कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री,
आंध्रचे माजी राज्यपाल
एन डी तिवारी (वय ८६) यांची आग्नि परीक्षा होते आहे.
याबाबतची हकीकत अशी
रोहित शेखर यांच्या पितृत्वाच्या वादावरून डीएनए चाचणीस नकार देणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांच्या रक्ताचे नमुने आज (मंगळवार) डीएनए चाचणीसाठी घेण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने तिवारी यांना डीएनए चाचणीसाठी आजपर्यंत रक्ताचे नमुने देण्याचा आदेश दिला होता. अखेर आज सकाळी त्यांच्या डेहराडून येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे रक्त घेण्यात आले. रक्ताचे नमुने घेण्यासाठी जिल्हा न्यायाधीश, डेहराडूनच्या सरकारी रुग्णालयातील सर्जन, दिल्ली उच्च न्यायालयाचे सह रजिस्ट्रार आणि पॅथॉलॉजिस्ट यांचे पथक तिवारी यांच्या घरी आले होते. हैदराबाद येथील प्रयोगशाळेत हे नमुने पाठविण्यात येणार आहेत.
रोहित तिवारी यांनी एन. डी. तिवारी हे त्यांचे पिता असल्याचा दावा न्यायालयात केला आहे. त्यासंदर्भात उच्च न्यायालयाने तिवारी यांना २३ डिसेंबर २०१० रोजी दिलेल्या आदेशात डीएनए चाचणी करण्यास सांगितले होते. त्याला तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने तिवारींना डीएनए चाचणीसाठी लाळ, केस आणि रक्ताची चाचणी करण्याचे पर्याय दिले. तसेच या चाचणीचा निकाल गुप्त राखण्याची ग्वाही दिली. त्यावर तिवारींनी डीएनए चाचणीसाठी असमर्थता दर्शविल्यावर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात पाठवले.
http://www.esakal.com/esakal/20120529/4865194554541369575.htm
प्रतिक्रिया
29 May 2012 - 9:23 pm | आशु जोग
29 May 2012 - 9:23 pm | आशु जोग
29 May 2012 - 9:30 pm | क्लिंटन
नारायण दत्त तिवारी म्हणजे तेच ना ज्यांचा १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला नसता तर त्यांना राजीव गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानपदी विराजमान झालेले आपल्याला बघायला मिळाले असते?
29 May 2012 - 10:22 pm | चिरोटा
ह्या रंगेल (गांधीवादी)गड्याने उद्योग मंत्री,परराष्ट्रमंत्री,नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष पदही भुषवले आहे. आंध्रचे राज्यपाल असताना केलेला रंगेलपणा कॅमेर्याने टिपला आणि मग शेवटी हा गडी पक्षश्रेष्ठींच्या मनातून उतरला. राजकारणातले कोणतेही उच्च पद भूषवण्यासाठी निवडून येणे हाच आणि फक्त हाच निकष बघतात.
30 May 2012 - 1:15 am | आशु जोग
>> रंगेलपणा कॅमेर्याने टिपला
लिंक द्या ना
विश्वास नाही बसत
30 May 2012 - 11:03 am | चिरोटा
कंपनीतून मी असल्या लिंका देत नाही बसणार!! युट्युबवर शोधा. (नेहमीप्रमाणे) दोन वर्षापूर्वी मिपावरही चर्चा झाली आहे ह्या विषयावर. हैद्राबादमधील राजभवनात शरीरविक्रय करणार्या मुलींचे येणे जाणे असायचे. ना.द. तिवारींनी त्या बदल्यात मुख्य 'मॅडम'ना उत्तर प्रदेशातली काही कंत्राटे द्यायचे कबूल केले होते. कंत्राट मिळणार नाही हे नंतर लक्षात आल्यावर मॅडमने राजभवनातच कॅमेरा लावला आणि तिवारीं अडकले.
30 May 2012 - 1:55 am | चिंतामणी
त्या काळात New Delhi Tiwari म्हणायचे तेच ते.
