एकजण दुसऱ्याला सांगत होता
कंटाळलो आता इतके घोटाळे करून
दुसरा म्हणाला
कंटाळून कसे चालेल ? आपल्याला देश चालवायचा आहे ना ?
पहिला उत्तरला
आपली वारस मंडळी आहेत ना तयार , मग कसली काळजी ?
दुसरा म्हणाला
एका घोटाळ्यातून दुसरा करायचा
त्यात नको त्याला अडकवायचं
परत त्याची सुटका करण्यासाठी,
आपणच धडपड करायची
स्वागतासाठी कमानी, ओवाळण्यासाठी पंचारत्या, मोठाले फलक ...
हे सगळ सांगायलातरी " आपल्यासारखे आणखी कुणी " नकोत का ?
पहिला म्हणाला
खर आहे दोस्ता ...
असे म्हणून-
तो पहिला
दुसऱ्याला पुढच्या घोटाळ्यात कधी कसे कुठे अडकवायचे
ह्याचा मनातल्या मनात विचार करून
आळस झटकू लागला !!!
.
प्रतिक्रिया
4 Oct 2012 - 10:44 pm | सूड
'घो टाळा' असं वाचलं गेल्यामुळे कवितेच्या आशयाबद्दल संभ्रमित होऊन धागा उघडून पाह्यला.
5 Oct 2012 - 12:12 pm | sagarpdy
ख्खिक!
5 Oct 2012 - 11:12 am | ज्ञानराम
हि कविता आहे काय? मला वाटलं पहीलीतल्या बालभारतीच्या पुस्तकातील संवाद आहे.
" कोण कोणास म्हणाले ?" ते लिहा.....:;)
8 Oct 2012 - 4:35 pm | अमोल केळकर
हा हा हा , मस्तच :)