम चोर, शाळा, आयना का बायना, बालक पालक असे इंटरेस्टिंग आणि मुख्य म्हणजे भावनप्रधान नसलेले चित्रपट जरूर पाहावे असे आहेत.

प्रचेतस's picture

15 May 2013 - 10:04 am | प्रचेतस

खरे आहे.
यापैकी शाळा, मसाला पाहिला होता. शाळा चित्रपट चांगला असूनही सुजय डहाके कादंबरीला न्याय देण्यात कमी पडलेत असे खेदाने म्हणावेसे वाटते. मसाला चित्रपटातील ग्रामीण बाजाचे संवाद अजिबातच ग्रामीण वाटत नाहीत. आयना का बायनाचे तर नावच पहिल्यांदा ऐकतोय; म्हणजे तसे आधी ऐकले होते पण चित्रपट हिंदी असावा असे वाटले.
बालक पालक मात्र पाहिला नाही.

शाळा चित्रपट अगदीच फसला होता, असे मला वाटले.

आदूबाळ's picture

15 May 2013 - 11:13 am | आदूबाळ

अहो, तुम्ही "हमने जीना जीना सीख लिया" नावाचा (म्हणे) "शाळा" वर आधारित शिणुमा पाहिला नाही म्हणून असं म्हणताय. त्याचा कोण तो डायरेक्टर होता त्याच्या तुलनेत सुजय डहाके स्पीलबर्ग आहे.

गणामास्तर's picture

17 May 2013 - 5:33 pm | गणामास्तर

अहो त्या अति भयानक शिनेमाचा डायरेक्टर मिलिंद उके होता..त्या पिच्चर मागील हिष्ट्री लै वेगळी
आहे..सांगेन परत कधी तरी.

शक्य आहे, सिनेमा चांगला झाला का वाईट याबद्दल दुमत असू शकेल.

पुस्तकावरून केलेल्या सिनेमाच्या बाबतीत त्या दोहोंची तुलना करू नये, असं मला वाटतं. दोन्ही माध्यमं वेगवेगळी आहेत. पुस्तक नुसतं लिहून पूर्ण होत नाही, वाचूनच पूर्ण होतं. त्यात वाचकाची कल्पनाशक्ती अ‍ॅड झाल्यानंतरच ते वाचकाच्या समोर कथानक उभं करू शकतं. त्यामुळे प्रत्येक पुस्तक प्रत्येक वाचकाला वेगवेगळ्या तर्‍हेने अपील होतं. सिनेमा मात्र बाय इटसेल्फ संपूर्ण असतो. प्रेक्षकाच्या कल्पनाशक्तीला त्यात वाव नसतो. ती लेखक- दिग्दर्शकाचीच कमेंट असते.

(गुलजारचे सिनेमे याला अपवाद, ते आवाडण्या-नावडण्यात बघणार्‍याच्या आकलनाचा, अनुभवाचाही वाटा असतो.. असं माझं मत!)

उपास's picture

15 May 2013 - 7:55 pm | उपास

बरेचदा लोकं पुस्तक आणि चित्रपट ह्या माध्यमांची तुलना करतात, ते बर्‍याचदा अस्थायी असू शकतं. चित्रपटात वेळेच्या बंधनात (तीन तास/ अडीच तास..) दिग्दर्शक त्याला जे आणि जसं दाखवायचं ते दाखवतो, तुम्हाला ते तसंच वेळेच्या बंधनात राहून बघायचं असतं. पात्र जिवंत असली तरी ती आपल्यावर इतकी आदळू शकतात की तुम्ही विचार करेपर्यंत/ समजून घेईपर्यंत पुढचा सिन येतोच. थोडक्यात तुम्हाला एखादा चित्रपट एक एक सीन वेगळा काढून बघता येतोच असं नाही.
पुस्तकाचं मात्र तसं नाही. तुम्ही तुम्हाला हवं ते/ हव्या त्या वेगात, तुमच्या स्वतःच्या अनुभवविश्वाची रमत गमत तुलना करत पुस्तक पुढे वाचत नेऊ शकता. त्यामुळे विषय जितका तुमच्या स्वतःच्या आयुष्याशी तुलना करण्यासारखा असेल तितकं पुस्तकं जवळच वाटत जाईल, कारण पुस्तक तुम्हाला हवं ते स्वातंत्र्य (स्पेस) देतं वाचताना!
'शाळा'च्या बाबतीत नेमकं हेच आहे, त्यामुळे पुस्तक सरस ठरलं तर त्यात विशेष नाही.

उदय के'सागर's picture

15 May 2013 - 10:28 am | उदय के'सागर

''आयना का बायना'' हा सिनेमा अतिशय 'हीन' दर्जाचा आहे असे खेदाने आणि संतापाने म्हणावे वाटते. ह्याच विकांताला तो झी मराठी वर पहिला आणि खुप निराशा झाली. (मुळात चिडचिड झाली कारण ह्या चित्रपटासाठी मी माझे बाकीचे सगळे कामं बाजूला ठेवले, घरच्यांचा ओरडा खाल्ला... आणि हातात काय पडले तर एक वाईट चित्रपट).

मात्र, बाकी नमूद केलेल्या चित्रपटांशी १००% सहमत!

@वल्ली - तुम्ही ह्या (''आयना का बायना'') चित्रपटाचे नावच नाही ऐकले हे उत्तमच, चुकूनही बघू नका हा एक सल्ला!

इनिगोय's picture

15 May 2013 - 10:52 am | इनिगोय

आयना का बायना मी पाहिलेला नाही, त्यामुळे चित्रपट कसा आहे, याची कल्पना नाही.

'प्रेमाची गोष्ट' हाही वरच्या यादीत नोंदवण्यासारखा एक चांगला सिनेमा होता. मात्र त्याची हाताळणी जरा गंडली, असं वाटलं होतं.

अक्षया's picture

15 May 2013 - 9:50 am | अक्षया

नाजुक विषयावरचा हा चित्रपट पण तितक्याच प्रभावी पणे आणि कुशलतेने केलेले परीक्षण.
व्यक्तीरेखांचे बारकावे छान टिपलेत.
नक्कीच बघणार हा चित्रपट.:)

अभ्या..'s picture

15 May 2013 - 10:04 am | अभ्या..

बरं केलस इन्नातै. चित्रपटाचं परिक्षण भारी लिहून दिलेस.
आता बिल्कुल बघणार नाही.

इनिगोय's picture

15 May 2013 - 10:18 am | इनिगोय

आँ! हे मृणाल कुलकर्णींना दाखवू नको! :P

पिलीयन रायडर's picture

15 May 2013 - 11:13 am | पिलीयन रायडर

मस्त लिहीलय परीक्षण!
आता बघायला हरकत नाही हा पिक्चर..

उत्तम परिक्षण पण चित्रपट कंटाळ्वाणा होतो.नभोनाट्य ऐकल्या सारखा वाटतो.डोळे मिटुन पाहिला तरी काही मिस करतो आहोत अस वाटत नाही. उदा: रोहितच्या हॉस्पिटलच्या आवारात बाग फुलवण्याच्या प्रसंगात बाग सुद्धा निट दाखवली नाही.

सौंदाळा's picture

15 May 2013 - 11:31 am | सौंदाळा

तुमचे चित्रपट परिक्षण आवडले.
बायकोचा बालक-पालक बघण्याचा हट्ट धुडकावुन मल्टिप्लेक्सात जाऊन पुणे-५२ हा भयाण चित्रपट बघितल्यापासून सिनेमाग्रुहात जाऊन चित्रपट बघण्याचा धसका(दोघांनीही)घेतला आहे. टिव्हिवर लागेल तेव्हा वेळ असला तर जरुर बघण्यात येईल.

नंदन's picture

15 May 2013 - 11:38 am | नंदन

आवडला. संधी मिळताच पाहण्याच्या यादीत या चित्रपटाची भर घातली आहे.

स्पा's picture

15 May 2013 - 11:40 am | स्पा

ओघवते परीक्षण आवडले .

पण वल्ली म्हणतो तसे आम्हास असले "भावनिक गुंतावळे" पाहण्यात अजाबात रस नसल्याने आमचा पास !!

पैसा's picture

15 May 2013 - 11:53 am | पैसा

मृणाल कुलकर्णीकडून अशाच सुजाण चित्रकृतीची अपेक्षा होती. सवड मिळताच नक्की बघेन.

रुमानी's picture

15 May 2013 - 12:09 pm | रुमानी

मस्त लिहीलय परिक्षण...!
पहिल्य दिवशिच पिक्चर जाउन बघितला होत. केवळ मृणाल कुलकर्णी साठी,
विषय मात्र चांगला निवडला आहे तिने . . एका स्त्रीच्या भवना छान मांडल्यात तिने, तसेच सचिन खेडकरा आणी मृणाल यांच्या नात्यात होणारी घुस्मट हि खुप छान मांडलीये. तसे काम सर्वानिच छान केलय.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 May 2013 - 9:28 pm | निनाद मुक्काम प...

केवळ मृणाल कुलकर्णी साठी,
ती कुलकर्णी होण्याच्या पूर्वी स्वामी मध्ये पहिल्यांदा पहिली तेव्हाच माझ्या हृदयाची
स्वामिनी झाली होती.
सौंदर्य व बुद्धिमत्तेचा मिलाफ त्याला संस्कारक्षम व्यक्तिमत्त्वाचे कोंदण त्याला पुणेरी पैलू पडलेले .
क्या बात हे
तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी हा सिनेमा पहिला जाईल.

प्यारे१'s picture

15 May 2013 - 1:15 pm | प्यारे१

परिक्षण आवडले. दोन- तीनदा वाचले तेव्हा नक्की कोण कुणाबरोबर आहे हे समजले. म्हणजे आधी नावांचा गोंधळ. असो. :)

बाकी मृणाल 'देवांची' आणि माधवरावांची 'रमा' असल्यापासून आवडायची. ' बन्नो तेरी....' वाली विको ची जाहिरात मस्तच.
नवीन मालिकांमधली मधली तिची 'गुंतता हृदय हे' मधली नायिका आणि मुळात मालिका सतीश राजवाड्यांची असल्याने आवडली.

michmadhura's picture

15 May 2013 - 1:33 pm | michmadhura

हा चित्रपट पहायला नक्की आवडेल.

वा. अगदी नीट तपशीलवार पाहिला आहेत चित्रपट. त्यामुळे केवळ चित्रपट परिचय असा लेख न होता, काहीसा रसग्रहणात्मक आणि तरीही स्पॉईलर्स नसलेला उत्तम लेख झाला आहे. हा लेख प्रत्यक्ष चित्रपट बघताना काहीसा गाईडलाईन देणारा आणि आनंद वाढवणारा ठरेल.

:-)

काहीकाही सिनेमे इतके सुरेख बनतात, की त्यातल्या एकाएका प्रसंगावर खूपसं बोलता येऊ शकतं. आणि म्हणूनच मग किती सांगायचं, कुठे थांबायचं हे ठरवावं लागतं.

तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे असणारं 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमाचं मटामधलं मुकेश माचकर यांनी केलेलं रसग्रहण सहज आठवलं. अजूनही संग्रही आहे ते.

सूड's picture

15 May 2013 - 2:05 pm | सूड

मृणाल कुलकर्णीने दिग्दर्शन केलंय म्हणून तरी पाहीन असं वाटतंय.

दखल घेण्याजोगा आहे.

कारण या सर्व सव्यापसव्याला मनाची "आय वॉण्ट सम चेंज" ही एकमेव भुमीका कारणीभूत आहे.

आणि

कथा, मानवी मनाची गुंतागुंत, नाते संबंधातील आडवळणे, अभिनय, चित्रपट... सगळ्या अँगलनी आस्वाद घ्यावा म्हणुन हे विषय चांगले आहेत. पण त्यातुन निष्कर्श काढण्याच्या भानगडीत पडु नये.

कारण निष्कर्श निघूच शकत नाही. फक्त चर्चा होईल जिचा आपल्या रोजच्या जगण्याला, विचारांना दिशा मिळायला काही एक उपयोग नाही.

ओशोंचं आकाशावर लिहून ठेवावं असं एक वाक्य आहे :

`मन का स्वभावही कुछ ऐसा है, उसे जो मिल गया वह व्यर्थ हो गया!'

अनुश्री आणि केदार : अनुश्रीनं स्वतःच्या अक्कल हुशारीनं केदारसारखा उडनखटोला निवडलाय. आता कुणाला बोलणार? बरं प्राप्त परिस्थितीत काही मार्ग नाही पण संधी मिळताच रोहितबरोबर जमवायचा चान्स सोडत नाही.

थोडक्यात काय तर अनुश्रीसाठी केदार आणि केदारसाठी अनुश्री व्यर्थ आहेत कारण ते उपलब्ध उपभोगू शकले नाहीत. एकमेकांशी सूर जुळवू शकले नाहीत. केदारला पश्चात बुद्धी होते तोपर्यंत अनुश्रीचं रोहितबरोबर चालू झालं आहे.

रोहित आणि प्राची : संशोधनात करियर करण्यासाठी डिवोर्स कशाला घ्यायला हवा? म्हणजे वरून काहीही उच्च कारण दिसो, ते एकमेकांना कंटाळलेले आहेत. `मात्र आजही मैत्रीचं नातं टिकवून आहेत'. ही निव्वळ धूळफेक आहे. थोडक्यात दोघांनाही आपल्या निर्णयावर विश्वास नाही म्हणून ते परतीचा मार्ग मोकळा ठेवून आहेत. आणि दोघंही भंपकपणाचा कळस आहेत. कारण प्राचीला तिच्या आवडीचं `प्रेमपात्र' मिळालं नाही (इतकंच) पण रोहित संधी मिळताच अनुश्रीशी जमवून मोकळा झाला आहे.

अर्थात निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक यांचा वकूब तो काय? तर सिनेमाची कॅच लाईन पाहा :

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
शिडीवर चढता चढता सापानं गिळायचा गेम असतं.

प्रेम म्हणजे एकमेकांप्रती संपूर्ण कमीटमेंट. दुसर्‍याला हरेक परिस्थितीत साथ देणारी एकसंध चित्तदशा. प्रेम म्हणजे मनाच्या `जो मिल गया वह व्यर्थ हो गया' या स्वभावावर मात करणं. सुरूवातीलाच योग्य निर्णय घेणं आणि मग उपलब्धाला आपल्या साथीदाराबरोबर नि:सीम कृतज्ञतेनं उपभोगणं.

प्यारे१'s picture

15 May 2013 - 2:16 pm | प्यारे१

बोला पुंडलिक वरदे हाआआआआआआआआआरी विठठल......!
त्या ' टिकल्या वर्क' वाल्या साड्यांसाठी एक 'टीपिकल' शब्द आहे. त्या हो उन्हात चमकतात त्या! कुणाला माहिती आहे का? ;)

हा आक्खा प्रतिसाद अवांतर आहे. हा म्हणजे माझा. :)

पैसा's picture

15 May 2013 - 2:43 pm | पैसा

विट्ठलाचं नाव काढू नको रे, मला बडव्यांची आठवण येते! :D :P :-/

यशोधरा's picture

15 May 2013 - 4:24 pm | यशोधरा

:D

नमस्कार श्री.प्यारे, अल जिरा यात सुद्धा पोहोचल्या का त्या ' झ्ग्गा मग्गा मल्ला बग्गा' साड्या ? तिकडं साडीचा पन्ना अंमळ मोठा असतो का हो ?

स्पंदना's picture

15 May 2013 - 6:02 pm | स्पंदना

त्याला बादला वर्क म्हणतात.
आता भावड्या तूम्हाला ते म्हणायला जमणार आहे का? नाही तर तूम्ही बादलीवर जाणार, जास्तीत्जास्त बदला.

प्यारे१'s picture

15 May 2013 - 6:17 pm | प्यारे१

गावाकड कदी गेल्तासा ? लई दिसात चक्कर मारली नसल्यास येक डाव याच जाऊन. ;)
आमा गड्यास्नी ठावं हाय ते तुमाला म्हायती न्हाय व्हय? :)

बाकी आमी बादली वापरत नसतोय. पोहरा वापरतो.
पन काये ना, आडातच नाय तर पोहर्‍यात येनार कुठून/?

@ ५० राव, अजून मापं काढायला सुरु केलेलं नाही. त्यामुळे पन्ना नीट ठाऊक नाही.

@ इनिगोय,
शतकी धाग्यासाठी 'मी माझेच आभार मानतो/ते'. त्यानंतर 'कसचं कसचं' वगैरे माझं मीच म्हणा.
किर्पा प्राप्त होगी. ;)

इनिगोय's picture

15 May 2013 - 3:00 pm | इनिगोय

जबरदस्त!

तुमच्या संपूर्ण प्रतिसादावरून तुम्ही सिनेमाचा प्रोमोदेखील पाहिलेला नाही हे लक्षात आणून दिलंत, हे बरं केलंत.

पहिल्या दोन ओळी सिनेमाची कॅचलाईन म्हणून कुठे वाचल्यात हे जाणून घ्यायचं जबरदस्त कुतूहल आहे.

संजय क्षीरसागर's picture

15 May 2013 - 4:58 pm | संजय क्षीरसागर

तुमच्या संपूर्ण प्रतिसादावरून तुम्ही सिनेमाचा प्रोमोदेखील पाहिलेला नाही हे लक्षात आणून दिलंत, हे बरं केलंत

फुकट सुद्धा पाहणार नाही.

पहिल्या दोन ओळी सिनेमाची कॅचलाईन म्हणून कुठे वाचल्यात हे जाणून घ्यायचं जबरदस्त कुतूहल आहे.

ती परिक्षणाची सुरुवात आहे म्हणून मला तसं वाटलं. पण तो एकूण चित्रपटाचा आशय असेल, तुमचं मत असेल किंवा चित्रपटातलं गाणं असेल, काहीही असलं तरी ते प्रेम नाही.

प्यारेभौ लिहायला कचवचले असतिल पण मी म्हणते आक्ख्खा प्रतिसादच अवांतर आहे. संक्षींसारख्या मुद्देसूद अन पट्टीच्या वादपटूकडून इतकी साधी चूक अपेक्षित नव्हती.

अनुश्री आणि केदार : अनुश्रीनं स्वतःच्या अक्कल हुशारीनं केदारसारखा उडनखटोला निवडलाय. आता कुणाला बोलणार? बरं प्राप्त परिस्थितीत काही मार्ग नाही पण संधी मिळताच रोहितबरोबर जमवायचा चान्स सोडत नाही.
थोडक्यात काय तर अनुश्रीसाठी केदार आणि केदारसाठी अनुश्री व्यर्थ आहेत कारण ते उपलब्ध उपभोगू शकले नाहीत. एकमेकांशी सूर जुळवू शकले नाहीत. केदारला पश्चात बुद्धी होते तोपर्यंत अनुश्रीचं रोहितबरोबर चालू झालं आहे.
रोहित आणि प्राची : संशोधनात करियर करण्यासाठी डिवोर्स कशाला घ्यायला हवा? म्हणजे वरून काहीही उच्च कारण दिसो, ते एकमेकांना कंटाळलेले आहेत. `मात्र आजही मैत्रीचं नातं टिकवून आहेत'. ही निव्वळ धूळफेक आहे. थोडक्यात दोघांनाही आपल्या निर्णयावर विश्वास नाही म्हणून ते परतीचा मार्ग मोकळा ठेवून आहेत. आणि दोघंही भंपकपणाचा कळस आहेत. कारण प्राचीला तिच्या आवडीचं `प्रेमपात्र' मिळालं नाही (इतकंच) पण रोहित संधी मिळताच अनुश्रीशी जमवून मोकळा झाला आहे.

इथे संक्षी यांचा कथेवर अन त्यातल्या व्यक्तिरेखांवर आक्षेप आहे असे वाटते. याचा परिक्षणाशि काय संबध ? यावर तुम्ही स्वतंत्र लेख लिहू शकता. चित्रपट न पाहता परिक्षणावर टीका करणे म्हणजे फोटो खराब आल्याबद्दल फ्रेममेकरवर टिप्पणी केल्यासारखे होईल.

प्रेम म्हणजे एकमेकांप्रती संपूर्ण कमीटमेंट. दुसर्याीला हरेक परिस्थितीत साथ देणारी एकसंध चित्तदशा. प्रेम म्हणजे मनाच्या `जो मिल गया वह व्यर्थ हो गया' या स्वभावावर मात करणं. सुरूवातीलाच योग्य निर्णय घेणं आणि मग उपलब्धाला आपल्या साथीदाराबरोबर नि:सीम कृतज्ञतेनं उपभोगणं.

....खरं आहे. हे आदर्श प्रेम. पण मला वाटते, चित्रपटात ‘कसं असावं ‘ याचे चित्रण केले नसून प्रत्यक्षात ‘कसं असतं’ ते दाखवले आहे. त्यावर आदर्शपणा लादण्याचा जुलूम तुम्ही का करता बॉ ?
चित्रपटाची कथा/ थीम पटली नसल्यास स्वतंत्र धागा लिहून खंडन करावे.
परिक्षणाविषयी बोलायचे ते इथे बोलावे.

त्याचं काये ना स्नेहातै, घडा असतो ना घडा, तो एकदा भरला- म्हन्जे कशानंही भरु दे, पाण्यानं, मातीनं, दगडांनी अथवा सोन्यानं - की त्यात नवीन काही भरता येत नाही. नवीन काही टाकायचं असलं तर आधीचं काढायला हवं ना!
आधीचं काढायची कुणाचीच तयारी नसते. नवीन काही ओतायचा उपयोग होत नाही.
त्यामुळं सध्या आम्ही 'शांत' असतो. ;)

घडा असतो ना घडा, तो एकदा भरला- म्हन्जे कशानंही भरु दे, पाण्यानं, मातीनं, दगडांनी अथवा सोन्यानं - की त्यात नवीन काही भरता येत नाही.

असहमत्...कितीही भरले तरी बियरसाठी जागा शिल्लक राहते असे बोधकथेत ऐकल्याचे आठवते.

बियरसाठी जागा शिल्लक असली म्हंजे वन काण्ट बेअर टु फिल इट विथ एनीथिंग एल्स असेही वाचल्याचे आठवतेय.

प्यारे१'s picture

15 May 2013 - 4:19 pm | प्यारे१

>>>बोधकथेत ऐकल्याचे
नवीन आवृत्ती आली का? ;)

आली आणि संपलीसुद्धा.. आहात कुठे?

बॅटमॅन's picture

15 May 2013 - 4:22 pm | बॅटमॅन

आली आणि संपलीसुद्धा..

काय बोधकथा की बीअर :P

सस्नेह's picture

15 May 2013 - 4:50 pm | सस्नेह

संपली की संपादित केली...?

बॅटमॅन's picture

15 May 2013 - 4:53 pm | बॅटमॅन

ते पिणार्‍यांना आपलं संपादकांना माहिती ;)

चित्रपटाची कथा/ थीम पटली नसल्यास स्वतंत्र धागा लिहून खंडन करावे.

परिक्षणाविषयी बोलायचे ते इथे बोलावे.

प्रतिक्रियेतील हुकुमशाही सुराबद्दल निषेध! एकाच आयडीला कॉर्नर करून लिहीलेला प्रतिसाद वाटतो आहे.

*************************************
काय बॅटमॅना - सहमत ना..? ;-)
*************************************

अगदी एकाच आयडीवर तुटून पडणारा प्रतिसाद वाटतो आहे =)) =)) ;)

पूर्ण सहमत. अन त्याचा विरोध केला की आरोप करायचे हेही तसेच ;)

सही रे मोदका.

अरे तू तर सिरीयस झालास.. मी मजा करतोय रे. ;-)

स्नेहांकिता - दोन्ही प्रतिसाद हलकेच घ्या हो!!

सस्नेह's picture

15 May 2013 - 5:22 pm | सस्नेह

....हे आकाशातल्या बापा ! या पुणेकराना आमच्या कोल्हापुरी भाषेतले आर्जव कधी समजणार ?
‘यावे, लिहावे ..मिपा आपलाच असा !’ हे यांना गोड लागतं अन आमचे ‘करावे बोलावे’ यांना कडू लागते...
हन्त हन्त....

सूड's picture

15 May 2013 - 5:27 pm | सूड

>>‘यावे, लिहावे ..मिपा आपलाच असा !’

येवा, लिवा ..मिपा आपलाच आसा !’

परीक्षण इतकं तपशीलवार आणि उत्तम आहे की पिचरबद्दल अपेक्षा अतोनात वाढल्या आणि भंगल्या तर त्याचा दोष मा.श्री. इनिगोय यांचे माथी राहील :D :P

मा.श्री. इनिगोय यांचे माथी राहील

मा.श्री?

बॅटमॅन's picture

15 May 2013 - 2:31 pm | बॅटमॅन

हे संबोधण पुर्षाण्णा आणी म्हैलाण्णाही लागू करता येतं की, श्रीयुतचं श्रीमती आणि माणणीय च माणणीया केलं की झालं, हाकानाका.

ठाकुर्लीत राहून मराठी बाटलंय त्याचं !! ;)

बॅटमॅन's picture

15 May 2013 - 3:12 pm | बॅटमॅन

हीहीही :D

५० फक्त's picture

15 May 2013 - 5:55 pm | ५० फक्त

का छळता रे त्याला, एक तर गावाकडच्या फोटोंच्या धाग्यांवर नीट प्रतिसाद नाही देता येत त्याला.

सौंदाळा's picture

15 May 2013 - 4:11 pm | सौंदाळा

बियरसाठी जागा शिल्लक असली म्हंजे वन काण्ट बेअर टु फिल इट विथ एनीथिंग एल्स

आणि

परीक्षण इतकं तपशीलवार आणि उत्तम आहे की "पिचरबद्दल" अपेक्षा अतोनात वाढल्या

वाचुन मज्जा आली.
पिचरबद्दल आमच्यादेखील अपेक्षा नेहमीच जास्त असतात :):)

बन्डु's picture

15 May 2013 - 2:44 pm | बन्डु

प्राची नाही प्रज्ञा नाव आहे पल्लवि जोशी चं!

दिपक.कुवेत's picture

15 May 2013 - 3:20 pm | दिपक.कुवेत

हे वाचुनच सिनेमा बघायची उत्सुकता ताणली आहे!

संजय क्षीरसागर's picture

15 May 2013 - 4:48 pm | संजय क्षीरसागर

इथे संक्षी यांचा कथेवर अन त्यातल्या व्यक्तिरेखांवर आक्षेप आहे असे वाटते. याचा परिक्षणाशि काय संबध ?

चित्रपट न पाहता परिक्षणावर टीका करणे म्हणजे फोटो खराब आल्याबद्दल फ्रेममेकरवर टिप्पणी केल्यासारखे होईल.

आपण विचार कसा करतो यावर ते अवलंबून आहे. परिक्षण चित्रपट पाहण्यास किंवा न पाहण्यास उद्युक्त करतं. नाही तर परिक्षणाचा उद्देश काय? परिक्षण चित्रपट विषयाचाच सारांश असतो.

नुसतं परिक्षणाविषयी लिहीलं तर ते लेखिकेची भाषा, स्टाईल, मांडणी वगैरेवर होईल. ते अर्थात अचूक आहे पण त्याचा उपयोग काय? मुळ मुद्दा चित्रपट काय सांगतो हा आहे.

पण मला वाटते, चित्रपटात ‘कसं असावं ‘ याचे चित्रण केले नसून प्रत्यक्षात ‘कसं असतं’ ते दाखवले आहे. त्यावर आदर्शपणा लादण्याचा जुलूम तुम्ही का करता बॉ ?

जर चित्रपटातली वास्तविकता निरुपयोगी असेल (खरं तर ती प्रेमाची वास्तविकता नाही) तर तो प्रयासच व्यर्थ ठरतो.

मला नेहमी एक आश्चर्य वाटतं, वास्तविक प्रेम लोकांना आदर्श कसं वाटतं? आणि वास्तविक लादायचा प्रश्न कुठे येतो? समजलं तर घ्या नाही तर राहूं दे, जुलूम कुठे आहे?

