Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रचेतस on Sat, 04/28/2012 - 19:18
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
नमस्कार मिपाकरहो, पुण्यातील मिपाकरांसाठी एक बातमी अशी की तब्बल एक वर्षानंतर पुण्यात पुन्हा एकदा बार्बेक्यू नेशन येथे कट्टा आयोजीत करण्यात आला आहे. मागच्या बार्बेक्यू नेशनच्या कट्ट्याला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे सदर कट्टा त्याच ठिकाणी पुन्हा एकदा करण्यात येत आहे. दिवस :- मंगळवार दिनांक१-मे -२०१२ स्थळ :- वाकड-बार्बेक्यू नेशन-सयाजी रूफ टॉप, पुणे-मंबई बाह्यवळण मार्ग. वेळ :- संध्याकाळी ७ च्या सुमारास तूर्तास नक्की असलेले कट्टेकरी :- धन्या, ५० फक्त, मोदक, गणेशा, गणामास्तर, वपाडाव, अत्रुप्त आत्मा, प्यारे१, सूड, वल्ली इच्छुकांनी मला, ५० फक्त आणि धन्या यांना व्यनि करावा. म्हणजे ऐन वेळेस काहीं बदल झाल्यास कळवता येईल. कृपया तिघांनाही व्यनि करावा, म्हणजे एकाने काहीं उत्तर दिल्यास बाकी दोघांना माहित राहील. हे मुंबई कट्टा ह्या धाग्याचे विडंबन नसून खरेच असा कट्टा आयोजीत करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी. फक्त धागा जाहीर करण्यात आमच्याआधी मुंबईकरांनी बाजी मारली. :) माणशी साधारण ५७५ ते ६५० (व्हेज-नॉनव्हेज) असा खर्च अपेक्षित आहे. मेनू आणि इतर तपशील पुढील संकेतस्थळावर मिळेल. http://www.barbeque-nation.com
  • Log in or register to post comments
  • 23326 views

प्रतिक्रिया

Submitted by गवि on Tue, 05/01/2012 - 10:30

Permalink

अनेकानेक शुभेच्छा.. दुसर्या

अनेकानेक शुभेच्छा.. दुसर्या दिवशी सुटी असती तर नक्की आलो असतो.. पुणे गेटची आठवण ताजी आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Tue, 05/01/2012 - 11:22

Permalink

पुणे कट्ट्याला शुभेच्छा

पुणे कट्ट्याला शुभेच्छा काही झालं तरी टेबलावरचे झेंडे खाली पडू देऊ नका. मोदक, गणेशाला दिमतीला घ्या.... त्यांनी पांढरे झेंडे झळकावले पाहिजेत.. बास ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 05/01/2012 - 11:41

In reply to पुणे कट्ट्याला शुभेच्छा by स्पा

Permalink

@त्यांनी पांढरे झेंडे झळकावले

@त्यांनी पांढरे झेंडे झळकावले पाहिजेत.. बास >>> आपण आलात तर लाल झेंडा लाऊ Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 05/01/2012 - 12:43

Permalink

चला

आजही एक लाईव्ह वृत्तांत येणार काय?
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Tue, 05/01/2012 - 12:51

Permalink

कट्ट्याला शुभेच्छा!

कट्ट्याला शुभेच्छा! बाकी वाकड पुण्यात कधी आले ब्वॉ ? हे म्हणजे उगीच कर्जत्-कसार्‍याला मुंबै म्हणण्यासारखेच झाले की.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 05/01/2012 - 13:35

In reply to कट्ट्याला शुभेच्छा! by कुंदन

Permalink

प्रांतीय अस्मितेची आग

Image removed. प्रांतीय अस्मितेची आग लावण्याचा दुष्ट प्रयत्न... Image removed. तीव्र णिषेध.. !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 05/02/2012 - 12:27

In reply to प्रांतीय अस्मितेची आग by अत्रुप्त आत्मा

Permalink

पुणे - मुंबई.

