हॉटेलात गाण्याच्या भेंड्याबिंड्या खेळून बोअर मारू नका! त्यापेक्षा मिसळ खा आणि आपापल्या घरी जा! त्या तात्याला नाही धंदा, म्हणून त्याने हे हॉटेल चालू केलंनीत! दुसरं काय? ;)
अवांतर - ए पोर्या फडका मार आणि एक कडक मिसळ घेऊन ये तर्री मारून! पावपण दे. पंखा चालू कर, आणि जरा तो पेपर दे वाचायला बघू!
अहो प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती का? ह्या अंताक्षरी खेळणार्या लोकांनी मिसळपावची ऑर्डर दिली आहे. ती यायला लय वेळ लागत आहे. म्हणुन बसले आहेत सगळे खेळत. काय?
- संताजी धनाजी
कुडता लालेलाल,त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल,त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवीत आला टांगेवाला !! हे गीत आम्हाला म्हणायचे होते आता आम्ही नाय खेळणार जा !
चम चम करता है ये नशीला बदन
हय हय हय हय
करना चाहे हर कोई मुझसे मिलन
हय हय हय हय
मदभरे ये होट गुलाबी
करले अपनी रात शराबी
बेताबी है मनमे है मिठी चुभन
हय हय हय हय
मराठी चित्रपटः अगंबाई अरेच्चा मधील गाणे.
म्हणजे मराठीच! नाही का?
चल रे वाघ्या बीगी बीगी वाट कुणाची पाहू नको
दुनिया सारी जरी पलटली वाट कुणाची पाहू नको
माझा वाघ्या ! माझ्या वाघ्या !
( दादा कोंडके च्या पीच्चरमधलं झोकदार गाण हाये)
डॉक्टर ..आपल्या उत्तरांमध्ये एकाच सेकंदाचा फरक आहे. पण माझ्या गाण्यात ल आणि तुमच्यात न शेवटी येते तेव्हा पुढच्या खेळाडूने कोणत्याही ल किंवा न कुठलेही अक्षर वापरले तरी चालेल.
प्रतिक्रिया
17 Sep 2007 - 10:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रेशमाच्या रेघांनी लाल काळ धाग्यांनी
हात नका लावू माझ्या साडीला.
ल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
17 Sep 2007 - 10:51 am | आजानुकर्ण
डोळं नाही थार्याला
एकटक पाहू कसं
लुकलुक तार्याला
17 Sep 2007 - 10:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लाजून हसणे अन हसून पाहणे
ओळखून आहे,सारे तुझे बहाणे.
ण. न.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
17 Sep 2007 - 10:56 am | आजानुकर्ण
नाम घेता मुखी राघवाचे
दास रामाचा हनुमंत नाचे
हो
दास रामाचा हनुमंत नाचे
17 Sep 2007 - 11:00 am | प्रकाश घाटपांडे
चांदणे शिंपित जाशी
चालता तू चंचले
प्रकाश घाटपांडे
17 Sep 2007 - 11:00 am | राजीव अनंत भिडे
हॉटेलात गाण्याच्या भेंड्याबिंड्या खेळून बोअर मारू नका! त्यापेक्षा मिसळ खा आणि आपापल्या घरी जा! त्या तात्याला नाही धंदा, म्हणून त्याने हे हॉटेल चालू केलंनीत! दुसरं काय? ;)
अवांतर - ए पोर्या फडका मार आणि एक कडक मिसळ घेऊन ये तर्री मारून! पावपण दे. पंखा चालू कर, आणि जरा तो पेपर दे वाचायला बघू!
राजीव भिडे.
23 Dec 2008 - 8:27 pm | संताजी धनाजी
अहो प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती का? ह्या अंताक्षरी खेळणार्या लोकांनी मिसळपावची ऑर्डर दिली आहे. ती यायला लय वेळ लागत आहे. म्हणुन बसले आहेत सगळे खेळत. काय?
- संताजी धनाजी
17 Sep 2007 - 11:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चल ग सखू चल ग सखू
पंढरीला !
जय हरी विट्ठल !
त्या मिसळमधी जरा गाण्याची तर्री मारुन दे रे भो ;) राजीव साहेबाला.
17 Sep 2007 - 11:04 am | आजानुकर्ण
लाल टांगा घेऊनी आला लाल टांगेवाला
ऐका लाला गातो गाणी लल्लल्ललल्लल्ल ला ला.
17 Sep 2007 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुडता लालेलाल,त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल,त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवीत आला टांगेवाला !! हे गीत आम्हाला म्हणायचे होते आता आम्ही नाय खेळणार जा !
