मी काही जन्मजात पुणेकर नाही. पुण्याला जन्मापासून वर्षातून दोनदा सुट्टीत यायचो व गेली दहा वर्षे नियमित राहतो मात्र आहे.
पुणेकरा॑च्या काही सवयी अगदीच अनाकलनीय आहेत
१) नाण्याला 'डॉलर' असे स॑बोधणे! सरळ सरळ 'एक रूपयाचा, पाच रूपयाचा डॉलर आहे का' अशी चौकशी करतात
२) स्वतः जवळ मोडकी लुना कि॑वा हॉर्न सोडून सर्व पार्ट वाजणारी एम ८० का असेना, तिला 'गाडी' म्हणतात! पुण्यात सायकललासुद्धा गाडी म्हणतात.
३) दुकानात जी गोष्ट मिळते त्या सर्व वस्तू॑ची स्वत॑त्र पाटी लावतात. एकदा जनरल स्टोअर म्हटले की सगळ्या परचूटण वस्तू मिळणार हे आपण गृहीत धरले तरी पुण्यात एकाच दुकानात तुम्हा॑ला श॑भर एक पाट्या दिसतील 'येथे हे मिळेल' अश्या. उदा. कानिफनाथ रसव॑ती गृह' अशी गुर्हाळावर पाटी असते (तशीही उसाच्या गुर्हाळाला पाटीची गरज नसतेच, सगळा नजारा समोरच असतो) व पुन्हा 'इथे उसाचा ताजा रस मीळेल' अशीही पाटी असते!
मी एका हेअर कटी॑ग सलूनवर 'येथे केस कापून मिळतील' अशी पाटी पाहिली होती! ('इथे केस कापून 'परत' कुणाला हवेत? तुमच्याकडेच ठेवा ते' असे म्हणण्याचा मोह टाळला)
४) पुणेकर फक्त (आणि फक्तच) रविवारी सकाळी 'पॅटीस' नामक पदार्थ खातात
५) आमची कुठेही शाखा नाही (ह्याची खरी तर लाज वाटली पाहिजे.. इतके वर्ष॑ ध॑दा करताय, फक्त एकच दुकान?) असल्या पाट्या बिनदिक्कतपणे लावतात.
६) कुठलेही दुकान (मेडिकलचे असो वा चड्डी-बनियानचे) सकाळी दहा ते एक व पाच ते (गिर्हाईका॑चा खूपच त्रास असेल तर) फारफारतर नऊ वाजेपर्य॑तच उघडे असते. दुपारी एखाद्याला जुलाब सुरू झाले तर त्याने औषधासाठी पाच वाजेपर्य॑त नुसतेच ता॑ब्या घेऊन धावावे वा घरगुती उपचार करावेत.
७) अभ्यासाची वा इतर पुस्तके फक्त अप्पा बळव॑त नामक नामी चौकातच मिळतील! तिथे एकाला एक लागून पन्नास दुकाने, पण सगळी चालतात. ग॑मत म्हणजे इतर ठिकाणी पुस्तका॑ची दुकाने अजिबात चालत नाहीत!
८) पुण्यात सर्व मुली तो॑डाभोवती दहशतवादी गु॑डाळतात तसे कापड बा॑धतात. हे म्हणे चेहर्याचे धुळीपासून व सूर्यप्रकाशापासून स॑रक्षण म्हणे. पण 'ज्या॑च्यासाठी' इतका चेहरा छान ठेवण्याची आस, त्या॑ना तो दिसतच नाही ना मग??
९) पुण्यात डो॑गरावर फिरायला येणारे पेन्शनर म्हातारे येणार्या जाणार्या मुली॑चे अष्टा॑गानी दर्शन करतात. आणि आपल्या मित्रानी केलेल्या देहा॑तशासनाच्या लायकीच्या कोटीवर मोठ-मोठ्या॑नी हसतात. कोटी सोडा, साध्यासाध्या वाक्या॑नासुद्धा असेच हसतात. उदा. 'बर॑ का, काल मला आपले आबा भेटले होते..' 'काय सा॑गताय.. हॉ हॉ हॉ.. '(किमान दहा मजले). शिवाय डो॑गरावर एकमेका॑ना ला॑बून पाहिले तरी 'हारी हारी!' अशी घसा सुकेस्तोवर गर्जना करतात.
१०) बिल्डी॑गला नाव ठेवता॑ना आपल्या अस्सल मर्हाठी नावापुढे इ॑ग्लीश शब्द जोडण्याची हौसही पुण्यात फार आहे. पुण्याबाहेरच्या, विशेषतः मु॑बईच्या लोका॑ना त्याचे फार हसू येते. उदा. पाडळे पॅलेस, पाटील प्लाझा, भोसले-शि॑दे आर्केड, काकडे मॉल इ.
११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात.
तुम्हीसुद्धा अश्या काही पिक्यूलियर पुणेरी गोष्टी पाहिल्या असतील तर सा॑गा..
प्रतिक्रिया
18 Aug 2008 - 10:55 pm | मुशाफिर
"आणि खत्रूड दुकानदारांबद्दलच म्हणायचं तर त्यातला बराचसा दोष कर्वें, लेलें, अभ्यंकर, चितळें वगैरे कोकणस्थी आडनावं लावणार्यांकडेच जातो....ह. घ्या )"
ह्यावरुन आठवलेला अजून एक किस्सा. आमचे एक नातेवाईक कोल्हापूरला असतात त्यान्च्या शेजारी राहात असलेल्या काकानी सान्गितलेला.
हे शेजारी एकदा पुण्यात असताना चितळेंच्या दुकानात बाकरवडी आणायला गेले. त्या दिवशी "बाकरवडी सम्पली आहे उद्या या!" असे सान्गून त्याना परत पाठवल. त्याना २५ कि. बाकरवडी हवी असल्याने तुम्हि आगावू मागणी नोन्दवून घ्या, अशी त्यानी विनन्ती केली. तेव्हा त्याना "इथे सकाळी बाकरवडीसाठी मोठी रान्ग लागते , उद्या त्यावेळी या आणि मिळेल तेव्हढि घेवून जा!" हे उत्तर मिळाले.
दुसर्या दिवशी रान्गेत उभे राहून जेव्हा ते मागणी नोन्दवू लागले तेव्हा "अहो आता बाकरवडी सम्पत आली आहे. तुम्हाला एव्हढि दिली तर इतरना मिळणार नाहि, एव्हढी कशाला हवी आहे बाकरवडी तुम्हाला एकावेळी?" अस विचारल. तेव्हा ते काका शान्तपणे म्हणाले "त्याच काय आहे? मी कोल्हपूरला असतो आणि महिन्यात एकदाच पुण्याला येतो. आमचा कुत्रा Tommy तुमच्या बाकरवड्यानशिवाय काही खात नाही हो! तेव्हा, त्याला चितळेंकडे बाकरवड्या कमी होत्या हे कस समजावणार?"
त्याना २५ किलो बाकरवड्या मिळाल्या! :)
(पुण्याचही पाणी चाखलेला!)
मुशाफिर.
19 Aug 2008 - 12:09 am | टारझन
अर्रे वा ! कुत्रा चितळ्यांची बाकरवडी खातो का ? वा वा वा !!!
मग माणसे पेडिग्री खात असतील =)) =))
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
19 Aug 2008 - 12:21 am | मुशाफिर
मुम्बैकराना विचारून काय उपयोग? :)
(जगात कुठेही राहिला तरी मनाने मुम्बैकरच असलेला!)
मुशाफिर :)
18 Aug 2008 - 10:57 pm | भाग्यश्री
चांगलं चालूय.. संदीप तुझे सगळे मुद्दे पटले..
बाकी पुण्याला उगीचच नावं ठेवणार्या लोकांना काय सांगायचे आता? जाऊदे, माझं पुणे इतकं मस्त आहे की अशा कॉमेंट्सनी पुण्याच्या चांगल्या गोष्टींना काहीच फरक पडत नाही.. उग्गीच विचार करून माझ्या डोक्याला ताप ! त्यापेक्षा पुण्याचा पाऊस्,सिंहगड..पुण्यात राहणारे थोर कलावंत (उदा भीमसेनजी..) त्यांनी सुरू केलेला सवाईगंधर्व, आमची युनिव्हर्सिटी,आमचे शाळा कॉलेजेस याचा विचार करते मी..... अरे हज्जार गोष्टी आहेत आमच्याकडे ज्या बाकी कोठेही नाहीएत.. एखाद्या गोष्टीचे मोठेपण तिला न देण्याचा करंटेपणा मी नाही करणार.. जे चांगलं आहे ते आहेच.. मग दुनियेला ते पटो वा न पटो !! दुनिया गेली (पुण्याच्या) खड्ड्यात !! :) B)
बैलोबा चायनिजकर, आणि टारझन किल्ला छान लढवलात.. असाच पुणेरी बाणेदारपणा दाखवत चला!! :D
19 Aug 2008 - 10:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे हज्जार गोष्टी आहेत आमच्याकडे ज्या बाकी कोठेही नाहीएत..
उदा: खड्ड्यांतले रस्ते, खत्रूड दुकानदार, सार्वजनिक वाहतूक सेवेचा अभाव, सौजन्याचाही अभावच, पाऊस न पडणे, भुईकोट किल्ले, शेअर बाजार, उपयुक्त लोकल ट्रेन्स, यु.आय.सी.टी... इत्यादी! पण भीमसेनजींचं पुण्यातलं वास्तव्य आणि त्यांचा सवाई गंधर्व महोत्सव या दोन गोष्टींमधे या पुणेकर लोकांचं काय योगदान हे कोणी पुणेकर मला सांगाल का? किंवा पुण्याच्या भल्यासाठी तुमचं काय योगदान हे तरी, म्हणजे का भांडताय ते तरी समजेल मला!
दुनिया गेली (पुण्याच्या) खड्ड्यात !!
बरोबर आहे, कारण अलम दुनियेत खड्ड्यांमधले रस्ते फक्त पुण्यातच आहेत!
18 Aug 2008 - 11:23 pm | यशोधरा
>>बाकि काहि म्हणा पण मुम्बई वर कितीही टिका केलीत तरी आम्हि तुम्हाला अनुमोदनच देवू.
नाय ब्वॉ!! आम्हां पुणेकरांना नाय्येत असल्या सवयी टीका करायच्या उठसूठ!! तुम्हां मुंबैकरांना आहेत वाट्ट???
:D
18 Aug 2008 - 11:33 pm | मुशाफिर
ह्या लेखातली निरिक्षणे एका पुणेकरानेच लिहिली आहेत. आम्ही फक्त पुण्यनगरीचे आणि तिथल्या नगरजनान्चे काही किस्से सान्गतोय इतकच! ;)
(साळसूद)
मुशाफिर :)
18 Aug 2008 - 11:38 pm | यशोधरा
>>ह्या लेखातली निरिक्षणे एका पुणेकरानेच लिहिली आहेत.
असं, स्वतःवरच हसायला तेवढं मोठं मन, मनाचा दिलदारपणा आणि अतिशय तरल विनोदबुद्धी लागते!! आता पुणेकरांपाशीच ती आहेच! म्हणून तर पुणे तिथे काय उणे!! :)
18 Aug 2008 - 11:48 pm | मुशाफिर
>>असं, स्वतःवरच हसायला तेवढं मोठं मन, मनाचा दिलदारपणा आणि अतिशय तरल विनोदबुद्धी लागते!! आता पुणेकरांपाशीच ती आहेच!
अशी विनोदबुद्धी मुम्बैकरान्कडे नाहि म्हणून तर मुम्बैकरान्च्या विक्षिप्तपणाचे किस्सेहि नाहीत! :) ह्.घ्या.
अल्प (विनोद) बुद्धि असलेला मुम्बईकर
मुशाफिर! :)
18 Aug 2008 - 11:57 pm | अभिज्ञ
>>ह्या लेखातली निरिक्षणे एका पुणेकरानेच लिहिली आहेत.
