या पूर्वीचे भाग http://misalpav.com/node/1545
http://misalpav.com/node/1624
http://www.misalpav.com/node/1635
पासुन पुढे
धमुचे लग्न ( उत्तरार्ध)
काळ ९ भविष्यातला कुठला तरी साधाराण धमाल मुलाच्या लग्नानंतर दीड/दोन वर्षानन्तरचा
वेळ : तुम्हाला हवी ती.
स्थळ : जेथे चहापोहे नाहीत ते /तसले.
घड्याळाने पाच ठोके दिले. धमु जागाच होता. हल्ली तो गजर व्हायच्या तासभर
अगोदरपासुनच जागा असायचा. हम्म..आता उथलच पाहीजे. पाणी येईल भरलं पाहीजे.
रिकामी बादली कॊरपोरेशनच्या फ़ुरफ़्रुरणा-या नळाखाली लावत तो स्वत:शीच विचार करु लागला.
पूर्वी हे असे असले काही नव्हते. आता रोज अंघोळ करायला लागते. दाढी करायला लागते.सुट्टीच्या
दिवशीही अंघोळ म्हणजे कै च्या कैच ना. हल्ली धुम्रशलाका वगैरेवरही बन्दी आली होती. तो शारुखखान
सोडु शकतो मग तू का नाही सोडु शकत नाहीस हे वर ऐकावे लागत होते. हे बरे आहे अग मी कुठे
तो शारुख कुठे? त्याची माझी बरोबरी होते का? त्याला सिगरेट सोडली हे सांगायला सुद्धा पैसे मिळत असतील.
अन त्याची माझी बरोबरी होईल का? पण हे त्याला सगळे मनातल्या मनातच बोलावे लागत होते.
पूर्वी असे बरे असायचे ना? शनिवार दुपार पर्यन्त लोळत पडायचे मग संध्याकाळी जंगली महाराज
किंवा मग फ़र्ग्युसन रोड वरच्या फ़ुटपाथ वर आन्द्या / इनोबा भेटायचे मग टवाळक्या कुटाळक्या करत
चन्द्र मावळेपर्यन्त वेळ मस्तच जायचा. हल्ली सगळा शनिवार हिची सहकार नगरमधली आत्या कोथरुडचे
काका किंवा मग सदाशिव पेठेतली मैत्रीण यांच्यातच जायचा. त्यांच्याकडचे साखर टाकलेले कांदे पोहे खावे लागायचे.
काटाकिर्र सुद्धा बरेच दिवसात झाले नव्हतेच. शांग्रीला वगैरे तर फ़ारच दूरची गोष्ट होती जवळजवळ अप्राप्य म्हणाना.
धमाल मुलगा विचारा मग्न झाला.
..........................................................................................................................
" हॆलो अरे इनोबाच ना ? एक काम होते? ते तूच करशील बघ ? सन्जोपसर मोबाईलवरुन बोलत होते.
" मला न उमगलेले जी ए" या विषयावर जरा मार्गदर्शन हवे होते. मला सखाराम गटणेजी ना त्या संदर्भात एकदा
भेटायचय" त्याची अपॊइंटमेंट मिळतेय का बघ ना?" मी त्याना एक व्यनी टाकला होता." रक्त गाभुळलल्या
बनातली करवदलेली हाक.या हेडिंगखाली. शेवाळ्लेल्या मनातले फ़िकुटलेले विचार एकदम पारदर्शी करुन घ्यायचे आहेत.
तुझे ऐकतील गटणेजी सांगुन बघ ना जरा"हो मी माझ्या परीने प्रयत्न करुन बघतो. तो कसा रीस्पोन्स देतो त्यावर अवलंबुन आहे.
बाकी तुम्ही काय करता सध्या? हेच की ते बघ सध्या कधितरी एखाद्या नव्या संस्थळावर लिहितो. ते सर्किट्पाव नावाचे संस्थळ
निघालय ना तेथे रजनीकातच्या चित्रपटांची परि़क्षणे लिहितोय. तसे नवे काही नाही. "शेंबुड आणि रीकामा खिसा"
हा नवा लेख कुठेतरी प्रसिद्ध करायचा आहे त्याच्या शोधात आहे. त्या नव्या संस्थळावर प्रत्येक सदस्याला सर्कीट या
शब्दापासुनच सुरु होणारे नाव घ्यायला लागते म्हणे .तेथे प्रत्येकाची नावे सर्कीट हसमनीस , खरा सर्कीट , छोटासर्कीट ,
सर्कीट्ली , सर्कुटल्या ,सर्कीट मुलगा ,सर्कीट बाळ, सर्कुभाऊ , सृष्टीसर्कीट, सर्कीट्लावण्या अशीच असावी लागतात.