उ.प्र.चे मुख्यमंत्री असताना (हो. एकेकाळी उ.प्र.मधे कॉन्ग्रेसची एकहाती सत्ता होती.) हे दिल्लीतच जास्त काळ असत.
असो.
निकाल विरूध्द गेला तरी त्याना काय फरक पडणार. तो गुप्त असणार आणि जनतेला लूटून जमवलेल्या संपत्तीतील थोडासा वाटा द्यायला लागेल इतकेच.
30 May 2012 - 7:24 am | नितिन थत्ते
>>जनतेला लूटून जमवलेल्या संपत्तीतील थोडासा वाटा द्यायला लागेल इतकेच.
वाटा द्यायला लागेल याविषयी साशंक आहे. तिवारींच्या नामुष्कीखेरीज अधिक ठोस काही साध्य होईल असे वाटत नाही.
नितिन थत्ते
30 May 2012 - 8:10 am | अर्धवटराव
म्हातारा आपल्या हिरव्या दिवसातल्या आठवणीने मनातल्यामनात ताजातवाना होत असेल ;)
अर्धवटराव
30 May 2012 - 5:10 pm | चिरोटा
राजकिय वर्तुळांमध्ये ह्या 'अभिमानाच्या' बाबी धरल्या जातात.काश्मीरचा एक मोठा नेता असल्या 'सवयीं' साठी प्रसिद्ध आहे.सरकारी खर्चाने परदेशवारी करताना ह्या नेत्याचे लक्ष परिषदा,संवाद सोडून भलतिकडेच असायचे.
30 May 2012 - 9:46 am | शैलेन्द्र
"परंतु सर्वोच्च न्यायालयाने तिवारींना डीएनए चाचणीसाठी लाळ, केस आणि रक्ताची चाचणी करण्याचे पर्याय दिले."
लाळ नाही "बकल स्वॅब" , गालाच्या आतील बाजुच्या त्वचेचे आवरण.
30 May 2012 - 9:55 am | शैलेन्द्र
कामानिमीत्त विदर्भ एक्स्प्रेसने अनेकदा मुंबई नागपुर प्रवास होतो, वर्हाड व विदर्भातल्या राजकारण्यांची ही आवडती गाडी. गाडीने कल्याण सोडल की अनेक आमदार खासदार मैफल जमवुन बसतात, आपण फक्त मुक श्रवणभक्ती करायची.. त्यातीलच काही जणांकडुन ऐकल्यानुसार, संध्याकाली, ७ वाजल्यानंतर, बायकांनी एन डी तिवारींच्या बंगल्यावरुन व पुरुषांनी सिताराम केसरींच्या बंगल्यावरुन जावु नये, अशी म्हणे दील्लीत नवख्यांना सुचनाच असायची.
31 May 2012 - 7:54 pm | आंबोळी
सुचना जबरदस्तच आहे.
डिएनए टेस्टचा निकाल काय लागला कळाले का?
1 Jun 2012 - 11:40 am | शैलेन्द्र
लागला तरी आपल्याला कळणार नाही.
30 May 2012 - 12:11 pm | अमृत
रक्तपरीक्षा.... :-) आणि त्या परीक्षेचा अचूक निकाल वर्तवू शकणार्यास कोणतेही बक्षिस दिले जाणार नाही :-)
अमृत
30 May 2012 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार
मग आता 'रक्तचरित्र-३' मध्ये दोघांपैकी एकाला नायक बनवायला हरकत नाही.
30 May 2012 - 3:24 pm | सर्वसाक्षी
तिवारीमहाशयांच्या रासलिलांसंबंधी एक एसेमेस जोरदार फिरला होता
'याला एन डी टि वी म्हणावे काय?
- नाही, वयाचा विचार करता एन डी टि वी इमॅजिन अधिक योग्य ठरेल'
31 May 2012 - 10:05 pm | सुनील
DNA टेस्टचा निकाल लागला का?
27 Jul 2012 - 6:43 pm | सुनील
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15203132.cms