आर्सेलर मित्तल मर्जर.. (भाग - १)
>>>अचानकपणे मित्तल स्टीलने आर्सेलर विरूध्द 'होस्टाईल बीड' ची घोषणा केली व सारा युरोप ढवळून निघाला...
२२.८ बिलीयन डॉलर्स. इतकी प्रचंड किंमत मोजायची तयारी दाखवून मित्तल नी आपले हेतू स्पष्ट केले. स्टील उद्योगाचा चेहरामोहरा बदलणार याची सर्वांना जाणीव झाली. पण सगळे इतके सोपे नव्हते; सोपे असणारही नव्हते, आणि याचीही सर्वांना कल्पना होती.
सगळ्यात मोठा अडसर होता आर्सेलर मॅनेजमेंटचा. फ्रेंडली डीलला नकार देणारी ही मॅनेजमेंट टीम 'होस्टाईल बीड' ला सर्वशक्तीनीशी; सर्व मार्गाने तोंड देणार हे उघड होते.
आर्सेलरचे घर - लक्झंबर्ग, फ्रान्स, बेल्जीयम, स्पेन आणि खुद्द लंडन मध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. सर्वांनाच हे अविश्वसनीय वाटत होते.
आर्सेलर, लेबर युनीयन्स, या सर्व देशातले मंत्री, लक्झंबर्गचे राष्ट्रपती, कॉम्पीटीशन कमीशनर्स सगळे जण एकत्र येवून मित्तल स्टीलच्या विरोधात उभे राहिले.
प्रत्येकाचे वेगवेगळे हितसंबंध गुंतले होते.
आर्सेलरला 'स्वत्व' जपायचे होते. मित्तल स्टील बरोबर मर्ज होवून आपली 'ओळख' पूर्णपणे मिटून द्यायची नव्हती.
लेबर युनीयन्स ना व प्लँट बंद होण्याची व कामगारांच्या नोकर्यांची चिंता होती.
लक्झंबर्ग, फ्रान्स, बेल्जीयम, स्पेन ला आर्सेलरने त्यांच्या देशात केलेल्या गुंतवणुकीची व भविष्यकालीन धोरणांची काळजी होती.
कॉम्पीटीशन कमीशनर्स ना स्वच्छ व्यवहारांची आणि एकाधिकारशाहीची शंका होती.
लक्झंबर्गचे राष्ट्रपती व मंत्रीमंडळ नवीन कंपनीचे मुख्य कार्यालय लक्झंबर्ग बाहेर जावू नये याच्या विवंचनेत गुंतले होते.
या सगळ्यांमध्ये एकच समान दुवा होता की मित्तलना रोखायचे.
कोणत्याही देशाला, सरकारला, कुणा पदाधिकार्याला न कळवता अचानकपणे केलेली घोषणा पचवणे सर्वांनाच जड गेले. कारण..?
"युरोप मध्ये अशा गोष्टी या पध्दतीने केल्या जात नाहीत"
युरोपीयन कमीशन, देशांतर्गत सरकार, वाणिज्य मंत्री, कॉम्पीटीशन ऑथॉरीटीज यांना आधी संपूर्णपणे कल्पना देवून, विश्वासात घेवून भविष्यकालीन धोरणे / बदल वगैरे कळवून मगच पुढच्या हालचाली करायच्या ही सर्वमान्य पध्दत.
याला उघडपणे छेद देत मित्तलनी अत्यंत धाडसी पाऊल टाकले होते.
पांच वेगवेगळे देश, त्यांचे वेगवेगळे नियम, वेगवेगळे कायदे या सर्वांवर असणारा युरोपीय संघटनेचा अंकुश आणि या सर्वांचे डील बाबतचे प्रतिकूल मत याला तोंड द्यावे लागणार हे मित्तलना माहिती होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील ३०० तज्ञ लोक यासाठी अहोरात्र झटत होते. मित्तल स्टीलच्या बाजूने इन्व्हेस्टमेंट बँकर्स ची फौज उभी केली गेली होती.
अशीच फौज आर्सेलरने ही उभी केली.
मित्तल स्टीलच्या बाजूने,
Goldman Sachs
Credit Suisse
HSBC
Citi Group
Societe Generale
आर्सेलरच्या बाजूने
Merrill Lynch
Morgan Stanley
Deutsche Bank AG
BNP Paribhas SA and UBS AG.