म्हणे. छोटा डॊन ने तर शॊर्ट सर्कीट हेच नाव घेतलय. मी सर्कीट्सन्जोप हे नाव घेऊ म्हणालो. तर ते नाव अगोदरच
कोणितरी ब्लॊक करुन ठेवले आहे. संपादक मंडळाला विचारले तर त्यानी तांत्रीक दिले. म्हणाले नावाचे हे कॊम्बिनेशन इतके
स्फ़ोटक आहे की ज्या ज्या राउटर मधुन या आयडीचे कोड जातात ते ते राउटर बिथरतात. " आपल्याला ते तंत्रीक काही कळत
नाही बॊ" इनोबा म्हणाला." नावात काय आहे.". असे तुकोबानी म्हंटलयच की. तुला तसे वाटते रे. पण तुकोबानी म्हंटलय
"नामातची सर्व असणे नामा म्हणे"
..............................................................................................................................
"बघा हो पंत हे काय असते ते जरा सांगता. भृगु संहीता काय म्हणते याच्यावर." वेदश्री पंताना कसलातरी कागद दाखवत म्हणाली.यात
लिहिलय की पाण्याची भूजल पातळी ही दिवसेंदिवस खाली खाली जात आहे. जाऊ दे ग वेदु बाळ भूजल पातळी ही केवळ पृथ्वीच्या वरच
अवलंबुन असते.पंत पुस्तकातुन डोके वर न काढताच बोलले. पंत हे तुम्ही म्हणताहात. वेदश्रीला आश्चर्यच वाटले भृगुसंहीता सोड .
अग मी सध्या यमी संहीते नुसार "शनी आणि अशनी" यांचा अभ्यास करतोय. त्यानुसार पितृपंध्रवडा लागायच्या अगोदर तो गौप्यस्फ़ोट होणार आहे.
नाना तुमचे मत काय आहे. पंतानी नाना चेंगटाला संभाषणात ओढले. मी काय म्हणतो पंत तुम्ही म्हणाना नेहमीप्रमाणे म्हणता तसे.
की अगोदर अधिश्ठान हवे त्यानन्तर एकाग्रता मगच प्रश्न विचारा म्हणुन, नेहमी तसेच म्हणताना.नाना नी पंताना मार्ग सांगतला.
पंताना स्वत:चाच हुकमी एक्का असलेले उत्तर नाना चेंगटाला सुचावे याचेच आश्चर्य वाटले.
.................................................................................................................................
"स्वाती पाव" या संस्थळाला सुरु होऊन नुकतेच कुठे सहा महिने झाले होते. काय विजुभाऊ आपण या संशळावर अजुन किती दिवस
स्वाती डाम्बीस आणि स्वातीभाऊ नावाने सीकेपी आणि गुज्जु रेशीप्या ल्ह्यायचे? पिवळा डाम्बीस विजुभाऊंकडे तक्रार करत होते.
तुमचे बरे आहे हो तुम्ही आंबे चहा फ़णस कशावरही लिहिता मला माझ्या मिसेस च्या वह्या चोरुन बघाव्या लागतात नव्या रेशीप्या शोधायला?
कुठले हो बरे तो केसु संपादक मंडळात गेल्यापासुन आमच्या क्रमश:स्वांत्र्यावर गदा आली आहे. आम्हाला स्वप्नेसुद्धा क्रमश: पडतात.हल्ली
मला स्वप्नात क्रमश: हा बोर्ड दिसला की खडबडुन जाग येते. त्यातुन तो गटण्या. त्याला तर कोणताही नवा आयडी दिसला की तो विजुभाऊ
असेल अशीच खात्रीशीर शंका येत असते" विजुभाऊ त्यांच्या परीने उत्तर देत म्हणाले
.................................................................................................................................................
"मुक्त्सुनीत भौ या नव्या धंद्याचे काही खरे नाही." बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ ग्लासात ओतला आणि डोळ्यांजवळ नेत म्हणाला.
"हो ना" मुक्तसुनीत त्याला अनुमोदन देत म्हणाला. "लोक ट्रॆव्हल एजन्सी म्हणजे कुरीयर कंपनी यातला फ़रकच समजुन घेत नाहीत.
माझे हे सामान न्या त्या भाच्याला न्या. ठाण्याच्या काकांकडुन चंची नेउन पुण्याच्या काकाना द्या ही असलीच कामे सांगतात.माझ्या मागच्या
दोन ट्रीपा तर बनी , जनी , मनी ,बोका , अशा मंडळीना नेणे आणणे पोहोच करणे यातच गेला. शिवाय ही मंडळी प्रवासात काय काय वाट्टेल
तो उतमात घालत असतात तो वेगळाच. आपण ट्रेव्हलिंग एजन्सी चालवतो पाळणाघर नाही म्हणावे." "अरेरे तुम्ही पाळणाघराला इतके का घाबरता.
म्हंटले आहे की जीचे हाते पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. " एक महिला सदस्या म्हणा ली. तुम्हाला काय जातय म्हणायला.? आमचा जीव जातो
त्या दोरी पायी. ट्रॆव्हल एजन्सी चा प्रवास काही ढगातुन होत नाही. शिवाय ते सुभाषीत आहे जिचे हाती असे आहे ज्याचे हाती असे नाही.
मुक्तसुनीत हळवा होत म्हणाला.
.............................................................................................................................................................
"तीन अधीक दोन पाच अधीक सतरा बावीस अधीक......." प्रा डॊ दिलीप बिरुटे या एका वर्षात कायकाय केले हा हिषेब करत होते.
मराठी संस्कृतीक अपशब्दकोषाचे काम अजून अर्धेच राहीले होते. तद माताय, भगिनीभोगे, मातृगमनी , या शब्दानन्तर तेव्ह्ढा जोरदार
शब्द अजून सापडला नव्हता. नाही म्हणायला "च्यायला" या शब्दाचे १०१ उपयोग ( सप्रयोग) " हे एकमात्र पुस्तक प्रकाषीत झाले.
त्यातल्या "च्यायला" हे दोन वाक्ये जोडणारे उभयान्वयी अव्यय म्हणुन वापरता येते या शोधाबद्दल पेटंट घ्यावे की कसे याबद्दल एकमत होत नव्हते.
त्यानी " केस कापायला गेलो होतो" . "न्हाव्याचे दुकान बंद होते". ही दोन वाक्ये "च्यायला" शब्दाने ही दोन वाक्ये जोडुन वेगळा अर्थ
असणारे वाक्य बनते. उदा : "केस कापायला गेलो होतो च्यायला न्हाव्याचे दुकान बंद होते " या वाक्यातुन बोलणारा केस न कापताच
तसाच परत फ़िरला या मूळ दोन्ही वाक्यात नसणा-या अर्थाचे वाक्य तयार करुन सप्रयोग उदाहरण दिले होते. स्वत:च्या शोधाचा ते
पुन्हा पुन्हा विचार करत असताना पेठकर काका हातात डबा घेउन आले.
घे रे दिलीप......बघ तर इजिप्शीयन पुरणपोळी ...अरे लक्ष कुठे आहे तुझे दिलीप....पेठकर काका अक्षरश धरुन हलवत बिरुटेसराना म्हणाले
अरे हो हल्ली की नाही लोक मला "डीलीट बिरुटे" या नावानेच ओळखतात. त्यामुळे मला कोणी "दिलीप" म्हणुन हाक मारली की लवकर कळतच
नाही" दिलीप बिरुटेनी स्पष्टीकरण दिले.
............................................................................................................................................................................
मनस्वी ने आज बीटाची चटणी ,अल्फ़ा फ़्राईड राईस , आणि थीटा शिकरण च्चे फ़ोटो मुखपृष्ठावर लावले होते. लोकांची तक्रार होती की त्यात
खवलेल्या गाजराच्या कापांमुळे जीलेब्यांचा भास होत होता. वरदा प्राजु शीतल यशोधरा यानी "जावे कट्टेचिया देशा" हे पुस्तक नुकतेच लिहुन
त्याचे बे एरीयात होण-या जालीयविष्व साहित्य सम्मेलनात प्रकाशन करायचे ठरवले होते. टा-याने भारतात दंत विमा नावाची कॊन्सेप्ट सुरु करुन
त्याच्या फ़्रॆन्चायझी युगांडा केनीया आणि टाझानिया इथे ओपन केली होती. मृगनयनी ने झटपट कविता हे पुस्तक जालावर झळकवले.
गटणेच्या पिक्चरचा हीरो मदनबाण अजूनही पिक्चर पूर्ण झाले नसल्याने फ़ोटोग्राफ़ी या जुन्या व्ययसाया कडे वळला होता. टारझन ने त्याला बोर्डावर
"फ़ोटोत टोपीचा फ़ेटा करुन देऊ मिटलेले डोळे उघ्डुन देउ" लग्नाचे, डोहाळे जेवणाचे, बारशाचे मुंजीचे , एक्सष्ठी , सहस्त्रचंद्रदर्शन , मयताचे ,
तेराव्याचे फ़ोटो काढुन देउ असे लिहायला सांगितले होते त्यामुळे त्याचा धंदा खूपच जोरात चालला होता. आता त्याला मक्याच्या कणसाचे आणि
काळ्या गुळाच्या भट्टीचे फ़ोटो काढायला वेळच मिळायचा नाही. छोटा डॊन भडकमकर सरांच्या "पळुन जाउन लग्न कसे करावे" या कोर्सची सिनीयर
परिक्षा नुकताच पास झाला होता.आणि भडकमकर कोचिंग ऎकेडॆमीत फ़ॆकल्टी म्हणुन जॊइन व्हायची त्याला ऒफ़र आली होती. छॊटा डॊन बरोबर
पळुन पळुन कंटाळलेल्या शार्प शूटर आम्बोळी ने नौपाड्यात कन्दील भाड्याने द्यायचा व्यवसाय सुरु केला होता. ऎडीशनल सर्व्हीसेस म्हणुन त्याने
"येथे पाय चेपुन मिळतील "असाही बोर्ड लावला होता. संत तात्याबा आश्रमात नव्या शिश्याना दीक्षा देताना फ़ेकुन मारलेल्या उसाचे कांडके कसे
चुकवावे याचे मार्गदर्शन सुरु केले होते. आन्दुयात्री ने आंतर्जालीय राजकारणात शिकलेल्या धड्यांवरुन्बोध घेत "आन्द्या ली" हे नवे नाव धारण केले होते.
चोच्या / कोम्बडीच्या वगैरे बहुउपयोगी शब्द नुकतेच आत्मसात करुन त्याचे गद्यातले ३०३ उपयोग यावर तो हल्ली लोकाना मार्गदर्शन करत होता.
छोटी टिन्गी दुसरी ब मधुन एकदम दहावी ची परोक्षा देत होता. परिक्षेत त्याला "हे हे हे तुम्ही माझी मैत्रीण व्हाल? काळजी घ्या" संदर्भासहीत स्पष्टीकरण
द्या या प्रश्नाचे उत्तर देता आले म्हणुन त्याल एकदम वरच्या वर्गात ढकलला होता.
..............................................................................................................................................................
वर्षभरात केवढ्या तरी घटना घडुन गेल्या होत्या. इतके सगळे घडले...आपल्याला तर विजुभाऊ नी लग्नात शोधलेली पाटी अजुन अगदी कालच
पाहिली असल्यासारखे वाटत होते. त्याला एकदम आठवले त्याने लग्ना आधीचे ते दिवस.......आहाहा काय मस्त होते नाही.
तेंव्हा काय मस्त श्लोक सुचायचे
"घर असावे घरासाठी
तू असावीस घरपणासाठी
तुझ्यामुळे घराला घरपण येते
मलाही थोडे शहाणपण येते"
या ओळी गुणगुणत चतु:श्रुंगीपर्यन्त रस्त्यावरुन जायचो. रस्त्या वरचे खड्डेसुद्धा किती मोहक, चिंटुकले आणि गोड वाटायचे.
आता मात्र दळण आणणे, तुळशीबागेत अवजड वाहनांच्या गर्दीत फ़िरणे, लग्ने अटेंड करणे , बारशी अटेंड करणे यातच सगळा वेळ जातो
आपण हे सगळे न कुरकुरता करुच कसे शकतो याचेच धमाल मुलाला आश्चर्य वाटत होते.