गैरसमज आहे.
डॉ.दाढे हे स्वतः डोंबिवलीकर आहेत, अन फक्त गेले दहा वर्षच पुण्यात आहेत.
खरा पुणेकर असल्या फालतु स्वनिरिक्षणात (ह्.घ्या.) वेळ घालवत नसतो.
पुण्यात काय उणे आहे ह्याचे निरिक्षण करण्याचे काम
अपुणेकर मंडळिंवर सोपवून तो आपल्या कामात व्यस्त असतो. ;)
19 Aug 2008 - 12:13 am | मुशाफिर
काम
अपुणेकर मंडळिंवर सोपवून तो आपल्या कामात व्यस्त असतो.
पण कितीहि व्यस्त असला तरिही......पुण्यासाठी किल्ला लढवायला सदैव तत्पर असतो. हे लिहायच राहून गेले कि काय? :) ह. घ्या.
(किल्ला न लढवताच पान्ढरे निशाण दाखवणारा)
मुशाफिर :)
20 Aug 2008 - 3:11 pm | मनीष पाठक
(किल्ला न लढवताच पान्ढरे निशाण दाखवणारा)
वेळ आली की घातली शेपुट. ही एकच घाण खोड मुंबईकरांनी सोडुन द्या.
(जन्म आणि कर्माने मुंबईकर असलेला) मनीष पाठक.
18 Aug 2008 - 11:57 pm | यशोधरा
>>अशी विनोदबुद्धी मुम्बैकरान्कडे नाहि
हे मात्र खरं!! :) कसं जगता हो विनोदबुद्धी नसतानाही?? घड्याळाच्या तालावर नाचताना 'विनोदच' काय कोणतीही भावना बाळगणे हेच मुंबैकर विसरुन गेलाय!! म्हणून मग, पुण्याला नावं (असूयेपोटी) ठेवतो, अन् तिथेच दुसरं घर घेतो, आणि पुन्हा अस्सल 'मुंबैकर' पणा दाखवत पुण्यालाच नावं ठेवतो!! :(
असो.
19 Aug 2008 - 12:05 am | मुशाफिर
>>घड्याळाच्या तालावर नाचताना 'विनोदच' काय कोणतीही भावना बाळगणे हेच मुंबैकर विसरुन गेलाय!!
एकदम मान्य! मुम्बई म्हणजे सात भिकार! :)
(भिकार मुम्बईवरही मनापासून प्रेम करणारा)
मुशाफिर
19 Aug 2008 - 12:14 am | यशोधरा
>>भिकार मुम्बईवरही मनापासून प्रेम करणारा
फक्त मुंबैवरच? आम्ही पुणेकर अख्ख्या भारत देशावर प्रेम करतो ब्वॉ!! :)
>>मुम्बई म्हणजे सात भिकार!
नाही कोण म्हणलय!! :D
19 Aug 2008 - 12:31 am | टारझन
मुम्बई म्हणजे सात भिकार!
नाही कोण म्हणलय!!
देवा असल्या मुंबैकराच्या हातात देश गेला तर परदेशात झेंडे लाऊन येतील .. पत्रकार परिषदेत म्हणतील आमचा भारत सात भिकार .... आरारारा ... काय हे भिकारचळ लागले रे .. चॅचॅचॅ
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
19 Aug 2008 - 12:29 am | खादाड_बोका
भैय्यांना घर द्याल का हो किरायाने ब्वॉ!! ;) ;) ;) ;)
सत्य कटु असते....
19 Aug 2008 - 12:36 am | मुशाफिर
नाहि कोण म्हणतय? पण मुम्बैकर भारतावर प्रेम करतात, हे वेगळ सान्गाव लागत नाही (पुणेकरानसारख!) :). शेवटी, देशाच्या आर्थिक राजधानीच स्थान पुणे नक्किच नाही.
स्वगतः- मुशाफिरा, जसा काही मुम्बैतून मिळणारा सगळा महसूल तू स्वत:च्याच खिशातून भरतोस! :)
(देशप्रेमी),
मुशाफिर
19 Aug 2008 - 12:54 am | यशोधरा
>>भैय्यांना घर द्याल का हो किरायाने ब्वॉ!!
एक मुंबै मराठी माणसाच्या हातातून सुटते आहे/ सुटली आहे तेवढे पुरेसे वाटत नाही का हो बोकोबा?? :)
>>देशाच्या आर्थिक राजधानीच स्थान पुणे नक्किच नाही.
असतं तर ते बिगरमराठी लोकांच्या हाती गेलं नसतं मात्र!!
बोकोबा, मुशाफिर, पुण्यातही बिगर मराठी वा आधीपासून पुण्यात नसलेले कित्येक जण येतात, विद्यार्थी, नोकरदार सगळेच. तरीही पुण्याचं पुणेपण सुटत नही, सुटूही नये. मुंबईइतकं बोटचेपं धोरण पुण्यात इतक्या सहजासहजी स्वीकारलं जाईल अस मला तरी वाटत नाही.
19 Aug 2008 - 12:52 am | अभिज्ञ
शेवटी, देशाच्या आर्थिक राजधानीच स्थान पुणे नक्किच नाही.
बर बाबा तु आनि तुझी मुंबै लै भारि.झाल समाधान?
बर जाता जाता एक काम करा,पुणे आणि पुणेकरांवर गरळ ओकण्यापेक्षा तीच ताकत मुंबईत मराठी च्या संवर्धनासाठि वापरा ना.
ह्या देशाच्या आर्थिक राजधानीत आताशा मराठी मुंबईकर पनवेल पर्यंत पोहोचलाच आहे, काहि वर्षांत तो पुण्यात पोचला तर त्यात नवल वाटायला नको. काय?
19 Aug 2008 - 1:10 am | मुशाफिर
कळकळ मुम्बईकरानाहि आहेच! आज मुम्बईत जो मराठी माणूस टिकला आहे तो स्वतःच्या हिमतीवरच. अर्थात, त्याची स्थिति फार भूषणावह नाही, हे कोणिच नाकारत नाहि.
आहो, मि. पा. वर आम्हि जे लिहितो आहोत ते फक्त गम्मत म्हणून. आणि मुम्बै काय किवा पूणे काय? जगात जिथे राहू तिथे भारतीय आणि त्यातहि मराठी (माणस आणि शहर) आम्हाला सगळ्यात प्रिय आहे!
तेव्हा समस्त मिपाकर जनहो माझे लिखाण ह्.घ्या. हे. सा. न. ल. :)
काहि काळ पूण्यनगरी(तही) निवास केलेला,
मुशाफिर
19 Aug 2008 - 12:54 am | मुशाफिर
सध्या परदेशातच झेन्डे लावत आहोत (फक्त अटकेपार नाही हो, त्याच्याही पुढे! ), तेही मोठ्या अभिमानाने! (भारतीयत्वाच्या बर का? नाहीतर मुम्बईच्याच का? असा तिरकस पुणेरी प्रश्ण विचाराल!) :) ह्.घ्या.
आणि पत्रकार परिषदेच म्हणाल तर आम्हा पामरान्चि कसली हो परिषद?
परदेशस्थ (पण मनाने) मुम्बैकर(च),
मुशाफिर
19 Aug 2008 - 1:03 am | टारझन
शेवटी, देशाच्या आर्थिक राजधानीच स्थान पुणे नक्किच नाही.
नाचा मग !! =))
सध्या परदेशातच झेन्डे लावत आहोत
देश आपल्या हातात नाही... असले झेंडे तर आम्ही पण लावले आहेत.
आणि पत्रकार परिषदेच म्हणाल तर आम्हा पामरान्चि कसली हो परिषद?
आई गं .. किती डोकं फोडून सांगू ? ज्यांच्या हातात देश आहे (प्रधानमंतत्री, राष्ट्रपती, ई.) ते परदेशात गेले की एक पत्रकार परिषद होते (शुद्ध मराठीत प्रेस कॉन्फरंस) त्यांच्या प्रत्येक शब्दाला महत्व आसतं.. आता आमची मुंबै सात भिकार म्हणनार्याच्या हातात जर देश गेला आणि त्याने वरिल कंडीशन्स मधे म्हंटला की आमचा भारत 'सात भिकार' चांगली इज्जत उतरवुन याल हो ! आणि कोणती बहुराष्ट्रिय बैठक असेल आणि त्यात भारताला कोणी काय म्हंटले तर तुम्ही त्याच्या ७ गुणे कौतुक कराल हो ....
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
19 Aug 2008 - 12:59 am | यशोधरा
>>सध्या परदेशातच झेन्डे लावत आहोत
बरका मुशाफिरभौ, तुम्ही जे झेंडे आत्ता लावताय ना, ते कधीच लावून परतलोय बरं आम्ही पुणेकर!! ;) नवीन कायतरी बोला!!
19 Aug 2008 - 1:05 am | अभिज्ञ
तुम्ही जे झेंडे आत्ता लावताय ना, ते कधीच लावून परतलोय बरं आम्ही पुणेकर!! नवीन कायतरी बोला!!
यशोधरा जबरा प्रतिसाद टाकलास.
अगदी बॅकहँड क्रॉसकोर्ट.
19 Aug 2008 - 1:19 am | अभिज्ञ
मंडळी
आता बास करुयात.
एका दिवसात १०० च्या वर प्रतिसाद आलेत.मि.पा.वरील नवीन विक्रमच झालेला असावा.
अन हा धागा असाच चालु राहिला तर प्रतिसाद संख्या हजारात पण जाइल.
ह्यातून निष्पन्न काहि होणार नाहि. (आणि पुणेकरांकडे एवढा फावला वेळहि नसतोच म्हणा)
डॉ.दाढे यांनी गंमत म्हणुन लिहिलेला हा धागा एवढे प्रतिसाद खेचेल असे वाटले नव्हते.
त्यांनाहि हि वादावादि वाचून "कुठून झक मारली अन हा लेख लिहिला" असे न वाटल्यास नवलच!
असो ज्यांना अजूनहि ह्या विषयावर टंकायचे असेल त्यांनी नवीन धागा काढलेलाच बरा.
कारण आता इथे वाचायला त्रास पडतो.
काय म्हणता?
अभिज्ञ.
19 Aug 2008 - 1:28 am | ब्रिटिश टिंग्या
मी नुकताच एंटरलोय......
मला जरा एखादा वात्रट, खडुस अन् टिपीकल पुणे ३० प्रतिसाद टाकु दे!
(पक्का पुणेरी) टिंग्या :)
19 Aug 2008 - 2:17 am | ब्रिटिश टिंग्या
आमच्याबद्दल बोलताय होय.....बोला बोला......
फक्त १ गोष्ट लक्षात असु द्या, आम्ही जसे आहोत, तसेच राहु......आमची कितीही चेष्टा केली तरी हम नही सु ध रें गे!
आता जरा बाकीच्या मुद्यांबाबत -
४) पुणेकर फक्त (आणि फक्तच) रविवारी सकाळी 'पॅटीस' नामक पदार्थ खातात
हो खातो.....अन् फक्त हिंदुस्थान बेकरीचाच खातो.....आमची मर्जी! तुमच्या पित्ताशयात आम्ल का बरे वाढावे त्यामुळे :?
दुपारी एखाद्याला जुलाब सुरू झाले तर त्याने औषधासाठी पाच वाजेपर्य॑त नुसतेच ता॑ब्या घेऊन धावावे वा घरगुती उपचार करावेत.
त्यासाठी खडीवाले वैद्यांचा पाचक काढा ठेवावा नेहमी घरी......अन् हो खडीवाले वैद्यांचा पत्ता सांगायला वेगळा चार्ज पडेल!
सरळ सरळ 'एक रूपयाचा, पाच रूपयाचा डॉलर आहे का' अशी चौकशी करतात
'इतरांनी' डोक्यावर चढवुन ठेवलेल्या डॉलरची आमच्यालेखी 'काय' किंमत आहे हे एव्हाना समजले असेल आपल्याला!
ह्याची खरी तर लाज वाटली पाहिजे.. इतके वर्ष॑ ध॑दा करताय, फक्त एकच दुकान?
लाज कसली यात? जो लाजला तो पुणेकर नाहीच!
एंड फॉर युवर काईंड इन्फॉरमेशन, आम्ही चमनलाल बोरा किंवा मगनलाल जैन नाहीत! (आम्ही संतापाने फुटतो तेव्हाच इंग्रजी फाडतो)
उलट तुम्हाला आनंद वाटायला हवा की मराठी माणुस असुनही 'धंदा' (तसला नव्हे) करतोय!
बिल्डी॑गला नाव ठेवता॑ना आपल्या अस्सल मर्हाठी नावापुढे इ॑ग्लीश शब्द जोडण्याची हौसही पुण्यात फार आहे.
आमचे सदस्यनाम बघा!
बाकीचे मुद्दे तसे चावुन चावुन चोथा झालेले आहेत......
तरीपण आमच्या खवय्येगिरीबद्दल कोणी टिपण्णी कशी केली नाही याचं राहुन राहुन आश्चर्य वाटतयं......अहो अ-पुणेकरांना जळ(व)ण्यासाठी कितीतरी आरोग्यभुवनं पुण्यात आहेत्.......आठवा! बादशाही, पुणे बोर्डिंग हाउस, रामनाथ, बापट उपहार गृह, बेडेकर इ.इ.......द्या शिव्या ह्यांना अन् नंतर इथेच मिटक्या मारत जेवा लेको!
आम्हाला आता सवय झालीये या सर्वाची!
असो, वरील सगळे मुद्दे केवळ ह.घेणे.....मागाहुन तक्रार चालणार नाही.
(पुणेकरांवर टीका करणार्यांना खडकी-दापोडी समजणारा) टिंग्या!
पुण्यातील वात्रट कार्ट्याची स्वगतपाटी - वरील प्रतिसाद वाचेल तो वेडा!
19 Aug 2008 - 7:04 am | पक्या
जियो टारझन, यशोधरा, टिंग्या, अभिज्ञ, संदिप ....मस्त गड लढवलात रे.
बाकी पुण्यात उणं शोधण्याचे काम अ-पुणेकरच करत असतात हे मात्र खरयं. कोल्ह्याला द्राक्षे आंबट ! :)
माझे कितीतरी नातेवाईक जे पुण्याबाहेर रहात होते ते कालांतराने पुण्यात रहायला आले आहेत अगदी मुंबईकर सुद्धा. अनेक ओळखीतल्या मुंबईकरांनी पण पुण्यात सदनिका घेतलेल्या आहेत.
प्रत्येक शहराचा एक चेहरा असतो , एक ओळ्ख असते आणि ती पुण्याने जपली आहे .
बिनचेहर्याच्या शहरात माणसे यंत्रवत झालेली असतात.
19 Aug 2008 - 7:27 am | अनिल हटेला
(पुणेकरांवर टीका करणार्यांना खडकी-दापोडी समजणारा) टिंग्या!
धन्य हो !!!
यशोधरा,अभिज्ञ,टा-या, आणी समस्त पुणेकर हो....
सही..................
आणी पुण्या ला नाव ठेवणारे ..... ह.घ्या.. हे .सा. न .ल
मजा आली....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
19 Aug 2008 - 8:38 am | प्रकाश घाटपांडे
इथ अमुल्य कार्यक्रम विनामुल्य पहाता येतात. पुणेकर फुकटात कुठं काय पघायला भेटतयं यात तरबेज. हा आता दाखवनारे बी पुणेकरच.
प्रकाश घाटपांडे
21 Feb 2009 - 1:33 am | वजीर
खरं आहे!!
19 Aug 2008 - 9:07 am | विजुभाऊ
रणजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या नावाखाली पी वाय सी ची टीम उतरवणारे पुणेकरच.
बाकी पुणे आणि मुम्बैत एवढे एक साम्य आहे.
मुम्बैकराला भारतात मुम्बई हेच एकमेव शहर आहे असे वाटते.
पुणेकराला पुणे (आणि नाईलाजाने मुम्बै )सोडुन इतरत्र मागास भागातले लोक रहातात असे वाटते.
ऍल्युमिनियम ची ओसरी करुन तेथे मिळणार्या तीन चमचे चाला अमृततुल्य नाव देणारे आणि खुन्या/ पासोड्या / दगडुशेठ /जिलब्या/ सोन्या /हत्ती / माती अशी फासेपारध्यांच्या नावासारखी देवा ची नावे ठेवणारे पुणेकर हे देवालाही न उलगडलेले कोडे आहे.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
19 Aug 2008 - 9:18 am | अनिल हटेला
बरोबर आहे !!
कोडच आहे हो !!!
शेवटी एक्मेवाद्वीतीय काय असत ते ...
तो प्रकार फक्त पुण्यातच पहायला मिळेल ....
आणी कुणी - काहीही म्हटल तरी त्याच महत्त्व कमी हत नाही ना...
शिवाजी महाराजा च्या पावन स्परशाने पावन झालेली ही भूमी..
ज्ञानेश्वर ,तुकारामा च्या निवासाची भूमी...
शंभू राजा समाधी सुद्धा पुण्यातच .....
पेशवाई पुण्यातील च ....
अर्थात च मान्य करा नका करू हा इतीहास आहे ...
टिळक ,आगरकर्,म. फुले. कर्वे ,किर्लोस्कर ...यादी फार मोठी आहे ...
आता तुम्ही म्हनाल ही मंडळी पुण्याची नव्हतीच मुळी....
बरोबर आहे हे सुद्धा ...
पण मग त्यानी कर्म भूमी म्हणुन पुण्याचीच निवड का केली..
(१२+२= MH १४ वाला)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
19 Aug 2008 - 9:58 am | मराठी_माणूस
यादी फार मोठी आहे ...
उर्वरित महाराष्ट्राचि सुद्धा
19 Aug 2008 - 10:08 pm | खादाड_बोका
पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी?
त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . :D :D :D :D
विहीरीतल्या बेडकाल काय विश्वाची पारख....जिथे ऊणे त्याचेच नाव पुणे
19 Aug 2008 - 10:08 pm | खादाड_बोका
पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी?
त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . :D :D :D :D
विहीरीतल्या बेडकाल काय विश्वाची पारख....जिथे ऊणे त्याचेच नाव पुणे
19 Aug 2008 - 10:08 pm | खादाड_बोका
पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी?
त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . :D :D :D :D
विहीरीतल्या बेडकाल काय विश्वाची पारख....जिथे ऊणे त्याचेच नाव पुणे
19 Aug 2008 - 10:09 pm | खादाड_बोका
पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी?
त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . :D :D :D :D
विहीरीतल्या बेडकाल काय विश्वाची पारख....जिथे ऊणे त्याचेच नाव पुणे
19 Aug 2008 - 10:09 pm | खादाड_बोका
पुण्याचे येवढेच महत्व असते तर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आमच्या "नागपुरला" का उघडले बॉ त्यांनी?
त्यांच्या ईतके हुशार आणी समजुतदार लोक मी तरी अजुन पाहीले नाही . :D :D :D :D
विहीरीतल्या बेडकाल काय विश्वाची पारख....जिथे ऊणे त्याचेच नाव पुणे
19 Aug 2008 - 10:03 am | अनिल हटेला
मराठी माणसा जागा हो !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
19 Aug 2008 - 10:08 am | मराठी_माणूस
स्वतः: च्या डोळ्या वरचि झापडे बाजुला करा, मग दिसेल सगळे जागेच आहेत
26 Feb 2009 - 9:59 am | दिल्लीचं कार्ट
बरोबर
19 Aug 2008 - 10:06 am | विजुभाऊ
उर्वारीत महाराष्ट्राची यादी फार मोठी आहे.तेच म्हणतो
पण पुणेकराला पुणे (आणि नाईलाजाने मुम्बै )सोडुन इतरत्र मागास भागातले लोक रहातात असे वाटते. त्याशिवाय बाकी काही दिसतच नाही.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
19 Aug 2008 - 10:22 am | टारझन
इतरत्र मागास भागातले लोक रहातात असे वाटते. त्याशिवाय बाकी काही दिसतच नाही.
विजाभौ आगामी निवडणूका गडचिरोलीतुन लढवणार आहेत वाटत =))
अहो असतात मागास लोक मागास भागात, काय करणार ? चला आपण उच्चशिक्षणाचे ऍडमिशन घेताना प्राधान्ययादी मधे आंबेडकर युनिव्हर्सिटी-->मराठवाडा युनिव्हर्सिटी-->तत्सम (विजाभौंच्या भाषेत पुणेर्यांनी मागासात काढलेल्या) युनिव्हर्सिटी मधे ऍडमिशन घेऊया.... आहो आख्या म्हाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी हे नाव पुण्याला जनमताने मिळालंय.. इसको कोण एक माणूस के सर्टिफिकेट की गरज नही हय.... (जस टिळकांना लोकमान्य)
गणपतीला जी पण नावे आहेत ती प्रेमाखातर आहेत, त्यात मुंबैकरासारखा वरवरपणा नाही
ए कोई नया धागा शुरू करो रे ...........
जहालमतवादी पुणेकर्स : यशो,आन्या,टिंग्या,अभिज्ञ्,टार्या अँड टिम
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
19 Aug 2008 - 10:07 am | रामदास
पुण्यावर होत असेल तर नक्कीच काहीतरी असणार या शहरात. तर मग अशी थोडी थोडी चर्चा करून कशाला थांबायचं.ज्याला पुणं आणि पुणेकर समजले आहेत त्यांनी एक मोठा लेख लिहायला काय हरकत आहे.(डॉ. दाढ्यानी हा विषय मांडला असावा एका स्थलांतरीत माणसाच्या नजरेतून )फोटो फीचर बनवलं तर आणखी मजा .एखाद्या मानसशास्त्रीनी पुणेकरांच्या मानसिकतेचं विश्लेषण पण का करू नये.?(प्रत्येक शहराची अशी खास मानसिकता असते असं मला वाटतं.)मनमोकळ्या चर्चेचा आनंद झाला.
19 Aug 2008 - 11:51 am | ऍडीजोशी (not verified)
च्यायला नेमक्या ह्याच टॉपीक च्या वेळी काम वाढल्याने गप्प बसावं लागलं. असो. आता टाकतो तेल.
पेशवाई पुण्यात होती ह्यात काय नवल? कारण मुंबई निर्माण केलीच मुळी साहेबाने. त्यावेळी मुंबई आजच्या सारखी असती तर पेशवे कुठे राहिले असते हे सांगायला नकोच. आणि पेशव्यांच्या पुण्या नंतर निर्माण होऊनही आज मुंबई अख्ख्या भारताची आर्थीक राजधानी आहे. शेयर बाजार आहे, डायमंड मार्केट आहे. तरी पुणेच महान.
आपला,
(श्रीमंत मुंबईकर) ऍडी जोशी
पुण्यात म्हणे जगाला जळवतील अशा खायच्या जागा आहेत. असतीलही. पण मग ते जग पेठांपुरते मर्यादीत असेल. एकट्या दादर आणि गिरगाव मधेच अख्ख्या पुण्यापेक्षा जास्त आणि सरस खायची आणि प्यायची सोय आहे. तरी पुणेच महान.
