जो मेरा हो नही पाया, वो तेरा हो नही सकता.... :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
9 May 2013 - 6:56 am

डॉ.कुमार विश्वास.

गेल्या वर्षी लोकपाल विधेयकाच्या निमित्तानं दिल्लीत मोठं आंदोलन सुरु होतं. श्री अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल,किरण बेदी आणि अन्य मंडळींच्या आंदोलनाला लोकांनी प्रचंड अशा संखेनं पाठींबा दिला. एक प्रचंड उत्साह त्यावेळेस दिसला होता. अगदी स्वांतंत्र्याचा लढा आम्हाला प्रत्यक्ष पाहता आला नाही, पण तसंच वाटावं असं भारावून गेलेलं वातावरण होतं, असं अनेक लोक बोलत होते. माध्यमांची दिवसभर क्षणाक्षणाची रिपोर्टींग सुरु असायची. नेत्यांच्या भेटीगाठी स्टेटमेंट्स यांची ब्रेकींग न्युज चाललेली असायची. आणि या आंदोलनाच्या निमित्तानं एक चेहरा विविध वाहिन्यांवर झळकत असायचा. दुपारच्या वेळी मुख्य आंदोलनकर्ते जेव्हा आराम करत असायचे तेव्हा एक तरुण त्या माईकचा ताबा घ्यायचा आणि त्या गर्दीला सांभाळायचा ते मला आवडायचे ते नाव म्हणजे डॉ.कुमार विश्वास.

कुमार विश्वास या माणसाला मी कधी भेटलो नाही पण भेटण्याची संधी मिळाली तर नक्कीच भेटेन. काही माणसं आपल्याला उगाच आवडत असतात. आपल्याला त्यांच बोलणं आवडतं, त्यांचं नुसतं दिसणं आवडतं आणि आपण त्यांच्या प्रेमात पडतो. प्रेम कोणतंही असो, ते आंधळं असतं आपली फसगत होते तरीही आपल्याला अक्कल येत नाही. आपण पुन्हा तिच्या/त्याच्या आठवणीत गुंतून जातो. लोक काय म्हणतात त्याचा विचार करत नाही. कुमार विश्वास यांचे मी अनेक व्हिडियो आज दिवसभर पाहिले प्रत्येक कार्यक्रमात तो आपली आवडती कविता म्हणतो आणि रसिकांच्या काळजांचा ठाव घेतो. अतिशय गोड वाटतं त्याची कविता ऐकतांना. आपण कधी प्रेम केलं असेल, आपण प्रेमात पडला असाल, रडला असाल तर तुम्हाला कुमार विश्वास यांच्या आवाजातील ही गोड कविता नक्कीच आवडेल. असं वाटतं ( इथे ऐका )

कोयी दिवाना कहता है, कोयी पागल समजता है,
मगर धरती की बेचैनी को, पागल समजता है
मै तुझसे दूर कैसा हू, तू मूझसे दूर कैसी है
ये तेरा दिल समजता है, या मेरा दिल समजता है
के मोहबत एक एहसान की पावनसी कहानी है,
कभी कबिरा दिवाना था, कभी मीरा दिवानी है
यहा सब लोक कहते है, मेरी आखो मे आसू है
जो तु समजे तो मोती है, जो ना समझे तो पानी है
समंदर पीर का अन्दर है लेकीन रो नही सकता
ये आसू प्यार का मोती है, इसको खो नही सकता.
मेरी चाहत को अपणा तु बना लेना मगर सून ले
जो मेरा हो नही पाया वो तेरा हो नही सकता
भवर कोयी कुमदनी पर मचल बैठा तो हंगामा
हमारे दिल मे कोयी ख्वाब पल बैठा तो हंगामा
अभी तक डूब कर सुनते थे सब किस्सा मोहब्बत का
मै किस्से को हकिकत मे बदल बैठा तो हंगामा.