"अरे धमु जरा एवढे करतोस का? "आतुन साद ऐकु आली .
धमाल मुलगा नॊस्टेल्जीया मधुन जागा झाला.
त्याने दोरीवर वाळत घातलेले दुपटे काढले आणि तो आतल्या खोलीत गेला
बाहेर कोणीतरी रेडीओवर गात होते
"खरे म्हणजे आपण सगळे सुखात जगत असतो
एका दुर्लभ क्षणी एक चेहेरा आपल्याला भेटतो
अक्कल गहाण पडते
भेजा कामातुन जातो
लख्ख उघड्या डोळ्यानी आपण चक्क लग्न करतो
आपण चक्क लग्न करतो आपण चक्क लग्न करतो आपण चक्क लग्न करतो
त्या चेहेयाचे असली रूप मग आपल्याला कळते
बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्यापुढे येते........"
....................................................................................................................................................
स्क्लेमर : या लेखातले प्रसंग काल्पनीक आहेत. लेखातली पात्रे कधी भेटली आणि तशीच वागली तर तो
लेखकाच्या द्र्ष्टेपणाचा जय आहे असे समजु नये. योगायोगामुळेच हे असे घडले आहे असे ठाम समजुन चालावे. लेखक हा भविष्यवेत्ता वगैरे नसून त्याला
ज्यूल्स व्हर्न प्रमाणेच दिवसाउजेडी स्वप्नप्रवास करण्याची सवय आहे असे मानावे...........
प्रतिक्रिया
17 Aug 2008 - 10:47 pm | विद्याधर३१
विजुभाऊ
धम्याच्या नावाखाली फुल ठोकाठोकी....
और ये लगा सिक्सर......
विद्याधर
18 Aug 2008 - 1:05 am | इनोबा म्हणे
धम्याच्या नावाखाली फुल ठोकाठोकी....
हेच म्हणतो
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
17 Aug 2008 - 11:11 pm | टारझन
चैफेर फटकेबाजी .. धमाल मुलाच्या नावावर , धमाल करमणूक ..
मजा आली... हे सामान तुम्ही धम्याची ६०ची ऍनिवर्सरी पर्यंत लांबवू शकता....
प्रो.प्रा. टारझन
खवीस दंत व अस्थी विमा एजन्सी
अफ्रिका लिमीटेड
(आमची शाखा: युगांडा,केनिया,टांझानिया,इथोपिया,घाना,नायजेरिया.. अँड सो ऑन)
आमचे येथे श्री कृपेकरून सगळ्या दातांचे आणि हाडांचे विमे ऊतरवले जातिल. लग्न आणि पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
18 Aug 2008 - 12:02 am | पावसाची परी
हाहाहाहाहाहाहाहाहा
>>मजा आली... हे सामान तुम्ही धम्याची ६०ची ऍनिवर्सरी पर्यंत लांबवू शकता....
सहमत
हाहाहाहाहाहाहाहाहा
हाहाहाहाहाहाहाहाहा
18 Aug 2008 - 12:11 am | चंबू गबाळे
चांगले चिमटे घेतलेत सगळ्यांनाच!
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D
18 Aug 2008 - 12:56 am | बिपिन कार्यकर्ते
अ फ ला तू न....
त्यांच्याकडचे साखर टाकलेले कांदे पोहे खावे लागायचे.
धम्या आपण समदु:खी रे...
म्हणाले नावाचे हे कॊम्बिनेशन इतके
स्फ़ोटक आहे की ज्या ज्या राउटर मधुन या आयडीचे कोड जातात ते ते राउटर बिथरतात.
काय हा धाक?
एक महिला सदस्या म्हणा ली.
तूफान.
बिपिन.
