एकदा सहजच पराण्णांना भेटायला सौंदर्य फुफाट्यात गेलो होतो. बाहेरच्या खोलीत पराण्णा निवांतपणे बसले होते. पुढ्यात नेहमीप्रमाणे कि बोर्ड दाबत मिपावर कुणाची तरी खेचत होते ..
"काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाकुर्लीहून.." असे जुजबी प्रश्न पराण्णा विचारत होते.
जरा वेळाने तेथे सोत्री आले. सोकाजीराव त्रिलोकेकर. पूर्वीचे मुंबईकर . पुण्यातल्या मिपा कट्ट्या मध्ये पराण्णा आणि त्यांची ओळख झाली स्वतः सोत्री मद्याचे भोक्ते. अनेक उत्तमोत्तम कॉकटेल , किंवा मोक्टेलस त्यांनीच पराण्णांना दिल्या होत्या असं पराण्णा सांगत असत..
'काय केव्हा आलात..' असं म्हणून सोत्रींनी हसून स्वागत केलं आणि माझ्या हातावर काही ओले काजू ठेवले. काजू अतिशय क्रिस्पी आणि सुरेख होते.. मी ते पटापट मटकावले परंतु मला प्रश्न असा पडला की त्याची सालं टाकायची कुठे? मग बाहेर जाताना ती सोबत न्यायची आणि टाकून द्यायची असं मी ठरवलं आणि तसाच बसून राहिलो..
माझी चुळबुळ सोत्रीच्या लक्षात आली..
'माझ्याजवळ द्या ती सालं.. त्यापासून पण एक झकास गोवन कॉकटेल बनवतो मी
ते इतक्या सहजतेने म्हणाले की मलाच ती सालं त्यांच्या हातात देतांना अवघडल्यासारखं वाटलं..
"यांना ते मॅन्गो मार्गारीटा पण दे.." पराण्णा म्हणाले..
"खास देवगडचा मॅन्गो मार्गारीटा आहे बर्र का.. " - पराण्णांचा चीरकलेला खर्ज.!
सोत्रींनी लगेच तत्परतेने घरून जाऊन माझ्याकरता ते मॅन्गो मार्गारीटा आणलं..अगदी सुरेख, कॉकटेल होतं, त्यात आमरस म्हणजे माझा जीव कि प्राण
मग निरोप घेतला..
पराण्णांनी विचारलं, "कसे जाणार?"
पराण्णांना एकूणच रस्ते, गाड्या याचा विलक्षण तिटकारा
"बाईक ने आलोय .. मस्त रमत गमत जाणार ."
हां हां बरोबर.. उगाच रस्त्यांचे, डोंगरांचे फटू काढायचे असतील ..", आता घरी गेलात कि ते फटू टाकून प्रवास वर्णनाची जिलबी टाकू नका मिपावर म्हणजे मिळवली
माझ्या जिलबी टाकण्यात पराण्णांनी एवढी उत्सुकता दाखवली की मला गंमतच वाटली..!
असो..
कुणी म्हणेल या लेखाचं प्रयोजन काय? काय तर म्हणे ओले काजू खाल्ले..! नि कॉकटेल ढोसले
खरं आहे.. आठवण तशी छोटीशी आणि साधीच आहे.. परंतु अशा अनेक लहानसहान आठवणीच कुठेतरी मर्मबंधातली ठेव होतात आणि तीनसांजा झाल्या की या खिडकीतनं, त्या खिडकीतनं घिरट्या घालायला लागतात, अस्वस्थ करतात..!
आणि आता फक्त आठवणीच तर आहेत..पटकन एखादा फोन करून किंवा सौंदर्य फुफाट्यात जाऊन चार श्या द्यायला पराण्णा कुठे आहेत..?! ते गेले गुजरात ला
प्रतिक्रिया
30 Apr 2013 - 9:34 am | आतिवास
थोडी वेगळी; पण आहे भयकथाच :-)
30 Apr 2013 - 9:40 am | पैसा
मेले हसून! अजुन बऱ्याच जिलब्या येणे बाकी आहे!
