दिव्य तांडव सुरू जाहले करूनी ललकार
नित्य होती वार जैसे घुमे तलवार..
वीज नभी ची लखलख करिते ढगांवरी वार
कडाडकडकड अभ्र कोसळे सोसूनी प्रहार
जलौघ बरसे वायूसंगे होऊनी बेजार
कडकड गडगड मेघ नादती करूनी चित्कार
'जलद' चालला बरसत धारा टाकीत फुत्कार
कसा जाहला हिरवाईचा त्यासी साक्षात्कार
युद्ध होते ग्रिष्माशी, तो होता ऐसा स्वार
जाती धावूनी हाक देण्या, अवनीची पुकार
रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार
मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार
जिंकले ते युद्ध ऐसे झाला जयजयकार
मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार..
- प्राजु
प्रतिक्रिया
16 Aug 2008 - 4:36 pm | इनोबा म्हणे
रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार
मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार
जिंकले ते युद्ध ऐसे झाला जयजयकार
मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार..
कविता आवडली
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
16 Aug 2008 - 4:40 pm | विसोबा खेचर
अतिशय सुरेख कविता...
सगळ्या कल्पना खूप सुंदर आहेत...
वीज नभी ची लखलख करिते ढगांवरी वार -- ही कल्पना तर क्लासच!
रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार
मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार
या ओळी सर्वात जास्त आवडल्या...
अभिनंदन प्राजू, जियो..!
तात्या.
अवांतर - 'कडकड गडगड मेघ नादती करूनी चित्कार' ह्या ओळीत मेघ 'चित्कार' करतात ही कल्पना तेवढी पटली नाही...
16 Aug 2008 - 4:55 pm | राघव१
प्राजुताई,
रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार
मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार .... हे विशेष आवडले! :)
आणि हो,
"वीज नभी ची लखलख करिते ढगांवरी वार" करितेचा २ वेळा करायचा वापर एकदाच करूनही योग्य परिणाम साधलाय. सुंदर! शुभेच्छा!!
राघव
16 Aug 2008 - 4:57 pm | आनंदयात्री
रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार
मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार
हे लैच मस्त !!
16 Aug 2008 - 6:18 pm | शितल
रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार
मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार
मस्तच.
16 Aug 2008 - 9:56 pm | अविनाश ओगले
छान आहे कविता... वेगळी.
17 Aug 2008 - 4:54 am | स्वांतसुखाय
जिंकले ते युद्ध ऐसे झाला जयजयकार
मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार..
घुमला ओंकार... एकदम मंत्रमुग्ध केले.
कवीता आवडली.
17 Aug 2008 - 7:21 am | मनीषा
आहे कविता
मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार..
सुंदर...
17 Aug 2008 - 10:19 am | श्रीकृष्ण सामंत
प्राजुजी,
अतिशय सुरेख कविता आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
17 Aug 2008 - 11:00 am | मदनबाण
जिंकले ते युद्ध ऐसे झाला जयजयकार
मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार..
हे फार आवडले..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
17 Aug 2008 - 7:53 pm | प्राजु
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Aug 2008 - 6:52 am | धनंजय
सर्व कल्पनाचित्रे छानच.