वन हिट वंडर - ४ -> 'Cotton Eye Joe'

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
27 Jun 2012 - 6:01 pm

पाश्चात्य संगीतामध्ये आणि त्यातही इंग्लिश गाण्यांच्या संदर्भात खूपदा आपली एक गल्लत होते. ज्या लोकांची गाणी चांगल्यापैकी नावाजलेली असतात, ते सगळे मूळात इंग्लिश लोकंच असतात, असं आपलं आपण समजूनच चालतो. माझ्या या समजुतीला पहिला धक्का दिला अ‍ॅबाने, दुसरा बोनी एम् ने. सुरूवातीचे हे दोन धक्के असे काही जोरदार होते की त्यानंतर मी पुन्हा अशी समजुत करूनच घेतली नाही. पण ही तशी खूप जुनी गोष्ट. पाश्चात्य संगीत हे नेहमीच भांडवलदारांच्या हातातून वाढलं आहे. जे विकलं जाईल त्याचीच निर्मिती होते हे तिथलं सर्वमान्य सत्य. पण यामुळेच होतं काय की संगीतक्षेत्रामधले निर्माते, सतत नव्या हरहुन्नरी कलाकारांच्या शोधात असतात. हा शोध यशस्वी व्हावा यासाठीही हे निर्माते फार डोकं लढवतात आणि संगीतक्षेत्रात नव्या नव्या कल्पनांना वाव देतात. १९९४ साली अशीच एक कल्पना तीन स्विडीश संगीत निर्मात्यांनी मांडली.

यान् एरिक्सन, उर्यान युबर्ग आणि पॅट रायनिझ या तीन संगीत निर्मात्यांनी असं ठरवलं की अमेरिकेमधलं कंट्री-म्युझिक (लोकसंगीत) आणि युरोपात प्रचंड लोकप्रिय असलेलं इलेक्ट्रोनिक डान्स म्युझिक (युरोडान्स) यांचं मिश्रण करून शक्य झाल्यास टेक्नोम्युझिक निर्माण करू शकलो तर सध्याच्या नृत्यप्रिय तरुणांमध्ये ते नक्की विकलं जाऊ शकेल. त्यानुसार त्यांनी क्रॉक, डॅगर, एस आणि मेरी जो (अ‍ॅनिका युंग्बर्ग) या कंट्री-म्युझिक जाणणार्‍या कलाकारांचा एक गूप बनवला. मेरी जो ही यांची गायिका. अमेरिकेमधल्या दक्षिणेकडल्या राज्यातल्या गरीब, अशिक्षित गोर्‍या शेतकर्‍यांमध्ये हे कंट्री-म्युझिकचं मूळ मानलं जातं. त्यांना अमेरिकेत 'Rednecks' असं म्हणतात पण हा शब्द चुकीचा लिहून या ग्रूपचं नामकरण झालं, 'Rednex'.

'Rednex'चं पहिलं गाणं होतं, शतकभरापूर्वीचं मूळ अमेरिकन लोकगीत, 'Cotton Eye Joe'.

'Rednex' ने या मूळ गाण्याचं धृवपद तसंच ठेवलं आणि इतर शब्द मात्र स्वतःचे घातले. मूळातच हे लोकगीत असल्याने लोकही पूर्वीपासूनच आपल्याला हवे तसे शब्द या गाण्यात जोडत होते त्यामुळे ते काही फारसं खटकलं नाही. त्यांनी गाण्याला पूर्वी नसलेली तुफानी लय दिली आणि बरोबरच दिले जोरदार ड्रम-बीट्स. या दोन अ‍ॅडिशन्सनी या लोकगीताला एका जबरदस्त युरोडान्स गाण्यात बदलून टाकलं. हे परिवर्तन इतकं झकास झालं की 'Cotton Eye Joe' युरोपात लोकप्रिय झालंच पण त्याचबरोबर अमेरिकेतही बिलबोर्ड टॉप १०० काऊण्टडाउनमध्ये पहिल्या चाळीसात आलं (२५). त्यांचा विडिओदेखिल खास अमेरिकेतल्या दक्षिणेकडील राज्यातला असावा असाच बनवला गेला होता.

यानंतरही 'Rednex'ची अनेक गाणी युरोपात गाजली पण 'Cottton Eye Joe' इतकी लोकप्रियता अमेरिकेत मात्र त्यांना पुन्हा काही लाभली नाही. यामुळेच आपल्या 'वन हिट वंडर' यादीमध्ये 'Rednex' आणि 'Cotton Eye Joe' या दोघांचा समावेश झालेला आहे.

'Cottton Eye Joe'ने 'Blender' नामक मासिकाच्या '50 Worst Songs Ever' या यादीमध्ये ३८वं तर 'AOL Radio'च्या '100 Worst Songs Ever' या यादीमध्ये ८६वं स्थान राखलं आहे.

व्यक्तिशः मला 'Rednex'चं 'Cotton Eye Joe' त्याच्या विडिओसकट आवडतं हे वेगळं सांगायला नकोच, नाही का?

तेव्हा आता या वंडरफूल गाण्याचा आस्वाद घ्याच!

'Rednex'चं 'Cotton Eye Joe' हे गीत -

If it hadn't been for Cotton-Eye Joe
I'd been married long time ago
Where did you come from where did you go
Where did you come from Cotton-Eye Joe
If it hadn't been...

If it hadn't been...
If it hadn't been...

He came to town like a midwinter storm
He rode through the fields so hansome and strong
His eyes was his tools and his smile was his gun
But all he had come for was having some fun

If it hadn't been...
If it hadn't been...

He brought disaster wherever he went
The hearts of the girls was to hell broken sent
They all ran away so nobody would know
and left only men cause of Cotton-Eye Joe

If it hadn't been...
If it had't been...

If it hadn't been...
If it hadn't been...

If it hadn't been...

छायाचित्रे आंतरजालावरून आणि विडिओ यू ट्यूब वरून साभार.

वन हिट वंडर - ३ -> 'King Tut'

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

आहा... नाईन्टीजमधलं आणखी एक झिंगवणारं तुफानी गाणं. याचा स्पीड ऐकून पहिल्यांदा चांगलंच चक्रावायला झालं होतं. ब्रीथलेस टाईपचं गाणं आहे एकदम.. आणि व्हिडीओबद्दल काय बोलावं. प्रथमदर्शनी विकृत किंवा घाणेरडा वाटला पण नंतर मजा यायला लागली.

अतिशय झक्कास गाणं आहे हे. तुफानी फास्ट मेंडोलिन वाजवलं आहे. (मेंडोलिन किंवा तत्सम)..

या गाण्यामागची हिस्टरी सांगितल्याबद्दल अनेक धन्यवाद.

रेडनेक्सचं अजूनही एक गाणं आलं होतं मला वाटतं एमटीव्हीवर.. पण इतका प्रभाव नाही पडला. एकसारखीच वाटली चाल.

२-अनलिमिटेड हा ग्रूप आठवतोय का? वन हिट वंडर नाही तरी वन आल्बम वंडर म्हणता येईल त्यांनाही. तेही याच प्रकारचे होते. नो लिमिट्स आल्बम.. ट्रायबल डान्स, नो लिमिट्स, मॅजिक फ्रेंड ही गाणी कोणाला आठवताहेत का?

गाण्याच नाव वगैरे काही माहित नव्हत पण गाण माहित होत.
धन्स प्रास. एकुण त्या काळातल रिमिक्सच म्हणाव लागेल ना हे?

राजो's picture

27 Jun 2012 - 6:43 pm | राजो

या वरुन "इन्स्पायर" होऊन आपल्या अन्नू मलिक यांनी "कोई नही तेरे जैसा..." असे काहीतरी गाणे बनवले आहे.

निखिल देशपांडे's picture

27 Jun 2012 - 10:26 pm | निखिल देशपांडे

हेच लिहायला आलो होतो..
आवडते मला हे गाणे...
भारी आहे..

मुक्त विहारि's picture

27 Jun 2012 - 6:45 pm | मुक्त विहारि

छान माहिती...

एक's picture

27 Jun 2012 - 11:25 pm | एक

पण ते मधला मोनोलॉग पण लिहायच ना.

"लिसन टू द स्टोरी ऑफ अ मॅन नेम..."

केबलच्या नळकांड्या जेव्हा आमच्या घरात पोहोचल्या तेव्हा त्यातल्या सगळ्याच कार्यक्रमांबद्धल कमालीची उत्सुकता होती पण सगळ्यात जास्त 'एम टिवी' चं वेड होतं. तेव्हाच्या 'वी.जे.' पैकी 'नोनी' अजूनही माझ्या लक्षात आहे.
सुरूवातीला ऐकलेल्या गाण्यांपैकी 'कॉटन आय जो' हे गाणं त्यातल्या फास्ट ठेक्यामुळे आणि विडियोमुळे चांगलंच लक्षात राहिलं होतं. असंच आणखी एक गाणं म्हणजे 'इन्फॉर्मर' गाणं. त्यानंतर 'एस ऑफ बेस' ची गाणीपण ऐकायला छान वाटायची.

वारा's picture

28 Jun 2012 - 2:37 pm | वारा

प्रास जी मस्त धागा...
आपल्याला पण असली गाणी फार आवडायची. त्याचा अर्थ समजुन घ्यायचा कधी प्रयत्न कधी केला नाही.

अजुन काही गाण्यांची हिस्ट्री वाचायला आवडेल.
उदा.

मिस्टीरीयस गर्ल..
टेक माय ब्रेद अवे..
shes got the look..
Charlies whisper..
Cloud No 9 ...
Last Crismos..

गवि's picture

28 Jun 2012 - 2:41 pm | गवि

मस्त लिस्ट ..

Charlies whisper.

तुम्हाला बहुधा Careless whispers आठवत असावं.. जॉर्ज मायकेलचं.

वारा's picture

28 Jun 2012 - 3:15 pm | वारा

होय गविजी मला तेच म्हणायच आहे. अजुन बरीच गाणि आहेत.
आमचे मोठे बन्धुराज त्यांच्या मित्रांकडुन Cassate ढापुन आणायचे मग काय दिवस रात्र कंटाळा येईपर्यंत
रीपीट पळवायचो..

जयनीत's picture

28 Jun 2012 - 9:30 pm | जयनीत

छान लेख आहे. वन हिट वंडर गाणं म्हणतात ते अगदी योग्य आहे. एकदा ऐकलं तर विसरू शकत नाही असं.