तसे ठाणे तरी मुंबईत कुठे येते? पण, आता मुंबई अफाट पसरली आहे. तेंव्हा हरकत नसावी. येत्या काही वर्षात पुणे सुद्धा मुंबईत येईल, अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 05/02/2012 - 13:31

In reply to पुणे - मुंबई. by प्रभाकर पेठकर

Permalink

>>येत्या काही वर्षात पुणे

>>येत्या काही वर्षात पुणे सुद्धा मुंबईत येईल, अशी आशा आहे. काडी, पेट्रोल, तेल, इ.इ.इ. सर्व दिल्या गेले आहे या एका वाक्याने :P
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग on Tue, 05/01/2012 - 15:24

Permalink

अर्रर्र!! यावेळीही संधी

अर्रर्र!! यावेळीही संधी हुकणार कट्ट्याला येण्याची. :( मजा करा!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 05/02/2012 - 00:49

Permalink

लै जबर्‍या मज्जा आली

Image removed. लै जबर्‍या मज्जा आली राव...येक नंबर ठिकाण हाय Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 05/02/2012 - 07:26

In reply to लै जबर्‍या मज्जा आली by अत्रुप्त आत्मा

Permalink

अ आ याची दखल घ्या

यावेळ्चा वृतांत शब्देवीण संवादू असा द्या . अख्या स्मायली सेंटरला कामाला लावा. मोदक, वल्ली यांच्या जाड्या स्मायली तिथे पाहिल्याचे स्मरतेय ! आत्मा अव्यक्त असल्याने त्याच्या स्मायलीचा मातुर सवाल खडा हाय ! डोळा मिचकावणार्‍या स्मायलीसह- च्याउरा
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Wed, 05/02/2012 - 12:35

Permalink

कट्टा नक्की

कट्टा नक्की झाला ना , मग वृत्तांत कुठाय ?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 05/02/2012 - 13:40

In reply to कट्टा नक्की by कुंदन

Permalink

>>कट्टा नक्की झाला ना , मग

>>कट्टा नक्की झाला ना , मग वृत्तांत कुठाय ? 'प्रत्येक कट्ट्याचा वृत्तांत असायलाच हवा असं नाही.' असं जुन्या जाणत्या (कृपया वयस्कर वाचलं तरी हरकत नाही.) मिपाकरांचं मत आहे. त्यातही हवाच असेल वृत्तांत तर आयोजकांशी सल्लामसलत करणेत येऊन योग्य ते करणेत येईल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Wed, 05/02/2012 - 16:58

In reply to >>कट्टा नक्की झाला ना , मग by सूड

Permalink

अरे लिही ना रे वृत्तांत !!!

अरे लिही ना रे वृत्तांत !!! त्यांच्याकडे भाग दोन तयार आहे, पण तुम्ही भाग एक टाकल्याशिवाय त्यांना तो टाकता येत नाही आहे ना ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 05/02/2012 - 18:13

Permalink

बार्बेक्यू नेशनचा

बार्बेक्यू नेशनचा रणसंग्राम-अर्थात मिपाराष्ट्राचा प्राणांतिक लढाईनंतरचा विजय संध्याकाळची वेळ,,फक्त अंधार पडायची खोटी होती...प्रांत पुणे येथुन खादाडांचा एक सशस्त्र जथ्था एका पांढर्‍या शुभ्र ऐरावतावरुन तासभर आधीच कुच करुन निघालेला होता... तो जथ्था रणसंग्रामी येऊन तयारित उभा राहिला...पण बाकिची दलं अजुनही येत नव्हती,शत्रू त्यांच्या नाद/वासासकट युद्धभूमीच्या अगदी समीप येऊन ठेपलेला होता.अगदी कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल अशी परिस्थिती. एवढं कमी की काय,म्हणुन काही वेळातच पिंपरी/चिंचवड ग्रामाचा तो महा(न) वल्लीदार खादाड रणवीर आपल्या तश्याच धीरगंभीर पल्सर नामक काळ्या घोडीवरुन रस्त्याची धूळ चौखुर उडवीत दौडत दौडतच आला...आल्या नंतर घोडी सावलीला सोडून म्होरक्याला रामराम आणी आंम्हास सलाम ठोकुन तातडीच्या युद्ध पूर्व बैठकीत सहभागी झाला.''आज कोणत्या बाजुने हल्ला चढवायचा..? आघडीला कोण असणार..? खिंडित कुणाला गाठायचे..? ;-) '' आदी अनेक अत्यावश्यक आणी महत्वाच्या बाबींवर चर्चा घडली... या चर्चे दरम्यान आपल्या म्यानेतून तलवार काढलेला,मुदकेश्वर दत्त आणी त्याचा सहकारी तेज नेमबाझ सुडकेश्वर मुख्य दलाच्या आज्ञेच्या प्रतिक्षेत कधी येऊन हुबे ठाकले ते कळलेही नाही.एंव्हाना सुरुंगस्फोट तज्ञ दलपती पन्नास फक्तेश्वर,जोरदार हल्लाबाज बहुशस्त्रधारी आत्मारामभट्ट अत्रुप्त,गुप्तहेर पिंगट धुंगट,राहणार-अशक्यओळखग्राम,आणी खजिनदार सह भालाबाज धनाजी(फेम-संताजी/धनाजी) अशी एकंदर ७ जणांची टोळी हाती भडकलेला जठराग्नी घेऊन हळूहळू सयाजी डोंगराच्या पायथ्याकडे सरकू लागली होती.अजुन काहि जण कमी होते,पण अता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता... सयाजी डोंगराकडुन चढाईला सुरवात करणार,एवढ्यात समोरच्या झाडीतुन द्विराष्ट्र शांतता सेनेचे काही अधिकारी डोंगरावर जाण्यापूर्वीच्या तपासणी साठी सामोरे आले.बार्बॅक्यूनेशन भूमीकडे नेणारा डोंगर चतुरतारांकित असल्यामुळे सर्व राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष कॉफी अन्नान्न यांच्या सांगण्यावरुन अंगावरुन झाडपाला फिरवुन सर्वांना मार्गस्थ करण्यात आले.डोंगर दैवीगुणांनी संपन्न असल्यामुळे आकाशस्थ पातळीवर असलेल्या युद्धभूमीकडे योद्ध्यांना नेण्यासाठी एक उडता हवामेहेल ठेवण्यात आला होता,त्यात बसुन सर्व योद्धे युद्धभूमीच्या नियोजित स्थानी पोहोचले... साक्षात मोदकेश्वराने आधीच मोर्चे बांधणी केलेली असल्यामुळे, पुढे अन्नाच्या एकाही कणाचा विलंब न होऊ देता सर्वांनी आपापली शस्त्रे तय्यार केली. एवढ्यात आणखि एक योद्धा गाणाजी मास्तुरे,आणी नव आमंत्रित मुश्टीयोद्धा महाग्यानी-नादखुळा यांनिही आवाजी हजेरी लावली,शत्रूला सैन्याची होणारी ही जमवा जमव कानावर गेलेली होतीच,म्हणुनच मुख्यभूमी टेबलावर प्रतिचार सैनिकांच्या मध्यभागी एकेक रणचंडी हवनकुंड मांडण्यात आले.आणी काहि कळायच्या आत,बार्बॅक्यूनेशनचे शस्त्रधारी सैनिक चहुबाजिनी हल्ला चढवू लागले,एकच रणसंग्राम जाहला... बोला...''पार्वतीपते हरहरमहादेव...!'' ''हणामारा जाळा तोडा...जो जो दिसेल त्याला फोडा'' अशा सहस्रावधी गर्जनांनी आसमंत दुमदुमुन गेले, जो जो कबाबी सैनिकांचा गज रणभूमीवर उतरेल त्यास मिपाखादाडराष्ट्राचे धुरंधर रणवीर तेल लाऊन तंदुरात पोळू लागले. ''वाचवा वाचवा..रेहेम रेहेम'' अश्या आरोळ्या उठत असताना(च) पोळुन पळुन जाणर्‍या काही सैनिकास नेटाने पकडुन जायबंदी करण्यात येऊ लागले.आज मिपाराष्ट्र-विजयाची शपथ घेऊन हरएक योद्धा आलेला असल्यानी,दर दहा मिनिटाला कबाबच्या ५/५तुकड्या सहज युद्धमुखी गारद होत होत्या, काही वेळानी युद्धातले डावपेच कमी पडु लागले असं वाटत असताना, एका जुन्या अनुभवी पूर्वराष्ट्रातला युद्धतज्ञ बि.का. धाऊन आला.मग बार्बॅक शत्रूंचे सर्व सैन्यहारक असे एक नेहमीचे धोरण नक्की काय असावे ते सगळ्यांच्या लक्षात आले...आधी बलाढ्य बार्बेक सैनिकांच्या पायदळ/घोडदळासह अनेक नामी तुकड्या चाल करुन येणार्‍या राष्ट्रावर सोडाव्या.आणी त्यांना खिंडित येण्यापूर्वीच तह करण्यास भाग पाडावे...पण आज ते होणे नव्हते,माता अन्नपूर्णेच्या मनात काहि वेगळेच होते.पहिल्या कबाब हल्याचा रणकुंडात भाजुन खरपुस समाचार घेतल्या नंतर,मिपाराष्ट्राची ही धुरंधर सौन्याची तुकडी अजुनही दोन्ही---हतानी लढत असलेल्या मोदकेश्वराला अवरते घेऊन पुढिल रणभूमीकडे गेली... परंतु मुख्ख्यान्न रणक्षेत्रात काही विशेष जोर नव्हता हे लक्षात आल्यामुळे...तिथे माफक लुटालुट करुन...शत्रूच्या त्या डेझर्टच्या मखमली हिरवळ असणार्‍या ;-) बागेकडे सगळ्यांनी कुच केली.निरनिराळ्या फळांच्या,केकच्या,पेस्ट्रीजच्या,पुडिंगच्या तयारीत उभ्या असलेल्या सैन्यावर आखरी वार पडला...पुन्हा रणभेरी वाजो लागल्या,धरा माराच्या आरोळ्यांनी रणमैदान गर्जू लागले...दिसेल त्या काऊंटरवर प्रत्येक तुकडीचा निकराचा हल्ला पडला... युद्धमैदान आईक्रिमच्या डागांनी गारेग्गार झालं.टेबलावर जिकडे बघावं तिकडे लचके तोडलेल्या फळांचे छिन्न-विच्छिन्न भाग, डेझर्टच्या रिकाम्या प्लेटांवर काट्याचमच्यांनी मान टाकुन दिलेली शरणागती,आणी आईस्क्रिमच्या प्रत्येक भांड्याला दिलेल्या सद्गतीने टेबलरूपी रणमैदान माखलेलं होतं.. अखेर बराच काळ चाललेल्या रणधुमाळी नंतर मिपाराष्ट्राचे खादाडवीर केलेल्या युद्धाच्या मानाने अत्यंत माफक टॅक्स रणभूमीला चुकवून,विजयी यशस्वी मुद्रेने डोंगरपायथ्याशी जमा झाले...तिथे आज घडलेल्या संग्रामातील प्रतिपक्षातील अवडलेल्या योद्ध्यांच्या नामाचा जयजयकार करण्यात आला...लगेच...''आता पुढिल लढाई कोठे..?'' असे प्रश्नही झडू लागले.त्यावर काही माफक चर्चा घडुन..सर्व दलांनी परस्परांचा निरोप घेतला..आणी पुन्हा नविन लढाई जिंकण्याची लक्ष स्वप्ने पाहात,सर्व जण आपापल्या दलांसह स्वगृहप्रासादाची वाट धरते जाहले... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 05/02/2012 - 18:20

In reply to बार्बेक्यू नेशनचा by अत्रुप्त आत्मा

Permalink

फटु किधर हय???

फटु किधर हय???
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 05/02/2012 - 18:25

In reply to बार्बेक्यू नेशनचा by अत्रुप्त आत्मा

Permalink

हाहाहा! काही सैनिक तर बार्बेक

हाहाहा! काही सैनिक तर बार्बेक सैन्याच्या खाली पडलेल्या सैनिकांना अक्षरशः विस्तवावर भाजून भाजून खात होते. क्रौर्याची परिसीमाच जणू! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 05/02/2012 - 18:56

In reply to हाहाहा! काही सैनिक तर बार्बेक by बिपिन कार्यकर्ते

Permalink

ह्ही ह्ही ह्ही ह्हा ह्हा

ह्ही ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा... शत्रू लै टेस्टी असल्यावर जास्त भाजायला नको का..? ;-) आणी एकदा हाती लागल्यावर सद्गती नाय दिली तर आमी अट्टल कसले..? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Wed, 05/02/2012 - 18:38

In reply to बार्बेक्यू नेशनचा by अत्रुप्त आत्मा

Permalink

ज ह ब र्‍या !!!

अंगात काय संचारलं होतं हो हा वृत्तांत लिहिताना तुमच्या??? =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) हा युद्धखोरीचा वृत्तांत वाचून दोन सँडविचे, एक कचोरी आणि दोन पेले ताकाला सद्गती देणेत आली आहे :p
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 05/02/2012 - 18:40

In reply to बार्बेक्यू नेशनचा by अत्रुप्त आत्मा

Permalink

ह्यो वृतांत नक्की ल्हेला कुनी ?

