ऑलंपीक - अविस्मरणीय क्षण.
"ऑलंपीक" हा शब्द जरी उच्चारला किंवा कानावर आला की खालच्या घटना डोळ्यासमोरून स्लाईड शो प्रमाणे झरझर सरकू लागतात, काळ वेळ ठिकाण सर्व विसरून!!
१) डेरेक रेडमंड - १९९२ बार्सिलोना ऑलंपीक.
४०० मीटर धावण्याची सेमी फायनल सुरू झाली.. पूर्ण भरात असलेल्या डेरेक रेडमंड ने भन्नाट सुरूवात केली.. अर्धे अंतर पार केले न केले तोच त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला. होणार्या वेदनांमुळे रेडमंड ट्रॅकवरच कोसळला. बाकीचे स्पर्धक पुढे निघून गेलेच होते. ऑलंपीकचे स्वप्न भंगल्याचे दु:ख इतके तीव्रपणे जाणवले की रेडमंड हमसून हमसून रडू लागला. ट्रॅकवर जखमी रेडमंड भोवती मेडीक आणि इतर सपोर्ट्सचा गराडा पडला. त्यांची मदत नाकारून अचानक काहीतरी ठरवल्याप्रमाणे रेडमंड उठला.. लंगडत लंगडत पळू लागला..."रेस पूर्ण करायची" या उद्देशाने.
अचानक त्याच्या खांद्यावर एक हात जाणवला. ट्रॅकभोवती संरक्षणासाठी असलेल्या गार्डसोबत अक्षरश: भांडून, ढकलाढकली करून व त्यांना गुंगारा देवून डेरेक रेडमंडच्या मदतीसाठी एक माणूस आला होता. त्याचे वडील 'जिम रेडमंड'.
आपला मुलगा वेदनेने तळमळत आहे हे पाहून पुढचा कोणताही विचार न करता मदत करणार्या वडिलांचा आधार डेरेक ने घेतला व आता ट्रॅकवर दोघे पळू लागले.. "रेस पूर्ण करायची" या उद्देशाने.
आता गेम ऑफीशियल्स ट्रॅकवर आले व जिम रेडमंडशी वाद घालू लागले, ते वडीलच आहेत हे कळाल्यावर ऑफीशियल्स चा ही नाईलाज झाला. (हे सगळे सुरू असताना डेरेक आणि जिम हळूहळू धावतच होते... फिनीश लाईनकडे)
फिनिश लाईनच्या थोडे आधी डेरेकने वडीलांचा हात सोडला व रेस पूर्ण केली. ६५००० प्रेक्षक स्टँडींग ओवेशन देत असताना...
जरी ऑलंपीक रेकॉर्डमध्ये डेरेक या रेस मधून "ऑफिशीयली" बाद झाला असला आणि निकाल "Did Not Finish" असा असला तरी या कृतीने डेरेक ऑलंपीक इतिहासात जावून बसला. ही घटना इंटरनॅशनल ऑलंपीक कमिटीच्या 'Celebrate Humanity' videos' मध्ये दाखल झाली, डेरेकने रिटायरमेंट नंतर ऑलंपीक चळवळीसाठीही काम केले.
वडील जिम रेडमंड ना २०१२ लंडन ऑलंपीक टॉर्च "कॅरी" करण्याचा बहुमान मिळाला.
डेरेक व जिम रेडमंड बार्सिलोना ऑलंपीकमध्ये
२) अमेरीकन बास्केटबॉल टीम - १९७२ म्यूनीक ऑलंपीक
१९७२ साल, ऑलंपीकची गोल्ड मेडल मॅच, स्पर्धक कोण तर अमेरीका आणि रशिया. (साल आणि स्पर्धक यांच्याकडे विशेष लक्ष द्या!)