17 Sep 2007 - 11:12 am | आजानुकर्ण
सखू चं गाणं पण तुम्हीच म्हटलं आणि टांगेवाल्याचं पण? हे कसं शक्य आहे?
17 Sep 2007 - 11:54 am | प्रकाश घाटपांडे
लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखर्याच
बोल ना ग मंजुळ मैनेच
17 Sep 2007 - 11:56 am | सहज
बोल ना ग मंजुळ मैनेच... नारी ग्ग ग ग ग ग
गोमू संगतीन माझ्या तू येशील काय?
माझ्या पीरतीची रानी तू होशील काय?
य
17 Sep 2007 - 11:58 am | आजानुकर्ण
या गो दांड्यावरनं बोलतोय नवरा कुणाच येतो
त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक
त्यांनी नेसल्या गो नेसल्या पैठणी साड्या
पुढचं आठवतंय का कोणाला
नाही तर य घ्या.
17 Sep 2007 - 12:12 pm | स्वाती दिनेश
या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या,
जाहल्या तिन्ही सांजा..
17 Sep 2007 - 12:13 pm | आजानुकर्ण
जग हे बंदिशाळा, जग हे बंदिशाळा
कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला
जग हे बंदिशाळा
ळ-ल
17 Sep 2007 - 12:26 pm | स्वाती दिनेश
लेक लाडकी या घरची ,होणार सून मी त्या घरची...
17 Sep 2007 - 1:48 pm | सागर
चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी
झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी
राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी
अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी
माफ करा सगळं गाणं देतोय. पण सर्ज्या चित्रपटातले हे खूप छान गाणे असल्यामुळे देत आहे.
"न" वरुन
17 Sep 2007 - 1:53 pm | सहज
खल्लास गाण आहे खर.
17 Sep 2007 - 3:48 pm | जुना अभिजित
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
ढगांशी वारा झुंझला रे
काला काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी मीच देते टाळी
फुलव पिसारा नाच
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच..
च घ्या च..
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
17 Sep 2007 - 4:25 pm | प्रकाश घाटपांडे
आता तुझी पाळी मीच देते टाळी
मी पुर्वी असंच म्हणायचॉ. पण ते वीज देते टाळी अस आहे.
प्रकाश घाटपांडे
17 Sep 2007 - 3:52 pm | आजानुकर्ण
चम चम करता है ये नशीला बदन
हय हय हय हय
करना चाहे हर कोई मुझसे मिलन
हय हय हय हय
मदभरे ये होट गुलाबी
करले अपनी रात शराबी
बेताबी है मनमे है मिठी चुभन
हय हय हय हय
मराठी चित्रपटः अगंबाई अरेच्चा मधील गाणे.
म्हणजे मराठीच! नाही का?
17 Sep 2007 - 4:33 pm | उग्रसेन
चल रे वाघ्या बीगी बीगी वाट कुणाची पाहू नको
दुनिया सारी जरी पलटली वाट कुणाची पाहू नको
माझा वाघ्या ! माझ्या वाघ्या !
( दादा कोंडके च्या पीच्चरमधलं झोकदार गाण हाये)
17 Sep 2007 - 4:56 pm | आजानुकर्ण
'य' आलाय. च चं गानं लिव्हलं की!
17 Sep 2007 - 5:03 pm | उग्रसेन
माय मराठीच्या परिक्शकांनी अंताकशरीत हे गाणं बाद केलेले हाये.
मराठी मातीचा वास नाय येत तेला.
तव्हा येतं का 'घ'पसून नै जमलं तर 'ग' देतो.
17 Sep 2007 - 5:17 pm | आजानुकर्ण
घर थकलेले संन्यासी
हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळयामधले
नक्षत्र मला आठवते
17 Sep 2007 - 5:19 pm | जुना अभिजित
घन ओथंबून येती
बनात राघू फिरती
डोंगरघाटा(इकडे तिकडे चू. भू. दे. घे.)
वेढीत वाटा
वेढीत मजला नेती
घन ओथंबून येती
त घ्या त..
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
17 Sep 2007 - 5:22 pm | आजानुकर्ण
असे आहे.
