{Bokeh}

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
30 Mar 2013 - 11:27 am

फोटोचे सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा त्यात कलात्मकता आणण्यासाठी Bokeh या तंत्राचा वापर केला जातो.
Bokeh म्हणजे ब्लर केलेल्या भागाची क्वालिटी,फोटो काढताना मुख्य विषयाचा पार्श्वभाग कसा आणि कितपत ब्लर केला आहे त्यावरुन Bokeh ची गुणवत्ता कळते किंवा ठरवली जाते.
अर्थात तुम्हाला हवे तसे अनेक प्रयोग करता येतात्,असाच एक प्रयोग मी केला आहे तो इथे देत आहे.
1
विविध रंग छटांचा उपयोग Bokeh निर्माण करण्यासाठी केला जाउ शकतो.
2
हवा तसा आकार आणि दिशा मिळवण्यासाठी योग्य त्या दिशेने कॅमेरा डिफोकस करणे आवश्यक असते.
3
आकार आणि त्याचा शार्पनेस हे तुम्ही कॅमेरा प्रकाशाच्या कॉणत्या अँगलनी धरला आहे त्यावर अवलंबुन आहे.जसे खालच्या फोटोत कारच्या स्टील बंपरवरुन परावर्तित होणारा प्रकाश मला तीव्र स्वरुपात टिपायचा होता.4
आता फोटोच्या पार्श्वभुमीत यांचा वापर डिफोकस केल्याने मिळवता येतो,आता एखादी गोष्ट डिफोकस केल्याने कशी दिसेल आणि कशी दाखवता येईल याचा विचार करता आला पाहिजे,जे विविध प्रयोग करुन पाहिले की सहज जमेल.
खाली डिफोकस झालेली दोन उदा, देत आहे.
5
हा फोटो डिफोकस केल्यावर खालील प्रमाणे दिसतो.
6
तसेच या फोटो वरुन सुद्धा डिफोकस केल्यावर नक्की काय परिणाम साध्य करता येतो याची कल्पना तुम्हाला येईल.
7
वरील निरांजनाला जेव्हा डिफोकस केले तेव्हा परिणाम खालील प्रमाणे दिसला.
8

आता तुम्ही विचार करत असाल की याचा उपयोग कसा केला जातो किंवा कसा करायचा ? या साठी मी प्रयोग केलेला एक फोटो खाली देत आहे.सरबताच्या ग्लासाला शोभा आणण्यासाठी बर्‍याचदा लिंबाची फोड किंवा इतर फळाची फोड अडकवली जाते,मग Bokeh चा वापर मी फळाची फोड देण्यासाठी केला. कसा तो खाली पहा.
9
असे अनेक प्रयोग तुम्हाला करता येतील... :)
अधिक माहितीसाठी खालील दुवे उघडावेत...
https://en.wikipedia.org/wiki/Bokeh
http://www.kenrockwell.com/tech/bokeh.htm

कॅमेरा :--- निकॉन डी-५१००
*कलादालनात फोटो टाकता येत नसल्याने वेगळा पर्याय निवडावा लागतो आहे,हा धागा कलादालनात हलवता आला तर बरे होईल.

छायाचित्रणस्थिरचित्रप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Mar 2013 - 12:43 pm | ज्ञानोबाचे पैजार

सिनेमात अंधळ्या व्यक्तीला दिसु लागते तेव्हा पहिल्यांदी साधारण असेच काहीसे दिसते.
आणि मग ड्व्यायलॉग ऐकु येतो. "मॉ मुझे सबकुच दिखताहै, मेरी ऑखे ठीक होगयी मॉ"

तंत्र म्हणुन झकास आहे विषेशतः शेवटचा फोटो आवडला.

आदूबाळ's picture

30 Mar 2013 - 1:42 pm | आदूबाळ

किंवा मराठी शिणुमात हीरो हिरविण असलेल्या स्वप्नात जातो तेव्हा...