18 Aug 2008 - 1:26 am | मुक्तसुनीत
>>>रिकामी बादली कॊरपोरेशनच्या फ़ुरफ़्रुरणा-या नळाखाली लावत तो स्वत:शीच विचार करु लागला. पूर्वी हे असे असले काही नव्हते. आता रोज अंघोळ करायला लागते. दाढी करायला लागते.>>>>>>
>>>>." रक्त गाभुळलल्या बनातली करवदलेली हाक.या हेडिंगखाली. शेवाळ्लेल्या मनातले फ़िकुटलेले विचार एकदम पारदर्शी करुन घ्यायचे आहेत. >>>>
>>तुमचे बरे आहे हो तुम्ही आंबे चहा फ़णस कशावरही लिहिता मला माझ्या मिसेस च्या वह्या चोरुन बघाव्या लागतात नव्या रेशीप्या शोधायला?>>>
>>>>ठाण्याच्या काकांकडुन चंची नेउन पुण्याच्या काकाना द्या ही असलीच कामे सांगतात.माझ्या मागच्या दोन ट्रीपा तर बनी , जनी , मनी ,बोका , अशा मंडळीना नेणे आणणे पोहोच करणे यातच गेला. शिवाय ही मंडळी प्रवासात काय काय वाट्टेल तो उतमात घालत असतात तो वेगळाच. आपण ट्रेव्हलिंग एजन्सी चालवतो पाळणाघर नाही म्हणावे>>
बाबौ !! भल्याभल्यांची "च" उतरवली राव तुम्ही ! लगे रहो ;-) खरोखर मजा आली !
18 Aug 2008 - 4:00 am | मदनबाण
काय विजुभौ क्रमशः टाकायचे विसरलात की काय ? :)
बाकी एकदम जोरदार आहे..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
18 Aug 2008 - 4:48 am | पिवळा डांबिस
हल्ली सगळा शनिवार हिची सहकार नगरमधली आत्या कोथरुडचे
काका किंवा मग सदाशिव पेठेतली मैत्रीण यांच्यातच जायचा.
त्यांच्याकडचे साखर टाकलेले कांदे पोहे खावे लागायचे.
अगदी खरं आहे! सांभाळ रे, धम्या!!
त्यातून तुझं सासर आहे शाकाहारी! (फुल म्येलं हे धम्या, तिच्यायला!!)
तुला बीटाची चटणी ,अल्फ़ाल्फा फ़्राईड राईस , आणि थीटा शिकरण खायला लागणार!!!:))
:)
तुमचे बरे आहे हो तुम्ही आंबे चहा फ़णस कशावरही लिहिता मला माझ्या मिसेस च्या वह्या चोरुन बघाव्या लागतात नव्या रेशीप्या शोधायला?
श्श्शूऽऽऽ! विजुभाऊ, तुमच्या तोंडात तीळ्सुद्धा भिजत नाही बघा!!
आता मिसेसनी हे वाचलं तर? पुढच्या वेळेस घरी आलांत की बीटाच्या चटणीने तुमचं आदरातिथ्य होणार, मटन-बिर्याणी विसरा आता!!!
:)
18 Aug 2008 - 6:18 am | मेघना भुस्कुटे
सहिये! विजुभौ, तुम्ही काय ऐकत नै! आणि 'धम्याच्या लग्नाचं' नाव कशाकरता?
18 Aug 2008 - 6:26 am | रामदास
तरीच धमू चापात सापडलेल्या उंदरासारखा केवीलवाणे आवाज काढत असतो.
18 Aug 2008 - 6:53 am | सहज
धमुचे लग्न ( उत्तरार्ध) म्हणजे हा तर सरळ सरळ "गोंधळ" घातला की तुम्ही :-)
18 Aug 2008 - 9:00 am | अनिल हटेला
धम्याच्या नावाखाली फुल ठोकाठोकी....
हेच म्हणतो
आणी मजा आली बर !!!!!
( ध मू तुला कायमचा गि-हाइइक बनवलये बेट्या !!)
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
18 Aug 2008 - 10:11 am | मृगनयनी
झभर्डस्ट... विजु भौ.........
तुमचं नाव "नॉस्ट्रॅडेम्स" हवं होतं...
अप्रतिम.....
मिपावरील व्यक्तिअंगाचा, व्यक्तीरसाचा, व्यक्तीरचनांचा,व्यक्तीस्वभावाचा इतका बारकाईने अभ्यास करून आपाप्ल्या व्यक्तीरेखेत त्या त्या व्यक्तींना चपखल बसवून भविष्याचा अंतर्वेध घेऊन, विलक्षण तंतोतंत आभास निर्माण करण्यात तुमचा हात (किंवा...इतर काहीही) कोणीही धरू शकत नाही..
लगे रहो... विजुभै....