17 Sep 2007 - 5:24 pm | आजानुकर्ण
तू तेव्हा तशी
तू तेव्हा अशी
तू बहराच्या बाहूंची
तू तेव्हा तशी
तू तेव्हा अशी
तू ऐलराधा,
तू पैल संध्या
चाफेकळी
प्रेमाची
तू तेव्हा तशी
तू तेव्हा अशी
17 Sep 2007 - 5:27 pm | नंदन
कळले सारे शब्दांच्या पलीकडले,
प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
17 Sep 2007 - 5:33 pm | उग्रसेन
कुठं 'श' चे गाणं म्हणा
17 Sep 2007 - 5:33 pm | आजानुकर्ण
काय बाबूराव, लिव्हलंय नव्हं थितं?
17 Sep 2007 - 5:33 pm | आजानुकर्ण
लाजली सीता स्वयंवराला
पाहुनी रघुनंदन सावळा
ळ-ल
17 Sep 2007 - 5:55 pm | उग्रसेन
लेक चालली सासरला
गाणं येत नाय नुस्त रडू येऊ राह्यलं
17 Sep 2007 - 6:02 pm | आजानुकर्ण
जरा रुमाल बाजूला ठेवून निदान शब्द द्या की. मग लावा परत पदर डोळ्याला.
17 Sep 2007 - 6:06 pm | उग्रसेन
लाज लाजरी गोड गोजीरी ताई तु होणार नवरी
फुला फुलाच्या बांधून माळा ताई तु होणार नवरी.
17 Sep 2007 - 6:13 pm | आजानुकर्ण
असं असावं ते.
ठीक आहे.
17 Sep 2007 - 5:58 pm | टिकाकार
या अन्ताक्शरिचा वयोगट काय आहे?
टिकाकार
17 Sep 2007 - 6:00 pm | आजानुकर्ण
या वयोगटासाठी फार लहान आहात. हा खेळ फक्त हाफ तिकीट वाल्यांसाठी आहे.
17 Sep 2007 - 6:03 pm | उग्रसेन
काड्या घालाचं काम नका करु.
इथं वयाचं काय संबंध लहान पोराला गाणं येतं अन मोठ्याला बी येतं
17 Sep 2007 - 6:09 pm | टिकाकार
मित्रान्नो,
इन्डिआ चा जिडिपी ग्रोथ रेट कमी होत आहे हे माहित आहे का?
टिकाकार
17 Sep 2007 - 6:13 pm | आजानुकर्ण
मग?
आणि मिसळपाव आणि माहितीचा काय संबंध?
17 Sep 2007 - 6:20 pm | जुना अभिजित
अंताक्षरीमध्ये असे प्रश्न विचारल्यामुळे कमी होत असावा..
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
17 Sep 2007 - 6:16 pm | आजानुकर्ण
रात्रीस खेळ चाले
या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही
हा खेळ सावल्यांचा
हा चंद्र ना स्वयंभू
रवितेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा
अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होय साक्षी
हा दूत चांदण्यांचा
आभास सावली हा
असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते
असती नितांत भास
हसतात सावलीला
हा दोष आंधळयांचा
या साजीर्या क्षणाला
का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका
उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या
या धुंद जीवनाचा
हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा
17 Sep 2007 - 6:21 pm | उग्रसेन
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी
आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे
तेजी दिशा गेल्या आटून
कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे
17 Sep 2007 - 6:26 pm | स्वाती दिनेश
रे तुझ्या वाचून काही येथले अडणार नाही,
रे तुझ्या वाचून वीणा बंद ही पडणार नाही..
17 Sep 2007 - 6:39 pm | जुना अभिजित
ही वाट दूर जाते स्वप्नामधिल गावा
माझ्या मनांतला का तेथे असेल रावा
जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा
घे साउली उन्हाळा कवळून बाहुपाशी
लागून ओढ वेडी खग येती कोटरासी
एकेक चांदणीने नभदीप पाजळावा
स्वप्नामधिल गांवा स्वप्नामधून जावे
स्वप्नांतल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे
स्वप्नांतल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा
वा घ्या वा.. डोक्यातल्या नव्हे.. :-))
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
17 Sep 2007 - 6:51 pm | स्वाती दिनेश
वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम..
17 Sep 2007 - 8:30 pm | आजानुकर्ण
मक्याच्या शेतात एकलीच होते
ठाऊक नव्हतं कुणा
उभ्या पिकामधी आडवा घुसतोय
हाये कोण ह्यो पाहुणा
- अगंबाई अरेच्चा
17 Sep 2007 - 9:19 pm | प्रकाश घाटपांडे
नको मारुस हाक मला घरच्यांचा धाक,
भर बाजारी करिशी खुणा
करु नको पुन्हा हा गुन्हा
आता कंच अक्षर द्याव ह घ्या
प्रकाश घाटपांडे
17 Sep 2007 - 9:57 pm | विकास
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
संगा सर्वा दिसता कसो खंडाळ्याचो घाट...