30 Apr 2013 - 10:42 am | विश्वनाथ मेहेंदळे
आता घणसोली वर पण लिही ना रे !!!!
30 Apr 2013 - 11:30 am | बॅटमॅन
घणसोली? हे काय असतं?
(कोकण-निरक्षर) बॅटमॅन.
30 Apr 2013 - 4:11 pm | भुमन्यु
घणसोली? ...
नवी मुंबईतील एक भाग/उपनगर....
कुणी राहत असेल तर क्रुपया सांगा मला भेटायला आवडेल..
राहुल गारखेडकर
30 Apr 2013 - 4:25 pm | सूड
असलं कसलं नाव उपनगराचं!!
1 May 2013 - 12:03 am | अत्रन्गि पाउस
अहो .ऐरोली घणसोली राबोडी तुर्भे वाशी खारघर मानसरोवर मानखुर्द पण आहेत...
30 Apr 2013 - 4:42 pm | बॅटमॅन
माहितीकरिता धन्यवाद.
1 May 2013 - 12:35 am | विश्वनाथ मेहेंदळे
घणसोली काय असतं हे विचारू नका. तिथे काय असते ते विचारा. एक निर्जन फलाट असतो.... एक फलाट, त्यावर बाकडे, मिपावर अकौंट आणि हातात कळफलक. साला आणखी काय पायजेल ???
30 Apr 2013 - 9:45 am | इरसाल
एकुणात पराण्णा आणी सोकाजीराव त्रिलोकेकरांमधे "असं" किंवा "तसं" काही आहे असं म्हणायचं आहे वाट्टं !!!!!!
30 Apr 2013 - 9:53 am | मस्त कलंदर
आवडल्या गेले आहे!!
30 Apr 2013 - 9:56 am | बॅटमॅन
=)) =)) =))
30 Apr 2013 - 10:01 am | चौकटराजा
ते मर्मबंधतली ठेव वगैरे भाषा तोंडी यायला चाळीस तरी पावसाळे पहावे लागतात. आपल्याला ती लवकरच येऊ लागली आहे. एकूण द्रष्टेपणाचे लक्षण आहे !
30 Apr 2013 - 11:03 am | कुंदन
अकाली प्रौढ झालाय तो स्पाल्या.
30 Apr 2013 - 10:13 am | स्पंदना
या खिडकीतनं, त्या खिडकीतनं
या पेक्षा या सायटीवरुन त्या सायटीवर अस लिही.
पराला खिडकी रुचायची नाही.
लिहिलय मात्र मस्त.
30 Apr 2013 - 10:17 am | नि३सोलपुरकर
स्पावड्या..यु टू .
जबरा एकदम.
30 Apr 2013 - 10:38 am | विश्वनाथ मेहेंदळे
ओल्या आणि गोड, सुरेख वगैरे काजूची साले मस्त असतात, कोवळी असतात. खाऊन टाकली तरी त्रास होत नाही. कधीकधी मलाही काजू खाताना राहिलेली साले कचऱ्याच्या बादलीपर्यंत जाऊन टाकण्याचा कंटाळा येतो. पण तेव्हा मी ती गपचूप बाजुच्याच्या खिशात टाकतो.
लंबकर्ण
30 Apr 2013 - 10:57 am | राही
अगदी कोवळ्या काजूगरांची साले जरा जाडच असतात.साले जाड आणि गर अगदी चिमुकला.बी जरा जून झाली की साले पातळ होऊ लागतात आणि खाता येतात.एकेक गर तोंडात जात असताना साले टाकण्यासाठी उठायचा कंटाळा येतो.
विडंबन छानच आहे.
मात्र, ओले काजू क्रिस्पी नसतात. कटकन तुकडा पडतो हे खरे, पण चर्वण केल्यावर ओलसर पिठूळ चव जिभेवर रेंगाळते.
