(एक पेग संपून गेला..)

केसुरंगा's picture
केसुरंगा in जे न देखे रवी...
4 Aug 2008 - 8:26 pm

स्वाती फडणीस यांचा 'एक क्षण निसटू गेला..' वाचून एक निसटलेला क्षण आम्हालाही आठवला! ;)

हिरव्यागार बाटलीच्या तोंडाशी..
थांबून राहिलेला थेंब,
पांढर्‍या शुभ्र बर्फावर..
ओतलेल्या पिंटभर सोड्यात,
टप्पकन पडला...
एक लाट उंच उसळली..
ग्लासात आणि मनात!
एकाच वेळी!!
चिअर्स!!!
डोके हलके करणारी
अजून एक मैफल
लगोलग आत गेलो..
वाट बघत बसलेले काजू गोंजारले..
हळूच शर्टची बटणे मोकळी केली..
आणि गेलो..
तोंड ओले करण्यापुरतं पेग आणायला..
तो पेग तो क्षण!!!
येव्हड्यात पिऊन झाला..
छ्या!!!
जाऊदे!
मूड आहे आज!
म्हणताच ग्लास मोकळा झाला...
अजून एक पेग संपून गेला..

केसुरंगा

कवितामुक्तकविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

4 Aug 2008 - 8:31 pm | केशवसुमार

केसुरंगाशेठ,
वा वा क्या बात है.. चिअर्स!!!
अजून एक विडंबन पाडून गेला....
(निवॄत्त)केशवसुमार

विसोबा खेचर's picture

5 Aug 2008 - 12:53 am | विसोबा खेचर

हम्म! चालू द्या, छान चालली आहे विडंबने! :)

च्यामारी, आता हा केसूरंगा आणखी कोण आलाय बरं नवीन? केसू आणि रंगाने काय कमी हैराण केले होते म्हणून ही नवी भर की काय?! :)

सर्किट's picture

5 Aug 2008 - 5:01 am | सर्किट (not verified)

सोड्यासाठी वापरलेले "पिंटभर" हे विशेषण खूप आवडले.

- सर्किट

स्वाती फडणीस's picture

5 Aug 2008 - 11:06 am | स्वाती फडणीस

हे असे विडंबन येईल असे वाटलेलेच

नारदाचार्य's picture

5 Aug 2008 - 3:50 pm | नारदाचार्य

असे विडंबन आहे हे. पण तोचतोचपणा जाणवतोच सारखे दारू, ग्लास, सोडा, बाटली आले की (या गोष्टी कशा, प्रत्यक्षातच ठीक असतात. कल्पनेत नाही). अर्थात, प्रयत्न चांगला आहे.

अरुण मनोहर's picture

6 Aug 2008 - 10:42 am | अरुण मनोहर

>>>(या गोष्टी कशा, प्रत्यक्षातच ठीक असतात. कल्पनेत नाही). अर्थात, प्रयत्न चांगला आहे.
च्यामारी. लोक म्हनतेत दारू सोडा. आता सोडली तर खयालोंमधे प्यायला पन ह्या कळीच्या नार्दाची बंदी. जगायच कस मानसानं?
(हलक्यान प्या) :O)