ट = त
19 Sep 2007 - 2:28 am | नंदन
'संगा सर्वा' च्याऐवजी 'सांग गो चेडवा '(मुली) हवे. छिद्रान्वेषीपणाबद्दल क्षमस्व.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
20 Sep 2007 - 10:44 pm | जगन्नाथ
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
संगा सर्वा दिसता कसो खंडाळ्याचो घाट...
हे असलं मराठी लादणं बरोबर नाही हां . . .
सांग गो च्यडवा दिसतां कसॉं
असं पाहिजे.
चेडू म्हणजे "सुबक ठेंगणी" . . .
17 Sep 2007 - 9:23 pm | विसोबा खेचर
या दिल की सुनो दुनियावालो...
हेमंतदांचं हे फार छान गाणं आहे!
17 Sep 2007 - 10:09 pm | प्रकाश घाटपांडे
तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी
एकांती मज समीप तीच तू ही कामिनी
'न 'घ्या
प्रकाश घाटपांडे
17 Sep 2007 - 10:13 pm | विकास
नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे उर भरू
श्रीरामाचे नाव गात या श्रीरामाला पार करू
जय गंगे जय भागिरथी, जयजय राम दाशरथी
"थ" अथवा "त"
17 Sep 2007 - 10:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे
अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे
(मराठी गझल सम्राट सुरेश भट यांची झक्कास गझल)
18 Sep 2007 - 12:06 am | मुकुन्द
मुकुन्द
रे मना बघ तुला कोण रे साद घाली
ल आल परत
18 Sep 2007 - 8:11 am | आजानुकर्ण
लेक लाडकी या घरची
होणार सून मी त्या घरची
होणा$$र सून मी त्या घरची
होणा$$र सून मी त्या घरची
18 Sep 2007 - 8:34 am | जुना अभिजित
चांद मातला मातला त्याला कशी आवरू
अंगी वणवा चेतला मला कशी सावरू
र घ्या...रघ्या नव्हे.. र..घ्या र
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
18 Sep 2007 - 8:39 am | विकास
रुपानं देखणी रंगान चिकनी
कोकीळेचा गळा ग बाई माझ्या बकरीचा ब्यॅ...
संमद्यास्नी लागलाय लळा!
ब्यँ आले ! :)
नाही जमले तर "ल" घ्या
18 Sep 2007 - 9:42 am | जुना अभिजित
लटपट लटपट तुझं चालणं ग मोठ्या नखर्याचं
बोलणं ग मंजूळ मैनेच
नारी ग$$ नारी ग$$$ नारी ग नारी ग नारी ग..
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
18 Sep 2007 - 2:55 pm | उग्रसेन
भेंड्यासाठी त्याच त्याच गाण्याच्या कडवी देउ नै
असं झाल्यावर अंताकशरीत मज्या येणार नाय.
18 Sep 2007 - 3:17 pm | जुना अभिजित
नकळत घडले सारे मित्रा..ल वरून दुसरं गाणं म्हणतो मग तर झालं..
लाल लाल लाल लाल तापलाय तवा
सांग पोरी चपाती भाजू कवा..
व आला आता.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
18 Sep 2007 - 4:13 pm | आजानुकर्ण
वाट पाहूनि जीव शिणला,
दिसामागुनी दिस ढळला
सुर्व्या आला तळपून गेला
मावळतीच्या *अंधाराला गं
गडनी सखे गडनी
*चू.भू.दे.घे.
18 Sep 2007 - 4:29 pm | प्रकाश घाटपांडे
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला,
सागरा!
र घ्या { आयडिया केली की नाही?}
प्रकाश घाटपांडे
18 Sep 2007 - 4:34 pm | आजानुकर्ण
राजसा जवळी जरा बसा
जीव हा पिसा
तुम्हाविण बाई
कोणता करू शिणगार सांगा तरी काही
काय सुरेखाताई.
18 Sep 2007 - 4:46 pm | प्रकाश घाटपांडे
हिल हिल पोरी हिला, तुझ्या कप्पाळीला टिळा,
तुझ्या कप्पाळीला टिळा न फ्याशन मर्हाटी शोभे तुला
प्रकाश घाटपांडे
18 Sep 2007 - 5:59 pm | तर्री
तिन्हिसन्ज सखे मिळाल्या/...................
