पुणे कट्टा: १ मे २०१२

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
28 Apr 2012 - 7:18 pm

नमस्कार मिपाकरहो,

पुण्यातील मिपाकरांसाठी एक बातमी अशी की तब्बल एक वर्षानंतर पुण्यात पुन्हा एकदा बार्बेक्यू नेशन येथे कट्टा आयोजीत करण्यात आला आहे. मागच्या बार्बेक्यू नेशनच्या कट्ट्याला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे सदर कट्टा त्याच ठिकाणी पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

दिवस :- मंगळवार दिनांक१-मे -२०१२
स्थळ :- वाकड-बार्बेक्यू नेशन-सयाजी रूफ टॉप, पुणे-मंबई बाह्यवळण मार्ग.
वेळ :- संध्याकाळी ७ च्या सुमारास

तूर्तास नक्की असलेले कट्टेकरी :- धन्या, ५० फक्त, मोदक, गणेशा, गणामास्तर, वपाडाव, अत्रुप्त आत्मा, प्यारे१, सूड, वल्ली

इच्छुकांनी मला, ५० फक्त आणि धन्या यांना व्यनि करावा. म्हणजे ऐन वेळेस काहीं बदल झाल्यास कळवता येईल. कृपया तिघांनाही व्यनि करावा, म्हणजे एकाने काहीं उत्तर दिल्यास बाकी दोघांना माहित राहील.

हे मुंबई कट्टा ह्या धाग्याचे विडंबन नसून खरेच असा कट्टा आयोजीत करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी. फक्त धागा जाहीर करण्यात आमच्याआधी मुंबईकरांनी बाजी मारली. :)
माणशी साधारण ५७५ ते ६५० (व्हेज-नॉनव्हेज) असा खर्च अपेक्षित आहे.
मेनू आणि इतर तपशील पुढील संकेतस्थळावर मिळेल.
http://www.barbeque-nation.com

मौजमजामाहिती

प्रतिक्रिया

हे मुंबई कट्टा ह्या धाग्याचे विडंबन नसून खरेच असा कट्टा आयोजीत करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी. फक्त धागा जाहीर करण्यात आमच्याआधी मुंबईकरांनी बाजी मारली.

हे ढिक्स्लेमर नसतं तर खरंच विडंबन वाटलं असतं.

असो. आयोजकांच्या यादीत आमचं नाव पाहून अंगावर मुठभर मास चढलं आहे. (एरव्ही कार्यालयात एक साधा टेलेफोनिक कॉल तुला सेटप करता येत नाही असा नेहमी उद्धार होतो आमचा. ;) )

सुहास झेले's picture

28 Apr 2012 - 11:09 pm | सुहास झेले

अगदी ह्येच म्हणतो ..... ;) :)

सोत्रि's picture

28 Apr 2012 - 8:20 pm | सोत्रि

करा लेको, कट्टे करा , खा खा मटार उसळ खा, शिकरणं खा...

- (कट्टा वृत्तांताची वाट बघणारा) सोकाजी

यकु's picture

29 Apr 2012 - 12:57 am | यकु

करा लेको, कट्टे करा , खा खा मटार उसळ खा, शिकरणं खा...

पानं खा, गफ्‍फांचे फड रंगवा, मनगटाला अत्तरं लावा ;-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Apr 2012 - 10:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आयला, वल्ली आणि त्यातून असा धागा म्हणजे विडंबन नाही यावर विश्वास ठेवणे कठीण.

"लांडगा आला रे आला" होऊ नये हो वल्ली दादा !!!!

विडंबनाचं कंत्राट आत्मुसकडे असते.:)

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2012 - 11:48 am | अत्रुप्त आत्मा

@विडंबनाचं कंत्राट आत्मुसकडे असते. >>>मी नाही दह्यातली,आणी कढी लावा ताकातली ;-) असं म्हणतात ते हेच अगदी

चिंतामणी's picture

28 Apr 2012 - 11:09 pm | चिंतामणी

>>>हे मुंबई कट्टा ह्या धाग्याचे विडंबन नसून खरेच असा कट्टा आयोजीत करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी.

हे बरे केले की जाहीरपणे सांगीतले "विडंबन नाही".

कट्ट्यास शुभेच्छा.

प्रचेतस's picture

29 Apr 2012 - 10:09 am | प्रचेतस

काय हे चिंतामणी काका, फक्त शुभेच्छा. तुम्ही पण कट्ट्याला येणं आवश्यक आहे.

चिंतामणी's picture

30 Apr 2012 - 4:55 pm | चिंतामणी

काही पूर्वनियोजीत कार्यक्रमामुळे येउ शकत नाही.

क्षमस्व.

