नाव शोधून शोधून जोडू नको!

केसुरंगा's picture
केसुरंगा in जे न देखे रवी...
15 Aug 2008 - 3:35 am

मिसळपावावर सदस्यांची नावे अशी फिरताना बघून आमचे डोळे फिरले! 8|
एकामागून एक सदस्य अशी नावे फिरवून फिरताना पाहून ना.घ. देशपांड्यांच्या डाव मांडून भांडून मोडू नको ह्या अप्रतिम गाण्याचे शब्द आम्ही फिरवले! :O ;)

नाव शोधून शोधून जोडू नको
नाव शोधू नको

जाणले मी तुझे सर्व, मी जाणले,
खूप 'वेडे' तुझ्यासारखे पाहिले,
तूच सारी तुझी लाज सोडू नको

'जाल सर्वज्ञ' तू रे मला भासला
कौतुकाने तुला हार मी घातला,
हार घेऊन माजून तोडू नको

घेतलेले तुझे नाव, तू काढले,
आणि त्याचे पुढे ब्रीद तू राखिले,
त्याच नावास लाजून खोडू नको

ऐकले मी तुझ्या रे मुळे सर्व हे
लोक म्हणती मला घातले मी 'झगे'
भरजरी हा 'झगा' हाय ओढू नको

केसुरंगा

कविताविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

15 Aug 2008 - 3:45 am | केशवसुमार

केसुरंगा शेठ,
एका मागून एक धुलाई लावलीय.. @) काय विचार काय आहे? B)
सुंदर विडंबन.. आवडले..
(निवृत्त)चतुसुमार
वेड्या सारखी स्वतःशी बडबडः रंग्या हा कोण आपल्या गल्लीत शिरुन धुडगुस घालतो आहे शोधायला हवे :W

धमाल सर्किट's picture

15 Aug 2008 - 4:31 am | धमाल सर्किट (not verified)

केसुरंगाशेठ !!!!

जियो !

जाणले मी तुझे सर्व, मी जाणले,
खूप 'वेडे' तुझ्यासारखे पाहिले,
तूच सारी तुझी लाज सोडू नको

मधली ओळ

बेवडे ही तुझ्या सारखे पाहिले

अशी हवी होती, म्हणजे ते व्यक्तिमत्व ठळक उठून दिसले असते! ;-)

१० पैकी दहा !!

- सर्किट

केशवसुमार's picture

15 Aug 2008 - 4:37 am | केशवसुमार

द्राक्षासवाचा असर??
(वेडा)केशवसुमार
वेड्यासारखी स्वतःशी बडबड: मला वाटले 'सर्किट' म्हणजे 'वेडा'

धमाल सर्किट's picture

15 Aug 2008 - 4:45 am | धमाल सर्किट (not verified)

केसुशेठ,

आपले जालवाचन कमी झालेले दिसते, की वयोमानानुसार विस्मरणाचा रोग आपल्यालाही जडलाय ?

असर नाही हो, अंमल !

- (अजून अंमलात मी) सर्किट

केशवसुमार's picture

15 Aug 2008 - 4:52 am | केशवसुमार

सर्किटशेठ,
अंमळ चुकलच..
(कुठल्याही अंमलात नसलेला)केशवसुमार
आता आपल्यालाही चा संदर्भा कुणाच्या खरडीत शोधावा बरे?
वेड्यासारखी स्वत:शी बडबडः हल्ली लेख कमी खरडवाचन जास्त अस झालायं
(खरडपाव)

चतुरंग's picture

15 Aug 2008 - 6:23 am | चतुरंग

जाणले मी तुझे सर्व, मी जाणले,
खूप 'वेडे' तुझ्यासारखे पाहिले,
तूच सारी तुझी लाज सोडू नको

ऐकले मी तुझ्या रे मुळे सर्व हे
लोक म्हणती मला घातले मी 'झगे'
भरजरी हा 'झगा' हाय ओढू नको

काय छक्के पे छक्का बरसात आहे राव!
क्या बात है!! हॅट्स ऑफ केसुरंगाशेठ!!

(खुद के साथ बातां: रंग्या, लेका केसुशेठ म्हणतात ते बाकी खरं आहे हां, हा लेकाचा केसुरंगा मधूनच येतो आपला फ्यूज काढून घेतो! बत्ती गुल!! कुछ गेम करना पडेगा इसका! :W :? ~X( )

चतुरंग

बेसनलाडू's picture

15 Aug 2008 - 6:42 am | बेसनलाडू

असे पतंग उडाले/उडवले की आम्ही काटाकाटी बघायला उभेच असतो ;) कैपोच्चे!!!!!!!
(प्रेक्षक)बेसनलाडू

प्राजु's picture

15 Aug 2008 - 8:05 am | प्राजु

एकदम... स्टेडियमच्या बाहेरच की हो...!
जोरदार बसला आहे षटकार...!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/