संक्षीप्तानुभव

इनिगोय's picture
इनिगोय in जनातलं, मनातलं
17 Dec 2012 - 9:30 am

मिपाच्या काही सदस्यांशी नुकत्याच गप्पा झाल्या. मिपावर येणारे जिलब्यापाडू धागे, धोधो येणारी खल्लास विडंबनं, नवलेखकांचा नवखा उत्साह, स्वतःची मतंच खरी मानणारे, ती दामटणारे काही सदस्य असं सगळंच त्यात आलं.
मग पुढे लेखन कसं हवं, कसं नको, प्रतिक्रिया कशा द्याव्या, कशा नसाव्या हेदेखील. या निमित्ताने पटणाऱ्या, न पटणाऱ्या बऱ्याच गोष्टींची उजळणी झाली.

या सगळ्या उचापतीचा सारांश म्हणून हे जिलबीचं ताट.. हे ताट भरायला हातभार लावणाऱ्या (आणि लावणार असलेल्याही) इतर बल्लवांचेही आभार. :-D
...

मिसळपावच्या दुनियेमध्ये आहेत काही सदस्य
त्यांच्यापैकी एकांचे काही कळेना हे रहस्य

न लागू दे टोटल तरी धागे तू काढावे
गरज असो नसो भले प्रतिसादही द्यावे

चर्चा होईल वादळी, परि अर्थ? .. शून्य.
झाला नाही उपयोग तरी तू मात्र धन्य.

म ची बाराखडी आहे विशेष प्रिय तुला
सदा तुझा घोष सुरू - मी.. माझे.. मला.

नसलेल्या मुद्यावर शब्दाळल्या भाषी
एकुलत्या एका संदर्भावर लिही लिही लिहिशी

बघता बघता जमून येते वाचकांची गर्दी
४०, ५०, ६० प्रतिसाद.. होत राहते भरती

धाग्यावरती आल्यावर चालवायची शाब्दिक कात्री
एकेकट्या सदस्याशी मात्र करायची असते मैत्री

तुझ्या मताविना वेगळे असूच नये काही
दरवेळी हाच हट्ट..? असं बरं नाही.

ऎकवले कोणी चार शब्द की खट्टू होते मन
आपलंच असं का होतं हे बघायचं नाही पण

गाणं, कविता, अध्यात्म, असो कोणताही 'विषय'
सग्गळ्यातलं सग्गळं तुलाच कळतं. खरंच का रे ...असंय?

वावरसंस्कृतीकविताविडंबन

प्रतिक्रिया

अक्षया's picture

17 Dec 2012 - 9:35 am | अक्षया

अगदी मनातले लिहीलेत. :)

लीलाधर's picture

17 Dec 2012 - 9:41 am | लीलाधर

मस्तच की इनिगोय लाखातले एक मांडले आहे बरं का :)

स्पा's picture

17 Dec 2012 - 9:51 am | स्पा

=)) =))

शिर साष्टांग दंडवत.

मूकवाचक's picture

17 Dec 2012 - 10:24 am | मूकवाचक

_/\_

माननीय अक्षया / मा. चचा / मा. स्पाऊ / मा. मूकवाचक...

मज पामराला याबद्दल अधिक माहिती देता का प्लीज? व्यनी केला तरी चालेल.

कवितानागेश's picture

17 Dec 2012 - 12:01 pm | कवितानागेश

आधी 'पामर' या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ सांग बरे लब्बाडा. :D

लीलाधर's picture

17 Dec 2012 - 6:40 pm | लीलाधर

+ 1
100% सहमत लीमाउशी :)

मूकवाचक's picture

17 Dec 2012 - 12:18 pm | मूकवाचक

समझ समझ के समझ को समझो, समझ समझना भी एक समझ है।
समझ समझ के जो न समझे, मेरी समझ में वो नासमझ है।

अक्षया's picture

17 Dec 2012 - 12:35 pm | अक्षया

+१

सस्नेह's picture

17 Dec 2012 - 3:41 pm | सस्नेह

आपकी नजरोने समझा व्यनीके काबिल मुझे
सब प्रतिसादको ठहर जा मिल गया कातिल मुझे..

बॅटमॅन's picture

17 Dec 2012 - 12:40 pm | बॅटमॅन

हाण्ण तेच्या मारी =))

स्पंदना's picture

17 Dec 2012 - 12:54 pm | स्पंदना

हं!

एकुण ऑरगॅझॅमिक लेखन दिसतय.

गवि's picture

17 Dec 2012 - 1:03 pm | गवि

कवितेविषयी नंतर..

