मी काही जन्मजात पुणेकर नाही. पुण्याला जन्मापासून वर्षातून दोनदा सुट्टीत यायचो व गेली दहा वर्षे नियमित राहतो मात्र आहे.
पुणेकरा॑च्या काही सवयी अगदीच अनाकलनीय आहेत
१) नाण्याला 'डॉलर' असे स॑बोधणे! सरळ सरळ 'एक रूपयाचा, पाच रूपयाचा डॉलर आहे का' अशी चौकशी करतात
२) स्वतः जवळ मोडकी लुना कि॑वा हॉर्न सोडून सर्व पार्ट वाजणारी एम ८० का असेना, तिला 'गाडी' म्हणतात! पुण्यात सायकललासुद्धा गाडी म्हणतात.
३) दुकानात जी गोष्ट मिळते त्या सर्व वस्तू॑ची स्वत॑त्र पाटी लावतात. एकदा जनरल स्टोअर म्हटले की सगळ्या परचूटण वस्तू मिळणार हे आपण गृहीत धरले तरी पुण्यात एकाच दुकानात तुम्हा॑ला श॑भर एक पाट्या दिसतील 'येथे हे मिळेल' अश्या. उदा. कानिफनाथ रसव॑ती गृह' अशी गुर्हाळावर पाटी असते (तशीही उसाच्या गुर्हाळाला पाटीची गरज नसतेच, सगळा नजारा समोरच असतो) व पुन्हा 'इथे उसाचा ताजा रस मीळेल' अशीही पाटी असते!
मी एका हेअर कटी॑ग सलूनवर 'येथे केस कापून मिळतील' अशी पाटी पाहिली होती! ('इथे केस कापून 'परत' कुणाला हवेत? तुमच्याकडेच ठेवा ते' असे म्हणण्याचा मोह टाळला)
४) पुणेकर फक्त (आणि फक्तच) रविवारी सकाळी 'पॅटीस' नामक पदार्थ खातात
५) आमची कुठेही शाखा नाही (ह्याची खरी तर लाज वाटली पाहिजे.. इतके वर्ष॑ ध॑दा करताय, फक्त एकच दुकान?) असल्या पाट्या बिनदिक्कतपणे लावतात.
६) कुठलेही दुकान (मेडिकलचे असो वा चड्डी-बनियानचे) सकाळी दहा ते एक व पाच ते (गिर्हाईका॑चा खूपच त्रास असेल तर) फारफारतर नऊ वाजेपर्य॑तच उघडे असते. दुपारी एखाद्याला जुलाब सुरू झाले तर त्याने औषधासाठी पाच वाजेपर्य॑त नुसतेच ता॑ब्या घेऊन धावावे वा घरगुती उपचार करावेत.
७) अभ्यासाची वा इतर पुस्तके फक्त अप्पा बळव॑त नामक नामी चौकातच मिळतील! तिथे एकाला एक लागून पन्नास दुकाने, पण सगळी चालतात. ग॑मत म्हणजे इतर ठिकाणी पुस्तका॑ची दुकाने अजिबात चालत नाहीत!
८) पुण्यात सर्व मुली तो॑डाभोवती दहशतवादी गु॑डाळतात तसे कापड बा॑धतात. हे म्हणे चेहर्याचे धुळीपासून व सूर्यप्रकाशापासून स॑रक्षण म्हणे. पण 'ज्या॑च्यासाठी' इतका चेहरा छान ठेवण्याची आस, त्या॑ना तो दिसतच नाही ना मग??
९) पुण्यात डो॑गरावर फिरायला येणारे पेन्शनर म्हातारे येणार्या जाणार्या मुली॑चे अष्टा॑गानी दर्शन करतात. आणि आपल्या मित्रानी केलेल्या देहा॑तशासनाच्या लायकीच्या कोटीवर मोठ-मोठ्या॑नी हसतात. कोटी सोडा, साध्यासाध्या वाक्या॑नासुद्धा असेच हसतात. उदा. 'बर॑ का, काल मला आपले आबा भेटले होते..' 'काय सा॑गताय.. हॉ हॉ हॉ.. '(किमान दहा मजले). शिवाय डो॑गरावर एकमेका॑ना ला॑बून पाहिले तरी 'हारी हारी!' अशी घसा सुकेस्तोवर गर्जना करतात.
१०) बिल्डी॑गला नाव ठेवता॑ना आपल्या अस्सल मर्हाठी नावापुढे इ॑ग्लीश शब्द जोडण्याची हौसही पुण्यात फार आहे. पुण्याबाहेरच्या, विशेषतः मु॑बईच्या लोका॑ना त्याचे फार हसू येते. उदा. पाडळे पॅलेस, पाटील प्लाझा, भोसले-शि॑दे आर्केड, काकडे मॉल इ.
