कधी रे येशील तू... अनामिका....

मृगनयनी's picture
मृगनयनी in जे न देखे रवी...
10 Sep 2008 - 9:27 am

पुनवेच्या चंद्राला नभी शोभतसे, शुभ्र चंद्रिका
यमुनेच्या तीरी साद घाली, हरीची मुग्ध सानिका

ऐकुनि ते सूर, नुपुरे झंकारित येई वेडी राधिका
येई त्वरेने, नजरा चुकवित, परि नसे ती अभिसारिका

परमात्म्याची ओढ तिला, ती होय अलौकिक साधिका
दिव्यत्वावरि प्रीती करी, ती हरीची प्रियतम प्रेमिका

दोन ह्रदयांचे पाहुनि मिलन, मोहुनि जाती वृक्ष-लतिका
साक्ष आहे, या अमरप्रेमाची, वृंदावनातील मधु-मल्लिका

सांगे मजला ही स्नेहकथा, जाईची अबोध कलिका
झुरते मी वेड्या राधेपरि, कधी रे येशील तू... अनामिका....

कवितामुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

राधिका's picture

10 Sep 2008 - 3:26 pm | राधिका

अतिसुंदर!

आपण कृष्ण-भक्त दिसता..

येई त्वरेने, नजरा चुकवित, परि नसे ती अभिसारिका

राधेची पवित्र भक्ती अतिसुंदर शब्दात वर्णिली आहे.....

जैनाचं कार्ट's picture

10 Sep 2008 - 3:44 pm | जैनाचं कार्ट (not verified)

सुंदर !!!

आवडली कविता !

दोन ह्रदयांचे पाहुनि मिलन, मोहुनि जाती वृक्ष-लतिका
साक्ष आहे, या अमरप्रेमाची, वृंदावनातील मधु-मल्लिका

मल्लिका चा काय अर्थ तुम्हाला अभिप्रेत आहे :?

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

मृगनयनी's picture

10 Sep 2008 - 4:08 pm | मृगनयनी

मल्लिका चा काय अर्थ तुम्हाला अभिप्रेत आहे

राजे, जाईचे फुल हे २ प्रकारचे असते...
एका प्रकारात जाई च्या पाकळ्यांना फिक्कट गुलाबी रंगाची किनार लाभलेली असते.
आणि दुसर्‍या प्रकारात, जाईची फुले शुभ्र-पांढरी असतात... बर्‍याचदा मोगर्‍याचा आभास होतो.
अर्थात दोन्ही प्रकारच्या "जाई"चा वास अतिशय सुगंधी असतो.

तर या दुसर्‍या प्रकारातली अति-धवल जाई म्हणजे संस्कृतातली "मल्लिका" .....
तिच्यातला 'मध' डोळ्यांना चांगला असतो.
ही फुले श्रीकृष्णाला प्रिय असतात.

:)

जैनाचं कार्ट's picture

10 Sep 2008 - 4:11 pm | जैनाचं कार्ट (not verified)

अरे वा !
मल्लिकाचा हा अर्थ मला माहीतच नव्हता !
उत्तम माहीती साठी धन्यवाद !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

पावसाची परी's picture

11 Sep 2008 - 11:03 am | पावसाची परी

अतिशय छान ग नयने
माझ्या कृष्णावर छान कविता करता येतात तुला :)
माझ नाव असताच आणि कुठेतरी (इश्श)

शेखर घोरपडे's picture

11 Feb 2009 - 4:27 pm | शेखर घोरपडे

छान......

सांगे मजला ही स्नेहकथा, जाईची अबोध कलिका
झुरते मी वेड्या राधेपरि, कधी रे येशील तू... अनामिका....

मला वेळ मिळाला की लगेच येतो... =))

मृगनयनी's picture

11 Feb 2009 - 4:53 pm | मृगनयनी

मला वेळ मिळाला की लगेच येतो..

:( :( छे छे... अजिबात नको....

आमच्याकडची "वैकन्सी" संपली आहे ! आणि आम्ही आमच्या नौर्मल "जीवनसाथी" बरोबर नक्कीच खुश राहु. :)

कारण आपल्याला येउन पुरते ३ तासही झाले नाहीयेत, आणि जवळ जवळ ४-५ महिन्यांपुर्वी प्रकटित केलेल्या माझ्या छोट्याशा काव्याचा माग काढत, फारच "शॅबी" प्रतिक्रिया दिलीत आपण!... म्हणुन विचारलं!

पुन्हा असे धाडस करू नका.... किमान आमच्या बाबतीत तरी.......

:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

दशानन's picture

11 Feb 2009 - 4:55 pm | दशानन

>>>पुन्हा असे धाडस करू नका.... किमान आमच्या बाबतीत तरी.......

सहमत.

व तुम्हाला वाढदिवसांच्या शुभेच्छा मिळतील हजारो ने !

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

त्रास's picture

11 Feb 2009 - 4:58 pm | त्रास

नाही ब्वा कळली.