हम तुम्हारे साथ है....:)
धमाल मुलगा नॊस्टेल्जीया मधुन जागा झाला.
त्याने दोरीवर वाळत घातलेले दुपटे काढले आणि तो आतल्या खोलीत गेला
=)) =)) =))
स्वप्नातून बाहेर पडण्याची वेळ फारच 'लेकुरवाळी' आहे....
धम्या.... तुम भी लगे रहो........
(प्रिय धम्या...... तुमच्या घरात नवीन पिढीचा "रक्षाबंधन-सोहळा" कधी साजरा होईल......याची आम्ही वाट बघतोय.....) ;)
19 Aug 2008 - 5:32 pm | डॉ.प्रसाद दाढे
धमाल मुलगा नॊस्टेल्जीया मधुन जागा झाला.
त्याने दोरीवर वाळत घातलेले दुपटे काढले आणि तो आतल्या खोलीत गेला
सॉल्लीड भाऊ! खूप दिवसा॑नी मस्त लिहिल॑त!
18 Aug 2008 - 10:23 am | आनंदयात्री
मस्त लिहलेय.
आपलाच
आंद्या ली
19 Aug 2008 - 7:23 pm | मनस्वी
आवडलं.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
18 Aug 2008 - 11:29 am | विसोबा खेचर
खरं सांगायचं तर आता अश्या लेखनाचा कंटाळा आला आहे. सदर लेखन काही ठिकाणी ठीक व टाईमपास वाटले परंतु बर्याच ठिकाणी कंटाळवाणेही वाटले.
प्रामाणिक मत, राग नसावा..
तात्या.
18 Aug 2008 - 10:58 pm | सर्किट ली (not verified)
सहमत ! जरा ब्रेक घ्या सगळ्यांनी.
- सर्किट
19 Aug 2008 - 12:08 am | चतुरंग
(खुद के साथ बातां : रंगा, ह्या पेक्षा विडंबन किती छान, दोन क्षण हसवलं की बात खतम! ;) )
चतुरंग
18 Aug 2008 - 6:00 pm | शितल
कोणाला सोडले नाही हो विजुभै,
:)
18 Aug 2008 - 6:49 pm | अवलिया
ठीक प्रयत्न
धम्याच्या नावाखाली फुल ठोकाठोकी केली आहे ....
काहि ठिकाणी ओढुन ताणुन बसवले असे वाटते
तितकी मजा आला/आली नाही
पुढील प्रयत्न (केल्यास) शुभेच्छा
राग नसावा
सर्किट चेंगट
(हल्ली नावात सर्किट लावले पाहिजे असा काहि दंडक झाल्याचे आमच्या कानावर उडत उडत आले. आणिबाणित कुठल्याही दंडकाची अवज्ञा होवु नये म्हणुन सहीपुरता नावात तात्पुरता बदल केलेला आहे हे सुज्ञ वाचक लक्षात घेतीलच. ज्यांना समजले नसेल त्याना आता कळेल)
18 Aug 2008 - 10:08 pm | सखाराम_गटणे™
त्यातुन तो गटण्या. त्याला तर कोणताही नवा आयडी दिसला की तो विजुभाऊ
असेल अशीच खात्रीशीर शंका येत असते
आता बर्याच शंका मिटाल्या आहेत. तुम्ही तुमच्या परीने आमचे समाधान केल्यावर काय बोलणार आता???
पण सध्या बातम्या (कंड्या ???) पसरवण्याचे काम जोरात चालु दुसरी मंडळी करताहेत.
मयताचे ,
तेराव्याचे फ़ोटो काढुन देउ असे लिहायला सांगितले होते
आंम्बोळी आहे का भागीदारीत, जबरा धंदा होइल. 'नडला तो पाडला, आणि फोटो काढला'
रक्त गाभुळलल्या
बनातली करवदलेली हाक
नाय बा, आपल्याला नाय जमणार. असली वाक्ये चार चार वेळा वाचली तरी डो़क्यावरुन जातात. आम्ही काय सांगणार, ते पण संजोपरावांना !!!!!!!!
आम्हाला अजुन १० जन्म हवेत.
एक महिला सदस्या म्हणा ली.
ह्या स्त्री सद्स्येच्या खरडवहीत ४-५ जाउन आलो, पण स्वागत मजकुर वाचला की आमचे धेर्य खचते.