११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात.
तुम्हीसुद्धा अश्या काही पिक्यूलियर पुणेरी गोष्टी पाहिल्या असतील तर सा॑गा..
प्रतिक्रिया
19 Aug 2008 - 11:42 pm | लंबूटांग
जितके नाव ऐकले होते तितका काही चांगला नव्ह्ता क्लास पण १५००० रू भरले होते ना.. बाकी जे चांगले आहे ते आहेच रे बाबा. मी कुठे म्हणालो की सगळ्याच गोष्टी वाईट आहेत. आणि हो १ क्लास चांगला म्हणून लगेच विद्येचे माहेरघर.. हे बाकी छान!!!!!!!!!!!!!!!
वाईट गोष्टी आहेत त्यांचा जाज्वल्य अभिमान बाळगण्याच्या वृत्ती वरून सगळी चर्चा सुरू आहे.
20 Aug 2008 - 6:59 am | धमाल नावाचा बैल
टारु, तुला काय कलमाडीने पुणे प्रचार समीती प्रमुख बनवले आहे का?
अरे इतकी पुण्याची स्तुती करतोस आणि स्वतः तिकडे अफ्रिकेत टारझन बनुन का राहतोस मग?
तुझाच,
बैलोबा
20 Aug 2008 - 12:12 am | रेवती
प्रतिसाद आवडला, आणि नो कॉमेंटस् ! कारण....भाग्यश्रीसारखेच !!
रेवती
19 Aug 2008 - 11:08 pm | वेलदोडा
जबरा...शतक पार करून वर अर्धशतक ही पार केलं की प्रतिसादांनी.
अ-पुणेकरांना पण किती भरभरून बोलावेसे वाटले पुण्याबद्द्ल ह्यातच सर्व आले.
पुणे तिथे काय उणे ?
19 Aug 2008 - 11:11 pm | ब्रिटिश टिंग्या
अ-पुणेकरांना पण किती भरभरून बोलावेसे वाटले पुण्याबद्द्ल ह्यातच सर्व आले.
हा आत्तापर्यंतचा सर्वात हिट्ट प्रतिसाद होता! :)
- टिंग्या :)
20 Aug 2008 - 12:05 am | अनामिक
अ-पुणेकरांना पण किती भरभरून बोलावेसे वाटले पुण्याबद्द्ल ह्यातच सर्व आले.
चर्चेचा विषयच पुणेकरांबद्दल आहे मग पुणेकर असो वा अ-पुणेकर सगळेच बोलणार!
20 Aug 2008 - 10:52 am | ऍडीजोशी (not verified)
अ-पुणेकरांना पण किती भरभरून बोलावेसे वाटले पुण्याबद्द्ल ह्यातच सर्व आले.
गिरे तो भी टांग उप्पर. आम्ही मुंबईकर इथल्या भैयांबद्दलही असेच भरभरून बोलतो :)
20 Aug 2008 - 11:24 am | वेलदोडा
>> गिरे तो भी टांग उप्पर. ....
जोशीबुवा, टांग उप्पर करायला आधी पडायला हव ना. इथे पडलयं कोण? पुणेकर तर नक्कीच नाही.
>>आम्ही मुंबईकर इथल्या भैयांबद्दलही असेच भरभरून बोलतो .
छान छान ..मुंबईकरांची ही सवय म्हणावी काय.. सतत इतरांची उणीदुणी काढण्याची ?
19 Aug 2008 - 11:27 pm | अभिज्ञ
नागपुरकर मंडळि...इथे प्रतिक्रिया देण्या आगोदर अजून एकदा विचार करा.
मुंबईकर हे पुणेकरांकडून सपशेल मात खाउन पळून गेलेले पाहिलेच असेल,
तशीच गत तुमचीहि करून घेउ नका. हा मोलाचा सल्ला. :)
बा़की आपण सुज्ञ आहात. ;)
अभिज्ञ.
20 Aug 2008 - 12:13 am | अनामिक
वाईट किंवा चुकिची प्रतिक्रिया दिलेलीच नाही मी. त्यमुळे मात खाण्याचा किवा कसल्याच प्रकारची गत होण्याचा प्रश्नच येत नाही!
20 Aug 2008 - 12:34 am | अभिज्ञ
वाईट किंवा चुकिची प्रतिक्रिया दिलेलीच नाही मी. त्यमुळे मात खाण्याचा किवा कसल्याच प्रकारची गत होण्याचा प्रश्नच येत नाही!
माझा ह्या धाग्यावरचा पहिला प्रतिसाद वाचाच.(पृष्ठ क्रमांक १)
आपण जे काहि लिहिताय त्याची कारणे मी आधिच दिलेली आहेत अन ती आपल्याला तंतोतंत लागु पडतात. ;)
अभिज्ञ.
20 Aug 2008 - 2:01 am | अनामिक
ऐवढे प्रतिसाद होते कि तुमची वाचलेली प्रतिक्रिया डोक्यातून गेली!
विशेषत: मुंबईकर,ठाणेकर,विदर्भ,खानदेश,कोंकण, मराठवाडा ह्यातील जनतेला ह्या शहाराविषयी एक प्रकारची वेगळि
असुया असून देखील मनात खोलवर कुठेतरी ह्या शहराविषयी जिव्हाळा कायम आहे.
मी असुया या शब्दाबद्दल सहमत नाही. हो, जिव्हाळा म्हणाल तर भक्कम आहे!
अहो,आपल्या शहराविषयी,गावाविषयी प्रत्येकालाच अभिमान असतोच,परंतु भले बाकिच्या शहरांबद्दल असो वा नसो ,
मराठी जनतेला पुणे शहराविषयी "मत" हे असतेच ,हे कोडे मला काहि उलगडलेले नाहि.
अगदि बरोबर, १००% पटले.
(नारायण पेठेत, लक्ष्मी रस्त्यावर २ वर्षे वास्तव्य केलेला) अनामिक.
20 Aug 2008 - 12:03 am | पक्या
>> कुठे दिसले नाही कबूल केल्याचे.. गिरे तो भी हमारी टांग उपर असेच दिसले मला. आणि मला वाटते ह्याच गोष्टीवरून सगळे पुण्याला नावे ठेवतायत.
लंबूटांगजी वरील वाक्य म्हणण्या आधी खालील वाक्ये पहा --
>>पुणे-३० मधे .. "पाणी घेणार का ? " असला प्रश्न विचारायची देखील पद्धत आहे. ... इति टारझन
>>असो लेख आणी प्रतीसाद वाचुन मजा आली....
महाराष्ट्र शासनाच्या रस्ते वाहतुक नियामक मंडळाने देखील पुणेकरांची स्वभाव रचना लक्षात घेउन पुण्यातील वाहनांना
एम एच १२ असा कोड दिला असावा. पुणेकरांसारखीच पुण्यातील वाहने देखील हा "बाराचा" शिक्का घेउन मिरवताना पाहुन अंमळ मौज वाटते. हे अगदी चपखल बसते पुण्यातील चालकाना.... इति अनिल हटेला
>>पुणे हे कोणत्याच बाबतीत आदर्श शहर नाही, किंवा माझा ते तसं आहे असा दावाही नाही. - इति घाटावरचे भट
>> मी एक सदाशिवपेठी पुणेकर असून सुद्धा मला हि निरक्षण वाचून मजा आली....इति एक
>> पुण्यात प्रदूषण वाढलय हे मात्र खरय, -- इति ईश्वरी
>>पुणं देखील सर्वच्या सर्व सुंदर नाहीचे.. जसं अडगळीची खोली म्हण्ता तशी पुण्यातही आहेत...इति भाग्यश्री
अ-पुणेकर पुण्याला उठसूट नावे ठेवत्तात हेच यावरून दिसून येते.
20 Aug 2008 - 1:16 am | लंबूटांग
>>पुणे-३० मधे .. "पाणी घेणार का ? " असला प्रश्न विचारायची देखील पद्धत आहे. ... इति टारझन हे मला कोणत्याही अंगाने कबूल केल्यासारखे वाटत नाही. मजा आली म्हणणे म्हणजे चूका मान्य करणे असा अर्थ विद्येच्या माहेरघरातील पुणेकरच काढू जाणे.
पुणं देखील सर्वच्या सर्व सुंदर नाहीचे.. जसं अडगळीची खोली म्हण्ता तशी पुण्यातही आहेत...इति भाग्यश्री
>>पुणे हे कोणत्याच बाबतीत आदर्श शहर नाही, किंवा माझा ते तसं आहे असा दावाही नाही. - इति घाटावरचे भट
ह्या दोघांचा अपवाद. असो. कोणतेच शहर आदर्श नसते. बहुतांश पुणेकर गिरे तो भी हमारी टांग उपर म्हणतात असे म्हणायला पाहिजे होते. चू.भू.द्या घ्या
20 Aug 2008 - 3:09 am | पक्या
>>मजा आली म्हणणे म्हणजे चूका मान्य करणे असा अर्थ विद्येच्या माहेरघरातील पुणेकरच काढू जाणे.
चुका? कमाल आहे तुझी ,लंबूटांग ! इथे चुका मान्य कराव्यात अशा कुठल्या चुका पुणेकरांनी केल्या आहेत? आपल्या शहराविषयी अभिमान बाळगणे ही जर चूक असेल तर ते तुलाही लागू होतेच की.