खेळ संपायला ३ सेकंद राहिले असताना.... ............. स्कोर -- रशिया ४९ - अमेरीका ४८
अमेरीकेने पुढच्या दोन सेकंदात दोन पॉईंट मिळवले .... स्कोर -- रशिया ४९ - अमेरीका ५०
खेळ संपायला १ सेकंद उरला होता.. आणि पुढे जे झाले ते कोडे कुणालाच कधीच सुटले नाही.
आत्तापर्यंतची सर्वाधीक वादग्रस्त ऑलंपीक मॅच.. या गेममध्ये इतके निर्णय बदलले गेले, इतके गोंधळ झाले की आजही कोणताही स्पष्ट निर्णय लागला नाहीये. फायनल मॅचमध्ये वादग्रस्त परिस्थितीत गोल्ड मेडल हरल्याचे अमेरीकन टीमच्या इतके जिव्हारी लागले की ४० वर्षांनंतरसुध्दा या मॅचचे सिल्व्हर मेडल्स त्यावेळच्या अमेरीकन बास्केटबॉल टीमने स्वीकारले नाहीयेत. अमेरीकन बास्केटबॉल व इंटरनॅशनल ऑलंपीक कमिटी (IOC) वगैरेनी बर्याच विनंत्या केल्या पण कांही खेळाडू आजही सिल्वर मेडल न स्वीकारण्यावर ठाम आहेत.
एका खेळाडूने तर त्याच्या मृत्यूपत्रात, बायकोने, मुलांनी व त्याच्या पुढच्या पिढ्यांनी "सिल्वर मेडल स्वीकारू नये" असे आदेश दिले आहेत.
या मॅचची अधिक माहिती -इथे
मराठीत वर्णन (मला तरी) शक्य नाही इतकी गुंतागुंत आहे शेवटच्या ३ सेकंदात!!
३) मुहम्मद अली.
ही घटना ऑलंपीकशी निगडीत आहे कोणत्याही ऑलंपीकदरम्यान घडलेली नाही.
वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी "रोम ऑलिम्पिक" मध्ये "गोल्ड मेडल" चा बहुमान मिळवून अली ने करीयरची झकास सुरूवात केली. मायदेशी मात्र तो एक ऑलंपीक विजेता असला तरी पहिला एक "कलर्ड" होता व नंतर सुवर्णपदक विजेता.
एके दिवशी एका रेस्त्रॉ मध्ये गेले असताना त्याला अत्यंत हीन वागणूक मिळाली. वेट्रेसने बर्गर व सोडा देण्याचेही नाकारले... या घटनेने दुखावलेल्या अलीने स्व्तःच्या गळ्यात असलेले मेडल तोडून काढले व ओहायो नदीत भिरकावून दिले. (हो, त्यावेळी अली ते मेडल कायम गळ्यात घालून फिरत असे!)
या घटने बद्दल अली म्हणतो,
"I was young, black Cassius Marcellus Clay, who had won a gold medal for his country. I went to downtown Louisville to a five-and-dime store that had a soda fountain. I sat down at the counter to order a burger and soda pop. The waitress looked at me.... 'Sorry, we don't serve coloreds,' she said. I was furious. I went all the way to Italy to represent my country, won a gold medal, and now I come back to America and can't even get served at a five-and-dime store. I went to a bridge, tore the medal off my neck and threw it into the river. That gold medal didn't mean a thing to me if my black brothers and sisters were treated wrong in a country I was supposed to represent."
१९९६ च्या "अॅटलांटा ऑलंपीक" ची ज्योत पेटवण्याचा बहुमान अली ला मिळाला व याच स्पर्धेदरम्यान १९६० चे सुवर्णपदक एका खास कार्यक्रमात पुन्हा प्रदान केले गेले व ते अलीने आभारपूर्वक स्वीकारले.
४) नादिया... पर्फेक्ट १० वाली. (पूर्णविराम!!!)
___________________________________________________
तुमच्या कडे नोंद झालेल्या अशा काही घटना असतील तर येवूद्यात.. फक्त ऑलंपीक नव्हे तर खेळांशींही निगडीत.
(क्रिकेटच्या घटनांचा तर पाऊस पडेल अशी शक्यता वाटते :-p तो पडावा अशीही इच्छा आहे. :-))
प्रतिक्रिया
9 Aug 2012 - 2:14 pm | भडकमकर मास्तर
१९८८ सोल ऑलिम्पिक मध्ये ग्रेग लुगानीस ( ग्रीस) डायव्हिंग बोर्डला धडकून त्याच्या डोक्याला मोठी जखम झालेली होती,
अधिक गूगलून माहिती मिळवायला हवी..
इथे या प्रसंगाबद्दल भन्नाट माहिती आहे..
त्याचे पुन्हा गोल्ड मेडल डिफेन्ड करणे मस्त....
शिवाय एड्स असताना, ही माहिती अधिक रोचक...
http://www.infoplease.com/spot/summer-olympics-greg-louganis.html
9 Aug 2012 - 2:28 pm | गवि
ऑलिम्पिक ट्रिव्हियांचं छान कलेक्शन..
बेन जॉन्सन की कोणीतरी (चुभूदेघे) धावक होता.. त्याला १०० मीटर अंतर अविश्वसनीय वेळेत पूर्ण करताना पाहिल्याचं आठवतं. बराच लहान होतो त्या वेळी, पण जे काही सेकंद त्याने घेतले होते ते निव्वळ अशक्य कोटीतले होते. आठ की नऊ पॉईंट काहीतरी. पुन्हा चुभूदेघे..कारण सगळी आठवण धूसर झालीय.. एकदम भारी वाटला होता तो अॅथलीट..
दोनेक दिवसांतच तो उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याची बातमी वाचली आणि प्रतिमाभंग झाला..
9 Aug 2012 - 2:32 pm | मेघवेडा
झकास रे मोदका. छान लेख.
क्रिकेटचं नाव काढलंच आहेत तर काही चटकन आठवणार्या कॉन्ट्रोव्हर्सीज् -
१. सुनील गावस्कर १७४ चेंडूंत ३६ नाबाद. वि. इंग्लंड, लॉर्ड्स. १९७५ वर्ल्ड कप.
२. ट्रेवर चॅपल अंडरआर्म बॉल वि. न्यूझीलंड. एमसीजी. १९८१ बेन्सन & हेजेस कप.
३. वर्ल्ड कप १९९२ सेमीफायनल. एससीजी. द. आफ्रिकेला विजयाकरिता १३ चेंडूत २२ धावा हव्या असताना आलेल्या १२ मिनिटांच्या पावसाने कमी केलेले १२ चेंडू नि सुधारित लक्ष्य - १ चेंडूत २२ धावा!
४. कुठलाही पाकिस्तानी खेळाडू - कुठलंही वर्ष - काहीतरी मिळेलच. ;)
सध्या इतकंच.. बाकी सवडीनं.
9 Aug 2012 - 2:38 pm | अक्षया
ऑलिम्पिक चे अनुभव चांगले मांडलेत.
२५ जुन १९८३ ची वर्ल्ड कप फायनल मॅच !!!
जिंकलो तेंव्हाचा आनंद, जल्लोष अविस्मरणीय आहे..अजुनही दूरदर्शन वर पाहीलेली ती मॅच आठवते..:)
9 Aug 2012 - 2:51 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मोदक राव, क्रिकेट नको रे बाबा. एकतर त्याचे अजीर्ण झाले आहे
दुसरे म्हणजे एकदा लोक क्रिकेट वर बोलायला लागले की बाकीचे खेळ बाजूलाच पडतील, नेहमीप्रमाणे.
9 Aug 2012 - 3:30 pm | गवि
क्रिकेटही चालेल म्हणणे म्हणजे आम्हाला तुमच्या कथा पाठवा यासोबत कविताही चालतील असं म्हणण्यापैकी आहे...
