प्यार का पहला ख़त लिखने में वक्त तो लगता हे |
नए परिंदो को उड़नेमे वक्त तो लगता हे ||
परमेश्वरा , अरे अनादी अनंत बसला आहेस तिथे .. हजारो , कोटी कोटी रूपे तुझी
प्रेमात पडलोय तुझ्या .. किती रुपात पाहू ? कसाही तुला जाणून घ्यायचा प्रयत्न केलास तरी तू अपूर्णच भासतोस रे
तुझ्या प्रेमात पडायची हिम्मत केलीये ... जिथे तुकाराम, ज्ञानेश्वर , मीरा , शबरी यांचा कस लागला .. तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा
तुझी भक्ती करायची.. कशी.. काय .. काहीच ठावूक नाही रे .. मी अगदी नवखा आहे ..
तू नक्की आहेस तरी का , माझी प्रार्थना ऐकतोस का हे हि ठावूक नाही
अज्ञाताची ओढ म्हण , आकर्षण म्हण ... शब्द नाहीत .. तुझ्या प्रेमात पडलोय हे मात्र नक्की, किंवा कदाचित तूच क्षणात मला भेटून जाशील
तस झालं तर मला तुला ओळखता येईल का रे ?
जिस्म की बात नहीं थी , उनके दिल तक जाना था
लंबी दुरी तय करने में , वक्त तो लगता हे
तू सोन्याच्या सिंहासनावर पण आहेस , आणि गावाच्या वेशीबाहेरील झाडीतल्या शेंदरी दगडातही .
किडा - मुंगीत आहेस आणि माणसाच्या हृदयातही .तुझी कोटी कोटी रूपे , आम्हीच निर्माण केली , आमच्याच वेड्या कल्पना असतील सगळ्या
तुझ्या शरीराचा, ह्या बाह्य रूपाचा मोह नाही रे आता, जे संताना गवसलं , ते तुझे अंतरंग
तुझ खर रूप मला सापडेल का? या क्षणभंगुर जगाच्या रंग रंगोटिला भुललेल्या मला तू भेटशील का?
नक्की तू आहेस तरी कोण ?मला वेळ लागेल कदाचित तुझ्या पर्यंत पोचायला, एक काय अनेक जन्म हि लागतील ,कितीही वेळ लागला तरी माझी थांबायची तयारी आहे
गांठे अगर लग जाये तो फिर , रिश्ते हो या डोरी ,
लाख करे कोशिश खुलने में , वक्त तो लगता हे
तुझ्याशी एक नात झालंय रे , अनामिक
निसर्गातही तुझ अस्तित्व जाणवत , हि पंच तत्व तुझ्याच सत्तेने बांधली गेली आहेत
माझा कोणाच्याही नकळत अव्याहत सुरु असलेला श्वास .. तूच पुरवतो आहेस मला , काही ओळख नसताना
मग निसर्गातला तू खरा , पंचतत्वां मधला तू खरा , कि माझ्या श्वासातला .....
एवढ्या जवळ असूनही , मग लांब का वाटतोस ..
या मायेने , या विकारांनी एवढ जखडून ठेवलंय, कि या गाठी सोडवून तुझ्या पर्यंत पोचायला वेळ लागणारच
तू असाच तिथे असशील अनादी अनंत..
आणि मी ... कधी न कधी तुझ्यापाशी येईनच , वचन देतो
____________________________________________________
गझल : http://www.youtube.com/watch?v=u1aRx8Yu__8
गायक : जगजीत सिंग
प्रतिक्रिया
6 Nov 2012 - 11:26 am | जेनी...
सॉरी स्पा . लेकीन दिल तक नहि पहुंचा :(
गझल की तो बात हि अलग है
मंजिल पर चलते चलते , कोई राहि अगर मिल जाये
दिलो को मिलते मिलते , वक्त तो लगता है |
6 Nov 2012 - 11:42 am | संजय क्षीरसागर
हमने इलाज़े-ज़ख्मे-दिल तो ढूंढ लिया लेकिन,
गहेरे ज़ख्मोंको भरने वक़्त तो लगता है
या शेवटच्या ओळी आहेत.
गज़ल ठीक आहे पण लेखाचा संपूर्ण संदर्भ हुकला आहे.
6 Nov 2012 - 11:47 am | स्पा
हाहा.. माहितेय हो..
