राम राम मंडळी
हल्ली अनेकांचे प्रतिसाद उडतात. लेख उडतात. कविता उडतात. इतकेच काय तर काही काही आयडी सुद्धा उडतात. कंपू त्रास देतो. लेखन प्रतिसाद लिहितांना घाबरल्यासारखे होते. अनेकांना अनेक गोष्टी आंतरजालावर वावरतांना त्रासदायक होतात. या सर्वांवर उपाय म्हणुन आम्ही लिहित असलेल्या संकेतस्थळपुराणातील मसंअध्यायातील एक स्तोत्र देत आहोत. सर्वांनी याचा वापर करुन आपले जीवन सुखी करावे :)
****
मसंमहात्म्यस्तोत्रम्
शृणु मित्र प्रवक्ष्यामि मसंमहात्म्यमुत्तमम्।
येन मन्त्रप्रभावेण आंतरजाल शुभो भवेत्॥
न लेखनं न प्रतिसादम् पाककृतीम् न कौलम्।
न खरडं व्यनीं च न प्लसवनम् च आक्षेपम्॥
मसंमहात्म्यपाठमात्रेण सर्वजालफलं लभेत्।
अति गुह्यतरं मित्र संपादकानामपि दुर्लभम्॥
गोपनीयं प्रयत्नेन स्वहस्तेनलिखितम् आर्य।
डिलिटं एक्सपल्शनं तथा कंपुकलहादिकम्।
पाठमात्रेण संसिद्धयेत मसंमाहात्म्यमुत्तमम्॥4॥
|| अथ मंत्र ||
ॐ ऐं ह्रीं क्लीं जालाय विच्चे।
ॐ ग्लौं हुं क्लीं जूं प्रवेश प्रवेश गमन गमन लेखन लेखन प्रतिसाद प्रतिसाद ह्रीं क्लीं मित्राय खरडं व्यनीम् घ्रुं घ्रुं संपादक कलह तटस्थ वशी कुरु कुरु हं सं लं क्षं फट् स्वाहा
|| इति मंत्र: ||
नमस्ते मालकाय नमस्ते संपादकेभ्यः |
नमः ओल्डमेंबरेभ्यो महाकंपवे नमः ||
नमस्ते काथ्याकुटकाय च आस्वादकाय |
नमः कौलप्रवर्तकाय च कवये नम: ||
नमो नमः मल्टीएक्सेलशीट मेंटेनराय |
नमः अवांतरलेखकधागाविध्वंसकेभ्यः ||
नमः सर्वेभ्यो सदस्येभ्यो नमो नमः |
सायंप्रात: पठेन्नरः मसंमहात्म्यमुत्तम् ||
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं परम्।
लेखक लभते प्रतिसादं वृक्षार्थी लभते वृक्षम् ||
संपादक लभते अजो मोक्षार्थी लभते कंपुम्।
जपेद् मसंमहात्म्यस्त्तोत्रम् लभेत् शीघ्रं फलं ||
एकमासेन पठित्वा लभेत कंपु न संशय:।
षण्मासेन श्रद्धया पठित्वा भविष्यति संपादक: ||
इति श्रीसंकेतस्थळपुराणे मसंअध्याये मसंमहात्म्यस्तोत्रं संपूर्णम्
प्रतिक्रिया
26 Oct 2010 - 12:07 pm | यशोधरा
भारी! :D
27 Oct 2010 - 3:43 am | मिसळभोक्ता
शुद्धलेखनात खूप चुका आहेत. कुणा संस्कृत जाणकाराकडून तपासून घ्यावे.
धन्यवाद.
26 Oct 2010 - 12:13 pm | प्रीत-मोहर
वाअवाअवाअवाअवाअवाअवस......नान्स मस्त.............
26 Oct 2010 - 12:15 pm | छोटा डॉन
चालायचेच ...
26 Oct 2010 - 12:18 pm | परिकथेतील राजकुमार
नाना मस्त रे :)
मला संस्कृत खुप काही कळते वगैरे अशातला भाग नाही, खरेतर फारसे कळतच नाही. मला जमला झेपला तेवढा अर्थ लावुन वाचले. आवडले आणि पटले. मांडणीची पद्धत आवडली.
अवांतर :- अरे ह्या बामनाचा धागा अजुन उडला नाही?
26 Oct 2010 - 12:21 pm | llपुण्याचे पेशवेll
वा वा वा. छान छान .. नान्या स्तोत्रांची संकल्पना छान पण थोडी वृत्तात मार खात आहेत बघ. :) बाकी इथे संस्कृत फाट्यावर मारले असल्याने कोणाला फारसे संस्कृत कळत नसावे. म्हणून तुझी स्तोत्रे टीकली रे. जर त्या सुहाशासारखी मराठीत लिहीली असतीस तर लगेच उडली असती बघ. :)
26 Oct 2010 - 12:34 pm | छोटा डॉन
अगदी करेक्ट आहे बघा पेशवे.
नाना किंवा इतर कोणीही असो, जे असले साहित्य लिहतात ते म्हणजे जणु 'कालीदासाचे महाकाव्य'च...
बाकी ज्यांना हे समजत नाही ते जणु 'औरंगजेब किंबा गेलाबाजार फौलादखान'च ...
बरोबरच आहे, असल्या अरसिक लोकांनी अशी 'अजरामर महाकाव्ये' उडवल्यावर आरडाओरडा व्हायलाच हवा.
ह्याबाबत संबंधितांचे कौतुक वाटते,त्यांचा हा रामशास्त्रीपणा मला नेहमीच आदर्शवत वाटतो.
धन्यवाद :)
- छोटा डॉन
26 Oct 2010 - 12:50 pm | llपुण्याचे पेशवेll
अंमळ डोक्यावर पडले की 'असले' रामशास्त्रीपण सुचते बघा. अन्यथा इतिहास साक्षी आहेच. नाही का!
26 Oct 2010 - 12:53 pm | यशोधरा
एवढेच म्हणते.
26 Oct 2010 - 12:55 pm | छोटा डॉन
तुर्तास "छान छान" एवढेच म्हणतो.
बाकी असो.
26 Oct 2010 - 1:00 pm | यशोधरा
रामशास्त्री बाणा आहे खरा.
तूर्तास छान म्हणून, नंतर फार तर खाते उडवाल. अधिक काय?
26 Oct 2010 - 1:13 pm | छोटा डॉन
छे हो, कसला काय ?
आम्ही म्हणजे १ नंबरचे औरंगजेब !
असो, (वर 'आम्ही औरंगजेब आहोत' हे कबुल केल्याने ) हा शेवटचा प्रतिसाद, बाकी उरलेला वेळ जरा चांगला घालवावा म्हणतो. आंतरजालावर येण्याचा संस्थळी मारामार्या हाच एकमेव हेतु नसावा असे आम्ही ठरवले आहे, नाही जमले तर येणेच बंद करु, कसें ?
अवांतर : खाते उडवणे वगैरे आरोप करताना भाग ठेवावे, सदर निर्णय कधीही एकट्याचा नसतो हे कदाचित आपल्याला ज्ञात नसेल किंवा नुसतेच तसे भासवायचे असेल. पण आमचा संयम ही आमची कमजोरी नाही एवढेच सांगतो.
असो, हा शेवटचा प्रतिसाद दे आहेच :)
- छोटा डॉन
26 Oct 2010 - 1:17 pm | llपुण्याचे पेशवेll
खाते उडवणे वगैरे आरोप करताना भाग ठेवावे, सदर निर्णय कधीही एकट्याचा नसतो हे कदाचित आपल्याला ज्ञात नसेल किंवा नुसतेच तसे भासवायचे असेल. पण आमचा संयम ही आमची कमजोरी नाही एवढेच सांगतो.
धन्यवाद मग सदर टीकाही एकट्यावर नाही हे ध्यानी घ्यावं इतकंच सांगणं आहे.
26 Oct 2010 - 1:20 pm | यशोधरा
आम्ही म्हणजे १ नंबरचे औरंगजेब ! >> स्वपरिक्षण हे नेहमी उत्तमच. :)
नाही जमले तर येणेच बंद करु, कसें ? >> हे म्हणजे मागे कोणी मी आत्महत्त्या करतो असा ढोल बडवत धागा टाकला होता, त्याची आठवण झाली! असो.
>> पण आमचा संयम ही आमची कमजोरी नाही एवढेच सांगतो. >> कोणीही विरोधी स्वर लावला, की धमकीवजा बोलणे ही एक मात्र कमजोरी दिसते. असो.
26 Oct 2010 - 12:57 pm | सुहास..
जर त्या सुहाशासारखी मराठीत लिहीली असतीस तर लगेच उडली असती बघ. >>>>
गप्राव !!
तु पण अंबळ डोक्यावर आपटलेलाच आहे ,कुठे कधी काय बोलायच कळत नाही तुला !! ईथे आधीच दंगेखोरांमुळे केसांची सुतारफेणी झाली आहे.
मला पण गाण म्हणत बसाव लागेल " पंछी बनु ऊडता फिरु "
बाकी नाना, अप्रतिम आणी 'हम पंछी एक डालके "
26 Oct 2010 - 3:39 pm | निखिल देशपांडे
बरोबरच आहे, असल्या अरसिक लोकांनी अशी 'अजरामर महाकाव्ये' उडवल्यावर आरडाओरडा व्हायलाच हवा.
हे तर होणारच ना रे डॉन्या...
लेख उडाला तरी रडणार नाही उडाला तरी रडणार
शेवटी काही लोकांना चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत असे आता म्हणावेसे वाटात आहे.
असो कुणातही काहीच फरक पडणार नसल्या मुळे माझा पहिला आणि शेवटचा प्रतिसाद.
26 Oct 2010 - 3:47 pm | आनंदयात्री
>>'अजरामर महाकाव्ये' उडवल्यावर आरडाओरडा
ठ्ठो .. !!!
=)) =)) =))
26 Oct 2010 - 4:18 pm | सुहास..
'अजरामर महाकाव्ये'
मला देखील शब्दच आठवत नव्हता, धन्यवाद !! आपल्या प्रतिसादचे स्वागतच आहे !
26 Oct 2010 - 12:28 pm | सविता००१
खूप आवडले.
26 Oct 2010 - 12:29 pm | समंजस
छान आहे मंत्र आणि स्तोत्र धन्यवाद :)
माझं आणि संस्कृत भाषेचं वाकडं असल्यामुळे विशेष नाही कळलं.
काही शंका -
१. हा स्तोत्र/मंत्र पठण करताना इतर स्तोत्र/मंत्रांप्रमाणे समजून न घेताही पठण केल्यास लाभ होइल का?
२. हा स्तोत्र/मंत्र विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी, विशिष्ट वेळा पठण केल्यासच लाभ होणे अपेक्षीत आहे का?
३. हा स्तोत्र/मंत्र पठण करताना घ्यावयाची काही विशिष्ट काळजी?
28 Oct 2010 - 12:11 pm | विजुभाऊ
अजून काही शंका
हा स्तोत्र/मंत्र पठण करताना
१) कोणत्या आसनात बसावे
२) कोणत्या आसनावर बसावे
३) कोणत्या आसनासह बसावे
४) कोणत्या आसनामुळे जास्त फळ मिळू शकते?
५) आसानात बसायलाच हवे का? की उभ्याउभ्या चालू शकेल
६) हा स्तोत्र/मंत्र पठण करताना ची ध्वनीचित्रफीत वगैरे काही उपलब्ध आहे का?
26 Oct 2010 - 12:33 pm | नितिन थत्ते
अवद्ले
26 Oct 2010 - 12:46 pm | सूड
चान चान !!
26 Oct 2010 - 12:59 pm | स्वैर परी
मस्तच लिहिले आहे! चालु द्या!
26 Oct 2010 - 1:12 pm | गांधीवादी
अवलिया एकदम मस्त.
प्रिंट मारून घेतली आहे,
पण रोज किती वेळा जप करायचा ?
26 Oct 2010 - 1:17 pm | Nile
सकाळी विधीला जितके वेळ बसता तितका वेळ जप करा. ;-)
26 Oct 2010 - 1:24 pm | गांधीवादी
मी प्रश्न विचारला 'किती वेळा', तुम्ही उत्तर दिले 'किती वेळ' ह्याचे.
असो काय हरकत नाही. धन्यवाद.
आमच्या मूळ प्रश्नासाठी अवलिया ह्यांच्याकडून उत्तराच्या प्रतीक्षेत.
अवांतर : जे मुनी ध्यानधारणा, योग, सिद्धी, वगेरे करून मंत्र शोधून काढत असतील, तेच ह्याचे बरोबर उत्तर देऊ शकतील असे आम्हाला वाटते.
26 Oct 2010 - 1:20 pm | sneharani
छान लिहलयं!
26 Oct 2010 - 1:41 pm | सविता
झकास
26 Oct 2010 - 1:49 pm | मितभाषी
नानबा लेका लै दिसानी दर्जेदार का म्हन्तात ते वाचायला मिळाल. लगे रहो नानबा.
नान्या नान्या लेका बॅलिस्टर का नाही झालास?
26 Oct 2010 - 1:57 pm | मनि२७
मस्तच.... धागा कधी उडेल ह्याचा भरवसा नाही..म्हणून कॉपी पेस्ट करून घेतला
बाकी धागा उडू नये ह्यासाठी शुभेच्छा.... ;-)
26 Oct 2010 - 3:58 pm | गणपा
:)
26 Oct 2010 - 10:05 pm | शेखर
मन कस प्रफुल्लित झालं स्तोत्र म्हणल्यावर ;)
28 Oct 2010 - 3:20 am | डावखुरा
आज अवलिया नाव सार्थक झाले....
28 Oct 2010 - 8:18 am | शिल्पा ब
संस्कृत वगैरे डोक्यावरून जातं म्हणून डायरेक्ट प्रतिसादच वाचले...आमच्यासाठी अत्यंत उपयोगी असे मंत्र आहेत असे समजते...कोणाला उपयोग झाला तर कळवावे.
28 Oct 2010 - 1:06 pm | बिपिन कार्यकर्ते
हे स्तोत्र पूजा करताना म्हणायचे की पूजेच्या आधी / नंतर. अवलियागुर्जींनी खुलासा करावा, नाही तर घास्कीगुर्जींन,.
28 Oct 2010 - 1:08 pm | अवलिया
तुम्ही पूजा दिवसा करता की रात्री ?
2 Jun 2015 - 11:02 am | नीलमोहर
:)