तर लक्झंबर्गला सरकारचे सल्लागार होते, JP Morgan Chase and Co.
ही फक्त इन्व्हेस्टमेंट बँकर्स ची यादी. लॉ फर्म, PR फर्म, अकाऊंटन्ट्स, कम्युनीकेशन एक्स्पर्ट्स या व अशा अनेक टीम्स एकाच वेळी मैदानात उतरल्या होत्या.
जगभरातले Who's Who एकतर या डीलमध्ये या ना त्या कारणाने गुंतले होते नाहीतर खूप बारकाईने लक्ष ठेवून होते.
(अवांतर - या डीलनंतर वरील सगळ्या फर्म्सना मिळालेली अॅडवायझरी फी होती तब्बल ३०० मिलीयन डॉलर्स)
पुढे काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती.
कोणतीही चर्चा न करता, डील मधले मुद्दे विचारान न घेता आर्सेलर मॅनेजमेंटने तिसर्याच दिवशी मित्तल स्टीलची ऑफर नाकारली.
पुढचे पांच महिने मित्तल पितापुत्र वेगवेगळ्या देशांना भेटी देत होते. राज्यकर्ते, मंत्री, युरोपीयन कमीशनचे अधिकारी, देशांतर्गत सरकारचे पदाधिकारी, कॉम्पीटीशन कमीशनर्स, शेअरहोल्डर्स ना भेटत होते. ऑफर मागची कल्पना. स्टील उद्योगाचे भवितव्य. जागतीक स्टील उद्योगातील युरोपचे स्थान, महत्त्व अशा गोष्टी पटवून दिल्या जात होत्या.
या पांच महिन्यांच्या दरम्यान मित्तल पितापुत्रांनी ७५० तासांपेक्षाही जास्त विमान प्रवास केला (साधारणपणे २५ वेळा जगप्रदक्षिणा होईल इतके) बाकीच्या लोकांसाठी मित्तल स्टीलने जेट विमाने भाड्याने घेतली होती.
या दरम्यान आर्सेलर CEO गाय डॉले वेगळ्याच कारणासाठी चर्चेत राहिला..
मित्तल स्टीलला "कंपनी ऑफ इंडीयन्स",
मित्तल स्टीलने कमावलेल्या पैशाला 'monnaie de singe' म्हणजेच 'monkey money'
लक्ष्मी मित्तलना 'खोटे बोलणारा / खरे लपवणारा माणूस'
आर्सेलर म्हणजे 'खरे अत्तर' आणि मित्तल स्टील म्हणजे 'यु-डी-कलोन'
अशी विशेषणे वापरून स्वत:साठी आणि स्वत:च्या कंपनीसाठी परिस्थीती आणखी बिकट करून घेतली.
१९ मे २००६ ला मित्तलनी आपली ऑफर ३४ % ने वाढवली. कंपनी स्ट्रक्चर बदलायचे मान्य केले व नवीन कंपनी मधला फॅमीली स्टेक ५०% च्या खाली न्यायचीही तयारी ठेवली.
लक्ष्मी मित्तल चर्चेसाठी अजूनही वाट बघत होते. त्यांच्या प्रयत्नांना आर्सेलर मधून कोणीच दाद देत नव्हते.
दरम्यान आर्सेलरने एक व्हाईट नाईट शोधून काढला. "सेव्हरस्टाल" रशीयन स्टील कंपनी.
२६ मे २००६ ला आर्सेलरने "सेव्हरस्टाल" बरोबर मर्जर ची घोषणा केली.
मित्तल स्टील साठी हा मोठा धक्का होता. इतके सारे प्रयत्न वाया गेल्यामुळे सगळेच जण सुन्न झाले. मित्तल स्टील ला पुढे अंधार दिसत होता.
चार महिने सर्व शक्तीनीशी लढलेल्या लढाईत त्यांच्या समोर दुसरेच कोणीतरी जिंकत होते...
(क्रमश:)
प्रतिक्रिया
13 Jul 2012 - 4:41 am | अर्धवटराव
फारच गुंतागुंतीचा मामला. पुढे काय झालं सर जी?
अवांतरः इतके देशोदेशीचे सरकारे यात इन्व्होल्व्ह होते. मग याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे मोठे परिमाणं असणार. या बाजुवर देखील प्रकाश पडला तर दुधात साखर :)
अर्धवटराव
13 Jul 2012 - 5:01 am | जेनी...
भक्कम लिहिलयस
वाचतेय ....
13 Jul 2012 - 10:18 am | प्यारे१
शब्दप्रयोग आवडला.
विशेषतः 'इस्पात' कंपनी च्या लेखाबाबत केल्यामुळे जास्तच.
वाचतोय. :)
@ मोदक- द लेखक :
अधिक सविस्तर लिहील्यास आणखी आवडेल.
कायद्याचा भंग न करता अनुवाद/ स्वैर भाषांतर करता येईल असं काही बघून एक सुंदर लेखमाला बनवता येऊ शकेल. अर्थात मागे म्हटल्याप्रमाणं जर एकच पुस्तक न वापरता बाकी 'सोर्सेस' देखील वापरत असाल तर कायदा उल्लंघनाचा फारसा प्रॉब्लेम यायला नको.
संदर्भ सूची देऊन त्यामध्ये हे सगळे टाकता येऊ शकेल असं वाटतं.
13 Jul 2012 - 12:32 pm | मोदक
धन्स रे. :-)
विचार करायला हरकत नाही पण ते पुस्तक म्हणजे डेटाबेस आहे.
शक्य ते सगळे मुद्दे त्यांनी पुस्तकात घेतले आहेत. त्यामुळे आणखी काही नवीन माहिती कोणत्याही सोर्स ने मिळेल असे वाटत नाही. :-(
त्या लेखकांनी लक्ष्मी मित्तल व आदित्य मित्तलच्या खाजगी विमानाच्या 'फ्लाईट लॉग' सारखी कागदपत्रे मिळवून.. व्यवस्थीत अभ्यास करून पुस्तक लिहिले आहे.
13 Jul 2012 - 12:41 pm | स्पा
मोदक - प्यारे काका
वा वा
डोळे पाणावले आज
13 Jul 2012 - 12:44 pm | प्रचेतस
तुमचे डोळे नेहमीच पाणावतात ब्वॉ, तरी डोंबिवली कायम तहानलेलंच.
बाकी लेखमाला १ नंबर.
13 Jul 2012 - 10:32 am | बॅटमॅन
+१. भक्कम एकदम!!
13 Jul 2012 - 11:23 am | एमी
+१ जबर्याच!
मस्त लिहिलंय रे मोदका!
मानलं बॉ तुला _/\_
13 Jul 2012 - 5:55 am | मराठमोळा
खुपच ईंटरेस्टींग झालाय हा भाग पण..
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे.. यासंबंधीत पुस्तकासाठीदेखील लायब्रेरीत नंबर लावलाय :)
13 Jul 2012 - 7:35 am | जोशी 'ले'
वेनवान लेखन शैली आवडली ...लगे रहो,
पुलेशु :-)
17 Jul 2012 - 2:07 pm | सस्नेह
'वेनवान' ?
मला तरी 'वेगवान' वाटली...
अन इंटरेस्टिंग !
17 Jul 2012 - 6:49 pm | जोशी 'ले'
:-)
13 Jul 2012 - 7:38 am | जोशी 'ले'
वेनवान लेखन शैली आवडली ...लगे रहो,
पुलेशु :-)
13 Jul 2012 - 7:45 am | सुधीर
कथा पकड घेतेय. पुढे काय याची उत्सुकता आहे.
13 Jul 2012 - 7:56 am | ५० फक्त
छान लिहिलंय रे,..
13 Jul 2012 - 8:02 am | स्पा
एकदम दणका विषय घेतलायेस रे....
भारिच लिहिल आहेस.
पु.भा.प्र
13 Jul 2012 - 9:38 am | सुमीत भातखंडे
वाचतोय
13 Jul 2012 - 10:23 am | पिंगू
भारी आहे. मन लावून वाचतोय..
13 Jul 2012 - 10:41 am | झकासराव
जबरद्स्त वेगवान घडामोडी :)
13 Jul 2012 - 10:54 am | मी_आहे_ना
आजच सकाळी विचार करत होतो, पुढचा भाग कधी वाचायला मिळतोय ह्याचा..धन्यवाद. पु.भा.प्र.
13 Jul 2012 - 10:54 am | छोटा डॉन
मालक, कथा ( रियल स्टुरी) एकदम पकड घेत आहे, जास्त फाफटपसारा न लिहता नेमक्या आणि प्रभावी शब्दात तुम्ही जे वर्णन करत आहात त्याचे कौतुक करावेसे वाटते.
पुढचा भाग पटाकन येऊद्यात, उत्कंठा वाढत चालली आहे.
लेखमालेसाठी आभार ...
- छोटा डॉन
13 Jul 2012 - 11:22 am | किसन शिंदे
हेच म्हणतो. जास्त पसारा न वाढवता अगदी नेमक्या शब्दात अनुवाद साधलाय. :)
लगे रहो मोदकराव! :)
13 Jul 2012 - 11:33 am | जे.पी.मॉर्गन
>>जास्त फाफटपसारा न लिहता नेमक्या आणि प्रभावी शब्दात तुम्ही जे वर्णन करत आहात<<
सहमत. वाचतो आहोत.
जे पी
13 Jul 2012 - 1:24 pm | स्मिता.
डॉनरावांच्या प्रत्येक शब्दाशी सहमत.
13 Jul 2012 - 11:04 am | sagarpdy
भारीच!
13 Jul 2012 - 11:14 am | वेताळ
पुढचा भाग येवु दे भावा.
13 Jul 2012 - 11:22 am | अक्षया
खुप इंटरेस्टिंग झालाय हा सुद्धा भाग..:)
पुढचा भागाचा प्रतिक्षेत..
13 Jul 2012 - 11:34 am | सोत्रि
एकदम विंटरेस्टींग... मजा येतेय!
- (मर्ज्ड) सोकाजी
13 Jul 2012 - 12:26 pm | सायली ब्रह्मे
वा छानच लिहीतो आहेस..खुप आवडला हा भाग सुद्धा..:)
13 Jul 2012 - 12:30 pm | मुक्त विहारि
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
13 Jul 2012 - 12:47 pm | मन१
मग काय झालं ह्या धुमश्चक्रिचं?
13 Jul 2012 - 2:12 pm | चिगो
मस्त वेगवान कथानक आहे.. पकड घेणारं लिखाण / अनुवाद.
लगे रहो, मोदक..
13 Jul 2012 - 2:17 pm | गणपा
मोदका भारी चाललीये रे मालिका.
उत्कंठा भागागणीक वाढत चालली आहे.
13 Jul 2012 - 2:42 pm | मी कस्तुरी
छान लिहिलयस...
पुढच्या भागाची वाट पाहतेय :)
13 Jul 2012 - 2:45 pm | गणेशा
जे काही लिहिले आहे ते खुप भारी लिहिले आहे.
संपुच नये वाचताना असे वाटत आहे..
लिहित रहा... वाचत आहे
13 Jul 2012 - 4:56 pm | आत्मशून्य
पण हा भाग अतिशय त्रोटक...
13 Jul 2012 - 5:06 pm | मोहनराव
मस्त लेखनमाला.. पु भा प्र.
13 Jul 2012 - 7:20 pm | मदनबाण
मस्त... :)
भाग जरा मोठा हवा होता...
पुढच्या भागाची वाट पाहतो.
13 Jul 2012 - 7:37 pm | पैसा
पुढे काय झालं?
13 Jul 2012 - 7:43 pm | रेवती
सगळं अचाट वाटतं.
13 Jul 2012 - 9:08 pm | सुनील
हाही भाग उत्तम!
13 Jul 2012 - 10:32 pm | हारुन शेख
खूप मजा येते आहे. लवकर लवकर लिहा पुढचे भाग . Arthur Hailey ची strong Medicine आठवली हे सगळं वाचून.
14 Jul 2012 - 12:26 am | अपूर्व कात्रे
पण जरा जास्त लिहा की राव... सिरीअलची कथा नका लिहू.... मोक्याच्या क्षणी "उर्वरित भाग उद्या" असे म्हणणारी....
14 Jul 2012 - 3:43 pm | मोदक
पुढचा भाग शेवटचा.
बादवे - वरील वाक्य असे आहे - You never win Silver, you lose Gold.
16 Jul 2012 - 11:20 am | प्रेरणा पित्रे
पुढचा भाग लवकर टाक रे.... वाचतेय....