आपला,
(खादाड मुंबईकर) ऍडी जोशी
पुण्यात मराठी टक्का जास्त आहे. मग??? लोकं बाहेरून येतात ते आयुष्यात पुढे जायला. जगाच्या मागे असलेल्या गावात कोण कशाला जाईल. पुण्यापेक्षा जास्त मराठी टक्का आमच्या आसूद गावात आहे. ह्यावर काय बोलायचे? अमेरिकेत शेकडो लोकं जातात. युगांडा मधे कोण कशाला जाईल? आणि मुंबईतून जी कोणी लोकं पुणे, तळेगावला रहायला येतात ती रिटायर्ड झाल्यावर. पुर्वी पुण्यात निदान हवा तरी चांगली होती. आता तिचीही वाट लागली आहे. तरी पुणेच महान.
आपला,
(मराठी मुंबईकर) ऍडी जोशी
पुण्यातले रस्ते, रिक्षावाले आणि PMT बद्दल तर बोलावे तितकेच कमी आहे. वहतुकीला शिस्त नावाचा प्रकारच नाहिये. सिग्नल पाळणार्या माणसाकडे बाकिचे "सटकलाय" ह्या नजरेने बघतात. पुण्यात असून स्वतःचं वाहन नसणारा माणूस अपंग होऊन जातो अथवा रिक्षानी जायची हिंमत केलीच तर कंगाल होतो. मुंबईमधली वहातूक व्यवस्था अतीशय उत्तम आहे. इथे आयुष्यभर स्वतःच वाहन न घेऊन जगणारी माणसं आहेत. लोकं लेन ची शिस्त पाळतात. लाल, पिवळा, हिरवा दिवे वाला सिग्नल पालीकेने लोकांच्या करमणूकी साठी लावला नाहिये हे मुंबईकर जाणतो. इंटरनॅशनल एअरपोर्ट बद्दल मी बोलतच नाहिये. तरी पुणेच महान.
आपला,
(शिस्तप्रिय मुंबईकर) ऍडी जोशी
अरे हो, आणि आजकालचे बरेचसे पुणेकर अजून पेशवाईतच जगतायत. जगोत बापडे. कोणे एके काळी पेशवाई होती. आता नाहिये. तरी पुणेच महान.
आपला,
(वर्तमानात जगणारा मुंबईकर) ऍडी जोशी
19 Aug 2008 - 12:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
जगाच्या मागे असलेल्या गावात कोण कशाला जाईल. पुण्यापेक्षा जास्त मराठी टक्का आमच्या आसूद गावात आहे.
आणखी एक सिक्स पुण्याच्या विरुद्ध बाजूनी! आणि आणखी काही उदाहरणादाखल:
त्यावेळी मुंबई आजच्या सारखी असती तर पेशवे कुठे राहिले असते हे सांगायला नकोच. आणि पेशव्यांच्या पुण्या नंतर निर्माण होऊनही आज मुंबई अख्ख्या भारताची आर्थीक राजधानी आहे.
पण मग ते जग पेठांपुरते मर्यादीत असेल. एकट्या दादर आणि गिरगाव मधेच ....
जगाच्या मागे असलेल्या गावात कोण कशाला जाईल. पुण्यापेक्षा जास्त मराठी टक्का आमच्या आसूद गावात आहे. ह्यावर काय बोलायचे? अमेरिकेत शेकडो लोकं जातात. युगांडा मधे कोण कशाला जाईल?
सिग्नल पाळणार्या माणसाकडे बाकिचे "सटकलाय" ह्या नजरेने बघतात.
लाल, पिवळा, हिरवा दिवे वाला सिग्नल पालीकेने लोकांच्या करमणूकी साठी लावला नाहिये हे मुंबईकर जाणतो.
तुमचं उत्तर अतिशय मुद्देसूद आहे आणि बिनतोडही, पण ....
आणि आजकालचे बरेचसे पुणेकर अजून पेशवाईतच जगतायत.
भौ, हे तुम्हीच लिहिलं आहेत, त्यामुळे फार जास्त अपेक्षा करू नका "इतिहास"पुरुषांकडून!
एक षष्ठांश गोरी यमी गोखले (खरी, संहिता जोशी)
20 Aug 2008 - 3:30 pm | मनीष पाठक
एक षष्ठांश गोरी यमी गोखले (खरी, संहिता जोशी)
आपल्या बाजुने कोणितरी बोलणारे भेटल्यानंतर अति हार्शाने किंवा आनंदाने बावचाळलेल्या मधले एक उदाहरण. स्वताचे खरे नावही विसरलेल्या यमु आज्जी. :)
(मनाने आणी कर्माने मुंबईकर)मनीष पाठक
19 Aug 2008 - 12:22 pm | टारझन
पेशव्यांच्या पुण्या नंतर निर्माण होऊनही आज मुंबई अख्ख्या भारताची आर्थीक राजधानी आहे.
ह्यात मराठी माणसाचा किती हात ? उद्या बिहारचा जपान (जपान्यांमुळे) झाला तर लालू म्हणेल मी बिहारचा जपान केला आणी ह्या ऍड्या(का येड्या?) सारखा नाचेल =))
(पुण्याचा श्रीमंत पेशवा)
टारझन
पुण्यापेक्षा जास्त मराठी टक्का आमच्या आसूद गावात आहे. ह्यावर काय बोलायचे?
ह्यालू ... ह्यालू ? ..... कुनी वळाखत का आसूद गावाला .. च्यामारी लिवता लिवता माझी भाषाच आसुद झाली =)) काय पण एक एक गावठी ...
(शुद्ध पुणेकर)
टारझन
अमेरिकेत शेकडो लोकं जातात. युगांडा मधे कोण कशाला जाईल?
आमेरिकेत आजकाल पट्टेवाला पण जातो... आम्ही नुसते युगांडाच नाही तर अजुन ४ देशांची वारी करून आलोय. आणि पट्टेवाल्याच्या अमेरिकेत जायचा मोह नाहीच ... आलेले चान्स नाकारून अफ्रिका गाठली.. उद्या दुसरा देश ... हवा आहे आपली .. वास घेऊन नाक दाबा =))
(बारा देशांचं मिनरल वॉटर पिलेला)
टारझन
पुण्यात म्हणे जगाला जळवतील अशा खायच्या जागा आहेत. असतीलही. पण मग ते जग पेठांपुरते मर्यादीत असेल. एकट्या दादर आणि गिरगाव मधेच अख्ख्या पुण्यापेक्षा जास्त आणि सरस खायची आणि प्यायची सोय आहे
अरारारा .. =)) =)) =)) हसून हसून मेलो आहे ... मला दादर गिरगावाच्या एकाही खायच्या ठिकाणाचं नाव कोण्या नॉन-पुणेकर आणी नॉन-महाराष्ट्रियन माणसाने घेतलेल ऐकिवात नाही... हा मात्र माझ्या पूणे ऑफिसला व्हिजीट देणारे दिल्लीची टिम मात्र आवर्जुन पराठे खायला "चैतन्य" मधेच आवर्जुन जातात. असो ... तुम्ही बी या हो जोशी ब्वॉ....
(पूण्याच्या शेकडो हॉटेल्सचे शेकडो मेनू चापलेला)
टारझन
पुण्यातले रस्ते, रिक्षावाले आणि PMT बद्दल तर बोलावे तितकेच कमी आहे. वहतुकीला शिस्त नावाचा प्रकारच नाहिये. सिग्नल पाळणार्या माणसाकडे बाकिचे "सटकलाय" ह्या नजरेने बघतात.
हाहाहा .... यह तो पूणे की शान है ... थ्री चियर्स फॉर पी.एम.टी.
पुण्यात असून स्वतःचं वाहन नसणारा माणूस अपंग होऊन जातो अथवा रिक्षानी जायची हिंमत केलीच तर कंगाल होतो.
आता बावळटांना जगात कुठेही फसवलंच जातं .... आम्ही मात्र रिक्षाने मस्त फिरुन पैशे जमवून आहोत... =))
(अतिहुशार आणि बावळटांना फाट्यावर गंडवणारा पुणेकर)
टारझन
लाल, पिवळा, हिरवा दिवे वाला सिग्नल पालीकेने लोकांच्या करमणूकी साठी लावला नाहिये हे मुंबईकर जाणतो. इंटरनॅशनल एअरपोर्ट बद्दल मी बोलतच नाहिये. तरी पुणेच महान.
=)) =)) =)) वा ! पूण्यात किती करमणूक होते वा वा वा .... आणि एवढी शिस्त पाळून देखील दादरहुन पूणे हायवे ला लागायला २-३ तास लागतात.. मग तिथुन पुढे पूण्याला माणूस १:३० तासातच पोचतो .. वा रे मुंबईच ट्राफिक ... सिग्नल तोडायला जागा पायजे ना ..गाड्यांना जेट इंजिन असत तर जाम एकमेकांवर गाड्या चढवून हवेत पण ट्राफिक जाम केलं असतं... पूण्यात एवढे अरुंद रोड असुन पण कधी मुंबैच्या १०%पण ट्राफिक नाही
(करमणूकीचे सिग्नल तोडणारा)
टारझन
आणि शेवटी आख्ख्या जगाला पुरून उरून मिशा पिळणारा पूणेकर
- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
19 Aug 2008 - 12:36 pm | अभिज्ञ
टार्या,
लै भारि प्रतिसाद.
जबरि हाणलास.
अभिज्ञ.
19 Aug 2008 - 1:26 pm | ऍडीजोशी (not verified)
ह्यात मराठी माणसाचा किती हात ?
तू नक्कीच १००% पुणेकर आहेस. आपला वाद पुण्यातले मराठी विरुद्ध मुंबईतले मराठी असा नसून पुणे शहर विरुद्ध मुंबई शहर असा आहे. आणि तुझंच उदाहरण घ्यायचं तर पेशवाई बुडण्यात आणि महराष्ट्राची राजधानी बदलून मुंबई होण्यात मात्र पुण्यातल्या मराठी माणसांचा १००% हात आहे.
वास घेऊन नाक दाबा
पुण्यातली सुवासीक हवा आणि प्रदुषणमुक्त वातावरण ह्यावद्दल पुण्यातल्या स्कूटर-धारी अतिरेकी मुलींना विचरून ये.
अरारारा .. हसून हसून मेलो आहे ... मला दादर गिरगावाच्या एकाही खायच्या ठिकाणाचं नाव कोण्या नॉन-पुणेकर आणी नॉन-महाराष्ट्रियन माणसाने घेतलेल ऐकिवात नाही...
पेठांतून बाहेर या पंत. एशीयाड ने उतरून प्रकाश मधे खाल्ल्याशिवाय पुढची कामे न करणारे किती पुणेकर दाखवू? आता ह्यावर तू पुन्हा भूक लागली की माणूस खाणारच असं बिनबुडाचं विधान करशीलच.
मला दादर गिरगावाच्या एकाही खायच्या ठिकाणाचं नाव कोण्या नॉन-पुणेकर आणी नॉन-महाराष्ट्रियन माणसाने घेतलेल ऐकिवात नाही.
हा अजून एक खराखुरा बेसलेस पुणेरी पणा. ह्या न्यायाने मी सुर्योदय होतच नाही असं म्हणू शकेन.
तुला अनंताश्रम, प्रकाश, जिप्सी, चंद्रगुप्त, दिल्ली दरबार, समर्थ भोजनालय, सत्कार, महेश, तांबे आहारग्रुह, कुलकर्णी, ताराबाग, खाऊ गल्ली, राजधानी, श्रीकृष्ण बोर्डींग हाऊस, मेरवान, माँडेगार, लिओपोल्ड, कॅफे ब्रिटानिया आणि अशी अजून अनेक नावं गेली नसतीलंच. आणि तुझ्या ओळखीचे नसले तरी माझ्या ओळखीचे शेकडो नॉन मराठी लोकं इथले वारकरी आहेत. कारण तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मुंबईत मराठी टक्का कमी आहे.
हाहाहा .... यह तो पूणे की शान है ... थ्री चियर्स फॉर पी.एम.टी.
वा... काय पण शान आहे. जियो मेरे लाल.
