कवितेचे पुस्तक किंवा कवितेचा एखादा ब्लॉग वाचणे हा माझ्याकरता नितांतसुंदर अनुभव असतो. लहानपणी केव्हा या आनंदाची गोडी लागली ते आठवत नाही पण एक पक्के लक्षात आहे - गणितातील प्रमेय सोडविल्यावर झालेल्या शब्दातीत आनंदाची तुलना आतापर्यंत फक्त एकाच आनंदाने झाली आणि ती म्हणजे "कवितेतील सौंदर्यस्थळ" अचानक गवसणे.
खरोखर अंतःस्फुरणाने उतरलेली प्रत्येक कविता ही वाचकाच्या मनाशी सूक्ष्म संवाद साधते याबद्दल मला यत्किंचीतही संदेह नाही. नीबीड आणि वनश्रीने नटलेल्या गर्द रानवाटेवरून अनेकदा गेल्यानंतर हळूहळू त्या वाटेवरची दडलेली सौंदर्यस्थळे आपल्या लक्षात येऊ लागतात त्याप्रमाणेच बर्याच कविता या पुनर्वाचनानंतर हळूहळू उलगडू लागतात हा अनुभव आहे. जणू काही कवितेला, एखाद्या स्तोत्राला देखील सूक्ष्म"सेल्फविल" (स्वेच्छा) असते. जेव्हा तिला , आपल्यापुढे पूर्ण सौंदर्यानिशी साकार व्हावयाचे असते तेव्हाच ती साकार होते.
रामरक्षा हे स्तोत्र (कविता) बुधकौशिक ऋषींना स्वतः शंकरांनी स्वप्नामध्ये सांगीतले आणि बुधकौशिक ऋषींनी ते आठवेल तसे प्रातःकाळी लिहून काढले असा उल्लेख या स्तोत्रांत आहे. मी लहानपणापासून कितीदा तरी रामरक्षा ऐकली, पठण केली. परंतु खूप उशीरा मला या स्तोत्रांतील काही संदर्भ लागले. जसे - जिव्हां विद्यानिधी: पातु, कण्ठं भरतवंदितः, स्कंधौ दिव्यायुधः पातु या काही ओळी. माझ्या जिव्हेचे रक्षण विद्येचा ठेवा (निधी) करो यामध्ये विद्या आणि जिव्हा हा संबंध भेदक आहे. राम-भरत भेटीमध्ये रामचंद्रांनी , भरतास कडकडून मीठी मारली आणि असा हे भरतास वंदनीय श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करो हा गळाभेटीचा आणि कंठाचा अन्वय किती मनोहर आहे. माझ्या स्कंधाचे रक्षण दिव्य आयुधे (खांद्यावर धनुष्य) धारण केलेले प्रभू रामचंद्र करोत. - या प्रत्येक अवयव आणि नामाच्या जोडीमधील अन्वय (संबंध) माझ्या लक्षात आला. करौ = सीतापती: (सीतेचे पाणिग्रहण केलेले राम), शृती = विश्वामित्रप्रियः वगैरे.
तीच गोष्ट विष्णूशोडषनाम स्तोत्राची - भोजने च जनार्दनं (सर्व जनांचे पालन करणारा), विवाहे तु प्रजापतीम (प्रजेचा नाथ), युद्धे चक्रधरं देवं या ओळीत पहा युद्धात रक्षण करण्यासाठी पद्महस्त वगैरे नावाने आठवण न काढता सुदर्शन चक्रधारी रुपाची आठवण काढली आहे. प्रवासे च त्रिविक्रमम (तीन पावलांत पृथ्वी व्यापणारा), संकटे मधुसूदनम (मधु राक्षसाचा वध करणारा), कानने नारसिंहं च म्हणजे वनामध्ये रक्षण करण्यास साक्षात नरसिंह रूप आठविले आहे, पावके जलशायिनम म्हणजे अग्नीपासून रक्षण करण्यासाठी क्षीरसागरामध्ये शयन करणार्या रुपाचे चिंतन आहे. प्रत्यक नामाचा अन्वय नंतरच्या चिंतन केलेल्या विशेषणास किती भेदक चपखल लागतो आहे. हे जेव्हा लक्षात आले , तेव्हा मला एक अननुभूत आनंद मिळाला.
तीसरे उदाहरण "हनुमान चालीसा"चे. बरेच दिवस म्हणत असे आणि एके दिवशी एका ओळीचा अर्थ लागला. "कुमती निवार सुमती के संगी" - आहाहा. सुमती म्हणजे शुभ बुद्धी असलेले प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र हे कळले आणि मला अवर्णनिय आनंद झाला.
एका लक्ष्मीस्तोत्रात , देवीचा उल्लेख श्रीपतीप्रिया आहे. सहज वाचतेवेळी किंवा अन्य कामात असताना स्फुरले अरे याचे २ अर्थ होऊ शकतात श्री जी पतीची प्रिय (लाडकी) आहे किंवा ती जिला श्रीपती (विष्णू) प्रिय आहेत. आणि अवर्णनिय वाटले.
एकंदर आतपर्यंतचा काव्याच्या गोडीचा प्रवास असा आहे. लहानपणी स्तोत्रांचे बोट धरुन बाळपावले टाकलेली आहेत. खूपदा मनात येते मुलीला ही गोडी लावता येत नाही कारण ती इंग्रजी माध्यमातून शिकते, मीदेखील दूर असते आणि मन खंतावते. असो त्या आडरानात नको शिरायला. आपल्याला कधी कोणत्या कवितेच्या ओळीचा अर्थ असा स्फुरला असेल, गवसला असेल, तर तो आनंद या धाग्यावर जरुर शेअर करा.
प्रतिक्रिया
24 Aug 2012 - 3:37 pm | बॅटमॅन
आमची काही फेव्हरीट स्तोत्रे:
१. भीमरूपी महारुद्रा.
२. चर्पटपञ्जरिका आणि शंकराचार्यांची सर्व स्तोत्रे- विशेषतः देव्यपराधक्षमानमस्तुस्तोत्रम.
३. अथर्वशीर्ष.
४. रामरक्षा.
५. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते.
बाकी नंतर.
24 Aug 2012 - 4:58 pm | स्पा
आमची काही आवडती स्तोत्रे
वर दिलेली सर्व
शिवाय
रुद्र
श्री सुक्त
पुरुष सुक्त
27 Aug 2012 - 1:34 pm | परंपरा
वरील स्तोत्रे आमचीही अत्यंत फेवरिट आहेत :)
28 Aug 2012 - 5:10 am | निनाद
हे देवी मला काही मंत्र तंत्र यंत्र येत नाही. पण तू माझी भक्ती समजून घे अशी करुणा भाकणारे हे शब्द अतिशय सुंदर रितीने गायले आहेत. खाली चित्रफीत आहे. त्यानुसार स्तोत्र वाचता येईल.
देव्पराधक्षमापनस्तोत्रम्
न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहोन चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथा:।
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनंपरं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ॥१॥
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतयाविधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत्।
तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवेकुपुत्रो जायेत क्व चिदपि कुमाता न भवति ॥२॥
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहव: सन्ति सरला:परं तेषां मध्ये विरलतरलोहं तव सुत:।
मदीयोऽयं त्याग: समुचितमिदं नो तव शिवेकुपुत्रो जायेत क्व चिदपि कुमाता न भवति ॥३॥
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचितान वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषेकुपुत्रो जायेत क्व चिदपि कुमाता न भवति ॥४॥
परित्यक्ता देवा विविधविधिसेवाकुलतयामया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भवितानिरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ॥५॥
श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरानिरातङ्को रङ्को विहरित चिरं कोटिकनकै:।
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदंजन: को जानीते जननि जपनीयं जपविधौ ॥६॥
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरोजटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपति:।
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवींभवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम् ॥७॥
न मोक्षस्याकाड्क्षा भवविभववाञ्छापि च न मेन विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुन:।
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वैमृडानी रुद्राणी शिव शिव भवानीति जपत: ॥८॥
नाराधितासि विधिना विविधोपचारै:किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभि:।
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथेधत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ॥९॥
आपत्सु मग्न: स्मरणं त्वदीयंकरोमि दुर्गे करुणार्णवेशि।
नैतच्छठत्वं मम भावयेथा:क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति ॥१०॥
जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि।
अपराधपरम्परापरं न हि माता समुपेक्षते सुतम् ॥११॥
मत्सम: पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।
एवं ज्ञात्वा महादेवि यथा योग्यं तथा कुरु ॥१२॥
सुश्राव्य आणि सुस्पष्ट उच्चार!
हिंदी भाषेत संपुर्ण अर्थ येथे पाहा - http://in.jagran.yahoo.com/dharm/?page=article&category=15&articleid=62
24 Aug 2012 - 4:18 pm | सहज
कविता समजणे वरुन रामदास यांचा एक उत्तम लेख आठवला. कविता एक लांबचा प्रवास
24 Aug 2012 - 4:50 pm | शुचि
होय हा लेख खरच उत्तम आहे. लेख नव्हे मी तर म्हणेन गद्य कविताच आहे ती :)
24 Aug 2012 - 6:23 pm | नाना चेंगट
आम्हाला तर हे स्तोत्र आवडते ब्वा !
24 Aug 2012 - 6:29 pm | शुचि
आई ग!!!! मेले, वारले, खपले. नाना सुपर्ब!!!!!!
24 Aug 2012 - 6:39 pm | sagarpdy
टोप्या बंद!
24 Aug 2012 - 11:33 pm | बॅटमॅन
खपल्या गेलो आहे. पाय लागू गुर्जी ____/\____
24 Aug 2012 - 6:31 pm | रेवती
माझी आवडती स्तोत्रे, गणपती अथर्वशीर्ष, रामरक्षा, हनुमान चालिसा. त्यातही रामरक्षा म्हणायला सुरुवात केली थांबू नये असे वाटते. अर्थ अर्थातच सगळ्या स्तोत्रांचे माहित नाहीत. ;)
24 Aug 2012 - 6:47 pm | शुचि
रेवती तू या साईटवर जाऊन बघ. एक तर मी आतापर्यंत ऐकलेली ध्वनी रुपातील सर्वात गोड रामरक्षा तुला तेथे सापडेल. शिवाय ती फाइल डाऊनलोड करता येते :)
अवांतर - सहसा रामरक्षेचा प्रसार महाराष्ट्राबाहेर झालेला ऐकीवात नाही . इतकं गोड स्तोत्र पण का कोण जाणे :( ....
24 Aug 2012 - 6:48 pm | रेवती
आभार.
24 Aug 2012 - 6:45 pm | पुण्याचे वटवाघूळ
मी देवदेव करणारा अजिबात नाही . तरीही अथर्वशीर्शातील "त्वं ब्रम्हा स्त्वं, विष्णूस्त्वं, रूद्रस्त्वं, इन्द्रस्त्वं...." ही ओळ म्हणायला त्यातल्या ट्युनिंगमुळे खूप आवडते.
24 Aug 2012 - 6:52 pm | शुचि
मला ॐ कर्णेभि: .... हा शांती मंत्र आवडतो. फार सुंदर अर्थ आहे.
24 Aug 2012 - 6:46 pm | पैसा
कवितांबद्दल तर खूपच लिहिण्यासारखं आहे. पण बाकी सार्यांनी स्तोत्रांबद्दल लिहिलंय म्हणून माझी आवडती स्तोत्रं लिहिते. रामरक्षा आणि मधुराष्टक.