18 Sep 2007 - 6:05 pm | प्रकाश घाटपांडे
ल अक्षर आले आहे, त नाही.
प्रकाश घाटपांडे
18 Sep 2007 - 6:18 pm | उग्रसेन
अंताकशरी खेळना-यांनी 'ल' वर गाणं आनू नै
लै अवघड होतं मंग.
18 Sep 2007 - 9:12 pm | आजानुकर्ण
लळा जिव्हाळा शब्दच खोटे, मासा मासा खाई
कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही
लळा जिव्हाळा शब्दच खोटे
पिसे सनतडी, काड्या जमवी चिमणी बांधी कोटे
दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे
बळावता बळ पंखामधले पिल्लू ऊडूनी जाई
बाबूजींचे अप्रतिम गाणे...
ई घ्या.
18 Sep 2007 - 9:17 pm | स्वाती दिनेश
ती गेली तेव्हा रिमझिम ,पाऊस निनादत होता...
त..
18 Sep 2007 - 9:20 pm | आजानुकर्ण
-->पिल्लू ऊडूनी जाई
ई आला आहे.
19 Sep 2007 - 2:51 pm | जुना अभिजित
ई च्या ऐवजी इ चालत असेल तर घ्या...
इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची
आता मी ल ची गाणी आठवून ठेवलेत तर ल यायचाच बंद झालाय..
च घ्या च.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
19 Sep 2007 - 3:02 pm | स्वाती दिनेश
चंदाराणी,का ग दिसतेस थकल्यावाणी?
चंदाराणी..शाळा ते घर्,घर ते शाळा..आम्हा येतो कंटाळा...
चंदाराणी..
न घ्या..
19 Sep 2007 - 4:37 pm | आजानुकर्ण
नाच नाचूनी अती मी दमले
थकले रे नंदलाला
थकले रे नंदलाला
19 Sep 2007 - 5:31 pm | स्वाती दिनेश
लष्करचे सुख काय सांगू गे,
अग मी तुजला नारी..
तुझ्यास्तव सोडूनी आलो घरी..
19 Sep 2007 - 5:41 pm | जुना अभिजित
रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा
कोण्त्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा?
सागती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा
चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
आलं परत ल...
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
19 Sep 2007 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना
बनात ये ना, जवळ घे ना
चंदेरी चाहूल, लावित प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
19 Sep 2007 - 5:45 pm | जुना अभिजित
डॉक्टर ..आपल्या उत्तरांमध्ये एकाच सेकंदाचा फरक आहे. पण माझ्या गाण्यात ल आणि तुमच्यात न शेवटी येते तेव्हा पुढच्या खेळाडूने कोणत्याही ल किंवा न कुठलेही अक्षर वापरले तरी चालेल.
ल किंवा न घ्या..
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
19 Sep 2007 - 6:25 pm | स्वाती दिनेश
नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत,
परी सारे हलक्याने आड येते रीत..
(शब्द इकडे तिकडे झाले असतील..)
19 Sep 2007 - 6:26 pm | आजानुकर्ण
नाही कशी म्हणू तुला
म्हणते रे गीत
परी सारे हलक्याने
आड येते रीत
नाही कशी
श श शहामृगाचा
19 Sep 2007 - 6:28 pm | स्वाती दिनेश
माझे शब्द बरोबर होते तर..
कर्णा,ग्रेट पिपल थिंक अलाइक..
19 Sep 2007 - 6:32 pm | आजानुकर्ण
वा!
20 Sep 2007 - 2:07 pm | उग्रसेन
शालू हिरवा ....
येणार साजन माझा !
20 Sep 2007 - 2:45 pm | जुना अभिजित
लताजींच्या आवाजात सुधीर मोघे यांच मधुर गाणं.
झुलतो बाई रास झुला
नभ निळे रात निळी, कान्हा ही निळा
झुलतो बाई रास झुला
आयशपथ हा 'ल' काही पाठ सोडत नाही.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
20 Sep 2007 - 2:48 pm | स्वाती दिनेश
लाल लाल पागोटे गुलाबी शेला,
चिंट्यादादा आला(की गेला..असेच काहीतरी आहे),जीव झाला खुळा..
20 Sep 2007 - 3:24 pm | टीकाकार-१
या अंताक्षरीचा अंत कधी होनार?
20 Sep 2007 - 4:25 pm | जुना अभिजित
लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा
विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्यसुंदर मस्तकी बाळा
तेथूनीया जळ निर्मळ वाहे झुळझुळा
तरी वाटलेलंच की 'ल' परत येतोय..
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित