नमस्कार मंडळी !
आज सूर्यग्रहण आहे हे आपणाला माहितच आहे. नासाच्या या संकेतस्थळावर (http://www.nasa.gov/multimedia/nasatv) चीन मधून दिसणारे ग्रहण थेट दाखवत आहेत.
या स्थळाची माहिती मला आताच समजली. नासाचे हे स्थळ जागातल्या अश्या काही घडामोडी नेहमीच थेट दाखवते असे दिसते आहे. म्हणजे पुढील वेळेस सुद्धा या स्थळाकडे लक्ष ठेवल्यास काही चांगले बघायला, ऐकायला मिळेल.
या स्थळावर अजून काही स्वारस्यपूर्ण सापडल्यास कृपया प्रतिसादात लिहावे.
अवांतर : या सारख्या तत्कालिन महत्वाच्या सूचना, सुचवण्या करण्यासाठीच खरेतर खरडफळा आहे असे वाटते. पण नासाच्या संस्थळाचा दुवा पुढे सुद्धा उपयोगी पडेल असे वाटल्याने लेख इथे लिहिला.
आपलाच,
--(ग्रहांकित) लिखाळ.
प्रतिक्रिया
1 Aug 2008 - 4:42 pm | स्वाती दिनेश
पाहते आहे रे...अप्रतिम!
आवाज मात्र नीट येत नाहीये,पण कोई बात नही..
स्वाती
1 Aug 2008 - 4:54 pm | चतुरंग
ग्रहण आता फारच छान बघता येतंय! केवढी सोय झाली वा वा!!
पुन्हा एकदा धन्यवाद!
मिपाकरांनो ग्रहण बघण्याची संधी सोडू नका!!
चतुरंग
1 Aug 2008 - 5:09 pm | मनस्वी
धन्यवाद लिखाळ.. माहितीपूर्ण दुवा दिलास.
बघतीये मी.. अप्रतिम.. सर्वांनी बघा..
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
1 Aug 2008 - 5:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुढच्या वर्षी भारतात जुलै महिन्यात खग्रास ग्रहण दिसणार आहे. दुर्दैवाने तो महिना पावसाचा असल्याने ग्रहण दिसेलंच असं नाही.
पण ९९ सालच्या ऑगस्टमधे आम्ही कच्छ मधे गेलो होतो आणि तेव्हा चंद्राची सावली प्रचंड वेगानी जमिनीवरून धावताना दिसली होती, ती फक्त ढगांमुळेच!
(ग्रहणामुळे खगोलशास्त्र आवडलेली) यमी
1 Aug 2008 - 5:30 pm | लिखाळ
आता प्रक्षेपण बहुधा बंद पडले आहे असे दिसते.
येथे मला ग्रहणाबद्दल काही माहिती मिळाली.
http://www.nasa.gov/topics/solarsystem/features/eclipse/index.html
http://www.exploratorium.edu/eclipse/2008/index.html
तसेच थेट प्रक्षेपणाचे दुवे सुद्धा तेथेच आहेत.
--लिखाळ.
1 Aug 2008 - 5:59 pm | मैत्र
अजून चालू आहे का? कुठे आहे त्या संस्थळावर ?
जर संपलं असेल तर कुठे व्हीडिओ आहे का ?