धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!
२०१२ मध्ये भारतातल्या नोकरदारांचे पगार ११.९ टक्क्यांनी वाढणार!!
http://www.dayandnightnews.com/2012/02/indian-employees-to-get-11-9-sala...
धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!
तेही २०१० मध्ये १०.६ आणि २०११ मध्ये १२.६ टक्के वाढल्यानंतर!!
http://www.deccanherald.com/content/56166/india-inc-may-give-106.html
सरकारचं कौतुक करून, दुवा देऊन काही उपयोग नाही :)
त्यापेक्षा नाचलेले काय वाईट ! :)
धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!
नाचा रे नाचा !!!
आज सोनियाचा दिन आला... धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!
प्रतिक्रिया
24 May 2012 - 3:12 am | मी-सौरभ
वाढून काय फार फायदा होईल असे वाटत नाही बुवा :(
24 May 2012 - 6:37 pm | राजेश घासकडवी
पगार वाढले तर फायदा का होत नाही? जरा समजावून सांगा.
25 May 2012 - 10:09 am | शाहरुख
फार फायदा होणार नाही असं त्यांना वाटतंय !
बाकी, धागा आवडला :)
24 May 2012 - 3:16 am | Nile
ह्या रिकामटेकड्या लोकांना कशाला पगार वाढवून देतात कोण जाणे. हाफिसात बसून संस्थळावर चांभार चौकशा करत हिंडत असतात नुस्ते लेकाचे! सालं काँग्रेजी सरकार एकदम बिनकामाचं आहे राव!!
24 May 2012 - 10:33 am | स्वातीविशु
ह्या सरकारचे खायचे दात वेगळे अन दाखवायाचे दात वेगळे आहेत हो.....गेल्या दोन काही म्हणावी अशी पगारवाढ झाली नाहीये :(
24 May 2012 - 10:36 am | मदनबाण
गेल्या दोन काही म्हणावी अशी पगारवाढ झाली नाहीये
असं कसं ? असं कसं ? मंत्री-संत्री लोकांनी स्वतःची पगारवाढ एकमताने वाढवुन घेतली की ! त्यांनाही महागाईचा त्रास होतो म्हणे ! ;)
24 May 2012 - 10:47 am | चिंतामणी
गुरूजींचे मौलीक विचार वाचायला आवडतील.
24 May 2012 - 10:57 am | विनायक प्रभू
खुळ्याबरोबर मुळा
25 May 2012 - 4:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आलात ना पुन्हा आपल्या औकातीवर. एवढे शिकलात, विचारवंत झालात पण डोळा पगारावरच ठेवणार. मोठे व्हा, स्वतःचा एखादा धंदा सुरू करा, चार लोकं ठेवा नोकरीवर ते नाही. यांना आनंद पगार वाढण्याचा!
अवांतरः तुम्ही नाचताना कसे दिसाल याचं चित्र डोळ्यासमोर येऊन ड्वाले पानावले.
25 May 2012 - 8:58 am | शकु गोवेकर
धिन तिचिका धिन्तिचिका धिन्तिचिका रे -बोडी गार्ड मधले गाणे गा रे आप ले दात दाखवा रे धिन्तिचिका रे आ आ रे
25 May 2012 - 9:08 am | ऋषिकेश
हा पगार कोण?
27 May 2012 - 9:24 pm | हृदय भेदी
तकलीफ ही आहे की महागाई पगारवाढी पेक्षा दुप्पट वेगाने वाढते आहे.....
28 May 2012 - 12:53 pm | राजेश घासकडवी
सध्या भाववाढीचा दर ७ टक्क्याच्या आसपास आहे. खालील दुव्यावर गेल्या चाळीस वर्षातले भाववाढीचे दर पहायला मिळतील.
http://www.tradingeconomics.com/india/inflation-cpi
28 May 2012 - 2:52 pm | विसुनाना
एप्रिलमध्ये कंझ्युमर प्राईस इंडेक्स (रियल) इन्फ्लेशन १०.३६% झाले आहे. त्या आगीत आता पेट्रोलची भर पडणार. मे - जून मध्ये १२%.
29 May 2012 - 2:08 am | राजेश घासकडवी
हम्म्म... तरीही भाववाढ ही पगारवाढीच्या दुप्पट नाही.
मला एक कळत नाही, की भाववाढ होते आहे हे खरं आहे. पण त्याचबरोबर पगारही वाढताहेत हे मान्य करायला लोक का उत्सुक नाहीत? पेट्रोलचे भाव वाढले की त्यावर सरकारला शिव्या देणं, भ्रष्ट राजकारण्यांवर ताषेरे ओढणं, आणि पगार वाढल्यावर 'हो, असतील वाढले, पण त्याबरोबरच महागाई पण वाढली ना' वगैरे तक्रार.
सगळेच लोक कायम आयुष्याकडे 'अर्धा रिकामा ग्लास' म्हणूनच का बघतात?
29 May 2012 - 7:21 am | नितिन थत्ते
हा हा हा.
अहो पगार वाढतात ते "आम्ही" कर्तबगार वगैरे असतो म्हणून
महागाई वाढते "त्यांच्या" नाकर्तेपणाने
.... एवढं कसं कळत नाही?
29 May 2012 - 11:19 am | विसुनाना
(अनेक कारणांनी वाढणारी) महागाई, लाखो करोड रुपयांमध्ये भ्रष्टाचार आणि एकूणच 'पैसा है तो सब चलता है' अशा प्रकारे चाललेला कारभार हे नसते तर आयुष्याचा ग्लास आणखी भरला असता. ग्लास पावपट रिकामा असता तर आता होते आहे त्याच्या निमपट बोबाबोंब झाली असती. (बोंबाबोंब इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रिकामा भाग ऑफ द ग्लास! ;))
28 May 2012 - 8:44 am | चांगभलं
घासु लै मोकळ वेळ दिस्तोय...
"तिकडे " घाण करा कि :)
आता निलोबा येतिल चद्दि साव्र्त
28 May 2012 - 3:05 pm | परिकथेतील राजकुमार
छान बातमी.
बाकी तुमचा पगार कधी वाढणार ? तुम्ही आंबे कधी खरेदी करु शकणार ?
हितचिंतक
29 May 2012 - 2:38 am | निनाद मुक्काम प...
येथे मंदीने ग्रासले आहे.
त्या बिमारू ग्रीस आणि पोर्तुगाल च्या घशात येथील सर्व विकासनिधी विनासायाय जात आहे, तरीही त्यांचे तोंड वाकडे ते वाकडे .