आता बावळटांना जगात कुठेही फसवलंच जातं.... आम्ही मात्र रिक्षाने मस्त फिरुन पैशे जमवून आहोत...
हे टिपीकल पुणेरी बिनबुडाचं उत्तर. मुद्दा न कळता वादासाठी वाद. रिक्षा ने जाऊन कंगाल होण्यात रिक्षावाल्यांची बेईमानदारी दिसून येते सोन्या. बाहेर गावाहून आलेल्या लोकांना फसवण्यात शहाणपणा मानणार्या पुणेकरांचा विजय असो.
वा ! पूण्यात किती करमणूक होते वा वा वा .... आणि एवढी शिस्त पाळून देखील दादरहुन पूणे हायवे ला लागायला २-३ तास लागतात.. मग तिथुन पुढे पूण्याला माणूस १:३० तासातच पोचतो .. वा रे मुंबईच ट्राफिक ...
पुण्याची परिस्थीती वेगळी आहे? १:३० माणूस पुण्याच्या वेशीवर पोचतो माणूस. पुढे पोचायचे वांधेच आहेत.
आणि अरे पुणे आहेच केवढस्सं... तरी गल्लो गल्ली ट्राफीक जॅम. पुण्याच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत पोचायला रस्ता मोकळा असेल तर तास पण लागत नाही. त्यामुळे नदीचं पाणी काठावर पसरतं म्हणून तिला मडक्याने आटोपशीरपणाचे धडे देउ नयेत.
सिग्नल तोडायला जागा पायजे ना.. गाड्यांना जेट इंजिन असत तर जाम एकमेकांवर गाड्या चढवून हवेत पण ट्राफिक जाम केलं असतं...
आता तू स्वतःच लिहीतोस की पुण्यातले रस्ते अरूंद आहेत. आणि तरी तुला असं म्हणायचंय का की तिथे सिग्नल तोडायला जागा असते? नक्की काय ते एक ठरव, नी मग बोल.
पूण्यात एवढे अरुंद रोड असुन पण कधी मुंबैच्या १०%पण ट्राफिक नाही
अरे पुणे केव्हढं? मुंबई केव्हढी? मुंबईचे एक एक उपनगर पुण्याहून मोठे आहे. संबंध आहे का काही तुलनेचा? पण तू बोल. कारण तू पुणेकर असल्याने कुणी ऐको न ऐको, बोलंणं हा तुझा अधिकार आहे.
19 Aug 2008 - 10:45 pm | टारझन
आपला वाद पुण्यातले मराठी विरुद्ध मुंबईतले मराठी असा नसून पुणे शहर विरुद्ध मुंबई शहर असा आहे.
वर कमीत कमी तीन वेळा पुणे शहराचा नाही, पुणेकराचाच उल्लेख झालाय.
पेठांतून बाहेर या पंत.
आता अजुन किती बाहेर येऊ जोशी ब्वॉ ?
एशीयाड ने उतरून प्रकाश मधे खाल्ल्याशिवाय पुढची कामे न करणारे किती पुणेकर दाखवू?
आयला आमच्या वाटचं तुम्हीच उत्तर दिलत का? वा वा वा !! लै झाक! खरी गोष्ट बिनबुडाची कशी काय? अच्छा जळजळ होतेय होय .. मग ठीक आहे.
माझ्या ओळखीचे शेकडो नॉन मराठी लोकं इथले वारकरी आहेत.
ते तिथेच रहातात. जेवायला ते काय युपी-बिहार(किंवा काय असेल ते) तिकडे जातील काय ? .. आता करोडोंची पैदास मुंबैत पैदा करून ठेवल्यावर शे-दोनशे लोक येणारच जवळ खायला.पण पुण्याच्या जंगली महारज रोडची आठवण नक्कीच करत असतील.पण पुण्याच तसं नाय बॉ .. बाहेरची लोक इथे आले की आवर्जुन (अगदी आवर्जुन बरंका) स्पेशल हाटिलात जातात (लिश्ट मोठी आहे, दर वेळी लिहीने शक्य नाही).
वा... काय पण शान आहे. जियो मेरे लाल.
वा काय पण जोशी आहे. जलो मेरे लाल
रिक्षा ने जाऊन कंगाल होण्यात रिक्षावाल्यांची बेईमानदारी दिसून येते सोन्या.
आता पुन्हा तेच का?कोणीही फक्त बावळटांनाच फसवू शकतो.रिक्षावाला काही गनपॉइंट वर लुटत नाही. तुला असं म्हणायचय का मुंबै मधे संत तुकारामांचे १ कोटी अवतार रहातात ?
बाहेर गावाहून आलेल्या लोकांना फसवण्यात शहाणपणा मानणार्या पुणेकरांचा विजय असो.
हेच जर आधी बोलला असता तर मिपाचे बरेच किलोबाइट्स वाचले असते रे पितळ्या ...
आणि अरे पुणे आहेच केवढस्सं...
=)) =)) =))
पुणे क्षेत्रफळ = ७००किमी वर्ग
मुंबई क्षेत्रफळ = ४३७.७१ किमी वर्ग
आता एवढ बिनबुडाच विधान करण्याची पुणेकराची पातळी नाही, बिनबुडाची विधाने करण्याची ऍड्या मुंबैकरांची हुकूमत मान्य आहे... =)) आरारारा .. मेलो ... =))
तरी गल्लो गल्ली ट्राफीक जॅम.
मुंबई मधे एक फ्लायओव्हर पार करायला १ तास पण लागू शकतो. अर्रे पूणे फ्लायओव्हर पेक्षा छोटंस असेल नाही ?
अरे पुणे केव्हढं? मुंबई केव्हढी? मुंबईचे एक एक उपनगर पुण्याहून मोठे आहे. संबंध आहे का काही तुलनेचा?
डुकरांना,कोंबड्यांना एका खुराड्यात बंद करून ठेवतात, त्यांना एवढी गर्दी पाहुन वाटतं आरे आपलं खुराड पुण्यापेक्षा लै लै मोठं ... =)) =))
बिनबुडाची विधाने बुडापासून करणारा पुणेकर
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
20 Aug 2008 - 12:28 pm | ऍडीजोशी (not verified)
वर कमीत कमी तीन वेळा पुणे शहराचा नाही, पुणेकराचाच उल्लेख झालाय.
अरे माझ्या गोंडस गुलाबा का अक्कल पाजळतोयस स्वतःची. इथे मी कधीही पुणेकर मराठी / पंजाबी / गुजराती असा उल्लेख केलाय का सोन्या?? पुणेकर म्हटलंय. तू ही मुंबईकर म्हण की.
आणि पेशवाई बुडण्यात असलेल्या पुणेकर मराठी लोकांबद्दलच तुझं मत अजून मांडलंच नाहियेस.
एशीयाड ने उतरून प्रकाश मधे खाल्ल्याशिवाय पुढची कामे न करणारे किती पुणेकर दाखवू?
आयला आमच्या वाटचं तुम्हीच उत्तर दिलत का?
बाळा हे प्रकाश दादर मधे आहे. आणि ते तुला महिती नसेल तर ते तुझं अज्ञान आहे. प्रकाश फेमस नाहिये असा पुणेरी अर्थ काढू नकोस. ह्यालाच पुणेरी कुपमंडूक व्रुत्ती म्हणतात.
आता पुन्हा तेच का?कोणीही फक्त बावळटांनाच फसवू शकतो. रिक्षावाला काही गनपॉइंट वर लुटत नाही.
ह्या बाबतीत मात्र पुणेरी भामट्यांना तोड नाही. तसंच फसवणं, समोरच्या माहिती नाही हे जाणून गंडवणं आणि गरजेच्या वेळी नाडणं ह्यातला फरक तुझ्या सो कॉल्ड पुणेरी बुद्धीला कळू नये ह्यात काहिही आश्चर्य नाहिये.
पुणे क्षेत्रफळ = ७००किमी वर्ग
मुंबई क्षेत्रफळ = ४३७.७१ किमी वर्ग
+
डुकरांना,कोंबड्यांना एका खुराड्यात बंद करून ठेवतात, त्यांना एवढी गर्दी पाहुन वाटतं आरे आपलं खुराड पुण्यापेक्षा लै लै मोठं ...
अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्याचा हा अजून एक पुणेरी प्रकार. अरे बाळा ज्या मुंबईत ४८ एकर चं जिजामाता उद्यान, ६४ एकर चं एस्सेल वर्ल्ड, ३० एकर ची फँटसी लँड, ३७० हेक्टर चं बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, १०४ km² चं नॅशनल पार्क आहे तिचा टोटल एरीया ४३७.७१ किमी वर्ग होऊ शकतो हे फक्त तुझ्यासारखा बाळबुद्धी पुणेकरच मान्य करेल. पण अर्थात हे तुला माहिती नसल्याने जगात अजून कुणालाच महिती नाही आणि फक्त मुंबईतलीच लोकं तिथे जातात असं विधानही तू करशीलच.
गुगल वर सर्च करून तू फक्त समोर दिसलेले मथळे वाचलेस. खोलात जाऊन माहिती नाही काढलीस. ती मी देतो - पुण्याचे जे हे क्षेत्रफळ तू देतोयस ते चुकीचं आहे. आजूबाजूची बांडगुळं पकडून मोजल्यावर पुण्याचा मेट्रोपॉलीटन एरीया होतो 1,359 km² आणि तशी मी जर नवी मुंबई / पनवेल वगरे मुंबई रीजन मधे येणारी सबर्बस मुंबई मधे जमा केली तर मुंबईचा एरीया होतो - 4,355 km².
पण हे सोड. पुणे म.पा. च्या अखत्यारीत येणारा एरीया आहे १८८ km². त्यात पिंपरी चिंचवड म.पा. जमा केलं तर हा एरीया होतो ३१४.११ km² आणि फक्त मुंबई म.पा. च्या अखत्यारीत येणारा एरीया आहे ४८० km². पण तरीही तू पुणेच मोठं असा दावा करशीलंच. (हे सगळे आकडे मी सरकारी वेबसाइट्स वरून घेतले आहेत.)
सरकारच्या वेबसाईट नुसार मुंबई भारतातलं सगळ्यात मोठं मेट्रोपॉलीस आहे रे. पण तू पुणेकर असल्याने स्वतःलाच सगळी अक्कल देवानी दिली आहे असा तुझा समज असल्याचं लपत नाहिये. ह्याला म्हणतात पेठांतून बाहेर येणे. पण ह्यातला फरक तुझ्या सो कॉल्ड पुणेरी बुद्धीला कळू नये ह्यात काहिही आश्चर्य नाहिये.
आता एवढ बिनबुडाच विधान करण्याची पुणेकराची पातळी नाही, बिनबुडाची विधाने करण्याची ऍड्या मुंबैकरांची हुकूमत मान्य आहे... आरारारा... मेलो...
तुझं बिन बुडाचं बुड दाखवलंय मी वर.
तरी, गिरे तो भी टांग उप्पर ह्या पुणेरी बाण्या नुसार, तुझं पुणेच महान आहे रे महाराजा.
19 Aug 2008 - 11:57 am | यशोधरा
>>पुणेच महान.
धन्यवाद जोशीबुवा शेवटी हे सत्य मान्य केल्याबद्दल!! :) थ्यांकू, थ्यांकू :D
19 Aug 2008 - 12:23 pm | मनस्वी
११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात.
प्रसाद, हे वरचं एक सोडून बाकी सगळं खरं आहे! :)
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
19 Aug 2008 - 12:28 pm | अनिल हटेला
एडी भौ!!
बरोब्बार ओळखलत !!
साहेबाच्या देशाची सवय आहे भो तुम्हाला...
तुम्ही आणी तुमची मुम्बै आम्ही कधी म्हतल बॉ की महान नाही......?
आमच एव्हढच म्हनन होत की ,
आमच्या पुण्याला का म्हुन नाव ठेवता....?