अभ्या..'s picture

30 Mar 2013 - 1:07 pm | अभ्या..

बाणराव मस्त एकदम. उदाहरणे पण अप्रतिम.
आम्ही याचा वापर कॅमेरा वापरुन नव्हे तर फोटोशॉप मधील गॉश्यन ब्लर फिल्टर वापरुन अगदी असाच करतो. रिझल्ट एकदम सुरेख मिळतो. प्लेन, ग्राफिक बॅक्ग्राऊंड पेक्षा अशा ब्लर्ड इमेजेसनी जास्त डेप्थ येते. ग्रीटींग्स आणी इन्विटेशन कार्डसाठी तर हा नेहमीचा फंडा आहे.
धन्यवाद.

स्पा's picture

30 Mar 2013 - 1:37 pm | स्पा

सुरेख रे बाणा

पहिले चार फोटो बघून स्वप्नात असल्यागत वाटले. नंतर कैरी आंबट लागल्याने एकदम डोळे उघडले !
फोटोग्राफीतलं काय काळात नाही, पण फोटो बघत राहावं वाटले.

'फोटोग्राफीतलं काय कळत नाही' असे वाचावे.

दिपक.कुवेत's picture

30 Mar 2013 - 1:59 pm | दिपक.कुवेत

हेच म्हणतो....तांत्रिक माहिती सोडली तर कैर्या आणि सरबताचा फोटो आवडला....रंग मस्त दिसतोय आणि कडांना बहुतेक वरुन मीठ लावलेल दिसतय :P

(सरबत प्रेमी) दिपक

इरसाल's picture

30 Mar 2013 - 2:41 pm | इरसाल

म्हणजे नक्की सरबत नाय ! .....काय ओ सोत्री बरोबर ना ?

काढाला मीठ लावलेले नाही,ते बुडबुडे आहेत.कोकमच सरबत आहे ते ! ;)

धनुअमिता's picture

30 Mar 2013 - 3:00 pm | धनुअमिता

छान माहिती दिलीत.

आतिवास's picture

30 Mar 2013 - 3:09 pm | आतिवास

एक तर बरेच फोटो डी- फोकस होतात आपोआप (नीट माहिती नसल्याने) - त्याला आता हे नवीन नाव द्यावं काय- असा विचार मनात आला. :-)

अनेकदा प्रत्यक्ष कॅमेरा वापरताना हे करायला वेळ नसतो पण नंतर फोटो एडिटमध्ये जाऊन असले उद्योग केले आहेत - पण आता कॅमेरा वापरताना करुन पाहते. तुम्ही काढलेले फोटो आवडले म्हणून मग हा प्रयोग करुन पाहीन. माहितीबद्दल आभार.

दादा कोंडके's picture

30 Mar 2013 - 3:20 pm | दादा कोंडके

माहिती आवडली. या निमित्ताने फोटुग्राफीच्या इतर तंत्राची माहितीपण वाचायला आवडेल. उ.दा. सिलेक्टीव्ह कलर वगैरे.

मदनबाण's picture

30 Mar 2013 - 3:33 pm | मदनबाण

ठांकु.
या निमित्ताने फोटुग्राफीच्या इतर तंत्राची माहितीपण वाचायला आवडेल. उ.दा. सिलेक्टीव्ह कलर वगैरे.
याची माहिती मी आधीच दिली आहे. खेळ रंगांचा...या धाग्यात.
हल्लीच्या नव्या कॅमेर्‍यात सिलेक्टीव्ह कलर असा पर्याय सुद्धा असतो.

दादा कोंडके's picture

31 Mar 2013 - 5:44 am | दादा कोंडके

अरेच्चा खरच की. उद्याच काही फोटूंवर प्रयोग करून बघतो.

बाकी या तंत्रावरून एक साउथइंडियन गाणं आठवलं त्यात त्या गाण्यात फ्रेममधे फक्त हिरवीनच्या साडीचा रंग पटापट बदलतो.