9 Aug 2012 - 3:32 pm | स्पा
क्रिकेटही चालेल म्हणणे म्हणजे आम्हाला तुमच्या कथा पाठवा यासोबत कविताही चालतील असं म्हणण्यापैकी आहे..
अहो गवि चारचौघात बोलताना.. जरा कविमनाचा विचार करत जा कि ;)
9 Aug 2012 - 6:00 pm | मोदक
>>>बाकीचे खेळ बाजूलाच पडतील, नेहमीप्रमाणे
नाय रे विमे.. माझ्याकडे (क्रिकेट सोडून) अजून अशा घटनांची लिस्ट आहे .. हळू हळू देतो* :-)
*स्वत:चा धागा वर ठेवण्याचा क्षीण प्रयत्न वगैरे खवचट प्रतिसादांची तयारी ठेवली आहे ;-)
9 Aug 2012 - 3:00 pm | ५० फक्त
ऑलंपीक - अविस्मरणीय क्षण. - यातले काही क्षण जर स्वत अनुभवलेले असतील भले टिव्हीवर का असेना पण अनुभवले असतील तर त्याबद्दलच्या अविस्मरणीतयतेबद्दल काही लिहिणं ठिक आहे, प्रत्यक्ष एवढ्या सा-या ऑलिंपिक मध्ये यापेक्षा जास्त मजेच्या, धाडसाच्या किंवा उल्लेखनीय घटना घडल्या असतील, त्यातला काही घटनांना त्यावेळच्या आणि सध्याच्या मिडियाने उचलुन धरलं, मग आता आपण पुन्हा त्यांचंच पुन्हा कौतुक करण्यात काय हशील आहे. ?
मोदक,एक विनंती, आंतरजालावर इतर ठिकाणी उपलब्ध माहितीवर आधारीत , अनुवाद करुन किंवा भाषांतर करुन धागे का धागे काढतो ,पुस्तकं वाचुन किंवा पुस्तकाबद्दल लिहिणं, स्वैर अनुवाद करणं हे समजु शकतो, पण हे जरा आसाऑस्टं होतं आहे. तुझी चांगली लेखनक्षमता आणि शैली अशा प्रकारच्या इंडिया टिव्ही टाईप लिखाणात वाया घालवु नकोस.
अवांतर - ते 'ऑलंपिक' चं ऑलिंपिक करता येईल का?
9 Aug 2012 - 3:25 pm | स्पा
.
9 Aug 2012 - 4:15 pm | किसन शिंदे
:)
9 Aug 2012 - 4:22 pm | किसन शिंदे
दोनदा आला आहे.
9 Aug 2012 - 4:42 pm | बॅटमॅन
अदोरेकित सबुदाचा अरथ काय?
9 Aug 2012 - 4:45 pm | किसन शिंदे
आऊट साईड ऑफ स्टंप
9 Aug 2012 - 5:57 pm | बॅटमॅन
धन्स...बाकी हा शॉफॉ जरा कैच्याकैच होता बरं का!!
9 Aug 2012 - 5:55 pm | मोदक
>>>एवढ्या सा-या ऑलिंपिक मध्ये यापेक्षा जास्त मजेच्या, धाडसाच्या किंवा उल्लेखनीय घटना घडल्या असतील
हे मान्य. पण या सगळ्या घटना सर्वांनाच माहिती असतील असे नाही म्हणून मला माहिती असलेल्या थोड्या घटना लिहून सुरूवात केली.. बाकी सर्वजण प्रतिसादातून भर घालतीलच हा धाग्याचा उद्देश होता / आहे.
तसेच "खेळ" हा विषय निघाला की क्रिकेट ला टाळून मी पुढे जावू शकत नाही म्हणून तेही मुद्दाम अॅडवले. (हे वैयक्तीक मत आहे)
>>>मोदक,एक विनंती, आंतरजालावर इतर ठिकाणी उपलब्ध माहितीवर आधारीत , अनुवाद करुन किंवा भाषांतर करुन धागे का धागे काढतो, पुस्तकं वाचुन किंवा पुस्तकाबद्दल लिहिणं, स्वैर अनुवाद करणं हे समजु शकतो, पण हे जरा आसाऑस्टं होतं आहे.
आज असा कोणता विषय आहे ज्याची माहिती जालावर उपलब्ध नाहीये?
माझ्या लेखनाला विकीपांडीत्य समजा हवे तर पण या घटना बर्याच लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीयेत ही वस्तुस्थिती आहे, आणि यांवर बहुदा मराठीत खूप कमी लिखाण झाले आहे... म्हणून हे सगळे मराठीत आणण्याचा प्रयत्न करतो आहे.
>>>तुझी चांगली लेखनक्षमता आणि शैली अशा प्रकारच्या इंडिया टिव्ही टाईप लिखाणात वाया घालवु नकोस.
अहो कसली लेखन क्षमता? सकाळी सणक आली आणि तासाभरात लेख खरडला. ;-)
तुमची कळकळ समजू शकतो, आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद..! :-)
9 Aug 2012 - 6:29 pm | मन१
चांगलं लिहितो आहेस, ते मर्जर -अॅक्विझिशन बद्दलच इतकं सगळं पहिल्यांदाच वाचायला मिळालं.
अशीच वेगवेगळ्या, नवनवीन गोष्टींची ओळ्ख झाली तर बरं.
9 Aug 2012 - 3:07 pm | सुधीर
घटना नव्याने कळल्या. तिनही घटना खासच. विजय कुमारला रौप्य पदक मिळवताना यावेळी थेट पाहिलं. ऑलिम्पिक वगळता असे खेळ बघायला नाही मिळत.
लक्षात राहिलेला क्रिकेटचा सामना एकच! साऊथ-आफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिआ १९९९ चा उपांत्य फेरीतला सामना, एवढा थरार यापूर्वी अनुभवला नव्हता.
9 Aug 2012 - 3:13 pm | तुषार काळभोर
भारत वि ऑस्ट्रेलिया-६ वा सामना, कोकाकोला कप (२२ एप्रिल १९९८)
पहिला डाव: ऑस्ट्रेलिया २८४/७ (५० षटके ) - बेवन १०१(१०३), मार्क वॉ ८१(९९)
भारताला जिंकण्यासाठी २८५ धावांची गरज. पण हरलो तरी २५४ धावा हव्या होत्या न्युझीलंडला निव्वळ धावगतीवर मागे टाकून अंतिम सामना गाठण्यासाठी. ऑस्ट्रेलियाने (नेहमीप्रमाणे ) आधीच अंतिम सामन्यातील जागा निश्चित केलेली. भारताची मदार गांगूली, सचिन, अझरुद्दीनवर. सावध पाठलाग चालू झाला. १७च्या वैयक्तिक आणि संघाच्या ३८ धावा असताना गांगुली गेला. तिसर्या क्रमांकावर बढती दिलेल्या मोंगियाने सचिनला अर्धशतकी भागिदारीत साथ दिली. १०७ वर तो गेला. सचिनचे अर्धशतक झाल्यावर तो ब्रेकफेल झाल्यागत सुटला. आणि शारजातल्या वाळवंटात धुळीचं वादळ सुरू झालं. सामना २५ मिनिटं थांबवण्यात आला. वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी ४ षटके कमी करण्यात आली. आणि भारताला नवीन लक्ष्य मिळालं ४६ षटकात जिंकण्यासाठी २७६ आणि फायनलसाठी २३७ धावा.
धुळीचं वादळ शमलं, पण सचिन नावाचं वादळ ऑस्ट्रेलियावर पसरलं होतं. १३१ बॉल्समध्ये ९ चौकार व ५ षटकार मारून १४३ धावा फटकावल्या त्यानं. फायनलसाठी आवश्यक २३७ धावा झाल्यावर ४३व्या षटकात २४२ वर सचिन बाद झाला. बाकीच्यांनी राहिलेल्या ३ षटकात ८ धावा केल्या. भारत सामना हरला होता पण भारताला फायनल मध्ये पोहचवून सचिन जिंकला होता.
(फायनलमध्येही सचिनने १३१ बॉल्स मध्ये १३४ धावा तडकावल्या आणि भारताला २५व्या वाढदिवशी विजय मिळवून दिला. या सीरिजनंतर मायदेशी परतल्यावर शेन वॉर्नने "सचिन आपल्या गोलंदाजीवर षटकार मारत असल्याची स्वप्ने पडतात", अशी कबूली दिली होती.)
9 Aug 2012 - 3:33 pm | स्पा
पहिला किस्सा भन्नाटच आहे
धन्यवाद
9 Aug 2012 - 3:40 pm | स्पंदना
व्वा! मस्त माहिती. नादियाचा तर पिक्चर पाहिलाय मी. तिच्या आईने ती प्युबर्टीत आल्यावर तिचा खेळ बंद करुन टाकला. किती वाईट्ट वाटल बघ्ताना.
मोदक लेख मोद देणारा आहे.
9 Aug 2012 - 6:36 pm | sagarpdy
१९९९ ची युरोपियन फुटबॉल चाम्पियान्शीप ची फायनल. मेनचेस्टर युनायटेड आणि बायर्न म्युनिच या दोन बलाढ्य संघांची टक्कर. म्युनिच ने सुरुवातीच्या काहि मिनिटातच गोल टाकला. आणि नंतर ९० मिनिटं होउन खेळ जादाच्या ३ मिनिटात गेला.
९०:०० स्कोर 'म्युनिच १-० युनायटेड'
९०:३६ स्कोर 'म्युनिच १-१ युनायटेड'
९२:१७ स्कोर 'म्युनिच १-२ युनायटेड'
अधिक माहिती
9 Aug 2012 - 6:43 pm | तुषार काळभोर
फुटबॉल/हॉकी मध्ये जादा वेळ का असते?
9 Aug 2012 - 7:45 pm | sagarpdy
जादा वेळेला "injury time" असे म्हणतात. माझ्या माहिती प्रमाणे खेळामध्ये होणाऱ्या दुखापती , फौल्स ई. मध्ये खेळाचा जो वेळ वाया जातो त्याची भरपाई म्हणून हि जादा वेळ दिली जाते.
10 Aug 2012 - 10:34 pm | अप्पा जोगळेकर
छान. महंमद अलीच्या बाबतीत घडलेली घटना तर अतिशय चटका लावणारी.
11 Aug 2012 - 12:16 am | मोदक
अली ने व्हिएतनाम युध्दात भाग घ्यायला दिलेला नकार आणि त्या दरम्यान केलेल्या वक्तव्यातून जगाला एक वेगळा अली दिसला.
I ain't got no quarrel with them Viet Cong. they never called me nigger
_______
“You want me to do what the white man says and go fight a war against some people I don't know nothing about - get some freedom for some other people when my own people can't get theirs? We’re over there so that the people of South Vietnam can be free. But I'm here in America and I'm being punished for upholding my beliefs.”
_______
"No, I am not going 10,000 miles to help murder kill and burn other people to simply help continue the domination of white slavemasters over dark people the world over. This is the day and age when such evil injustice must come to an end."
_______
Why should they ask me to put on a uniform and go ten thousand miles from home and drop bombs and bullets on brown people in Vietnam while so-called Negro people in Louisville are treated like dogs and denied simple human rights?
11 Aug 2012 - 12:41 am | इनिगोय
बापरे, कसलं धाडस म्हणायला पाहिजे हे. अजिबात माहीत नसलेल्या खूप गोष्टी तुझ्या लेखांमधनं कळतात. लिहित राहा. "दयतलोव्ह पास ची मालिकाही जमल्यास पूर्ण करणार का?