भूछत्र आणि कोडाईकॅनाल हे काय आहे ते आधी कोणीतरी सांगा आणि अडाण्याचा दुवा घ्या.. (जालीय दुवा नव्हे.. )

कवितानागेश's picture

17 Dec 2012 - 1:17 pm | कवितानागेश

भूछत्र आणि कोडाईकॅनाल हे काय आहे>
उपरोक्त माहितीसाठी कृपया 'संपादक मंडळ' या आयडीला व्यनि करा. :D

पैसा's picture

17 Dec 2012 - 6:13 pm | पैसा

मला पण पाठवा.

येक कॉपी हिकडंपन पाट्वा बरं का ;)

ते कोडाईकनालचे भूछत्र कवितेबरोबर बाय डिफॉल्ट चिकटते.

या विषयी जास्ती बोललो तर अवांतर होवून आमच्या आधीच्या विडंबनाच्या आठवणी निघतील म्हणून इतकेच. ;-)

कवितेबरोबर नव्हे, जिलबीबरोबर्! चिकट असते ना जिलबी..

एस's picture

18 Dec 2012 - 11:15 pm | एस

भूछत्र आणि कोडाईकॅनाल हे काय आहे>
उपरोक्त माहितीसाठी कृपया 'संपादक मंडळ' या आयडीला व्यनि करा.

वेल, ही खरंच काय भानगड आहे बरं? कृपया कुणीतरी मला व्यनि करून सांगा... :P व्यनि पाठवणार्‍याचा आयडी गुप्त ठेवला जाईल.. :D

नक्की कारण माहिती नाही...

पण धाग्याची वर्गवारी करताना "काव्य" विभाग निवडलाकी "भूछत्र आणि कोडाईकॅनाल" आपोआप चिकटते.

अभ्या..'s picture

17 Dec 2012 - 1:16 pm | अभ्या..

लैच बारीक निरिक्षण बाबौ.
नेक्स्ट ट ट टSSSSSSS ?

गणपा's picture

17 Dec 2012 - 2:45 pm | गणपा

बेक्कार सहमत. :)

Dhananjay Borgaonkar's picture

17 Dec 2012 - 3:47 pm | Dhananjay Borgaonkar

आगगाग्गा....याला म्हणतात शालजोडीले...
लैच भारी लिवलय...___/\___

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Dec 2012 - 3:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

और भी आने दो. :)

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

17 Dec 2012 - 7:26 pm | किसन शिंदे

अभ्यास लै दांडगाय ब्वा तुमचा. ;)

५० फक्त's picture

18 Dec 2012 - 10:54 pm | ५० फक्त

लै भारी लिहिलंय, ते इंग्रजीमध्ये असतंय ना एसे रायटिंग अन प्रेसे रायटिंग तसलं काही.

प्यारे१'s picture

18 Dec 2012 - 11:08 pm | प्यारे१

अरेच्चा.... हे चावायचं आपलं वाचायचं राहूनच गेलं.

ह्याची बॅलन्स शीट बनवायला एखाद्या 'सी ए' कडं च जावं लागणार की वो इनिगोय!

कुनी हाय काय 'वळकीचं'? ;)

इष्टुर फाकडा's picture

18 Dec 2012 - 11:09 pm | इष्टुर फाकडा

काय प्रतिसाद पाडावा समजेना झालंय :) वर्गवारीत सामील होण्याची भीती आहे ;)

एक तर वर्गात या नाहीतर वारीत, उगा चौरस्त्यावर उभं नका राहु.

इष्टुर फाकडा's picture

19 Dec 2012 - 3:09 pm | इष्टुर फाकडा

पुंडलिक वरदे हारीठ्ठल, स्री द्य्नादेव तुकाराम...
फंडरीनात म्हाराज कि जय, ज्ञानेस्वर म्हाराज कि जय, झालंस्तर पिंपळपार म्हाराज कि जय.....
:)

अनिल तापकीर's picture

20 Dec 2012 - 5:19 pm | अनिल तापकीर

चांगभलं

अन्या दातार's picture

20 Dec 2012 - 9:49 pm | अन्या दातार

आमचेही चार आणे.
नसलेल्या मुद्द्यावर, शब्दाळल्या हाती
एकल्या संदर्भावर लिहित तू राही

अंती येशी कोपयाशी, दुखावेल मन
पायाखाली घसरलेले वाळूचे अंगण

धाग्यावर जमून येईल वाचकांची गर्दी
मंद स्मित करतील कवितेचे दर्दी

स्मिता चौगुले's picture

9 May 2013 - 4:57 pm | स्मिता चौगुले

अक्शी शालजोडितन कि व ...:)

यशोधरा's picture

10 May 2013 - 5:29 am | यशोधरा

इनि :)