बाणराव हे सगळं कॅमेर्‍यात पूर्वी होत असतं तर भारीच होतं पण आता इमेज इडीटिंग साठी इतके अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध असताना फायनल इमेज कॅमेर्‍यातूनच देण्याचा आग्रह कशाला?
माझा कॅमेर्‍याला आणि फोटोग्राफीच्या कलेला कमी लेखण्याचा उद्देश नाहीये पण जरुरी इनपुट कॅमेर्‍यातून घेऊन बाकी प्रोसेसला अ‍ॅप्लीकेशन्स आहेतच की.
आणि दादा ते साउथची हिरवीनीला साडीचा कलर बदलायला लावायचे लै सोप्पे हाय बघा फटूशाप मध्ये. हे बघा म्या केलेले. ;)
a
लै म्हणजे लै शिंपल. फक्त alt+I+A+R एवढेच करा आन कलर निवडा.

मदनबाण's picture

31 Mar 2013 - 7:28 pm | मदनबाण

जबरा !

दादा कोंडके's picture

1 Apr 2013 - 1:35 pm | दादा कोंडके

खत्राच. मी जे गाणं बघितलं होतं ते सापडलच नाही. पण तो इफेक्ट इथंही बघता येइल.

अवांतरः ते गाणं शोधण्यासाठी युट्युबवर 'सारी कलर' वगैरे टाकल्यावर भलभलते विडिओ आले आणि ते बघता बघता मी काय शोधत होतो तेच विसरून गेलो. ;)

एस's picture

30 Mar 2013 - 7:14 pm | एस

बोकेचे तीन प्रकार मानले जातात.

१. वाईट बोके
२. न्यूट्रल किंवा परफेक्ट बोके
३. चांगला बोके

बाकी बोकेबाजी बोक्यावरील आगामी लेखात. ;)

मी काढलेले फोटू असे येतात आणि सगळे नावं ठेवतात. आता सांगीन किती भारी प्रकार आहे तो! ;)

कवितानागेश's picture

30 Mar 2013 - 10:36 pm | कवितानागेश

=))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Mar 2013 - 4:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दुसरा जवळजवळ मोनोक्रोम फोटो आणि शेवटच्यातली रंगसंगती आवडली. दिवाळी (किंवा ख्रिसमस) ला तोरणांमधे जे छोटे छोटे दिवे असतात त्यांचे असे फोटो अलिकडच्या काळात बरेच पाहिले.

कर्नाटकात बाईक वर फिरायला गेलो होतो तेव्हा एके ठिकाणी हा फोटो काढला होता.
a
त्यात पण आपोआपच बोके इफेक्ट मिळाला होता.

कैर्‍यांचा फोटो टाकयलाच हवा होता का?
इथुन पुढे दोन आर्टीकल्सना मी कैर्यांच्या फोटोच्या निशेधार्थ कमेंट टाकणार नाही.

एस's picture

31 Mar 2013 - 5:20 pm | एस

docomo effect

मदनबाण's picture

31 Mar 2013 - 7:13 pm | मदनबाण

@ प्रथम आणि स्वॅप्स
दोघांचे फोटो आवडले. :)
सर्व प्रतिसाद देणार्‍या मंडळींना ठांकु. :)

nishant's picture

31 Mar 2013 - 8:29 pm | nishant

boke

एस's picture

31 Mar 2013 - 11:19 pm | एस

फक्त कॉम्पोजिशनमध्ये जरा दाटी झाल्यागत वाटतंय.

माझीही थोडीशी भर

फोटोशॉप मधे सगळेच शक्य असले तरी उत्तम बोके देणार्‍या लेन्सेस च्या शोधात सगळेच असतात. सर्वसाधारण पणे बोके हा लेन्स चे अ‍ॅपर्चर (जितके कमि तितके चांगले), वस्तू आणि मागचे अंतर आणि फोटोग्राफर पासूनचे अंतर ह्यावर अवलंबून असतो.
काही चांगले बोके (गोल, समान प्रकाशमान), मध्यम बोके (डोनट रिंग) आणि वाईट (षट्कोनी, अति प्रकाशमान) असे मानले जातात अर्थात हे सर्व तुमच्या वैयक्तिक आवडीवर अवलंबून आहे.

मोठ्या झूम लेन्सेस चे बोके बहुतेकवेळा बरे/चांगले असतात.
एक उदा - २८-२०० किरॉन
DSC01970

किंवा लेन्स जर वाईड अँगल असेल तरी बोके मिळू शकतो.
२१mm lens
IMG_5622

एस's picture

31 Mar 2013 - 11:27 pm | एस

अ‍ॅपर्चर (जितके जास्त तितके चांगले)

f/1.8 हे अ‍ॅपर्चर f/5.6 पेक्षा मोठे अ‍ॅपर्चर आहे.

http://www.shortcourses.com/use/using1-9.html

वाचक's picture

1 Apr 2013 - 2:29 am | वाचक

मला अ‍ॅपर्चर व्हॅल्यू म्हणायचे होते. (आता दुरुस्ती करता येते का बघतो)

फोटो कसे वाटले तेही सांगा म्हणजे सुधारणा करता येतील.

पण मला तितकेसे खास वाटले नाहीत. पहिल्या फोटोत डॉक्युमेंटरी स्टाइल दिसून येते, जी सर्वसामान्यपणे इतर कुणीही सर्वसामान्य फोटोग्राफर वापरेन. तुमचं असं यात काय स्पेशल आहे? हा फोटो असा फ्लॅट घेण्यापेक्षा जर थोडा बाजूने व अ‍ॅक्यूट अ‍ॅंगल वापरून काढला असता तर ते पान, त्याचं ते जाळीत अडकणं, प्रवाहशीलतेला सुचवलेला अडथळा अधिक परिणामकारकपणे दाखवता आलं असतं असं मला वाटतं. तुम्ही उन्हाच्या दिशेला क्रॉप करून अवकाशाचा (स्पेस) भास निर्माण केलाय, पण पानाची दिशा त्या अवकाशाचं इमेजमध्ये नसूनही असलेलं स्थान अधोरेखित करत नाहीये. तसंच इमेजमधील इतर घटकही त्या अवकाशाकडे निर्देश करत नाहीयेत. दुसरं म्हणजे कॉम्पोजिशन मध्ये प्रेक्षकाच्या डोळ्यांना गाइड करत नेणे महत्त्वाचे आहे. वरील फोटोत नजर सतत पानावरून उजवीकडच्या जाळीच्या भागावर व परत अशी भिरभिरत राहते. खिळत नाही. फोटोग्राफीचा एक पेंटिंग आणि ते पण वॉटरकलर पेंटिंग म्हणून विचार करून पहा. सजेस्टिवनेस, फ्लो, लाइट अ‍ॅण्ड शॅडोज् चा खेळ इ. सर्व मिळून जसे एखादे परिणामकारक वॉटरकलर पेंटिंग बनते, तशीच फोटोग्राफीमध्ये इमेज बनते. ह्या अ‍ॅंगलने जरासा विचार करून पहा.

दुस-या फोटोचंही कॉम्पोजिशन मला एवढं आवडलं नाही. वाइड अ‍ॅंगल लेन्स वापरून तुम्ही यापेक्षाही खूप परिणामकारक रचना तुमच्या प्रतिमेत कैद करू शकला असतात. प्रेक्षकाला डिस्ट्रॅक्ट करणारे काही एलिमेंट्स या फोटोत जास्त आहेत असं वाटलं.

इतर कुणी मला असा फीडबॅक विचारला असता तर मी त्याला म्हणालो असतो, 'वा रे मित्रा, तोडलंस. कीप इट अप्.' मात्र तुम्हांला इथे मुद्दाम चॅलेंज करत आहे कारण तुम्ही अतिशय चांगले फोटोग्राफर आहात हे मला जाणवलंय. :)

(अवांतर - कुणाला कीप इट अप् वाला फीडबॅक हवा असेल तर आधी व्यनि ने तसे कळवणे. ;) )

वरील अवांतर हघेहेवेसांनल :))

अभ्या..'s picture

2 Apr 2013 - 1:23 am | अभ्या..

इमेजमधील इतर घटकही त्या अवकाशाकडे निर्देश करत नाहीयेत.

गरजही नाही.
अ‍ॅज अ काम्पोझीशन पहिले अत्युत्तम जमलेय. अ‍ॅप्लाइड आर्टच्या अंगाने विचार केला तरी एखाद्या पुस्तकाचे अप्रतिम कव्हर होउ शकते. माझे मत विचाराल तर अशा दृष्य कलेच्या शब्दबंबाळ समीक्षेपेक्षा काढ्त राहा फोटो. कॅमेरा, टेक्नीकल डिटेल्स हे नंतर येतात. तुम्हाला जसे दिसते, जाणवते ते त्या चौकटीत उतरावयाचा प्रयत्न करा.

फोटोग्राफीचा एक पेंटिंग आणि ते पण वॉटरकलर पेंटिंग म्हणून विचार करून पहा

या वाक्यासाठीच हे लिहिले आहे. :)
सो..कीपीटप ऑल्वेज

फोटो बद्दल मतांतरे होउ शकतात, पण तुम्ही निर्भिड्पणे तुमचे स्पष्ट मत सांगितल्याबद्दल आभार.

पहिला फोटो
मी ह्यात खास वेगळे असे काहीच केले नाही हे तुमचे बरोबर आहे, अगदि 'रुल ऑफ थर्ड' नियमाप्रमाणे काढलेला फोटो आहे. इथे कॉम्पोझिशन चे वैशिष्ट्य म्हणून न देता ह्या ५० वर्षे जुन्या किरॉन लेन्स चा बोके दाखवण्याकरता दिले आहे.

दुसरा फोटो
तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, इथे डिस्ट्रॅक्ट करणारे एलिमेंट्स जास्त आहेतच, पण परत एकदा, ताबडतोब फ्लिकर वर उपलब्ध असलेला आणि वाईड अँगल मधे बोके असलेला फोटो म्हणून दिला आहे.

कॉम्पोझिशन आणि बोके दोन्हीच्या दृष्टीने हे एक-दोन बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा.
"OLYMPUS E-PL1 with Chinon 55mm f1.7"
OLYMPUS E-PL1 with Chinon 55mm f1.7

एक नुसतेच कॉम्पोझिशन (तरी प्रत्यक्षात जेवढे दिसत होते तेवढे पकडता आले नाही, लेन्स ५०मिमि असल्याने.)
"OLYMPUS E-PL1 with Canon FD 50mm f1.8"
OLYMPUS E-PL1 with Canon FD 50mm f1.8

१. छान
२. सुंदर

मदनबाण's picture

1 Apr 2013 - 9:52 am | मदनबाण

निशांत आणि वाचक तुम्हा दोघांचे फोटो मस्त आहेत.
उत्तम Bokeh साठी पर्चर व्हॅल्यू जशी महत्वाची आहे,त्याच बरोबर मूळ सबजेक्ट कसा फोकस करता त्यावर सुद्धा योग्य नियंत्रण हवे,तसेच झूम फॅक्टर सुद्धा Bokeh वर परिणाम करतो.
१)फोकस लॉक करुन झूम मधे बदलाव करुन तुम्ही अपेक्षित बदलाव करु शकता किंवा २) लेन्स मॅन्युअल मोड मधे टाकुन हाताने फोकस अ‍ॅडजेस्ट करु शकता. माझ्या वरील फोटोत या दोन्ही पद्धतीचा वापर केला आहे.

@निशांत - मस्त फोटो आहे. पण त्याच्या डाव्या बाजूचा ब्राईटनेस थोडा वाढवला तर अजून सुंदर दिसू शकेल फोटो. (असं माझं वैयक्तिक मत हं)
@वाचक - दोन्ही फोटो सुरेख. पण पहिला प्रचंड आवडला.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Apr 2013 - 1:00 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त रे मदन राजाध्याक्ष.

मदनबाण's picture

2 Apr 2013 - 9:07 am | मदनबाण

मदन राजाध्याक्ष.
बाब्बो... त्यांच्या नखाची सर सुद्धा माझ्याकडे नाही,त्यांच्या शिष्येकडुन २-४ टिप्स शिकायला मिळाल्यात हेच माझ्यासाठी मोठ्या भाग्याची गोष्ट आहे.

चिगो's picture

1 Apr 2013 - 1:57 pm | चिगो

एकदम कामाचा, "शिक्षक" लेख.. सगळेच फटू आवडले.

मैत्र's picture

1 Apr 2013 - 6:55 pm | मैत्र

Diwali

मूळ चित्राचे रिझोल्युशन चांगले असूनही इथे नीट दिसत नाहीये..

उदय's picture

2 Apr 2013 - 3:19 am | उदय

बोके मुख्यतः लेन्सच्या Depth of field (मराठी?) वर अवलंबून असतो, असा माझा अनुभव आहे. Depth of field जितकी कमी असेल, तितका बोकेचा परिणाम उठून दिसतो. त्यामुळे अपर्चर (लेन्सचा डोळा) जास्त उघडा ठेऊन (for same focal length) किंवा लेन्सची फोकल लेंथ वाढवून (for same aperture) बोके आणता येतो. चित्र बघा माझ्या अनुभवाप्रमाणे फोकल लेंथ वाढवणे हे अधिक सोपे असते, त्यामुळे टेलिफोटो लेन्सने बोके चांगला दिसतो (standard/wide angle lens पेक्षा).

उदा: बोके दाखवण्यासाठी मी काढलेले फोटो टाकत आहे. wide angle lens मुळे foreground आणि background दोन्ही शार्प दिसत आहेत, त्यामुळे बोके दिसत नाही. पण त्याच जागी उभे राहून टेलिफोटो लेन्स वापरली, तर बोके दिसतो.

बोके दिसत नाही.
photo1
किंचीत बोके
photo2
बोके दिसत नाही.
photo3
बोके
photo4

वाचक's picture

2 Apr 2013 - 6:03 am | वाचक

पण मला वाटते की ह्यात जास्त अ‍ॅपर्चर पेक्षा चित्र-विषय आणि त्यामागचे अंतर खूपच जास्त असल्यामुळे आलेला बोके ईफेक्ट जास्त आहे.

ही तुमची 'मेगा झूम' लेन्स असावी का? - १८-२०० वगैरे ?
निकॉन्/सोनी चा कॅमेरा असावा. इतका अचूक व्हाईट बॅलन्स नेहेमी बघायला मिळत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Apr 2013 - 6:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

समजून घेण्यासाठीही फोटो उत्तम आहेत.

पण मला वाटते की ह्यात जास्त अ‍ॅपर्चर पेक्षा चित्र-विषय आणि त्यामागचे अंतर खूपच जास्त असल्यामुळे आलेला बोके ईफेक्ट जास्त आहे.

हे प्रत्येक वेळेलाच होत नाही का? प्रत्यक्ष अंतर किती आहे यापेक्षा भिंग ते चित्र-विषय यातलं अंतर आणि भिंग-पार्श्वभूमीला असणार्‍या गोष्टी, व्यक्ती यांच्यातल्या अंतराचं गुणोत्तर जेवढं अधिक व्यस्त तेवढा हा परिणाम अधिक ठसठसशीत दिसणार.

@वाचक
निकॉन कॅमेरा आहे, ५५-३०० मिमी. निक्कॉर लेन्स.

@अदिती
Depth of field वर अवलंबून आहे. भिंग ते चित्र-विषय यातलं अंतर आणि पार्श्वभूमीला असणार्‍या गोष्टी या समान ठेवल्या असताना, टेलिफोटो लेन्सने बोके मिळेल पण wide angle लेन्सने मिळणार नाही, असे होऊ शकते. Practically speaking, wide angle lenses offer more depth of field at a particular subject distance and aperture. This is useful if you want to maximize sharpness of a wider zone, but not very useful when you would rather isolate your subject using selective focus (for which telephoto lens is better).

a

जमलाय का?

मदनबाण's picture

2 Apr 2013 - 9:30 am | मदनबाण

@ वाचक
तांत्रिक गोष्ट शि़कण्यासाठीचा काही सोप्या गोष्टी तुम्हाला सांगतो...
१) कॅमेर्‍याचे मॅन्युअल संपूर्ण वाचुन काढा.
२)कॅमेर्‍यात जितके शुटिंग मोड आहेत त्या सर्वात फोटो काढुन पहावेत्,त्यामुळे प्रत्येक मोड मधे फोटोत काय फरक पडतो या बद्धल बरीच माहिती मिळेल
३)मॅन्युअल मोडमधे जितका वेळ फोटो काढता येतील तितके काढा त्यात एफ नंबर आणि शटर स्पीड यांचे खेळ करुन पहा बर्‍याच गोष्टी कळतील
४)अचुक फोकस साधण्यासाठी प्रयत्न करत रहा.
५)ज्या प्रमाणे हातात नविन मोबाईल आल्यावर आपण त्यातले सगळे ऑपशन्स बघतो आणि वापरतो तेच कॅमॅरॅ बरोबर करा.
६)जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फोटो काढा, मी स्वतः अगदी असेच करतो... समोर येणारी प्रत्येक वस्तु विषय मानुन त्याला अचुक टिपण्याचा ध्यास ठेवावा.
६) एकादी गोष्ट येण्यास / शिकण्यास वेळ लागु शकतो,त्यामुळे मला अत्ताच आले पाहिजे अश्या अट्टहासाने फोटो काढु नका, प्रयोगाअंती, परफेक्ट् फोटो. तेव्हा भरपुर प्रयोग करा. टेक्नीक अपोआप कळायला लागेल
७) इतरांचे फोटो पहा आणि त्यातुन काय शिकता येईल याचा विचार करा.
८) कॅमेरा कोणताही असला तरी फोटो काढणार्‍याचे कौशल्य महत्वाचे,डिजीटल कॅमॅर्‍यामुळे लोक जरा आळशी झाले आहेत असे मला वाटते,पूर्वी रोलचा कॅमॅरा असल्याने आणि रोल फुकट जाईल या भितीने देखील प्रत्येक फोटो नीट कंपोझ करुन काढला जाई.पण आता कितीही फोटो काढण्याची मुभा डिजिटल कॅमेर्‍याने मिळाल्याने घाई घाईने अनेक फोटो काढुन ते डिलीट करतात.! भरपुर फोटो काढायची सोय झाली आहे ना...,मग याचा फायदा घ्या ! म्हणजे भरपुर फोटो काढा,पण त्यात अचुकता आणण्याचा भरघोस प्रयत्न करा.
मी या विषयातील तज्ञ नाही,तुमच्या सारखाच सामान्य फोटोग्राफर आहे,जे मी केले /करतो,आणि शिकलो त्यातलेच काही मुद्दे वर दिले आहेत.

एस's picture

2 Apr 2013 - 11:10 pm | एस

८) कॅमेरा कोणताही असला तरी फोटो काढणार्‍याचे कौशल्य महत्वाचे,डिजीटल कॅमॅर्‍यामुळे लोक जरा आळशी झाले आहेत असे मला वाटते,पूर्वी रोलचा कॅमॅरा असल्याने आणि रोल फुकट जाईल या भितीने देखील प्रत्येक फोटो नीट कंपोझ करुन काढला जाई.पण आता कितीही फोटो काढण्याची मुभा डिजिटल कॅमेर्‍याने मिळाल्याने घाई घाईने अनेक फोटो काढुन ते डिलीट करतात.! भरपुर फोटो काढायची सोय झाली आहे ना...,मग याचा फायदा घ्या ! म्हणजे भरपुर फोटो काढा,पण त्यात अचुकता आणण्याचा भरघोस प्रयत्न करा.

+१