संगीतप्रेमी मिपाकरांनो ,

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
4 May 2012 - 9:31 am

सर्व संगीतप्रेमी मिपाकरांसाठी एक मस्त कार्यक्रम होत आहे. पुणे परिसरातील मिपाकराना तर या कार्यक्रमाला जाणे सहज शक्य आहे.
सादरकर्ते- श्री अमित वैद्य .( खास वेगळे अ‍ॅकॉर्डेयन वादक ) कार्यक्रमाचे नाव- अ‍ॅन इव्हनिंग विथ अ‍ॅकॉर्डेयन
श्री वैद्य हे मेलडी व रिदम एकाच वेळी या वाद्यातून निर्माण करतात. त्यामुळे हे एक्सटेंडेड हारमोनियम वादन नाही. जुन्या जमान्यातील शंकर
जय ओपी नय्यर, सी आर, एस डी यांची अजरामर गीते वेगळ्याच ढंगात ऐकायला मिळतील.
या कार्यक्रमास पाहुणे म्हणून केर्सी लॉर्ड ( खास आर डी बरोबर काम केलेले ) आहेत. स्थळ० निवारा हॉल पत्रकार भवन जवळ सदाशिव पेठ पुणे
प्रवेश विनामुल्य .( ये सबसे बडी बात). दि. ६ मे सायंकाळी ६ वाजता.

विसू - ही अशी एखाद्या कार्यक्रमाची एक प्रकारे जाहिरात करणे हे जर मिपा च्या धोरणात बसत नसेल तर धागा काढून टाकला तरी चालेल. पण
विनामुल्य असल्याने शौकीनाने दिलेली एक माहिती या स्वरूपात मजकूर दिला असे.

संगीतमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

4 May 2012 - 9:47 am | अमोल केळकर

धन्यवाद
जरा मुंबईत ठेवता येईल का बघा ना असा कार्यक्रम विनामूल्य :)

अमोल

चिंतामणी's picture

4 May 2012 - 9:57 am | चिंतामणी

येण्याचा प्रयत्न करण्यात येइल.

धन्यवाद चौराकाका.
संगीतप्रेमी नसल्याने कार्यक्रमास येणे जमणार नाही.

संजय क्षीरसागर's picture

4 May 2012 - 10:59 am | संजय क्षीरसागर

अमित वैद्य अफलातून वाजवतो आणि कार्यक्रमही विनामूल्य आहे, मी नक्की प्रयत्न करीन

चौकटराजा's picture

4 May 2012 - 12:13 pm | चौकटराजा

येताना देव आनंद प्रमाणे कोणती तरी कॅप घालून या म्हणजे भेटायला सोपे जाईल .

तुम्ही रेकॉर्डिंग करून इथे टाका या कल्पनेला प्रचंड अनुमोदन आहे

पुण्याबाहेरील मिपाकरासाठी आणखी एक एहसान करा चौकटभाउ. सदर कार्यक्रमाचे कॅमेरा चित्रण करून कृपया मिपावर टाकावे. म्हणजे आमच्यासारख्या संगीतप्रेमींना अप्रत्यक्षतरी आस्वाद घेता येइल.

मुक्त विहारि's picture

4 May 2012 - 11:39 am | मुक्त विहारि

हेच म्हण्तो.

मोदक's picture

4 May 2012 - 11:32 am | मोदक

धन्यवाद...

परिकथेतील राजकुमार's picture

4 May 2012 - 12:40 pm | परिकथेतील राजकुमार

विसू - ही अशी एखाद्या कार्यक्रमाची एक प्रकारे जाहिरात करणे हे जर मिपा च्या धोरणात बसत नसेल तर धागा काढून टाकला तरी चालेल. पण

विनामुल्य कार्यक्रमाची माहिती 'समाजसेवा' ह्या सदरात मोडते. (वाचताय ना विकासशेठ ?) तेंव्हा काळजी नसावी.

माहितीबद्दल धन्याचे वादस आणि आभारप्रदर्शन्स.

विकास's picture

7 May 2012 - 6:40 pm | विकास

खी खी खी! चांगला मुद्दा! खासदारकी नाही पण गेला बाजार नगरसेवक म्हणून नियुक्त करायाला हरकत नाही. :-)

जोक्स अपार्टः कार्यक्रमाच्या माहितीबद्दल धन्यवाद. जमल्यास जे हा कार्यक्रम बघू शकणार नाहीत (पक्षी आमच्यासारख्यांना) त्यांच्यासाठी ह्या कार्यक्रमाचा वृत्तांत, छायाचित्रे आणि काही जर स्वरमुद्रण उपलब्ध झाले तर येथे अवश्य कळवा.

संजय क्षीरसागर's picture

7 May 2012 - 5:56 pm | संजय क्षीरसागर

हा प्रतिसाद काढला आहे