आणि एखाद्या गोष्टीची मजा येते म्हणजेच ती गोष्ट पटलेली असते. नाहीतर मजा कशी येणार?
स्वगत : आता या अ-पुणेकरांनी बोलायला मुद्दे नाहीयेत म्हणुन शब्दांचा किस पाडायला आणि विषयांतर करायला सुरवात केलीये .
20 Aug 2008 - 5:06 am | लंबूटांग
अरे बाबा आता शब्दांचा कीस तुच पाडतो आहेस. मी चुकून चूका लिहीले.. भावना समज ;) ..बॉस ची नजर चुकवून पटापट टंकताना जे शब्द सुचले ते वापरले (स्वगतः आता अ-पुणेकर हापिसात टाईमपास करतात असे ऐकायला तयार रहा लंब्या) ...अभिमान बाळगणे यात काहीच चूक नाही आहे ..पण ज्या काही गोष्टी वाईट आहेत त्या खेळकर पणे मान्य कराव्यात एवढीच अपेक्षा..जसे मुंबई ला प्रचंड गर्दी आहे. चालणे मुश्किल होते. पावसाळ्यात पाणी तुंबते. आणि बरेच काही. ह्या गोष्टी मुंबईकर मान्य करतोच.
20 Aug 2008 - 1:59 am | खादाड_बोका
आम्हा नागपुरकरांना पुणेकरां सारख्या पा... फुशारक्या माराव्या लागत नाहीत.
१. जगप्रसिद्ध संत्र्याचे शहर :-नागपुर
२. भारताचे सर्वात "हिरवे" शहर :-नागपुर
३. भारतातील सर्वात सुंदर रस्ते :-नागपुर
४. बौद्ध बांधवांची "दिक्षाभुमी":-नागपुर
५. भारताचा मध्यबिंदु " झिरो माईल" :-नागपुर
६. जगप्रसिद्ध "हल्दिराम" ची सुरवातः-नागपुर
७. भारतातील सर्वात मोठा "कार्गो प्रकल्प मिहान":-नागपुर
८. जगप्रसिद्ध "R S S" चे मुख्यालय :-नागपुर
९. महाराष्ट्राची उपराजधानी :-नागपुर
१०. "विधानसभेचे हिवाळी अधिवेशन":-नागपुर
लिस्ट ईतकी मोठी आहे की मी पुर्ण लिहीन, तर पुणेकर :O तुम्ही वाचता वाचता म्हातारे व्हाल. =)) =)) =))
नागपुरकर दिवसा स्वप्ने पाहात नाही त....
20 Aug 2008 - 9:21 am | विजुभाऊ
भारताचे सर्वात "हिरवे" शहर :-नागपुर
भारतातील सर्वात जास्त हिरवट म्हातारे भेटतात ती जागा पर्वती : पुणे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
20 Aug 2008 - 12:36 pm | वेलदोडा
>> हिरवट....
अहो पण विजूभाऊ,
खालील तात्यांचे आवाहन आणि दाढे साहेबांची नम्र विनंती वाचली नाहीत का?
आता त्यांच्या विनंतीला मान देऊन पुण्याच्या विषयावरील प्रतिसाद देणे थांबवा अन्यथा ते उडवले जातील ...बघा बॉ
20 Aug 2008 - 2:50 am | पक्या
>>लिस्ट ईतकी मोठी आहे की मी पुर्ण लिहीन...........
=D> छान छान
बोक्या,
नागपूर ची वैशिष्ठ्ये सांगायची आहेत ना तुला...तर मग दुसरा धागा सुरू कर ना...
तुमचं नागपूर किती छान ह्या विषयी चर्चा चालू नाहीये इथे. विषयांतर कशाला करतोस?
अशी पुण्याचीही लिस्ट तयार होईल . पण तो विषय च नाहीये इथे
20 Aug 2008 - 7:01 am | मनीषा
हे महत्वाचे आणि प्रगती करणारे शहर आहे यात वादच नाही म्हणुन तर पुण्यात आयुका आहे, एनडीए आहे... इन्फोसिस आहे... पुण्यातले लोक प्रत्येक क्षेत्रात नेहमीच आघाडीवर आहेत... (आणि हे फक्त पुणेकर म्हणत नाही तर सगळेच म्हणतात /अनुभवतात )
उडदामाजी काळे गोरे हे असणारच... म्हणुन सगळी डाळ वाईट नसते...
पुण्यात कोणाला वाईट अनुभव आले असतील तर ते वैयक्तीक आहेत... (तसे इतर शहरांमधे सुद्धा येउ शकतात्/येतात )म्हणुन पुण्याला नावे ठेवायचे कारण नाही..
समस्या सगळीकडेच असतात.. तशा पुण्यात सुद्धा आहेत म्हणजे तो काय पुण्याचा आणि पुणेकरांचा दोष होत नाही..
आता मुंबई मधे किती बकाल झोपडपट्ट्या आहेत... एअरपोर्ट वर विमान लॅन्ड होताना पहिला नजारा त्या झोपड्यांचाच असतो पण तरीही (मी पुणेकर असले तरी) ते बघुन सुद्धा घरी आल्या सारखच वाटतं (देशप्रेम इ. इ. )
मला वाटतं पुणे- आणि पुणेकरां विषयी बोलणे ..टीका करणे याची अ-पुणेकर लोकांना सवय झाली आहे..
पण इतकी नावे ठेउन सुद्धा घर ते पुण्यात घेतात.. मुलांना शिकायला पुण्यात पाठवतात.. नोकरी (आणि छोकरी सुद्धा ) पुण्याचीच करतात..
आणि तरी सुद्धा पुणे वाईट... ????????
((अ-पुणेकरांच्या ) स्वभावाला औषध नाही हेच खरे..)
20 Aug 2008 - 7:30 am | विसोबा खेचर
अरे अजून संपली नाही का पुण्याची अन् पुणेकरांची टकळी? :)
बरं बुवा, आम्ही हारलो, पुणेकर जिंकले! पुणंच सर्वात गिरेट! मग तर झालं!? :)
आपला,
(फॉकलंडरोडवरचा मुंबईकर) तात्या.
20 Aug 2008 - 9:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सर्वात जास्त प्रतिसाद खेचणारा विषय म्हणून "पुण्या"चं जाहीर अभिनंदन नानांनी करावं असं मी सुचवत आहे! ;-)
यमी (from the middle of nowhere!)
20 Aug 2008 - 11:21 am | वेलदोडा
>>अरे अजून संपली नाही का पुण्याची अन् पुणेकरांची टकळी?
का हो तात्या - पुणेकरांची ती टकळी आणि अ-पुणेकरांचे काय - रसाळ शब्द, अमृताचे बोल, मधुर वाणी...? :/ (ह.घ्या.)
20 Aug 2008 - 7:41 am | अनिल हटेला
नमस्कार बोकोपंत !!!
आवडत हो नागपूर देखील आम्हाला ....
मुंबई आमचीच आणी पुणे , नागपुर सारा महाराष्ट्र माझा ....
मेरा भारत महान.......वादच नाही..................
मुद्दा हा आहे की का म्हणुन बेस लेस विधान करून पुण्याला नाव ठेवता, राजे!!!!
हजारदा सांगीतल की विषय काय आहे टॉपीकच तो आधी वाचा ...
काय -काय प्रतीसाद आलेत ते वाचा आणी मग बोला....
असो...
इथुन पुढे विचार करून टाइप कराल असे वाटते....
( एकेक काळचा नागपुर च्या जगप्रसिद्ध "हल्दीराम्स" चा पुण्यातील सेल्समन )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
20 Aug 2008 - 8:36 am | खादाड_बोका
त्या राजेन्द्र अग्रवालला (हल्दीराम)ज्या दिवशी ह्या खादाड बोक्याच खरे नाव सांगशील तर तो घरी येईल तुला घ्यायला.
बोका काय आहे हे फार कमी लोंकानां माहीत आहे....
तात्या माफ करा...
मला तर स्वप्नातही भुक लागते....
20 Aug 2008 - 8:36 am | अनिल हटेला
धन्यवाद......
पण काहीही गरज नाही....
आणी हल्दीराम ला तलाक ,तलाक ,तलाक झालाये........
असो.......
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
20 Aug 2008 - 11:52 am | विसोबा खेचर
आता हा विषय थांबवण्यात आला आहे. यापुढील प्रतिसाद काढून टाकले जातील याची कृपया नोंद घ्यावी..
20 Aug 2008 - 11:53 am | डॉ.प्रसाद दाढे
सर्व मिपामित्रा॑ना आवाहनः
ह्या विषयावरील चर्चा आता था॑बविण्यात आली आहे. (अर्थातच तात्या॑शी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे) व ह्यापुढे ह्या दुव्यावर कोणीही नवीन लिहू नये (अन्यथा तो उडविला जाईल)
प्रतिसाद देणार्या व न देणार्याही सर्व मिपाकरा॑चे व वाचका॑चे आभार
20 Aug 2008 - 1:09 pm | ऍडीजोशी (not verified)
अणुमोदण आहे
20 Aug 2008 - 1:31 pm | सुर
चला बर झाल .....
* * * Jai Maharashtra * * *
khara ter Marathi tach lihayacha prayatna karat hote pan have te Shabd milat navhate.. Mhanun mag Asach lihila
Shevati kay Bhavana mahatavachi..nai ka...