जेनी...'s picture

1 May 2012 - 10:16 am | जेनी...

काका बिज्जि असतात बॉ .....:)

हर्षद खुस्पे's picture

28 Apr 2012 - 11:19 pm | हर्षद खुस्पे

आम्हि आलो तर चालेल का? म्हणजे आम्हि नविन आहे . आणी कोणाची ओळख नाहि.....म्हणुन विचरल

मोदक's picture

28 Apr 2012 - 11:32 pm | मोदक

अवश्य या.... ओळखी व्ह्ययला सुरूवात होईलच. :-)

अँग्री बर्ड's picture

28 Apr 2012 - 11:35 pm | अँग्री बर्ड

छान आहे, बड्या असामीच तिथे स्वागताला असल्याने यायला संकोच वाटतो. शिवाय दमडीचा प्रश्न आहेच. असो, दुरून पाहू झापातून

प्रचेतस's picture

29 Apr 2012 - 10:10 am | प्रचेतस

बड्या असाम्या कोणीच नाहीत, सर्व आपलेच साधेसुधे मिपाकर आहेत, तेव्हा संकोच करू नये. अवश्य यावे.

अन्या दातार's picture

29 Apr 2012 - 11:21 am | अन्या दातार

(नेहमीप्रमाणेच) कट्ट्यास शुभेच्छा!

भिकापाटील's picture

29 Apr 2012 - 11:42 am | भिकापाटील

मि आलो तं चालन का

भिका दामु जगदाळे

या की बिंधास.
सर्व मिपाकरांनी यावं हीच अपेक्षा आहे.

पियुशा's picture

29 Apr 2012 - 12:58 pm | पियुशा

तुमच्या पुणे कट्ट्याला हार्दीक हार्दीक शुभेच्छा :)

प्रभाकर पेठकर's picture

29 Apr 2012 - 8:15 pm | प्रभाकर पेठकर

'मी पा'हतोय. जरा भारताबाहेर पडलो तर झाले ह्यांचे कट्टे सुरू. 'मुंबई कट्टा' काय, लगेच 'पुणे कट्टा' काय..! आता मुंबईकर 'चिंचपोकळी कट्टा' करतील. नाहीतर 'धारावी कट्टा' करतील की लगेच पुणेकर 'सासवड कट्टा' करतील नाहीतर 'निगडी कट्टा' करतील. आम्ही आपले बापुडवाण्या चेहर्‍याने ह्यांना 'शुभेच्छा' देत बसतो आहे.

:( :-( :sad:

कुंदन's picture

29 Apr 2012 - 11:50 pm | कुंदन

काका, दुबै कट्ट्याला येणार का ?
१५ मे ते ३० मे मध्ये ठरवुयात.

प्रभाकर पेठकर's picture

30 Apr 2012 - 2:11 am | प्रभाकर पेठकर

ठरवा तारीख. गुरुवार, शुक्रवार सोडून असेल तर उत्तम. माझे, आठवड्यातील, व्यवसायाचे मुख्य दिवस आहेत.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Apr 2012 - 12:40 am | विश्वनाथ मेहेंदळे

काका तुम्ही भारतात आले कधी आणि गेले कधी तेच कळेना, मग कट्टा कसा करणार ? नंदनने तत्परतेने फोन केला ना. तुम्ही परत कधी येणार आहात ते कळवा, आपण एक कशाला, दोन कट्टे करू !!!

प्रभाकर पेठकर's picture

30 Apr 2012 - 2:13 am | प्रभाकर पेठकर

जमवूया. मी भारतात येई पर्यंत बहुतेक पावसाळा उजाडेल. पण, नक्कीच जमवूया.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 May 2012 - 1:55 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अस्सल मुंबईकराला पावसाची काय भीती हो काका ? मागच्या पावसाळ्यात गाड्यांचा प्रॉब्लेम असताना केला होता की एक कट्टा. तुम्हाला चालत असेल तर भर पावसात मरीन ड्राईव्ह ला एक कट्टा करू....

प्रभाकर पेठकर's picture

2 May 2012 - 1:06 am | प्रभाकर पेठकर

भर पावसात मरीन ड्राईव्ह ला एक कट्टा करू....

जरूर करू. मला आवडेलच. पण मनात, सर्वांनी मिळून, २-३ दिवस कोंकण करावं असा विचार आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 May 2012 - 10:31 am | विश्वनाथ मेहेंदळे

अरे वा !!! आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन !!!!

गवि's picture

2 May 2012 - 10:39 am | गवि

कोंकणात कट्टा..

चला... कुठे, कधी, केव्हा? मी कोणाकोणाला कुठून पिकप करायचे? ठाणे पनवेल मार्गात कुठेही थांबावे. पहाटे लवकरच निघू.

आणखी कोणकोण येताहेत?

प्रचेतस's picture

2 May 2012 - 10:58 am | प्रचेतस

मी येतोय.

