नमस्कार मिपाकरहो,
पुण्यातील मिपाकरांसाठी एक बातमी अशी की तब्बल एक वर्षानंतर पुण्यात पुन्हा एकदा बार्बेक्यू नेशन येथे कट्टा आयोजीत करण्यात आला आहे. मागच्या बार्बेक्यू नेशनच्या कट्ट्याला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे सदर कट्टा त्याच ठिकाणी पुन्हा एकदा करण्यात येत आहे.
दिवस :- मंगळवार दिनांक१-मे -२०१२
स्थळ :- वाकड-बार्बेक्यू नेशन-सयाजी रूफ टॉप, पुणे-मंबई बाह्यवळण मार्ग.
वेळ :- संध्याकाळी ७ च्या सुमारास
तूर्तास नक्की असलेले कट्टेकरी :- धन्या, ५० फक्त, मोदक, गणेशा, गणामास्तर, वपाडाव, अत्रुप्त आत्मा, प्यारे१, सूड, वल्ली
इच्छुकांनी मला, ५० फक्त आणि धन्या यांना व्यनि करावा. म्हणजे ऐन वेळेस काहीं बदल झाल्यास कळवता येईल. कृपया तिघांनाही व्यनि करावा, म्हणजे एकाने काहीं उत्तर दिल्यास बाकी दोघांना माहित राहील.
हे मुंबई कट्टा ह्या धाग्याचे विडंबन नसून खरेच असा कट्टा आयोजीत करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी. फक्त धागा जाहीर करण्यात आमच्याआधी मुंबईकरांनी बाजी मारली. :)
माणशी साधारण ५७५ ते ६५० (व्हेज-नॉनव्हेज) असा खर्च अपेक्षित आहे.
मेनू आणि इतर तपशील पुढील संकेतस्थळावर मिळेल.
http://www.barbeque-nation.com
प्रतिक्रिया
2 May 2012 - 7:27 pm | सोत्रि
ही 'बखर कट्ट्याची' आवडली.
फोटो क्र. ८:
कोणालातरी आमची (हे आदरार्थी एकवचन) कट्ट्याला, तृप्त पोटाने का होईना पण आठवण झाली हे पाहून डोळे पाणावले... कुठे आहे माझा रुमाल.... ;)
- (धारातीर्थी पडलेला) सोकाजी
2 May 2012 - 8:11 pm | रेवती
मजेदार वृत्तांत. भटजीबुवांचे लेख आजकाल दे दणादण असतात.;)
3 May 2012 - 10:45 am | मी-सौरभ
टू आज्जी...
@मृत्युंजय : परत एकदा याच ठिकाणी किंवा डेक्कनला कट्टा करावा काय? थोडी जळ्जळ कमी होईल ;)
2 May 2012 - 8:17 pm | पैसा
लढाई मारलीत तर तुम्ही!
2 May 2012 - 8:55 pm | प्रचेतस
भटजीबुवा, लै भारी वृत्तांत.
बार्बेक्यू नेशनचे स्टार्टर्स नेहमीप्रमाणेच झकास होते. पनीर टिक्का, झुकिनी पॉलेंटा, ग्रिल्ड मशरूम्स, ग्रिल्ड पायनापल, हरियाली कबाब, क्रिस्पी कॉर्न आणि आमचे सर्वात आवडते कॅज्युन स्पाईस पॉटेटो. सगळेजण अगदी मनसोक्त खात होते. पहिला वीर धराशायी झाला तो नाद खुळा, पाठोपाठ भटजीबुवांचा झेंडाही खाली झुकला. आत्माजींना आम्ही भरपूर छळल्यामुळे ते बार्बेक्यूच्या सळ्या घेऊन आम्हांवर धावून येण्याच्या तयारीतच होते. मग हळूहळू सर्वानींच स्टार्टर्स संपवून लेमन कोरीएंडर सूप कडे मोर्चा वळवला. स्टार्टर्स मजबूत हाणल्यामुळे मुख्य जेवण तसे अगदी कमीच खाल्ले गेले पण त्यातला मेनू पण झकास होता. पनीर पसंदा, दम आलू पंजाबी, व्हेज झोंबीओ का असाच काहीसा पदार्थ, दाल ए दम, व्हेज बिर्याणी, कर्ड राईस, सॅलड्स चे १०/१२ प्रकार. पण खाऊन खाऊन तरी किती खाणार. नाईलाजाने फारसे न खाताच डेझर्टकडे वळण्यात आले. फळांचे विविध प्रकार दिमतीला हजर होतेच. अंगुरी गुलाबजाम, फिरनी, पायनापल पुडींग, आंबा आणि व्हॅनिला आईस्क्रीम. डेझर्ट भरपूर रिचवून झाल्यावर आम्ही खास पुणेरी प्रश्न विचारते झालो. 'येथे बडीशेप मिळेल काय?' तर ती काउंटरवर मिळेल असे सांगण्यात आले. अर्थात बडीशेपेच्या पुड्या आम्ही मूठभर भरून घेतल्या हे सांगणे न लगे.
नंतर खाली येऊन मनसोक्त गप्पा मारून आम्ही सर्व आपापल्या घरी चलते झालो.