Sweet Sonu
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
20 Aug 2008 - 7:34 pm | आम्हाघरीधन
विद्येचे माहेघर , सांस्कृतिक राजधानि , चोखंदळ रसिक ईत्यादि. अरे पण हे कोणि ठरवले ?
स्वतः च ठरवयाचे , स्वतः च आवर्जुन वारंवार वापरायचे (लिहिताना, बोलताना) आणि असे दाखवायचे कि हे सगळ्याना मान्य आहे .
एकदम सत्य, स्वतःच्या तोन्डाने स्तुति करणे कितपत योग्य?
20 Aug 2008 - 7:46 pm | विजुभाऊ
आपण आपल्या तोंडाने करतो ती स्तुती नव्हे तर स्वतःबद्दल अनमोल माहीती देण्याचे काम पुणेकर करतात.
तेसुद्धा जगाला चांगल्या गोष्टी कळाव्यात म्हणुन करतात.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
30 Dec 2008 - 2:42 pm | सखाराम_गटणे™
हा सगळ्यात मोठा धागा दिसतोय
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
2 Jan 2009 - 3:34 pm | वाहीदा
पुणेरी लोकं थोडी नाही म्हणाली तरी 'SNOB' - 'शिष्ट' असतात . स्पेशली - पेठेतले तर असतातच
असो तरी पण पुणे आवड्ते संगळ्यांना :-)
~ वाहीदा
21 Feb 2009 - 1:17 pm | मराठी_माणूस
ह्या शीळ्या कढी ला कोणी उत आणला आहे ;)
22 Feb 2009 - 12:13 pm | पुष्कर
पुण्यातल्या बायकांना भोंडले पाठ असतात.
पुण्यात संगीत संमेलनांना गर्दी असते. सवाईची वेळ बदलल्यावर आख्खं पुणं हळहळलं.
वसुबारस, धनत्रयोदशी, तुळशीचं लग्न या दिवशीसुद्धा पुण्यात दिवाळी साजरी करतात.
पुण्यात नागपंचमी किंवा नारळीपौर्णिमेच्या दिवशी देवळांमध्ये 'श्रावणी' नामक कार्यक्रम असतो.
पुण्यात फक्त 'चहा, भिस्कुट, क्रिमरोल' एवढंच मिळणारी दुकाने आहेत, त्यांना अमृततुल्य म्हणतात.
22 Feb 2009 - 12:48 pm | टिम्बु
पुणेकर महानगर पालिकेला भरमसाट कर भरतो आणि त्याचा स्वता: करीता न करता नागरी सुविधा आपल्याच वर खर्चानी वापरतो.
4 Mar 2009 - 12:10 pm | आनंद घारे
या धाग्यावरील चर्चा थांबवण्यात आली होती ना?
नवीन प्रतिसाद आल्यामुळे या धाग्याचे नाव लिस्टवर आले आणि मी हा लेख पहिल्यांदा वाचला! आधीच इतकं काही लिहिलं गेलं आहे, त्यात मी कसली भर घालणार?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
4 Mar 2009 - 2:47 pm | अविनाशकुलकर्णी
मजेशीर व्याख्या : खास ''पुणेकर'' रानी लिहिलेली
१) पेन: दुसरयाकडून घेवून परत न करण्याची वस्तू
२) बाग: भेळ शेवपूरी वगॆरे खाऊन कचरा टाकण्याची जागा
३) चवकशीची खिडकी: 'इथला माणूस कोठे भेटेल हो' अशी चवकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक चवकोनी जागा.
४)ग्रंथपाल: वाचकाने मागितलेले पुस्तक 'बाहेर गेले आहे' असे तंबाखू चघळत तिराकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.
५) विद्यार्थी: आपल्या शिक्शकांना काहीही dnyaan नाही असे मानून आत्मकेंद्रीत राहणारा एक जीव
६) कार्यालय: घरगुती ताणतणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा
७) जांभई: विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी
८) शब्दकोश: जिथे 'लग्ना'आधी 'घटस्फोट' होतो असे स्थ्ळ
९) प्रेमप्रकरण: क्रिकेट सारखाच एक खेळ. जिथे पाच दिवसांच्या 'कसोटी'पेक्शा झटपट 'सामने' अधिक लोकप्रिय असतात
१०) सिगारेट: वाळका पाला भरलेली एक सुर नळी जिच्या एका टोकाला आग दुसरया टोकाला मुर्ख माणूस
११) कपबशी: नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू
१२) college: शाळा व लग्न यामधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण
========================
शब्द पुणेरी, अर्थ पुणेरी..
