ऑलंपीक - अविस्मरणीय क्षण.
ऑलंपीक - अविस्मरणीय क्षण.
"ऑलंपीक" हा शब्द जरी उच्चारला किंवा कानावर आला की खालच्या घटना डोळ्यासमोरून स्लाईड शो प्रमाणे झरझर सरकू लागतात, काळ वेळ ठिकाण सर्व विसरून!!
१) डेरेक रेडमंड - १९९२ बार्सिलोना ऑलंपीक.
४०० मीटर धावण्याची सेमी फायनल सुरू झाली.. पूर्ण भरात असलेल्या डेरेक रेडमंड ने भन्नाट सुरूवात केली.. अर्धे अंतर पार केले न केले तोच त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला. होणार्या वेदनांमुळे रेडमंड ट्रॅकवरच कोसळला. बाकीचे स्पर्धक पुढे निघून गेलेच होते. ऑलंपीकचे स्वप्न भंगल्याचे दु:ख इतके तीव्रपणे जाणवले की रेडमंड हमसून हमसून रडू लागला. ट्रॅकवर जखमी रेडमंड भोवती मेडीक आणि इतर सपोर्ट्सचा गराडा पडला. त्यांची मदत नाकारून अचानक काहीतरी ठरवल्याप्रमाणे रेडमंड उठला.. लंगडत लंगडत पळू लागला..."रेस पूर्ण करायची" या उद्देशाने.
अचानक त्याच्या खांद्यावर एक हात जाणवला. ट्रॅकभोवती संरक्षणासाठी असलेल्या गार्डसोबत अक्षरश: भांडून, ढकलाढकली करून व त्यांना गुंगारा देवून डेरेक रेडमंडच्या मदतीसाठी एक माणूस आला होता. त्याचे वडील 'जिम रेडमंड'.
आपला मुलगा वेदनेने तळमळत आहे हे पाहून पुढचा कोणताही विचार न करता मदत करणार्या वडिलांचा आधार डेरेक ने घेतला व आता ट्रॅकवर दोघे पळू लागले.. "रेस पूर्ण करायची" या उद्देशाने.
आता गेम ऑफीशियल्स ट्रॅकवर आले व जिम रेडमंडशी वाद घालू लागले, ते वडीलच आहेत हे कळाल्यावर ऑफीशियल्स चा ही नाईलाज झाला. (हे सगळे सुरू असताना डेरेक आणि जिम हळूहळू धावतच होते... फिनीश लाईनकडे)
फिनिश लाईनच्या थोडे आधी डेरेकने वडीलांचा हात सोडला व रेस पूर्ण केली. ६५००० प्रेक्षक स्टँडींग ओवेशन देत असताना...
जरी ऑलंपीक रेकॉर्डमध्ये डेरेक या रेस मधून "ऑफिशीयली" बाद झाला असला आणि निकाल "Did Not Finish" असा असला तरी या कृतीने डेरेक ऑलंपीक इतिहासात जावून बसला. ही घटना इंटरनॅशनल ऑलंपीक कमिटीच्या 'Celebrate Humanity' videos' मध्ये दाखल झाली, डेरेकने रिटायरमेंट नंतर ऑलंपीक चळवळीसाठीही काम केले.
वडील जिम रेडमंड ना २०१२ लंडन ऑलंपीक टॉर्च "कॅरी" करण्याचा बहुमान मिळाला.
डेरेक व जिम रेडमंड बार्सिलोना ऑलंपीकमध्ये
२) अमेरीकन बास्केटबॉल टीम - १९७२ म्यूनीक ऑलंपीक
१९७२ साल, ऑलंपीकची गोल्ड मेडल मॅच, स्पर्धक कोण तर अमेरीका आणि रशिया. (साल आणि स्पर्धक यांच्याकडे विशेष लक्ष द्या!)
खेळ संपायला ३ सेकंद राहिले असताना.... ............. स्कोर -- रशिया ४९ - अमेरीका ४८
अमेरीकेने पुढच्या दोन सेकंदात दोन पॉईंट मिळवले .... स्कोर -- रशिया ४९ - अमेरीका ५०
खेळ संपायला १ सेकंद उरला होता.. आणि पुढे जे झाले ते कोडे कुणालाच कधीच सुटले नाही.
आत्तापर्यंतची सर्वाधीक वादग्रस्त ऑलंपीक मॅच.. या गेममध्ये इतके निर्णय बदलले गेले, इतके गोंधळ झाले की आजही कोणताही स्पष्ट निर्णय लागला नाहीये. फायनल मॅचमध्ये वादग्रस्त परिस्थितीत गोल्ड मेडल हरल्याचे अमेरीकन टीमच्या इतके जिव्हारी लागले की ४० वर्षांनंतरसुध्दा या मॅचचे सिल्व्हर मेडल्स त्यावेळच्या अमेरीकन बास्केटबॉल टीमने स्वीकारले नाहीयेत. अमेरीकन बास्केटबॉल व इंटरनॅशनल ऑलंपीक कमिटी (IOC) वगैरेनी बर्याच विनंत्या केल्या पण कांही खेळाडू आजही सिल्वर मेडल न स्वीकारण्यावर ठाम आहेत.
एका खेळाडूने तर त्याच्या मृत्यूपत्रात, बायकोने, मुलांनी व त्याच्या पुढच्या पिढ्यांनी "सिल्वर मेडल स्वीकारू नये" असे आदेश दिले आहेत.
या मॅचची अधिक माहिती -इथे
मराठीत वर्णन (मला तरी) शक्य नाही इतकी गुंतागुंत आहे शेवटच्या ३ सेकंदात!!
३) मुहम्मद अली.
ही घटना ऑलंपीकशी निगडीत आहे कोणत्याही ऑलंपीकदरम्यान घडलेली नाही.
वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी "रोम ऑलिम्पिक" मध्ये "गोल्ड मेडल" चा बहुमान मिळवून अली ने करीयरची झकास सुरूवात केली. मायदेशी मात्र तो एक ऑलंपीक विजेता असला तरी पहिला एक "कलर्ड" होता व नंतर सुवर्णपदक विजेता.
एके दिवशी एका रेस्त्रॉ मध्ये गेले असताना त्याला अत्यंत हीन वागणूक मिळाली. वेट्रेसने बर्गर व सोडा देण्याचेही नाकारले... या घटनेने दुखावलेल्या अलीने स्व्तःच्या गळ्यात असलेले मेडल तोडून काढले व ओहायो नदीत भिरकावून दिले. (हो, त्यावेळी अली ते मेडल कायम गळ्यात घालून फिरत असे!)
या घटने बद्दल अली म्हणतो,
"I was young, black Cassius Marcellus Clay, who had won a gold medal for his country. I went to downtown Louisville to a five-and-dime store that had a soda fountain. I sat down at the counter to order a burger and soda pop. The waitress looked at me.... 'Sorry, we don't serve coloreds,' she said. I was furious. I went all the way to Italy to represent my country, won a gold medal, and now I come back to America and can't even get served at a five-and-dime store. I went to a bridge, tore the medal off my neck and threw it into the river. That gold medal didn't mean a thing to me if my black brothers and sisters were treated wrong in a country I was supposed to represent."
१९९६ च्या "अॅटलांटा ऑलंपीक" ची ज्योत पेटवण्याचा बहुमान अली ला मिळाला व याच स्पर्धेदरम्यान १९६० चे सुवर्णपदक एका खास कार्यक्रमात पुन्हा प्रदान केले गेले व ते अलीने आभारपूर्वक स्वीकारले.
४) नादिया... पर्फेक्ट १० वाली. (पूर्णविराम!!!)
___________________________________________________
तुमच्या कडे नोंद झालेल्या अशा काही घटना असतील तर येवूद्यात.. फक्त ऑलंपीक नव्हे तर खेळांशींही निगडीत.
(क्रिकेटच्या घटनांचा तर पाऊस पडेल अशी शक्यता वाटते :-p तो पडावा अशीही इच्छा आहे. :-))

(क्रिकेटच्या घटनांचा तर पाऊस पडेल अशी शक्यता वाटते :-p तो पडावा अशीही इच्छा आहे. :-))वर्गीकरण
प्रतिक्रिया
१९८८ सोल ऑलिम्पिक मध्ये
ऑलिम्पिक ट्रिव्हियांचं छान
झकास रे मोदका. छान
ऑलिम्पिक चे अनुभव चांगले मांडलेत..:)
(क्रिकेटच्या घटनांचा तर पाऊस
हो...
ख्याक
बाकीचे खेळ बाजूलाच पडतील, नेहमीप्रमाणे..
ऑलंपीक - अविस्मरणीय क्षण. -
+१
+२
प्रतिसाद
पण हे जरा आसाऑस्टं होतं
अदोरेकित सबुदाचा अरथ काय? आऊट
धन्स...बाकी हा शॉफॉ जरा
ह्म्म..
मोदक...
छान माहिती
शारजातलं वादळ
पहिला किस्सा भन्नाटच
व्वा! मस्त माहिती. नादियाचा
१९९९ ची युरोपियन फुटबॉल
जेन्युईन प्रश्न
जादा वेळेला "injury time" असे
छान. महंमद अलीच्या बाबतीत
ह्म्म्म...
बापरे, कसलं धाडस म्हणायला