24 Aug 2012 - 6:50 pm | शुचि
ज्योती अश्विनी भीडे ने टाळ मृदुंगाच्या तालावर गायलेले मधुराष्टक ऐकले आहेस का? निव्वळ अप्रतिम!!! अत्यंत कर्णमधुर आहे. हे पहा खाली आहे लिन्क -
24 Aug 2012 - 6:55 pm | पैसा
खरंच मधुर आहे!
28 Aug 2012 - 4:53 am | निनाद
पंडित जसराज यांनी गायलेले मधुराष्टकम ऐका.
अगदी हलके सुरुवात होऊन पुढे इतका सुंदर ठेका येतो!
संपले तरी परत ऐकावेसे वाटते.
याचे अजून एक थोड्याश्या निराळ्या प्रकारे गायलेले अजून एक गायन तूनळीवर आहेच.
इतक्या सुंदर रचनेसाठी श्री वल्लभाचार्यांचे किती आभार मानावेत...?
28 Aug 2012 - 1:43 pm | पैसा
धन्यवाद!
8 Sep 2012 - 4:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुव्यांबद्दल धन्स.
-दिलीप बिरुटे
24 Aug 2012 - 9:07 pm | राही
आपल्याकडे तर रामरक्षा इतकी लोकप्रिय आहे की मंगलाष्टकांसाठी रामरक्षेतले श्लोक वापरतात. खरंच सुंदर स्तोत्र आहे.
बाकी आवडती स्तोत्रं म्हणजे चर्पटपञ्जरिका, द्वादशपञ्जरिका,महिषासुरमर्दिनी, मधुराष्टक, श्रीसूक्त. (हे तर फारच आवडते.) आरत्यांमध्ये ओवाळू आरती मदनगोपाळा जर व्यवस्थित चालीवर म्हटली गेली तर.
24 Aug 2012 - 10:28 pm | सुधीर
http://www.youtube.com/watch?v=yqfwHEgaByY
पहिल्यांदा वाचलं तेंव्हा जिभेचे तुकडे पडतीलसं वाटलं, म्हणून नेटवर शोधून श्रवणभक्ती केली. सुश्राव्य आहे त्यामुळेच पाठ झालं. त्यातलं शेवटचं कडव खासच वाटतं. अगदी हाणामारीच्या चित्रपटातल्या क्लायमॅक्स सारख. :)
राजभय चोरभय परमंत्र परयंत्र परतंत्र परविद्याश्छेदय छेदय
स्वमंत्र स्वयंत्र स्वतंत्र स्वविद्याः प्रकटय प्रकटय
सर्वारिष्टान्नाशय नाशय
सर्वशत्रून्नासय नाशय
असाध्यं साधय साधय
हुं फट् स्वाहा |
28 Aug 2012 - 5:36 am | निनाद
सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होऊ दे, असे म्हणणारे हे स्तोत्र भारी आहे.
एक्दम पावरबाज!
आपल्याला आवडले... म्हणण्याचा प्रयत्न करणार.
धन्यवाद!
24 Aug 2012 - 10:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वाध्यायपरिवारात मी अनेक स्तोत्रे मोठ्या आवाजात पहाटेच्या प्रभातवेळी म्हणली आहेत.
आनंद मिळायचा, गेले ते दिवस उरली ती आठवणीतली स्तोत्रे.
श्रीपांडुरंगाष्टकम.
महायोगपीठे तटे भीमरथ्या
वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै:
समागत्य तिष्ठंतमानंदकंदं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्
श्री मधुराष्टकम
अधरं मधुरं वदनं मधुरं
नयनं मधुरं हसितं मधुरम
हदयं मधुरं गमनं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम.
भवान्यष्टकम
न तातो न माता न बन्धुर्न दाता
न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता
न जाया न विद्या न वृत्तिर्ममेव
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि.
-दिलीप बिरुटे
(धार्मिक)
28 Aug 2012 - 5:43 am | निनाद
श्री मधुराष्टकम पं. जसराजांनी मस्त गायलं आहे.
फार छान वाटते ते ऐकायला...
भवानि अष्टकम हे ही आदि शंकराचार्य लिखित
मला पुण्य माहित नाही की तीर्थे नाहीत माहिती .
न व्रते माहिती न मुक्ती माहिती.
मला तर फक्त तुझी भक्ती माहिती असे सांगणारे
न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं
न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित्
न जानामि भक्तिं व्रतं वापि मातर
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि...
येथे ऐकले, आवडले.
25 Aug 2012 - 9:07 am | चौकटराजा
मी दहाएक वर्षाचा असताना मी गीतेचा पंधरावा अध्याय पाठ केला. व माझ्या मामाला घडाघडा म्हणून दाखविला. मामाने विचारले यातील किती ओळींचा अर्थ समजावून घेतलास . माझे उत्तर अर्थातच एकही नाही असेच होते. मामा म्ह्णणाला "व्यर्थ आहे मग हे सारे ! " इतक्या लहान वयात. मी एका गोष्टीची खूणगाठ मनात बांधली. प्रत्येक गोष्टीत अर्थ दिसत असेल तरच स्वीकारायची. स्तोत्रे एक स्वर ताल याचा
आनंद देणारी असतातच पण ती समजून घेतली नाहीत तर" अचपळ टळटळ मळमळ पळपळ " अशा
कवितांइतपतच ती आनंद देणारी असतात.
25 Aug 2012 - 3:25 pm | सस्नेह
संस्कृत श्लोकांच्या बाबतीत वाचलेली एक गोष्ट आठवली.
एका पंडिताने आपल्या मुलाकडून १६ वर्षाचा होईपर्यंत सर्व वेद, उपनिषदे, श्रुती, स्मृती, टीका, भाष्ये इ. मुखोद्गत करवून घेतले. १६ वर्षाचा झाल्यावर मुलाने विचारले, 'बाबा, यांचा अर्थ तुम्ही मला नाही शिकवला ?'
पंडित म्हणाले, 'मुला, यांचा अर्थ मी हयातभर शोधतो आहे. पण अजुनी प्रत्येक वेळा म्हटले की नवा अर्थ मनात उमटतो. आता तुला सर्व मुखोद्गत झाले आहे.अर्थ शोधायला संपूर्ण आयुष्य तुझ्यापुढे पडले आहे.'
25 Aug 2012 - 9:09 pm | कलंत्री
मामाने नकळतच आपल्या आवडीला प्रोत्साहन देण्याऐवजी त्या आवडीचा संकोचच केला असे मी म्हणेन. जगात प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे असा हट्ट का बरे?
प्रत्येक गोष्ट प्रत्येक टप्प्यावर आपोआपच होत असते असा भाव असलेला बरा.
26 Aug 2012 - 7:50 am | चौकटराजा
जगात प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे हा आग्रह नाही व ते अशक्य ही आहे पण समजून घेणे यातील
आनंद काही वेगळाच म्हणूनच म्हणतात ना एखादी तरी ओवी अनुभवावी !
मामाने उलट एक नवी दृष्टी लहान वयातच दिली. तरीही संगणक क्षेत्रात गेल्यावर जे खाली पडले की फुटते
ते हार्डवेअर व फुटत नाही ते सॉफटवेअर ही माझी समज जवळ जवळ दोन वर्षे होती. ४ स्ट्रोक एंजिन म्हणजे दोन स्ट्रोक असलेले डबल सिलिंडरचे एंजिन हा समज ऑटो वर्कशॉप मधील माझ्या एका मित्राचा होता.
संत ज्ञानदेवानी तर या " समजण्या" चा आग्रहासाठी आपली अलौकिक ग्रंथरचना केली ना ?
26 Aug 2012 - 6:28 pm | कलंत्री
तुमच्याच वयाचा असताना मी जलगांवहुन रेल्वेहुन येत असताना माझ्याबरोबत अंदाजे ५० वयाचे एक सहप्रवासी होते. गप्पा चालु असताना मी बोललो की मला गीता / ज्ञानेश्वरी समजत नसेल तर का बरे वाचावी? त्यावर त्यांनी लगेच सांगीतले की आपण आता चाललो आहे आणि प्रत्येक अंतर आपल्याला समजत नाही, आपण फक्त येणार्या स्थानकाची नावे लक्षात ठेवतो / वाट पाहतो. तसेच आपली धर्मग्रंथे वाचताना वाचत जा वाचत जा कधीतरी माऊली आपल्याला नक्कीच समजावुन सांगेन.
तुमच्या मामानी वाचत जा आणि समजावुन पण घेत जा असा सल्ला द्यायला हवा होता. तुम्हाला पाठातर आणि अवगतहोणे या दोघाचा नक्कीच फायदा झाला असता असे मला वाटते.
जमल्यास मामांना हे एकदा परत ऐकवा आणि आता त्यांची प्रतिक्रिया काय असेल ते गंमत म्हणून समजून घ्या.
27 Aug 2012 - 1:05 pm | शुचि
किती समर्पपक दाखला दिलात कलंत्री साहेब. आपला प्रतिसाद नितांत आवडला.
27 Aug 2012 - 5:31 pm | चौकटराजा
मामांचा विरोध केवळ पाठांतरास होता. ज्या व्याक्तिचा बुध्यांक केवळ ५२ आहे. ( माझीच मुलगी) तिला गीतेतील अध्यायांसह अनेक स्तोत्रे पाठ आहेत. मला जितकी येतात त्यापेक्षा तिचा साठा जास्तच ! वाचणे व आकलन करून घेणे व पाठ करणे यात मूलभत फरक आहेच . स्वर व लय याचा आनंद ही मुलगी घेउ शकते पण दोन अधिक दोन म्हणजे चार का होतात ? याचा ज्ञानानंद ती घेउ शकत् नाही.
ज्ञानासाठी पाठांतर काहीच प्रमाणात आवश्यक असते. पण आकलनाच्या आनंदाची पातळी काही औरच.
वर मूळ खाली फांद्या असा हा वेदाचा अजब वृक्ष आहे ज्यात " छंदाची " पाने त्या शाखांना फुटली आहेत.
हे कळणे जास्त सुंदर नाही का ?
8 Sep 2012 - 5:23 pm | दादा कोंडके
संस्कृत श्लोकांचा अर्थ माहित नसेल तर पाठ असण्यात काहीच कौतुक नाही. त्या पेक्षा देवांचं कोडकौतुक असलेल्या मराठी आरत्या पाठ केलेल्या काय वाईट? चार ठिकाणी पूजा सांगून पोट तरी भरता येतं.
27 Aug 2012 - 11:15 am | निनाद
अरेरे!
25 Aug 2012 - 9:32 pm | टिवटिव
रावणरचित स्तोत्रे शिवतांडव स्तोत्र अत्यंत सुंदर आहे...
27 Aug 2012 - 1:03 pm | शुचि
अगदी.अतिशय सुनाद पूर्ण असे हे स्तोत्र सुश्राव्य आणि ऑफबीट आहे.
28 Aug 2012 - 5:54 am | निनाद
शिवताण्डवस्तोत्राची रचना आवेशपूर्ण आहे.
लताभुजङ्गपिङ्गलस्फुरत्फणामणिप्रभा
कदम्बकुङ्कुमद्रवप्रलिप्तदिग्वधूमुखे ||
मदान्धसिन्धुरस्फुरत्त्वगुत्तरीयमेदुरे
मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि ||
ललाटचत्वरज्वलद्धनञ्जयस्फुलिङ्गभा
निपीतपञ्चसायकं नमन्निलिम्पनायकम्||
सुधामयूखलेखया विराजमानशेखरं
महाकपालिसम्पदेशिरोजटालमस्तु नः ||
हे खास आवडले
हे रावण लिखित आहे?