(काजू आनंदे)
30 Apr 2013 - 10:41 am | विसोबा खेचर
अतिशय उत्तम, मस्त, खुमासदार विडंबन..
मज पामराच्या एका क्षुल्लक लेखाचे इतके छान विडंबन झाले याचा आनंद वाटतो..
जियो..! :)
30 Apr 2013 - 11:25 am | सूड
मिपावरच्या जिलब्या!!
30 Apr 2013 - 11:28 am | नंदन
"ते" आठवले :)
30 Apr 2013 - 11:34 am | स्पा
=))
30 Apr 2013 - 11:37 am | लीलाधर
काय रे स्पांड्या वय वर्षे 55 झालय की रे अता तुझे मेल्या काजु खाताना कवळी संभाळ रे बाबा :)) ;) :-P :-D
30 Apr 2013 - 11:39 am | बॅटमॅन
कवळी संभाऽल स्पांडू कवळी संभाऽल ओयेऽऽ
(ब्याटिंदरसिंग फ्रॉम ब्यॅटिंडा).
30 Apr 2013 - 11:39 am | स्पा
!! ॐ साई राम !!
30 Apr 2013 - 11:42 am | अभ्या..
सारखं आपलं परा, सोत्री, सौंदर्यफुफाटा, बाईक्स न फोटो.
उगा त्यातून टाकलेल्या क्षणिक जिलब्या...
बॉर झालो राव.
***************************************
- ह्ल्क्या घेणे
30 Apr 2013 - 11:44 am | स्पा
आपल्या भावनेचा आदर करतो...परंतु माझ्याकडून या पुढेही असंच काहीसं लेखन होईल असंही नमूद करतो.. आणि यापुढे माझ्या लेखांकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्याची आपल्याला सूचनावजा विनंती करतो.. smiley
धन्यवाद..
-- किसोबा स्केचर
30 Apr 2013 - 11:48 am | मालोजीराव
:)) :)) :)) :))
30 Apr 2013 - 11:51 am | बॅटमॅन
अरारारा =)) =)) =))
(टोण्या माने)
30 Apr 2013 - 11:57 am | अभ्या..
आपल्याही तब्येतीचा आणि स्केचिंगचा आदर आहेच
या पुढे जिमला जाण्याचे आणि सही देण्याचे कष्ट घेणार नाही ;)
-- धन्यवाद
***************************************
- कडू बेणे
30 Apr 2013 - 12:59 pm | सुहास झेले
हा हा हा... =)) =)) =))
30 Apr 2013 - 1:50 pm | सूड
इथे कुठे वेळ घालवताय स्पात्या 'वरलीचे एक बाजूला, बंधू मला बंगला बांध चांगला' या ठाकुर्लीत वाजणार्या आगरी कोळीगीताचं रसग्रहण वाचायचंय तुम्ही लिहीलेलं.
-(भेदक)
1 May 2013 - 8:11 am | चौकटराजा
कुणाचे किती किस घेतले . महेश भट ला भेटला काय???
कुणाची कसली व किती स्केचेस काढली... ऐला अॅणॉटॉमीचा लैच षौक दिसतोया ...!
30 Apr 2013 - 11:46 am | कोमल
छान केलयं विडंबन.. :))
सोत्री, पाकृची वाट बघत आहे.. येउद्या..
30 Apr 2013 - 12:25 pm | सामान्य वाचक
'केतकी पिवळी पडली' कारां च्या धोतराला हात?
30 Apr 2013 - 12:33 pm | आदूबाळ
ख्यातनाम
(धोतर. लेखक तर आहेच)
30 Apr 2013 - 12:35 pm | गणपा
आठवण छानच.