कुमार विश्वास यांच्या बद्दल मला फारशी माहिती नाही. तुनळीवर (कोणी लावला राव या शब्दाचा शोध) काही व्हिडियोंमधे हास्य कवी संमेलनात ते कविता म्हणतांना दिसतात. अभियंता आणि विद्यापीठात शिक्षक असल्याचे वाटते. विविध ठिकाणी त्यांचे स्टेज शो झालेले दिसतात. दिल्लीतल्या आंदोलनापूर्वीही त्यांचे आपले काही चाहते आहेत असेही दिसते. आपल्याकडून त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली तर वाचायला आवडेलच. एका व्हिडियोवरच्या दुव्यात ते असं म्हणतात की मला लोक विचारतात की तुम्ही आंदोलनात का सहभागी झालात तर ते म्हणतात जेव्हा माझी येणारी पिढी आणखी काही वर्षांनी विचारेल की माणसांना सामाजिक विषयावर जोडणारं एक आंदोलन झालं होतं, त्यात तुम्ही सहभागी होता का तर मी ताठ मानेनं म्हणेन की माझा सहभाग त्यात होता. अशा आशयाचं ते बोलतात. मला त्याची कविता आवडते, त्यांचं बोलणं आवडतं, एक भूमिका आवडते. हं आता काही कार्यक्रमात ते थोडा पांचटपणाही करतांना दिसतात. पण, एवढं तेवढं चालायचंच. आपल्याला त्याच्या आवाजातील कविता आवडेल असं वाटलं म्हणून हा नसता प्रपंच. :)

कलानाट्यविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

के मोहबत एक एहसान की पावनसी कहाणी है,
कभी कबिरा दिवाना था, कभी मीरा दिवानी है
यहा सब लोक कहते है, मेरी आखो मे आसू है
जो तु समजे तो मोती है, जो ना समझे तो पाणी है

सुरेख! घरुन ऐकेन.

कहानी, पानी असं हवं ते. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2013 - 7:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुरुस्त करतो.

-दिलीप बिरुटे

चाणक्य's picture

9 May 2013 - 7:11 am | चाणक्य

त्यांच्या कविता अगदी सहज, सोप्या शब्दात आणि गुणगुणाव्या अश्या असतात. सादरही छान करतात. फक्त कधीकधी वाहवत जातात ते. मग आपण कुणाबद्दल काय बोलतोय याचं भान नसतं त्यांना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2013 - 7:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> फक्त कधीकधी वाहवत जातात ते. मग आपण कुणाबद्दल काय बोलतोय याचं भान नसतं त्यांना.

सहमत. आपले असंख्य चाहते आहेत आणि आपण काहीही बोलले की लोक त्याला दाद देतात असा एकदा समज झाला की व्यासपीठावरुन काहीही बोलल्या जातं. आणि अनेकदा असा माणूस तो कितीही चांगला बोलत असला तरी आपल्या मनातून उतरुन जातो.

-दिलीप बिरुटे

प्रमोद देर्देकर's picture

15 Apr 2014 - 11:10 am | प्रमोद देर्देकर

पीठावरुन काहीही बोलल्या जातं. >>>>]\
अहो डॉ. बहुतेक बोललं जातं असं असावं.

अत्रुप्त आत्मा's picture

9 May 2013 - 7:35 am | अत्रुप्त आत्मा

भारि आहे हा माणुस आणि त्याचं काव्यही!

कवितानागेश's picture

9 May 2013 - 9:04 am | कवितानागेश

लेखाचे शीर्षक वाचून वेगळंच काहितरी वाटले होते! ;)

कोमल's picture

9 May 2013 - 10:07 am | कोमल

रसग्रहण आवडले.. :)
काव्य घरी जाऊन ऐकेन.

स्पंदना's picture

9 May 2013 - 9:26 am | स्पंदना

वा! वा!! सर तुम्हीपण लिहीते झालात याचा अतिशय आनंद आहे.

प्रचेतस's picture

9 May 2013 - 9:36 am | प्रचेतस

अगदी अगदी.

पैसा's picture

9 May 2013 - 9:35 am | पैसा

मस्त रसग्रहण! विनोदी कविता म्हणताना छान गंभीर कविता आहे.

मात्र धाग्याचे शीर्षक पाहून मिपाच्या सद्यस्थितीशी काही संबंध आहे का हा विचार डोक्यात आला होताच!

रुमानी's picture

9 May 2013 - 9:52 am | रुमानी

डॉ.कुमार विश्वास याची छान ओळख करुन दिलीत आपण.

के मोहबत एक एहसान की पावनसी कहानी है,
कभी कबिरा दिवाना था, कभी मीरा दिवानी है

कविता अतिशय सुरेख......!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2013 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

के मोहबत एक एहसान की पावनसी कहानी है
'अहेसासो' असा शब्द आहे तो. माझी लिहिण्यात चूक झाली.

-दिलीप बिरुटे

चिनार's picture

2 May 2016 - 10:46 am | चिनार

बरोबर..

मोहब्बत एक ऐहसासो की पावन सी कहानी हैं..
कभी कबिरा दिवाना था, कभी मीरा दिवानी है..

कुमार विश्वास एक उच्च दर्जाचे कवी आहेत. राजकारणात का आला हा माणूस ते कळत नाही.
असो, त्यांचातल्या कवीमनाला सलाम !

विसोबा खेचर's picture

9 May 2013 - 10:20 am | विसोबा खेचर

सर, छान लिहिलंय...

कुमार विश्वासबद्दल ऐकून होतो आधी..या लेखामुळे आता त्याच्या कविता अजून वाचाव्या वाटू लागल्यात.

सहज's picture

9 May 2013 - 1:03 pm | सहज

कॉमेडीबाजी व कविताच्या नादात हे महाशय वाहून जातात. कजरा रे गाण्यावरुन अभिषेक-ऐश्वर्या व अमिताभ यांच्याबद्दल तोडलेले तारे ऐकून जमल्यास कधी तर कविता बघू पण ह्यांचे भाषण किंवा सामाजिक मते ऐकायला हवीच असे नाही हे ठरवले.

प्यारे१'s picture

9 May 2013 - 1:15 pm | प्यारे१

वाहावत जातात हे मान्य.
'कोई दिवाना' च्या दोन ओळी म्हणायला जवळपास १५ मिनिटे घेतलीत.

बाकी ओंकारा मध्ये डॉलीचे वडील ओंकाराला अशाच अर्थाचे वाक्य बोलतात.
'जो अपनोंकी सगी ना हो सकी वो तेरी सगी क्या होगी'

इंट्रेष्टिंग! इकडे लक्ष दिले नव्हते.

मुक्त विहारि's picture

9 May 2013 - 12:55 pm | मुक्त विहारि

धन्यवाद..

गवि's picture

9 May 2013 - 1:33 pm | गवि

चांगला लेख आहे. सदर व्यक्तीचा पाहून अथवा ऐकून परिचय नाही, पण तुम्ही करुन दिलात. उत्तम.

सुधीर's picture

9 May 2013 - 1:39 pm | सुधीर

मै किस्से को हकिकत मे बदल बैठा तो हंगामा|
शेवटची ओळ सही आहे.

आनन्दिता's picture

9 May 2013 - 1:46 pm | आनन्दिता

त्यांचे रनटाईम जोक जाम मस्त असतात.. वहावत जातात हे हि खरं आहे...

अग्निकोल्हा's picture

10 May 2013 - 1:53 am | अग्निकोल्हा

वत जाणे एकदम भारि प्रकार आहे बुआ... तसही साचलेलं असुच नये कोणी म्हणतो मी ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 May 2013 - 7:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुमार विश्वास यांची शैली अशी आहे की, दोन ओळी म्हणाच्या जरासा पॉज घ्यायचा, प्रेक्षकात काही हालचाल होत असेल तर त्यावर कमेंट्स करायच्या. बोलता बोलता उत्तरप्रदेश, राजस्थान, इथल्या काही वैशिष्ट्यांचा उल्लेख करायचा त्यावर विनोद करायचा. शिटी वाजवली तर त्यावर कमेंटस करायच्या. विद्यापीठातील अध्यापक कसे गंभीर असतात त्यावर बोलायचे, विद्यार्थी वस्तीगृहात पहिल्यांदा येतो तेव्हा खोबर्‍याच्या तेलाची बाटली वगैरे अमूक अमूक घेऊन येतो नंतर त्याच्याकडे कशा वेगवेगळ्या बाटल्या सापडतात त्यावर कमेंटस करत करत प्रेक्षकांना मनमुराद हसवायचे अशी ती शैली आहे आणि मधेच मग निवेदन करता हू, आपको इस कविताकी चार लायने पसंद आयेगी. आणि मग तरुणांना आवडेल अशा दोन ओळींची निवड करायची. अर्थात जालावर याच शैलीतल्या म्हणजे तो कोणत्याही ओळी म्हणतांना एकच अशी शैली निवडतो असे दिसते. विनोदाची पेरणी करायची आणि मग मग आता काही कवितेच्या ओळी म्हणणार आहे, आपल्याला त्या आवडणार आहेत. आणि जर आपल्याला त्या ओळी आवडल्या नाहीत तर मी शायरी सोडून देईन. (सर्वच ठीकाणी हाच फॉर्मुला)

मेरा अपना तजुर्बा है, तुम्हे बतला रहा हु मै
कोयी लब छु गया था तब, के अब तक गा रहा हु मै.

आणि एकदा प्रेक्षकांची दाद मिळाली की मग पुन्हा मग मै आपके सामने कुछ कविताये पेश करता हू लेकीन कविताए के बारे मे लोग कहते है की आप प्रेमकीही कविता क्यो सुनाते हो. कुछ सामाजिक देश के बारे मे क्यु नही लिखते. मग तो म्हणतो, प्रेम हजारो साल पहले था, अब भी है, और कल भी रहेगा. पाकिस्तान तेरसट साल पहले नहीथा, आज है............आणि मग पॉज घ्यायचा. पब्लिक खळखळून दाद देते. आपण महाविद्यालयात शिकत असतांना जिच्यावर प्रेम करतो ती काही वर्षांनी भेटते तेव्हा ती तिच्या मुलाला म्हणते देखो बेटा मामा.... वगैरे.

बिछड के तुमसे प्यार मे कैसे जिया जाये बिना तडपे
जो मै खुद ही नही समजा वही समजा रहा हू मै.

किसी फ़त्तर मे मूरत है
कोयी फत्तर की मूरत है

लो हम ने देखली दुनिया, जो इतनी खूबसूरत है
जमाना अपनी समझे पर मुझे अपनी खबर ये है
तुझे मेरी जरुरत है मुझे तेरी जरुरत है.

कार्यक्रम सादर करतांना एक सोबती असतो मला वाटतं तो कवी असावा आणि ते ठरवून प्रेक्षकांची करमणूक करतात आणि ते इतकं सहजपणे होतं की ते लक्षात येत नाही. . मधे मधे बोलून त्याच्या मुद्द्याला पकडून विनोद करतात युपीचं शाळेतील इंग्रजी कसं आहे, प्राचार्य बनना चाहीहे मै ओ क्यु नही बनता. प्राध्यापक सतत गंभीरच का असतात वगैरे यावर विनोद मारुन पुन्हा निवेदन करता हू--

मेरे जीने मे मरने मे तुम्हारा नाम आयेगा
मे सांसे रोक लू फीर भी यही इल्जाम आयेगा.
हर एक धडकन मे जब तुम हो तो फीर अपराध क्या मेरा
अगर राधा पुकारेगी तो फीर घनशाम आयेगा.

असो, गेली दोन दिवस कुमार विश्वासमय झालो होतो. आपणही त्याच्या परिचयाला दाद दिली, त्याच्या निमित्तानं आमच्या लेखनाला दाद दिली मनःपूर्वक आभार.

-दिलीप बिरुटे

पक्षी's picture

3 May 2016 - 10:38 am | पक्षी

अतिशय छान...
तुमचे प्रतिसाद नेहमीच वाचनीय/माहितीपूर्ण असतात.
हा भाग मुख्य लेखात असायला हवा होता...

ढालगज भवानी's picture

10 May 2013 - 7:59 pm | ढालगज भवानी

मेरा अपना तजुर्बा है, तुम्हे बतला रहा हु मै
कोयी लब छु गया था तब, के अब तक गा रहा हु मै.

वेडं केलं या ओळींनी!!!!!!

यहा सब लोक कहते है, मेरी आखो मे आसू है
जो तु समजे तो मोती है, जो ना समझे तो पानी है

क्या बात!! क्या बात!!!

नीलकांत's picture

12 May 2013 - 10:09 am | नीलकांत

साधारतः तीन वर्षापुर्वी कुमार विश्वासांच्या वरील कवितेचं उत्तम सादरीकरण मी ऐकलं होतं. कविता नवीन तरीही ताबडतोब ठाव घेणारी होती ;) सादरकर्ता उत्तम होता त्यामुळे लागलीच बोल लिहून घेऊन आणि कविचं नाव गुगलबाबाल रगडंलं. उत्तम कविता आणि समोरील प्रेक्षकवर्गाचा उत्तम पध्दतीने घेतलेला ठाव हे कुमार विश्वासांचं बलस्थान आहे.

परत एकदा त्यांच्या कविता ऐकाव्याश्या वाटल्या. धन्यवाद सर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2014 - 5:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निवडून येतो का आमचा कवीमित्र :)

अभी तक डूब कर सुनते थे सब किस्सा मोहब्बत का
मै किस्से को हकिकत मे बदल बैठा तो हंगामा.
:)

-दिलीप बिरुटे

तुमच्या कवीमित्राच्या कवितेचा खुप पूर्वी मी मराठीत भावानुवाद केला होता. :)

कुणी बेभान म्हणतं मला, कुणी वेडं समजतं मला
धरतीच्या उमाळ्याला आकाशीचा नभच समजलेला
कसा तुझ्यापासून दूर मी, अन माझ्यापासून दूर तू
दुराव्यातील हा जिव्हाळा फक्त आपल्याला कळलेला

प्रेम तुझ्या माझ्या विश्वासाची एक पवित्र गाथा आहे
कधी कबीर तर कधी मीरेचीही तशीही हीच कथा आहे
सगळेच म्हणतात इथे, माझे डोळे आसवांनी भरलेले
कळलं तुला तर मोती, नाही तर पाण्याचा साठा आहे

आहे वेदनांचा सागर ह्र्दयात, पण मला रडायचं नाही
माझे अश्रु तुझ्या प्रेमाची निशाणी, जी हरवायची नाही
माझी ओढ तुला कळो किंवा नाही, पण थोडं ऐक तू
जी गोष्ट माझी झाली नाही, ती तुझीही व्हायची नाही

भुंगा जर कधी कमळ फुलावर बसला तर पाप घडलं
आम्ही एखादं स्वप्न जिवापाड जपलं तर पाप घडलं
कालपर्यंत तल्लिन होऊन ते ऐकत होते प्रेमाचे किस्से
आणि आम्ही खरंच कुणावर प्रेम केलं तर पाप घडलं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Apr 2014 - 4:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यासेठ, भारी जमलंय...! :)

-दिलीप बिरुटे

वाहवत जात असेलही, पण कुमार विश्वास एक सच्चा माणूस आहे. तोलून मापून बोलत नाही.

"कोई खामोश है इतना बहाने भूल आया हूँ
किसी की इक तरन्नुम में तराने भूल आया हूँ
मेरी अब राह मत तकना कभी ए आसमाँ वालों
मैं इक चिड़िया की आँखों में उड़ाने भूल आया हूँ"

अजुन एक....

'थी खून से लथपथ काया, फिर भी बन्दूक उठा कर
दस दस को एक ने मारा, फिर गिर गए होश गँवा कर
जब अंत समय आया तो, कह गए कि अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफ़र करते हैं'

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2016 - 10:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी ऐकलं नाय हे.....

-दिलीप बिरुटे

धडपड्या's picture

30 Apr 2016 - 11:19 pm | धडपड्या

'ऐ मेरे वतन के लोगों' त्यांनी लिहिलेय??

रघुनाथ.केरकर's picture

4 May 2016 - 11:15 am | रघुनाथ.केरकर

'थी खून से लथपथ काया, फिर भी बन्दूक उठा कर
दस दस को एक ने मारा, फिर गिर गए होश गँवा कर
जब अंत समय आया तो, कह गए कि अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफ़र करते हैं'

कवि प्रदीप ना?

अनिरुद्ध प्रभू's picture

4 May 2016 - 3:02 pm | अनिरुद्ध प्रभू

'थी खून से लथपथ काया, फिर भी बन्दूक उठा कर
दस दस को एक ने मारा, फिर गिर गए होश गँवा कर
जब अंत समय आया तो, कह गए कि अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफ़र करते हैं'

हो प्रदीपच ...

खर तर एका विडिओ डॉ. च्या तोंडी ऐकलं होतं....
त्यामुळे मोठी चुक झाली.
क्षमस्वः

अनिरुद्ध प्रभू's picture

30 Apr 2016 - 11:04 am | अनिरुद्ध प्रभू

डॉ.विश्वासांचे....