मराठीतले काही शब्द पुण्यात फारच वेगळ्या अर्थाने उच्चारले जातात. अशा काही शब्दांची ही डिक्शनरी
१.यंत्रणा : जाडजूड मुलगी
२.दांडीयात्रा : ऑफिसला सलग बुट्ट्या
३.पेटणे : संतापणे
४.हुकलेला : मुद्दाच न कळालेला
५.चैतन्यकांडी : सिगारेट
६.चैतन्यचूर्ण : तंबाखू
७.चेपणे : पोट भरून दाबून जेवणे
८.कल्ला : धम्माल
९.बुंगाट : (वाहनासंदर्भात) अतिशय वेगाने
१०.गाडी : टू व्हीलर
११.टांगा पल्टी, घोडे फरार : दारू पिऊन आउट होणे
१२.थुक्का लावणे : फसवणे
१३.एलएलटीटी : लुकिंग लंडन, टॉकिंग टोकियो (तिरळा)
१४.कर्नल थापा : थापाड्या माणूस
१५.सत्संग : ओली पार्टी
4 Mar 2009 - 4:29 pm | सूहास (not verified)
१६: सामान = छान मुलगी
१७:वरती=बुधवार पेठ
१८:कान फाडणे=खोटे बोलणे
१९:च्या आयला=समस्त सभा॑षणाचा अग्रशब्द
२०:तीर्थस्वरूप=बाप
२१:मनाचे श्लोक=बड॑ला/थापा
२२:चावणे=मस्करी करणे/माप काढणे
२३:चघळणे=नुसती बडबड करणे
२४:म॑ग(एकदम खवून्)=कसा/कशी आहेस
सुहास..
आता "मी"काय करू ?
4 Mar 2009 - 3:51 pm | समीरसूर
डॉक्टरसाहेब,
खूप छान लेख लिहिलाय. काही-काही वाक्ये खरच खूप खुमासदार आहेत. :-) मजा आली.
पुण्याचं मला खरच खूप विशेष कौतुक वाटतं. १७-१८ वर्षांपूर्वी मी जेव्हा पुण्यात रहायला आलो तेव्हा पुणे खूप छान आणि आटोपशीर होतं. माझी पहिली अगदी छोटी पुणे भेट १९८९ ला झाली. त्यावेळी मंगलामध्ये 'धडाकेबाज' पाहिला होता. मुंबईच्या इतकं जवळ असून देखील डान्स बारचा प्रादुर्भाव पुण्यात कधीच झाला नाही. नाही म्हणायला पुण्यातले आणि आस-पासचे हौशी रसिक पनवेल वार्या करायचे आपली तहान भागवायला आणि कान्हे फाटा आणि कात्रज जवळ कुठेतरी डान्स बार अनधिकृतरीत्या सुरू असल्याच्या आणि नंतर पोलिसांनी कारवाई करून ते बंद पाडल्याच्या बातम्या ७-८ वर्षापूर्वी वाचल्याचे स्मरते. पण हा एक अपवाद! पुण्यात डान्स बार असावेत असं कदाचित कुणालाच वाटलं नाही ही खरच कौतुकाची गोष्ट आहे. औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर सारख्या शहरांत देखील त्याकाळी अधिकृत/अनधिकृत डान्स बार होते. पण पुण्याच्या संस्कृतीला ते कधीच रुचले नाही. मुंबईसारखी मुक्त बारसंस्कृती देखील इथे कधी रुजली नाही. कुठेही पायी फिरायला खूप छान वाटायचे त्याकाळी. आताचे पुणे हे मुंबईच्या वाटेवर जातेय की काय अशी मला भीती वाटते. तसे झाले तर एक सुंदर आणि छान शहर एका अतिवेगवान, जगडःव्याळ, बाजारू आणि चंगळवादी संस्कृतीचा बळी ठरेल असे मला वाटते. मुंबईचा वेग आणि तिथली संस्कृती भीतीदायक आहे. पुणे अजूनही सुसह्य आहे.