प्रभाकर पेठकर's picture

2 May 2012 - 11:45 am | प्रभाकर पेठकर

अरे! हो...हो...हो... जरा थांबा. माझे येण्याचे नक्की तर ठरू द्या. १०-२० दिवस आधी पक्की योजना आखून बार उडवून देऊ कोंकणाचा (कोंकनाचा टंकणार होतो).

सूड's picture

2 May 2012 - 11:58 am | सूड

मी पण यायला तयार आहे कोकणातल्या कट्ट्याला, वीकांतास कट्टा नसेल तर महिनाभर आधी हिंट दिलीत तर बरं. म्हणजे तश्या सुट्ट्या टाकायला.

प्रभाकर पेठकर's picture

2 May 2012 - 12:22 pm | प्रभाकर पेठकर

मान्य. तसा प्रयत्न करतो.

मृत्युन्जय's picture

30 Apr 2012 - 9:32 am | मृत्युन्जय

मेल्यांनो जरा बरा दिवस नाही का रे सापडला. त्या छत्रपतींना गेले २ महिने विचारतोय सरुटॉबानेचा कट्टा कधी तर सांगायला तयार होइनात आणि असे चोरीछुपे कट्टा ठरवुन मोकळे झालात होय रे? माझ्या नावचे ३ व्हेज स्टार्टर्स आणि १ डेझर्ट बाजूला काढुन ठेवा नाहितर पचायचे नाहित तुम्हाला ते.

बाकी कट्टय्याला (जळजळी) शुभेच्छा. ऐष करो लेको.

शुभेच्छा!
बारबेक्यु नेशन्स म्हंजे अन्लिनिटेट खाणं आणि (म्हणूनच) अनलिमिटेट गप्पा :) धमाल करालच (ते सांगायला नकोच)
फटु टाकून नक्की जळवा! :)

प्रेरणा पित्रे's picture

30 Apr 2012 - 10:45 am | प्रेरणा पित्रे

क्रुपया व्यनि कसा करायचा ते सांगावे....

प्रचेतस's picture

30 Apr 2012 - 1:49 pm | प्रचेतस

उजव्या बाजूच्या कॉलममध्ये आपल्या आयडीच्या नावाखाली 'संदेश' अशी लिंक दिसेल. त्यावर क्लिक करून संदेश पाठवता येईल.
किंवा आपण ७.३० च्या सुमारास सयाजीपाशी हजर राहिलात तरी चालेल.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Apr 2012 - 1:21 pm | बिपिन कार्यकर्ते

मी येणार आहे. :)

विजुभाऊ's picture

30 Apr 2012 - 4:05 pm | विजुभाऊ

प्रेषक बिपिन कार्यकर्ते Mon, 30/04/2012 - 13:21.

मी येणार आहे. Smile

बिपिन कार्यकर्ते

ग कुणीतरी येणार येणार ग.पाहुणा कुणी येणार येणार ग........

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Apr 2012 - 5:16 pm | निनाद मुक्काम प...

हे असे होणारे कट्टे आणि त्यांची रसभरीत वर्णने पाहून जीवात घालमेल सुरु आहे.
ह्यावेळी जीवाची मुंबई करावी ह्या हेतूने पत्नीला टांग देऊन दोन आठवडे मी एकटाच भारतवारी करण्याच्या बेतात आहे.
मग हम हे और कट्टे

निनादरावांच्या जुन्या ओळखींचा फायदा मिपासाठी करवून पुढला एखादा (म्हमई) कट्टा त्यांच्यासोबत पंचतारांकित स्थानात साजरा करावा असा एक अत्युच्च विचार डोक्यात घोळत आहे. काय म्हणता निनादराव? ;-)

श्रावण मोडक's picture

30 Apr 2012 - 11:24 pm | श्रावण मोडक

ह्यावेळी जीवाची मुंबई करावी ह्या हेतूने पत्नीला टांग देऊन दोन आठवडे मी एकटाच भारतवारी करण्याच्या बेतात आहे.
मग हम हे और कट्टे

धाडस आहे बॉ असं काही तरी जाहीर लिहिता म्हणजे.

पैसा's picture

30 Apr 2012 - 11:36 pm | पैसा

तिला बिचारीला मराठी येत नाही त्यामुळे हे तिच्या कानावर जायची शक्यताच नाही!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 May 2012 - 12:58 am | निनाद मुक्काम प...