बाकी शेवटुन चौथी आणि तिसरी ओळ अगदीच दवणीय झाली आहे. ;)
30 Apr 2013 - 1:27 pm | सस्नेह
आणि शेवटाच्या नंतरची पाचवी अन सुरुवातीच्या आधीची दुसरी म्हणजे तर कहर चघळणीय... !
30 Apr 2013 - 1:34 pm | अभ्या..
=)) =)) =)) =)) घ्या आता.
टवाळ लोक्स महिला असतील तर त्यांना काय म्हणावे बरे? ;)
30 Apr 2013 - 2:02 pm | सस्नेह
अभ्या मेल्या, तुला आमच्या प्रतिसादातले कुसळ दिसते पण इतर सुपरमार्केट वाल्यांनी दिलेले मुसळ दिसत नाही...!
30 Apr 2013 - 2:09 pm | बॅटमॅन
मुसळ आणि कुठून आलं हो मध्येच? ही हिंसक संस्कृती आहे, तिचा निषेध असो.
(अहिंसक बेनवधक) बॅटमॅन.
1 May 2013 - 8:14 am | चौकटराजा
ते ज्या कडच्या पीशीत ३२०० पटीनी काय बी म्होटं करून पहाता येतया ! म्हून त्येला आसली वाईट खोड लागलीया !
30 Apr 2013 - 7:20 pm | सस्नेह
खर्रं खर्रं सांग अभ्या ( वशाडमेल्या), इथे तुला 'टवळी' हे उत्तर अभिप्रेत आहे ना ?
30 Apr 2013 - 9:35 pm | अभ्या..
नाही बाबा. तसलं काही नाही.
मला एका फुलाचे नाव अभिप्रेत होते, पण म्हणलो असतो तर अभिचे प्रेत झाले असते. ;) म्हणून गप्प बसलो.
1 May 2013 - 12:17 am | बॅटमॅन
कोटीभास्कर दादांनू, दंडवत घ्यावा. _/\_
1 May 2013 - 12:31 am | अभ्या..
गोटीभास्कर म्हणले तरी चालेल. दुपारी बघितलास ना मासा? ;)
1 May 2013 - 2:47 am | बॅटमॅन
एखादा तमिळ/केरळी माणूस या दोन्ही उच्चारांत फरकच करू शकणार नाही अभ्या ;)
आणि गोटीभास्कर पण भारीच :) पण त्यात जरा दादा कोंडके-इश दंग्याचे लै पोटेन्शिअल आहे =))
30 Apr 2013 - 12:56 pm | सुहास झेले
:D :D :D
30 Apr 2013 - 1:16 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय उत्तम, मस्त, भेट वर्णन..
मज पामराच्या एका क्षुल्लक भेटीचे इतके छान वर्णन आले याचा आनंद वाटतो..
जियो..!
ह्यावरुन आमची आणि सोत्री अण्णांची पहिली भेट आठवली.
एका हवाईसंदर्भ दारूत्सवात भट्टी मागच्या एका खोलीत बिका आराम करत होते..मी बाहेर पायलट बनून हवेत उडत होतो..तेव्हा सोत्री अण्णा भेटायला आला होता.. तेव्हा काहीही ओळख नसताना माझ्या पोटावर गुद्दा मारून "दारू वाढव साल्या..रोज सकाळी उठून ढोसायला जात जा.." हे ज्या अधिकाराने सांगितल त्याच अधिकाराने आज मला नेहमी कॉकटेल पाजत असतो.
30 Apr 2013 - 1:17 pm | सामान्य वाचक
...
30 Apr 2013 - 1:26 pm | सुहास झेले
=)) =)) =))
30 Apr 2013 - 1:41 pm | सूड
=))
कहर!!
30 Apr 2013 - 2:13 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
ख ल्ला स !!
1 May 2013 - 1:08 am | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =))
1 May 2013 - 2:31 am | उपास
ज ह ब ह री :))
30 Apr 2013 - 1:43 pm | स्पा
कौतुक करणा-या, टीका करणा-या, प्रोत्साहनपर, सकारात्मक, नकारात्मक, समिक्षणात्मक, अवांतर/विषयाला सोडून लिहिणा-या अशा सर्व प्रतिसादकर्त्यांचा मी आभारी आहे.