जरा वेगळा angle लावून ऐकली
6 Nov 2012 - 1:36 pm | संजय क्षीरसागर
माहिती असतांना असं केल्यानं प्रेमगीताला भजनी ठेका लावल्यासारखं झालय आणि त्यामुळे एका भावपूर्ण गज़लची वाट लागली आहे
6 Nov 2012 - 1:46 pm | स्पा
ओके
6 Nov 2012 - 12:06 pm | गवि
स्पावड्या, तुझं मधलं निरुपण अतिशय सुंदर आहे. अगदी टचिंग.
ही गझल मधेमधे पेरली आहे आणि भावानुवाद हा शब्द वापरला आहे त्यामुळे तुझ्या चांगल्या मुक्तकाला गझलेचं ठिगळ लागल्याचा भास होतोय.
गझल आपल्या जागी ठीक आहे.. पण तू व्यक्त केलेल्या विचारांपासून बरीच दूर आहे (अगदी वेगळ्या अँगलने बघण्याच्या प्रयोगासाठी देखील).
प्रयोगाची कल्पना आवडली, प्रयोगातूनच काहीतरी नवीन निघू शकतं. सरधोपट वाट आणखी धोपटत राहून नव्हे.
लगे रहो. :)
8 Nov 2012 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>प्रयोगाची कल्पना आवडली, प्रयोगातूनच काहीतरी नवीन निघू शकतं. सरधोपट वाट आणखी धोपटत राहून नव्हे.
लगे रहो
सहमत.
8 Nov 2012 - 11:05 am | स्पा
धन्यु हो गवि सेठ
अधांतरी प्रयोगाला सपोर्ट केल्याबद्दल :)
6 Nov 2012 - 12:46 pm | प्रचेतस
मुक्तक आवडले.
6 Nov 2012 - 1:15 pm | अत्रुप्त आत्मा
मुक्त केलेला "क" अवडला ;-)
6 Nov 2012 - 1:54 pm | गोंधळी
गझलेचा भक्तिभावानुवाद आवडला.
6 Nov 2012 - 9:25 pm | कवितानागेश
अजून थोडे विचारमंथन अपेक्षित आहे. थोडी घाई झालीये लिहायची.
6 Nov 2012 - 10:16 pm | शुचि
फारच सुंदर!!!
7 Nov 2012 - 10:06 pm | ५० फक्त
हल्ली शिर्षकं देताना अंमळ गडबडता, शिर्षासनं करत जा नियमितपणे.
असो, मी केलेला असाच एक प्रयोग आठवला. http://www.misalpav.com/node/15536 संपाद्कांना विनंती करुन उघडुन घ्यावा लागेल.
8 Nov 2012 - 8:26 am | स्पंदना
प्रेम म्हणजे मनाच्या गाभार्यातुन उमटणार अस काही तरी, जे नेमक सापडत नाही, पण अंतर्बाह्य बदलुअन टाकत.
भक्तीसुद्धा अशीच! त्यामुळे स्पा तुमच इंटरप्रिशन अगदीच वावग नाही म्हणता येणार. छान लिहिल आहे.
8 Nov 2012 - 9:11 am | मूकवाचक
पूर्णपणे सहमत.
स्पा यांचा लेख वाचून गझलशी समांतर असे चार शब्द सुचले -
प्यार का पहला ख़त लिखने में वक्त तो लगता हे |
नए परिंदो को उड़नेमे वक्त तो लगता हे ||
श्वासाश्वासात 'सोहम्' भिनायला एक तप तर लागणारच होते
नवथर अंकुराचा वटवृक्ष व्हायला एक तप तर लागणारच होते
जिस्म की बात नहीं थी , उनके दिल तक जाना था
लंबी दुरी तय करने में , वक्त तो लगता हे
सावळ्या सगुणाचा प्रश्नच नव्हता, 'हृदयस्थो जनार्दन:' जाणायचे होते
एवढे मोठे अंतर कापायला, एक तप तर लागणारच होते
गांठे अगर लग जाये तो फिर , रिश्ते हो या डोरी ,
लाख करे कोशिश खुलने में , वक्त तो लगता हे
निरगाठींच्या गुंत्यात अडकली, दोरी असो की जिवंत नाते
सरळसोट ती करता करता, एक तप तर लागणारच होते
8 Nov 2012 - 10:31 am | जेनी...
:)
8 Nov 2012 - 10:45 am | श्रीरंग_जोशी
मला तसे काही कळत नाही या विषयात पण या ओळी भावल्या...