हे बाकी खरे आहे.
कोणी मिपाकर जर्मन भाषेत पारंगत असला म्हणजे आमची घटका भरली.
पण विनोदाचा भाग सोडला. तर ह्या भारत भेटीत स्टाफ रेट वर लीला केम्केंस्की मध्ये दिवस मुंबई मुक्काम त्यात घरी लगीनसराई व उरलेले दिवस भारत भ्रमण म्हणजे मला जीवाची मुंबई करायला मिळालीच नाही.
कीर्तीचा वडापाव खाणे नशिबी नव्हते. म्हणून पुढची भारतभेट एकट्याने करायची व मजबूत नाटके सिनेमे ( ज्या बद्दल मिपावर चांगले लिहून आले असेल तर ) आणी जुन्या व नव्या मित्र मैत्रिणीशी भरपूर मराठीत गप्पा मारणार आहे.
येथे गेल्या सहा महिन्यात कोणाशीही मराठी बोललो नाही आहे.
आपण ह्या भाषेत संवाद साधत आयुष्याची २२ वर्ष भारतात घालवली ह्यावरील विश्वास गढूळ होत चालला आहे. म्हणून लिहिण्याच्या निमित्ताने का होई ना मराठीत लिहिता होतो ( हेच माझ्या लेखापेक्षा प्रतिसाद मोठा होण्याचे एक कारण असेल )
तर पुढील भारतभेटीत एककलमी कार्यक्रम
मी मराठीचा आणी मराठी माझी.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Apr 2012 - 11:32 pm | निनाद मुक्काम प...

प्रास भाउ
जरूर
माझ्याकडून जेवढे जमेल तेवढे करून पंचतारांकीत कट्टा नक्की करू.

सुहास..'s picture

30 Apr 2012 - 11:47 pm | सुहास..

सॉरी !

हर्षद खुस्पे's picture

1 May 2012 - 12:08 am | हर्षद खुस्पे

मी येणार आहे. :) सम्पर्क कुठे करायचा ते सांगावे हि विंनंती

प्रचेतस's picture

1 May 2012 - 8:29 am | प्रचेतस

व्यनिद्वारे फोन नं पाठवत आहे.
सयाजीला डायरेक्ट ७:३० पर्यंत आलात तरी चालेल.

रेवती's picture

1 May 2012 - 12:33 am | रेवती

इनो.

विकास's picture

2 May 2012 - 1:12 am | विकास

:(

बाकी कट्ट्यांसदर्भात एक प्रश्न: खर्‍या आणि ड्युप्लिकेट अशा दोन्ही आयडीज ना कसे बोलवावे? ;)

प्रभाकर पेठकर's picture

2 May 2012 - 1:20 am | प्रभाकर पेठकर

खर्‍या आयडीज् ना बोलवा, डुप्लीकेट आयडीज् वृत्तांत लिहीतील.

अनेकानेक शुभेच्छा.. दुसर्या दिवशी सुटी असती तर नक्की आलो असतो.. पुणे गेटची आठवण ताजी आहे..

पुणे कट्ट्याला शुभेच्छा

काही झालं तरी टेबलावरचे झेंडे खाली पडू देऊ नका. मोदक, गणेशाला दिमतीला घ्या....
त्यांनी पांढरे झेंडे झळकावले पाहिजेत.. बास ;)

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2012 - 11:41 am | अत्रुप्त आत्मा

@त्यांनी पांढरे झेंडे झळकावले पाहिजेत.. बास >>> आपण आलात तर लाल झेंडा लाऊ

सहज's picture

1 May 2012 - 12:43 pm | सहज

आजही एक लाईव्ह वृत्तांत येणार काय?

कुंदन's picture

1 May 2012 - 12:51 pm | कुंदन

कट्ट्याला शुभेच्छा!
बाकी वाकड पुण्यात कधी आले ब्वॉ ? हे म्हणजे उगीच कर्जत्-कसार्‍याला मुंबै म्हणण्यासारखेच झाले की.

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2012 - 1:35 pm | अत्रुप्त आत्मा

प्रांतीय अस्मितेची आग लावण्याचा दुष्ट प्रयत्न... तीव्र णिषेध.. !

प्रभाकर पेठकर's picture

2 May 2012 - 12:27 pm | प्रभाकर पेठकर

तसे ठाणे तरी मुंबईत कुठे येते? पण, आता मुंबई अफाट पसरली आहे. तेंव्हा हरकत नसावी. येत्या काही वर्षात पुणे सुद्धा मुंबईत येईल, अशी आशा आहे.

बॅटमॅन's picture

2 May 2012 - 1:31 pm | बॅटमॅन

>>येत्या काही वर्षात पुणे सुद्धा मुंबईत येईल, अशी आशा आहे.

काडी, पेट्रोल, तेल, इ.इ.इ. सर्व दिल्या गेले आहे या एका वाक्याने :P

श्रीरंग's picture

1 May 2012 - 3:24 pm | श्रीरंग

अर्रर्र!! यावेळीही संधी हुकणार कट्ट्याला येण्याची. :(
मजा करा!!

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2012 - 12:49 am | अत्रुप्त आत्मा

लै जबर्‍या मज्जा आली राव...येक नंबर ठिकाण हाय

चौकटराजा's picture

2 May 2012 - 7:26 am | चौकटराजा

यावेळ्चा वृतांत शब्देवीण संवादू असा द्या . अख्या स्मायली सेंटरला कामाला लावा. मोदक, वल्ली यांच्या जाड्या स्मायली तिथे पाहिल्याचे स्मरतेय ! आत्मा अव्यक्त असल्याने त्याच्या स्मायलीचा मातुर सवाल खडा हाय !
डोळा मिचकावणार्‍या स्मायलीसह- च्याउरा

कुंदन's picture

2 May 2012 - 12:35 pm | कुंदन

कट्टा नक्की झाला ना , मग वृत्तांत कुठाय ?

>>कट्टा नक्की झाला ना , मग वृत्तांत कुठाय ?
'प्रत्येक कट्ट्याचा वृत्तांत असायलाच हवा असं नाही.' असं जुन्या जाणत्या (कृपया वयस्कर वाचलं तरी हरकत नाही.) मिपाकरांचं मत आहे. त्यातही हवाच असेल वृत्तांत तर आयोजकांशी सल्लामसलत करणेत येऊन योग्य ते करणेत येईल. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 May 2012 - 4:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अरे लिही ना रे वृत्तांत !!! त्यांच्याकडे भाग दोन तयार आहे, पण तुम्ही भाग एक टाकल्याशिवाय त्यांना तो टाकता येत नाही आहे ना ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2012 - 6:13 pm | अत्रुप्त आत्मा

बार्बेक्यू नेशनचा रणसंग्राम-अर्थात मिपाराष्ट्राचा प्राणांतिक लढाईनंतरचा विजय

संध्याकाळची वेळ,,फक्त अंधार पडायची खोटी होती...प्रांत पुणे येथुन खादाडांचा एक सशस्त्र जथ्था एका पांढर्‍या शुभ्र ऐरावतावरुन तासभर आधीच कुच करुन निघालेला होता... तो जथ्था रणसंग्रामी येऊन तयारित उभा राहिला...पण बाकिची दलं अजुनही येत नव्हती,शत्रू त्यांच्या नाद/वासासकट युद्धभूमीच्या अगदी समीप येऊन ठेपलेला होता.अगदी कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल अशी परिस्थिती. एवढं कमी की काय,म्हणुन काही वेळातच पिंपरी/चिंचवड ग्रामाचा तो महा(न) वल्लीदार खादाड रणवीर आपल्या तश्याच धीरगंभीर पल्सर नामक काळ्या घोडीवरुन रस्त्याची धूळ चौखुर उडवीत दौडत दौडतच आला...आल्या नंतर घोडी सावलीला सोडून म्होरक्याला रामराम आणी आंम्हास सलाम ठोकुन तातडीच्या युद्ध पूर्व बैठकीत सहभागी झाला.''आज कोणत्या बाजुने हल्ला चढवायचा..? आघडीला कोण असणार..? खिंडित कुणाला गाठायचे..? ;-) '' आदी अनेक अत्यावश्यक आणी महत्वाच्या बाबींवर चर्चा घडली... या चर्चे दरम्यान आपल्या म्यानेतून तलवार काढलेला,मुदकेश्वर दत्त आणी त्याचा सहकारी तेज नेमबाझ सुडकेश्वर मुख्य दलाच्या आज्ञेच्या प्रतिक्षेत कधी येऊन हुबे ठाकले ते कळलेही नाही.एंव्हाना सुरुंगस्फोट तज्ञ दलपती पन्नास फक्तेश्वर,जोरदार हल्लाबाज बहुशस्त्रधारी आत्मारामभट्ट अत्रुप्त,गुप्तहेर पिंगट धुंगट,राहणार-अशक्यओळखग्राम,आणी खजिनदार सह भालाबाज धनाजी(फेम-संताजी/धनाजी) अशी एकंदर ७ जणांची टोळी हाती भडकलेला जठराग्नी घेऊन हळूहळू सयाजी डोंगराच्या पायथ्याकडे सरकू लागली होती.अजुन काहि जण कमी होते,पण अता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता...

सयाजी डोंगराकडुन चढाईला सुरवात करणार,एवढ्यात समोरच्या झाडीतुन द्विराष्ट्र शांतता सेनेचे काही अधिकारी डोंगरावर जाण्यापूर्वीच्या तपासणी साठी सामोरे आले.बार्बॅक्यूनेशन भूमीकडे नेणारा डोंगर चतुरतारांकित असल्यामुळे सर्व राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष कॉफी अन्नान्न यांच्या सांगण्यावरुन अंगावरुन झाडपाला फिरवुन सर्वांना मार्गस्थ करण्यात आले.डोंगर दैवीगुणांनी संपन्न असल्यामुळे आकाशस्थ पातळीवर असलेल्या युद्धभूमीकडे योद्ध्यांना नेण्यासाठी एक उडता हवामेहेल ठेवण्यात आला होता,त्यात बसुन सर्व योद्धे युद्धभूमीच्या नियोजित स्थानी पोहोचले... साक्षात मोदकेश्वराने आधीच मोर्चे बांधणी केलेली असल्यामुळे, पुढे अन्नाच्या एकाही कणाचा विलंब न होऊ देता सर्वांनी आपापली शस्त्रे तय्यार केली.

एवढ्यात आणखि एक योद्धा गाणाजी मास्तुरे,आणी नव आमंत्रित मुश्टीयोद्धा महाग्यानी-नादखुळा यांनिही आवाजी हजेरी लावली,शत्रूला सैन्याची होणारी ही जमवा जमव कानावर गेलेली होतीच,म्हणुनच मुख्यभूमी टेबलावर प्रतिचार सैनिकांच्या मध्यभागी एकेक रणचंडी हवनकुंड मांडण्यात आले.आणी काहि कळायच्या आत,बार्बॅक्यूनेशनचे शस्त्रधारी सैनिक चहुबाजिनी हल्ला चढवू लागले,एकच रणसंग्राम जाहला... बोला...''पार्वतीपते हरहरमहादेव...!'' ''हणामारा जाळा तोडा...जो जो दिसेल त्याला फोडा'' अशा सहस्रावधी गर्जनांनी आसमंत दुमदुमुन गेले, जो जो कबाबी सैनिकांचा गज रणभूमीवर उतरेल त्यास मिपाखादाडराष्ट्राचे धुरंधर रणवीर तेल लाऊन तंदुरात पोळू लागले. ''वाचवा वाचवा..रेहेम रेहेम'' अश्या आरोळ्या उठत असताना(च) पोळुन पळुन जाणर्‍या काही सैनिकास नेटाने पकडुन जायबंदी करण्यात येऊ लागले.आज मिपाराष्ट्र-विजयाची शपथ घेऊन हरएक योद्धा आलेला असल्यानी,दर दहा मिनिटाला कबाबच्या ५/५तुकड्या सहज युद्धमुखी गारद होत होत्या,

काही वेळानी युद्धातले डावपेच कमी पडु लागले असं वाटत असताना, एका जुन्या अनुभवी पूर्वराष्ट्रातला युद्धतज्ञ बि.का. धाऊन आला.मग बार्बॅक शत्रूंचे सर्व सैन्यहारक असे एक नेहमीचे धोरण नक्की काय असावे ते सगळ्यांच्या लक्षात आले...आधी बलाढ्य बार्बेक सैनिकांच्या पायदळ/घोडदळासह अनेक नामी तुकड्या चाल करुन येणार्‍या राष्ट्रावर सोडाव्या.आणी त्यांना खिंडित येण्यापूर्वीच तह करण्यास भाग पाडावे...पण आज ते होणे नव्हते,माता अन्नपूर्णेच्या मनात काहि वेगळेच होते.पहिल्या कबाब हल्याचा रणकुंडात भाजुन खरपुस समाचार घेतल्या नंतर,मिपाराष्ट्राची ही धुरंधर सौन्याची तुकडी अजुनही दोन्ही---हतानी लढत असलेल्या मोदकेश्वराला अवरते घेऊन पुढिल रणभूमीकडे गेली...

परंतु मुख्ख्यान्न रणक्षेत्रात काही विशेष जोर नव्हता हे लक्षात आल्यामुळे...तिथे माफक लुटालुट करुन...शत्रूच्या त्या डेझर्टच्या मखमली हिरवळ असणार्‍या ;-) बागेकडे सगळ्यांनी कुच केली.निरनिराळ्या फळांच्या,केकच्या,पेस्ट्रीजच्या,पुडिंगच्या तयारीत उभ्या असलेल्या सैन्यावर आखरी वार पडला...पुन्हा रणभेरी वाजो लागल्या,धरा माराच्या आरोळ्यांनी रणमैदान गर्जू लागले...दिसेल त्या काऊंटरवर प्रत्येक तुकडीचा निकराचा हल्ला पडला... युद्धमैदान आईक्रिमच्या डागांनी गारेग्गार झालं.टेबलावर जिकडे बघावं तिकडे लचके तोडलेल्या फळांचे छिन्न-विच्छिन्न भाग, डेझर्टच्या रिकाम्या प्लेटांवर काट्याचमच्यांनी मान टाकुन दिलेली शरणागती,आणी आईस्क्रिमच्या प्रत्येक भांड्याला दिलेल्या सद्गतीने टेबलरूपी रणमैदान माखलेलं होतं..

