डिस्क्लेमरः लेखनातील पात्रे प्रत्यक्षातील असली तरी प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत, हे कळायला काही आईन्स्टाईनची बुद्धीमत्ता नको. लिखाणाच्या सोयीसाठी काही ज्येष्ठांचे उल्लेख एकेरी करावे लागले आहेत, त्याबद्दल क्षमस्व.इथे वयाचा, ज्ञानाचा, सत्तेचा कसलाही मुलाहिजा राखला जाण्याची अपेक्षा करू नये. कुणी थट्टा केली तर आपल्या पगडीच्या झिरमिळ्या गळून पडतील असं वाटणार्यांना अगोदरच ही सावधगिरीची सूचना!!:))
यासाठी "बेस" म्हणून "मिपा" वर लिहले गेले साहित्य तसेच त्याला पडलेले प्रतिसाद हा मसाला कच्चा माल म्हणून वापरण्यात आले आहेत तरी कोणी आमच्यावर "साहित्यचोरीचा आळ" घेऊ नये, तसे झाल्यास त्या निषेघांच्या खलित्यास केराची टोपली दाखवण्यात येईल असे आम्ही नमूद करू ईच्छितो .... :छोटा डॊन काका च्या हुकुमवरून्.
ठण् ठण ठण् ठण घडाळ्याने मोजुन् बारा टोले दिले................
दुपारी मध्यानीसच् भल्या पहाटे धमाल् मुलगा उठला. "जब् जागो तब् सवेरा " या स्वामी आत्मप्रबोधानन्द् यांच्या उक्ती नुसार शनिवारी विकान्त उजवुन् रात्री झोपुन रवीवारी दुपारी ३ वाजता उठला तरी तो त्याला सकाळ् म्हणत असे त्या मानाने दुपारी बारा म्हणजे भली पहाटच होती...हां तर काय म्हणत् होततो मी; हां! पहाट झाली .धमु उठला.नाईलाजाने ईर्षाद म्हणत् त्याने ब्रशावर् पेष्ट् चढवुन् दातावर टेकवली. खसाखसा चेहेरा वगैरे धुतला.एक धूम्र शलका शिलगावुन झुरका मारला.ठ्यॊ करुन ठसका लागला आणि त्याचा मेंदू जागृत् झाला. त्याच्या मित्रांच्या मते तो हल्ली जर्रा जास्तच् झुरत् होता.
काहीतरी करायलाच हवे. धमु स्वत:शीच् म्हणाला. डॊन्या, इनोबा , आन्द्या यासगळ्यांचे बिचार घेउन झाले होते.कोण काय म्हणत् होते कोण काय म्हणत होते.त्यांचे बरोबर होते . लग्न तर करायलाच् हवे होते. प्रश्न होता की कसे आणि कुठे. स्वारगेट् , नेहरु स्टेडीयम, शान्ग्रीला गार्डन ,स्वीकारपासुन् ते अगदी सिंहगड् रोडवरचे कार्यालय सगळेच् काय काय सूचना देत होते.सगळ्यांचे बरोबर् होते पण् यात गोची एकच् होती ती म्हणजे यातल्या कोणालाही लग्नाचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता.
आपण् असे करु यात का. भडकमकरसर सध्या गाईडन्स देतात् त्यांच्या कडे जाउया का? कधी नव्हे तो झंप्या वेळेवेर् योग्य ते बोलला.डॊन्याला तो काय बोलला त्या बद्दल् आक्शेप् नव्हता पण हे वाक्य झम्प्या का बोलला तु बोलु शकत् नव्हतास का असे रागावुन् त्याने ईनोबा कडे पाहीले.ईनोबा नेहमीप्रमाणे नाठाळाच्या माथी काय हाणायचे या गहन् विचारत् गढला होता.धमु असा हवालदील् होऊ नकोस्आम्ही आहोत ना आंद्या धमु ला समजावत् म्हणाला.तुझा प्रॊब्लेम् काय् आहे?
"काय येडं आहे रे हे" छोटा डॊन् आनन्दयात्री वर उचकत म्हणाला"हिकडे सगळे रामायण् झाले तरी हे विचारतय् की रामाची सीता कोण"?
मी सांगते रामाची सीता कोण ते.मनस्वी मध्येच् त्याचे बोलणे तोडत् म्हणाली ."रामाची सीता सिन्डी क्राफ़र्ड् बरोबर् की नाही धमु"
"धमु नकाना म्हणु" धमाल मुलगा कळवळुन म्हणाला.इथे माझ्या जिवनमरणाचा प्रश्न चाललाय् आणि तुम्हाला सिन्डी क्राफ़र्ड् सुचतेय्"
"ती तुझा प्रश्न सोडवणारे का रे धमु"?मनस्वी पुन्हा एकदा त्याला धमु म्हणायचे नाही हे पुन्हा एकदा विसरुनच् म्हणाली.
मी काय म्हणतो आपण त्या भडक् मकर सरांकडे जाउया. बघु तर् ते काय सल्ला देतात्.माझ्या मैत्रीणीला त्यांच्या "ईन्टरव्ह्यु देणे.... एक् जीव घेणे" या मार्गदर्शन् शिबीरात मस्त् मार्गदर्शन् दिले होते त्यानी." मनस्वी म्हणाली.
"मग् मिळाली का तीला नोकरी" विवेकग ने न रहावुन् विचारले "हा बघ् हा बघ् एक तर् रोज येत् नाही आणि अशे ऐन् वेळीला कै च्या कै प्रश्न विचारतो":इनोबा " ते भडक मकर् सर् म्हणजे काय वाटले तुला? ऒ ! ते असले तसले क्लासेस् घेत् नाहीत् ते इन्टेर्व्ह्यु कसे द्यायचे;पत्रकाराना कसे ताटकळत् ठेवायचे बोलताना मधे मधे पॊजेस कसे घ्यायचे ?किती घ्यायचे ?आपल्या इन्टेर्व्ह्यु मध्ये वादग्रस्त् विधाने कशी पेरायची हे नव्या नटाना शिकवत असतात् तुला काय वाटले नोकरी कशी मिळवावी याचे इन्टेर्व्ह्यु ?"
आपण् असे करु यात् आपण् कट्ट्यावर् जाउ या तिथे काहीतरी मार्गदर्शन् मिळेल्..
----------------------------------------------------------------------------
इकडे कट्ट्यावर्.....
बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून त्यातुन पलिकडे पहात अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही अशी मान हलवत् म्हणाला नाही रे केशवा एवढी काही पिवळी वाटत् नाही. तुझी लिव्हर् फ़क्कड् काम् करतेय्. त्या डॊक्टर् ला अक्कल् नाही उगाच् म्हणतो कावीळ् झाली म्हणुन खरे सांगतो तुझी लघवी तेवढी काही पिवळी नाही. तळकट् वगैरे तू तसाही खात् नाहीस्. उगाच् आता पथ्यबिथ्ये पाळु नकोस्.
हो रे मला ही आता तसेच् वाटु लागले आहे. तो तात्या तिकडे सध्या नव्या लोकांना दीक्शा देतोय् जोरात् सिंगल् माल्ट् वगैरे ची आणि आपण् या इथे या "छद्मी शेवाळ् ;वटवाघूळ् आणि दक्षीण लेबनॊन् मधल्या चिचुन्द्र्या" असल्या भिकार् चर्चा करत् बसलोय. चित्तर् तुला काय् वाटतेय् आपण् काय् करावे या परिस्थितीत्?
ऒ काय् म्हणालास्? मला ही भिकार् सावकार् खेळत् बसायचा कंटाळा आलाय्.हल्ली तर् पान हा शब्द् ऐकला तरी कंटाळा येतो. जेवणाचे पान् घ्या म्हणाले कोणी तरी भूक् संपते.चित्तर् म्हणाला.पाककृती ला काय् रीस्पॊन्स द्यायचा हेच् कळत नाही. आयला लोक काय च्या काय् चहा आणि पापडावर लिहितात्.
मला तर् सध्या जोरात् भूक् लागते. सध्या प्रत्येकजण पाककृत्या खरडत् असतो.. शिवाय् तात्या त्याची चित्रे पण् देतो . जाम् भूक् लागते.
आणि सध्या चर्चा महाचर्चा अतिमहाचर्चा यापेक्शा "खाद्य पदार्थ" यालाच् जास्त् प्रतिसाद् मिळतो. "खयाली पुलाव" चांगला खपतो. आपण द्यायचो त्यासारखे "जिंकले जिंकले तोडलत् हो तुम्ही" असले प्रतिसाद् आता जवळ् जवळ् ब्यानच् झालेत.
आता मला सांग सन्जोप् मी तीन भागात् "चिघळलेल्या जखमा ,विरघळले बेडुक् आणि विरलेले प्रतिसाद् यावर् जब्बरदस्त् लेख् लिहिले काय झाले रे त्याचे तीस वाचने आणि पाच् प्रतिसाद् तेही दोन तुझे एक् मी त्याचे दिलेले स्पष्टीकरण आनि दोन "माझे तसेच् मत" असले. त्यापेक्शा केशवच्या "मी आता विडम्बन् करणार नाही" त्याला बरे प्रतिसाद् मिळाले. विडम्बनापेक्शाहीयाला जास्त् प्रतिसाद्.
मी तर आता विडम्बन कविता करण्यापेक्शा "मी आता विडम्बन् करणार नाही (१) , "मी आता विडम्बन् करणार नाही" (२)" असेच् लिहीयचे ठरवले आहे ईति:केशवसुमार.
नाहीतर "काय जेवलात" असले तरी सुरु करतो. निदान डोक्याला तरी ताप नाही. "जेन्जारलेली झुरळे, रक्तगाभुळलेले बेडुक आणि उपटसुम्भ्" यापेक्शा "काय जेवलात् " याची वाचने जास्त् होतात
---------------------------------------------------------------------------
सुवर्णमयी आणि ऐश्वर्या राय यांचे वेगळेच् बोलणे चालले होते.
"मी काय म्हणते आपण जालावर् कोण काय काय लिहीतात् त्यात् पुरुष किती. बायका किती आणि बायकांची नावे घेतलेले पुरुष किती हे शोधायलाच् हवे:" सुवर्णमयी
"तुम्हाला काय् म्हणायचे आहे नक्की सांगा" ’ऐश्वर्या राय "मी पुरुष् आहे की स्त्री याचा माझ्या लिखाणाशी काय सम्बन्ध्":ऐश्वर्या राय
आहे पुरुष लेखाकाना स्त्री ने जालावर् काही टीका केली की ती सहन होत नाही.कुठे कुठे जायचे जाला मध्ये हे त्याना कळत् नाही":सुवर्णमयी.
-----------------------------------------------------------------------------
"मला खरेच् कळत् नाहिये की काय करायचे?" धमाल मुलगा "इकडे आबा म्हणतात् की मी एवढा बाप असताना तु लग्नाची काळजी कशाला करतोस् आणि ते तारीख पण् ठरवत् नाहीत्."
"आपण् असे करुयात का? आपण लोकांचा कौल घेउ या" छोटा डॊन काहीतरी सांगु लागला"
"त्याने काय होईल्? धमाल मुलगा
त्याने निदान लोकांकडुन आपल्याला चार पाच् नवे पर्याय मिळतील"छोटा डॊन
आणि तसे पर्याय न मिळता लोकांनी चर्चा भलतीकडे नेली तर? धमाल मुलगा "उगाच ह घ्या ह ह पो दु ह ह पु वा असले प्रतिसाद् मिळाले तर्?"
त्याची तू काळजी करु नकोस् .मी पुण्याचे पेशव्याना याची काळजी घेण्यास सांगितले आहे
"मी काय म्हणतो" उदय सप्रे एकदम् उत्साहाने म्हणाला
"बोल आता तूच् राहीला होतास.बोल बोल वाघ पिंजयात सापडे बायका मुले मारती खडे" छोटा डॊन.
"ए याला सांग की मी काहीही बोललो की हा मला प्रत्येक वेळी मधे मधे आडवतो" उदय सप्रे रडवेला चेहेरा करत् म्हणाला.
"बोल रे तू त्या डॊन्याचे येवढे मनावर् घेउ नकोस.तसे पाहीले तर त्याचे चूक् नाहीये आत्ता. पण तू बोल" धमाल मुलगा उदय ला शांत करत् बोलला.
"पण् त्याने मला पुन्हा अडवले तर?"उदय सप्रे.
"तो आता आडवणार नाही"धमाल मुलगा
"कशावरुन म्हणतोस्"उदय सप्रे.
"त्याची सिग्नेचर वाच त्यात् स्पष्ट् लिहीली आहे की त्याची कोठेही इतरत्र शाखा नाही" धमाल मुलगा
" मग ठीक आहे" उदय सप्रे.
"आता बोल ना " धमाल मुलगा.
"आपण संत तात्याकाम जाबाली ना विचारुया"उदय सप्रे. "त्यानी सध्या दीक्षे चे क्लासेस् काढले आहेत ते शिष्याना दीक्शा देण्या अगोदर सिंगल माल्ट् देउन पावन् करुन घेतात्."
"चला चला आपण लगेच् जाउयात" ईनोबाला धमाल मुला पेक्शाही जास्त घाई झाली होती "अन धमाल मुलाच्या लग्नाचे विचारु त्याना"
सगळे लगोलग संत तात्याबा महाराजांच्या त्वरेने आश्रमाकडे निघाले.
( क्रमश:)
प्रतिक्रिया
22 Apr 2008 - 11:01 am | धमाल मुलगा
च्यामारी....काय करावं ह्या विजुभाऊंना?
आयला, माझ्या लग्नाचा पार बॅन्डबाजाच वाजवून टाकला की तुम्ही!
परफेक्ट....
एकसे एक ठकाठक...
आता, ह्यात माझंच लगीन विजुभाऊंनी आणल्यामुळे मीच जास्त विस्तृत प्रतिक्रिया देणे हे योग्य ठरणार नाही...बाकी उरलेले सगळे आमच्या रेवड्या उडवतीलच ह्यात तीळमात्र शंका नाही!
गांववालोंsssssssss सुस्साईड!!!!!!!!!!
आता हाणा जोरात!
मी काय म्हणतो, आपण तात्या ख्रिस्ताला शरण जाऊ! पटतंय का?
22 Apr 2008 - 6:55 pm | मनापासुन
धमुच्या लग्नाला यायच्य बलं का.विशलायच्य नाही
22 Apr 2008 - 11:09 am | मदनबाण
आत्ता पासुनच उखाणे तयार ठेव.....:)))))
(आपला बाराती)
मदनबाण
22 Apr 2008 - 11:22 am | विसोबा खेचर
"आपण संत तात्याकाम जाबाली ना विचारुया"उदय सप्रे. "त्यानी सध्या दीक्षे चे क्लासेस् काढले आहेत ते शिष्याना दीक्शा देण्या अगोदर सिंगल माल्ट् देउन पावन् करुन घेतात्."
"चला चला आपण लगेच् जाउयात" ईनोबाला धमाल मुला पेक्शाही जास्त घाई झाली होती "अन धमाल मुलाच्या लग्नाचे विचारु त्याना"
सगळे लगोलग संत तात्याबा महाराजांच्या त्वरेने आश्रमाकडे निघाले.
हा हा हा विजूभाऊ! चालू द्या... :)
फुडचा पार्ट लवकर टाका. चांगलं लिवत आहात...
आपला,
(सिंडी क्रॉफर्डचा पागलप्रेमी) संत तात्या क्रॉफर्ड.
23 Apr 2008 - 9:05 pm | प्राजु
हा हा हा विजूभाऊ! चालू द्या... :)
फुडचा पार्ट लवकर टाका. चांगलं लिवत आहात...
.. असेच म्हणते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Apr 2008 - 11:27 am | मनस्वी
जबरदस्त.
विजुभाऊ. छान निरिक्षण केलंत.
22 Apr 2008 - 1:27 pm | आनंदयात्री
जिंकले .. जिंकले तुम्ही विजुभाऊ.
सुपर्ब !!
धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक !
>>तीस वाचने आणि पाच् प्रतिसाद् तेही दोन तुझे एक् मी त्याचे दिलेले स्पष्टीकरण आनि दोन "माझे तसेच् मत" असले.
>>चिघळलेल्या जखमा ,विरघळले बेडुक् आणि विरलेले प्रतिसाद्
अरारा रा ......... बेक्कार.. :))
>>बोल आता तूच् राहीला होतास.बोल बोल वाघ पिंजयात सापडे बायका मुले मारती खडे" छोटा डॊन.
:)))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))) सप्रे'म (म ला बोल्ड)
आन दो :))
स्वगतः पुढची लेखमाला "आंद्याचे वधुसंशोधन" अशी नसली म्हणजे मिळवले :))))))))))))))))))
23 Apr 2008 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जिंकले .. जिंकले तुम्ही विजुभाऊ.
सुपर्ब !!
धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक !
तलवारबाजी उत्तम चालू आहे, चालू द्या !!! :)
22 Apr 2008 - 5:03 pm | छोटा डॉन
शेवटी माझ्या क्रमशः लिहण्याला कंटालून विजूभाऊंनी माझ्या "राखीव कुरणात घुसखोरी" केली म्हणायची. मस्त, जबरदस्त ...
च्यायला "धम्या" ची फुल "पिपाणी वाजणार" असे दिसतयं ...
"कधी नव्हे तो झंप्या वेळेवेर् योग्य ते बोलला.डॊन्याला तो काय बोलला त्या बद्दल् आक्शेप् नव्हता पण हे वाक्य झम्प्या का बोलला तु बोलु शकत् नव्हतास का असे रागावुन् त्याने ईनोबा कडे पाहीले""
हाण तिच्यायला. आता अवघड आहे बुवा. चारचौघात तुम्ही आमचे "वाद" असे ओपन कराय लागलात तर ... मस्त
"मी तीन भागात् "चिघळलेल्या जखमा ,विरघळले बेडुक् आणि विरलेले प्रतिसाद् यावर् जब्बरदस्त् लेख् लिहिले काय झाले रे त्याचे तीस वाचने आणि पाच् प्रतिसाद् तेही दोन तुझे एक् मी त्याचे दिलेले स्पष्टीकरण आनि दोन "माझे तसेच् मत" असले""
धम्याच्या भाषेत फु ... ट... लो !!!
जरा अजून थोडी लगीनघाई वाढवा ...
आम्ही वाचतो आहोतच ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
22 Apr 2008 - 6:03 pm | इनोबा म्हणे
दुपारी मध्यानीसच् भल्या पहाटे धमाल् मुलगा उठला. "जब् जागो तब् सवेरा " या स्वामी आत्मप्रबोधानन्द् यांच्या उक्ती नुसार शनिवारी विकान्त उजवुन् रात्री झोपुन रवीवारी दुपारी ३ वाजता उठला तरी तो त्याला सकाळ् म्हणत असे त्या मानाने दुपारी बारा म्हणजे भली पहाटच होती...
हा हा हा! साईबांला बसला होतास काय रे?
कधी नव्हे तो झंप्या वेळेवेर् योग्य ते बोलला.डॊन्याला तो काय बोलला त्या बद्दल् आक्शेप् नव्हता पण हे वाक्य झम्प्या का बोलला तु बोलु शकत् नव्हतास का असे रागावुन् त्याने ईनोबा कडे पाहीले.ईनोबा नेहमीप्रमाणे नाठाळाच्या माथी काय हाणायचे या गहन् विचारत् गढला होता.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"बोल आता तूच् राहीला होतास.बोल बोल वाघ पिंजयात सापडे बायका मुले मारती खडे" छोटा डॊन.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून त्यातुन पलिकडे पहात अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही अशी मान हलवत् म्हणाला नाही रे केशवा एवढी काही पिवळी वाटत् नाही. तुझी लिव्हर् फ़क्कड् काम् करतेय्. त्या डॊक्टर् ला अक्कल् नाही उगाच् म्हणतो कावीळ् झाली म्हणुन खरे सांगतो तुझी लघवी तेवढी काही पिवळी नाही. तळकट् वगैरे तू तसाही खात् नाहीस्. उगाच् आता पथ्यबिथ्ये पाळु नकोस्.
ह. ह. पु. वा.
"चला चला आपण लगेच् जाउयात" ईनोबाला धमाल मुला पेक्शाही जास्त घाई झाली होती
'फूकट ते पौष्टीक.'
इजुभाऊ फुडचा भाग लौकर येऊ द्या बरं का!
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
22 Apr 2008 - 6:06 pm | धमाल मुलगा
हा हा हा! साईबांला बसला होतास काय रे?
आयला, काय जादूटोणा येतो की काय तुला....
कसं ओळखलंस?
22 Apr 2008 - 6:06 pm | स्वाती राजेश
सही लिहीले आहे. मी म्हटल्याप्रमाणे मि.पा.चे सद्स्य त्या चॅनल्स वर चालू असलेल्या सिरीयल पेक्षा छान लिहितात.
त्याचे उत्तर म्हणजे तुम्ही लिहिलेली वरील कथा...
भन्नाट आहे. सर्व पात्रे अगदी डोळ्यासमोरून जातात....
सदस्यांना न भेटताही त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते.
ह.घ्या.
उदा:
धमाल मुलगा: मुलींच्या गप्पा भरपूर, पण समोर आली कि त त प प होते.:))))
थोडक्यात काय?....लढाईच्यावेळी तोफेत पाणी.
विकि: असा कि मुलीशी बोलेल, धमाल मुलाच्या कांदे पोहे कार्यक्रमापर्यंत त्याला मदत करेल.
मुलीच्या बापाने नाही म्हटले तर हा पठ्या काही पळून जाऊन लग्न करायच्या भागगडीत मदत करणार नाही.
मुलीच्या बापाचा, भावाचा मार खाण्याच्या भितीने.
थोडक्यात काय?.....तुम लढो हम कपडे संभालते है!
पुण्याचे पेशवे: डोक्यावर पगडी, घारे डोळे, पक्के सदाशिव पेठी.....
तात्या: डोक्यावर काळी टोपी, कोट, पांढरे धोतर्....कोटाच्या खिशात एक तपकीर ची डबी. ती सारखी ओढून, शिंक आली कि, म्हणतात्,अरे शिंच्या.............(अगदी चार दिवस सासूचे सिरीयल मधील कोकणातील मामा सारखे)
बाकीच्यांच्या नावे व प्रतिमा नंतर.....
अशा आणखी कोण कसे असेल? त्यांच्या लिखाणावरून, बोलण्यावरून प्रत्यक्ष न बघताही त्या व्यक्तीची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते?
22 Apr 2008 - 6:11 pm | धमाल मुलगा
धमाल मुलगा: मुलींच्या गप्पा भरपूर, पण समोर आली कि त त प प होते.:))))
थोडक्यात काय?....लढाईच्यावेळी तोफेत पाणी.
डायरेक्ट आमचं माप काढून मोकळे???? आपल्याला खुन्नस?
बोला कोणती पोरगी? आत्ताच्या आत्ता जाऊन न 'त त प प' करता तिच्याशी बोलून दाखवतो.."ताई, किती वाजले? "
हां...उग्गाच चंपक नाय समजायचा आपल्याला!
तात्या: डोक्यावर काळी टोपी, कोट, पांढरे धोतर्....कोटाच्या खिशात एक तपकीर ची डबी. ती सारखी ओढून, शिंक आली कि, म्हणतात्,अरे शिंच्या..
हा..हा..हा...
मस्त! एकदम तात्या अशा वेशात डोळ्यापुढे आले! खत्तरनाक!!!!
22 Apr 2008 - 6:49 pm | वरदा
डॉन भाऊंचं काम पुढे सुरु वाट्टं झक्कास जमलय...
थोडक्यात काय?....लढाईच्यावेळी तोफेत पाणी.
खी खी खी...
पुण्याचे पेशवे: डोक्यावर पगडी, घारे डोळे, पक्के सदाशिव पेठी.....
मी पण एकदम सेम इमॅजीन केलं....
अगदी चार दिवस सासूचे सिरीयल मधील कोकणातील मामा सारखे हा हा हा हा........
22 Apr 2008 - 7:53 pm | मनापासुन
बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून त्यातुन पलिकडे पहात अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही अशी मान हलवत् म्हणाला नाही रे केशवा एवढी काही पिवळी वाटत् नाही. तुझी लिव्हर् फ़क्कड् काम् करतेय्. त्या डॊक्टर् ला अक्कल् नाही उगाच् म्हणतो कावीळ् झाली म्हणुन खरे सांगतो तुझी लघवी तेवढी काही पिवळी नाही. तळकट् वगैरे तू तसाही खात् नाहीस्. उगाच् आता पथ्यबिथ्ये पाळु नकोस्.
अरे बापरे बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ म्हण्टल्यावर मला वेगळेच वाटले होते. फुटलोच की .झकास फिरवले भौ.
"ईन्टरव्ह्यु देणे.... एक् जीव घेणे".......ते इन्टेर्व्ह्यु कसे द्यायचे;पत्रकाराना कसे ताटकळत् ठेवायचे बोलताना मधे मधे पॊजेस कसे घ्यायचे ?किती घ्यायचे ?आपल्या इन्टेर्व्ह्यु मध्ये वादग्रस्त् विधाने कशी पेरायची हे नव्या नटाना शिकवत असतात्
विजुभौ भडकमकर सरांचे कितव्या बॅचचे विद्यार्थी होतात ?
छद्मी शेवाळ् ;वटवाघूळ् आणि दक्षीण लेबनॊन् मधल्या चिचुन्द्र्या" जब्बरदस्त विषय निवडलात की.
"चिघळलेल्या जखमा ,विरघळले बेडुक् आणि विरलेले प्रतिसाद् यावर् जब्बरदस्त् लेख् लिहिले काय झाले रे त्याचे तीस वाचने आणि पाच् प्रतिसाद् तेही दोन तुझे एक् मी त्याचे दिलेले स्पष्टीकरण आनि दोन "माझे तसेच् मत" असले. त्यापेक्शा केशवच्या "मी आता विडम्बन् करणार नाही" त्याला बरे प्रतिसाद् मिळाले. विडम्बनापेक्शाहीयाला जास्त् प्रतिसाद्.
यावर प्रतिक्रिया आमच्या टाळक्यातच येत नाही ..बेष्टच
धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक !
हे डॉन काकांशी १००००००% मनापासुन एकमत
22 Apr 2008 - 10:14 pm | ठणठणपाळ
माझं नाव कुठेच घेतलं नाही?
24 Apr 2008 - 3:14 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो आत्ता तर लग्न ठरते आहे उखाण्यापर्यंत यायला वेळ आहे....
आणि हा लग्नाला आल्यावर तुमचे नाव घ्यायचे असेल तर तुम्हाला स्वतःची बायको घेऊन यायला लागेल तुमचे नाव घ्यायला.
काय विजुभाऊ बराबर का नाई?
पुण्याचे पेशवे
22 Apr 2008 - 10:41 pm | पिवळा डांबिस
विजुभाऊ, हे छान कार्य अंगावर घेतलंत!
टाका उडवून बार या धमाल्याच्या लग्नाचा!! खूप दिवस टवाळक्या करत फिरला तो!! आता देऊया जू मानेवर!!!:))
धमाल्या, सगळ्या मिपाकरांना बोलव हो लग्नाला! आणि आमंत्रण पत्रिकेत "कृपया (शाब्दिक) आहेर आणू नयेत" हे लिहायला विसरू नकोस!!!:)))
नाहीतर भर समारंभात तुझी चड्डी काढून घेतील ही मंडळी!!!:)))
तुझ्या सासुरवाडीला कळणार नाही की नवर्यामुलाकडून आलेली ही मंडळी आपलीच बाजू कशी काय घेतायत बॉ!!!:))
-डांबिसकाका
23 Apr 2008 - 12:14 am | इनोबा म्हणे
"कृपया (शाब्दिक) आहेर आणू नयेत" हे लिहायला विसरू नकोस!!!:)))नाहीतर भर समारंभात तुझी चड्डी काढून घेतील ही मंडळी!!!:)))
धम्या, लेका डांबीस काकांनी (स्वारी बरं का!)तर थेट तुझ्या चड्डीलाच हात घातला की रे! आता तर अगदी मनापासून तूला 'चड्डीत रहा' असेच सांगावेसे वाटतेय.
स्वगतः च्यामारी,आज धम्याचा शनी वक्री दिसतोय.
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
23 Apr 2008 - 2:10 am | पिवळा डांबिस
आम्ही कशाला धम्याच्या चड्डीला हात घालू? आम्ही तर इथं लांब बसलोय!! आम्ही तिथल्याच (तुमच्यासारख्या!:)) मंडळींपासून त्याला सावध करत होतो!!:)))
-डांबिसकाका
23 Apr 2008 - 11:41 am | धमाल मुलगा
रहावंच लागेल बाबा...आमची सद्दी संपलेली दिसतीये. आता आपण पार गपगार झालोय!
स्वगतावर स्वगतः वक्री कस्सला, तिच्यायला एकदम चक्री दिसतोय!
शनिशिंगणापूरला एखादी चक्कर टाकावी लागणार दिसतंय
-(हनुमान चालिसा वाचण्यात गर्क) ध मा ल.
23 Apr 2008 - 10:28 am | विजुभाऊ
नाहीतर भर समारंभात तुझी चड्डी काढून घेतील ही मंडळी!!!:)))
आमच्याकडे नवरदेवाचे बूट पळवुन लपवतात. नवरदेवाची चड्डी लपवुन ठेवायची फ्याशन कधी पासुन सुरु झाली
24 Apr 2008 - 3:16 pm | llपुण्याचे पेशवेll
पत्रिकेवरच छापायला पाहीजे 'आहेर नाहीतर बाहेर"
पुण्याचे पेशवे
24 Apr 2008 - 3:20 pm | मनस्वी
"धमुच्या लग्नाची पत्रिका" हा एक वेगळा विषय आहे.
24 Apr 2008 - 3:28 pm | धमाल मुलगा
का बुवा? हे...आपलं...बाई?
आता पत्रिकेत आणि काय वेगळं असणार आहे? एक गंपतीबाप्पा, सनई-चौघड्याचं चित्र, एखाद्या नारळाचं चित्र...आणि आमच्या कुळाचा उध्धार! ह्याहून आणखी काय वेगळं असणार?
देवा पांडुरंगा...अजुन काय काय बघायला लावणार आहेस रे? ही मनस्वी एक नंबरची दुष्ट मुलगी आहे! आता हिच्या डोक्यात आणखी काय खूळ आलंय कोण जाणे!
23 Apr 2008 - 3:34 am | ब्रिटिश टिंग्या
छान चाललयं....अ.ये.दे.
- छोटी टिंगी
अवांतर सल्ला - धमु , चड्डी सांभाळ रे बाबा! (स्वत:ची) ;)
23 Apr 2008 - 9:41 am | केशवसुमार
केशवच्या "मी आता विडम्बन् करणार नाही" त्याला बरे प्रतिसाद् मिळाले. विडम्बनापेक्शाहीयाला जास्त् प्रतिसाद्.
मी तर आता विडम्बन कविता करण्यापेक्शा "मी आता विडम्बन् करणार नाही (१) , "मी आता विडम्बन् करणार नाही" (२)" असेच् लिहीयचे ठरवले आहे ईति:केशवसुमार.
हा हा हा..
छ्या बॉ.... "केश्या" मेल्या तुला का त्या विजुभाऊ सरखे चहा घालून ....नाही नाही.. पाणी घालून सहा सहा सात सात भाग लिहिता येत नाहीत? :((..(स्वगत :-ते भडकमकरमास्तर क्रमश: लिहिण्याच गाईडन्स देतात् का विचारयला पाहिजे..)
(वाचक-लेखक)केशवसुमार
धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक !
घरी जयचा यायचा रस्ता कुणाला सांगू नका.. बरेच लोक पाळतीवर असतील तुमच्या.. धम्मक लाडू द्यायला..जरा सांभाळून..
(हितचिंतक)केशवसुमार
23 Apr 2008 - 10:25 am | आनंदयात्री
प्रसाद मुळे,
फ्लॅट नं १५, नागपुरे बिल्डिंग,
धनकवडी पोष्ट ऑफिसच्या मागे,
धनकवडी, पुणे.
हा पुर्ण पत्ता. या.
:))))
23 Apr 2008 - 10:11 am | केशवसुमार
यात्रीशेठ,
गैरसमज,गैरसमज..
धम्याच्या नावाखाली बाकीसगळीकडे तलवारबाजी चाल्लीये तुमची ... खतरनाक !
ह्या वाक्याला सहमत अस लिहायच राहीले..:)
केशवसुमार..
असो पत्ता मिळाला म्हणजे अता फुक्का झोडायला यायला हरकत नाही..
(स्वगतः- पत्ता खरा आहे ना.. नाहीतर निघायचा कुठल्या तरी डॉनचा नाहीतर पोलिस चौकीचा)
23 Apr 2008 - 10:21 am | आनंदयात्री
तरी म्हटले जाणता माणुस रागावला चिडला तरी असे बोलणार नाही !
असो या मग या विकांताला, संध्याकाळच्या वेळेस तुमच्या कविता घेउन ('विडंबन घेउन' असे वाचले की काय ;) ), बसुयात छान, व्यवस्था चोख होइल हे वे सां न लगे. प्रेत खाण्यात तुम्ही अन आम्ही एका ताटातले, तुमच्या आवडीचे छानसे कायतरी बनवुयात, हादडुयात, फक्कड गप्पा मारुयात अन रात्री मस्त आमच्या गच्चीवर उघड्या आभाळाखाली ताणुन देउयात, काय म्हणता.
23 Apr 2008 - 10:38 am | विदेश
पण ऑगदी वॉस्तवॉतले वॉट्तात हो शिंचे!
23 Apr 2008 - 11:12 am | धमाल मुलगा
विदेश भाऊ, रोशोगुल्ला खात खात प्रतिक्रिया टाकलीये काय?
-(लग्नाच्या चिंतेत...चड्डी सांभाळणारा) ध मा ल.
23 Apr 2008 - 11:27 am | विदेश
नाही बाबा, घरचे लग्नकार्य असल्यावर पानाचा तोबरा भरला की असंच होणार!
23 Apr 2008 - 11:29 am | धमाल मुलगा
पिंक टाकून मोकळे व्हा...नाहीतर उगाच उचकी लागायची....सुपारी कच्ची घातलेली दिसत्ये :-)
23 Apr 2008 - 11:35 am | विदेश
कधीच टाकली होती त्या यष्टीच्या लाल फोनमधे!आत्ता व्यवस्थित बोललोय की रे!
23 Apr 2008 - 11:43 am | धमाल मुलगा
खरंच की!
बाकी ते 'त्याचा पुनर्वापर होऊ शकतो' जबरान् ! :-))
इतके दिवस होता कुठं भाऊ तुम्ही? टोल्यावर टोले हाणताय की!
मस्त!
23 Apr 2008 - 11:50 am | विदेश
टोले दिले!आपल्या विजूभाऊनीच नाही का -ठण ठण करीत बारा टोले दिलेत!
23 Apr 2008 - 7:23 pm | विजुभाऊ
शेवटी माझ्या क्रमशः लिहण्याला कंटालून विजूभाऊंनी माझ्या "राखीव कुरणात घुसखोरी" केली म्हणायची. मस्त, जबरदस्त
डॉन काका तुम्ही सांगा क्रमशः लिहीले ते चांगले की वाईट? केशवसुमार काका म्हणतात की
छ्या बॉ.... "केश्या" मेल्या तुला का त्या विजुभाऊ सरखे चहा घालून ....नाही नाही.. पाणी घालून सहा सहा सात सात भाग लिहिता येत नाहीत?.
लग्नाची तयारी काय एका दिवसात होते?
चहा पिउन ....नाही नाही.. पाणी पिउन बुचकळ्यात पडलेला विजुभाऊ
24 Apr 2008 - 10:04 am | बकुळफुले
इन्टेर्व्ह्यु कसे द्यायचे;पत्रकाराना कसे ताटकळत् ठेवायचे बोलताना मधे मधे पॊजेस कसे घ्यायचे ?किती घ्यायचे ?आपल्या इन्टेर्व्ह्यु मध्ये वादग्रस्त् विधाने कशी पेरायची हे नव्या नटाना शिकवत असतात् तुला काय वाटले नोकरी कशी मिळवावी याचे इन्टेर्व्ह्यु ?"
---------हि हि हिहि हि हि हि ख्या ख्याख्याख्या ख्याख्या
बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून त्यातुन पलिकडे पहात अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही अशी मान हलवत् म्हणाला नाही रे केशवा एवढी काही पिवळी वाटत् नाही. तुझी लिव्हर् फ़क्कड् काम् करतेय्. त्या डॊक्टर् ला अक्कल् नाही उगाच् म्हणतो कावीळ् झाली म्हणुन खरे सांगतो तुझी लघवी तेवढी काही पिवळी नाही................................................
अरे बापरे बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ हा असा असेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते .
विजुभाऊ तुमची ब्याटीन्ग जोरात चालली आहे की. लग्नाला उगाच ताटकळत बसवु नका वर्हाड्याना आता. आणि लग्नाला चंगले बुन्दीचे लाडु आणा.
हे इतके वाचुन खुषीत फुललेली...बकुळफुले
24 Apr 2008 - 7:34 pm | वरदा
पत्रिकेत लिहूया "तुमचा आहेर हाच आमचा आधार"
24 Apr 2008 - 8:41 pm | llपुण्याचे पेशवेll
वरदाताई पण मग ते धमु स्टाईल नाही वाटणार.. तिथे 'आहेर नाहीतर बाहेर' असे धमु स्टाईल वाक्य पाहीजे..
ता.क. धमालराव तुझा उल्लेख मी शक्यतो धमु असा करत नाही पण आज जरा हुक्की आली रे तुला धमु म्हणायची..
कदाचित हे तुझ्या होणार्या ज्या कुठल्या बायकोला कळेल ती कदाचित उखाणा घेताना म्हणेल
'धमुरावांचे नाव घेते......'.
मग तिला तात्या तिला भाईकाकांच्या 'दिगंबरकाका' स्टाईल नी सांगतिल "खुळी की काय तु नवर्याला धमु म्हणते. धमालराव म्हण" :))))
पुण्याचे पेशवे
24 Apr 2008 - 8:50 pm | प्रमोद देव
"आहेर आणू नये" च्या ऐवजी..... "आहेर आणून ये" ... असे चुकून (मुद्दाम) छापायचे.
:))))))))))))))
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
24 Apr 2008 - 9:14 pm | वरदा
खुळी की काय तु नवर्याला धमु म्हणते. धमालराव म्हण" :))))
ह ह पु वा
24 Apr 2008 - 10:00 pm | शितल
मी तर म्हणते आहेर स्विकारल्या वर तो छोट्या डॉन कडे द्यावा, मग तो पाकीट फाडुन पाहिल, रु.२१/- ताक, पाणी, रू.५१/- नाष्टा, रु.१०१/- शाकाहारी थाळी, रू.१५१/- शाकाहारी थाळी मागेल खाईल तेवढी, २५१/- मासा॑हारी, रु.३००/- च्या वर पेय (समजलेच असेल) आणि मासा॑हारी, रु.५००/- च्या वर तर पेय, जेवण, आहेर ही टॉवेल टोपी. रु.१०००/- मरेस पर्यत खा.
25 Apr 2008 - 7:14 am | छोटा डॉन
च्यायला आमच्याकडं कशाला आहेर ? एकदा गोष्ट माझ्याकडे आली की मी ती परत देत नाही ...
त्यामुळे लग्नानंतर हाणामार्या नको ....
आणि बाय द वे, वेळ कुणाला आहे आहेर उघडून बघायला ?
आम्ही तर मस्त आमचा घोळका जमवून आणि वर मस्त "कोंबडं [ धम्या ] ऊडालं तंगडं धरून ... " हे गाणं लाऊन धूमशान नाचणार. काय म्हणता, होता का सामिल ?
ते आहेराच झेंगाट आमह्च्याकडं नको बाबा ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
25 Apr 2008 - 2:48 am | वरदा
रु.१०००/- मरेस पर्यत खा
म्हणजे फक्त त्याच दिवशी ना? नाहीतर धमु च्या बिचार्या बायकोला करुन द्यायला सांगायचे जेवण:))))))
25 Apr 2008 - 3:08 am | शितल
.>>> म्हणजे फक्त त्याच दिवशी ना? नाहीतर धमु च्या बिचार्या बायकोला करुन द्यायला सांगायचे जेवण:))))))
आता ते धमु ठरवणार त्याला कसे मारायचे ते एका दिवसात कि पुरवुन पुरवुन (एकदम न स॑पवता)मारायचे.
25 Apr 2008 - 3:20 am | ब्रिटिश टिंग्या
धमु ठरवणार?
लग्नानंतर नवर्याला एवढे अधिकार असतात असं ऐकलं नव्हतं कधी.....
25 Apr 2008 - 7:16 am | छोटा डॉन
हाण तिच्यायला ...
बघ रे धम्या बाबा, संभाळ ...
नाहितर समर्थांसारखी पळायची तुझी तयारी असल्यास "गाडी" तयार ठेवायची जबाबदारी आपली... [ आता बाकीची मला हाणणार बहूतेक, पळा तद् माताय ]
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
25 Apr 2008 - 8:53 am | छोटा डॉन
आपल्या कडे लग्न करणार्या अभागी माणसाला "घोड्यावरून" मिरवयची पद्धत आहे.
मग झाली का त्यासाठी "घोड्याची" व्यवस्था ???
तुम्ही बसा घोड्याचर म्हणजे आम्ही नाचायला मोकळे, काय ?
जर घोड्याची व्यवस्था होत नसेल तर मला सांगा, आम्ही बर्याच बनावटीचे "घोडे" बाळगून आहोत ...
आणतो तिच्यायला त्यातला एक झक्कास पैकी ....
आता "धम्या" घोड्यावर बसल्यावर जर कुणी "घोड्यावर गाढव बसले आहे" असे म्हणाले तर मात्र तेथे "राडा" होईल., तेव्हा सावधान ...
बाकी आमच्या "चित्तरंजन कोल्हटकर" म्हणल्याप्रमाणे " आम्ही घोडा पाहिला आहे, गाढव पाहिले आहे पण घोड्यावर बसलेले गाढव पहिल्यांदाच बघू ..." [ धमु ह. घे. किंवा घेऊ नको, कसेही ]
घोडेवाला छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
25 Apr 2008 - 2:26 pm | स्वाती राजेश
आता "धम्या" घोड्यावर बसल्यावर जर कुणी "घोड्यावर गाढव बसले आहे" असे म्हणाले तर मात्र तेथे "राडा" होईल., तेव्हा सावधान ...
"घोड्यावर गाढव बसले आहे"असे नाही म्हणणार.
आम्ही "गाढवावर घोडे बसले आहे" असे म्हणू चालेल?????
3 May 2008 - 12:29 pm | शरुबाबा
आम्ही तर मस्त आमचा घोळका जमवून आणि वर मस्त "कोंबडं [ धम्या ] ऊडालं तंगडं धरून ... " हे गाणं लाऊन धूमशान नाचणार. काय म्हणता, होता का सामिल ?
एका पायावर ( तंगडीवर) तयार