आणी शेयर मार्केट ,डायमंड मार्केट ई...
तुमच्याच मालकीच भो ते........
पुणेकर म्हणे पेठाच्या बाहेर जात नाहीत ....
हो!! आता आमची सवय्च आहे ती, काय करणार ..
आणी आमच्या वाहतुक व्यवस्थे बद्दल बोलुच नका....
तुम्ही कधी पाहिलये की आपल उगाच !!!
पन तरी हम हम है ...........
( इनो घ्याच राव )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
19 Aug 2008 - 12:34 pm | पक्या
>>ऍल्युमिनियम ची ओसरी करुन तेथे मिळणार्या तीन चमचे चाला अमृततुल्य नाव ....
नावाप्रमाणेच तो चहा असतो बरं का ! एकतर अमृततुल्य मधील चहा सतत भल्या मोठ्या पातेलीत उकळत असतो. त्यामुळे पाण्याचा अंश कमी होऊन तो चांगला घट्टमुट्ट झालेला असतो. शिवाय त्यात वेलची वगैरे मसाला घालून दिला जातो. हे नावाचे न उलगड्णारे कोडे वाटत असेल तर पिऊन पहा आधी.
19 Aug 2008 - 12:35 pm | शेखर
बाहेरुन आलेल्या लोकांना खायच तिथ हा*यची सवय आहे. खाल्या घरचे वासे मोजणारी माणस ही त्यांना काय आपल काम झाल की झाल. परत नावे ठेवायला मोकळी ...
शेखर
19 Aug 2008 - 12:43 pm | अवलिया
चांगली चर्चा चालु आहे नवीन माहिती मिळत आहे
माझ्या बाजुने कुठेही तेल ओतत नाही
जरा नवीन धागा सुरु केला तर अधिक चांगला आस्वाद घेता येइल
अर्थात पुणेकर व अपुणेकरांचे यावर एकमत झाले तर....
सर्किट चेंगट
(हल्ली नावात सर्किट लावले पाहिजे असा काहि दंडक झाल्याचे आमच्या कानावर उडत उडत आले. आणिबाणित कुठल्याही दंडकाची अवज्ञा होवु नये म्हणुन सहीपुरता नावात तात्पुरता बदल केलेला आहे हे सुज्ञ वाचक लक्षात घेतीलच. ज्यांना समजले नसेल त्याना आता कळेल)
19 Aug 2008 - 1:52 pm | वेलदोडा
एका लेखाला एवढे प्रतिसाद !!! रेकॉर्ड ब्रेक झालं की
पूणे तिथे काय उणे हे मात्र इथेही दिसून आलं.
कोणी कितीही पुण्याला नावे ठेवली तरी पुणे हे एकमेवाद्वितीय शहर आहे ह्यात वाद्च नाही.
मुंबईपेक्षा पुणे बरं म्हणणारे माझ्या ओळखीतले अनेक अ-पुणेकर पुण्यात स्थायिक झालेले आहेत... ते काय उगाच नाही
बाकी चालू देत्...मजा येतेय वाचायला.
विरंगुळ्यासाठी 'पुण्याचा चेहरा जपणारी' ही काही चित्रे ---
विद्येचे माहेरघर - पुणे विद्यापीठ
शनिवारवाडा
सिंहगड
वैशाली
दगडूशेठ हलवाई ट्र्स्ट गणपती (मंड्प)
मार्झोरिन
दहशतवादी ? तरूणी
19 Aug 2008 - 2:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वेलदोडेराव,
हा दगडूशेठचा फोटो कुठून आणलात हो? "याचे फोटो काढायचे नाहीत, काढलेत तर फिल्म जप्त करू" अशी धमकी मला मागच्या वर्षी मिळाली होती. तो डिगीटल क्यामेरा होता हे त्या रखवालदाराला कळलं नाही ही गोष्ट वेगळी!
19 Aug 2008 - 2:59 pm | वेलदोडा
यमी ताई,
प्रत्यक्ष मंदिरात गणपतीचा फोटो काढता येणार नाही...तशी सक्त मनाई आहे. हा फोटो गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळाच्या रथाचा आहे. लक्ष्मी रोड वरील एका उंच बिल्डींग मधुन काढला आहे. अर्थात मी नव्हे...मित्राने शेअर केलाय तो इथे डकवलाय.
19 Aug 2008 - 3:03 pm | ईश्वरी
छान चर्चा चालू आहे. निरीक्षणे वाचून मजा वाटली पण सर्व काही पटली नाहीत.
१) संदिप ने ह्याचे स्पष्टीकरण दिलेच आहे
२)टू व्हिलर ला पुण्यात गाडी म्हणतात हे निरीक्षण बरोबर आहे. पण ती दोनचाकी गाडीच नाही का? सायकलला मात्र गाडी म्हणतात हे तुमच्याकडूनच ऐकले (अर्थात वाचले). इथे अमेरिका मध्ये तर सायकल ला बाईक हा शब्द वापरतात.
माझ्या मते प्रत्येक शहराची खास एक भाषा असते. ऐकणार्याला त्या भाषेची गंमत वाटणे साहजिक आहे पण ती टर उडवण्याइतपत नक्कीच हास्यास्पद नसते.
३)हे पु़ण्यातच काय पण इतरही छोट्या शहरात मी पाहिले आहे.
४) पुण्यात असताना मी स्वतः पॅटिस आठवड्यातील कोणत्याही दिवशी खायचे.
५)आमची कोठेही शाखा नाही ..ही परिस्थिती आता बदलली आहे. गाडगीळ सराफ , अष्टेकर सराफ , चितळे बंधू , कासट (साडीवाले) ....बरीच नावे सांगता येतील
६)हे निरीक्षण बरोबर आहे ...पण ही परिस्थिती आता (पुण्यात) सर्वत्र नाही.
७) अप्पा बळवंत मध्ये ही दुकाने खूप पूर्वीपासून आहेत. उलट इथे भरपूर दुकाने असल्याने निवडीला अनेक पर्याय सहज उपलब्ध होतात. आणि मॉल सारखे पॉश नसले तरी खरेदीला मजा येते. हल्ली नव्याने झालेली क्रॉसवर्ड सारखी दुकाने ही चांगली चालतात की.
८)प्रदूषणा पासून संरक्षण ...पण मुलीच नाही तर हल्ली मुले पण नाक तोंड झाकले जाईल असा त्रिकोणी आकारात मोठा हातरूमाल बांधतात(हेल्मेट नसेल तर). पुण्यात प्रदूषण वाढलय हे मात्र खरय.
९)हे काही मी कधी अनुभवले नाही..तुम्ही निरीक्षण केलय ..असेलही तसं
१०)हम्म्...हे बरोबर. तुमच्या यादीत अजून एक भर्...अरोरा टॉवर
११) मी स्वतः म्हणत नाही पण क्वचित कधीतरी इतरांच्या तोंडून ऐकलय खरं.
प्रत्येक शहर वासियांची खास एक ओळख असते तशी ती पुण्याची पण आहे. अस्सल पुणेकरांना पुण्याचा जाज्वल्ल्य अभिमान कायम रहाणारच.
ईश्वरी
19 Aug 2008 - 3:35 pm | मराठी_माणूस
अस्सल पुणेकरांना पुण्याचा जाज्वल्ल्य अभिमान कायम रहाणारच.
तसेच दुसर्यांना पण त्यांच्या गावाचा असणार हे लक्षात घेतले पाहिजे. आपले चांगले म्हणताना दुसर्याना हिणवु नये(वर काहि प्रतिसादात मागास भाग, गडचिरोलि ई. म्हटले आहे)
19 Aug 2008 - 3:56 pm | यशोधरा
अहो, मराठी माणूस, कोणत्या पुणेकराने इथे दुसर्यांना हिणवले आहे? पुणेकर स्वतः होऊन हे असले गुर्हाळ सुरु करत नाहीत, पण इतर शहरचे/ गावचेच करतात अन् एका मर्यादेनंतर पुणेकरांना बोलणे भाग पडतेच!!
इथेही हा धागा पुणेकराने सुरु केलेला नाही हे लक्षात घ्या म्हणजे झाले ... डॉ. साहेब मूळचे पुण्याचे नाहीत
19 Aug 2008 - 4:10 pm | अनिल हटेला
आरे मराठी माणसा जरा वाच !!
विषय काय होता?
तो कुठे नेला ,
कुणी नेला...
आपल हे चांगल आहे .....
काहीही झाल की पुणे आहेच ....
असो ...
परत एक्द सगळा टॉपीक वाचा म्हणजे कल्पना येइन .....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
19 Aug 2008 - 4:45 pm | डॉ.प्रसाद दाढे
आता मला आयडी बदलून 'काडी मास्तर' असा केला पाहिजे! कॉलेजमध्ये वाद-विवाद स्पर्धेत बसल्यासारखे वाटले. मजा आली.
मु॑बई आणि पुणे ह्यात उच्च-नीच ठरविणे म्हणजे लता श्रेष्ठ की आशा कि॑वा रफी थोर की किशोर असे विचारण्यासारखे होईल.
दोन्ही शहरात काही गोष्टी चा॑गल्या आहेत आणि काही वाईट! पण मुळात माझा उद्देश दोन्हीत तुलना करण्याचा नसून पुण्यातल्या वैशिष्ठ्यपूर्ण व ग॑मतीदार गोष्टी लिहिणे हा होता. साक्षात भाईकाका॑नीदेखील ह्या दोन्ही थोर शहरातल्या गमती-जमती लिहिल्या आहेतच. त्या सुप्रसिद्ध लेखात नसलेल्या व आत्ता अनुभवास येणार्या मजेशीर अनुभवा॑चे स॑कलन असा मूळ उद्देश आहे.
19 Aug 2008 - 8:16 pm | विजुभाऊ
भाईकाका॑नीदेखील ह्या दोन्ही थोर शहरातल्या गमती-जमती लिहिल्या आहेतच.
भाई काका हे मुळचे पुणेकर नव्हते. ते पार्ल्याचे म्हणजे मुम्बैकर होते.
पुणेकर स्वतः होऊन हे असले गुर्हाळ सुरु करत नाहीत, पण इतर शहरचे/ गावचेच करतात
हेच खरे
:::::::पार्लेकर विजुभाऊ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
19 Aug 2008 - 8:35 pm | ब्रिटिश टिंग्या
ही चर्चा (वाद?) पुणेरी पुणेकरांच्या सवयी/ वैशिष्टे यांबद्दल होती ना :?
मग यात अ-पुणेकरांनी लुडबुड का करावी?
अन् करायची असलीच तरी लुडबुड करणार्या जवळपास सर्व प्रवेशिका मुंबईतुनच का याव्यात?
याचा अर्थ बाकी महाराष्ट्राने पुण्याचे श्रेष्ठत्व मान्य केले वाट्टं ;)
असो, मुंबईच्या छत्रछायेत असणार्या ठाणे,कल्याण अन् डोंबिवलीत खडीवाले वैद्यांचा पाचक काढ्याचा खप वाढल्याच्या बातम्या येत आहेत!
अभिनंदन पुणेकरहो!
(पुणेकर) टिंग्या!
