साधारण १९७६-७७ च्या सुमारास अमेरिकेमध्ये इजिप्शियन फिवर पसरलेला. नव्हे नव्हे, 'डोंबिवली फिवर'सारखा कोणता तरी नवीन आजार नव्हे, त्या दरम्यान अमेरिकेमध्ये इजिप्तमधून प्राचीन वस्तुंचं फिरतं संग्रहालय आणलेलं आणि त्यात'King Tut' इजिप्तच्या फेरोंच्या शवपेटिका (सार्कोफॅगस) नि त्यांच्या थडग्यातल्या बहुमूल्य वस्तुंचं प्रदर्शन मांडण्यात आलेलं. हे इजिप्शियन सरकारी संग्रहालयाचं प्रदर्शन अमेरिकेतल्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये फिरत होतं आणि सर्वसामान्य अमेरिकन ते पहायला रोज शेकड्याने भेट देत होते. सगळ्या अमेरिकेत या इजिप्शियन संस्कृतीबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झालेलं. त्याच दरम्यान एक गाणं आलं, "King Tut".
'बॉय किंग' म्हणून ओळखल्या जाणार्या इजिप्शियन फेरो 'तुतानखामेन' याचं अमेरिकन लघुरूप होतं, 'King Tut' आणि हे गाणं लिहिलेलं, स्टीव मार्टीन यानं. स्टीव आपल्याला माहित आहे, एक विनोदवीर सिनेमानट म्हणून. पण त्याबरोबरच तो एक उत्तम विनोदी लेखक, गीतकार, संगीतकार आणि गायकही आहे. स्टीवने त्याच्या गाण्यांचे अनेक अल्बम्स प्रकाशित केलेत. त्यातलाच एक अल्बम, 'A Wild & Crazy Guy' प्रचंड लोकप्रिय झाला. या अल्बममध्ये सामिल असलेलं 'King Tut' हे गाणं स्टीवने, तो काम करत असलेल्या 'Saturday Night Live' या कार्यक्रमात सर्वप्रथम सादर केलं. तो स्वतः मुख्य गायक आणि त्यामधले 'Tut Uncommons' नावाचे त्याचे मदतनीस, हे मूळ 'निट्टी ग्रीट्टी डर्ट बँड'चे सदस्य आणि स्टीवचे कलाजगतातील सुरूवातीपासूनचे मित्र होते. या कार्यक्रमात सॅक्सोफोनवादक लू मोरिनीचा झकास सोलोही टाकला गेला.
'King Tut' हे गाणं पुढे जबरदस्त लोकप्रिय झालं. गाण्याच्या सिंगल्सच्या १० लाखाहून जास्त रेकॉर्ड्स विकल्या गेल्या. बिलबोर्ड टॉप १०० लिस्ट मध्ये हे गाणं १७व्या क्रमांकापर्यंत वर चढलं. या गाण्याला उत्कृष्ट विनोदी गाण्याचं ग्रॅमी मिळालं. पण बिलबोर्डावर ४० च्या वर चढलेलं स्टीवचं हे एकमेव गाणं असल्याने त्यामुळे 'King Tut' नि स्टीव मार्टीन, दोघेही 'वन हिट वंडर' म्हणून आपल्या या लेखमालेत दाखल झाले आहेत.
स्टीवची सांगीतिक प्रतिभा बघता, त्याने या क्षेत्रात नक्कीच आणखी भरीव कारागिरी केली असती पण त्याने आपला मोहरा अभिनयाकडे वळवला आणि त्याचं नाणं तिथेही खणखणीत वाजलं. जेव्हा शक्य होईल तेव्हा स्टीव अजूनही निरनिराळ्या ग्रूप्ससोबत गाणी गात त्याच्यातल्या संगीतकार-गीतकार नि गायकाला ताजतवानं ठेवतच असतो.
मग आता घेऊ यात, स्टीव मार्टीनच्या 'King Tut' या धमाल विनोदी गाण्याचा आनंद, त्याच्या १९७८-७९च्या सादरीकरणातून.
'King Tut' चे 'Saturday Night Live' कार्यक्रमामधलं सादरीकरण इथे पहाता येईल.
'King Tut' चे लिरिक्स -
King Tut (King Tut)
Now when he was a young man,
He never thought he'd see
People stand in line to see the boy king.
(King Tut) How'd you get so funky?
(funky Tut) Did you do the monkey?
Born in Arizona,
Moved to Babylonia (king Tut).
(king Tut) Now, if I'd known
they'd line up just to see him,
I'd trade in all my money
And bought me a museum. (king Tut)
Buried with a donkey (funky Tut)
He's my favorite honkey!
Born in Arizona,
Moved to Babylonia (king Tut)
Dancin' by the Nile, (Disco Tut)
The ladies love his style, (boss Tut)
Rockin' for a mile (rockin' Tut)
He ate a crocodile.
He gave his life for tourism.
Golden idol!
He's an Egyptian
They're sellin' you.
Now, when I die,
now don't think I'm a nut,
don't want no fancy funeral,
Just one like ole king Tut. (king Tut)
He coulda won a Grammy,
Buried in his Jammies,
Born in Arizona, moved to Babylonia,
He was born in Arizona, got a condo made of stone-a,
King Tut!
छायाचित्रं नि विडिओ आंतरजालावरून साभार.
या पूर्वी : वन हिट वंडर - २ -> 'Disco Duck'
प्रतिक्रिया
20 Jun 2012 - 3:19 pm | मुक्त विहारि
रियली एंजॉयेबल..
20 Jun 2012 - 3:45 pm | मुक्त विहारि
ह्याच कलाकारचे खालील सिनेमे पण बघा...
१. चीपर बाय द डझन (पार्ट १ आणि २)... मूळ पुस्तक जास्त मजेशीर आहे...
२. पिंक पँथर (पार्ट १ आणि २)...
21 Jun 2012 - 5:52 am | स्पंदना
हा गाणी पण म्हणायचा? कसा असेल हा प्रत्यक्षात?
प्रास माहिती अन डान्स आवडला. गाण ठिक.
21 Jun 2012 - 7:53 am | किलमाऊस्की
:)
21 Jun 2012 - 8:43 am | प्रचेतस
एक भन्नाट गाणं आणि त्यामागच्या कलाकारांची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद.