देशामधे दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
आजवर अडाणी, गरीब जनता यामधे सहभागी असेल असा समज होता.
पण
पुणे स्फोट आणि मुंबई दंगलीच्या पार्श्वभूमीवर बंगलोर, हैद्राबाद येथे पोलिसांनी कारवाई केली.
त्यात अटक झालेल्यांमधे अनेक उच्चशिक्षितांचा समावेश आहे. हे अतिशय धक्कादायक आहे.
एक पत्रकार, एक डॉक्टर आणि डी आर डी ओ मधील एक शास्त्रज्ञ यामधे सामील आहेत.
त्यांच्याकडे विदेशी रायफलही मिळाली आहे.
अटक करण्यात आलेला डॉक्टर लष्कर-ए-तय्यबा सारख्या संघटनांना माणसे पुरविण्याचे,
तरुणांची भरती करण्याचे काम करीत असे.
लष्कर-ए-तय्यबा आणि तत्सम संघटनांना आजवर पाकमधून बळ मिळत होते.
पण आता त्यांना सौदीमधूनदेखील आर्थिक पाठबळ मिळते असे आढळले आहे.
मराठवाड्यात पकडलेल्या २ अतिरेक्यांना तर सौदीमधे आश्रयही मिळाला होता.
एका बाजूला भारताचे मित्र म्हणवणारे देश दुसर्या बाजूला काय कारनामे करताहेत, हे विचार करण्याजोगे आहे
२० वर्षापूर्वी काश्मीरमधेही या अशाच प्रकारांना सुरुवात झाली होती.
या सगळ्या घटना पाहता एक अजून आठवण होते.
९३ च्या बॉम्बस्फोटात सामील असणारा मेमन हादेखील सी ए होता.
बंगलोरमधे पकडलेल्यांना कैगा अणुऊर्जा प्रकल्प, कारवारातील सीबर्ड हा नाविक तळ
यावर हल्ला करावायचा होता
इतर हल्ल्यांपेक्षा हा हल्ला फार अवघड आहे. याला मोठी आर्थिक आणि लष्करी तयारी हवी.
या सगळ्याच मुळे दूरवर आणि खोलवर गेली असण्याची शक्यता आहे.
--
असे म्हटले जाते की देशभक्ती ही अतिशय नैसर्गिक भावना आहे. ती शिकवावी लागत नाही.
मग प्रश्न पडतो
शिकलेली माणसेच अशी का वागतात ?
इथेच खायचं, इथेच राहायचं, इथेच जन्मायचं आणि शेवटी याच मातीत मिसळून जायचं.
मग आयुष्यभर या देशाशी वैर का करायचं.
कळत नाही काही माणसं
जिथे खातात तिथेच का **** ?
.
प्रतिक्रिया
8 Sep 2012 - 3:13 am | अर्धवटराव
>>कळत नाही काही माणसं जिथे खातात तिथेच का **** ?
-- या "काहि" माणसांत बहुसंख्य हिंदु आहेत.
अर्धवटराव
8 Sep 2012 - 6:34 am | निनाद मुक्काम प...
पण आता त्यांना सौदीमधूनदेखील आर्थिक पाठबळ मिळते असे आढळले आहे
८० च्या दशकात अफगाण मध्ये जिहाद सुरु झाला आणि अमेरिकेच्या बरोबर सौदी कडून पैशाचा ओघ पाकिस्तानात सुरु झाला.
सौदी च्या पैशाच्या जोरावर व त्यांची कट्टरतेचे लागण लागल्याने जनरल झिया ने पाकिस्तान चे इस्लामीकरण सुरु केले. मदरशाचे तेथे पेव फुटले.
(पाकिस्तानातील ) पंजाबात लष्करे तय्याबा सारख्या संघटना सौदीच्या पैशावर उभ्या राहिल्या.