आमची स्वारी ऐकोन होती की जाज्वल्य शिवभक्त तथा खाद्यालंकृत बाळसे धारी श्री रा रा वल्लीपंत, हे कादंबरीमय शिवकाल वाचत आहेत. पण या धुमश्चक्रीची ही बख्रर ऐकोन आम्हासी " नेशनचा किल्ल्ला पडला " या पवाड्याची सय आली. ही बखर श्री वल्लीपंत यानी तर लिहिली नाही ना? पण नाही... आम्हास त्यात अ आ यांच्या लेखनप्रतिभेचा उजेड दिसत आहे . काय करावे बरे ? ,,,,,,( चौकट राजा येरझार्‍या घालतो) कोण आहे रे तिकडे",,,,,, च्यायला ... सगळेच नेशनला गेले का काय ? अरे ...ए..... गुप्तहेराना पाठवा मिपावर अन शोधोनी काढा या बखरीचा खरा कर्ता कोण?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 05/02/2012 - 18:54

In reply to बार्बेक्यू नेशनचा by अत्रुप्त आत्मा

Permalink

हे युद्ध क्षेत्रीचे काही फोटू

हे युद्ध क्षेत्रीचे काही फोटू ;-) १)युद्धपूर्व स्थिती-डावीकडुन...पिंगू.अ.आ.,सूड,५०फक्त Image removed. २)धन्या,वल्ली,पिंगू Image removed. ३)उजव्या रांगेत पहिले गणामास्तर आणी शेवटचे नाद-खुळा...बाकि पूर्व परिचित Image removed. ४)फायर ऑन-रणचंडी हवनकुंड Image removed. Image removed. ५)मित्रहो धनाजींची भावमुद्रा कोणते मुद्रितभाव शोधते आहे बरे..? ;-) Image removed. मुख्ययुद्धाचे फोटो-(कुणी काढले असल्यास ;-) ) टाकेल ;-) ६)अता डायरेक्ट शेवटची डेझर्टची रणधुमाळी---- Image removed. Image removed. ७)आ-रक्त आईस्क्रिम Image removed. ८)५०राव सोकाजींच्या अठवणीने बचैन झाल्याचे हे प्रत्यंतर.. ;-) नंतर तो शॉट ग्लास तसाच सोडून दिला म्हणे... ;-) Image removed. ९) शेवट योद्धे(ही) हलाल ;-) जाहले Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 05/03/2012 - 12:53

In reply to हे युद्ध क्षेत्रीचे काही फोटू by अत्रुप्त आत्मा

Permalink

भटजी, वृत्तांत झकासच हो.

भटजी, वृत्तांत झकासच हो. मंडळी, आता विचारलंच आहे म्हणून सांगतो ती डेझर्टस् भरलेली प्लेट माझी बरं का !! ( कोणीही विचारलं नसलं तरी असं सांगायचं असतं ;)) तेवढे डेझर्टचे प्रकार खाऊन नंतर दोन स्कूप मँगो आणि एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम येवढंच खाल्लं. तिथले स्टार्टर्स बाकी भन्नाट होते.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 05/02/2012 - 18:59

In reply to बार्बेक्यू नेशनचा by अत्रुप्त आत्मा

Permalink

पाय? पाय कुठ हाईत तुमच? हिकड

पाय? पाय कुठ हाईत तुमच? हिकड लाउन द्या, आमी पाया करुन खाउ! धन्य धन्य जाहलो आम्ही हा वृतांत वाचुन. एकुण काट्याचमच्याची लढाई जिंकुन विरश्री संचारलेल्या एकुण एक विराला आमचा दंडवत.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 05/02/2012 - 22:48

In reply to पाय? पाय कुठ हाईत तुमच? हिकड by स्पंदना

Permalink

वा...वा...वा... काय अप्रतिम

वा...वा...वा... काय अप्रतिम आणी मनाफासून परतिसाद दिलात हो तुंम्ही...! मनात परचंड आनंद दाटुन आला... Image removed. @पाय? पाय कुठ हाईत तुमच? हिकड लाउन द्या, आमी पाया करुन खाउ!>>> त्या पेक्षा आपला भेजा द्या ना पाठवुन,आमी बी भेजा फ्राय करून खाऊ...! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 05/03/2012 - 05:30

In reply to वा...वा...वा... काय अप्रतिम by अत्रुप्त आत्मा

Permalink

ऑ !

>>त्या पेक्षा आपला भेजा द्या ना पाठवुन,आमी बी भेजा फ्राय करून खाऊ...! >> ह्ये काय असतय आनि? भेजा? त्यो र कुठ अस्तोय? आन असला तर त्यो मिथ्य अस्तो की अमिथ्य?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग on Wed, 05/02/2012 - 19:18

In reply to बार्बेक्यू नेशनचा by अत्रुप्त आत्मा

Permalink

जबरदस्त वृत्तांत!