--धागोबा (वर)खेचर
30 Apr 2013 - 1:47 pm | गणामास्तर
धाग्याचा विषय काय होता ते एकदा सांगाल का प्लीज ????
===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================
30 Apr 2013 - 1:52 pm | सूड
वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात येईल.
-(असामान्य भोचक)
30 Apr 2013 - 9:06 pm | अत्रुप्त आत्मा
@--धागोबा (वर)खेचर >>>
अरे बास.......! अजुन किति मारशिल पाचर!!!
===============================================
हल कत बेणे =))
30 Apr 2013 - 2:06 pm | मन१
कैच्या कैच भन्नाट आहे.
लेखही, आनी प्रतिक्रियाही.
"किसोबा स्केचरही " भन्नाट, स्नेहांकितांची "शेवटानंतरची पाचवी ओळ" हाइ क्लाआअस.
मस्त. दिवस मजेत चाल्लाय आज.
30 Apr 2013 - 3:56 pm | jaypal
मनातला प्रतीसाद. स्पा गुर्जी दंडवत स्विकारा __/\__
30 Apr 2013 - 2:09 pm | प्रचेतस
ओले काजू मिळूनही त्यांची उसळ न करता तसेच तोंडात टाकणार्या अल्पसंतुष्ट मनोवृत्तीचा निषेध.
30 Apr 2013 - 4:38 pm | स्पा
अहो चार ओल्या काजूंची अशी कितीशी उसळ होणार हो ..
नि मी एकटा ..
मला कोण करून देणार ?
30 Apr 2013 - 4:33 pm | आजानुकर्ण
स्पा कृपया राग मानून घेऊ नका. तुमचे इथले लेखन वाचले आहे आणि त्यातुनच वरील अपेक्षा लिहिली आहे. इथे दिलेली आठवण सुरेखच आहे पण एक स्वतंत्र लेख म्हणून तुम्ही सातत्याने अशी किरकोळ विडंबने लिहिणे आवडले नाही. एका चाहत्याला तुम्ही नाराज करणार नाही ह्या अपेक्षेने लहान तोंडी मोठा घास घेते आहे. कळावे लोभ असावा.
-थंडा मामा
30 Apr 2013 - 4:34 pm | आजानुकर्ण
घेतो* आहे असे वाचावे--- प्रतिसाद संपादित करण्याची सोय नसल्याने टंकन दोष निवारण करणे जमले नाही -- उगाच गैरसमज नकोत म्हणून हा खुलासा
4 May 2013 - 10:30 am | विकास
सरळ सांगा ना पेश्शल डब्यात जाण्याचा प्रयत्न केला म्हणून. ;)
30 Apr 2013 - 4:36 pm | स्पा
=)) =))
30 Apr 2013 - 4:43 pm | jaypal
किती किती हासवाल? अश्याने एक दिवस जीव जाईल की म्हाता-याचा
फेकोबा चिटर
30 Apr 2013 - 4:45 pm | jaypal
चिटर ऐवजी टिचर असे वाचावे. निलकांता स्वसंपदनाची सोय कर रे बाबा.
30 Apr 2013 - 5:20 pm | सूड
भावना पोचल्याशी मतलब. आम्ही टिचरच वाचू काळजी नसावी. :)
4 May 2013 - 10:32 am | विकास
चिटर पण टीचर असतोच की. तो/ती आपल्याला शिकवून जातो/ते. फक्त उलटे सत्य असते अशातला भाग नसतो. :) असो.
30 Apr 2013 - 6:15 pm | प्यारे१
मस्त पाककृती आणि कॉकटेल. ;)
30 Apr 2013 - 6:26 pm | ढालगज भवानी
अवांतर - स्पा धारपांच्या एखाद्या कथेचे रसग्रहण करा ना प्लीज. कितीही वाचा मनच भरत नाही.
