दाराज कट्टा...लाईव्ह..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
22 Jul 2012 - 6:25 pm

मी आणि रामदासकाका वेळेतच दाराज च्या दिशेने निघालो..


वेटिंगमधे गप्पा सुरु..

तेरा जण जमा झालेत..

नीलकांत मालक,ररामदासकाका,निदे,मकी,योगी९००,प्रास्,पन्नासराव्,मोदक्,मनोज,पंकज आणि गणपा द ग्रेट.

वावरमुक्तकविचार

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jul 2012 - 10:20 pm | बिपिन कार्यकर्ते

*&*&(*^*@%^^*(*)_()#(*ऑ&ई&ऊर्‍ञ्ट्ञ्ञीऑवूईऑअ‍ॅपीव्पॅईऑईञी^&^&*^*(&@)(&#@&(*^(*

प्यारे१'s picture

24 Jul 2012 - 9:59 am | प्यारे१

*&*&(*^*@%^^*(*)
*&*&(*^*@%^^*(*)
*&*&(*^*@%^^*(*)
*&*&(*^*@%^^*(*)

ओळीत शिव्या दिल्यात. पुणेकर झाल्याचा फील! दुसरं काय?

विशु एकदम झक्कास फोटो :)
आणि दुसरा तो छोटु एकदम क्युट :)

किसन शिंदे's picture

23 Jul 2012 - 10:29 pm | किसन शिंदे

हा विशु कोण???

विशु म्हणजे विश्वनाथ मेहेंदळे असावेत.

सुनील's picture

23 Jul 2012 - 10:38 pm | सुनील

वर्णन आणि फोटाँवरून कट्टा एकंदरीत जोरदार झाला हे दिसतेच आहे! अभिनंदन!

सुधीर's picture

23 Jul 2012 - 10:41 pm | सुधीर

लिहिणारा कसा दिसतो हे बघायची नेहमीच उस्तुकता असते. काही नवीन चेहर्‍यांची ओळख झाली. वेळेअभावी मिपाचे सगळेच लेख वाचायला मिळत नाहीत. त्यामुळे कधी-कधी संदर्भ लागत नाहीत. आजच कळलं की, निलाकांत मालक झाले आहेत ते. मी अजुन पर्यंत तात्याच मालक आहेत असं समजत होतो.

तात्यांच्या लेखांचा पंखा होतो म्हणून त्यांच्या मागोमाग पाच-एक पर्षापूर्वी मिपावर आलो. गेल्या ५ वर्षात झालेले काही बदल कळले नाहित. काही आयडी गायब झाले (वा कदाचित दुसर्‍या आडीने वावरत असतील) तर काही इकडे तिकडे गेले. असो, तात्यासाहेब झुकरबर्गकरांनी मिपाचा आय. पि. ओ येण्यापूर्वीच शेअर विकले तर! निलाकांतांना शुभेच्छा. मिपा परिवारामधला स्नेह असाच वृद्धिंगत होवो.

माझा पहिलाच कट्टा एकदम दणक्यत झाला. आजवर कुठल्या आनंदाला मुकत होतो याची प्रचिती आली. गफ्फांचा रंगलेला फड (अस्मादिकांना घरी तोंड उघडण्याची सवय नसल्याने श्रवणभक्तीच जास्त केली. मकीने तिच्या प्रतीने प्रयत्नांची शर्थ केली पण आम्ही बधलो नाही. ;) ), एक मेकांची यथेच्छ खेचा-खेची, रामदास काकांचे अनुभवाचे बोल, सर्व काही भन्नाट. दुपार पर्यंत कट्ट्याचा हाता तोंडाशी आलेला घास हुकतो की काय? अशी भिती लागुन राहीली होती. कट्ट्या पुर्वी प्रासभौंशी दुरद्वनीवरुन बोलणे झाले होतेच. त्यात त्यांनी त्यांच्या डोक्यावरील टांगत्या तलवारीची कल्पना दिली होती. ;)
भारतीय प्रमाण वेळे नुसार १५-२० मिनीटे कट्टयाला उशीरा पोहोचलो. त्यामुळे फार फार तर २-३ मंडळी आलेली असतील असा अंदाज होता. पण कट्टोत्सुक मंडळींनी माझा अंदाज सपशेल चुकवला. १०-१२ मंडळी आधीच हजर होती. जवळच रहात असुन उशिरा पोहोचल्याने थोडासा ओशाळलो. पण उत्तम नट असल्याने माझे भाव कुणाला ओळखता आले नाहीत. ;)
बाकी सर्व वर्णन वर आलेलं आहेच त्यामुळे माझी ठिगळं जोडत नाही. :)
असे कट्टे वारंवार होवोत. मिपाधर्म फुलत राहो. आणि त्यांना उपस्थित रहाण्याचं भाग्य लाभो हीच श्रीचरणी प्रार्थना.

स्पा's picture

24 Jul 2012 - 9:47 am | स्पा

तेजायला कट्टा वाईट जबराट झालेला दिसतोय .
विमे, गवि.. भारी वृतांत :)

इरसाल's picture

25 Jul 2012 - 9:17 am | इरसाल

कदाचित अजुन काही कट्टेकरी ओव्हर हँगमधुन बाहेर आलेले दिसत नाहीत म्हणुन २ प्रतिसाद कमी पडत आहेत.हा ९९ वा

पप्पुपेजर's picture

25 Jul 2012 - 9:20 am | पप्पुपेजर

१०० वा प्रतिसाद

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jul 2012 - 11:43 am | अत्रुप्त आत्मा

आले कट्ट्याला... ;-)

राम राम दोस्तहो!

देर आये दुरुस्त आये, या उक्तीला सार्थ करून अस्मादिक आपला कट्टा वृत्तांत देत आहोत. ;-)

महिन्याभरापूर्वी आमच्या लिखाणातली नेहमीची ;-) चूक दुरूस्त करण्याची विनंती मान्य करताना कार्यरत ;-) संपादक गणपाशेठांनी त्यांच्या मुंबई वारीची कल्पना दिली आणि त्यादरम्यान काही मिपाकरांना भेटण्याची इच्छा जाहिर केली. त्यांच्या मागल्या वेळच्या मुंबईभेटीच्या वेळी काही अपरिहार्य कारणामुळे ते घडू शकले नव्हते तेव्हा त्यांना भरपूर अपशब्दांचे धनी व्हावे लागल्याने यंदा लो प्रोफाईल कट्टा व्हावा अशी त्यांची इच्छा होती, म्हणजे या वेळच्या टांग देण्याचा जास्त गाजावाजा झाला नसता ;-)

या विषयी गवि नि विमेकाकांशी बोलल्यावर त्यांनी नि विशेषतः विमेकाकांनी लो प्रोफाईल प्रयोजन पार उडवून लावलं आणि कट्ट्याच्या जोशपूर्ण आयोजनाचा घाट घातला. व्यनितल्या मोठ्ठ्या काथ्याकुटानंतर दाराज् धाबा हे स्थळ निश्चित झालं आणि मी जाहीर धागा टाकला. धाग्यावर आणि व्यनिंतून अनेकांनी हजर राहण्याचं कळवलं नि त्यातले अनेक जण आलेही.

नीलकांत, मनोज, योगी, प्रभो, पंकज आणि गणपा यांना पहिल्यांदाच भेटलो. गवि, विमे, रामदासकाका, मोदक, सुझे, माशँ, ५०राव, निदे, मकी, किसन यांच्याइतकंच त्यांच्याशीही उत्तम मैत्र प्रस्थापित झालं. कट्ट्याला फोनवरून हजेरी लावलेल्या जयपाल नि विजुभाऊंचेही आभार. अर्थात तशीच हजेरी मकीच्या फोनवरून पैसाताईंनीही लावली. पैसाताईशी पहिल्यांदाच बोलत होतो तरी तसं जाणवलंच नाही. वर्षानुवर्षाची मैत्री असल्यासारखेच बोललो. अर्थात तिलाही असंच वाटलं असेल अशी आशा आहे ;-)

गणपाला किडनॅप करायचा प्लान अजूनही विचाराधीन आहे. यंदा इम्प्लिमेन्ट होईल अशी आशा आहे. ;-)

खादाडीत निरामिष टोक मी लढवत होतो नि मला निदे, मकी, ५० राव, किसन, पंकज आणि माशँ मदतीला होते. निदेच्या आदेशाने मी ऑर्डरी देत सुटलो. हरा भरा कबाब, नरम दिल कबाब, गोबी मंचुरियन, मकई कटोरी अशा स्टार्टर्स नंतर बेबीकॉर्न मसाला, पंजाबी दम आलू आणि दाल मखनी यांच्यासोबत रोटींची नि नानची चळत पुढे आली. माशँसाठी पनीर बटर मसाला मागवलेला कारण त्यांना तिखट नको होतं. यातलंच पनीर त्यांनी कुणाशीच शेअर केलं नाही :angry: बाकी सगळेच पदार्थ चविष्ट होते. मी, ५० राव नि माशँनी खाण्याचा शेवट भाताने केला. भात नसेल तर जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतंच नाही ना आम्हाला ;-)

सगळ्यांचं खाणं होऊनही अखेरपर्यंत खिंड मी लढवली नि सवयीप्रमाणे ताट स्वच्छ करूनच उठलो तोच विमेकाकांनी पंजाबी लस्सी शेअर करायचा आदेश दिला नि त्या तवरल्या अवस्थेतच आम्ही वदलो, "नेकी और पूछ पूछ?" आमचं पाहून अनेकांना लस्सी प्याविशी वाटली मग त्यानंतर लस्सी आस्वादनाचा जंगी कार्यक्रम झाला.

दाराज् च्या गेटवर ग्रूपफोटो काढल्यावर मिपाकर वेगवेगळ्या दिशेला पांगले. पण मी धाग्यावर लिहिलेला,

मिसळपाव धर्म वाढवावा । अवघा हलकल्लोळ करावा ॥

हा कट्ट्याचा उद्देश निश्चितच पूर्ण झाला अशीच आमची सर्वांची धारणा होती.

परतताना, मिरारोड ते दादर मालक, मी नि विमेकाकांच्या संगती होते. प्रवासात नेहमीप्रमाणेच नक्षलवाद ते धर्म अशा हॉट टॉपिकांवर त्रिकोणी परिसंवाद घडला. तेव्हा तो ऐकायला आजुबाजूला जनसागर उसळलेला हे सर्व सदस्यांनी लक्षात घ्यावं नाही तर सम्मेलनात परिसंवाद घडलाच नाही असं वाटायचं, शक्य आहे का ते? :-p आणि अर्थात प्रत्यक्ष मिपाकरांच्या कट्ट्यावरच्या संवादांचे परिक्षण उघडपणे करणे अशक्य आहे. त्यावर व्यनित बोलू ;-)

एकूण काय तर मिसळपाव मान्सून सम्मेलन २०१२ उत्तम प्रकारे पार पडले. उपस्थित सर्वांचे आभार. पुढच्या अशा प्रसंगी उपस्थितीचे उच्चांक नव्याने प्रस्थापित व्हावे अशी श्रींचरणी प्रार्थना.

चांग भलं...............

माझीही शॅम्पेन's picture

26 Jul 2012 - 12:50 pm | माझीही शॅम्पेन

माशँसाठी पनीर बटर मसाला मागवलेला कारण त्यांना तिखट नको होतं. यातलंच पनीर त्यांनी कुणाशीच शेअर केलं नाही

माफी हुजुर ! पुढिल खेपेस सर्वाना स्पेशल पनीर डिश खिलवुन प्रायश्चित घेण्यात येतील :)

स्पंदना's picture

26 Jul 2012 - 7:51 am | स्पंदना

वर्णन आवडल! दोघा तिघांकडुन ऐकुन ही पुन्हा पुन्हा पहावस वाटल.

विलासराव's picture

1 Aug 2012 - 2:13 pm | विलासराव

काही अपरीहार्य कारणाने येउ शकलो नाही.
पुढील कट्ट्याला हजेरी लावली जाईल.