जबरदस्त वृत्तांत!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 05/02/2012 - 18:50

Permalink

अत्रुप्त आत्मा यांनी दैनिक

अत्रुप्त आत्मा यांनी दैनिक पुढारीच्या रविवार पुरवणीतील 'खबरनामा' नामक सोमाजी बिन गोमाजी लिखित अविस्मरणीय सदर नक्कीच वाचलेले असावे असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे :) (संध्याकाळ प्रभृतींपेक्षा पुढारीचा नक्कीच फ्यान असलेला आणि फेकानंदबरोबर त्याची तुलना होत असलेली पाहून वैतागलेला)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 05/02/2012 - 18:59

In reply to अत्रुप्त आत्मा यांनी दैनिक by बॅटमॅन

Permalink

@नक्कीच वाचलेले असावे असा

@नक्कीच वाचलेले असावे असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे >>> नाय हो दादा...उलट त्यांनाच हे वाचायला धाडुन द्या.. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 05/02/2012 - 21:28

In reply to @नक्कीच वाचलेले असावे असा by अत्रुप्त आत्मा

Permalink

सांगतो पण तुमी वाचलं नाय का

सांगतो ;) पण तुमी वाचलं नाय का ते? नसेल तर पुढारीचा रविवार अंक घ्या, बहार नामक पुरवणी घ्या आणि खबरनामा नामक सदर वाचा जरूर :)
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 05/02/2012 - 19:15

Permalink

भन्नाट ... जाम मज्जा करताय

भन्नाट ... जाम मज्जा करताय राव तुमिलोग :( आता जरा नाव पन सांगा सेपरेट फोतु लावुन आमि नवि माणस ...योद्ध्यान्ची नाव त्याच्या छयाचित्रन्सोबत द्या कि ह्यातल्या ५० रुपयना बघायची इच्छ आहे :) अवांतर : पून्याच्या लोकाना हसायच वावड आहे काय ??? :)
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Wed, 05/02/2012 - 19:31

In reply to भन्नाट ... जाम मज्जा करताय by जेनी...

Permalink

पहिल्याच फोटोत समोर उजवीकडून

पहिल्याच फोटोत समोर उजवीकडून पहिले आहेत ते ५० फक्त. पून्याच्या लोकांच्या हसण्याबद्दल आम्हाला काय माहित? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 05/02/2012 - 19:44

In reply to पहिल्याच फोटोत समोर उजवीकडून by गणामास्तर

Permalink

पून्याच्या _____________ याला

पून्याच्या _____________ याला म्हणतात पूणेकर :( नीदान प्रतिसादाना ( प्रतिसादात )तरि मुक्तपणे बागडु द्या ओ :(
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Wed, 05/02/2012 - 19:31

In reply to भन्नाट ... जाम मज्जा करताय by जेनी...

Permalink

अवांतर : पून्याच्या लोकाना

अवांतर : पून्याच्या लोकाना हसायच वावड आहे काय ???
म्हणजे तुम्ही अजुन पुणेकरांना पुरते ओळखलेले दिसत नाही. ;) - (पुणेरी) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 05/02/2012 - 19:42

In reply to अवांतर : पून्याच्या लोकाना by सोत्रि

Permalink

सोकाजि अहो अजुन तसा काहि

सोकाजि अहो अजुन तसा काहि सामनाच झाला नाहिय कधी पूणेरि लोकांशी :)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 05/03/2012 - 12:10

In reply to सोकाजि अहो अजुन तसा काहि by जेनी...

Permalink

तुमचा सदरा मिळेल काय हो ??

तुमचा सदरा मिळेल काय हो ?? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 05/02/2012 - 19:57

In reply to भन्नाट ... जाम मज्जा करताय by जेनी...

Permalink

>>अवांतर : पून्याच्या लोकाना

>>अवांतर : पून्याच्या लोकाना हसायच वावड आहे काय ??? त्याचं कायै काकू, से चीऽऽऽज असं म्हणून काढलेले फोटो कृत्रिम वाटतात. त्यामुळे गप्पाटप्पा चालू असताना हे फोटो काढलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 05/02/2012 - 20:08

In reply to >>अवांतर : पून्याच्या लोकाना by सूड

Permalink

ओह्ह अस्स आहे होय सूड काका

ओह्ह अस्स आहे होय सूड काका .....?? :-o अहो पण " गप्पा मारताना हसु नका " अशी कुठे पाटि लावलि होति काय काका ??;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 05/03/2012 - 09:40

In reply to ओह्ह अस्स आहे होय सूड काका by जेनी...

Permalink

एका काकूंना एका नवयुवकाला

एका काकूंना एका नवयुवकाला बळेबळे काका म्हटलेलं पाहून अंमळ मौज वाटली. "अजूनी यौवनात मी" या त्रिकालाबाधीत सत्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 05/03/2012 - 12:46

In reply to एका काकूंना एका नवयुवकाला by धन्या

Permalink

बघा की राव, एक तर का़कू छाप

बघा की राव, एक तर का़कू छाप प्रश्न विचारायचे आणि काकू म्हटलं की राग येतो. असो, पूजाबै तुम्ही काका म्हणालात तरी आम्हाला काही फरक पडत नाही. :D
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 05/02/2012 - 19:18

Permalink

एकटा वल्लि हसताना दिसला .

एकटा वल्लि हसताना दिसला . पिंगु चे थोडेसे दात दिसले :D बाकि सगळे एवढे सिरिअस का बसलेत ..?:(
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Wed, 05/02/2012 - 19:27

Permalink

जबरदस्त!

ही 'बखर कट्ट्याची' आवडली. फोटो क्र. ८: कोणालातरी आमची (हे आदरार्थी एकवचन) कट्ट्याला, तृप्त पोटाने का होईना पण आठवण झाली हे पाहून डोळे पाणावले... कुठे आहे माझा रुमाल.... ;) - (धारातीर्थी पडलेला) सोकाजी‍
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 05/02/2012 - 20:11

Permalink

मजेदार वृत्तांत. भटजीबुवांचे

मजेदार वृत्तांत. भटजीबुवांचे लेख आजकाल दे दणादण असतात.;)
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on गुरुवार, 05/03/2012 - 10:45

In reply to मजेदार वृत्तांत. भटजीबुवांचे by रेवती

Permalink

+१

टू आज्जी... @मृत्युंजय : परत एकदा याच ठिकाणी किंवा डेक्कनला कट्टा करावा काय? थोडी जळ्जळ कमी होईल ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 05/02/2012 - 20:17

Permalink

मस्त वृत्तांत!

लढाई मारलीत तर तुम्ही!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 05/02/2012 - 20:55

Permalink

भटजीबुवा, लै भारी

भटजीबुवा, लै भारी वृत्तांत. बार्बेक्यू नेशनचे स्टार्टर्स नेहमीप्रमाणेच झकास होते. पनीर टिक्का, झुकिनी पॉलेंटा, ग्रिल्ड मशरूम्स, ग्रिल्ड पायनापल, हरियाली कबाब, क्रिस्पी कॉर्न आणि आमचे सर्वात आवडते कॅज्युन स्पाईस पॉटेटो. सगळेजण अगदी मनसोक्त खात होते. पहिला वीर धराशायी झाला तो नाद खुळा, पाठोपाठ भटजीबुवांचा झेंडाही खाली झुकला. आत्माजींना आम्ही भरपूर छळल्यामुळे ते बार्बेक्यूच्या सळ्या घेऊन आम्हांवर धावून येण्याच्या तयारीतच होते. मग हळूहळू सर्वानींच स्टार्टर्स संपवून लेमन कोरीएंडर सूप कडे मोर्चा वळवला. स्टार्टर्स मजबूत हाणल्यामुळे मुख्य जेवण तसे अगदी कमीच खाल्ले गेले पण त्यातला मेनू पण झकास होता. पनीर पसंदा, दम आलू पंजाबी, व्हेज झोंबीओ का असाच काहीसा पदार्थ, दाल ए दम, व्हेज बिर्याणी, कर्ड राईस, सॅलड्स चे १०/१२ प्रकार. पण खाऊन खाऊन तरी किती खाणार. नाईलाजाने फारसे न खाताच डेझर्टकडे वळण्यात आले. फळांचे विविध प्रकार दिमतीला हजर होतेच. अंगुरी गुलाबजाम, फिरनी, पायनापल पुडींग, आंबा आणि व्हॅनिला आईस्क्रीम. डेझर्ट भरपूर रिचवून झाल्यावर आम्ही खास पुणेरी प्रश्न विचारते झालो. 'येथे बडीशेप मिळेल काय?' तर ती काउंटरवर मिळेल असे सांगण्यात आले. अर्थात बडीशेपेच्या पुड्या आम्ही मूठभर भरून घेतल्या हे सांगणे न लगे. नंतर खाली येऊन मनसोक्त गप्पा मारून आम्ही सर्व आपापल्या घरी चलते झालो.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 05/03/2012 - 05:49

Permalink

वात्रटांत - न पाहिलेल्या कट्टयाचा

एकदाचे ठरवून " बार्बेक्यो नेशन" सज्ज जाहला " मिपा" तला फॅक्शन वल्ली मुळातला माणूसच जंक्शन पन्नासला खादाडीचे मुळातच अट्रॅक्शन मोदकाने केले मेनूचे डिक्शन सुडाचे सर्वांवर कडक अटेंशन एक नवा करतोय ऑबझरवेशन गणामास्तर विचारतो घेउ का एक ट्युशन ? आले चौराचे फोन कनेक्शन मो, व, अ आ ने साधले कनवरसेशन खादाडीचे मग ऱंगले सेशन शेवटी बोडक्यावर बसले टॅक्सेशन कोणीतरी म्हणाला फोटूचे नाही मेन्शन "कट्टा " हे नाही ना फिक्शन ? कोणीतरी केले फोटूचे सिलेक्शन अ आ ने लढाईचे उचलले एक्सप्रेशन एकदाचे न्युज चे झाले ट्रान्समिशन संशयाच्या वादळाचे झाले डिप्रेशन " त्यां" च्या खिशाचे झाले कॉनट्रॅक्शन जळ्ण्याचे का व्हावे आपल्याला मोशन ? त्यानी साधले आनंदाचे फंक्शन आपलेही त्यात असू द्या कॉन्ट्रीब्युशन जय हिंद , जय महाराष्ट्र !!
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 05/03/2012 - 05:58

Permalink

वात्रटांत - न पाहिलेल्या कट्टयाचा

असेच म्हणतो .
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on गुरुवार, 05/03/2012 - 07:37

Permalink

लई भारी ओ भटजी, बाकी तुम्ही

लई भारी ओ भटजी, बाकी तुम्ही फार मोठ्या मनाचे बरं का. या रणात सर्वात जास्त जखमी झाला ते तुम्हीच, तरीसुद्धा आख्ख्या रिपोर्टात एकदा सुद्धा आ.वे. किंवा दु दु दु असे शब्द वापरले नाहीत. असो. वर्षातुन एकदाच जावं असं ठिकाण आहे हे, आणि भटजींची पनीर डायरेक ग्रिल वर भाजायची आयडिया लई भारी होती. नादखुळा पहिल्यांदाच भेटले पण तसं वाटलं नाही. काजुन्पोटॅटो तर भारी आहेतच त्यात कालचे क्रिस्पि कॉर्न सुद्धा चांगले होते, तो वेटर दिवसभर डोकोमोच्या जाहिरातीत दाखवतात तसं चार चार दाणे देत होता, पण छे असल्या बाबतीत काय चालु देतोय आम्ही त्याचं. बाकी ब-याच चुकवाचुकवी नंतर बिकांची झालेली भेट लक्षात राहिल. आता अजुन नविन ठिकाणं हुडकायला हवीत कट्ट्यासाठी, कट्ट्याला कळालेली एक तात्पुरती वाईट बातमी म्हणजे शाजी महिना दिड महिना बंद असणार आहे रिनोव्हेशन साठी, काल रात्री कोयलाला गेलो होतो तर ते पण शिफ्ट होतंय. अन्याव अन्याव आहे नुसता. अवांतर - कट्टापुर्व गप्पांमध्ये भटजींनी केलेले मार्गदर्शन अत्यंत मोलाचे होते, त्याबद्दल त्यांनी एक लेखमाला लिहावी ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 05/03/2012 - 07:57

In reply to लई भारी ओ भटजी, बाकी तुम्ही by ५० फक्त

Permalink

कोणते बुवा ते मार्ग-दर्शन

कोणते बुवा ते मार्ग-दर्शन ? मजला एकची स्मरण द्या ना? नाट्यपद...नाट्यपद... सुचतय मला ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 05/03/2012 - 08:51

Permalink

भटजी बुवा ची बखर....

ऐसि खबर बात देणारी बखर खरच जबर आहे. आणि काय लिहावे...
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com