ऐकादा क्लास आहे का, धेर्य टिकवण्यासाठी.
आता मी माझ्या परीने प्रतिक्रिया दिली आहे. आता तुम्ही बोला.
सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
19 Aug 2008 - 1:18 am | ब्रिटिश टिंग्या
छान आहे......
जरा दहावीचा अभ्यास करत असल्याने प्रतिसाद द्यायला उशिर झाला ;)
(दुसरी 'ब'तुन दहावी 'फ' मध्ये गेलेला) टिंग्या
19 Aug 2008 - 8:53 am | विजुभाऊ
अश्या लेखनाचा कंटाळा आला आहे.
जरा ब्रेक घ्या सगळ्यांनी.
सदर लेखन काही ठिकाणी ठीक व टाईमपास वाटले परंतु बर्याच ठिकाणी कंटाळवाणेही वाटले.
प्रामाणिक मत, राग नसावा..
सहमत आहे. ह्या प्रकारचे लिखाण भरपुर झाले हे खरे आहे.
प्रामाणीक मताबद्दल राग अजिबात नाही.
विनोदी लिखाणाची /लेखकाची एक गोची असते विनोद नीट पोहोचला तर वाचकाचा चेहेरा हसुन फुलतो
विनोद पडला तर लिहाणाराचा चेहेरा अगोदर पडतो
असो. चलता है.
सगळेच लेखन विनोदी असावे असे होत नाही. प्रत्येक विनोद जमतोच असेही नाही.
प्रत्येक बॉलवर विकेट पडली तर दोन ओव्हर मध्ये इनिंग सम्पुन जाईल
असो..
"शेख करता है मसजीद मे सजदे
उनका असर हो ये जरुरी तो नही."
हे विनोदी लिखाणाबाबत गृहीत धरलेले असते.
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
19 Aug 2008 - 7:21 pm | सखाराम_गटणे™
+१
सहमत्
सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
19 Aug 2008 - 7:25 pm | नंदा प्रधान
काय विजुभाऊ तिकडं कापसे बनुन लगेच तात्याला प्रतिटोला होय? :D
20 Aug 2008 - 9:11 pm | प्रभाकर पेठकर
लिखाण ठिक आहे. मुळात मला काल्पनिकापेक्षा वास्तविक लिखाण जास्त भावते. विजूभाऊंची तेवढी क्षमता आहेच. भविष्यात तसे काही वाचायला मिळेल ह्या अपेक्षेत आहे.....
4 Sep 2008 - 1:48 am | स्वाती राजेश
रिकामी बादली कॊरपोरेशनच्या फ़ुरफ़्रुरणा-या नळाखाली लावत तो स्वत:शीच विचार करु लागला. पूर्वी हे असे असले काही नव्हते. आता रोज अंघोळ करायला लागते. दाढी करायला लागते.
आणि बायकोसाठी (स्वतःच्या) चहा करायला, पाण्याच्ये आधण ठेऊन दुधाची पिशवी आणायला जायला लागते.
बाकी मस्तच लिहीले आहे,
धमुच्या मुलाच्या बारशाची वाट पाहात आहे...:)
28 Jun 2010 - 10:47 am | विजुभाऊ
धम्याच्या लग्नाच्या वर्धापनदिना निमित्त ................
जय हो.
अॅन्जॉय्....धमाल डे..........
( खरे तर अॅन्जॉय क्राय डे)
....
प्रका टा आ
28 Jun 2010 - 10:46 am | विजुभाऊ
धमुला आठवण म्हणून्.............येन्जॉय धमु
22 Jul 2010 - 10:31 pm | आमोद शिंदे
जुने संदर्भा लावायला ही मालिका म्हणजे खजिना आहे. निवांत वेळ काढून वाचायला हवे हे. :)
22 Jul 2010 - 11:12 pm | नावातकायआहे
>> तद माताय, भगिनीभोगे, मातृगमनी.
>> फ़ोटोत टोपीचा फ़ेटा करुन देऊ मिटलेले डोळे उघ्डुन देउ
>> येथे पाय चेपुन मिळतील
विजुभाउ ----/\ ------
=)) =)) =)) =))
23 Jul 2010 - 1:30 am | Pain
=)) =)) =)) =)) =)) =))