पुण्यातले आणखी एक विशेष म्हणजे जर एखाद्या अस्सल पुणेरी घरात जर आपण गेलात तर आधी दारातूनच तुमच्याशी बोललं जातं. मग थोडी ओळख असेल तर आत बोलावलं जातं. अगदीच जास्त ओळख असेल तर 'बसा' म्हटलं जातं. थोडं नातं असेल तर 'पाणी हवय का?' असं आस्थेने विचारलं जातं. अगदी जवळचं नातं असेल तर चक्क 'चहा घेणार का?' असही विचारलं जातं. अगदीच जवळचं नातं असेल, आणि नियमित येणं-जाणं असेल तर 'चहा टाकते' असं विचारलं जाऊन 'नको, नको, आत्ताच घेतला.' अशा उत्तराची अपेक्षा करत काकूं/मावशी तिथेच थांबतात किंवा काका 'अगं, चहा टाक जरा' असं म्हणतात. अगदी फारच घसट असेल आणि सख्ख्यातलं नातं असेल तर 'काही खातोस का/काही खाणार का?' असही विचारलं जातं. प्रत्यक्ष खायला/प्यायला केव्हा मिळतं हे आपण नक्की खायच/प्यायच आहे की नाही यावर ठरत असलं तरी ते बहुतांशी काका-काकूंच्या मूडवर ठरतं. :-)
मी एकदा आमच्या एका दुरच्या नातेवाईकांकडे गेलो होतो. त्या काकूंनी मला मोठ्या प्रयत्नांनंतर आत यायला सांगीतलं होतं आणि मी गेल्यावर तिथे आत सगळे शेवयांची खीर ओरपत असल्याचं दृष्य मला दिसलं. मी आत गेल्यावर सगळी 'खाणारी' तोंडं आत पळाली. काकूंनी मग मला अगदी देवाजवळ दूध ठेवतात तसल्या छोट्या वाटीमध्ये खीर दिली होती. मला खूपच हसू आलं होतं पण मह्त्प्रयासाने मी ते दाबलं होतं. अतिशयोक्ती करत नाही पण अगदी एका घोटात मी ती खीर संपवली होती. या काकूंचा जंगली महाराज रस्त्यावर मोठा बंगला होता आणि बंगल्याच्या आवारातच नोकरी करणार्या मुलींसाठी त्यांनी एक वसतिगृह बांधले होते. त्या स्वतः एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापक होत्या आणि पतिदेव एका मोठ्या कंपनीत जनरल मॅनेजर या पदावर काम करत होते. म्हणजे चहुबाजूंनी पैसा धोधो कोसळत असतांना देखील वृत्ती मात्र कोती होती. नुकतीच माझी एक मावस बहीण त्यांच्या वसतिगृहात राहून गेली पण तिच्याकडूनही (ती त्यांची अधिक जवळची नातेवाईक असूनही) पूर्ण पैसे आगाऊ घेतले आणि शिवाय मोबाईल चार्जिंगचे १०० रुपये प्रतिमहिना जादा घेतले. आता बोला! :-) असा हा अस्सल पुणेरीपणा!
--समीर
4 Mar 2009 - 4:22 pm | प्रमोद्_पुणे
'पाणी हवे आहे का?'
'पुन्हा या केव्हातरी निवान्त जेवायलाच.. (चार तास बसून गेल्यावर!!) पण फोन करून या ..'
4 Mar 2009 - 4:34 pm | सालोमालो
९ आणि ११ अंशत: पटल्या. पण तुमचं निरिक्षण खल्लास!
एक नंबर!
(जन्माने मुंबईकर पण विचारांनी पुणेकर) सालो
6 Mar 2009 - 10:39 pm | अविनाशकुलकर्णी
काहि खास वाक्ये[पुणेकर स्पेशल}
केशव - साधा सरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा.
सामान - त्याची प्रेयसी.
काटा काकु - चांगली दिसणारी पण वयाने ज्यास्त.
खडकी - एकदम टुकार.
झक्कास - एकदम चांगले.
काशी होणे - गोची होणे.
लई वेळा - नक्की, खात्रीने.
चल हवा येवू दे - निघून जा.
7 Mar 2009 - 11:43 pm | धमाल नावाचा बैल
च्यायला ही शिळी कढी अधुम मधुन ढवळून कोण वर आणत असतय रे? :D
10 Mar 2009 - 9:07 am | चिरोटा
हल्लि बेन्गळुरु मधे काही पुणेकर भेटले.
मी-पुण्यात हल्लि रस्ते चान्गले झाले आहेत असे ऐकले.
पुणेकर्-अजित पवार आहेत ना!
मी-पुण्यात आय्.टी. कम्पन्या खुप आहेत असे ऐकले आहे.
पुणेकर्-अजित पवार आहेत ना.
मी-पुणे आणि अजुबाजुच्या परिसरात जागान्चे भाव खुप आहेत.
पुणेकर्-अजित पवार आहेत ना! (त्या 'ना' चा उच्चार असा की त्या उपर तुम्ही काहि विचारणारच नाही!!)
10 Mar 2009 - 11:11 am | सँडी
तुम्ही अजित पवारशीच तर नव्ह्ते ना बोलत ? ;)
- सँडी
अजित पवार सार्खा एक परप्रांतिय पुणेकर!
11 Mar 2009 - 3:36 pm | मि माझी
ज्यानां पुणे आवडत नाही.. त्यांनी आपल्या गावाला जाउन रहावे खुशाल..!!