या पूर्वीचे भाग http://misalpav.com/node/1545 पासुन पुढे
यावेळेसची डिस्क्लेमर : या लेखातली पात्रे जरी खरी असली तरी प्रसंग काल्पनीक आहेत्. ही पात्रे तुम्हाला भविष्यात कधीतरी भेटली आणि लेखात् लिहिल्याप्रमाणे वागली तर तो निव्वळ योगायोग आहे असे समजावे. उगीचच लेखकाची निरीक्शण शक्ती जब्बरदस्त् आहे अशी दूषणे देऊ नयेत्
संत तात्याबा महाराज्; आश्रमात दुपारची झोप घेत अर्रर्रर्र चुकले समाधी घेत होते.छोटा डॊन ने दारावरची घंटा बडवली.त्या आवाजनेच त्यांची समाधी भंग पावली .डोळे किलकिले करुन त्यानी पाहीले दारात् असा भक्तांचा समुदाय पाहीला .मग पुन्हा डोळे मिटुन घेतले.आपण् समाधिस्त आहोत् हे जणु त्याना भक्तांच्या मनवर ठसवायचे होते.ये वत्स धमाल्या ; ये छोट्या डॊन्या ,मिटल्या डोळ्यानीच संत् तात्याबा वदले. या गोष्टीने उदय सप्रे फ़ारच प्रभावित झाला.ये बाळ् तू कशासाठी आला आहेस् ते मला ठाऊक आहे. लग्नाचा विचार महात् घोळतोय आणि त्याची तयारी कशी करावी हे उमजत् नाही. बरोबर् उदयोस्तु उदयोस्तु म्हणत उदय् सप्रे ने लोटांगण् घातले.संत तात्याबा काही न विचारता देखिल् मनातले ओळखतात हा तर् कलीयुगातला चमत्कार.तो ईनोबच्या कानाशी कुजबजला. इनोबाला माहीत् होते की ते सगळे धमाल्याच्या खरडवहीतून संत तात्याबानीअगोदरच् वाचुन ठेवले होते.
तात्या मला सल्ला द्या.धमाल मुलगा तात्याना म्हणाला; मला सुचत् नाही.
काय् सल्ला देवु.लग्न कर म्हणुन? की करु नको म्हणुन?
मला तसा सल्ला नको आहे. मला लग्न करायचे आहे?धमाल मुलगा
"मग कर् की तुला कोणी आडवले आहे? तात्याचिया सेवका वक्र को्ण पाहे असा सर्व जालमंडळी कोण आहे ?
संत तात्याबा महाराज गरजले. मी सरपंचाकडुन त्याचे प्रतिसादच रद्द करुन टाकतो.
तसे नाही महाराज सेवकास लग्न कसे करावे याचे मार्ग दर्शन् करावे.
मग वत्सा तू चुकीच्या जागी आला आहेस. त्या बाबतीत आम्ही मार्गदर्शन् करणे योग्य नव्हे..हवे तर् तू बसल्या जागी दुपारी जेवणानन्तर् समाधी कशी लावावी किंवा सिंगल् माल्ट् की आणखी दुसरी कोणती , पापलेट चांगले की सुरमाई याचे मार्गदर्शन् माग ते मी तुला देतो.या जन्मी आनन्द् कसा घ्यावयाचा याचे मार्गदर्शन् मी देतो.
लग्न कसे करावे यासाठी तु माझा सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ यां कडे जा ते तुला मार्गदर्शन् करतील. तसेच ते घरात बायकोला आणी बाजारात भाविणीला डोळा कसा घालावा याचे सा़क्शात्कारासहीत मार्गदर्शन करतात लग्न कसे करायचे या प्रश्ना सोबत ते दुसरे मार्गदर्शन् बोनस् म्हणुन करतात.
--------------------------------------------------------------------------------------------
फेठकर काकानी झारा घेउन वडे शेजवान चा पहीला घाणा बाहेर काढला. कालच्या शिल्लक नूड्ल्स चे काय करावे हा विचार करत असताना त्याना हा पदार्थ सुचला होता.या पदार्थाचा प्रयोग कोणावर् करावा या विचारातच् असतानाच् दारावरची घंटा घणणली. पेठकर काकानी दार उघडले.दारात दारात प्रा.डॊ. दिलीप बिरुटे उभे होते. ये ये रे दिलीप् अगदी वेळेवर आलास तू.मी शिर्यात चारोळी टाकावी की बदाम हा विचार करत होतो आणि तू आलास.
चारोळी अजिबात् नको ते तसले र् ला ट् जुळवलेले प्रकार् रटा रटा शिजवायच्या ही लायकीचे नसतात.
तद मातय त्या चारोळी वाल्यानी आम्हा गझल वाल्यांच्या नाकत् दम आणलाय. त्या भगिनीभोग्याना हे असेच अनुल्लेखाने मारायला हवे.वस्तुत: ते मातृगमनी समिक्षक् वर् त्याना साथ देतात. दिलीप बिरुटेंच्या जिभेवर डबल सरस्वती नाचत होती. सुसंकृतच बोलायचे हे ठरवल्यावर् ते शिव्या ही संस्कृत मधे द्यायचे .आम्ही कष्टाने हदय द्रवून वीस पंचवीस् ओळी लिहुन एक गझल लिहायची आणि त्यानी चार ओळीत त्याच् भावना व्यक्त करायच्या? हे चालणार नाही. या असल्या चारोळी लिहिणार्या नगरवधुसूताना ठेचलच् पाहीजे
तुला "रांडेच्या"हा च शब्द वापरायचा आहे ना दिलीप? पेठरकाकाना "नगरवधुसूत" हा संस्कृत् शब्द् प्रथम दर्शनी कळलाच नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------
धमाल मुलाने लग्न करायचा विचार बोलुन दाखवल्यामुळे भडकमकर् क्लासेस मध्ये छो. डॊन्या ने "पळुन जाउन लग्न......एक मोलाचे मार्गदर्शन्" हे शिबीर तात्काळ् जॊईन केले होते.
शिबीरात् पहीला धडा पळावे कसे याचे प्रात्यक्शिक होते त्याची प्रॆक्टीस म्हणुन रोज चार किलोमीटर् पळावे लागत् होते. छोटा डॊन ला याचे काही वाटत नव्हते पण् प्रश्न होता तो त्याचा अंगरक्शक शार्प् शूटर् "आम्बोळी" चा (पिस्तुलाची एकही गोळी न झाडता हा केवळ कन्दील लावुन कोणाचाही गेम करायचा) त्याला ही छोटा डॊन च्या मागोमाग रोज पळावे लागत होते.त्याच्या मते "एक वेळ लोटा घेउन पळणे सोपे पण कन्दील घेउन पळायचे म्हणजे चेष्टा आहे काय राव्". रोज पळुन पळुन आम्बोळीचे पाय दुखत होते .त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. छोटा डॊन ने हा कोर्स लावला हे धमाल मुला पासुन लपवुन ठेवले होते.
------------------------------------------------------------------------------------------------
काय रे अजानुकर्णा ही नवी भानगड काय् काढलीस्?छोटी टींगी हातातले घड्याळ् लावत् म्हणाला. कसली भानगड?
तीच रे जा जरा त्या आर्यला विचार त्याला काल डॊक्टरानी नवीन औषध् दिलय् त्यामुळे म्हणे सगले लोक चांगलेच् दिसतात्
रे देवा...! कुणा डॉक्टर/वैद्याला असा पेशंट देऊ नकोस.ह्या रुग्णाला माफ कर त्याला कळत नाहीए की काय चांगले आणि काय वाईट आहे ते.
पण् तु असा का म्हणतोस?का म्हणजे? का म्हणु नको? तु काल आजारी होतास सकाळी साफ़ व्हावी या साठी तुला मी सुमार केतकरांचे अग्र लेख वाचुन दाखवले. परीणाम् काय झाला?
आज तू राजकारण् की गजकरण यावर् चार भागात् लेख लिहिलासच ना?
"ते सोड मला सांग की धमाल मुला ने लग्न कोठे करावे? अजानुकर्ण.