30 Apr 2013 - 10:02 pm | किसन शिंदे
=)) =)) =))
30 Apr 2013 - 10:03 pm | जयवी
:) कम्माल आहात सगळेच्या सगळे :)
30 Apr 2013 - 10:17 pm | प्रीत-मोहर
हाहाहाहा अशक्य.
(सोत्रीच्या हातचे कॉकटेल प्यालेली )प्रीमो
30 Apr 2013 - 10:21 pm | मुक्त विहारि
छान जमले आहे विडंबन...
लगे रहो...
30 Apr 2013 - 10:27 pm | इनिगोय
जहबहर्या! अशा रेशिप्या अजून यिऊंद्या :))
1 May 2013 - 12:43 am | नीलकांत
जबरा :)
1 May 2013 - 12:57 am | शैलेन्द्र
नवोदित लेखकांच्या उत्कृष्ट लेखांचे आंबवण वापरुन अशा जिलेब्या पाडणार्या प्रस्थापित कंपुबाजांचा निषेध.
येवरे बोलुन मीनी माजे दोन शब्द संपवतो,
जे भना बाला, फुगा खोल्लन का? भेट जे तु खंबाल्पार्यान.. जाबतो तुना..
बसोबा अगोचर..
1 May 2013 - 1:07 am | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
मात्र, "माझ्या जिलबी टाकण्यात पराण्णांनी एवढी उत्सुकता दाखवली की मला गंमतच वाटली..!" हे वाक्य "जगभर जिलब्या टाकलेल्या पराण्णांनी...." असं हवं होतं ना? ;) ;) ;)
3 May 2013 - 12:30 pm | ब्रिटिश टिंग्या
मिपावरच्या सर्वोत्कृष्ट विडंबनांपैकी एक!
जियो!
- टिंग्या
3 May 2013 - 12:59 pm | स्पा
बाला ..
लई हाभार रं..
;)
3 May 2013 - 10:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
घाऊक लिखाणाचं दर्जेदार विडंबन कसं करावं याचं उत्तम उदाहरण. प्रतिसादकांनीही चार चांद लावलेले आहेत.
पण लेखाचं शीर्षक वाचून माझ्या अपेक्षा वेगळ्याच प्रकारे चाळवल्या होत्या खर्या.
4 May 2013 - 10:33 am | विकास
लिहायला अंमळ जड जात आहे. पण वरील प्रतिसादाशी सहमत. :)
3 May 2013 - 11:09 pm | इनिगोय
एक प्रश्न पडला आहे..
''ज्यांना जिलब्या खाता येत नसतील त्यांना यापुढे पुऱ्यांचे ताट द्यावे काय?''
3 May 2013 - 11:37 pm | सोत्रि
ज ह ब र द स्त च ~
- (सालीच कुठलं कॉकटेल करावं ह्या विवंचनेत पडलेला) सोकाजी
5 May 2013 - 5:41 am | राजेश घासकडवी
लेख आवडला. पण तमाम मिपाकरांतर्फे बोलतो स्पात्या, ते 'ढोसणी' चे भाग लिहून ठेवले आहेत, ते पूर्ण करा की. आम्ही किती वर्षं वाट पहायची?
5 May 2013 - 10:35 am | आजानुकर्ण
सहमत. आणि त्यासोबत त्या 'मारल्या चापट'चेही भाग पूर्ण करा.
5 May 2013 - 1:00 pm | विश्वनाथ मेहेंदळे
"ढोसणी" पण "मारल्या चापट" च्या मार्गाने जाणार असली तर अपूर्णच बरी. इतकी वर्षे थांबून काहीतरी मंडेन वाचायला मिळणार असेल तर काय फायदा? त्यापेक्षा अपूर्णतेची हुरहूर परवडली.