8 Nov 2012 - 11:02 am | स्पा
वाह मुक्या
मस्तच उतरलंय
माझ्या बेताल भजनी ठेक्यावर मस्त भजन बसवलस कि :)
12 Nov 2012 - 11:57 am | विश्वनाथ मेहेंदळे
बाकी सगळे ठीक आहे, पण मुक्या ???
12 Nov 2012 - 11:57 am | विश्वनाथ मेहेंदळे
बाकी सगळे ठीक आहे, पण मुक्या ???
13 Nov 2012 - 11:58 pm | जेनी...
=))
म्मूव्वा तरी लिवायचं =))
8 Nov 2012 - 11:44 am | अक्षया
फारच सुंदर लिहीले आहे..:)
8 Nov 2012 - 12:28 pm | इनिगोय
मस्त जमलं आहे. तप या शब्दाचा वापर आवडला.
शेवटची ओळ मला अशी लिहावीशी वाटली असती..
निरगाठी झाल्या असताना, नात्यामध्ये वा दोरीच्या
उलगडून त्या घेता घेता, एक तप तर लागणारच होते
8 Nov 2012 - 4:05 pm | कवितानागेश
एक मित्र गझल्सना 'प्रेयसीचे भक्तिगीत' म्हणायचा, ते आठवले. :)
भावानुवाद म्हणता येणार नाही, काहीशी स्वतंत्र/ समांतर आणि नेहमीप्रमाणेच सुंदर आणि प्रवाही रचना.
13 Nov 2012 - 9:56 am | अर्धवटराव
तुम्हा कवि वगैरे लोकांना हे कसं सुचतं कोण जाणे
अर्धवटराव
8 Nov 2012 - 11:03 am | स्पा
स्पा
आणि
तुमचं वेग्रे?????
एवढा आदर :D
8 Nov 2012 - 7:28 pm | ५० फक्त
आश्चर्य वाटलं ना, आता उतारा म्हणुन माझी खरडवही पहा.
8 Nov 2012 - 10:31 am | ज्ञानराम
स्पा खूप छान निरुपण,...
मुकवाचक .. छान रसग्रहण... आवडले... ( शेवटी या दूष्टीकोनाच्या बाजू आहेत...) मस्तच.
8 Nov 2012 - 2:05 pm | सहज
धन्यु रे स्पा!!!
बघा आजचा तरणाबांड मर्द मराठी गडी स्पांडू! ह्या वयातही परमेश्वराला पहीले प्रेमपत्र लिहतोय!! (भले, पहीला डाव देवाला असेही असते होय.) आणि उगाच बंग आणी दबंग मंडळी, तरुणाई कशी वाईनच्या नादी लागली असा टाहो फोडतायत!!
[खर खर सांग स्पा, हा लेख वाईन पिउन तर नाही ना लिहलास] :-)
12 Nov 2012 - 12:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>बघा आजचा तरणाबांड मर्द मराठी गडी स्पांडू! ह्या वयातही परमेश्वराला पहीले प्रेमपत्र लिहतोय!!
पहिले ??? जाहीर पहिले म्हणा हवे तर. आधी किती आणि कुणाकुणाला लिहिली त्याचा हिशोब काय माहित ? ;-)
>>[खर खर सांग स्पा, हा लेख वाईन पिउन तर नाही ना लिहलास]
योग्य प्रश्न... दोन आण्याची भांग घेतली कि वाटेल तितक्या कल्पना सुचतात, असे कुणी म्हणून गेले आहे ना.
8 Nov 2012 - 3:05 pm | संजय क्षीरसागर
स्पानं वर ओके म्हटल्यावर विषय संपला.
बाय द वे, भक्तीमार्गीयांना कसे भ्रम होतात याचं सुरेख दर्शन इथे घडवलं आहे.
कुठे असतो हा देव?
तर "श्वासाश्वासात 'सोहम्', 'हृदयस्थो जनार्दन:' (आहे ना कि-बोर्ड बडव!) म्हणजे नक्की कुठे श्वासात का हृदयात?
बर असेल, मग त्याला पत्र कशाला लिहायच? आणि ते पोहोचवणार कोण?
'नवथर अंकुराचा वटवृक्ष'! (..दे ढील) आता समजा हा बालक आहे तर त्याचा वटवृक्ष कशाला व्हायला पाहिजे? आणि झाला तर आता चालू असलेल्या श्वासात तो आहे ना? त्याच्यापर्यंत पोहोचायला "एक तप तर लागणारच" कशासाठी?
आता ही निरगाठ कुठून आली? बरं असू दे, मग ती सरळसोट (काय शब्द योजना!) केल्यावर देव कसा भेटेल?
कारण मूळात अशी कुठलीच दोरी नाही. ही दोरी देव या (तुम्हीच निर्माण केलेल्या) कल्पनेशी स्वतःला रिलेट करायला तयार केलेली भ्रामक चिज़ आहे. या सगळ्या गोंधळामुळे त्या (नसलेल्या) दोरीला गाठी बसल्यायेत असं तुम्हाला वाटतय. हा भंपकपणा सोडा. अशी काल्पनिक दोरी कधीही सरळ होणार नाही आणि ती झाली तरी काही उपयोग होणार नाही कारण तिच्या दुसर्या टोकाला कुणीही नाही.
8 Nov 2012 - 3:14 pm | स्पा
:)
ओके
8 Nov 2012 - 3:12 pm | बॅटमॅन
साप साप म्हणून भुई धोपटताना बोधपर जिलेब्यांचा पाऊस पाडण्याची हौस का अस्ते काय माहिती काहींना.
8 Nov 2012 - 4:26 pm | अत्रुप्त आत्मा
--^--^--^--
8 Nov 2012 - 8:00 pm | संजय क्षीरसागर
कारण त्यांची मर्यादा तेवढीच असते
12 Nov 2012 - 3:21 pm | बॅटमॅन
जिलेबीला शंकरपाळे तरी कसे म्हण्णार? ठीके, बाबा रामदेवी काढा म्हणतो इत:पर.
13 Nov 2012 - 9:51 am | अर्धवटराव
आमचीही एक थेअरी ऐका दादा.
तो निराकार आहे, त्याला मन आहे, त्याला बुद्धी आहे, सर्व आकार धारण करण्याची त्याची क्षमता आहे, तोच सर्व रुपे धारण करतो व सर्व रूपे त्यातच लय पावतात, या सर्व उपद्व्यापाची त्याला पूर्ण जाणीव आहे-ज्ञान आहे... पण तरिही तो अस्तित्वात नाहि. आहे कि नाहि गंमत :) ???
अर्धवटराव
13 Nov 2012 - 2:58 pm | बॅटमॅन
हां ही मात्र गंमत आहे खरी ;)
8 Nov 2012 - 3:14 pm | स्नेहल देशपांडे
छान आहे
13 Nov 2012 - 3:06 am | किसन शिंदे
छान लिहलंय रे स्पावड्या.
वर गवि आणि प्राडाँशी सहमत. प्रयोगाची कल्पना चांगलीय.
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तू त्या "चार लोकांची वाहवा मिळवणार्या" लेखनातून बाहेर पडतोयस याचा खुप आनंद होतोय.
13 Nov 2012 - 11:18 am | विश्वनाथ मेहेंदळे
कोण रे ते ४ लोक? मलापण सांग ना ;-)
13 Nov 2012 - 9:58 am | अर्धवटराव
काहिसा आपल्या राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पासारखा.
अर्धवटराव
13 Nov 2012 - 11:08 pm | पैसा
स्पाचा लेख आरामात वाचूया म्हणून इतके दिवस बाजूला ठेवला होता. आज लेख आणि प्रतिक्रिया वाचून वेगळीच करमणूक झाली. लेखातला प्रयोग आवडला. सूफी लोक अशाच प्रकारचं काही म्हणत असतात आणि मीरेने पण देवाला प्रियतम म्हटलं होतं तेव्हा हे अगदीच काही जगावेगळं लिखाण नाही. काही म्हणा, स्पाने काही लिहिलं तरी प्रतिसादांचा पाऊस ठरलेलाच!
15 Nov 2012 - 12:00 am | शैलेन्द्र
ते बाकीच सोडं, पण तुझ मन सध्या गजलेत आहे कि निरुपणात आहे ते सांग, म्हणजे इल्लाज करता येइल.