वाटते तर शंकराचार्यांच्या शैलीचे.
काही अजून माहिती मिळेल?
25 Aug 2012 - 9:43 pm | तर्री
रामरक्षा सगळ्या कुटुंबांनी एकत्र म्हणणे हा ऐक सुखद अनुभव आहे. रामचरित्र , संस्कृत भाषा आणि कविता अशी तिहेरी मैफल आहे ती !
मला देवे ऐकायला खूप आवडतात. पाठ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अर्थ फार समजत नाही पण पाथांताराची मजा काही औरच.
लहानपणी घरी जेवण्याआधी "त्रिसुपर्ण" म्हणत असत. गेल्या कित्ती वर्षात ऐकले नाही.
त्रिसुपर्ण आणि नैवाध्याचे जेवण हया साठी आत्मा अत्रुप्त !
26 Aug 2012 - 11:32 am | चैतन्य दीक्षित
तर्री...
अहाहा, काय आठवण करून दिलीत.
केळीच्या पानांवर गरम गरम वाढणं चालू आहे, आणि तिकडे ब्रह्मवृंद
'ये ब्राह्मणास्त्रिसुपर्णं पठन्ति | ते सोमं प्राप्नुवन्ति | आ सहस्रात्पङ्क्तिं पुनन्ति||' म्हणताहेत.
त्या वातावरणाची मजाच न्यारी. त्रिसुपर्ण मीही ऐकले नाही कित्येक वर्षात :(
26 Aug 2012 - 7:51 am | अप्रतिम
१.शिवमहिम्न.
२.गंगालहरी
३.श्रीसूक्त
४.पुरुषसूक्त
५.चर्पट्पंजरी
26 Aug 2012 - 11:38 am | चैतन्य दीक्षित
शिवमहिम्नाची जी फलश्रुती आहे त्यातला
'असितगिरिसमं स्यात्कज्जलं सिन्धुपात्रे- मेरूपर्वताइतकं काजळ समुद्रात मिसळून त्याची शाई केली-
सुरतरुवरशाखालेखनीपत्रमुर्वीं- कल्पवृक्षाच्या फांदीची लेखणी केली आणि पृथ्वी हा कागद समजला-
लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं- अशा कागदावर सरस्वतीने जरी सर्वकाळ तुझं गुणगान लिहायचं म्हटलं-
तदपि तव गुणानामीश पारं न याति |- तरीही तुझे गुण संपणार नाहीत...
हा श्लोक फार आवडीचा आहे.
27 Aug 2012 - 1:24 pm | शुचि
हरिस्ते साहस्त्रं कमल बलिमाधाय पदयो:
यदेकोने तस्मिन निजमुदहरकमलनेत्रम
गतो भक्तुद्रेकः परिणमतिमसौ चक्रवपुषः
त्रयाणां रक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम
सुदर्शन चक्राच्या जन्मोद्भवाचा हा श्लोक फार फार आवडतो.
साक्षात शिव दुरीतसंहारकारण हेतु "सुदर्शन चक्र" रुपे हरीच्या हस्ते स्थित आहेत. किती मनोहर हरीहर संबंध म्हणावा हा.
26 Aug 2012 - 11:17 am | ज्ञानराम
!!श्रीमनाचे श्लोक !!
मनाची शते ऐकता दोष जाती!
मतीमंद ते साधना योग्य होती !
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी !
म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी !!२०५!!
26 Aug 2012 - 1:45 pm | शुचि
करुन दिलीत ..... "व्यावहारीक शहाणपण" असलेले हे श्लोक खूपच आवडतात.
27 Aug 2012 - 11:09 am | निनाद
वा सुंदर धागा!
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते
हे माझेही आवडते स्तोत्र आहे.
अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते ॥
गिरिवरविंध्यषिरोधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।
भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते
जयजय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते॥ १॥
सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि धुर्मुखमर्षिणि हर्षरते
त्रिभुवनपोषिणि शंकरतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते ।
दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणिदुर्मदशोषिणि सिन्धुसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २॥
अयि जगदम्ब मदम्ब कदम्बवन प्रियवासिनि हासरते
शिखरिशिरोमणि तुंगहिमालय शृंग निजालय मध्यगते
मधुमधुरे मधुकैतभभंजिनि कैटभभञ्जिनि रासरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥३॥
अयि शतखण्ड विखण्डितरुण्ड वितुण्डितशुण्ड गजाधिपते
रिपुगजगण्ड विदारणचण्ड पराक्रम शुण्ड मृगाधिपते।
निजभुजदण्ड निपातितखण्ड विपतितमुण्ड भटाधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥४॥
अयि रणदुर्मद शत्रुवधोदित दुर्धरनिर्जर शक्तिभृते
चतुरविचार धुरीणमहाशिव दूतकृत प्रमथाधिपते ।
दुरितदुरीह दु्राशयदुर्मति दानवदूत कृतान्तमते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ५॥
अयि शरणागत वैरिवधूवर वीरवराभय दायकरे
त्रिभुवन मस्तक शूलविरोधि शिरोधिकृतामल शूलकरे।
दुमिदुमितामर दुन्दुभिनाद महोमुखरीकृत तिग्मकरे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥६॥
अयि निजहुङ्कृतिमात्र निराकृत धूम्रविलोचन धूम्रचते
समरविशोषित शोणितबीज समुद्भव शोणित बीजलते।
शिवशिव शुम्भ निशुम्भमहाहव तर्पित भूत पिशाचरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ७॥
