पुढे लिहिलेले चित्रपट मी कमीत कमी २ वेळा तरी पाहिले आहेत (पहिले चार) किंवा एकदाच पाहिले असल्यास पुन्हा पाहण्याची इच्छा आहे. त्यानुसार मी हे आवडलेले चित्रपट म्हणून सांगत आहे. ह्या चित्रपटाच्या कथानकाचा, कलाकारांच्या कलेचा दर्जा एकदम उच्च नसला तरी आवडण्यासारखाच वाटला. तसेच आता पाहिल्यास तेवढेच आवडतील का ह्याची खात्री मलाही नाही :) पण तुम्हा सर्वांसमोर ही यादी देण्यासारखे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. तसेच कथानक लिहिण्यास/वाचण्यास आवडत नसले तरी वाचकांना ह्या चित्रपटांची ढोबळ कल्पना यावी म्हणून तेही लिहिले आहे.
यूंही कभी
-एक साध्या, नेहमी लोकांना मदत करणार्या माणसाला देव भेटतो व जगाचे रक्षण करण्याकरीता लोकांना संदेश देण्याकरीता सांगतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात घडलेले प्रसंग ह्यात दाखवलेले आहेत.
कलाकार: कुमार भाटिया, अशोक कुमार, अर्चना पुरण सिंह, नविन निश्चल.
ऐसी भी क्या जल्दी है?
-इंग्रजी सिनेमा ’फादर ऑफ द ब्राईड’ वरून घेतलेला सिनेमा. स्वत:च्या मुलीवर अतिप्रेम करणार्या व अतिचिंता करणार्या वडिलांचे, मुलगी लग्न झाल्यावर घरातून जाईल ह्या कारणाने मुलीच्या आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमात/लग्नात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे दाखवले आहे.
कलाकार: सचिन, सॄष्टी बहल, विवेक मुशरन, अर्चना पूरण सिंह
हंसते खेलते
-पृथ्वीवरील वाढते असामाजिकीकरण आणि पृथ्वीचा होणारा र्हास पाहून देव पृथ्वीचा संपूर्ण नाश करण्याचे ठरवतो. पण ३ देवदूत त्याला विरोध करतात. तेव्हा देव त्यांना संधी देतो की एका आठवड्यात एखादा माणूस दाखवावा जो स्वार्थ न दाखवता इतरांवर प्रेम करेल व प्रसंगी त्यागही करेल. ह्या प्रकरणी ते ३ देवदूत राहूल रॉय ला निवडतात. त्यांच्या कामात अडथळे आणतो सैतान
कलाकार: राहूल रॉय, असरानी, राकेश बेदी, अनंत महादेवन, इशरत अली.
ढूंढते रह जाओगे
-एक तरूण (अमर उपाध्याय) त्याच्या प्रेमिकेला भेटण्यासाठी ती असलेल्या मोठ्या हॉटेल मध्ये येतो. तिथे एका व्यापार्याने (सतीश शहा) आपल्या एका हिर्याचा लिलाव करायचे ठरवले असते. तो हिरा चोरण्याकरीता चोर (जावेद जाफरी), एक खुनी (नसीरूद्दीन शाह) हे ही आलेले असतात. त्यांच्यात झालेले विनोदी प्रसंग ह्यात दाखविण्यात आले आहेत.
दो लडके दोनो कडके
-दोन गरीब तरूण पैसे मिळविण्याकरीता एका श्रीमंताच्या मुलाला पळवून आणतात. पण त्यांच्या घरातच दोन चोर चोरी करायला आलेले असताना त्या मुलाला पळवून नेतात. त्यानंतरचे प्रसंग.
कलाकार: अमोल पालेकर, असरानी. बाकीचे आठवत नाहीत :)
तेरा नाम मेरा नाम
-अजीत पाल आणि (बहुधा) बबलू मुखर्जी हे दोन तरूण मित्र. एक ब्राह्मण व दुसरा इतर जातीतला. ब्राह्मण मुलाला नोकरी पाहिजे असते पण तिथे आरक्षणामुळे त्याला मिळत नाही तर दुसर्याचे एका मुलीवर प्रेम असते. पण तिचे वडील तो ब्राह्नण नसल्याने त्याला विरोध करतात. म्हणून दोघेही नाव बदलतात. त्यानंतरची कथा दाखविली आहे.
ह्या सिनेमाचे नाव तेव्हा मला माहित नव्हते. पण एकदा दूरदर्शनवर रात्री दाखवला होता तेव्हा पाहिला. तेव्हा बरा वाटला. त्यानंतर पाहिले की ह्याच कथेवर नंतर आशिक मस्ताने (१९९६) आणि तेरे मेरे सपने (१९९६) हे चित्रपट ही बनलेत.
इना मिना डिका (मराठी)
-प्रशांत दामलेला (इना) कुठेही,केव्हाही झोपायची सवय असते. आणि त्याने झोपताना जे छायाचित्र पाहिले असते ते तो झोपलेला असेल तोपर्यंत प्रत्यक्षात येतात. त्याची बायको आणि त्याचा मित्र अशोक सराफ (मिना) त्याला एका डॉक्टरकडे , सुधीर जोशी (डिका), घेऊन जातात. डिका त्याच्या ह्या सवयीचा आणि चमत्काराचा फायदा घेऊन पैसे कमवायचा विचार करतो. त्यानंतरचे कथानक.
नंतर ह्याच नावाचा हिंदी सिनेमाही आला होता, ऋषी कपूर, जुही चावला आणि विनोद खन्ना ह्यांचा. पण त्या चित्रपटाच्या मानाने हा मराठी चित्रपट चांगलाच वाटला ;)
ही यादी पूर्ण नाही आहे. पण सध्या एवढेच आठवत आहेत. जमल्यास पुन्हा लिहिन.
तुम्हालाही असे काही वेगळे चित्रपट आवडले आहेत का?
प्रतिक्रिया
15 Apr 2010 - 1:28 am | शुचि
सौदागर - नूतन, अमिताभ आणि पद्मा खन्ना. नूतन अतिशय थोराड दिसते तर पद्मा खना तूफान मादक. "सजना है मुझे सजना के लिये" सुपर्ब गाणं.
अमिताभ खजूराचा गूळ विकणारा व्यापारी दाखवलाय आणि नूतन त्याची पहीली बायको जिचा तो केवळ तिच्या गूळ बनविण्याच्या कौशल्याकरता वापर करतो. आणि पैसे मिळाल्यवर लग्न करतो पद्म खन्नाशीच पण ते कसं यशस्वी होत नाही वगैरे.
एक चादर मैली सी -हेमा मालीनी तिच्या नवर्याच्या निधना नंतर तिच्याहून १० वर्षानी लहान दीराशी लग्न करते शेवटी असा काहीसा सामाजिक दृष्ट्या थोडा वादग्रस्त सिनेमा.
थोडा सा रूमानी हो जाये - नाना पाटेकर "प्लेन जेन" अनीता कंवर च्या आयुष्यात कसा आत्मविश्वासाची बहार आणतो त्याविषयीचा सिनेमा, सिनेमा नव्हे कविता.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
15 Apr 2010 - 4:22 am | गोगोल
खरोखरच आहे....ते गाण पाहून माझा मास्टर ऑफ माय डोमेन धोक्यात पडायची वेळ आली होती :P
16 Apr 2010 - 7:39 pm | मराठे
मास्टर ऑफ माय डोमेन
तुम्हीसुद्धा 'seinfield' प्रेमी वाट्तं !
15 Apr 2010 - 10:49 am | विशाल कुलकर्णी
'थोडा सा रुमानी हो जाये' मला देखील खुप आवडला होता.
मिर्च मसाला : राजस्थानमधील संस्थानिक आणि सामान्य जन (मिरची कुटणार्या बायका) यांच्यातील संघर्षाच्या माध्यमातून राजस्थानमधील तत्कालीन स्थितीचे अतिषय दाहक आणि भेदक चित्रण होते. ऑल टाईम फेवरीट 'स्मिता पाटीलेने' या ही चित्रपटात कमाल केली होती, नासीरदेखील तेवढाच समर्थपणे उभा राहीला होता तिच्या समोर.
'मुक्ता', "चेलुवि" : सोनाली कुलकर्णीच्या सहज सुंदर अभिनयाने नटलेला हे अतिशय बोलके आणि सुंदर चित्रपट
'वेन्सडे' : सामान्य माणसाची तगमग आणि त्याचा उद्रेक ... पुन्हा एकदा नसीरचा कमालीचा सशक्त अभिनय !
अजुन खुप आहेत, जसे जसे आठवतील तसे टाकत जाईन.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
15 Apr 2010 - 12:19 pm | इन्द्र्राज पवार
एक चादर मैली सी -हेमा मालीनी तिच्या नवर्याच्या निधना नंतर तिच्याहून १० वर्षानी लहान दीराशी लग्न करते शेवटी असा काहीसा सामाजिक दृष्ट्या थोडा वादग्रस्त सिनेमा.
...... नाही, "काहीसा सामाजिक दृष्ट्या थोडा वादग्रस्त".... आपल्या मराठी मनाला दिराने वाहिनीशी लग्न करणे वादग्रस्त वाटू शकते पण शीख, जाट तसेच पंजाब हरियाणाच्या अनेक पोटजातीत (विशेषत: ग्रामीण भागात) ही प्रथा अगदी राजरोसपणे (शेकडो वर्षापासून) चालत आली आहे. या जमातीचे आपल्या जमीन जुमल्यावर जीवापाड प्रेम आहे, आणि सबब त्या विधवा मुलीकडून मिळालेली Estate अन्यत्र जाऊ नये म्हणून घराघरात ही प्रथा चालू ठेवण्यात येते व तीत काही गैर आहे असे तेथील कोणालाच वाटत नाही. (मी स्वत: असा एक विवाह अटेंड केला आहे, जाट जमातीच्या माझ्या software engineer मित्राने जेव्हा मला `आपण वहिनीशी लग्न करणार आहे' असे सांगितले त्यावेळी माझ्या मराठी मनाला धक्का बसला होते. ही वहिनी तीन चार वर्षांनी मोठी असेल. आमचा group फिरोझपूर येते मुद्दाम ही चालरीत पाहण्यासाठी गेला होता. कमालीची बाब म्हणजे त्या वहिनी नात्यातील मुलीकडील मंडळीही मोठ्या आनंदात लग्नकार्यात भाग घेत होती.)
अशाच कथानकावर व याच प्रदेशाशी संबधित असलेला स्मिता पाटील यांचा "वारीस" आठवतो? इथेही विधवा स्मिता आपल्या धाकट्या बहिणीचे लग्न आपल्या सास-याबरोबर लाऊन देते. का तर ? घराण्याला "वारीस" असावा म्हणून.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
16 Apr 2010 - 8:13 pm | भारद्वाज
आदमी और घोडा कभी बुढे नाही होते ....असा समस्त पुरुषजातीच्या कानफडात वाजवणारा डायलॉग होता त्यात.
16 Apr 2010 - 8:14 pm | भारद्वाज
आदमी और घोडा कभी बुढे नाही होते ....असा समस्त पुरुषजातीच्या कानफडात वाजवणारा डायलॉग होता त्यात.
15 Apr 2010 - 1:36 am | टारझन
इना मिना डिका (मराठी) पाहिला आहे ... तुफान आवडलेला तेंव्हा तो चित्रपट ...
बाकी चित्रपट कधी देखे ना सुने :) तुमच्याकडे असल्यास षिड्या करु ठेवा ... भेटु तेंव्हा घेईन :) !
- जेवफक्त
15 Apr 2010 - 1:39 am | अश्विनीका
मिर्च मसाला - स्मिता पाटील , नासिर , दिना पाठक आणि त्यांच्या दोन्ही मुली - सुप्रिया , रत्ना
पाहिला तेव्हा स्मिता पाटील मुळे आवडला होता.
-अश्विनी
15 Apr 2010 - 1:41 am | शुचि
फार सुरेख आहे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
15 Apr 2010 - 9:21 pm | अश्विनीका
अ़जून काही -
जाने भी दो यारो - भक्ती बर्वे , नासिर, ओम पुरी, सतिश शहा...
एकदम मस्त आहे. शेवटचा महाभारत नाटकाचा सीन तर ह. ह. पु.वा. करणारा. सतीश शहाच्या प्रेताला साडी गुंडाळून द्रौपदी केले जाते आणि ह्या द्रौपदीला स्टेजवर आणल्यावर पुढे जो काय गोंधळ उडतो तो पडद्यावरच बघण्यासारखा.
http://www.youtube.com/watch?v=WQa0kWeelhU
होली - आशुतोष गोवारीकर , आमिर खान.
केतन मेहताचा सिनेमा होता. कॉलेज बॅकग्राऊंड असलेला. आमिर खान चा डेब्यू रोल होता. (कयामत से ..हा त्याचा व्यावसायिक दृष्ट्या पहिला सिनेमा पण होली मात्र त्या आधीचा. )
सारांश - अनुपम खेर - अफलातून अभिनय
अंगूर - संजीव कुमार , देवेन वर्मा , दिप्ती नवल , मौशुमी चटर्जी - कितीही वेळा पाहिला तरी प्रत्येक वेळी मस्तच वाटतो.
मृगया - मिथुन , ममता शंकर - बहुतेक टॉम आल्टर पण होता. खूप सुंदर सिनेमा आणि मिथुन ने आदिवासी तरूण छान रंगवला आहे.
- अश्विनी
15 Apr 2010 - 2:46 am | सुचेल तसं
मिथुनचे नितांतसुंदर चित्रपट. त्यातले संवाद तर अगदी अविस्मरणीय.
१) भीगी हुई सिगरेट जल नही सकती और तेरे मौतकी तारीख टल नही सकती.
२) अपुन का नाम है हिरा अपुन ने सबको चीरा
३) तुम चाहो तो मेरा प्रोग्राम नोट कर लो.. तुम सब मेरी डायरीमे मर चुके हो
४) मै चाहू तो तुम सबको अभी मार सकता हू. मगर अभी मारने से तुम्हारे मारने का क्रेडिट मेरी बुलेट को मिल जायेगा..
५) दुश्मनोंकी लाशोंपे भंगडा करनेवाला कभी लंगडा नही हो सकता.
देव आनंदचे काही चित्रपट जसे - लव अॅट टाइम्स स्क्वेअर, सेन्सॉर
रामसेंचे चित्रपट - सामरी, अजुबा कुदरत का, इत्यादि.
15 Apr 2010 - 3:00 am | चतुरंग
अशा तुफान विनोदी डायलॉग्ससाठी तर चित्रपट पहायचे! ;)
बघा बरं कसे पक्के लक्षात राहिलेत तुमच्या!! :D
(बॉलीवूड प्रेमी)चतुरंग
15 Apr 2010 - 3:06 am | सुमीत भातखंडे
=)) =)) =)) =)) =))
बाकी रामसेमधे अजून एक भर - वीराना
16 Apr 2010 - 3:41 pm | इनोबा म्हणे
वीराना तर लय भारी होता राव. ;) शाळेत असताना मित्राच्या घरी व्हिडीओ कॅसेटवर पाहिला होता.
लिमिटेड माज! ™
15 Apr 2010 - 3:16 am | सुमीत भातखंडे
हा पण असाच सुरेख चित्रपट.
दिग्दर्शनः सई परांजपे
ससा-कासवाची परंपरागत चालत आलेली गोष्ट.
पण आजच्या काळात ससाच कसा शर्यत जिंकतो हे दाखवणारा चित्रपट.
इथे सशाच्या भुमिकेत आहे - फारुक शेख आणि कासवाच्या - नसिरुद्दीन शाह.
चित्रपटाबद्दल अधिक इथे वाचा
15 Apr 2010 - 3:40 am | सुचेल तसं
नसरुद्दीन शहाचं भोळंभाबडं/सरळसोट कॅरॅक्टर चटका लाऊन जातं. दिप्ती नवलवर त्याचं आधीपासून प्रेम असतं पण तिला फारुक शेखच्या छानछोकीपणाची भुरळ पडते. जेव्हा ती फारुकपासून प्रेग्नंट होते आणि तो पळ काढतो तेव्हा नसिर तिच्याशी लग्न करतो. वाईट इतकंच वाटतं की ती तडजोड म्हणून त्याच्याशी लग्न करते.
15 Apr 2010 - 11:05 am | विशाल कुलकर्णी
+१... मला देखील कथा खुप आवडला होता. मुळात नसीरच आवडता कलाकार असल्याने त्याचे सर्वच चित्रपट आवडतात... मग त्यात स्पर्ष, मंडी यासारख्या नितांतसुंदर चित्रपटांबरोबर हिरो हिरालाल किंवा मोहरासारखे तद्दन मसालापटही पाहीले जातात.
नसीरचा आणखी एक सुंदर चित्रपट म्हणजे "वो सात दिन.....!"
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
15 Apr 2010 - 6:38 am | शुचि
बालिकाबधू मस्त!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
15 Apr 2010 - 8:10 am | स्पंदना
ह्रिषीदान्चा हा नेहमी सारखाच भावदर्शी चित्रपट!! व्रुन्दावन च हातावर कोरलेल गोन्दण जाळुन त्याच्यातुन मन काढुन घेण्याचा विफल प्रयत्न करणारी कुसुम् (हेमामालिनी--हो या चित्रपटात तिन चक्क अभिनय केलाय) बाल विवाहाची धुसर आठवण असणारा डॉक्टर व्रुन्दावन्(जितेन्द्र--नाही एक ही कम्बर हलवुन गाण नाही ) तिचा भाउ असराणी! काय सान्गू कितिदाही पाहिला तरी तो गोन्दण घालवण्याचा प्रसन्ग माझ्या डोळ्यात पाणी आणतो. मै उनके लिये कुछ भी नही । एक गैर भी नही । क्यो मेरी बात मानते हो? क्यु नही मेरा अभिमान तोडकर मुझे अपनाते? ह्रुदय स्पर्शी!! त्याच्या मोठे पणीच्या लग्ना तुन झालेला एक मुलगा ज्याला ती मला आइ म्हण असा आग्रह करते!!
आणि हो आपली रुप तेरा मस्ताना शर्मीला अन फरीदा जलाल हि सहाय्यक अभिनेत्री म्हणुन आहेत.
एकदातरी पहावाच असा, स्त्री च भावविश्व उलगडणारा हा माझा अतिशय आवडता चित्रपट
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
15 Apr 2010 - 8:55 am | चित्रगुप्त
अमेदेउस:
थोर संगीतकार मोझार्ट याचे जीवनावरील अप्रतीम चित्रपट (८ ऑस्कर मिळालेला)
गर्ल विथ अ पर्ल इयरिंग:
सतराव्या शतकातील थोर चित्रकार व्हरमीर याच्या याच नावाच्या प्रसिद्ध चित्रावर आधारित:
इन्ग्लोरियस बास्टर्ड्स:
दुसर्या महायुद्ध काळावरील नवीन अप्रतीम सिनेमा:
चित्रगुप्त
आमचे काही धागे:
मोनालिसाच्या बहिणी ?????
http://www.misalpav.com/node/11860
आपल्या मोना(लिसा) वहिनी:
http://www.misalpav.com/node/11663
आमचे काही पूर्वजन्मः
http://www.misalpav.com/node/11667
15 Apr 2010 - 10:06 am | Dipankar
ब्रिज ऑन द रिव्हर कॉय
15 Apr 2010 - 10:12 am | भडकमकर मास्तर
भंवरेने खिलाया फूल...
टीनएज लव्हस्टोरी
दिलदार गद्दार
फाळणीच्या पार्श्वभूमीवरची प्रेमकथा
15 Apr 2010 - 11:38 am | निशांत५
वास्तुपुरुष- हाहि एक अप्रतिम चित्रपत आहे
15 Apr 2010 - 3:02 pm | अरुंधती
खूप खूप चित्रपट आहेत आठवणींच्या पोतडीत.......
१] बनारस : उर्मिला मातोंडकरचा सुरेख अभिनय!
२] वॉटर
३] पिंजर
४] हीट अॅन्ड डस्ट
५] सूरसंगम
६] उत्सव
७] लेकिन
अजून खूप मोठी यादी आहे.........
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
15 Apr 2010 - 4:15 pm | चित्रगुप्त
वॉटर सिनेमातील नायिका इंग्रज वाटते, बाकी सिनेमा खूपच छान.
15 Apr 2010 - 4:40 pm | मनिष
वॉटर ची नायिका लिसा रे आहे. ती राहुल खन्ना, मोसमी चॅटर्जी बरोबर एका चित्रपटात होती, पण नाव नाही आठवत आता! :(
ऐश्वर्या राय नवीन होती तेव्हा तीला लिसा रे ची "लुक अलाईक" म्हणायचे. बॉम्बे डाईंग ची हॉट मोडेल होती ही. अभिनयाशी हिचा (जॉन अब्राहम सारखाच) फारसा संबंध नाही. अजूनही काही लिहिता येईल, पन राहू दे तुर्तास... ;)
17 Apr 2010 - 6:47 am | अर्धवटराव
नक्कि आठवत नाहि !!
(विसरभोळा) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
19 Jul 2012 - 11:48 am | आत्मशून्य
त्यातलं रंग रंग मेरे रंग रंग मे गाणं फार फेवरीट होतं त्या वेळेस व आज जवळपास ९ वर्षांनी ते पुन्हा पाहीलं मस्त वाटलं व अभिनय बघुन विनोदीही :)
17 Jul 2012 - 11:35 am | विकाल
आफताब अन लिसा रे 'कसूर' मध्ये एकत्र दिसले होते..!!
15 Apr 2010 - 3:35 pm | अभिषेक पटवर्धन
कोणी सई परांजपेचा 'पपिहा' पाहिलाय का? खुप आधी एकदा दूरदर्शन वर बघितला होता...बहुतेक विनि परांजपेच मुख्य भुमिकेत होती. कोणाला आठवतोय का?
15 Apr 2010 - 4:34 pm | मनिष
सध्या काही आवडत्या अप्रसिद्ध सिनेमांविषयी लिहतो....
एक डॉ. की मौत - पंकज कपूर आणि शबाना...खूप आधी एकदा दूरदर्शन वर लागला होता. पंकज कपूर एक शंशोधक, त्याच्या एका संशोधनाचा साईड इफेक्ट म्हणून फर्टीलिटी येऊ शकते..मग त्याची होणारी घुसमट...सगळाच सिनेमा या दोन समर्थ कलाकारांनी छान पेललाय!
Accepted - एका कुठल्याच कॉलेजमधे अॅडमिशन न मिळालेल्या मुलाने फेक अॅक्सेप्टंन्स लेटर लिहून केलेली धमाल. पुढे त्ते खरच ते कॉलेज काढून चालवतात...रूढ शिक्षणाच्या सीमा स्पष्ट करणारा चित्रपट.
आम्ही असू लाडके - तसा नवीन पण फारसा माहिती नसलेला चित्रपट. गिरीष ओक आणि सुबोध भावे यांचा. नायिकेचे नाव नाही माहित. मतिमंद मुलांबद्दलचा चित्रपट...उणीवा असल्या तरी चांगला जमलाय.त्यातील सुरेश भटांचे गाणेही झकास...हव्या, हव्या क्षणासही नको, नको म्हणायचे! आवर्जून बघावा असा.
डॅडी - पूजा भट आणि अनुपम खेर. पूजा भटने केलेल्या मोजक्या चांगल्या सिनेमांपैकी एक. एका दारूड्या माणसाची आणि त्याला मनसात आणणार्या त्याच्या मुलीची गोष्ट - खरच छान झालाय हा चित्रपट. अनुपम खेर फरच अप्रतिम आणि पूजा भट पण चालून जाते. मला ह्यातली सगळीच गाणी गजल आवडतात...'आईना मुझसे मेरे होने की निशानी मांगे' ही उदास गझल, 'कभी ख्वाब में या खयाल मे' ही रोमँटीक गझल आणि 'डॅडी तेरे जागे, तू सो जा रे' ही लोरी मस्तच जमल्यात. अर्थ, सारांश आणि डॅडी सारखे चित्रपट देणारा महेश भट नंतर कुठे भरकटला देव जाणे. हा चित्रपट मलाही हवाय सीडी किंवा डीव्हीडी वर मिळाला तर. स्वाती ताई, हा दाखव त्या जर्मन्स ला नक्की! कशालाही रडतात साले..
Postman In The Mountains - हा एक महोत्सवात गाजलेला चायनीज चित्रपट. फिल्म क्लबमुळे पहायला मिळाला. अप्रतिम आहे...एका गावतल्या, डोंगराळ भागात पत्र वाटणार्या पोष्टमनची आणि त्याच्या तरूण मुलाची गोष्ट. साध्या कथेवर चित्रपट किती सुरेख फुलवता येतो ह्याचे उदाहरण.
आलाप - अमिताभ, रेखा, संजीव कुमार ह्यांचा (माझ्या मते) फारसा महित नसलेला ऑफ बीट चित्रपट. सुरेख काम केलय अमिताभने...आणी गोष्ठी वेगळीच आहे. गाण्यात रस असलेला अका धनाढ्याचा मुलगा आणि त्याला समजू न शकणारा त्याचा बाप (ओम प्रकाश) ह्यांची कथा. येसूदास ने गायलेले हरीवंशराय बच्चन यांचे "कोई गाता मै सो जाता" आजही अंगावर काटा आणणारे. तसेच चांद अकेला पण सुंदर.
घर- विनोद मेहरा आणि रेखा यांचा एक नितांतसुंदर चित्रपट. खूप बोल्ड थीम पण अतिशय संयतपणे हातळलेली - १०१% श्रेय दिग्दर्शक माणिक चॅटर्जी यांचे. बायकोवर बलात्कार झाल्याने उध्वस्त झालेली ती आणि तिला समजून घेणारा, सावरणारा, फुलवणारा तिचा समजूतदार नवरा...कुठेही अतिरेक नसलेली गोष्ट. तो त्या गुन्हेगारांचा खून वगैरे करत नाही - खर तर ते दाखवलेही नाही. अशा कथेवरचा चित्रपट आपल्या इथे बनल्याबद्दल अभिमान वाटावा अस चित्रपट. ह्यातली गाणी गाजलीत पण चित्रपट फार लोकांनी पहिला आहे असे वाटत नाही - गाणि फारच छान.. आज कल पाँव जमीन पर, आप की आखों मे कुछ महके हुए से ख्वाब है, फिर वही रात है....
साथ-साथ - फारुख शेख-दिप्ती नवल. हा काही फार अपरीचित नाही. पण माझ्या अतिशय आवडत्या चित्रपटांपैकी एक. याची सगळीच गाणी गाजलीत, पण हा चित्रपट सुद्धा खूप कमी लोकांनी पाहिला आहे असे वाटते. ह्याची डीव्हीडी खूप प्रयत्न करुनही नाही मिळाली पण माझ्याकडे एक जुनी व्हीसीडी आणि त्याची मी अनेक पारायणे केलीत आणि बर्याच जणांना करायला लावलीत. माझ्या विचारांवर प्रभाव टाकणार्या काही मोजक्या कलाकृतींपैकी एक. गोष्ट साधीच पण प्रभावी आहे...एक आदर्शवादी डाव्या विचारसरणीचा तरूण, त्याचे प्रेम, मग पैशाच्या मागे पळणे आणि मग तिने करून दिलेली त्यांच्या मुल्यांची आणि priorities ची जाणीव. दोघांचीही कामे सुरेख झालीत..बाजी मारते ती अर्थातच दिप्ती नवल! "युं जिंदगी की राह मे" मधला तिचा तो intense लुक. अशक्य आहे ही बाई!!! जगजितची सगळीच गाणी खास...आणि कथेत चपखलपणे मिसळणारी. तुमको देखा तो ये खयाल आया...हे याच सिनेमातलच. ये तेरा घर ये मेरा घर हे ऐकावं तर ह्याच सिनेमाच्या संदर्भात.
एक मोठा लेख लिहीता येईल ह्या सिनेमावर मला....Movie very close to my heart! हास्य
..................................
खूप चित्रपट आहेत अजून.... ७०-८० च्या दशकातील अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह आणि फारुख शेख चे जवळ-जवळ सगळेच चित्रपट आवडतात. शिवाय सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांचे कितीतरी मराठी चित्रपट...लिहीन नंतर!
क्रमशः
- (अट्ट्ल आणि अस्सल फिल्मबाज) मनिष
15 Apr 2010 - 6:47 pm | अरुंधती
१] ब्लू अम्ब्रेला
२] काश
३] मंडी
४] बाजार
५] फायर
६] तेहझीब
७] सरदारी बेगम
८] मॉर्निंग राग
९] मकडी
१०] मि. अॅन्ड मिसेस अय्यर
११] चमेली
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
15 Apr 2010 - 8:16 pm | मस्तानी
Mr and Mrs Iyer खरंच फार सुंदर होता ...
एक इंग्रजी चित्रपट "The Holiday" ... Cameroon Diaz-Kate Winslet-Jack Black-Jude Law ... बघावासा आहे ...
15 Apr 2010 - 8:33 pm | इन्द्र्राज पवार
एक रुका हुवा फैसला : 12 Angry Men या इंग्रजी पटावर बेतलेला पण भारतीयकरण अगदी perfect. १२ ज्युरी एका गुन्हेगाराच्या शिक्षेबाबत चर्चा करत आहेत. एक ज्युरी सोडून बाकी ११ जणांना पूर्ण खात्री आहे कि तो कैदी गुन्हेगार आहे. पण एम. के. रैनाला तसे वाटत नाही आणि चर्चेचे जे गु-हाळ सुरु होते त्याचा परिपाक म्हणजे हा सुंदर चित्रपट. एका खोलीत घडत असलेला व केवळ संवादाच्या जोरावर हा चित्रपट DVD स्वरूपात उपलब्ध आहे. जरूर मिळविण्याचा प्रयत्न करावा. यातील कलाकार म्हणजे genius लोकांचे संमेलनच वाटावे. एम. के. तसेच के. के. रैना, पंकज कपूर, अन्नू कपूर, एस. एम. झहीर, आदी कितीतरी जे दूरदर्शनच्या जमान्यातील घराघरातील नाव झाले होते.
त्रिकाल : केवळ श्याम बेनेगलचा म्हणून नव्हे तर स्वर्गीय लीला नायडू यांचा शेवटचा तसेच गोव्याच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हा समजण्यास थोडा कठीण असा चित्रपट. टिपिकल बेनेगल टच. नासिरचीदेखील यात एक प्रमुख भूमिका आहे. छायाचित्रण तर अफलातून आहे !
New Delhi Times : या नावाच्या इंग्रजी वर्तमानपत्राचा संपादक शशी कपूर व या क्षेत्रात असलेले घाणेरडे राजकारण. मालकांचा निव्वळ फायदा कसा होत राहील इकडे डोळा, तर संपादकापुढे असलेले काही आदर्श. अतिशय गंभीर मांडणी आणि कुठेही तडजोड नाही. शर्मिला टागोर यांचीही संपादकाची डॉक्टर पत्नीची छान भूमिका. के. के. रैनाचीही एक मोठी भूमिका. मेंदू खाणारा हा चित्रपट होता. डीव्हीडी उपलब्ध आहे.
मंझील : बिग बी अमिताभ आणि मौशुमी चटर्जी यांची प्रमुख भूमिका. अमिताभ बिग बी होण्यापूर्वीचा एक सुंदर चित्रपट. विशेष म्हणजे पदवी घेउन नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा काहीतरी बिझिनेस सुरु करून तीत करीअर करावे असे सर्वसामान्य स्वप्न पाहणा-या एका होतकरू युवकास कोणत्या परिस्थितीस या देशात सामोरे जावे लागते याचे रोखठोक चित्रण. "मी कोणीतरी मोठा झालोच आहे" अशा आविर्भावात राहून मौशुमीची फसवणूक करणारा, तिचे भरभरून प्रेम पाहणारा व त्यामुळे मनातल्या मनात खजील होऊन स्वत:ला दोष देणारा अमिताभ मनाला नक्कीच भिडतो. हा एकमेव चित्रपट असेल की ज्यात फसवणुकीमुळे हतबल झालेला तरुण उद्योजक अमिताभ झोपडपट्टीतील गुंडाकडून मार खातो. "रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन" हे मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया परिसरात प्रत्यक्ष पाउस पडत असताना चित्रित केलेले गाणे पाहणे फार मोठे आनंददायक आहे.
गमन : जणू एक काव्यच ! फारुख शेखची मुंबईत जगण्याची धडपड. Taxi Driver च्या भूमिकेत. जगणे हाच या चित्रपटाचा विषय असल्याने बाकी बाबी नगण्य ठरतात. श्री. सुरेश वाडकर यांची गझल "सीने में जलन, आंखो में तुफान सा क्यू है ?" त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील उत्तम सादरीकरण आहे. जलाल आगादेखिल एका लक्षणीय भूमिकेत आहेत.
परामा : बंगाली वातावरणातील हा चित्रपट राखीच्या सिने कारकिर्दीतील महत्वाचा मानला गेलेला चित्रपट. एका मोठ्ठ्या अशा एकत्र कुटुंबातील राखी कर्ती गृहिणी. सुखसोयी, मुलेबाळे, पतीचे प्रेम, ज्येष्ठांची माया, पैसा अडका भरपूर, अशा सुखीसमाधानात जीवन जगणा-या आणि सतत कामात (तरीही आनंदात) असलेल्या राखीच्या जीवनात घरी Life Magazine चा त्यांच्याच कुटुंबातील एकाने शिफारस केलेला मूळ भारतीय फोटोग्राफर येतो. त्याला typical Bengali कुटुंबाचा परिसर व राहणीमान चित्रित करायचे असते. राखीच्या पतीचाही तो ओळखीचा असल्याने त्याला कुठेच अटकाव नसतो. मात्र त्याचे खास अमेरिकन पद्धतीचे सहज वागणे इकडे तिकडे वावरणे हे सुरुवातीस राखीच्या पचनी पडत नाही. पण ज्यावेळी पती तिला त्या प्रतिनिधीला कलकत्ता परिसर दाखविण्यासाठी सूचना करतो व मुलेही आईला नेहमीच्या कामातून थोडी फुरसत मिळेल म्हणून जाण्यास सांगतात, त्यावेळी प्रथमच आपण आता कुठे मोकळा श्वास घेत आहोत ही बाब तिला समजू लागते, शिवाय फोटोग्राफरचा Happy Go Lucky Nature तिला मोहित करतो. पुढे काय होते व राखीचे जीवन कशाप्रकारे ढवळून (किंवा उध्वस्त होते) निघते ते चित्रपट पाहिला तरच कळू शकेल. अपर्णा सेन दिग्दर्शित व अभिनित असलेला हा चित्रपट ब-याच वेगळ्या कारणानेही लक्षत राहिला होता. फोटोग्राफरचे काम केलेला कलाकार देखील त्या भूमिकेत अगदी फीट बसला होता. (त्याचे नाव विसरलो...!). एक बोल्ड चित्रपट, पण अप्रसिद्ध.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
16 Apr 2010 - 12:04 pm | मनिष
The Song Of The Sparrows - कालच पाहिला. माझा अतिशय आवडता इराणी डायरेक्टर माजिद माजिदीचा तुलनेने नवा (२००८) चित्रपट. अतिशय सुंदर...एका ऑस्ट्रीच फार्म वर काम करणार्या करीम ची गोष्ट. माजिदीच्या इतर चित्रपटांसारखीच गरीब पण मजेत रहाणार्या माणसांची गोष्ट. एक दिवस एक ऑस्ट्रीच पळून जातो आणि करीमची नोकरी जाते. शहरात (तेहरान) मुलीचे हिअरींग एड आणायला गेलेल्या करीमला चुकुन दुचाकी टॅक्सी समजले जाते आणि सुरु होतो करीमचा नवा उद्योग. शहरातली धावपळ, करीमला पडणारा मोह, त्याची धडपद आणि बदलती मुल्ये...सगळेच मस्त घेतलेय मजिदीने. टीपीकल माजिदी चित्रपट..children of heaven इतका नाही तरीही अतिशय सुरेख. माजिदी टच जाणवत राहतो..ते करीमचे निळे दार परत आणणे, नंतर शेताच्या पार्श्वभुमीवर उठून दिसणारे ते निळे दार...आणि त्या ओझ्याखाली वाकलेला, खुजा होत जाणारा करीम...अतिशय subtle आणि प्रभावी दिग्दर्शन! माजिदीच्या इतर चित्रपटांसारखाच ह्यातही मुलांची भुमिका फारच सुंदर आहे...नेहमीप्रमाणेच सबटायटल नसले तरी चालतील अशी माजिदीची प्रभावी चित्रभाषा...माजिदीवरही लिहायचे कधीतरी!
मला परवा क्रॉसवर्ड मधे 'एक उनाड दिवस' साजरा करतांना अचानक ही डिव्हीडी मिळाली, असे चित्रपट आवडत असतील तर अवश्य बघावा असा चित्रपट!
क्रमशः...
16 Apr 2010 - 1:02 pm | दिपक
दसविदानिया
सॉरी भाई
भेजा फ्राय
सहर
शौर्य
बारह आना
द रसेल गर्ल
पोस्टमन इन द माऊंटन
मरुन इन इराक
बाकी आठवतील तसे..
16 Apr 2010 - 3:52 pm | इनोबा म्हणे
आमच्या मिथूनदांच्या पिक्चरची लिस्ट बघा
इथून, तिथून... आपला हिरो मिथून
लिमिटेड माज! ™
16 Apr 2010 - 5:15 pm | उग्रसेन
कमल हसन आन श्रीदेवीची ऐक्टींग आन ष्टोरीमुळे ''सदमा ''पीच्चर लैच आवडाचा.
पुष्पक बी तसाच.
बाबुराव :)
16 Apr 2010 - 5:27 pm | दिपक
सर्वांनी हा धागाही चाळावा.
पठडीबाह्य/आवर्जून बघण्यासारखे चित्रपट
http://www.misalpav.com/node/3302
17 Apr 2010 - 6:44 am | अर्धवटराव
हा माझ अतीशय आवडता चित्रपट आहे... कारण
१) केवळ समाधी लावणारे संगीत
२) भक्ती किती वेगवेगळ्या स्वरुपाची असु शकते आणि किती उत्कट, उत्तुंग आणि खोल असु शकते याचे यथार्थ चित्रण
३) उत्कॄष्ट अभीनय
४) हिमालया इतक्या उत्तुंग व्यक्तीमत्वांचे दर्शन
५) भारतीय समाजजीवन ज्या अदृश्य अमृतधारेवर जगतय त्याचे प्रगटिकरण
... आणि बरेच काहि
(चित्रपटप्रेमी) अर्धवटराव
-रेडि टु थिन्क
16 Jul 2012 - 9:12 pm | मन१
धागा कामाचा वातला..
यथाशक्ती भर घालावी.
16 Jul 2012 - 9:13 pm | मन१
धागा कामाचा वातला..
यथाशक्ती भर घालावी.
17 Jul 2012 - 6:02 pm | चौकटराजा
मी सुमारे ४००० चित्रपट म्हणजे १९३९ च्या " गॉन विथ द विंड : पासून पाहिलेले आहेत. त्यात हिंदी मराठी व इंग्लीश सर्व आले. मी आता ठामप॑णे म्हणू शकतो की कथा ही सर्वात महत्वाची नंतर व्यक्तिचित्रण नंतर संवाद व अभिनय ! ही तीन मुल्ये आली की रंगीतपणा कॅमेरा अँगल, अभिनेते हे सारे निकष मागे पडतात. या संदर्भात मला " एक रूका हुआ फैसला "तसेच हाउस ऑफ नाईन ! अदद्व्तीय वाटतात .
19 Jul 2012 - 12:05 pm | अत्रुप्त आत्मा
१)एक रुका हुआ फैसला
२)समय
21 Sep 2012 - 11:21 am | पुष्कर जोशी
Holly Wood चे काही चित्रपट
The Terminator : अप्रतिम गोष्ट ...
युद्ध:
Green Zone : इराक युद्धावरील
A Team :
Comedy :
Blue Streak
Hacking :
Anti Trust
21 Sep 2012 - 12:33 pm | स्वप्निल घायाळ
1. Wild things Part 1 - Great Suspense theme.
2. Changeling - Great Story based on Real event.
3. Priceless - French movie...
4. Dr. Dolittle -
असे बरेच आहेत....
21 Sep 2012 - 10:59 pm | मैत्र
मूळ चित्रपट जास्त परिणामकारक आहे.. काही तासांच्या काळात आणि फक्त १२ जण.. मु़ख्य पात्रं ३-४. कथे इतकीच पटकथा किती महत्त्वाची असते त्याचं उदाहरण.
Influencing चं उदाहरण म्हणून हा चित्रपट दाखवला जातो इतका तो चित्रपटाच्या करमणूकीच्याही पलिकडे गेला आहे.
वरच्या अनेक नावांशी सहमत आहे..
सूरसंगम (मूळचा तेलुगू शंकराभरणम),Mr. and Mrs. Iyer हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट आहेत. त्यामुळे अप्रसिद्ध नाही म्हणता येणार.
पण अप्रतिम ...
वास्तुपुरूष हा एक जबरदस्त चित्रपट आहे. जरूर बघावा असा. संयत अभिनय, सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर जोडीचे नेहमीचे सशक्त मुद्दे - पात्र रचना... casting and character building. फार डोक्याला ताण देणारा असा आहे..
अजूनही आहेत काही...
22 Feb 2014 - 2:37 pm | देवदत्त
भरपूर चित्रपटांनी हजेरी लावली येथे. धन्यवाद :)