19 Aug 2008 - 9:39 pm | अनामिक
मी पुण्याचा नाही पण पुण्यात जवळ जवळ २ वर्षे होतो. मला पुणे शहर अतिशय आवडलं... पुणे तिथे काय उणे हे अगदि समर्पक. मला पुण्याविषयी काहिच तक्रार नाही. थोडीफार तक्रार आहे ती पुण्याच्या लोकांबद्दल. आणि सगळ्याच लोकांबद्दल नाहि बोलत मी. इथल्या बर्याच लोकांचा बाहेरुन आलेल्या लेकांकडे बघण्याचा दृष्टीकोण नाही आवडला मला. आपण आणि आपली मराठी बाहेरुन आलेल्या लोकांपेक्षा कशी श्रेष्ठ हे दाखवण्याचा त्यांचा अट्टहास का असतो हे मला न समजलेले कोडे आहे. आणि पुण्याबाहेरुन आलेले लोक पुणे खराब करताहेत हे म्हणणे कितपत योग्य? ज्या लोकांना यवतमाळ हा जिल्हा कि तालुका हे माहित नाही, चंद्रपुर मधे आदिवासी राहतात हि ज्यांची समजूत, अमरावती म्हणजे आंध्रप्रदेशाच्या सीमेवर का असं विचारणे आणि मुख्य म्हणजे पुण्या बाहेरचे (मुंम्बई सोडून) सगळे मागास आहेत असे समजणे हि सगळी पुण्याच्या लोकांची "कुपमंडूक" असण्याची लक्षणे आहेत असे समजावे का? जर आपण ज्या राज्यात राहतो त्याबदलच (पश्चिम महाराष्ट्र सोडून) आपल्याला माहिती नसेल तर मग फक्तं जन्माने पुणेरी असलेल्यांना एवढा जाज्वल्य अभिमान का असावा? हा अभिमान संपूर्ण राज्याबद्दल असायला नको का? तुम्ही मारे बारा देशाचं पाणी प्यायला असाल हो, पण आपल्याच राज्यातल्या लोकांना दोन्-दोन दिवस (नळाच्या) पाण्याची वाट पहायला लागते त्याचं काय? कि आपल्या शहरात तर पाण्याची कमतरता नाही, विज-वितरण अगदि सुरळीत आहे (बाकी ठिकाणी १२ -१६तास लोड शेडींग) हे बघुन आपला अभिमान अजून वृद्धिंगत होतो? मला लेखकाने नमुद केलेल्या मुद्यांबद्दल काहिच तक्रार नाहिये, ठिकाणाप्रमाणे व्यक्तींच्या प्रकृती बदलत जातातच, पण हि जी चर्चा चाललेली आहे ती भलतीकडेच म्हणजे आपण किती श्रेष्ठ हे दाखवण्याकडे घसरलीय.
आणि राहता राहिला पुणे श्रेष्ठ असल्याचा प्रश्न तर ते कुणीही मान्य करेल, फक्त तुमच्या पुणेरी लोकांचा इतर लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोण काय तो बदला!
(विदर्भातला) अनामिक.
अवांतर - पुणेरी नसल्याने लिहिताना व्याकरणाच्या चुका झाल्यात त्याकडे दुर्लक्ष करा.
19 Aug 2008 - 11:08 pm | टारझन
मला पुणे शहर अतिशय आवडलं... पुणे तिथे काय उणे हे अगदि समर्पक.
थ्यांक्स .. तुमच्या सारखी *** या मुंबैकरांची असती तर वादच नव्हता :)
इथल्या बर्याच लोकांचा बाहेरुन आलेल्या लेकांकडे बघण्याचा दृष्टीकोण नाही आवडला मला.
बरं बरं. माझे इतके ओ.एम.एस.मित्र आहेत(महारष्ट्रीयन्स सोडाच) माझं तर सगळ्यांशीच चांगल वर्तन आहे. हा .. आता पुण्यात राहुन कोणी पुण्याला नाव ठेवायला लागला, तर मात्र त्याच्या शाब्दिक मुस्काटात बसनार हे नक्की.
आपण आणि आपली मराठी बाहेरुन आलेल्या लोकांपेक्षा कशी श्रेष्ठ हे दाखवण्याचा त्यांचा अट्टहास का असतो
अर्रे वा ! पुण्यात २ वर्षे राहुन भाषा सुधारली की हो तुमची. :)
पुण्याबाहेरुन आलेले लोक पुणे खराब करताहेत हे म्हणणे कितपत योग्य?
पूण्यातच राहून खाऊन पिउन, पूण्यालाच नावं ठेवणं किती योग्य आहे ?
हा अभिमान संपूर्ण राज्याबद्दल असायला नको का?
आता नवा वाद नका काढु, पोळून घ्याल. आमच्या मराठी अभिमानावर प्रश्नचिन्ह ?
तुम्ही मारे बारा देशाचं पाणी प्यायला असाल हो, पण आपल्याच राज्यातल्या लोकांना दोन्-दोन दिवस (नळाच्या) पाण्याची वाट पहायला लागते त्याचं काय?
त्याची आम्हाला मनापासून कळकळ वाटते, पण निसर्गाच्या इच्छेपुढे काय करणार आम्ही पुणेकर ? आणि काहो ? आम्ही पण २ किलोमिटर जाऊन डोक्यावर रहाटाचं क्षारयुक्त पाणी पिलो आहे, आणि जिद्दीने प्रगती केली. आता काय प्रगती करू नये असं म्हणत असाल तर मात्र सॉरी बाबा.. काळ आणि पुणेकर कोणासाठी थांबत नाही.
तुमच्या पुणेरी लोकांचा इतर लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोण काय तो बदला!
पूण्यात राहून किंवा न राहून , पुण्यातलं उनं काढण्याचा दृष्टीकोण बदला हो
जळणार्या लाकडांना जरा थंडाई घ्या... इथे कोणी पुणेकराने हा वाद सुरू केला नाही.. जरा पुर्ण प्रतिसादांचा अभ्यास करून बोला हो ! कोणी पुणे का श्रेष्ठ असा सवाल केला म्हणून उत्तरादाखल दाखले दिले आहेत. आता एक रेष मोठी कशी दाखवाल असं विचारलं तर तिच्या शेजारी छोटी रेष मारावीच लागते.
असो , पुण्यात माझ्याच क्लास मधे २००+ मुले पुण्या बाहेरची होती, सगळेच्या सगळेच पुण्याच कौतुक करता थकत नाहीत. त्यांचं इथेच (आमच्या पुण्यात) व्हायचं पक्क होतं... पहा महिमा आमच्या पुण्याचा...
रहाटाचं क्षारयुक्त ते पेप्सिकोचं मिनरल पाणी पिलेला राष्ट्राभिमानी पुणेकर
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातातत्त्त
20 Aug 2008 - 1:43 am | अनामिक
बरं बरं. माझे इतके ओ.एम.एस.मित्र आहेत(महारष्ट्रीयन्स सोडाच) माझं तर सगळ्यांशीच चांगल वर्तन आहे. हा .. आता पुण्यात राहुन कोणी पुण्याला नाव ठेवायला लागला, तर मात्र त्याच्या शाब्दिक मुस्काटात बसनार हे नक्की.
तुमच्यासारखे वर्तन करण्याची बुद्धी देव सगळ्यांना देओ! (देवा कितीवेळा सांगायला लावतोयेस कि मी पुण्याला नावे ठेवतच नाहिये, नपेक्षा मला हे शहर फार आवडतं!) म्हणजे मग माझी किंवा इतरांची काहिच तक्रार राहणार नाही.
अर्रे वा ! पुण्यात २ वर्षे राहुन भाषा सुधारली की हो तुमची.
हा हा हा.....म्हणतात ना ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला....... :)
पूण्यातच राहून खाऊन पिउन, पूण्यालाच नावं ठेवणं किती योग्य आहे ?
अजीबात योग्य नाही. पण भाजीत मीठ कमी असलं तर सांगता कि नाही आईला? आणि तुम्हीच म्हणताय तुमचे मित्र पुण्याच कौतुक करता थकत नाहीत. जसं वागाल तसाच प्रतिसाद मिळेल. आम्हालापण पुण्याबद्दल तक्रार नाहिच. मला जी तक्रार होती/आहे ती मी सांगीतली आणि त्यावर फक्त शाब्दिक मुस्काटातच बसतेय.
आमच्या मराठी अभिमानावर प्रश्नचिन्ह ?
नाही, मराठी अभिमानावर शंका घेतलेली नाही. पण पश्चिम महाराष्ट्रातल्या किती लोकांना लातूर, परभणी, नांदेड, पुसद, यवतमाळ, वाशिम, चंद्रपुर, गडचिरोली, अकोला, अमरावती भागांबद्दल माहिती आहे?
काळ आणि पुणेकर कोणासाठी थांबत नाही
मला वाट्टं कि "काळ आणि मुंबई कोणासाठी थांबत नाही" असं बोललं जातं. तुम्ही तुमचा मुद्दा मांडायला वापरलं हरकत नाही.
पूण्यात राहून किंवा न राहून , पुण्यातलं उनं काढण्याचा दृष्टीकोण बदला हो
मी पहिलेच म्हंटलय "पुणे तिथे काय उणे हे अगदि समर्पक" आणि पुणेकर पण मान्य करतातच नं हे. म्हणजे इथे जसे चांगले आहे तसेच वाईटही आहेच. अन तसं असूनही मला पुणं आवडतच!
तुम्हाला उगाचच मझी जळजळ होतेय असं वाट्टंय. मला इनो किंवा थंडाईची गरज नाहिये, पण तुम्हीच (तुमच्या पैकी कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे) खिंड लढवून थकला असाल तर ग्लुकॉन डी घ्या :) !!
पुण्यावर मनापासून प्रेम करणारा
अनामिक.
20 Aug 2008 - 2:09 am | टारझन
माझे अनामिक डेबू... कायले आगांव अढू रायला बे ? आमू तुमाले बोल्लोच नाय... ज्यो पुण्यातलं उणं काडतो त्याले आमी धडा दावतो ... कल्ले काय .(.ते मुंबैकर) ?
जळगावच पाणी पिलेला)
टारू
19 Aug 2008 - 10:02 pm | भाग्यश्री
अनामिक, कुणीही पुणेकर किंवा टु बी स्पेसिफिक मी तरी कधीच अपुणेकरांना नावं 'उगीच' ठेवत नाही. माझ्या सर्व कॉलेज मैत्रीणी नॉन पुणेकर होत्या. त्यांच्याशी माझं अजुनही मस्त जमतं.. का जमतं, कारण त्या इथे आल्या, शिकायला.. शिकल्या.. आता नोकरी करतात, पुणे त्यांना मनापासून आवडतं.. पुणेकर नसून पुण्यावर त्यांच माझ्याइतकंच प्रेम आहे. असं जर असेल तर मी का नावं ठेवावीत त्यांना.. पण तेच माझ्या दुसर्या मैत्रीणीचे वडील, त्यांच्या लग्नापासून इथे राहतात पुण्यात (पंजाबी आहेत..) आणि तेव्हापासून आज पर्यंत २५ वर्षं पुण्याला शिव्याच घालतात.. मराठी शिकले नाहीत. मला का त्यांचा राग येऊ नये? तुम्ही जिथे राहता, जी तुमची कर्मभूमी आहे तिचा तुम्ही आदर केलाच पाहीजे,प्रेम अगदी नाही म्हणत मी, पण पुण्यातच राहून पुण्यालाच शिव्या घालण्याचे काय प्रयोजन? मला अश्या लोकांचा राग येतो .. सरसकट अपुणेकर नव्हे. आणि बहुतांश पुणेकर असाच विचार करत असावेत. काही असतात नग,जे सर्वच ठीकाणी असतात. उडदामाजी काळे गोरे.
आणि हो हे भाषेचे मात्र खरे आहे. आय ऍड्मिट , मला कुणी स.पे.स्टाईल मराठी बोलत नसलं तर ऑड वाटतं.. मी फटकळपणे सुधारायला नही जात. पण जमेल तेव्हा मी म्हणते ते उच्चार सांगते. तसं बोलायचं की नाही हा समोरच्याचा प्रश्न असतो,मी त्याचा आदर नेहेमीच करते. सगळेच कदाचित तसे करत नसतील.. मान्य.. पण हे बदलेल असंही वाटत नाही.. मात्र पहीला मुद्दा मला नाही पटला...