चित्रपटाची कथा/ थीम पटली नसल्यास स्वतंत्र धागा लिहून खंडन करावे.
परिक्षणाविषयी बोलायचे ते इथे बोलावे.

शेवटी चित्रपटाचा विषय आणि प्रतिसादाचा कंटेट महत्त्वाचा आहे. कुठे लिहीलं त्यानं काही फरक पडत नाही.

माझा रोख चित्रपटानं प्रेमासारख्या सुरेख विषयाच्या केलेल्या चुकीच्या हाताळणीवर आहे.

नुसतं परिक्षणाविषयी लिहीलं तर ते लेखिकेची भाषा, स्टाईल, मांडणी वगैरेवर होईल. ते अर्थात अचूक आहे

आर यू शुअर..? ते अचूक आहे..??

माझा रोख चित्रपटानं प्रेमासारख्या सुरेख विषयाच्या केलेल्या चुकीच्या हाताळणीवर आहे.

ओके.. बरोबर हाताळणी केलेले तीन चार चित्रपट सांगावेत. मी, स्पा, मंद्या, सूड, बॅटमॅन वगैरे तरूण मंडळी थोडे ज्ञानार्जन करावे म्ह्णतो. ;-)

स्पा's picture

15 May 2013 - 5:05 pm | स्पा

मी, स्पा, मंद्या, सूड, बॅटमॅन वगैरे तरूण मंडळी थोडे ज्ञानार्जन करावे म्ह्णतो

अगदी अगदी

बाकी

बुवाकाका , वल्लीकाका , विमेकाका , धनाजी राव वाकडे काका, अन्या दातार काका , प्रास काका यांना कसा विसरलास रे?????

प्रचेतस's picture

15 May 2013 - 5:29 pm | प्रचेतस

इतकी का आठवण यायला लागली रे स्पा बाळा तुला?

पैसा's picture

15 May 2013 - 5:06 pm | पैसा

चीनी कम का नको?

नको.. चीनी कम टाईप गृहस्थ "नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||" असे काहीतरी म्हणणार.

त्यांना प्रेमकविता वगैरे म्हणता येणार आहे थोडेच..? ;-)

नुसतं चित्रपटाविषयी लिहीलं तर ते चित्रपटाचे डायलॉग्स, स्टाईल, मांडणी वगैरेवर होईल. ते अर्थात अचूक आहे पण त्याचा उपयोग काय? मुळ मुद्दा मी काय सांगतो हा(च) आहे.

मला नेहमी एक आश्चर्य वाटतं, वास्तविक माझं सोडून स्वतःचं म्हणणं लोकांना आदर्श कसं वाटतं? आणि वास्तविक लादायचा प्रश्न कुठे येतो? समजलं तर घ्या नाही तर राहूं दे, जुलूम कुठे आहे?

शेवटी प्रतिसादाचा उद्देश आणि कंटेट महत्त्वाचा(च) आहे. कुठे लिहीलं त्यानं काही फरक पडत नाही.

पैसा's picture

15 May 2013 - 5:13 pm | पैसा

तुझे प्रतिसाद व्यर्थ. तुझ्या चर्चा व्यर्थ. तू मिपावर टाईमपास करणे व्यर्थ. तू बस फुकटच्या चर्चा करत. लोकांचे साखरपुडे पण झाले. माझं काय जातंय म्हणा! मी चालले वाती वळायला.

सूड's picture

15 May 2013 - 5:17 pm | सूड

>>लोकांचे साखरपुडे पण झाले.

हे बाकी लाख बोललात !! मुली मुलांमध्ये नक्की काय शोधतात ते कळेनासं झालंय आता.

इनिगोय's picture

15 May 2013 - 5:39 pm | इनिगोय

आणि 'माझे' वाचक 'माझ्या' धाग्यांमध्ये काय काय शोधतात.. तेही.. ;-)

हाच प्रश्न आम्हालाही पडला असून राईट टु इन्फॉर्मेशन अ‍ॅक्टान्वये याचे उत्तर सर्कारकडे मागण्याची शिफारस सुडकेश्वररावांकडे करण्यात येत आहे.