अखेर बराच काळ चाललेल्या रणधुमाळी नंतर मिपाराष्ट्राचे खादाडवीर केलेल्या युद्धाच्या मानाने अत्यंत माफक टॅक्स रणभूमीला चुकवून,विजयी यशस्वी मुद्रेने डोंगरपायथ्याशी जमा झाले...तिथे आज घडलेल्या संग्रामातील प्रतिपक्षातील अवडलेल्या योद्ध्यांच्या नामाचा जयजयकार करण्यात आला...लगेच...''आता पुढिल लढाई कोठे..?'' असे प्रश्नही झडू लागले.त्यावर काही माफक चर्चा घडुन..सर्व दलांनी परस्परांचा निरोप घेतला..आणी पुन्हा नविन लढाई जिंकण्याची लक्ष स्वप्ने पाहात,सर्व जण आपापल्या दलांसह स्वगृहप्रासादाची वाट धरते जाहले... :-)

वपाडाव's picture

2 May 2012 - 6:20 pm | वपाडाव

फटु किधर हय???

बिपिन कार्यकर्ते's picture

2 May 2012 - 6:25 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! काही सैनिक तर बार्बेक सैन्याच्या खाली पडलेल्या सैनिकांना अक्षरशः विस्तवावर भाजून भाजून खात होते. क्रौर्याची परिसीमाच जणू! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2012 - 6:56 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ही ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा... शत्रू लै टेस्टी असल्यावर जास्त भाजायला नको का..? ;-)

आणी एकदा हाती लागल्यावर सद्गती नाय दिली तर आमी अट्टल कसले..? ;-)

यकु's picture

2 May 2012 - 6:38 pm | यकु

अंगात काय संचारलं होतं हो हा वृत्तांत लिहिताना तुमच्या???

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=))

हा युद्धखोरीचा वृत्तांत वाचून दोन सँडविचे, एक कचोरी आणि दोन पेले ताकाला सद्गती देणेत आली आहे :p

आमची स्वारी ऐकोन होती की जाज्वल्य शिवभक्त तथा खाद्यालंकृत बाळसे धारी श्री रा रा वल्लीपंत, हे कादंबरीमय शिवकाल वाचत आहेत. पण या धुमश्चक्रीची ही बख्रर ऐकोन आम्हासी " नेशनचा किल्ल्ला पडला " या पवाड्याची सय आली. ही बखर श्री वल्लीपंत यानी तर लिहिली नाही ना?
पण नाही... आम्हास त्यात अ आ यांच्या लेखनप्रतिभेचा उजेड दिसत आहे . काय करावे बरे ? ,,,,,,( चौकट राजा येरझार्‍या घालतो) कोण आहे रे तिकडे",,,,,, च्यायला ... सगळेच नेशनला गेले का काय ? अरे ...ए..... गुप्तहेराना पाठवा मिपावर अन शोधोनी काढा या बखरीचा खरा कर्ता कोण?

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2012 - 6:54 pm | अत्रुप्त आत्मा

हे युद्ध क्षेत्रीचे काही फोटू ;-)
१)युद्धपूर्व स्थिती-डावीकडुन...पिंगू.अ.आ.,सूड,५०फक्त

२)धन्या,वल्ली,पिंगू

३)उजव्या रांगेत पहिले गणामास्तर आणी शेवटचे नाद-खुळा...बाकि पूर्व परिचित

४)फायर ऑन-रणचंडी हवनकुंड


५)मित्रहो धनाजींची भावमुद्रा कोणते मुद्रितभाव शोधते आहे बरे..? ;-)

मुख्ययुद्धाचे फोटो-(कुणी काढले असल्यास ;-) ) टाकेल ;-)

६)अता डायरेक्ट शेवटची डेझर्टची रणधुमाळी----


७)आ-रक्त आईस्क्रिम

८)५०राव सोकाजींच्या अठवणीने बचैन झाल्याचे हे प्रत्यंतर.. ;-) नंतर तो शॉट ग्लास तसाच सोडून दिला म्हणे... ;-)

९) शेवट योद्धे(ही) हलाल ;-) जाहले



भटजी, वृत्तांत झकासच हो. मंडळी, आता विचारलंच आहे म्हणून सांगतो ती डेझर्टस् भरलेली प्लेट माझी बरं का !! ( कोणीही विचारलं नसलं तरी असं सांगायचं असतं ;)) तेवढे डेझर्टचे प्रकार खाऊन नंतर दोन स्कूप मँगो आणि एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम येवढंच खाल्लं. तिथले स्टार्टर्स बाकी भन्नाट होते.

स्पंदना's picture

2 May 2012 - 6:59 pm | स्पंदना

पाय? पाय कुठ हाईत तुमच? हिकड लाउन द्या, आमी पाया करुन खाउ!

धन्य धन्य जाहलो आम्ही हा वृतांत वाचुन. एकुण काट्याचमच्याची लढाई जिंकुन विरश्री संचारलेल्या एकुण एक विराला आमचा दंडवत.

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2012 - 10:48 pm | अत्रुप्त आत्मा

वा...वा...वा... काय अप्रतिम आणी मनाफासून परतिसाद दिलात हो तुंम्ही...! मनात परचंड आनंद दाटुन आला...

@पाय? पाय कुठ हाईत तुमच? हिकड लाउन द्या, आमी पाया करुन खाउ!>>> त्या पेक्षा आपला भेजा द्या ना पाठवुन,आमी बी भेजा फ्राय करून खाऊ...! ;-)

स्पंदना's picture

3 May 2012 - 5:30 am | स्पंदना

>>त्या पेक्षा आपला भेजा द्या ना पाठवुन,आमी बी भेजा फ्राय करून खाऊ...! >>

ह्ये काय असतय आनि? भेजा? त्यो र कुठ अस्तोय? आन असला तर त्यो मिथ्य अस्तो की अमिथ्य?

श्रीरंग's picture

2 May 2012 - 7:18 pm | श्रीरंग

जबरदस्त वृत्तांत!

अत्रुप्त आत्मा यांनी दैनिक पुढारीच्या रविवार पुरवणीतील 'खबरनामा' नामक सोमाजी बिन गोमाजी लिखित अविस्मरणीय सदर नक्कीच वाचलेले असावे असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे :)

(संध्याकाळ प्रभृतींपेक्षा पुढारीचा नक्कीच फ्यान असलेला आणि फेकानंदबरोबर त्याची तुलना होत असलेली पाहून वैतागलेला)

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2012 - 6:59 pm | अत्रुप्त आत्मा

@नक्कीच वाचलेले असावे असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे >>> नाय हो दादा...उलट त्यांनाच हे वाचायला धाडुन द्या.. ;-)

सांगतो ;) पण तुमी वाचलं नाय का ते? नसेल तर पुढारीचा रविवार अंक घ्या, बहार नामक पुरवणी घ्या आणि खबरनामा नामक सदर वाचा जरूर :)

भन्नाट ...

जाम मज्जा करताय राव तुमिलोग :(

आता जरा नाव पन सांगा सेपरेट फोतु लावुन
आमि नवि माणस ...योद्ध्यान्ची नाव त्याच्या छयाचित्रन्सोबत द्या कि
ह्यातल्या ५० रुपयना बघायची इच्छ आहे :)

अवांतर : पून्याच्या लोकाना हसायच वावड आहे काय ??? :)

गणामास्तर's picture

2 May 2012 - 7:31 pm | गणामास्तर

पहिल्याच फोटोत समोर उजवीकडून पहिले आहेत ते ५० फक्त.

पून्याच्या लोकांच्या हसण्याबद्दल आम्हाला काय माहित? ;)

जेनी...'s picture

2 May 2012 - 7:44 pm | जेनी...

पून्याच्या
_____________

याला म्हणतात पूणेकर :(

नीदान प्रतिसादाना ( प्रतिसादात )तरि मुक्तपणे बागडु द्या ओ :(

अवांतर : पून्याच्या लोकाना हसायच वावड आहे काय ???

म्हणजे तुम्ही अजुन पुणेकरांना पुरते ओळखलेले दिसत नाही. ;)

- (पुणेरी) सोकाजी

सोकाजि अहो अजुन तसा काहि सामनाच झाला नाहिय कधी पूणेरि लोकांशी :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

3 May 2012 - 12:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तुमचा सदरा मिळेल काय हो ?? ;-)

>>अवांतर : पून्याच्या लोकाना हसायच वावड आहे काय ???
त्याचं कायै काकू, से चीऽऽऽज असं म्हणून काढलेले फोटो कृत्रिम वाटतात. त्यामुळे गप्पाटप्पा चालू असताना हे फोटो काढलेत.

ओह्ह अस्स आहे होय सूड काका .....?? :-o

अहो पण " गप्पा मारताना हसु नका "
अशी कुठे पाटि लावलि होति काय काका ??;)

एका काकूंना एका नवयुवकाला बळेबळे काका म्हटलेलं पाहून अंमळ मौज वाटली.

"अजूनी यौवनात मी" या त्रिकालाबाधीत सत्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. ;)

बघा की राव, एक तर का़कू छाप प्रश्न विचारायचे आणि काकू म्हटलं की राग येतो. असो, पूजाबै तुम्ही काका म्हणालात तरी आम्हाला काही फरक पडत नाही. :D

एकटा वल्लि हसताना दिसला . पिंगु चे थोडेसे दात दिसले :D
बाकि सगळे एवढे सिरिअस का बसलेत ..?:(