बाकी चर्चेबद्द्ल मी काही बोलतच नाही. काही लोकांना पुण्याबद्दल उगीच जळजळ असते हे मात्र अगदी खरं.. दिसलीच या चर्चेत.. असो.. प्रत्येकाची मतं असतात.पण उगीचच अती खुसपट काढणे आणि पुण्यात राहून पुण्याला शिव्या देत असलात, तर तुम्ही तुमच्या आवडणार्या गावात जा ना.. अवश्य जा!! :)
19 Aug 2008 - 10:52 pm | अनामिक
भाग्यश्री,
मी पण पुण्याला नावे ठेवतच नाहिये, मला स्वत:ला पुणे हे मनापासून आवडते आणि मी ते पहिलेच स्पष्ट केलयं. माझेसुद्धा पुणेरी मित्र आहेतच. आणि मी सगळ्या पुणेरी लोकांबद्दल नाहि बोलत आहे. पण बर्याच पुणेकरांचा दृष्टीकोण मला नाही आवडला. आता ते माझं वय्यक्तिक मत असू शकतं. पण जे वाटलं ते लिहिलं. याच चर्चेमधे उपहासाने गडचिरोलीला मागास म्हणून संबोधलय. मी तरी तिथे कधी गेलो नाहिये, पण ते काहि अगदिच मागसलेलं नाहिये. आणि घरातही अडगळीची खोली असतेच कि. त्यामुळेच तर बाकिच्या खोल्या साफ आणि सुंदर राहतात. आता पुणे होतं /आहे प्रगत आणि त्याला किंवा बाकि शहरांना अजून प्रगत बनवताना सो कॉल्ड मागास भागांकडे दुर्लक्ष होतं. म्हणून त्यांना कमी का लेखावं? तू स्वतः कुणाला कमी लेखत नसशील, पण असेही नग आहेत कि जे फक्त पुणेरी मित्रच पसंत करतात, अगदि अमेरिकेत आल्यावर सुद्धा! परत ते माझं वय्यक्तिक मत असू शकतं. पण वाटलं म्हणून लिहिलं. राग नसावा.
आणि जे तुला अशुद्ध वाटतं ति त्या त्या भागातली बोली भाषा असू शकते. उच्चारा बद्दल बोलत नाहिये मी. शिवाजीतला जी जहाजातल्या ज प्रमाणे उच्चारला तर मला पण आवडणार नाही. पण "तो मधेच बोलला" च्या ऐवजी "तो मधातच बोलला" हे म्हणजे बोली भाषेचा परिणाम.
(पुण्यावर मनापासून प्रेम करणारा) अनामिक.
19 Aug 2008 - 11:16 pm | भाग्यश्री
अनामिक मी तो प्रतिसाद पर्सनली तुम्हाला नाही लिहीला.. जनरलाईज्ड होतं स्टेटमेंट.. आणि हो, पुणं भारी म्हणून बाकीचं मागास मी कधीच म्हणणार नाही.. पुणं देखील सर्वच्या सर्व सुंदर नाहीचे.. जसं अडगळीची खोली म्हण्ता तशी पुण्यातही आहेत.. असो.. मी लिहीण्याच्या नादात जे मनात येईल ते लिहीलं.. तुम्हाल उद्देशून नव्हते..
आणि हो, बोलीभाषेबद्द्ल मी पूर्ण सहमत. मला ऑड वाटतं, कारण मी ती भाषा कधीच ऐकलेली नसते. म्हणून मला खटकतं, याचा अर्थ तो उच्चार्,तो शब्द चूक आहे असेही नाही..
19 Aug 2008 - 10:49 pm | खादाड_बोका
पुणेकरांनो, ऐकदा येवुन नागपुर पहा..म्हणजे तुम्हाला वाटेल, "सगळीकडे ऊणे....हेच काय आपले पुणे"? :D :D :D :D
विहीरीतल्या बेडकाला विश्वाची काय पारख....
19 Aug 2008 - 11:02 pm | अनामिक
खादाड बोका - तू नागपुरचा का?
आणि हो या म्हणाव सगंळ्यांना एकवेळ नागपुरला वेळ कढून... मस्तं तट्टे-गिट्टे लाउ, संत्रे खाऊ... काय म्हणता अ-नागपुरकर?
(नागपुरवर मनापासुन प्रेम करनारा) अनामिक.
19 Aug 2008 - 11:27 pm | पक्या
अनामिका,
अति जळ्जळ चांगली नाही बरं का? इनो घ्याच आता. :)
चर्चा पुणेकरांच्या पुणेरी पणाबद्द्ल चालू आहे (की होती ? ;) ) आणि त्यात पुण्याला उठसूट नावे ठेवू नये हे पुणेकरांचे म्हणणे आहे. ह्यात आता विषयांतर नको. तुमच्या नागपूरला कोणीही नावे ठेवलेली नाहीत. आणि पुणे छान की नागपूर छान असाही वाद इथे चालू नाही. तुम्हाला नागपूर ची वैशिष्ट्ये सांगायची असतील तर दुसरा धागा सुरू करा ना.
19 Aug 2008 - 11:41 pm | अनामिक
मि. पक्या,
मला जळ्जळ होतच नाहिये .... आणि मी पुण्याला नावेपण ठेवली नाहित. मला जे अनुभव आले, जे वाटलं ते लिहिलय. आणि मी नागपुर कसं छान हे सांगायचा प्रयत्नहि करत नाहिये. खादाड बोक्याच्या प्रतिक्रियेवर पुलंचं एक वाक्य आठवलं म्हाणून सहज लिहिलं. त्यात वाईट हेतू नव्हताच. कदाचित हे आपल्या ध्यानात आलेले दिसत नाही.
इनोची गरज नसलेला - अनामिक.
19 Aug 2008 - 11:19 pm | टारझन
सगंळ्यांना एकवेळ नागपुरला वेळ कढून... मस्तं तट्टे-गिट्टे लाउ, संत्रे खाऊ... काय म्हणता अ-नागपुरकर?
नक्कीच .. पुण्याचा खवय्या सगळी कडचे आस्वाद घेतो (पण तिथलंच खाऊन तिथल्या त्या बाबीला नावे कधीच ठेवत नाही...
"सगळीकडे ऊणे....हेच काय आपले पुणे"?
आयला या बोक्याच्या घश्यात कोणीतरी इनो ओता हो ...काय खाल्लय काय माहीत.
दंतकथा: पूण्यात खाऊन पैसे न देता पळून जाऊन त्या खाऊलाच नावें ठेवल्यावर फार जळजळ होते म्हणे..
सात समुद्र पार केलेला पूणेरी बेडूक
टारझन
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
19 Aug 2008 - 11:51 pm | अनामिक
नक्कीच .. पुण्याचा खवय्या सगळी कडचे आस्वाद घेतो (पण तिथलंच खाऊन तिथल्या त्या बाबीला नावे कधीच ठेवत नाही...
पुण्याचेच का सगळेच खवय्ये सगळीकडचा आस्वाद घेतात. त्यात नवल ते काय. आणि मी तरी पुण्याला नावे ठेवलेली नाहित. माझी पसंती मी पहिल्याच प्रतिसादात दिलेली आहे. माझा प्रश्न वेगळाच होता. आणि त्यावर प्रतिसाद देण्याऐवजी मलाच जळ्जळ होतेय हा निष्कर्ष काढल्या गेला. (भाग्यश्रीने प्रतिसाद दिला त्या बद्दल तिचे आभार)
20 Aug 2008 - 12:11 am | टारझन
अहो अनामिक ब्वॉ .. तुमचं मराठी वाचन पण सुधारावं लागेल का आता ? मी ते बोक्याला म्हंटलेलं आहे.
वाद हा चालु झाला कारण आम्ही पुणेकरांनी आमच्या पुण्याचं कौतुक केलं आणि वरच्या दंतकथेतल्या कथानायकांना ते सहन झालं नाही म्हणून
आणि तुमच्या प्रश्नांना मी पान-३ वर उत्तर दिले आहे.
कळावे लोभ नसावा
20 Aug 2008 - 1:47 am | अनामिक
माफ करा पान-३ वरचे उत्तर वाचले नहते.
कुणाकडूनच लोभाची अपेक्षा नसलेला,
अनामिक.
19 Aug 2008 - 10:26 pm | भाग्यश्री
या नागपूरकर, तुमचीच कमी होती.. भाईकाकांना मानलं.. लेख लिहायला फक्त पुणेकर ,मुंबईकर आणि नागपूरकर घेतले.. इथेही तेव्हढ्याच 'करांना' इंटरेस्ट दिसतोय..! :D
19 Aug 2008 - 10:53 pm | पक्या
येस्...बरोबर बोललीस भाग्यश्री. पुणं इत़कं असहय होत असेल तर कशाला रहाता पुण्यात? (पुण्यात राहून पुण्याला उठ्सूट नावे ठेवणार्यांना म्हणतोय)
इथ एक गोष्ट मात्र लक्षात आली...पुण्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आहेत आणि ज्या वाईट आहेत त्या आहेत हे पुणेकर मान्य करतच आहेत. पण
आमचं पुणं छान ,पुणे महान, पुण्याचा जाज्वल्य अभिमान असं पुणेकरांनी म्हणता क्षणी ह्या अ-पुणेकरांच्या कपाळाला आठ्या चढतात. स्वतःच्या शहराबद्द्ल अभिमान असणं ही काय चुकीची गोष्ट आहे काय? माझं आत्या कडे नगर ला (अहमदनगर) बरेचदा जाणं व्हायचं . त्यावेळी तिथले लोक (नगर पुण्यापेक्षा छोटं आणि पुण्याएवढं प्रगत नसलं तरी) आमचं नगरच तुमच्या पुण्यापेक्षा कसं चांगलं हे मला ऐकवायचे.
'स्वतःचा तो देशाभिमान आणि दुसर्याचा तो देशद्रोह ' ह्या उक्तीप्रमाणे काही अ-पुणेकर पुण्याला नावे ठेवत आहेत.
19 Aug 2008 - 11:19 pm | भाग्यश्री
हेहे पक्या.. मुद्दा बरोबर आहे. पण माझ्या नो कमेंट्स आता.. :) माझी सासूरवाडी नगर आहे.. :D
19 Aug 2008 - 11:24 pm | लंबूटांग
ज्या वाईट आहेत त्या आहेत हे पुणेकर मान्य करतच आहेत !!!!!!!!! :O
कुठे दिसले नाही कबूल केल्याचे.. गिरे तो भी हमारी टांग उपर असेच दिसले मला. आणि मला वाटते ह्याच गोष्टीवरून सगळे पुण्याला नावे ठेवतायत.
बाकी मला पण पुणे आवडले नाही बॉ अजिबात. २च दिवसात इतका वैतागलो मी पुण्याला की मी क्लास ला ३ आठवडे अप डाऊन केले.
१० रिक्षावाल्यांना विचारले की एखादा मेहेरबानी केल्यासारखा घेउन जाणार. आणि रोज त्याच अंतरासाठी कधी रु. १८ तर कधी रू. ४०. आणि सुट्टे पैसे नसायचेच बहुतेक वेळा त्यांच्याकडे. मग आपल्यावरच गुरकावणार. जाऊ देत.
मुंबईकर स्वतःच गर्दी वर आणि इतर वाईट गोष्टींवर बोलतो. फालतू च्या गोष्टींचा जाज्वल्य अभिमान बाळगण्यापेक्षा त्या सुधारता कशा येतील ते बघावे असे मला वाटते.
19 Aug 2008 - 11:34 pm | टारझन
पुण्याला की मी क्लास ला ३ आठवडे अप डाऊन केले.
पहा .. पहा ... पुण्यात क्लास साठी अपडाऊन करण्याचे एवढे कष्ट का घेतले रे बाबा? पुणं आवडलं नाही तर जायचं ना दुसरी कडे ...(विद्येचे माहेरघर का ते कळालं का आता ?)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात