पुणे आणि अमेरिकेत एक साम्य आहे...

चिम् चिम् मामा's picture
चिम् चिम् मामा in जनातलं, मनातलं
10 Aug 2012 - 4:59 am

पुणे आणि अमेरिकेत एक साम्य आहे...
दोन्ही ठिकाणी तुम्ह्चे सारख्या पद्धतीने स्वागत होते....

How long you are planning to stay in US?
What you are gonaa do here?

तसेच जर तुम्ही पुण्यात कोणाच्या घरी गेलात तरी तुम्हाला अशाच प्रश्नान्ना सामोरे जावे लागते...
आज कसे काय येणे केले...?
कधी पर्यंत मुक्काम आहे?

भूगोलमौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

चिम् चिम् मामा's picture

10 Aug 2012 - 5:05 am | चिम् चिम् मामा

यात पुण्याला किंवा अमेरिकेला नावे ठेवण्याचा इरादा नाही...

भरत कुलकर्णी's picture

10 Aug 2012 - 6:48 am | भरत कुलकर्णी

आपल्याला किंवा आपल्या 'लेखाला' नावे ठेवण्याचा उद्देश नाही पण हा खरोखर लेख होवू शकतो यावर तुमचा विश्वास आहे काय?
आपण स्व:ता 'हा लेख उडवण्यात यावा' ही मागणी संपादकांकडे करावी ही विनंती. यातच आपले मोठेपण सामावलेले आहे.

मी_आहे_ना's picture

10 Aug 2012 - 9:39 am | मी_आहे_ना

अगदी अगदी... लेख(म्हणता येत असेल तर, नाहीतर ललित का काय ते) काही झेपला नाही.
(मूळ वाईचा असून, पुण्याबद्दलही जाज्वल्य अभिमान असणारा, आणि वरचे प्रश्न फक्त 'व्हिसा अधिकार्यांकडून' ऐकलेला, तरिही एक देश म्हणून अमेरिका आवडलेला) मी आहे ना..इथेच, पुण्यात.

चिंतामणी's picture

10 Aug 2012 - 1:47 pm | चिंतामणी

लेख(म्हणता येत असेल तर, नाहीतर ललित का काय ते) काही झेपला नाही.

सहमत.

एव्हढे विद्वत्ताप्रचुर लिखाण मिपाकरांच्या पचनी पडणे अवघड आहे.

चिंतामणी's picture

10 Aug 2012 - 1:47 pm | चिंतामणी

लेख(म्हणता येत असेल तर, नाहीतर ललित का काय ते) काही झेपला नाही.

सहमत.

एव्हढे विद्वत्ताप्रचुर लिखाण मिपाकरांच्या पचनी पडणे अवघड आहे.

नितिन थत्ते's picture

10 Aug 2012 - 7:55 am | नितिन थत्ते

खिक...
अमेरिकेचा व्हिसा काढला असे सांगण्याची ऐड्या आहे ही.

नाना चेंगट's picture

10 Aug 2012 - 11:36 am | नाना चेंगट

खिक करु नका. आजकाल खिक केले की बरे नाही दिसत असे कुणीतरी सांगत होते.

मग त्याऐवजी काय करावे म्हणजे बरें दिसेंल?

नाना चेंगट's picture

10 Aug 2012 - 5:57 pm | नाना चेंगट

हॅ हॅ हॅ (काय वाईट आहे ;) )

यकु's picture

10 Aug 2012 - 6:27 pm | यकु

हॅहॅहॅ

इनिगोय's picture

10 Aug 2012 - 6:50 pm | इनिगोय

हं.. दिसतेंय हे बरें ;)

इरसाल's picture

10 Aug 2012 - 9:03 am | इरसाल

कंपनीला घाइ झाल्यामुळे दोन महिन्यात दोन वेळा युएस व्हिसा रिजेक्ट झालेला (खरी उत्तरं दिल्यामुळे)

सुंदर व ओघवती लेखनशैली. एवढा लांबलचक लेख असूनही कुठेही कंटाळवाणा झाला नाही, हे विशेष.
एकच सूचना करावीशी वाटते.. पुढच्या वेळी इतके मोठे लेख २-३ भागात टाकलेत तर जरा बरं होईल.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Aug 2012 - 10:35 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत. लेख क्रमश: असेल असे वाटले होते.

आनन्दा's picture

10 Aug 2012 - 10:41 am | आनन्दा

हे बहुधा दुसरे साम्य.. :ड

किसन शिंदे's picture

10 Aug 2012 - 10:48 am | किसन शिंदे

तुमचा हा 'लेख' चेपूवर स्टेटस म्हणून जास्त शोभेल. :)

परिकथेतील राजकुमार's picture

10 Aug 2012 - 10:52 am | परिकथेतील राजकुमार

तसेच जर तुम्ही पुण्यात कोणाच्या घरी गेलात तरी तुम्हाला अशाच प्रश्नान्ना सामोरे जावे लागते...
आज कसे काय येणे केले...?
कधी पर्यंत मुक्काम आहे?

आपले घर- दार, शहर सोडून आधी लोकाच्या दारात बोंबलत जावेच कशाला ? हाटेलात रहावे की, आणि अगदी राजासारखे आदरातिथ्य करून घ्यावे.

चिगो's picture

10 Aug 2012 - 12:14 pm | चिगो

इच्या मायला.. एकतर तुम्ही पाहुणे म्हणून येणार, त्यामुळे तुमची बडदास्त ठेवा. चांगलं-चुंगलं खायला प्यायला द्या.. तुमच्यासाठी वेळ काढा, तुमची करमणूक होईल असं आदरतिथ्य करा.. तुम्हाला फिरवा. बरं काही कमीजास्त झालंच तर तुमचे टोमणे खा.. सांगितलंय कुणी !? जा, र्‍हावा की हाटीलात नी करा जे करायचंय ते..

आपलं ढाण्ण ऽ ऽ कण अनुमोदन हाये पराला ! :-)

रेवती's picture

10 Aug 2012 - 6:22 pm | रेवती

कधी नव्हे ते पराशी सहमत व्हावे लागत आहे.
काय हो चिमा, नाही आवडत पुण्यात यायला तर कोणी आमंत्रण दिलय का?
आणि दिलच कोणी तर तुम्हाला घटनेनं 'नाही' म्हणायचा अधिकार दिलाय की!
तिथं मोह सुटत नाही अन् दुसर्‍याला नावं ठेवतायत.
ही नावं ठेवायची पद्धत तुमच्या गावची वाटतं?

इरसाल's picture

10 Aug 2012 - 11:06 am | इरसाल

जेव्हा जेव्हा "बोंबलत" हा शब्दप्रयोग करतात तेव्हा मला का कोण जाणे "सुक्या बोंबलांची ", "पाट्यावर दाबुन मग तांदळाच्या पिठात तळलेल्या ओल्या बोंबलांची", "भाजलेले सुके बोंबील", "सुक्या/ओल्या बोंबलांच्या कालवणाची" जबरदस्त आठवण येते

परिकथेतील राजकुमार's picture

10 Aug 2012 - 11:27 am | परिकथेतील राजकुमार

असे मन मारु नका इरसाल शेठ.

चेन्नईमध्ये एखादी महाराष्ट्रीयन बाई ठेवा स्वयंपाकाला.

बॅटमॅन's picture

10 Aug 2012 - 12:17 pm | बॅटमॅन

काय श्लेष मारलाय वा:!!!

इरसाल's picture

10 Aug 2012 - 1:17 pm | इरसाल

चेन्नईमध्ये एखादी महाराष्ट्रीयन बाई ठेवा स्वयंपाकाला.

आम्ही केरळात पडिक आहोत. प्राब्लेम काय साल नाय व्हनार झालं......
हा सल्ला सोकाजीरावांना उपयोगी पडेलसे वाटते.

पुण्याचे वटवाघूळ's picture

10 Aug 2012 - 11:34 am | पुण्याचे वटवाघूळ

आणि आणखी एक साम्य पुणे आणि अमेरिकेत आहे की. दोन्ही ठिकाणच्या (बहुसंख्य) लोकांना त्यांच्या ठिकाणाविषयी अतोनात अभिमान असतो आणि आपले ठिकाण सोडून जगात दुसरे काहीच नाही असे वाटत असते.

दोन्ही ठिकाणच्या (बहुसंख्य) लोकांना त्यांच्या ठिकाणाविषयी अतोनात अभिमान असतो आणि आपले ठिकाण सोडून जगात दुसरे काहीच नाही असे वाटत असते.

बहुसंख्य उत्तर/दक्षिण भारतीयांना असेच वाटत असते. या बाबतीत पुणेकर अग्रेसर वगैरे नाहीत.

कूपमंडूक म्हणालो असतो, पण तुम्ही वटवाघूळ आहात!! ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या ठिकाणाबद्दल अभिमान असतो.....एक मुंबई सोडली तर.

बॅटमॅन's picture

10 Aug 2012 - 6:02 pm | बॅटमॅन

अभिमान नसण्याचादेखील एक अभिमान असतो की काय मुंबैकरांना ;)

विकास's picture

11 Aug 2012 - 12:31 am | विकास

दोन्ही कडे बाहेरील व्यक्ती त्या त्या ठिकाणांना नावे ठेवतात आणि तरी तेथे स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात अथवा होतात. :-)

फरक इतकाचः अमेरीकेत परमनंट रेसिडेंन्सीनंतर नॅचरलाईझ्ड अमेरीकन नागरीक होता येते. पुण्यात तुम्ही परमनंट रेसिडंट होऊ शकाल पण नॅचरलाईझ्ड पुणेकर होणे शक्य आहे असे वाटत नाही! ;)

मनीषा's picture

10 Aug 2012 - 11:42 am | मनीषा

तसेच जर तुम्ही पुण्यात कोणाच्या घरी गेलात तरी तुम्हाला अशाच प्रश्नान्ना सामोरे जावे लागते...
आज कसे काय येणे केले...?
कधी पर्यंत मुक्काम आहे?

अस्सं?
मी तर ह प्रश्न ठाण्यात देखील ऐकला आहे.
ग्लोबलायझेशन इफ्फेक्ट ... दुसरं काय?

मी तर ह प्रश्न ठाण्यात देखील ऐकला आहे.

ठाणे काय पुणे काय........ शेवटी एकारान्त च की

मोहनराव's picture

10 Aug 2012 - 2:11 pm | मोहनराव

अप्रतिम लेख... तुम्ही असेच लिहत रहा (जिलब्या टाकत रहा)
पु. जि. प्र. (जि -जिलबीच्या)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2012 - 6:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीबद्दल धन्यवाद. :)

मला वाटलं काही तुलनात्मक अभ्यास, काही गृहितके, काही संशोधन, काही निष्कर्ष. काही साम्य-भेद असलेला एखादा अभ्यासपूर्ण लेख आहे की काय ? लेख सुरु झाला आणि लगेच संपला इतकेच बाकी काही नाही.

बाकी, तुम्ही पब्लिकचं काही मनावर घेऊ नका. लिहित चला. :)

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

10 Aug 2012 - 6:33 pm | बॅटमॅन

+१.

तेच ना. एवढ्याशा पुण्यातील इतकेसे पुणेकर, त्यांच्या कमेंट्स मनावरती का घ्याव्यात हे एक न उलगडलेले कोडे आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Aug 2012 - 6:38 pm | परिकथेतील राजकुमार

'मनावर' असा शब्द आहे होय तो. मी भलतेच काहितरी वाचले आणि अनावर झालो.

असो...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2012 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एवढ्याशा पुण्यातील इतकेसे पुणेकर,
'इतकेसे' या शब्दात मला काही तरी 'संखेचा' बोध होतो. त्याऐवजी दुसरा शब्द नै वापरता येणार का ? ;)

-दिलीप बिरुटे

पण तोच बोध होणे तर अपेक्षित है ना प्राडॉ ;)

परिकथेतील राजकुमार's picture

10 Aug 2012 - 6:59 pm | परिकथेतील राजकुमार

स्पार्टन्स पण इतकेसेच होते म्हणतात.

बाकी चालू द्या..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Aug 2012 - 8:30 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ह्म्म्म. ३०० मध्ये तीनशे पुणेकर* असते तर काय झाले असते असा एक रंजक विचार मनात चालू आहे. कुणीतरी कल्पनाविस्तार करायला मदत करा रे.

* म्हणजे आत्ताचे, ते पण शक्य असल्यास सदाशिवपेठी पुणेकर, बाजीप्रभूंच्या काळातील नाही .

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2012 - 8:41 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रतिस्पर्धी सैन्य कोणतं?

इनिगोय's picture

10 Aug 2012 - 9:19 pm | इनिगोय

नवा धागा काढा..

नाय त्या मैदानात शतक नको.

हा धड कमब्याक देखील नव्हता पराशेठ :) असो.

बाकी या उपमेचा एकूण इतिहास पाहता मूलनिवासी शक्तींना पाचारण करावे म्हणतोय ;)

(मूलनिवासी हीरो) बॅटमॅन.

म्हणजे ? हा लेख अभ्यास पूर्ण नाही ? असे आपण म्हणता की काय ?

इरसाल's picture

11 Aug 2012 - 2:08 pm | इरसाल

तलवार चालवली म्हटल्यावर दुसर कोण काय बोलणार.

शेवटी त्यांची सही बघा दुधारी हटवलेली आहे. ;)

तिमा's picture

10 Aug 2012 - 8:05 pm | तिमा

उथळ धाग्याला प्रतिसाद फार!

स्पा's picture

10 Aug 2012 - 9:24 pm | स्पा

अत्रुप्त आत्मा's picture

11 Aug 2012 - 12:06 am | अत्रुप्त आत्मा

बॉम्बे जिलेबी >>> ह्ही ह्ही ह्ही....!

काय काय असतं ना एकेक. ;-)

आनंदी गोपाळ's picture

10 Aug 2012 - 10:19 pm | आनंदी गोपाळ

अजूनही MH 12 प्रभागातील 'त्या' अस्मिता टिकून आहेत, अन कितीही उथळ धागे काढले तरी तितक्याच कडव्या अन कडवट प्रतिक्रीया येतात हे पाहून करमणूक झाली.

'सारेगम'मधे अवधूत गुप्ते सलील कुलकर्णींना 'एमेच्च बारा' म्हणून जे काय खिजवतो त्यावर टिपिकल एमेच्च बारा चेहरा (चेहर्‍यावर एमेच बारा वाजलेले) झालेला सलील आठवला अगदी..

रच्याकने : हाटेलीत जायची ऐपत सग्ळ्यांचीच असते हो. इथे प्रॉब्लेम असा आहे, ­पुण्यात आलात तर तुम्ही हॉटेलात रहा, पण आम्ही पुण्याबाहेर तुमच्याकडे आलो, तर तुम्ही मात्र 'गावाकडचा' वगैरे पाहुणचार 'आपुलकीने' करा अशी अपेक्षा दिसते...

(अनुभवी) गोपाळ

बॅटमॅन's picture

10 Aug 2012 - 11:03 pm | बॅटमॅन

अजूनही MH 12 प्रभागातील 'त्या' अस्मिता टिकून आहेत, अन कितीही उथळ धागे काढले तरी तितक्याच कडव्या अन कडवट प्रतिक्रीया येतात हे पाहून करमणूक झाली.

अगदी अगदी. बाकी करमणूक टॅक्सफ्री होते हेवेसांनल:) जामोप्यास्टाईल प्रतिक्रिया इथे देणे सुरू केले तर कित्ती कित्ती मज्जा येईल असे वाटून डोळे पाणावले ;)

रच्याकने : हाटेलीत जायची ऐपत सग्ळ्यांचीच असते हो. इथे प्रॉब्लेम असा आहे, ­पुण्यात आलात तर तुम्ही हॉटेलात रहा, पण आम्ही पुण्याबाहेर तुमच्याकडे आलो, तर तुम्ही मात्र 'गावाकडचा' वगैरे पाहुणचार 'आपुलकीने' करा अशी अपेक्षा दिसते...

अगदी अगदी. या काडीशी आपलं कडेशी बाडिस.

रच्याकने:

फेबुवर ही कम्युनिटी पाहिली, हहहहहहपुवा झाली नाव वाचून - "MH-12=आम्ही बाराचे" :D :P

आनंदी गोपाळ's picture

10 Aug 2012 - 11:46 pm | आनंदी गोपाळ

जामोप्यांची स्टाईल मारायची गरज नाही हो! ते स्वतः आहेत की मिपावर?

बाकी ब्याटम्यान, तुम्ही अन ते पुणेरी वटवाघूळ एकच का हो? (दोघांत ब्याट आहे म्हणुन विचारले..)

पन तरिही या धाग्यावर 'काय तो धागा आन काय ते पर्तीसाद!' अस्ली परस्तीती हाये!

अत्रुप्त आत्मा's picture

11 Aug 2012 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा

(दोघांत ब्याट आहे म्हणुन विचारले..)>> ख्याक!

मी ''दोघात एक(च) ब्याट'' वाचले... ;-)

माहिती आहे हो जामोप्या इथे आहेत ते! बाकी पुणेरी वटवाघूळ आणि अस्मादिक हे एक नव्हेत. ते पुण्याचे, तर मी गॉथमचा :)

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Aug 2012 - 7:53 am | पुण्याचे वटवाघूळ

बाकी ब्याटम्यान, तुम्ही अन ते पुणेरी वटवाघूळ एकच का हो? (दोघांत ब्याट आहे म्हणुन विचारले..)

नाही. माझी इतर नावे स्वाक्षरीत दिली आहेत. त्यात "बॅटमॅन" या नावाचा समावेश नाही :) आणि मी "पुण्याचे वटवाघूळ" आहे "पुणेरी वटवाघूळ" नाही.

आनंदी गोपाळ's picture

11 Aug 2012 - 2:23 pm | आनंदी गोपाळ

पुण्याचे चे पुणेरी झाले, क्षमस्व!

बाकी माझी आय्डी नेक्ष्ट संस्थळावर 'दारूडा साप' अशी घेणारे मी. (मी दारू प्यालेल्या सापासारखा नेहेमी सरळ चालतो म्हणून.)

आनंदी गोपाळ's picture

10 Aug 2012 - 11:45 pm | आनंदी गोपाळ

द्विरुक्त..

कुंदन's picture

10 Aug 2012 - 11:43 pm | कुंदन

हे असे काही पुणेकर अमेरिकेत गेल्यामुळे झाले ही काही अमेरिकन्स पुण्यात आल्यामुळे झाले , यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.

माझीही शॅम्पेन's picture

11 Aug 2012 - 5:29 pm | माझीही शॅम्पेन

किमान शब्दात कमाल आकर्षित करणारा धागा , सध्या अश्यात मीपा वर पहिला नाही... आपण चिम् चिम् मामा चे फॅन झालो राव !

बाकी पुणेकरांच्या विषयी बोलण्यची काही सोय राहिली नाही :)