"हा ज्याच्या त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे" छोटी टींगी.
"हे जाला वरचे सर्वात् विनोदी उत्तर आहे". अजानुकर्ण नुकतेच वाचलेले वाक्य त्वेशाने म्हणाला "आपल्याला एखादी जबाबदारी टाळायची असली की लोक हे असे बोलतात. त्यामुळेच आपली लोकसंख्या वाढते आणि त्यामुळेच् अन्नधान्य समस्या निर्माण् होते त्यासाठी आपण् सर्वानी शाकाहार अंगीकारलाच् पाहीजे.विचार... विचार प. पू भाईश्री ऐशवर्या राय भौ यांचे मौलीक विचार ऐक जरा. ते म्हणतात की विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर् तुला काहीतरी मत असलच पाहीजे. तुझा त्याचा सम्बंध् असला नसला तरीसुद्धा".
---------------------------------------------------------------------------------------------------
ए सांगा की लग्न कुठे करु मी. जागा सुचवा ना.धमाल मुलाला ईराक इराण युद्धापेक्शाही आता ही चिंता अधीक महत्वाची वाटत होती.
हे बघ् जागा कोणतीही असली तरी ती लोकाना यायला आणी जायला ही सोयीस्कर हवी डॊ प्रसाद् दाढे म्हणाले.
डॊ दाढे; साहेब मी एक विचारु का? इनोबा आता कोणता बॊम्ब् टाकणार हा अंदाज न आल्याने आनदयात्री अर्धा झाला.
विचार ना रे ईनोबा.....डॊ दाढेना आपल्याला कोणीतरी शन्का विचारली याचाच् आनन्द् झाला होता.
डॊक्टर साहेब मला सांगा "महाराष्ट्रात् मिसळ् कोठे मिळते" आणि "पुण्यात् भेळ् चांगली कोठे मिळते" यादोन्हीपैकी कोणत्या संशोधनाबद्दल तुम्हाला डॊक्टरेट् मिळाली हो?
ए ईनोबा जरा ऐक की मी लग्न कोठे करु ते सांग की.
"मला वाटते की पुणे सोड तु दुसरीकडे कोठेतरी लग्न कर तुमच्या पुण्यात् दुपारी दोन वाजता मिसळ्सुद्धा कोठे मिळत नाही". इती मदनबाण."सरळ् ठाण्याला ये"
"तू असे कर तू आळंदीत लग्न कर.तेथे भडकमकर क्लासेसच्या विद्यार्थ्याना स्पेशल् डिस्काऊंट् मिळतो.शिवाय दोन लग्नावर एक बारसे फ़्री अशी लेटेस्ट स्कीम आहे.
दोन लग्नावर तीसरे लग्न केले तर अर्ध्या चार्जेस मध्ये".आनन्द यात्री कडे पुण्यातल्या प्रत्येक कार्यलायतल्या स्कीमसची अद्ययावत् माहीती होती..
"अरे पण् मी घरातल्या सगळ्यांच्या परवानगीने लग्न करतोय" धमाल मुलगा."आळंदी कशाला"? शिवाय मला लग्नाला माझ्या बारामतीच्या काकाना पण बोलवायचे आहे.
"बारामतीचे काका येणार आहेत्?" ईनोबाला उत्साह आला. "मग आपण सगळ्या कार्यकर्त्यांचे फ़लक लाऊ या की".
तेवढ्यात् कोणाचा तरी मोबाईल वाजला. साक्शात मोबाईल वर आदेश् आला होता लग्न थाटामाटात् धुमधडाक्यात् मिपा च्या हसत्या खेळत्या अंगणातच होऊ देत.
या आदेशासरशी वरदा , मनस्वी , स्वाती , प्राजु धमाल मुलाच्या लग्नाच्या बाकी गोष्टी ठरवण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावल्या.
( क्रमश:)
या पूर्वीचा भाग http://misalpav.com/node/1545
प्रतिक्रिया
29 Apr 2008 - 10:00 am | मदनबाण
"तू असे कर तू आळंदीत लग्न कर.तेथे भडकमकर क्लासेसच्या विद्यार्थ्याना स्पेशल् डिस्काऊंट् मिळतो.शिवाय दोन लग्नावर एक बारसे फ़्री अशी लेटेस्ट स्कीम आहे.
दोन लग्नावर तीसरे लग्न केले तर अर्ध्या चार्जेस मध्ये".आनन्द यात्री कडे पुण्यातल्या प्रत्येक कार्यलायतल्या स्कीमसची अद्ययावत् माहीती होती..
:D :)) =))
29 Apr 2008 - 2:05 pm | मनस्वी
विजुभाऊ, हा भाग पण जमला आहे.
पण या भागात विशेष काही "घडले" नाही असे वाटते.
मस्त
29 Apr 2008 - 10:32 am | आनंदयात्री
>>दिलीप बिरुटेंच्या जिभेवर डबल सरस्वती नाचत होती.
>>नगरवधुसूताना
भारीच ... तद माताय नंतर नगरवधुसुत ...
29 Apr 2008 - 10:42 am | विजुभाऊ
नगरवधुसुत ... नव्हे रे नगरवधुसूत.
सुत वेगळे .....वेळ आल्यावर जे नाकाशी धरतात ते.( धागा)
सूत वेगले.....वेळ आल्यावर जो नाकाशी धरतो तो ( मुलगा)
तेव्हढ्या साठी शुद्ध लेखन ....शुद्ध लेखन
29 Apr 2008 - 11:14 am | चतुरंग
केशवसुत = केशवाचा मुलगा
सूतकताई = चरख्यावर सूत कातणे
तुम्ही बरोब्बर उलटं सांगितलंत!;)
(अवांतर - आज काय सकाळी सकाळी ब्रम्हानंदी टाळी काय!;)ह.घ्या.)
चतुरंग
29 Apr 2008 - 11:22 am | आनंदयात्री
आम्हाला आधीच विचारावे वाटले होते पण म्हटले लहान तोंडी मोठा घास नको, सकाळपासुन २-४ ठिकाणी फेलपडलेत विजुभाउ.
जाउद्याहो विजुभाउ त्या शुदलेकनाची ...
30 Apr 2008 - 6:00 am | नंदा प्रधान
मला सांगा हे असेच का? उलटे का नाही? हे नियम कुणी ठरवले आणि त्यांना तो हक्क कोणी दिला? आम्ही म्हणालो 'सूत' म्हणजे मुलगा. आणि 'सुत' म्हणजे सुत कातणे तर ते चुक का?
आणि सुत म्हणज जरे मुलगा तर सुतपुत्र म्हणजे कोण? मुलाचा मुलगा? मग नातू म्हणा ना सरळ.. :D
- नंदा
30 Apr 2008 - 6:11 am | पिवळा डांबिस
सुतपुत्र म्हणजे कोण? मुलाचा मुलगा? मग नातू म्हणा ना सरळ..
अहो पण जरा ऐकाल का...
सुतपुत्र असा तो शब्द नाहियाय! सूतपुत्र असा शब्द आहे हो मृत्युंजयात!!
त्यातल्या सूत चा अर्थ सारथी असा आहे.
सारथ्याचा पुत्र तो सूतपुत्र = कर्ण!
चु.भू.द्या.घ्या.
30 Apr 2008 - 6:17 am | नंदा प्रधान
सुतपुत्र असा तो शब्द नाहियाय!
देवा ऽऽऽ (प्रमोद नव्हे),
हे सुद्द लेखण वाले काय आमाला सोडत नाहीत!
बर बाबा सूतपुत्र!!!!! कातायचं सूत नव्हे साररथ्याचं सूत! झालं??
सपशेल माघार.
1 May 2008 - 8:38 pm | देवदत्त
सारथ्याचा पुत्र तो सूतपुत्र = कर्ण!
चु.भू.द्या.घ्या.
हे तर माहीत होते. द्रौपदी म्हणाली होती ना, मी सूतपुत्राला वरणार नाही.
