एक टुमदार गाव - माझे माधवनगर - भाग - २.

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जे न देखे रवी...
15 Mar 2010 - 8:48 pm

एक टुमदार गाव माझे माधवनगर - सन १९६० ते १९७० दसकातील आठवणी भाग - २.

मागेवळून पाहता कधी आठवतात मजेशीर गोष्टी ... बुधवार पेठेत स्वर्गात न्यायाला विमान येणार म्हणून पत्रके वाटून मोठी तयारी केलेले श्रद्धाळू जाखोटिया... त्यांचा भसाड्या नाकाचा राजा... रेल्वे स्टेशनच्या पलिकडील सुंदर विठ्ठल मंदिरात हभप वासुदेवराव जोशींची टाळ मृदुंगाच्या तालावर होणारी हरिपाठाच्या अभंगांवरील कीर्तने... त्यानंतर नातू शेठजींचे ‘इष्टी’ कथन... त्यात बालगंधर्वांचे भजन गायन... ६७ सालातील भुकंपानंतरची रात्र... चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी रात्री 2 ते 4 गस्त घालण्याची कामगिरी... दिवाळी अंकांची लायब्ररी चालवणे...

माधवनगरला हुशारीची व शैक्षणिक प्राविण्याची परंपरा होती. 1963 सालच्या परिक्षेत शालिनी भिडेने बोर्डात तिसरा क्रमांक पटकाऊन शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया हायस्कूलच्या नावाबरोबरच माधवनगरचे नाव महाराष्ट्रभर केले. पुढे सुधीर पंडीत सीए झाला, जवाहर पाचोरे आंतरराष्ट्रीय किर्तीचा ऑर्थोपेडिक सर्जन बनला. शश्या ओक हवाईदलात गेला. तर दीपक रानडेने पवईतून एमटेकची पदवी संपादली. शरद सोवनी नावाजलेला चित्रकार झाला. शालू भिडेने अमेरिकेत नासाच्या कार्यात नाव जोडले. अशोक-आनंद-रवी भिडे, हरीश प्रताप, सुभाष कुलकर्णी, सुधाकर पाटील, लक्ष्मण हिरकुडे, सटाले बंधू व इतर अनेकांनी देश-विदेशात नाव कमावले. मुली थोरामोठ्यांच्या सुना झाल्या.

... माधवनगरला आणखी एक परंपरा होती. सुखवस्तू राहाणी, व आस्थेवाईक भेटीमुळे प्रेम प्रकरणांना भरपूर वाव होता. म्हणतात, सुरवात गिट्टूनाना साठेंच्याकडे कबीर बेदीच्या रुबाबाचा पोरगा व आत्ताच्या प्रिती झिंटाची आठवणकरून देणाऱ्या ख्रिश्चन लीली पासून झाली. नंतर त्यात वेळोवेळी भर पडत गेली कधी विजु कुसूरकर व विजयश्री हेंद्रेची तर लता व अविनाश रानडेची. अनंतराव दामल्यांच्या रंजनाला रविजोशी भावला. एरव्ही प्रेमवीरांची कमी नव्हती. ‘लाईन मारणे’ हा तर त्यांचा मुख्य उद्योग होता. तो स्मार्ट राजा सोवनी असेल नाहीतर गबाळा बाळ्या इऩामदार, गठ्ठ्या, ढंब्या, पंत्या, दिग्या असेल.

पोरींचीही काही कमी नव्हती. नीला, मंगल, सुचेता, वृंदा, वसुंधरा, पुष्पी, सुमन, लता, शालू-रोहिणी-निमा-रेखा, जांभळीकर-देशपांडे-हेंद्रे भगिनी, स्टेशनच्या सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरणारी ठसठशीत कमलिनी, शिवाय गल्लोगल्ली अनेक.

माधवनगरला हुशारीची व शैक्षणिक प्राविण्याची परंपरा होती. 1963 सालच्या परिक्षेत शालिनी भिडेने बोर्डात तिसरा क्रमांक पटकाऊन शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया हायस्कूलच्या नावाबरोबरच माधवनगरचे नाव महाराष्ट्रभर केले. पुढे सुधीर पंडीत सीए झाला, जवाहर पाचोरे आंतरराष्ट्रीय किर्तीचा ऑर्थोपेडिक सर्जन बनला. शश्या ओक हवाईदलात गेला. तर दीपक रानडेने पवईतून एमटेकची पदवी संपादली. शरद सोवनी नावाजलेला चित्रकार झाला. शालू भिडेने अमेरिकेत नासाच्या कार्यात नाव जोडले. अशोक-आनंद-रवी भिडे, हरीश प्रताप, सुभाष कुलकर्णी, सुधाकर पाटील, लक्ष्मण हिरकुडे, सटाले बंधू व इतर अनेकांनी देश-विदेशात नाव कमावले. मुली थोरामोठ्यांच्या सुना झाल्या.

मंगळवार पेठेतील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पाटील गुरुजी, नामदेव पाटील, पवार, हरदी, माने गुरुजी, आदराची स्थाने होती. तर ‘शेरविगो’ हायस्कूलचे मुख्याध्यापक भऱा नाईकसर, परांजपेसर, पटवर्धनसर, केळकरसर, एचव्हीसर, त्यांची भगिनी कुलविकु मॅडम, पिटकेसर, जप्तीवालेसर, चिंचलीकरसर, बारपटेसर, देवलसर, आ.ह.साळुंखेसर, अकौंटन्सीचे क्लासेसवाले लिमयेसर, आदि सरांनी अनेकांच्या भावी करियरचा पाया घातला.

मागेवळून पाहता कधी आठवतात मजेशीर गोष्टी - बुधवार पेठेत स्वर्गात न्यायाला विमान येणार म्हणून पत्रके वाटून मोठी तयारी केलेले श्रद्धाळू जाखोटिया, त्यांचा भसाड्या नाकाचा राजा, रेल्वे स्टेशनच्या पलिकडील सुंदर विठ्ठल मंदिरात हभप वासुदेवराव जोशींची टाळ मृदुंगाच्या तालावर होणारी हरिपाठाच्या अभंगांवरील कीर्तने त्यानंतर नातू शेठजींचे ‘इष्टी’ कथन, त्यात बालगंधर्वांचे भजन गायन, ६७ सालातील भुकंपानंतरची रात्र, चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी रात्री 2 ते 4 गस्त घालण्याची कामगिरी, दिवाळी अंकांची लायब्ररी चालवणे, दर उन्हाळ्याच्या सुट्टीत हवापालटाला येणारे पाहुणे, त्यांच्या बरोबर विहिरीतील पाणी राहटाने शेंदणे, लांब लांब फिरायला जाणे....

माधवनगरचा तो काळ होता आनंदाचा. प्रत्येक गावाला चढउतार असतात. ब्रॉडगेजपायी रेल्वे स्टेशन गेले तेंव्हा माधवनगरचा कणाच मोडला, व्यवस्थापनातील त्रुटींमुळे कॉटन मिलचे धुराडे बंद पडले. एकेकाळी आशियाखंडातील सर्वात जास्त गाळप करणारा साखरकाखाना राजकारणाच्या रस्सीखेचीत संपला. मागांवर नियंत्रणे आली. कामगार कलह वाढला. कालांतराने माधवनगरचे रुपांतर बकाल वस्तीत झाले.

आज जरी असे असले तरी उद्या पुन्हा माधवनगर उभारी घेईल, अधिक समृद्धीच्या काळाकडे.

।। कालाय तस्मै नमः।।

एक माधवनगरकर

राहती जागाजीवनमानराहणीमौजमजा

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

16 Mar 2010 - 9:33 am | प्रकाश घाटपांडे

छान स्मृती. प्रत्येकाच्या स्मृतीत असा एक कोपरा असतोच. स्थळ काळ बदलतात एवढेच.
आ ह साळुंखे तिकडचेच का?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शशिकांत ओक's picture

15 Aug 2012 - 5:53 pm | शशिकांत ओक

डॉ. आ. ह. साळूंखे सर,
मी शेरविगोत शिकत असताना तेथे होते. बहिणीला संस्कृत शिकवायला होते.
आज माधवनगरच्या आठवणीचा धागावर आणला गेला, त्याला साद म्हणून हा भाग ही आठवला.
बालगंधर्व सिनेमा पाहिला तेंव्हा माधवनगरचे विठ्ठलमंदिर प्रकर्षाने आठवले ती शब्दांकित आठवण सादर करीन.

पैसा's picture

15 Aug 2012 - 8:13 pm | पैसा

इतक्या वर्षांनंतर तुम्हाला सगळी मंडळी नावासकट आठवत आहेत. विशेष आहे!

आपल्या मिपासदस्यांत सांगली माधवनगरचे कोणी आहेत काय?

चौकटराजा's picture

16 Aug 2012 - 8:10 pm | चौकटराजा

इतक्या वर्षांनंतर तुम्हाला सगळी मंडळी नावासकट आठवत आहेत. विशेष आहे!

अहो यात विशेष ते काय? त्याना गेले सात जन्मातील पोरींची नावे विचारा. लिष्ट तयार असेल नक्की !
विंक साहेब , हलके घ्या !

तुम्हालाही आठवत असतीलच ना हो काका?

शशिकांत ओक's picture

17 Aug 2012 - 11:34 am | शशिकांत ओक

अहो नुसते आठवणीं काढून काय होतेय. कप्पाळ...
पत्ते नुसते पिसून पिसून हुकुमाची राणी कधी हातात येते का?