अनिरुद्ध अभ्यंकरांची 'वय सोळावं सरलं की' ह्या तरल कवितेतल्या भावना साठीच्या 'हिरवट' चष्म्यातून पहायचा एक चाळा! ;)
वय साठावं लागलं की
सगळं 'हिरवट' सुचू लागतं
बसल्याजागी डुलकी घेत
स्वप्नात 'पाखरू' दिसू लागतं
मंडईच्या 'बागे'मध्ये
चाफ़ा केवडा दिसू लागतात
पूजेसाठी फुलं आणायला
'म्हातारे' ही निघू लागतात
न बघता प्रत्येकाच्या
नजरा कुठे कळू लागतं
वय साठावं लागलं की.....
अवसेच्या रातीला
बोचरी अनावर थंडी होते
खोकणार्या म्हातार्याला
भेटायला 'ब्रँडी' येते
'औषधाची' ही भाषा
प्रत्येकजण बोलू लागतं
वय साठावं लागलं की.....
पिरपिरणारा पाऊस अन
करवादणारी 'प्रीत' असते
गवतीचहा, आलं घालून
आता चहाची रीत असते
नाठाळ मन चॅनलवर
'मल्लिका'ला शोधू लागतं
वय साठावं लागलं की.....
पांढरट करड्या केसांमध्ये
'अनुभवाचं' सार असतं
त्या मोत्याच्या नजरबिंदूत
'नायके' काही फार नसतं
'नवं-जुनं' काही बघता
'जस्ट डू इट!' गर्जू लागतं
वय साठावं लागलं की....
चतुरंग
प्रतिक्रिया
13 Aug 2008 - 1:05 am | संदीप चित्रे
पिरपिरणारा पाऊस अन
करवादणारी 'प्रीत' असते
गवतीचहा, आलं घालून
आता चहाची रीत असते
नाठाळ मन चॅनलवर
'मल्लिका'ला शोधू लागतं
वय साठावं लागलं की.....
वा वा ! क्या बात है :)
13 Aug 2008 - 1:16 am | बिपिन कार्यकर्ते
पांढरट करड्या केसांमध्ये
'अनुभवाचं' सार असतं
त्या मोत्याच्या नजरबिंदूत
'नायके' काही फार नसतं
'नवं-जुनं' काही बघता
'जस्ट डू इट!' गर्जू लागतं
वय साठावं लागलं की....
रंगाशेठ, मस्तच आहे बॉ....
बिपिन.
13 Aug 2008 - 1:25 am | केशवसुमार
रंगाशेठ,
चाळीशी पेक्ष्या साठी बेष्ट दिसते आहे..
सगळीच कडवी झकास.. अभिनंदन..
(निवृत्त हिरवट)केशवसुमार
स्वतःशी वेड्यासारखी बडबडः धन्याशेठ पालथ्या घड्यावर पाणी ...
13 Aug 2008 - 1:41 am | बेसनलाडू
'शौकीन'ची आठवण झाली :)
(शौकीन)बेसनलाडू
13 Aug 2008 - 12:08 pm | स्वाती दिनेश
'शौकीन'ची आठवण झाली
मलाही.. :)
कविता आवडली हे वेसांनल.
स्वाती
13 Aug 2008 - 3:42 am | मदनबाण
मस्त विडंबन..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
13 Aug 2008 - 4:21 am | सर्किट (not verified)
वय साठावं लागलं की
सगळं 'हिरवट' सुचू लागतं
बसल्याजागी डुलकी घेत
स्वप्नात 'पाखरू' दिसू लागतं
रंगाशेठ,
साठीचे वर्णन झकास, आता साठीकडे डोळे लावून बसावे लागणार.
- सर्किट
(स्वगतः "अनुभवी" लोकांना विचारावे का ? नकोच, उगाच एखादे अनुभवकथन यायचे. )
13 Aug 2008 - 6:16 am | प्राजु
असं असतं तर साठावं..! हरकत नाही.
कविता छान आहे. आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
स्वगत : बहुतेक मधुचा प्याला रीताच राहणार की काय??
13 Aug 2008 - 7:07 am | सहज
विडंबन छान :-)
स्वगतः - पण एकही साठीचा /ची प्रतिक्रिया देत नाही तोवर काही खर्या अर्थाने....
13 Aug 2008 - 9:37 am | प्रमोद देव
रंगाशेठ विडंबन म्हणून आणि एक स्वतंत्र कविता म्हणूनही सगळं कसं मस्त जूळून आलंय.
लगे रहो रंगाभाय!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
13 Aug 2008 - 9:45 am | आनंदयात्री
मस्त जमलंय !!
>>बसल्याजागी डुलकी घेत
>>स्वप्नात 'पाखरू' दिसू लागतं
खी खी खी .. चित्रदर्शी की काय ते असच वाटलं !! :)
(सहजराव तुमचं स्वगत बघा तुमच्या प्रतिसादाच्या खालीच लगेच पुर्ण झाले ;) )
13 Aug 2008 - 2:15 pm | पद्मश्री चित्रे
'साठी ' ची कविता/विडंबन मस्स्स्त...