पण,
सुत= पुत्र
सूत= धागा
सूत= सारथी
सूत जमणे मधील सूत ते कोणते आता?
कोण म्हणते इंग्रजीत शब्द कसेही वापरतात. (हो, धर्मेंद्र म्हणाला चुपके चुपके मध्ये). :D
इथे मराठीतही एका प्रकारच्या उच्चारात किती वेगवेगळे शब्द दिसले. (ते ही इतक्या वर्षांनी, नेमके महाराष्ट्र दिनी :''( )
(जनरल डायर ह्यांना निवेदन: मी व्याकरणात/प्रमाणभाषेत शिरकाव करत नाही आहे. तेव्हा इथे दुर्लक्ष करावे :) )
30 Apr 2008 - 5:56 am | नंदा प्रधान
तेव्हढ्या साठी शुद्ध लेखन ....शुद्ध लेखन
तुमासनी हितलं सुद लेखनाचं णीयम म्हाहीत न्हाहीत का काय ?? आता दंगल व्हनार.. :SS
29 Apr 2008 - 10:58 am | विसोबा खेचर
तात्याचिया सेवका वक्र को्ण पाहे असा सर्व जालमंडळी कोण आहे ?
लग्न कसे करावे यासाठी तु माझा सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८
तसेच ते घरात बायकोला आणी बाजारात भाविणीला डोळा कसा घालावा याचे सा़क्शात्कारासहीत मार्गदर्शन करतात
हा हा हा! ही वाक्ये क्लास... :)
भगिनीभोगे, मातृगमनी समिक्षक, नगरवधुसुत!!
हा हा हा! आयचा घो, च्यामारी तुम्ही शिव्यांचे संस्कृतकरण बाकी सहीच केले आहे विजूभाऊ! जियो...!
या आदेशासरशी वरदा , मनस्वी , स्वाती , प्राजु धमाल मुलाच्या लग्नाच्या बाकी गोष्टी ठरवण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावल्या.
आता या मुली धमाल्याच्या लग्नाच्या कोणत्या गोष्टी ठरवणार आहेत हे पुढच्या भागात वाचायची उत्सुकता लागली आहे... :)
आपला,
(पिवळ्या डांबिसाचा संतसखा) संत तात्याबा महाराज.
29 Apr 2008 - 11:29 am | इनोबा म्हणे
विजुभाऊ अगदी झक्कास बरं का!
संत तात्याबा काही न विचारता देखिल् मनातले ओळखतात हा तर् कलीयुगातला चमत्कार.तो ईनोबच्या कानाशी कुजबजला. इनोबाला माहीत् होते की ते सगळे धमाल्याच्या खरडवहीतून संत तात्याबानीअगोदरच् वाचुन ठेवले होते.
हा हा हा!
संत महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८
'स्पिरीट ऑफ वाईफ' पुस्तक यांचेच आहे का हो?
तद मातय,मातृगमनी समिक्षक,नगरवधुसूत
डॉ.विजुभाऊ चहा यांचा 'आदर्श संस्कृत (अप)शब्दकोश'. आपली प्रत आजच नोंदवून ठेवा.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
29 Apr 2008 - 11:41 am | आनंदयात्री
>>'स्पिरीट ऑफ वाईफ' पुस्तक यांचेच आहे का हो?
:)) 'स्पिरीट ऑफ लाईफ' चे पिडा काकांसाठी 'स्पिरीट ऑफ वाईफ' करणे आवडले :))
29 Apr 2008 - 1:10 pm | प्रभाकर पेठकर
माफक करमणूक करणारा छान लेख. अभिनंदन.
पेठरकाकाना "नगरवधुसूत" हा संस्कृत् शब्द् प्रथम दर्शनी कळलाच नाही.
खरे आहे. तसे आम्ही असंस्कृतच.
29 Apr 2008 - 1:59 pm | प्रभाकर पेठकर
इथे असंस्कृत हा शब्द संस्कृत न जाणणारा अशा अर्थी वापरलेला आहे. तसे 'असंकृत' शब्दाला दूसरा अर्थही आहे. पण मुद्दाम विनोदनिर्मितीसाठी हा द्वयर्थी शब्द मी वापरला. मी लेख एन्जॉय केला आहे. विजूभाऊंचे सर्वच लिखाण मी नेहमी वाचतो आणि माझ्या मनात कुठल्याही प्रकारचे किल्मिष नाही.
धन्यवाद.
29 Apr 2008 - 1:57 pm | स्वाती राजेश
व्वा!! मस्त जमला आहे भाग-२.
त्यात तिसरा परिच्छेद आवडला. आंबोळीचा कंदील मस्तच!!!!!!!
रोज पळुन पळुन आम्बोळीचे पाय दुखत होते .त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. सही!!!!!!!!!:)
पेठकरांचे नुडल्स तळत बसणे,आचारी(शेफ्)पेठकर डोळ्यासमोर आले.:)))
आता तिसर्या भागात आम्हा भगिनींचा सहभाग आहे हे कळले. त्यामुळे उत्सुकता लागली आहे, कि आम्हाला कोणती कामे करावी लागणार?कि आम्ही नुसतेच करवल्या म्हणून मिरवणार? ते बाकी मस्त काम!!!!!!!!!!
29 Apr 2008 - 5:36 pm | वरदा
आवडला बरं का हा भाग पण...
रोज पळुन पळुन आम्बोळीचे पाय दुखत होते .त्यामुळे तो येता जाता सदाशीव पेठेत "येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा. =))
29 Apr 2008 - 5:54 pm | शितल
:\ :\ वीजुभाऊ आता बहुतेक धमाल्याचे लग्न लावुनच लेख था॑बतील.
वीजुभाऊ हा ही भाग आवडला.
29 Apr 2008 - 6:23 pm | ब्रिटिश टिंग्या
सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८
नगरवधुसूत
वडे शेजवान
हा हा हा! =))
छान जमला आहे हा भाग्.....पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत!
टिंग्या
29 Apr 2008 - 8:13 pm | इनोबा म्हणे
प. पू भाईश्री ऐशवर्या राय भौ यांचे मौलीक विचार ऐक जरा. ते म्हणतात की विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर् तुला काहीतरी मत असलच पाहीजे. तुझा त्याचा सम्बंध् असला नसला तरीसुद्धा".
हे वाचलंस का रे? चल लोळू नकोस,ऊठ आणि सरळ ऐशकडे जा.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
29 Apr 2008 - 11:36 pm | पिवळा डांबिस
बेटा विजू, तुझी धमाल्याच्या लग्नासाठी चाललेली लगबग बधून आमचे हृदय भरून आले आहे...
असाच लिहीत राहिलास तर थोड्याच दिवसांत तू "मिपाअड्ड्याचा पुल्देश्पांडे" म्हणून ओळखला जाशील असा आमचा आशिर्वाद आहे...
तात्याचिया सेवका वक्र को्ण पाहे असा सर्व जालमंडळी कोण आहे ?
सत्य आहे. म्हणून तर आम्ही तात्याबांचे शिष्य जालावर मिजाशीने रुबाब मारत फिरत असतो. कोणाची टाप लागलीय वाकड्या नजरेने बघायची!!:))
डॊक्टर साहेब मला सांगा "महाराष्ट्रात् मिसळ् कोठे मिळते" आणि "पुण्यात् भेळ् चांगली कोठे मिळते" यादोन्हीपैकी कोणत्या संशोधनाबद्दल तुम्हाला डॊक्टरेट् मिळाली हो?
हा, हा, हा!:))
डागतरसायेब, आता तुमचा प्रबंधच मिपावर प्रसिद्ध करा.... क्रमशः....
भगिनीभोगी, मातृगमनी, नगरवधुसूत
वा, वा, अगदी बिरूटेसरांच्या एम्.ए. (मराठी) च्या वर्गात बसल्यासारखं वाटलं! काय ते तेज, काय गिन्यान, वा!!:))
विजुभाऊ, आमच्या पुढील तीन पासवर्डस ची सोय केल्याबद्द्ल धन्यवाद!!
"येथे पाय चेपुन मिळतील" ही पाटी शोधतअसायचा.
सदाशिवपेठेतली पाटी? मग ती अशी हवी..
"येथे पाय चेपून मिळतील
घोट्यापासून गुडघ्यापर्यंत - मांड्या चेपून मागू नयेत"
वरदा , मनस्वी , स्वाती , प्राजु धमाल मुलाच्या लग्नाच्या बाकी गोष्टी ठरवण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावल्या.
आनंद झाला. या सगळ्या साळकाया-माळकाया सुटल्या होत्या आत्तापर्यंत!! शिंचा जो तो येतो तो आमच्यावर कोसळतो!!
लग्न कसे करावे यासाठी तु माझा सखा संत् महंत श्री श्री श्री पिवळा डांबीस १००८ यां कडे जा ते तुला मार्गदर्शन् करतील. तसेच ते घरात बायकोला आणी बाजारात भाविणीला डोळा कसा घालावा याचे सा़क्शात्कारासहीत मार्गदर्शन करतात लग्न कसे करायचे या प्रश्ना सोबत ते दुसरे मार्गदर्शन् बोनस् म्हणुन करतात.
वत्सा विजु, थोडासा चुकलास तू!
आम्ही लग्न कसे करावे याचं विशेष ट्रेनिंग देत नाही. ते होतंच!
आम्ही त्या दुसर्या भागाचे ट्रेनिंग देतो. कारण एकदा लग्न झाल्यावर ती दुसरी कला अवगत नसेल तर तुमचे हाल कुत्राही खाणार नाही...:))
अवांतरः हे १००८ लफडं काय आहे? कोणी स्पष्ट करेल काय?
'स्पिरीट ऑफ वाईफ' पुस्तक यांचेच आहे का हो?
नाही, आम्ही असले कोणतेही पुस्तक लिहीलेले नाही. आमचा पुस्तकी शिक्षणावर विश्वास नाही. आम्ही "गुरूमुखे विद्या" शिकवतो.
अहो, पुस्तकं वाचून जर लग्न जुळवता आलं असतं तर मिपावर इतके ब्रम्हचारी एकगठ्ठा कशाला आढळले असते? (गुरूराज तात्याबामाऊली, अज्ञ लेकराला क्षमा करा!!)
आपल्या चरणी विनीत,
पिवळा डांबिस - लॉसेंजेलिसपीठ
:))
30 Apr 2008 - 12:06 am | विसोबा खेचर
सत्य आहे. म्हणून तर आम्ही तात्याबांचे शिष्य जालावर मिजाशीने रुबाब मारत फिरत असतो. कोणाची टाप लागलीय वाकड्या नजरेने बघायची!!
:)
येथे पाय चेपून मिळतील
घोट्यापासून गुडघ्यापर्यंत - मांड्या चेपून मागू नयेत"
हा हा हा! हे बाकी लई ब्येस डांबिसा... सदाशिवपेठी पुणेरी पाटीवर 'मांड्या चेपून मागू नये' ही सूचना नक्की असेल! :)
तात्या.
30 Apr 2008 - 8:40 am | प्रभाकर पेठकर
येथे पाय चेपून मिळतील
घोट्यापासून गुडघ्यापर्यंत - मांड्या चेपून मागू नयेत"
पाय सावकाश चेपा, पुढे डेड एंड आहे.
2 May 2008 - 10:37 am | धमाल मुलगा
=))
काका..तुम नही सुधरोगे...मी आधीच बिघडलेलो, त्यात आणि कायतरी जबराट हाणताय....चामारी हे लक्षात राहून उग्गाच सासु/सासर्यांपुढे काहीतरी पाचकळपणा करायचो....
1 May 2008 - 10:51 pm | देवदत्त
छान... :)
1 May 2008 - 11:50 pm | मन
आहेत.
नुकतेच वाचले सगळे भाग.
ह.ह. पु. वा.
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
20 May 2013 - 11:36 pm | निनाद मुक्काम प...
आंजा वर भ्रमंती करतांना मिपावरील हे पिंपळ पान गवसले.
अजून हसतोय