धनुरनुसङ्ग रणक्षणसङ्ग परिस्फुरदंगनटत्कटके
कनक पिशंग पृषत्कनिषंगरसद्भट शृङ्ग हतावटुके।
कृतचतुरंग बलक्षितरंग घटद्बहुरंग रटद्बटुके
जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥८॥
जय जय जप्यजये जय शब्दपरस्तुति तत्पर विश्वनुते
भण भण भिन्जिमि भिंक्रतनूपुर सिंजितमोहित भूतपते ।
नटितनटार्ध नटीनटनायक नाटितनाट्य सुगानरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥९॥
अयि सुमन: सुमन: सुमन: सुमन: सुमनोहर कान्तियुते
श्रितरजनी रजनी रजनी रजनी रजनीकर वक्त्र वृते ।
सुनयनविभ्रमर भ्रमर भ्रमर भ्रमर भ्रमरधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१०॥
सहितमहाहव मल्लमतल्लिक मल्लितरल्लक मल्लरते
विरजितवल्लिक पल्लिकमल्लिकभिल्लिकभिल्लक वर्गवृते।
सितकृतफ़ुल्ल समुल्लसितारुणतल्लज्पल्लव सल्लल्लिते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ११॥
अविरलगण्डगलन्मदमेदुर मत्तमतङ्गज राजपते
त्रिभुवन भूषण भूतकलानिधि रुपपयोनिधि राजसुते।
अयि सुदतीजन लालसमानस मोहनमन्मथ राजसुते
जय जय हे महिसासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १२॥
कमलदलामल कोमलकान्ति कलाकलितामल भाललते
सकलविलास कलानिलयक्रम केलिवलत्कल हंसकुले ।
अलिकुल संकुल कुवलय मण्डल मौलिमिलद्र्कुलालिकुले
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १३॥
करमुरलीरववीजित कूजित लज्जितकोकिल मञ्जुमते
मिलितपुलिन्द मनोहर गुञ्जित रञ्जितशैल निकुञ्जगते ।
निजगुणभूत महाशबरीगण सद् गुणसंभृत केलितले
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१४॥
कटितटपीत दुकूलविचित्र मयूखतिरस्कृत चन्द्ररुचे
प्रणतसुरासुर मौलिमणिस्फुरदंशुलसन्नख चन्द्ररुचे।
जितकनकाचल मौलिपदोर्जित निर्भरकुंजरकुम्भकुचे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १५॥
विजित सहस्रकरैक सहस्रकरैक सहस्रकरैकनुते
कृतसुरतारक संगरतारक संगरतारक सूनुसुते।
सुरथसमाधि समानसमाधि समाधिसमाधि सुजातरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१६॥
पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनंसशिवे
अयि कमले कमलानिलये कमलानिलय: स कथं न भवेत् ।
तव पदमेव परंपदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१७॥
कनकलसत्कल सिन्धुजलैरनु सिंचिनुतेगुण रंगभुवं
भजति स किं न शचीकुचकुम्भ तटीपरिरम्भ सुखानुभवम् ।
तव चरणं शरणं करवाणि नतामरवाणि निवासि शिवं
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १८॥
तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननु कूलयते
किमु पुरुहूत पुरीन्दुमुखी सुमुखीभिरसौ विमुखीक्रियते ।
मम तु मतं शिवनामधने भवती कृपया किमुतक्रियते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१९॥
अयि मयि दीनदयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे
अयि जगतोजननी कृपयासि यथासि तथाऽनुमितासिरते ।
यदुचितमत्र भवत्युररी कुरुतादुरुतामपाकुरुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २०॥
॥श्रि दुर्गा गायत्रि॥
ॐ कात्यायनाय विद्महे कन्यकुमारि धीमहि ।
तन्नो दुर्गि: प्रचोदयात ॥
येथे ऐकता येईल.
27 Aug 2012 - 11:25 am | बॅटमॅन
अयि क मले क मलानि लये क मलानि लय: स कथं न भवेत् ।
न ज ज ज ज ज ज ल ग |
वृत्त कोणतं आहे बरं हे??
29 Aug 2012 - 7:17 am | निनाद
हे वृत्त अक्षरगण विभागातील मंदारमाला ((किंवा सुमंदारमाला) वृत्ताच्या जवळ जाते का?
त्यात अनुक्रमे २२/२३ अक्षरे असतात पण यात २४ आहेत :(
शंकराचार्य विरचित असे शेवटी आहे...
29 Aug 2012 - 6:28 pm | बॅटमॅन
यात २३ अक्षरे आहेत. मंदारमालेत २२ तर सुमंदारमालेत २३ असतात पण मंदारमालेत ७ वेळा त गण व नंतर एक गुरू तर या सर्व अॅरेंजमेंटच्या आधी एक लघू लावला की सुमंदारमाला होते. ज गणाचे इतके बाहुल्य असलेले वृत्त मला माहिती नाही.
29 Aug 2012 - 8:16 pm | मेघवेडा
साता 'त'कारीच मंदारमाला, गुरू एक त्याच्याहि अंती वसे! :)
>> ज गणाचे इतके बाहुल्य असलेले वृत्त मला माहिती नाही.
मात्रा मोजल्या तर पादाकुलकाचं एक्स्टेन्सशन वाटतं. पण अक्षरगणवृत्त आहे खरं.
27 Aug 2012 - 1:07 pm | शुचि
हे स्तोत्र अवघड आहे खरे पण ठाशीव शब्दोच्चारांमुळे छान वाटते.
28 Aug 2012 - 4:44 am | निनाद
ठाशीव शब्दोच्चारांमुळे छान वाटते.
आणि गायन करणार्यांच्या खास हेल काढण्याने आणि क्षणिक विरामामुळे अजूनच मजा येते.