3 May 2012 - 5:49 am | चौकटराजा
एकदाचे ठरवून " बार्बेक्यो नेशन"
सज्ज जाहला " मिपा" तला फॅक्शन
वल्ली मुळातला माणूसच जंक्शन
पन्नासला खादाडीचे मुळातच अट्रॅक्शन
मोदकाने केले मेनूचे डिक्शन
सुडाचे सर्वांवर कडक अटेंशन
एक नवा करतोय ऑबझरवेशन
गणामास्तर विचारतो घेउ का एक ट्युशन ?
आले चौराचे फोन कनेक्शन
मो, व, अ आ ने साधले कनवरसेशन
खादाडीचे मग ऱंगले सेशन
शेवटी बोडक्यावर बसले टॅक्सेशन
कोणीतरी म्हणाला फोटूचे नाही मेन्शन
"कट्टा " हे नाही ना फिक्शन ?
कोणीतरी केले फोटूचे सिलेक्शन
अ आ ने लढाईचे उचलले एक्सप्रेशन
एकदाचे न्युज चे झाले ट्रान्समिशन
संशयाच्या वादळाचे झाले डिप्रेशन
" त्यां" च्या खिशाचे झाले कॉनट्रॅक्शन
जळ्ण्याचे का व्हावे आपल्याला मोशन ?
त्यानी साधले आनंदाचे फंक्शन
आपलेही त्यात असू द्या कॉन्ट्रीब्युशन
जय हिंद , जय महाराष्ट्र !!
3 May 2012 - 5:58 am | चौकटराजा
असेच म्हणतो .
3 May 2012 - 7:37 am | ५० फक्त
लई भारी ओ भटजी, बाकी तुम्ही फार मोठ्या मनाचे बरं का. या रणात सर्वात जास्त जखमी झाला ते तुम्हीच, तरीसुद्धा आख्ख्या रिपोर्टात एकदा सुद्धा आ.वे. किंवा दु दु दु असे शब्द वापरले नाहीत. असो.
वर्षातुन एकदाच जावं असं ठिकाण आहे हे, आणि भटजींची पनीर डायरेक ग्रिल वर भाजायची आयडिया लई भारी होती. नादखुळा पहिल्यांदाच भेटले पण तसं वाटलं नाही. काजुन्पोटॅटो तर भारी आहेतच त्यात कालचे क्रिस्पि कॉर्न सुद्धा चांगले होते, तो वेटर दिवसभर डोकोमोच्या जाहिरातीत दाखवतात तसं चार चार दाणे देत होता, पण छे असल्या बाबतीत काय चालु देतोय आम्ही त्याचं.
बाकी ब-याच चुकवाचुकवी नंतर बिकांची झालेली भेट लक्षात राहिल.
आता अजुन नविन ठिकाणं हुडकायला हवीत कट्ट्यासाठी, कट्ट्याला कळालेली एक तात्पुरती वाईट बातमी म्हणजे शाजी महिना दिड महिना बंद असणार आहे रिनोव्हेशन साठी, काल रात्री कोयलाला गेलो होतो तर ते पण शिफ्ट होतंय. अन्याव अन्याव आहे नुसता.
अवांतर - कट्टापुर्व गप्पांमध्ये भटजींनी केलेले मार्गदर्शन अत्यंत मोलाचे होते, त्याबद्दल त्यांनी एक लेखमाला लिहावी ही नम्र विनंती.
3 May 2012 - 7:57 am | अत्रुप्त आत्मा
कोणते बुवा ते मार्ग-दर्शन ?
मजला एकची स्मरण द्या ना? नाट्यपद...नाट्यपद... सुचतय मला ;-)
3 May 2012 - 8:51 am | नाखु
ऐसि खबर बात देणारी बखर खरच जबर आहे. आणि काय लिहावे...
3 May 2012 - 9:02 am | स्पा
=))
=))
=))
झकास वृतांत गुर्जी.... :D
3 May 2012 - 9:59 am | गवि
मस्त..
होय ते बेक्ड पोटॅटो सर्वात मस्त असतात.. आणि सर्व स्टार्टर्सची नुसती चव घ्यायची म्हटली तरी पोट फुल्ल होऊन मेन कोर्सच्या दिशेने वळावंसंही वाटत नाही.. अर्थात मग डेझर्टस सोडायची नाहीत अशा उद्देशाने डेझर्ट काऊंटरकडे गर्दी होते.
मला वाटतं बा. ने. चा हाच पॅटर्न असावा म्हणून कदाचित ते मेन कोर्स अगदी कमी प्रमाणातच बनवून ठेवत असतील..
वृत्तांत आणि भरपेट खाऊन तृप्त झालेले मित्रगण पाहून समाधान जाहले.. बहोत खूब..
3 May 2012 - 10:56 am | स्पा
आणि वल्लीचे पहिले वहिले शतक
सविस्तर प्रतिक्रिया लवकरच
3 May 2012 - 2:41 pm | अत्रुप्त आत्मा
अंsssss मन्याsssss :evil: शतकाची पार्टनरशिप आहे आमची... :-p
3 May 2012 - 2:43 pm | प्रचेतस
का हो बुवा, का? का???
3 May 2012 - 10:57 am | स्वाती दिनेश
कट्टा सॉलिड्ड झालेला दिसतो आहे, वृत्तांत ,फोटो मस्तच!
स्वाती
4 May 2012 - 11:15 am | पियुशा
झाला का कट्टा ? छान छान ;)