याहू मेलची बनवेगिरी

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
27 Jun 2012 - 10:49 pm

आपल्यापैकी अनेक जण याहू मेल वापरत असतील.
याहूचा सध्या एक प्रॉब्लेम झालेला पहायला मिळतो.

याहू मेल आय डी वरून अ‍ॅड्रेसबूकमधील सर्वांना जंकमेल
किंवा धोकादायक वेबसाइटची लिंक पाठवली जाते.

त्या मेलचे शीर्षक 'वर्क फ्रॉम होम', 'करीअर', 'फ्री एज्युकेशन'
'अर्न फ्रोम होम' असे काहीही असते.

मेलमधे एक लिंक दिलेली असते. क्लिक केल्यावर कळते की
प्रत्यक्षात खरी हायपर लिन्क दुसरीच आहे.

सुरुवातीला असे वाटत असे की कुणीतरी मेल हॅक करतो आहे की काय

पण

आता असा अंदाज आहे की
हा उद्योग स्वतः याहूच पैशे घेऊन करीत असावा.

तरीही आलेल्या कोणत्याही मेलमधील लिन्कला क्लिक करण्यापूर्वी
सावधगिरी बाळगावी.

धोरणसंस्कृतीविचार

प्रतिक्रिया

हा याहूचा सध्याचा प्रॉब्लेम नाही, बराच जुना आहे.
दोनेक वर्षापासून तर माझ्या नातेवाईकांच्या नावाने विचित्र इमेला येतात. त्यांचे नाव पाहून मेला उघडून याआधी गोत्यात येतायेता राहिले आहे. आजकाल आम्ही आयडीयाची कल्पना केली आहे; त्यावरून ती इमेल खरी/खोटी हे समजते.

श्रीरंग_जोशी's picture

28 Jun 2012 - 12:19 am | श्रीरंग_जोशी

पण धागाकर्त्यांनी मांडलेला विचार - 'याहूची बनवेगिरी' मात्र पटला नाही.

याहू कंपनी जीने जालावरील किती तरी गोष्टींचे मुहूर्तमेढ रोवली ते गेल्या अनेक वर्षांपासून न संपणाऱ्या समस्यांचा सामना करत आहे.

त्यामुळे स्वतः असे काही करण्याचा आत्मघातकीपणा ते करणार नाहीत.

अवांतर -माझ्यासकट अनेकांचा याहू आयडी केवळ उल्लेखमात्र जिवंत आहे कारण आम्ही आमच्या निष्ठा जी मेल व गुगल ला वाहिल्या आहेत ;-).

बादवे - या धाग्यासाठी काथ्याकूट हे सदर अधिक योग्य राहिलं असतं असं मला वाटतं.

चित्रेचा तारा's picture

28 Jun 2012 - 4:27 am | चित्रेचा तारा

मला हिच समस्या आली होती, पासवर्ड बदलल्यानंतर सर्व सुरळीत झाले.

श्रीरंग_जोशी's picture

28 Jun 2012 - 4:31 am | श्रीरंग_जोशी

त्यानंतर ही समस्या आली नाही.

मराठमोळा's picture

28 Jun 2012 - 7:47 am | मराठमोळा

आजकाल जिथे तिथे व्यनींचीच चर्चा चालु आहे असे दिसते..
माझे याहु अकाउंट आहे पण वापरतच नाही.. असा मी याहुचा पोपट करतो.. त्यामुळे माझ्याशी ते बनवेगिरी करत नसावेत.
हो पण इतरांच्या याहुवरुन आलेले फेक मेल मी कधी उघडत नाही. फक्त त्या व्यक्तीला कळवतो.

(अवांतरः लेख उघडला तेव्हा वाटलं की कविता लिहिली आहे की काय? ;) )

याहू ला खोटे ई-सन्देश हि समजत नाहित. केवळ एक प्रयोग म्हणुन मी माझ्याच याहू व जी-मेल आयडी ला तिसर्याच्याच नावाने spoof* करून सन्देश पाठवला होता. याहुला काहिच समजले नाहि. जी-मेलने मात्र "तो" सन्देश "spam*" मध्ये दाखवला. त्या दिवसानन्तर याहू मेल वापरलेला नाही.

*मराठी शब्द काय?

आनंदी गोपाळ's picture

28 Jun 2012 - 1:15 pm | आनंदी गोपाळ

या प्रकारच्या मेल्स 'वर्म' प्रकारच्या व्हायरसने येतात. तुमचे अकाऊंट काँप्रोमाइझ झालेलेही असू शकते. त्या अधी एकदा चांगला (विकतचा) अँटीव्हायरस चालवून बघावा.
स्पॅम डिटेक्शन : स्पॅमचे फिल्टर्स तुम्ही कसे सेट करता यावर अवलंबून आहे @ सागर. याहूचे यूजर प्रोग्रमेबल आहेत, जीमेलचे अती शहाणे बहुधा ऑटो सेट आहेत. गूगल आपला जास्त डेटा चोरतो. याहू मेल तुमचे लोकेशन सांगत नाही. गूगल ते शोधून 'कॉण्टेक्स्ट' प्रमाणे जाहिराती तुमच्या गळी उतरवीते. गूगल तुमची ब्राऊजिंग पॅटर्न अन हिस्ट्री देखिल लक्षात ठेवतो असे वाटते. इतर अजून काय काय करतात कुणास ठाऊक.

(याऽऽऽहूनंदी) गोपाळ

>> या प्रकारच्या मेल्स 'वर्म' प्रकारच्या व्हायरसने येतात

म्हणजे पाठवणार्‍याच्या कॉम्प्युटरवर व्हायरस असेल असे म्हणायचे आहे का ...

रमताराम's picture

28 Jun 2012 - 10:38 pm | रमताराम

याहू अकाउंटवरून अशी मेल आली/आला/आलं (ज्याने त्याने आपल्या चॉईसचं क्रियापद वापरावे) म्हणून 'याहूची बनवाबनवी'? मला खुद्द बँकांच्या मेल आयडीवरून अशा मेल्स आल्यात, जीमेल अ‍ॅड्रेसवरून आल्यात, फार कशाला माझ्याच मेल आयडीवरून मला मेल आल्यात. माझ्या जीमेल आयडीवरही येतात. (एखाद्या मूर्ख मित्राने तुमचा आयडी एखाद्या फ्री ग्रीटिंग साईटवर टाकून तुम्हाला बड्डे कार्ड पाठवले की हे प्रकरण हमखास सुरू होते!) यात मेल सर्विस प्रोवायडरचा दोष कसा? बर्‍यापैकी सॉकेट प्रोग्रामिंग जमत असणारा एखादा असल्या करामती करू शकतो. हे म्हणजे खोट्या नोटा सापडल्या म्हणून आरबीआयला जबाबदार धरण्यासारखे आहे.

कंटेन्ट वाचून नि थोडे तारतम्य वापरले तर जेन्युईन कुठली नि स्पॅम कुठली हे समजू शकते.

जो मुद्दा धागाकर्त्यांनी मांडला आहे त्यात वर्णिलेला प्रसंग असा आहे की, आपल्या स्वतःच्या याहू खात्यावरून आपोआप आपल्याच मित्रमंडळींना अशी विपत्रे जातात. त्याबाबत आपण पूर्णपणे अनभिज्ञ असतो. जेव्हा आपल्या खात्यावरून असे विपत्र मिळालेले कुणीतरी आपल्याला असे कळवते तेव्हाच याची जाणीव होते.

आजकाल हा प्रकार सर्रास घडू लागल्यामुळे बऱ्याच लोकांना कल्पना आहे. पण दीड - दोन वर्षांपूर्वी असे घडायचे तेव्हा उगाच गैरसमज व्हायची शक्यता असायची.

असला प्रकार मोठ्या प्रमाणात वापरल्या जाण्याऱ्या इतर सुविधा जसे हॉटमेल, जी मेल वगैरे यांसोबत असा प्रकार घडल्याची उदाहरणे विरळाच...

शिल्पा ब's picture

28 Jun 2012 - 11:50 pm | शिल्पा ब

हं. एकदा माझ्या नवर्‍याला माझ्या अकाउंट मधुन काही स्पॅम मेल्स गेल्या होत्या खर्‍या. मी फक्त सगळ्या कुकीज काढुन टाकल्या अन ब्राउझिंग हिस्टरी काढुन टाकली. मग नै कै झालं.

रेवती's picture

28 Jun 2012 - 11:54 pm | रेवती

हा प्रयोग करून बघते.

याहू स्वतः ही लबाडी करीत असेल नसेल

पण याहूच या प्रकारांचा जास्त शिकार बनलाय

स्पॅम मेल्सही याहू आय डी वरच अधिक येतात

असे निरीक्षण नोन्दवतो