27 Aug 2012 - 1:19 pm | नंदन
मंत्रपुष्पांजली कदाचित काटेकोरपणे स्तोत्रांत बसणार नाही. पण त्याबरोबर 'ॐ गणानाम् त्वा गणपतिं हवामहे' आणि श्री वेंकटेश्वर सुप्रभातम्.
27 Aug 2012 - 1:51 pm | शुचि
वेंकटेश्वर सुप्रभातम फारच मधुर आहे. माझे आवडते काशीविश्वनाथ सुप्रभातम. गंमत म्हणजे - अन्नपूर्णा, मणिकर्णिका, धुंडीराज, काशीपुरी या सार्यांचे सुप्रभात करुन झाल्यावर मग शेवटी शंकरांचे सुप्रभातम आहे. सार्यांनी जणू आधी उठून सेवेस सज्ज व्हावे - हा माझा कयास आहे. मी जर फारच "बिटवीन द लाईन्स" वाचत असेन तर जरुर सांगावे. : (
27 Aug 2012 - 4:09 pm | तर्री
देवी अहिल्याबाई सिनेमा मध्ये कलापिनीबाईनी म्हटले आहे.
27 Aug 2012 - 4:44 pm | बॅटमॅन
कॉलिंग खुशितै.
27 Aug 2012 - 5:05 pm | शुचि
संस्कृत डॉक्युमेंट्स वर नर्मदाष्टक आहे.
27 Aug 2012 - 7:30 pm | निशदे
अथर्वशीर्ष माझेही अत्यंत आवडते........
शिरडीच्या साईबाबांच्या आरतीत शेवटी...... "सदा सत्स्वरूपं, चिदानंदकंदम.... " हेदेखील अत्यंत गोड...... विशेषतः आरतीचा सगळा खणखणाट संपून केवळ ते स्वर कानावर पडू लागताच खूप शांत वाटते....
28 Aug 2012 - 11:30 am | कवितानागेश
वाचनखूण साठवली आहे.
मला http://www.youtube.com/watch?v=0ifQJv22G90 इथली गायलेली हनुमान चालिसा फार आवडते.
28 Aug 2012 - 1:09 pm | सृष्टीलावण्या
मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं । न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः। चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। १ ।।
न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुः । न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः।
न वाक्पाणिपादम् न चोपस्थपायु । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। २ ।।
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ । मदो नैव मे नैव मात्सर्यभावः।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ३ ।।
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं । न मन्त्रो न तीर्थो न वेदा न यज्ञ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ४ ।।
न मे मृत्युशंका न मे जातिभेदः । पिता नैव माता नैव न जन्मः।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ५ ।।
अहं निर्विकल्पो निराकार रूपो । विभुत्वाच सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्।
न चासङ्गत नैव मुक्तिर्न बन्धः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ६ ।।
28 Aug 2012 - 2:29 pm | मैत्र
शुचितै,
इतका सुंदर धागा काढल्याबद्दल आधी आभार.
अनेक स्तोत्रं आवडीची आहेत. पण वर म्हटल्याप्रमाणे एखाद्या शांत संध्याकाळी घरातल्या सर्वांनी निरांजन आणि उदबत्ती लावून रामरक्षा म्हणण्यासारखा निरामय आनंद नाही.
अगदी आयुष्याचा भाग झालेलं स्तोत्र म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. स्थळ काळ वेळ कसलंही बंधन न बाळगता सहजपणे जे मनातून बाहेर येतं ते अथर्वशीर्ष. गणेशाची अनेक उत्तम स्तोत्रं आणि स्तवनं आहेत. पण हे खरोखर 'शीर्ष' आहे.
शंकर अभ्यंकरांची 'शिवस्तुती' ची अतिशय अप्रतिम कॅसेट होती. आता सीडी मिळत असावी. इतका गोड आणि तरीही बेसचा आवाज, सुंदर ताल आणि लय. त्यातलं सगळ्यात आवडणारं स्तोत्र म्हणजे वेदसार शिवस्तव.
पशुनां पतिं पापनाशं सुरेशं गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यम |
जटाजूटमध्ये स्फुरद्गांग्वारिं महादेवमेकं स्मरामि स्मरारिम ||
वर इतरांनी उल्लेख केलेली चिदानंदरुपं शिवोहम, गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी आणि अन्नपूर्णास्तोत्रं इ. अनेक स्तोत्रं या शिवस्तुती कॅसेट सीडी मध्ये आहेत.
पंडित जसराज यांनी अनेक स्तोत्रं अजरामर केली आहेत - गोविंद दामोदर माधवेति, मधुराष्टकम, कस्तुरीतिलकम इ.
मराठी मध्ये सगळ्यात आवडणारे म्हणजे अथर्वशीर्षाइतकेच मनात असलेले समर्थ रामदासस्वामींचे मनाचे श्लोक.
सकाळी प्रसन्न वेळी मनाला शांत तरीही योग्य पद्धतीने वागण्याचा, कर्तव्याचा 'कर्मयोग' सांगणारे श्लोक.
तितकेच रामरक्षेप्रमाणे दिवा लावल्यावर - करूणाष्टकांचे सगळे शब्द आणि श्लोक "अनुदिनी अनुतापे" का कुणास ठाऊक सगळा अहंकार कमी करतात.
सज्जनगडावर नित्य प्रार्थनेचा भाग असलेली 'कल्याण करी रामराया' ही आळवणी अनेक दिवस मनात घोळत राहते.
http://www.samarthramdas400.in/eng/download_aud.php इथे गडावरची बहुतेक सर्व स्तोत्रं नित्य प्रार्थना आहेत, चारुदत्त आफळे यांच्या आवाजात.
आणि हो आंध्राशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे अर्थात सुब्बलक्ष्मींच्या आवाजातलं वेंकटेश सुप्रभातम ही तितकंच प्रिय आहे. मूळ पद्धती मध्ये ते सलग इतर दोन स्तोत्रांसह म्हटलं जातं.
28 Aug 2012 - 3:19 pm | जयनीत
धन्यवाद हा प्रवास शेअर केल्या बद्दल.
लेखा सोबतच प्रतीसादतील स्तोत्रे सुद्धा साठवून ठेवण्या योग्य.
29 Aug 2012 - 7:49 pm | Pearl
धागा आवडला. खूप छान लिंक्स मिळाल्या.
धन्यवाद.
29 Aug 2012 - 8:47 pm | मेघवेडा
झकास! स्तोत्रे, कविता, गाणी हा अत्यंत आवडीचा विषय आहे. संध्याकाळी खेळून दमून घरी आल्यावर आंघोळ करून देवापुढं बसून म्हटलेली रामरक्षा/भीमरूपी असो, की मुंजीनंतर मे महिन्यात आजोळी असताना पहाटे उठून आजोबांकडून घेतलेली पुरूषसूक्त, श्रीसूक्त, शिवमहिम्नादिंची संथा असो, शाळेत/घरी जोरजोरात घोकत पाठ केलेल्या कविता नि सुभाषितं असोत, की आजोबांसोबत केलेली नाट्यगीतांची पारायणं असोत, ज्यात लय आहे त्या गोष्टींचा आपल्याला तर ब्वॉ ल्हानपणापासूनच नाद आहे! ;) आणि म्हणूनच महर्षी वेदव्यासांपासून समर्थ, तुकोबा, ज्ञानोबांपर्यंत ते केशवसुत, बोरकर, कुसुमाग्रजांपासून पाडगांवकरांपर्यंत, मास्टर दीनानाथ, पंडित अभिषेकी, सुमनताईंपासून ते अजित कडकडे, सुरेश वाडकरांपर्यंत समस्त मंडळी म्हणजे अगदी दैवी अवतारच वाटत आलेली आहेत.
अंधार पडू लागलाहे, आई पोळ्या लाटते आहे, घरात इतर कुणीच नाही. आणि मी तिच्या पुढ्यात बसून रामरक्षा म्हणतोय. किती विलक्षण वाटायचं. सगळ्या जगाशी संपर्क तुटल्यासारखं. तेवढ्या काळापुरते श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, भरत, हनुमान व त्याची समस्त वानरसेना, सुग्रीव, जनक नि चक्क वाल्मीकिही तिथं माझ्याजवळ येऊन बसलेतसा भास मला कित्येकदा झालेला आहे. तीच गत आजोबांकडून संथा घेताना. पहाटे तांबडं जरा कुठे फुटू लागलेलं आहे, घरातली मंडळी अजून उठतच आहेत, तोच थंडगार पाण्यानं न्हाऊन अंगणात येऊन तुळशीसमोर बसून आजोबांचं खर्जातलं "श्री सहस्रशीर्षा: पुरूषः सहस्राक्षः सहस्रपात्" ऐकलं की मी तडक वेद/पुराणकाळात पोचलोच! शेजारून वाहणार्या पाटाच्या पाण्याची गाज आणखी वातावरण निर्मिती करे. ते कोणीतरी वेदाध्यायी महर्षी आणि मी गुरूगृही आलेला बटू असंच चित्र माझ्या डोळ्यांसमोर असे.
याबरोबरच आणखी एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आरत्या! हे तर आणखी विलक्षण प्रकरण! असो. खूप दिवसांनी बर्याच जुन्याजुन्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यु शुचि. :)
30 Aug 2012 - 12:18 am | बॅटमॅन
मस्त प्रतिसाद!!!
29 Aug 2012 - 11:48 pm | आर्य
सांगलीला असताना स्तोत्रम नावाच्या संग्रहातील गाणी आणि श्लोक एकाला मिळाले
आज १० वर्षांनी दे खील त्या संगीताची आणि शंकराचार्यांच्या रचनाची गोडी अवीट वाट्ते .
सहस्रनामतल्या श्लोकांचे व्याकरण आणि अर्थ समजल्यावर खरी मजा येते
3 Sep 2012 - 10:00 am | निनाद
संस्कृत स्तोत्रांचे लेखन शुद्ध करून देऊ शकेल असा कुणी जाणकार आहे का?
3 Sep 2012 - 6:18 pm | बॅटमॅन
आहेत की बरेच जण. धनंजय हे या विषयातले मला माहिती असलेले तज्ज्ञ इथे मिपावरदेखील वावरतात. शुद्धलेखनाबरोबरच शुद्ध उच्चारांबद्दलदेखील त्यांचा गायडन्स घेण्यासारखा आहे.
4 Sep 2012 - 7:23 am | निनाद
सध्या त्यांना कार्यबाहुल्य आहे असे कळते.
12 Feb 2013 - 4:01 pm | प्रसाद गोडबोले
मस्तच !!
आमचे आवडते स्तोत्र - एकश्लोकी - शंकराचार्य ! एका श्लोकात सगळं तत्त्वज्ञान ..!!
इथे पहा http://sanskritdocuments.org
जय हो
12 Feb 2013 - 10:06 pm | तर्री
http://www.khapre.org/
हा एक अनमोल ठेवा मला काही दिवसापूर्वी गवसला ! हया धाग्याच्या वाचकांना रुचेल ही आशा .
12 Feb 2013 - 10:08 pm | शुचि
होय खजिना आहे.
12 Feb 2013 - 11:25 pm | क्रान्ति
म्हणजे कुबेराचं भांडार आहे सगळ्या दुव्यांसह आणि प्रतिसादांसह!
10 Sep 2014 - 10:20 pm | शैलजा शेवडे
खूप सुंदर चर्चा....मनापासून आवडली.