सौदी अरेबिया मधील शाही परिवारात अंदाजे १०० च्या आसपास राजकुमार आहेत व त्यांचे नातेवाईक व शाही परिवाराकडे पैसा आहे. ह्यातील काही शाही सदस्य व इतर मान्यवर जिहादी चळवळ जगभर चालू राहावी म्हणून पैशाचा ओघ पाकिस्तानात सुरु ठेवला आहे. आता पाकिस्तानात दहशतवादाचे वैश्विक दर्जाचे महाविद्यालय सुरु झाले असून अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुविख्यात ,नामांकित दहशतवादी ते निर्माण करत आहेत.
सौदी अरेबिया शी भारताने अमेरिकेच्या पाठिंब्याने अनेक मैत्रीचे ,व्यापारी करार केले आहे.
ह्यात गुन्हेगार हस्तांतरण हा महत्त्वाचा आहे.
ज्या दिवशी सौदी मधून बीड चा अतिरेकी भारतात आणल्या गेला. म्हणजे सौदी ने त्याचा पाक पासपोर्ट असतांना सुद्धा त्याला भारताच्या हवाली केले. हे पाहून पाकिस्तानी जिहादी समुदायाला मिरच्या झोंबल्या.
सौदी ला भारतीय प्रेमाचा उमाळा का आला हे सविस्तर
लवकरच लिहीन.
.
उच्च शिक्षित दहशतवादी हि गंभीर समस्या आहे. कसाब ला फासी देऊन समस्या संपणार नाही आहे, तर भारतातील मुसलमानांना पाकिस्तान मध्ये इस्लामच्या नावाने कसा रक्तरंजित संघर्ष सुरु आहे. व देश कसा मध्ययुगीन कालखंडात लोटला जात आहे.
.
8 Sep 2012 - 1:34 pm | रणजित चितळे
सहमत
वाचत आहे
प्रतिक्रीया नंतर देईन
9 Sep 2012 - 5:02 pm | आशु जोग
वाट पाहत आहोत
8 Sep 2012 - 12:50 pm | गोंधळी
http://www.esakal.com/esakal/20120907/4666469052006197302.htm
8 Sep 2012 - 9:13 pm | विनोद१८
जर आपण अल्लौद्दिन खिल्जि पासूनचा इतिहास पाहिला तर त्यान्ची मानसिकता लक्षात येइल. सम्पूर्ण जगाचे इस्लामिकरण करणे हे त्यान्चे ध्येय आहे ते लपून राहिलेले नाही किबहुना हेच आपले इतिकर्तव्य आहे, याशिवाय मुक्ति मिळ्नार नाही अशीच त्यान्ची धारणा असावी. यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असा जगाचा अनुभव आहे.
मनुष्य जितका सुशिक्शित तितकाच तो बुध्धिने विकसीत व सुसन्स्कारी असे म्हणतात परन्तु लहानपणापासून मिळालेले परधर्मअसहिश्णुतेचे बाळ्कडू व त्याला मिळणारी 'विशिष्ट' समाजमान्यता तसेच राजकारण्यानी तिकडे केलेला काणाडोळा याचा परिणाम म्हणजेच हे असले प्रकार. यामध्ये धक्कादायक ते काय ??
वाळवन्टी परन्परान्च्या दुराभिमान्यान्पासून यापे़क्शा वेगळी अपेक्शा कशी करावी ????
विनोद१८
10 Sep 2012 - 1:18 pm | विजुभाऊ
देशभक्ती ही अतिशय नैसर्गिक भावना आहे. ती शिकवावी लागत नाही.
असहमत
देशभक्ती म्हणजे राष्ट्रभक्ती नव्हे. देशभक्ती म्हणजे राज्यभक्तीही नव्हे.
भल्या बुर्याची चाड बाळगत काही वेळा देशविरोधी भूमिका घ्यावी लागते.
उदा:बिभीषण हा स्वतःच्या देशाविरुद्ध लढला नसता तर राम जिंकला नसता.
सुग्रीवाने स्वतःला राज्य मिळावे म्हणून वालीसारख्या चांगल्या शासकाविरुद्ध रामासारख्या बाहेरच्या माणसाला बोलावून कपटाने वध करवला.
शिवाजी महाराजानी अलीअदीलश: सोबत / औरंगजेबासोबत तह करार केले. सम्भाजीमहाराजाना औरंगजेबाच्या पदरी चाकर म्हणून ठेवले.
ज्या अदीलशाहीची चाकरी शहाजी महाराज बजावत होते त्याच अदेलशाही विरुद्ध शिवाजी महाराजानी बंड पुकारले होते.
इंग्रजांच्या विरोधात सुभाष चंद्रबोसानी सशस्त्र सैन्य उभे केले होते. इंग्रज राज्यकर्त्यांच्या शत्रुच्या सहाय्यास ते गेले होते.
स्वतन्त्र भारतात जयप्रकाश नारायणानी सरकारी फौजाना/पोलीसदलाला सरकारच्या विरोधात जाऊन बंड करण्याचे आवाहन केले होते
तथाकथीत देशप्रेम ही भावना लहानपणापासून केलेल्या संस्कारांमुळे( ब्रेन वॉशिंग्मुळे) तयार केलेली असते. ती मूलतःच कृत्रीम असते. आपण जेथे रहातो त्या त्या भूभागाबद्दल प्रेम वाटणे म्हणजे देशभक्ती नव्हे.
काही भावनांमुळे काही लोक काही समाजविघातक कृत्ये करतात. ते निदान वैयक्तीक फायद्यासाठी तरी करीत नाहीत.
मात्र काही जण केवळ वैयक्तीक फायद्यासाठी समाजीक संपत्ती लुबाडण्यासारखी समाजविघातक कृत्ये करतात. उदा : बेकायदा खाण उत्खनन , एखादे मंदीर/ मशीद पाडण्याचे आवाहन करून दोन समाजात दुही पाडणे ,
२जी स्पेक्ट्रम / कॉमनवेल्थ गेम्स सारखे घोटाळे करणे / शिक्षण संस्थांच्या नावाखाली भरमसाठ पैसे गोळा करणे .................... हे सर्व गुन्हे करणारे बहुतेकजण हे एका विशिष्ठ समाजातीलच आहेत.
यासर्वांनी कोणत्या प्रकारची देशभक्ती केलेली आहे ? हे सगळे उच्च शिक्षीत आणि मान्यवर आहेत याहून धक्कादायक घटना कोणती असेल?
खेदाने असे म्हणावे वाटते
आणि प्रश्न पडतो
ही शिकलेली मान्यवर माणसेच अशी का वागतात ?
इथेच खायचं, इथेच राहायचं, इथेच जन्मायचं आणि शेवटी याच मातीत मिसळून जायचं.
मग आयुष्यभर या देशाशी वैर का करायचं
10 Sep 2012 - 1:32 pm | पुण्याचे वटवाघूळ
याविषयी मला एक प्रश्न नेहमी पडतो. हिटलरच्या हत्येचा प्रयत्न झाला होता पण त्यातून हिटलर बचावला. असा प्रयत्न केलेले लोक देशभक्त की देशद्रोही? त्यांना देशभक्त म्हणणारे म्हणतील की हिटलर आपल्या देशाचे नुकसान करत आहे असे त्यांना वाटत होते आणि हिटलरला मारून देशाचे नुकसान टाळावे असे त्यांना वाटत होते. त्यांना देशद्रोही म्हणणारे म्हणतील की त्यांनी देशाच्या नेत्याची हत्या करायचा प्रयत्न केला. तेव्हा असे लोक देशभक्त की देशद्रोही? मागे २२ जून १८९७ चित्रपटावरील चर्चेत पुसटश्या सीमारेषेचा उल्लेख होता. मला वाटते अशा लोकांना देशभक्त की द्रोही म्हणावे हे पण आपण त्या सीमारेषेच्या कुठे उभे आहोत त्यावरून ठरविले जाईल. तेव्हा देशभक्त्/देशद्रोही ची सर्वमान्य व्याख्या असू शकत नाही हेच खरे.
10 Sep 2012 - 11:38 pm | आशु जोग
स्वदेशाशी गद्दारी केल्यानंतर
इतर देश तरी या लोकांची काय किंमत करतील ?
शेवटी तेही वापरून फेकून देणार
Use and Throw